सिंधुताई सपकाळ माहिती मराठी : Sindhutai Sapkal Information In Marathi

Sindhutai Sapkal Information In Marathi | सिंधुताई सपकाळ माहिती मराठी – अनाथांची माता, ज्यांना माई म्हणून ओळखले जायचं,  संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात ज्या आदरणीय स्त्रीच नाव घेतलं जाई, १००० पेक्षा जास्त अनाथ मुलांचे ज्या मातेने संगोपन केले, अश्या महान व्यक्तिमत्व म्हणजे सिंधुताई सपकाळ.

उतरले नव्हते अजून पाटीवरील शिक्षणाचे ओझे
लहानपणीच संसारात सांगा मन कसे रमले हिचे ?
हसण्या खेळण्याच्या दिवसात असे मातृत्व हे आले
सासरी नादतांना मात्र बालपण कधीच हरवले
सुखी संसारातले स्वप्न पाहिले मग मी काळे का दाटले ?
तुकड्या तुकड्याने काळीज फाटले, जेव्हा पतीनेही झिडकारले
इवलासा जीव कुशीत घेऊन भीक मागितली घरदार असून
मरण हि येईना थांबे पुढ्यात येऊन
पोटच्या गोळ्याची करून हाक ऐकून
नियतीने हि बघा हिला कशी फिरवली
मातेने ही कशी दूर लोटली
घरदार धनी असून देखील, पोरीला या अनाथ केली
पोरके झालेल्या लेकरांची आस हिला लागली
कुठे होती ? कुठे गेली ?
अनाथांची ही माय बनली. अनाथांची ही माय बनली.

.

Table of Contents

सिंधुताई सपकाळ माहिती मराठी : Sindhutai Sapkal Information In Marathi

आई कधीही पराभूत होऊ शकत नाही, स्त्री कधीही पराभूत होऊ शकत नाही, पण तिने मन खंबीर ठेवले पाहिजे आणि क्षमा करायला शिकले पाहिजे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सिंधुताई सपकाळ यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा

सिंधुताई जीवन परिचय (Sindhutai Sapkal Biography)

पूर्ण नावसिंधुताई सपकाळ
ओळखमाई, अनाथांची आई
जन्मतारीख १४ नोव्हेंबर १९४८
जन्मस्थळ वर्धा, महाराष्ट्र, भारत
वडील अभिमान साठे
पतीचे नावश्रीहरी सपकाळ
मृत्यू४ जानेवारी २०२२

कोण होत्या सिंधुताई सपकाळ ?

सिंधुताई सपकाळ या प्रख्यात व समर्पित सामाजिक महान कार्यकर्त्या असून अनाथ मुलांना जीवन देणाऱ्या व त्यांचा पालनपोषण करणाऱ्या एक महान कार्यकर्त्या व व्यक्तिमत्व होत्या. अनाथ मुलांची काळजी घेण्याचा निर्णय त्यांनी का घेतला ? याबद्दल त्या स्वतःच्या जीवनातील अनुभव सगळ्यांसमोर मांडतात व त्या गोष्टीमुळे अनाथ मुलांची काळजी घेण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.

सिंधुताई सपकाळाने विविध व्याख्याने दिली, त्या व्याख्यानांमधून, मुलाखतींमधून, सिंधुताई यांनी सांगितले की, अत्यंत त्रास सहन करून, गरजू व बेघर मुलांच्या पाठीशी आई म्हणून उभे राहून त्यांनी त्या मुलांचे भविष्य घडवले.

Sindhutai Sapkal

लहानपण हा प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा व आनंदाचा टप्पा असतो. त्या काळात प्रत्येक पालक आपल्या मुलावर मायेने प्रेम करतात व त्याचे लाड करतात व त्यांना त्यांच्या जगण्याचे उद्देश समजावतात. तरीही ज्या मुलाला पालक नाही, त्या मुलांचे बालपण हे अतिशय भयानक असते. अनाथ होऊन निवारा नसलेले जीवन जगणे हे जगातील मोठे दुःख आहे. सिंधुताई सपकाळ ह्या एक अशाच व्यक्तिमत्व आहेत. ज्यांनी अनाथांना सहारा देऊन, अनाथांची आई होऊन हजारो अनाथ मुलांसाठी देवाची देणगी बनली.

