शांता शेळके यांची माहिती मराठी : Shanta Shelke Information In Marathi

शांता शेळके माहिती मराठी : Shanta Shelke Information In Marathi – मराठी साहित्यविश्वात आणि रसिकांच्या मनात अढळ पदावर असलेल्या शांता शेळके यांनी आपल्या मंत्रमुग्ध कवितेने अमिट छाप सोडली आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध संस्कृतीत मानवी भावना, निसर्ग आणि मानवी अनुभव यांची सखोल जाण असलेल्या शेळके यांच्या लेखणीने केवळ काव्यात्मक नव्हे तर प्रगल्भपणे उद्बोधक अशा रचना लिहिल्या गेल्या.

सामान्य क्षणांना सौंदर्याच्या असाधारण अभिव्यक्तींमध्ये रूपांतरित करण्याच्या त्यांच्या अलौकिक क्षमतेने, सांसारिक सौंदर्याचे क्षणभंगुर क्षण टिपून, त्यांना काव्यरत्नांमध्ये रूपांतरित करणाऱ्या शब्दांनी दिलेला मराठी साहित्यातील वारसा पिढ्यान्पिढ्यांना प्रेरणा देत राहील, याबाबत शंका नाही.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास शांता शेळके यांच्या जीवनाचा परिचय देणार आहोत. हा लेख तुम्ही शेवटपर्यंत सविस्तर वाचावा.

Table of Contents

शांता शेळके यांची माहिती मराठी : Shanta Shelke Information In Marathi

शांता जनार्दन शेळके ह्या मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध कवित्री व लेखिका होत्या. त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात तसेच पत्रकाराची भूमिका सुद्धा अतिशय उत्तमरीत्या बजावली. कथा, अनुवाद, बालसाहित्य, गाणे, हे शांता शेळके यांच्या कलाकृतींपैकी महत्त्वाचे भाग आहेत. त्यांनी अनेक साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदसुद्धा भूषवले. आशा भोसले, लता मंगेशकर, किशोरी आमोणकर यांच्यासोबत अनेक मराठी गायिकांनी शांता शेळके यांच्या काव्य लेखन संग्रहांचे गाण्याच्या रूपात सादरीकरण करून ही गाणी सुपरहिट बनवली.

नाव शांता जनार्दन शेळके
जन्म तारीख १२ ऑक्टोबर १९२२
जन्म स्थळ इंदापूर
शिक्षण हुजूरपागा, मुंबई विद्यापीठ, सर परशुरामभाऊ महाविद्यालय
ओळख कवियित्री, लेखिका
पुरस्कार गीतलेखन, सूरसिंगर, ग. दि .माडगुळकर पुरस्कार
मृत्यू ६ जून २००२
मृत्यू ठिकाण पुणे
मृत्यूचे कारण कर्करोग

शांता शेळके यांचा जन्म आणि शिक्षण

प्रसिद्ध लेखिका व कवयीत्री शांता शेळके यांचा जन्म पुण्यामधील इंदापूर या ठिकाणी दिनांक १२ ऑक्टोंबर १९२२ रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव हे जनार्दन शेळके होते. शांता शेळके यांनी प्राथमिक शाळेसाठी राजगुरुनगर या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयांमध्ये प्रवेश घेतला व त्या ठिकाणी त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण पूर्ण झाले.