सिंधुताई यांचा जन्म आणि सुरुवातीचे जीवन

अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ १४ नोव्हेंबर १९४८ मध्ये महाराष्ट्रामध्ये जन्मलेले हे एक महान व्यक्तिमत्व. यांना आपण जरी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखत असलो, तरी सिंधुताईंना लोक प्रेमाने माई म्हणून ओळखत होते. सिंधुताई मुळच्या विदर्भातील वर्धा जिल्ह्यामधील पिंपरी मेघे. ही त्यांची जन्मभूमी. वडील अभिमान साठे हे गुरु पाळण्याचे काम करायचे, पिंपरी मेघेही अतिशय मागास असलेले व शहरी सुविधांचे स्पर्श नसलेले गाव.

कोणालाही शिक्षणाचा गंध नाही. अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावांमध्ये आले. अभिमान साठे यांची सर्वात मोठी मुलगी म्हणजे सिंधुताई. तिला लहानपणी चिंदी या नावाने पुकारले जायचे. सिंधुताईंना एक भाऊ आणि बहीण आहे. आपल्या मुलीने शिकावं अशी वडिलांची खूप इच्छा होती, पण आईने मात्र विरोध केला. म्हणून माईनचे बालपण गुरं राखण्यामध्ये गेले. पण इकडे माई चोरून शाळेत लपून जाऊन बसत होत्या.

पंडित जवाहरलाल नेहरू माहिती मराठी

सिंधुताई यांचा विवाह

अल्प वेळातच त्यांचे लग्न झाले. जेव्हा लग्न झाले, तेव्हा त्या १२ वर्षाच्या आणि पती जवळपास ३२वर्षाचे होते. वयामध्ये बरीचशी तफावत, घरामध्ये प्रचंड सासुरवास, आणि बरीच मेहनत या सगळ्या गोष्टींचा गाडा हाकत असताना अठराव्या वर्षापर्यंत माईनचे तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्यावेळी गर्भवती होता, तेव्हा त्यांना जीवनातील पहिला संघर्ष केला.

तेव्हा गुरे राखण हा त्यांचा व्यवसाय होता. गुरही शेकड्यांना असायची, त्यांचं शेण काढणं, असे करता करता अक्षरशः कंबर मोडायची आणि त्या शेण काढून अर्ध मेल्या होऊन जायच्या. आणि त्यावेळी त्यांना कोणतीही मजुरी मिळत नव्हती. म्हणून माईने तेव्हाच बंड पुकारला. माई हा लढा जिंकल्या, पण त्या लढ्याची किंमत त्यांना चुकवावी लागली.

सिंधुताई यांच्या जीवनातील पहिला संघर्ष

गावातील जमीनदार सिंधुताईच्या कार्यामुळे दुखावला गेला आणि जंगल खात्यातून त्यांना येणारी मिळकत बंद झाली. म्हणून गावात माईला एक नवीन गावकरी महिला म्हणून नेतृत्व मिळाले. या गोष्टीचा काटा काढण्यासाठी पोटातील मुल आपला असल्याचा खोटा प्रचार त्या जमीनदाराने सुरू केला. या गोष्टीमुळे सिंधूताईंच्या पतीने  त्यांच्या चरित्रावर संशय देखील घेतला. त्या रागात त्यांनी सिंधुताईला बेदम मारहाण केली व घराबाहेर काढून दिले. तसेच गावातल्यांनी त्यांना गावात घेतले नाही. मग शेवटचा आश्रय म्हणून त्या आपल्या घरी गेल्यात, आईनेही पाठ फिरवली.

त्याच्यानंतर मग मात्र वेळ आली होती.सिंधुताई सपकाळ यांच्या चारित्र्यावर त्यांच्या पतीने व गावकऱ्यांनी आरोप लावले व वयाच्या विसाव्या वर्षी सिंधुताई ज्यावेळी चौथ्यांदा गर्भवती असताना, नऊ महिन्याच्या गर्भवती सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या पतीने भरपूर मारहाण करून, गोठ्यामध्ये गायींच्या पायाखाली लाथा बुक्क्यांसाठी मरायला सोडले. त्या अर्ध मेल्या अवस्थेमध्ये गोठ्यातच सिंधुताई सपकाळ यांनी त्यांची मुलगी ममता हिला जन्म दिला.

Sindhutai Sapkal Information In Marathi

सिंधुताईंचे वैयक्तिक आयुष्य

मुलीच्या जगण्यासाठी व जिवंत राहण्यासाठी धडपड करत होत्या. स्वतःच्या पोटातील भूक भागवण्यासाठी सिंधुताईंनी रस्त्यावर, रेल्वे प्लॅटफॉर्मवर भीक मागायला सुरुवात केली.सिंधुताई भीक मागण्यासाठी परभणी, नांदेड, मनमाड, सारखे स्टेशनवर त्या भिक मागत असत. आणि स्टेशनवरच झोपत. परंतु एका स्त्रीला असणारी भीती या कारणाने एकटीने प्लॅटफॉर्मवर राहणे शक्य नसल्याने, सिंधुताई सपकाळ स्मशान भूमीमध्ये रात्र घालवत असे.

त्यावेळी त्यांच्यावर अशी अवस्था आली की, रात्री स्मशानात त्या जर लोकांना आढळून आल्यास, लोक त्यांना भूत म्हणायचे. पण पोटातल्या भुकेचा काय ? एक मृतदेह आला, अंत्यसंस्कार झाले, अंत्यविधी करून, लोक निघाले, तेव्हा कुठे एखादा पैसा हातावर पडेल, अशा आशेने माई चालू लागल्या. अखेर एकाला त्यांची दया आली. त्यांनी पीठ दिले, पैसे दिले, सिंधुताईनी मडक्यात पीठ काढून, चितेवरच्या निखार्‍यावर विस्तुवर भाजला. आणि कडक भाकरी केली. आणि तशीच खाल्ली.

सिंधुताई सपकाळ यांची मुलगी

वयाच्या विसाव्या वर्षी सिंधुताई ज्यावेळी चौथ्यांदा गर्भवती असताना, नऊ महिन्याच्या गर्भवती सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या पतीने भरपूर मारहाण करून, गोठ्यामध्ये गायींच्या पायाखाली लाथा बुक्क्यांसाठी मरायला सोडले. त्या अर्ध मेल्या अवस्थेमध्ये गोठ्यातच सिंधुताई सपकाळ यांनी त्यांची मुलगी ममता हिला जन्म दिला.सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीच्या नावावर त्याने दुसरे आश्रम स्थापन केले. त्या आश्रमाचे नाव “ममता बाल भवन” असे ठेवण्यात आले.

स्वतःची मुलगी ममता हिला माईनी दगडूशेठ हलवाई मंदिर सदृश्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे सांभाळण्यास दिले. ममता पुण्याच्या सेवा सदर मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या, पण एखाद्या दिवशी मुलांच्या उपाशी राहण्याची वेळ आली, तर बाकीचे मुले पाणी पिऊन झोपतील, ममताला पाहून माईंची माया जागृत झाली असती, आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते, पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता. म्हणून माईंनी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले.