पुढील उच्च शिक्षणासाठी, पुण्यामधील हुजूरपागा या हायस्कूलमध्ये त्यांनी उच्च शिक्षण घेतले. यानंतर, पुण्यामधील एसपी कॉलेजमध्ये त्यांनी बॅचलर ही पदवी प्राप्त केली. काही काळानंतर शांता शेळके मुंबईमध्ये येऊन, मुंबई विद्यापीठातून मराठी आणि संस्कृत मध्ये एम.ए करू लागल्या. त्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

Shanta Shelke Information In Marathi

शांता शेळके यांची कौटुंबिक माहिती

शांता शेळके यांचे संपूर्ण नाव शांता जनार्दन शेळके. त्यांचा जन्म १२ ओक्टोम्बर १९२२ रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे झाला. शांता शेळके यांच्या आईला म्हणजेच अंबिका बाईंना चित्रकलेची, वाचनाची आवड होती. त्या अतिशय मृदू स्वभावाच्या होत्या. त्यांच्या या वृत्तीचा कळत नकळत शांता शेळके यांच्यावर संस्कार होत होता. त्यांच्या वडिलांचे नाव हे जनार्दन शेळके होते. ते रेंज फॉरेस्ट ऑफिसर होते. 

शांताबाई शेळके यांचे आजोबा ( वडिलांचे वडील) हे शाळामास्तर होते. त्यांचे बालपण खेड, मंचर या परिसरात व्यतीत झाले. त्यांच्या वडिलांना त्या ‘दादा’ आणि आईला ‘वहीनी’ म्हणत असत. एकूण पाच भावंडात शांताबाई सगळ्यात मोठ्या होत्या. शांता बाईच्या वडिलांची नियमित बदली होत राहत असे. त्यामुळे चिखलदरा, नांदगाव, खर्डी या गावांतही त्यांना वास्तव्य करावे लागले. १९३० मध्ये शांताबाई नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे काविळीने निधन झाले. परिणामी, संपूर्ण कुटुंब पुण्यात त्यांच्या मामाच्या घरी स्थलांतरित झाले. त्यावेळी त्या चौथीत होत्या. 

नक्की वाचा 👉👉सिंधुताई सपकाळ माहिती मराठी

शांता शेळके यांची सुरुवातीची कारकीर्द

१९३८ मध्ये त्या मॅट्रीक झाल्या आणि पुण्याच्या स. प. महाविद्यालयातून बी. ए. झाल्या. प्रा. श्री. म. माटे, प्रा. के. ना. वाटवे, प्रा. रा. श्री. जोग यांच्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकाव्यतिरिक्त अवांतर वाचनाची, कवितेची गोडीही वाढत राहिली. या काळात साहित्याचे सखोल संस्कार त्यांच्यावर झाले.

कॉलेजच्या नियतकालिकासाठी त्यांनी एक लेख लिहिला. प्रा. माटे यांच्या त्यावरील अभिप्रायाने त्यांना लेखनासाठी हुरूप आला. हळूहळू त्या कविता, लेख, लिहू लागल्या. बी. ए. झाल्याबरोबर मुक्ता आणि इतर गोष्टी नावाचा त्यांचा एक कथासंग्रहही निघाला. याला प्रा. माटेसरांनी प्रस्तावना लिहिली.

१९४४ मध्ये संस्कृत घेऊन शांताबाई एम्. ए. झाल्या. या परीक्षेत त्यांना तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळाले. एम्. ए. झाल्यावर सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या समीक्षक मासिकात, नंतर नवयुग या अत्र्यांच्या साप्ताहिकात आणि दैनिक मराठात दोनतीन वर्षे काम केले.

विविध प्रकारच्या लेखनाच्या अनुभवाची शिदोरी त्यांना येथे मिळाली. अनेक साहित्याविषयक गोष्टी त्यांना इथे शिकायला मिळाल्या. नागपूरचे हिस्लॉप कॉलेज, मुंबईचे रूईया आणि महर्षी दयानंद महाविद्यालयात त्यांनी अनेक वर्षे अध्यापन केले.

शांता शेळके यांची कवयित्री म्हणून कारकीर्द

हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, प्रासंगिक गीते अशा विविध रूपातून त्यांची कविता आपल्याला भेटत असते. ‘रेशमाच्या रेघांनी लाल काळ्या धाग्यांनी’ सारख्या लावणी लिहिणाऱ्या शांताबाई या मराठीतील पहिल्या स्त्री लावणीकार होत.