नक्की वाचा 👉मदर टेरेसा माहिती मराठी 

सिंधुताई सपकाळ यांचे कार्य

  • माईच्या आयुष्यामध्ये एक प्रसंग घडला, पुण्यात माईने रस्त्यावर एक मुलगा रडत असताना दिसला. त्याला त्याचं केवळ नाव सांगता येत होतं. दीपक गायकवाड. माई त्याला पोलीस स्टेशनला घेऊन गेल्या, त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही, आणि उसकावून लावला. माईने तेव्हा त्याला सांभाळायचे ठरवले. असे पुढील महिन्याभरात भीक मागणारे दोन ते तीन मुले त्यांना भेटली. त्यांनाही माईंनी आपल्या पदराखाली घेतलं. व निराश व्यक्तीचे जगणे किती भयंकर असते, हे त्यांनी स्वतःला अनुभवले होते.
  • स्वतःची मुलगी ममता हिला माईनी दगडूशेठ हलवाई मंदिर सदृश्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे सांभाळण्यास दिले. ममता पुण्याच्या सेवा सदर मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या, पण एखाद्या दिवशी मुलांच्या उपाशी राहण्याची वेळ आली, तर बाकीचे मुले पाणी पिऊन झोपतील, ममताला पाहून माईंची माया जागृत झाली असती, आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते, पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता. म्हणून माईंनी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले.
  • जगण्याच्या या सततच्या धडपडीमध्ये सिंधुताई महाराष्ट्रामधील अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या ठिकाणी सापडली.महाराष्ट्रात मध्य प्रदेश सीमेवर मेळघाट टायगर रिझर्वसाठी स्थान निश्चिती होत होती. त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. या ठिकाणी व्याघ्र संरक्षण प्रकल्पामुळे ८४ आदिवासी गावे रिकामी करण्यात आली होती. या झालेल्या गोंधळात एका प्रकल्प अधिकाऱ्याने आदिवासी गावकऱ्यांच्या १३२ गायींना ताब्यात घेतले, आणि एका गाईचा मृत्यू झाला.
  • सिंधुताईंना गावकऱ्यांचे दुःख बघवले नाही, आदिवासी ग्रामस्थांच्या योग्य पुनर्वसनासाठी सिंधुताईंनी लढा देण्याचा निर्णय हाती घेतला. माईनने या आदिवासी लोकांना बाजू शासनासमोर मांडली. आणि त्यांना न्याय मिळवून दिला. तिचे प्रयत्न वन्यमंत्र्यांनी मान्य केले आणि पर्यायी स्थलांतरासाठी योग्य ती व्यवस्था केली. अश्या प्रकारे सिंधुताईने अजून एक लढाई जिंकली होती. अशा अनेक लढाया माई रोजच लढत होत्या.
  • आज महाराष्ट्रात सिंधुताई यांचे चार अनाथ आश्रम आहे. काही वर्षांपूर्वी माईने चिखलदऱ्यात एक वसतीगृह सुरू केले. आज बऱ्याच मुली तिथं शिक्षण घेतात.
  • कत्तलखान्यात पाठवल्या जाणाऱ्या वृद्ध गाईंना वाचवण्यासाठी, व त्यांना नवीन जीवन देण्यासाठी सिंधुताईंनी गोपिका गाई संरक्षण केंद्र, गोआश्रय केंद्राची ही स्थापना केली.

सिंधुताईंचे सामाजिक कार्य आणि कुटुंब

फुलांच्या पाय घड्यावरून चालताना काटे बोचले तर सहन करायला शिका, कारण काट्यांना फक्त बोचणं माहित असतं. वेदना कळत नसतात. म्हणून काट्यांशी दोस्ती करा. तुम्ही इतके पाय मजबूत करा की, एक दिवस काटे तुम्हाला सांगतील. आईए, वेलकम, सुस्वागतम, हम झुकते है तुम चलना सीखो.