बालसाहित्याच्या जगातही शांताबाई यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत.

माधव जूलिअन यांच्या काव्याचा त्यांच्यावर फार मोठा प्रभाव होता. त्यामुळे सुरुवातीला त्या वळणाची शब्दबंबाळ कविताच त्या लिहित राहिल्या. पण गोंदण (१९७५) पासून शांताबाईंची कविता कुणाच्याही अनुकरणापासून दूर असलेली कविता म्हणून, शांताबाईंच्या कवितेला चेहरा मिळाला. त्यांची कविता अधिकाधिक अंतर्मुख, चिंतनशील व प्रगल्भ होत गेली. बालपणाच्या सुखद आठवणी, प्रेम वैफल्य, मानवाच्या अपुरेपणाचा वेध, एकाकीपण, मनाची हुरहूर, सृष्टीची गूढता हे सारे काव्यविषय गोंदणपासून पुढील कवितेत अधिक प्रगल्भपणे प्रतिमारूप धारण करून वाचकांसमोर येतात

शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत.

वृत्तबद्ध कविता जशी त्यांनी लिहिली. तेवढ्याच सहजतेने त्यांनी गीते, बालगीते, सुनीते आणि मुक्तछंद रचनाही केल्या. ग. दि. माडगूळकरांप्रमाणेच उत्कृष्ट भावानुकूल चित्रपट गीते लिहिणारी गीत लेखिका म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली. गरजेनुसार, मागणीनुसार भालजी पेंढारकर, दिनकर द. पाटील, लता मंगेशकर, सुधीर फडके, हृदयनाथ मंगेशकर, सलील चौधरींसारख्या अनेक संगीत दिग्दर्शकांसाठी त्यांनी चालीबरहुकूम अशी अनेक गीते लिहिली. हृदयनाथ मंगेशकरांनी चाली दिलेली, सर्वांत गाजलेली लोकप्रिय गीते म्हणजे ‘वादळवारं सुटलं गं’, ‘वल्हव रे नाखवा’, ‘राजा सारंगा, राजा सारंगा’ ही होत. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिलेल्या वासवदत्ता आणि हे बंध रेशमाचे या दोन्ही नाटकांसाठी शांताबाईंनी गाणी लिहिली.

धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात.

अनुवादित कृतीला स्वतंत्र निर्मितीच्या जवळपास नेण्याची दृष्टी ठेवून अनुवादातून जवळजवळ पुनर्निर्मितीचा आनंद मिळावा ह्या गांभीर्याने शांता शेळके यांनी त्यांचे अनुवाद कार्य केले आहे. सौंदर्यदृष्टी, रसिकता, मानवी मनोभूमिका आणि सहजता ही शांता शेळके यांच्या साहित्याची वैशिष्टे होत. अवतीभवतीचा सामाजिक, सांस्कृतिक अवकाश त्यांनी याच सौंदर्यदृष्टीतून आणि सहजतेतून अभिव्यक्त केला आहे.

संतांच्या काव्यातील सात्विकता, पंडितांच्या काव्यातील विद्वत्ता आणि शाहिराच्या काव्यातील ललितमधुर उन्मादकता शांता शेळके यांच्या कवितेत आढळते. शांता शेळके यांच्या कथा ह्या त्यांनी बालपणी अनुभवलेल्या ग्रामीण जीवनाचे शब्दचित्र आहे. प्रौढ वयात अनुभवलेले शहरी जीवनातील अनुभवही नंतर त्यांच्या कथेत आले आहे. मनोविश्लेषण किंवा धक्कातंत्र या निवेदनशैलीचा वापर न करता अगदी सहज रोजच्या अनुभवाप्रमाणे त्यांच्या कथा अभिव्यक्त होतात. हीच बाब त्यांच्या ललित लेखनाबद्दल मांडता येते. रोजच्या दैनदिन अनुभवाला एक मानवी, वैश्विक स्तर देवून त्यांनी ललितलेखन केले आहे. मानवी जीवनाकडे बघण्याची कुतूहलपूर्ण दृष्टी, मानवी स्वभावाविषयीची उत्सुकता यापोटी मिळालेले अनुभव अतिशय चिंतनशिलतेतून शांता शेळके यांनी त्यांच्या ललितलेखनातून मांडले आहेत.

जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली.

“शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी “किलबिल किलबिल पक्षी बोलती”, “विहीणबाई विहीणबाई” अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले.

शांता शेळके यांचे योगदान

शांता शेळके यांनी मराठी साहित्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. कादंबरी, व्यक्तिरेखा, मुलाखती, कविता, कथा, समीक्षणे, परिचय, इत्यादी गोष्टींमध्ये त्यांनी नाविन्यता दाखवली आहे. शांता शेळके यांनी इंग्रजी चित्रपट उद्योगामध्ये सुद्धा महत्त्वाचे योगदान दिले आहे. तसेच त्यांनी वृत्तपत्रांचे स्तंभ प्रकाशित केले.

Shanta Shelke

मराठी साहित्यामधील योगदानाबरोबरच, मराठी गाण्याचे बोल निर्माण करण्यासाठी व अप्रतिम गाणे बनवण्यासाठी शांता शेळके प्रसिद्ध होत्या. १९५० मध्ये त्यांनी “राम राम पावनम” या चित्रपटासाठी पहिले गाणे बनवले. तसेच शांता शेळके यांनी  मराठी मधील प्रसिद्ध असणारी, “रेशमाच्या रेघांनी, लाल काळया धाग्यांनी” ही लावणी सुद्धा अतिशय सुंदररित्या बनवली होती. हि लावणी तितकीच सुपरहिट सुद्धा आहे.

१९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलानाच्या त्या अध्यक्षा होत्या. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. गीतांचे लावण्या, कोळीगीते असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले आहेत.

शांता शेळके यांचे कथासंग्रह 

  • सागरिका (१९९०)
  • गुलमोहोर (१९४९)
  • कविता करणारा कावळा (१९८७)
  • मुक्त (१९४४)
  • काचकमळ (१९६९)
  • बासरी (१९८२)
  • प्रेमिक (१९५६)
  • अनुबंध (१९८०)
  • सवाष्ण (१९७४)

शांता शेळके यांचे काव्यसंग्रह

  • जन्मजान्हवी (१९९०)
  • वर्षा (१९४७)
  • चित्रगीते (१९९५)
  • इत्यर्थ (१९९८)
  • रुपसी (१९५६)
  • अनोळख (१९८६)
  • गोंदण (१९७५)
  • पूर्वसंध्या (१९९६)
  • तोच चंद्रमा (१९७३)
  • निवडक शांता शेळके
  • रेशीमरेघा
  • ललित नभी मेघ चार
  • लेकुरवाळी
  • पावसाआधीचा पाऊस
  • एक गाणे चुलीचे
  • कविता विसावया शतकाची
  • कविता स्मरणातल्या
  • कळ्यांचे दिवस फुलांच्या राती
  • जाणता अजाणता

शांता शेळके यांचे ललित लेखन

शांता शेळके यांच्या ललित लेखनात शब्दांच्या दुनियेत, आनंदाचे झाड, धुडपाटी, पावसाआधीच पाऊस, एकपानी, वडिलधारी माणसं, संस्मरणें, मदारंगी, सांगावेसे वाटले म्हणून, इत्यादी पुस्तके समाविष्ठ होतात. 

शांता शेळके यांचे वर्तमानपत्रातील स्तंभ

  • ज्ञात निरक्षरता
  • पाण्याचे शरीर
  • मद्रांगी
  • त्यांचे काही वृत्तपत्रीय लेखन नंतर पुस्तकांच्या रूपात प्रकाशित झाले.