Sindhutai Sapkal Information In Marathi

सिंधुताई सपकाळ यांची जीवनगाथा ही अविश्वसनीय, अतुलनीय जिद्द आणि इच्छाशक्ती आहे. सिंधुताईंच्या खडतर जीवन संघर्षामध्ये सुद्धा सिंधुताईंनी अनाथ मुलांना दत्तक आणि पालनपोषणासाठी आपले जीवन समर्पित केले. यानंतर सिंधुताईंनी महाराष्ट्र राज्यामध्ये आश्रम बांधले. ज्या आश्रमामध्ये मुलांना अन्न, निवारा व शिक्षण देण्याचे कार्य केले गेले. निवारागृहे चालवण्याचे काम हे सोपे नाही. यासाठी सिंधुताई सपकाळ त्यांच्या आश्रमासाठी निधी उभ्या करण्यासाठी अतोनात कष्ट करत, कोणाकडूनही आर्थिक मदत न घेता त्यांनी त्यांच्या जीवनाची कहाणी व्यासपीठांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली.

सिंधुताई सपकाळ यांनी त्यांच्या उत्कृष्ट भाषणाद्वारे सांगितले की त्यांची कथा सर्वत्र सामायिक केली जावी. जेणेकरून इतरांना जीवनातील अडचणीवर मात करण्यास प्रेरणा मिळेल. सिंधुताई सपकाळ यांना मिळालेल्या प्रसिद्धीमुळे, सिंधुताई सपकाळ यांच्या व्यक्तिमत्त्वावर कधीच परिणाम झाला नाही. मुलांसोबत राहणे बागडणे, त्यांची स्वप्न पूर्ण करणे आणि त्यांना जीवनामध्ये स्थिर करणे, यामध्ये सिंधुताई स्वतःचे हित मानत.

सिंधुताई सपकाळ अर्थात माय या आपल्या महाराष्ट्र राज्यांमधील एक महान सामाजिक कार्यकर्त्या. सिंधुताईंनी समाजातील अनाथ मुलांच्या कल्याणासाठी हुरहुरीने प्रयत्न केला. त्यांनी विविध अनाथाश्रमे बांधून अनाथ मुलांना सहारा देऊन, काहींना वकील, काहींना डॉक्टर, अशा रीतीने जीवनामध्ये यशस्वी बनवले. सिंधुताई या मायाळू होत्या. त्यांना १००० नातवंडे आहेत.

सिंधुताईंनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी समर्पित केले. उत्पन्नाचा कोणताही स्त्रोत सिंधुताईंकडे उपलब्ध नसतानाही, त्यांनी मुलांवर आपल्या मुलांसारखेच प्रेम केले. त्यांचे पालन पोषण केले. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःवर घेतली. मुलांना सांभाळते तर आहे, परंतु त्यांच्या पुढील जेवणाचे कसे काय करावे? याचा प्रश्न त्यांनी मनात न बाळगता, अनाथ मुलांना सांभाळण्याचे मोठे धाडस दाखवले.

मुलांच्या संगोपनासाठी कोणाकडेही पदर न पसरवता. स्वाभिमानाने सिंधुताईंनी पैसे कमावण्यासाठी जगभरातील विविध संस्थानांमार्फत लोकांना भाषणे दिलेत. त्यांनी केलेल्या त्यांच्या कार्याला अधिकृत मान्यता नव्हती किंवा त्यांच्या आश्रमांना सरकारने कोणतेही अनुदान दिले नाही. यामुळे त्या थोड्या निराश झाल्यात, परंतु लोकांनी सिंधुताईंना व त्यांच्या सामाजिक कार्याला सबळ हाताने मदत केली.

सिंधुताईंचा नवरा ८० वर्षाचा असताना सिंधुताईंकडे परत आला. त्याने सिंधुताईंची क्षमा मागितली. त्यावेळी सिंधुताई आपल्या नवऱ्याची फक्त आई म्हणून सेवा करू इच्छित होत्या. असे बोलून त्यांनी नवऱ्याच्या चुका माफ केले. स्वतःच्या नवऱ्याची ओळख सिंधुताई तिचा सर्वात मोठा मुलगा म्हणून करून देत असे.