शांता शेळके यांचे अनुवादित साहित्य

मूळ लेखनाबरोबरच शांता शेळके यांनी बरेच ग्रंथ अनुवादितही केले आहेत. यामध्ये औट घटकेचा राजा, तालपुष्कर, चौघीजणी, गवती समुद्र, आंधळी, गाठ पडली ठका ठका, गाजलेले विदेशी चित्रपट, पाण्यावरल्या पाकळ्या, मेघदूत इत्यादी पुस्तकांचा समावेश होतो.  

Shanta Shelke

शांता शेळके यांच्या कादंबरी

  • कव्हर
  • पुनर्जन्म
  • मांत्रिक चिखलदर्यांचा
  • नरभक्षक
  • एक गडद सावली
  • माझा खेळ मांडू दे माझा खेळ मांडू दे माझा खेळ मांडू
  • ज्योती विजेती

शांता शेळके यांचे इतर साहित्य

  • झाड आनंदाचे
  • नाला पावसाचा
  • आठवणी
  • धूळ
  • अवद निवद
  • मानसे वडिलधारी

शांता शेळके यांची प्रसिद्ध गाणी shanta shelke songs list

ही कनकांगी कोण ललनाहे बंध रेशमाचेहे रान चेहऱ्यांचे
ही चाल तुरुतुरुहे श्यामसुंदर राजसाक्षणभर भेट आपुली
ही वाट दूर जातेमारू बेडूक उडी गड्यांनोमी आळविते जयजयवंती
मानत नाही श्याममी नवनवलाचे स्वप्‍नमी डोलकर डोलकर
विहीणबाई विहीणबाई उठाराम भजन कर लेनाविकल सांजवेळी
शारद सुंदर चंदेरीवहिनी माझी हसली गंविकल मन आज झुरत
वादलवारं सुटलं गोरेशमाच्या रेघांनीरूपास भाळलो मी
राघुमैना रानपाखरंरूपसुंदर सखी साजिरीमी ही अशी भोळी कशी गं
कशी कसरत दावतुया न्यारीकळले तुला काहीकळ्यांचे दिवस फुलांच्या
असेन मी नसेन मीअपर्णा तप करिते काननीअजब सोहळा
आले वयात मी बाळपणाचीअसता समीप दोघे हेअशीच अवचित भेटून जा
आली सखी आली प्रियामीलनाऋतु हिरवा, ऋतु बरवाएक एक विरते तारा
आला पाऊस मातीच्या वासातकर आता गाई गाईकशि गौळण राधा
आधार जिवाका धरिला परदेशआज चांदणे उन्हात हसले
हाऊस ऑफ बॅम्बूहा दुःखभोग साराहा माझा मार्ग एकला
स्वप्‍ने मनातली कास्वर्गाहुनही प्रिय आम्हांलाआज मी आळविते केदार
स्पर्श सांगेल सारीसूर येती विरून जातीसुख भरून सांडते
हिरव्या रंगाचा छंदअहो जाई क्ईच्या फुलाआई बघना कसा हा
सब गुनिजन मिल गावोसांग सांग नाव सांगसुकुनी गेला बाग
शालू हिरवा पाच निसांज आली दूरातूनसांगू कशी प्रिया मी
संपले स्वप्‍न तेसंगीतरस सुरससंपली कहाणी माझी
शूर अम्ही सरदारशोधितो राधेला श्रीहरीशोधू मी कुठे कशी
श्रावणसरीसाजणी सई गंसुखवितो मधुमास हा
आज मी निराधार एकलाआज सुगंध आला लहरतकाटा रुते कुणाला
कुणीतरी सांगा हो सजणाकान्हू घेउन जायकाय आणितोसी वेड्या
किलबिल किलबिल पक्षिकाय बाई सांगूजाईन विचारित रानफुला
खोडी माझी काढाल तरमाझ्या मायेच्या माहेरा माझ्या मना रे ऐक जर
माज्या सारंगा राजामाझी न मी राहिलेमाणुसकीचे पाईक आम्ही
माजो लवताय डावा डोळामाजे रानी माजे मोगामागते मन एक काही
माज्या मुखार गर्भच्छायामागे उभा मंगेशमला आणा एक हिऱ्यांची
मराठी पाउल पडते पुढेमनाच्या धुंदीत लहरीतमध्यरात्रिला पडे तिच्या
बाळ गुणी तू कर अंगाईबाळा माझ्या नीज नाबोल बोलना साजणा
घरपरतीच्या वाटेवरतीचंद्र दोन उगवलेचांदणं टिपूर हलतो वारा
जा जा रानीच्या पाखराजय शारदे वागीश्वरीजा जा जा रे नको बोलु
जायचे इथून दूरजिवलगा राहिले रे दूरझुलतो झुला जाई आभाळा
घन रानी साजणाझाला साखरपुडा गं बाईतुला न कळले मला न
जीवनगाणे गातच रहावेतळमळतो मी इथे तुझ्याविणतुझी सूरत मनात राया
जे वेड मजला लागलेतुझा गे नितनूतन सहवासगोंडा फुटला दिसाचा
जो जो गाई कर अंगाईगाव असानी माणसं अशीगीत होऊन आले सुख माझे
गगना गंध आलागजानना श्री गणरायागणराज रंगी नाचतो
छेडियल्या ताराचित्र तुझे हे सजीव होऊनडोळ्यांत वाकुन बघतोस
टप टप टप टाकित टापातुझा सहवासप्रीति जडली तुझ्यावरी
तू येता सखि माझ्याचांदण्या रात्रीतले तेबहरून ये अणुअणू
नको रे नंदलालापाऊस आला वारा आलापालखी हाले डुले
दूर कुठे चंदनाचे बनदिसते मजला सुखचित्रदाटून कंठ येतो
दुःख हे माझे मलादिवस आजचा असाच गेलादाटतो हृदयी उमाळा
तोच चंद्रमा नभातदशदिशांस पुसतोदैव किती अविचारी
ना नाना नाही नाहीना मानोगो तो दूँगीप्रीतफुले माझी सोनेरी
निळ्या अभाळी कातरवेळीनाही येथे कुणी कुणाचाप्राणविसावा लहरि सजण
पप्पा सांगा कुणाचेपहा टाकले पुसुनी डोळेपुनवेचा चंद्रम आला
पावनेर गं मायेला करूपायावरी प्रियाच्या सर्वस्वपाखरा गीत नको गाऊ