सिंधुताईंची संस्था (Institute of Sindhutai in Marathi)

सिंधुताई यांनी सर्वात पहिला मुलगा दत्तक घेतला त्यात दत्तक मुलाचे नाव दीपक असे होते. जो सिंधुताईंना रेल्वे ट्रॅक वर सापडला होता. लवकरच सिंधुताईंनी १६ मुले दत्तक घेतली या मुलांच्या सांभाळासाठी सिंधुताईंनी चिखलधारा येथे सर्वप्रथम आश्रम उघडला. पैसे देणाऱ्या लोकांनी सिंधुताईंकडे त्या सामाजिक कार्यासाठी उचित पावती मागितली, त्यामुळे तिला एनजीओची गरज जाणवली.

म्हणून सिंधुताई सपकाळ यांनी अमरावती मधील चिखलधारा येथे “वनवासी गोपाळकृष्ण शिक्षण” एवं “क्रीडा प्रसारक मंडळ फाउंडेशन” अंतर्गत “सावित्रीबाई फुले मुलींचे वस्तीगृह” ही सिंधुताई सपकाळ यांची पहिली एनजीओ स्थापन करून नोंदणी करण्यात आली. सिंधुताई सपकाळ यांचे हे एनजीओ आज त्यांनी सांभाळलेल्या मुलांपैकी चार मुले चालवतात.

सिंधुताईनी ममता बाल सदन संस्था स्थापन केली – सिंधुताई सपकाळ आश्रम

दीपक हा सिंधुताई सपकाळ यांना भेटलेला सगळ्यात पहिला मुलगा. जो त्यांनी दत्तक घेतला होता जो आता मोठा झाल्यावर सुद्धा, सिंधुताईंना सोडून जाण्यास नकार देत होता. सिंधुताई सपकाळ यांच्या मुलीच्या नावावर त्याने दुसरे आश्रम स्थापन केले. त्या आश्रमाचे नाव “ममता बाल भवन” असे ठेवण्यात आले.अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला.

या संस्थे मार्फत लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते, त्यांच्या भोजन, कपडे, अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील, यासाठी त्यांना मार्गदर्शन केले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे, आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे. हे कार्य ही संस्थेकडून केले जाते.

नक्की वाचा 👉 बाळूमामा यांची संपूर्ण माहिती मराठी

सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने, प्रदेश दौरे केले. आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर, त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे, या हेतूने त्यांनी “मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची” स्थापना केली आहे.

सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे

  • बाल निकेतन हडपसर, पुणे
  • सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह ,  चिखलदरा
  • अभिमान बाल भवन, वर्धा
  • गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
  • ममता बाल सदन, सासवड
  • सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

कवयित्री सिंधुताई सपकाळ माई

मला जाळू नका, जमिनीत गाडून टाका…!

खरंच… मी जेव्हा जमीनदोस्त होईल
सोबत काय येईल, मागे काय राहील?
दुर्दैवाने खडक फोडले,
दुःख जहाल मूर्तिमंत उभं आयुष्य गेलं
ना खेद ना खंत
ह्यातूनच नवी पहाट उद्याचं स्वप्न पाहिलं…
अनेकांना जवळ केलं, देताल तेवढे दिलं
आता थकले रस्ते, मनही खुणावते धीरे आस्ते
संपेल आयुष्याच तेल, पणती विजून जाईल…
सातपुडा उरी फुटेल
चिखलदऱ्याचा धीर सुटेल
वासराच्या गाई हंबरतील
पशुपक्षी ‘भैरवी’ गातील
स्तब्ध होतील वादळवारे
कडेकपारी आणि झरे
दुरावलेल्या भाग्याचं मी ‘अहेव’ लेण येईल
मातीचा पदर पांघरून मला ‘धरती’ पोटात घेईल…!

सिंधुताई सपकाळ यांचे विचार (Thoughts Of Sindhutai Sapkal in Marathi)

  • सगळ्या जगाला माफ करायची ताकद फक्त आईमध्ये असते.
  • दुसऱ्याचे दुःख वाटून घेतले की माणूस स्वतःचे दुःख आपोआप विसरतो.
  • माणूस कधीचं वाईट नसतो. माणसाच्या पोटाची भूक वाईट असते.
  • मला जीवन जगण्याचा मार्ग आणि आत्मविश्वास स्मशानभूमीतून मिळाला.
  • जीवनात कधी संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे रहा, त्यामूळे संकटांची उंची कमी होईल.
  • जर तुम्हाला स्वतःसाठी जगायचे नसेल तर इतरांसाठी जगायला शिका.
  • माझं पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाही कारण या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं.
  • दुःखी माणसाचे दुःख फक्त दुःखी माणूसच समजू शकतो.
  • मला जर सावलीच मिळाली असती तर उन्हाचे चटके कळाले नसते. मला चटके बसले त्यामुळे दुसऱ्याचे चटके पटकन कळाले.
  • तुम्ही खूप मोठे व्हा परंतु मातीशी असलेले नाते कधीही विसरु नका.

सिंधुताई सपकाळ – पुरस्कार व गौरव

  • सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
  • पद्मश्री पुरस्कार (२०२१)महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
  • पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (२०१२)
  • महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (२०१०)
  • मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
  • आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
  • सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
  • राजाई पुरस्कार
  • शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
  • श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा ‘सामाजिक सहयोगी पुरस्कार’ (१९९२)
  • सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला ‘रिअल हीरो पुरस्कार’ (२०१२).
  • २००८ – दैनिक लोकसत्ताचा ‘सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार’.
  • प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)
  • डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)
  • पुणे विद्यापीठाचा ‘जीवन गौरव पुरस्कार’
  • पद्मश्री पुरस्कार (२०२१).

सिंधुताई सपकाळ यांची मुलाखत

सिंधुताई सपकाळ यांच्यावरील चित्रपट

  • सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.
  • सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.

सिंधुताई सपकाळ यांचा मृत्यू

सामाजिक कार्यकर्ते आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कार्यकर्त्या, सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या कार्याचा ठसा जनमानसातून ठेवणाऱ्या व्यक्तींमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव आदराने घेतले जाते.

सिंधुताई सपकाळ यांचा प्रेरणादायी प्रवास दर्शवतो की, एका वचनबद्ध, निष्ठावान व दृढ निश्चय व्यक्तीसाठी कोणत्याही गोष्टी अशक्य नाही. सिंधुताई या माणुसकीचे प्रतीक आहे. वंचित पत्नीपासून, ते रस्त्यावर भीक मागण्यापर्यंत, ते आता अनाथ आणि असाह्य मुलांची आई बनली आहे, त्या म्हणजे सिंधुताई सपकाळ.

अधिकृत वेबसाइट – Sindhutai Sapkal Official Website

अधिकृत वेबसाइट 👉 सिंधुताई सपकाळ

सिंधूताईंच्या जीवनावर कविता (Poem On Sindhutai Sapkal in Marathi)

गरिबांची माय तू अनाथांची आई तू
दिन दुबळ्यांची सावली तू कलियुगातील देवी तू
तुझ्या वनवासाच्या किती सांगू व्यथा
शब्दात नाही मांडता येत, तुझ्या संघर्षाची कथा
दुःखाचे चढूनी डोंगर तुडविल्या अवघड वाटा
अनुवाणी चालताना माय रुतला असेल खोलवर काटा
घरदार सुटलं माय पण संसार नाही सुटला
जगाचा संसार केला पण डोक्यावरचा पदर नाही हटला
चूल आणि मूल या पलीकडे उभा दिसला, माय तुझा संसार
तिलांजली दिली सुखाला


दुःखातच दिसला तुझ्या जीवनाचा खरा सार
आज कोणी नाही अनाथ कोणीच नाही तुझ्यासारखे
माई तुझ्या छायेतील लेकरं
निडर आणि दुःख पारखे
हजारो मुलांच्या स्वप्नांना पंख देणारी
अनाथांना नाथ करून जाणारी
स्वतः जेवली नसताना दुसऱ्यांना भरवणारी
स्वतःच मूल सोडून काळजावर दगड ठेवणारी
स्वतःचा संसार मोडला म्हणून अख्या जगाचा संसार चालवणारी
कलियुगातली लक्ष्मी देवी
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ
तुला कोटी कोटी प्रणाम

सिंधुताई सपकाळ यांच्या वर १० ओळी (10 Lines On Sindhutai Sapkal in Marathi)

  • 1. सिंधुताई सपकाळ या प्रख्यात व समर्पित सामाजिक महान कार्यकर्त्या असून अनाथ मुलांना जीवन देणाऱ्या व त्यांचा पालनपोषण करणाऱ्या एक महान कार्यकर्त्या व व्यक्तिमत्व होत्या.
  • 2. अनाथांची माता, ज्यांना माई म्हणून ओळखले जायचं, संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात या आदरणीय स्त्रीच नाव घेतलं जाई
  • 3. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1948 रोजी महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पिंपरी मेघे गावात झाला.
  • 4. शेकडो अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कामासाठी त्या ओळखल्या जात होत्या.
  • 5. त्यांचे वयाच्या 10 व्या वर्षी लग्न झाले होते आणि त्यांचे आयुष्य खूप आव्हानात्मक होते.
  • 6. सिंधुताई यांनी 1000 हून अधिक अनाथ मुलांना दत्तक घेतले आणि त्यांना चांगले जीवन दिले.
  • 7. सिंधुताई यांना 2021 मध्ये पद्मश्री आणि 2010 मध्ये अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 8. सिंधुताई यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी 700 हून अधिक पुरस्कार मिळाले होते.
  • 9. भारताच्या या महान कन्येचे 4 जानेवारी 2022 रोजी निधन झाले.
  • 10. सिंधुताई सपकाळ यांचे जीवन लाखो लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहे आणि समाजासाठी तिच्या उदात्त सेवेसाठी ती स्मरणात राहील.

FAQ

१. सिंधुताई सपकाळ यांची संघर्षगाथा काय आहे?

सिंधुताई भीक मागण्यासाठी परभणी, नांदेड, मनमाड, सारखे स्टेशनवर त्या भिक मागत असत. आणि स्टेशनवरच झोपत. स्टेशनवर उघड्यावर राहणं शक्य नसल्याने, ते स्मशानात राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचा काय ? एक मृतदेह आला, अंत्यसंस्कार झाले, अंत्यविधी करून, लोक निघाले, तेव्हा कुठे एखादा पैसा हातावर पडेल, अशा आशेने माई चालू लागल्या. अखेर एकाला त्यांची दया आली. त्यांनी पीठ दिले, पैसे दिले, सिंधुताईनी मडक्यात पीठ काढून, चितेवरच्या निखार्‍यावर विस्तुवर भाजला. आणि कडक भाकरी केली. आणि तशीच खाल्ली.

२. सिंधुताई सपकाळ यांना किती पुरस्कार मिळाले?

सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
पद्मश्री पुरस्कार (२०२१)महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)
पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार’ (२०१२)
महाराष्ट्र शासनाचा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ (२०१०)
मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६) आदी पुरस्कार मिळाले आहे.

३. सिंधुताई सपकाळ यांच्याकडून आपण काय शिकू शकतो?

कोणत्याही प्रसंगी धैर्य सोडून न जाता, खंबीरपणे प्रत्येक संकटाचा सामना करून आयुष्य जगणे व इतरांचा विचार करून, इतरांना सुद्धा मदत करणे, इत्यादी. बऱ्याच गोष्टी सिंधुताई सपकाळ यांच्याकडून या शिकता येतात.

४. सिंधुताई सपकाळ यांचे पूर्ण नाव काय?

अनाथांच्या आई सिंधुताई सपकाळ १४ नोव्हेंबर १९४८ मध्ये महाराष्ट्रामध्ये जन्मलेले हे एक महान व्यक्तिमत्व. यांना आपण जरी सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळखत असलो, तरी सिंधुताईंना लोक प्रेमाने माई म्हणून ओळखत