शांता शेळके यांच्या कविता

शांता शेळके यांच्या कविता

फुलांच्या जन्मवेळा ?

कोणत्या असतात
फुलांच्या जन्मवेळा ?

कळ्या फुलताना …
कि पाकळ्या गळताना ?

अथांग निळाई
प्राण एकवटून बघताना ,
कि निमूटपणे …

खालच्या मातीत ..
मिसळताना ?

प्रिय विणकरा शांत शेळके

असेन मी, नसेन मी

असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे
फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे

हवेत ऊन भोवती, सुवास धुंद दाटले
तसेच काहिसे मनी, तुला बघून वाटले
तृणांत फुलापाखरू तसे बसेल गीत हे

स्वयें मनात जागते, न सूर ताल मागते
अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते
उन्हें जळांत हालती तिथे दिसेल गीत हे

कुणास काय ठाउके, कसे कुठे उद्या असू
निळ्या नभांत रेखिली, नकोस भावना पुसू
तुझ्या मनीच राहिले, तुला कळेल गीत हे

हे विश्व प्रेमिकांचे शांता शेळके

सायंकाळी क्षितिजावरती

सायंकाळी क्षितिजावरती
मंदपणे मी करते लुकलुक
शांत राहुनी अपुल्या जागी
भवतालाचे बघते कौतुक !
अफाट वरती गगन पसरले
विशाल खाली पसरे धरती
मी सृष्टीची सुता लाडकी
मंद चमकते क्षितिजावरती

शूर-आम्ही-सरदार

मागे उभा मंगेश

मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !

जटाजूट माथ्यावरी
चंद्रकला शिरी धरी
सर्पमाळ रुळे उरी
चिताभस्म सर्वांगासी लिंपुन राहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !

जन्मजन्मांचा हा योगी
संसारी आनंद भोगी
विरागी, की म्हणू भोगी ?
शैलसुता संगे, गंगा मस्तकी वाहे
माझ्याकडे देव माझा पाहतो आहे !

शांता शेळके पुरस्कार आणि सन्मान

  • शांता शेळके यांना “भुजंग” साठी भारत सरकारचा “गीतलेखन” हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
  • १९९६ मध्ये शांताबाईंना ग.दि.माडगूळकर यांच्याकडून ग.दि.माडगूळकर हा पुरस्कार प्राप्त झाला.
  • शांताबाईंच्या “मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश” या गाण्यासाठी “सूरसिंगर” पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
  • २००१ मध्ये शांताबाई यांना मराठी साहित्यामधील योगदानाबद्दल “यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठा” पुरस्कार देऊन गौरविले.
  • गदिमा गीतलेखन पुरस्कार – 1996 मध्ये

शांताबाईं शेळके नांवावर देण्यात आलेले पुरस्कार

  • सुधीर मोघे यांना शांताबाईं पुरस्कार 2007 साली मिळाला.
  • शांताबाईं शेळके पुरस्कार (मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान) कवियित्री प्रज्ञा दया पवार यांना 2008 साली मिळाला .
  • शांताबाईं शेळके साहित्य पुरस्कार कवियित्री डॉ. प्रभा गणोरकर यांना 2012 साली मिळाला.
  • शांताबाईं शेळके साहित्य गौरव पुरस्कार (शांता शेळके प्रतिष्ठान मंचर) लेखक गोविंद गणेश अत्रे यांना 2015 मध्ये मिळाला.
  • शांताबाईं शेळके साहित्य पुरस्कार(मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर विभाग) ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना 2014 साली मिळाला होता.
  • शांताबाईं शेळके साहित्य पुरस्कार(मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर विभाग) ललित लेखक व निबंधकार श्रीनिवास कुलकर्णी यांना 2013 मध्ये मिळाला होता.

शांता शेळके यांच्याबद्दल पुस्तके

  • शांताबाई (अनिल बळेल)
  • शांताबाईची स्मृतीचित्रे (संपादक, यशवंत किल्लेदार)
  • शब्दव्रती शांताबाई (लेखिका, नीला उपाध्ये)
  • आठवणीतील शांताबाई (संपादक,शिल्पा सरपोतदार)

शांता शेळके यांचा मृत्यू

शांता शेळके प्रसिद्ध कवयित्री, लेखिका होत्या. अशा महान कवयित्रीचा मृत्यू कर्करोगाने दि. ०६ जून २००२ मध्ये झाला. अशा महान कलाकाराला, कवयित्रीला, लेखिकेला मनापासून नमन.

शांता शेळके माहिती मराठीप्रश्न

१. शांता शेळके यांचा जन्म कधी झाला ?

प्रसिद्ध लेखिका व कवियीत्री शांता शेळके यांचा जन्म पुण्यामधील इंदापूर, या ठिकाणी दिनांक १२ ऑक्टोंबर १९२२ रोजी झाला.

२. शांता शेळके यांचा मृत्यू कधी झाला ?

शांता शेळके प्रसिद्ध कवयित्री, लेखिका होत्या. अशा महान कवयित्रीचा मृत्यू कर्करोगाने दि. ०६ जून २००२ मध्ये झाला.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस प्रसिद्ध कवियित्री शांता शेळके यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment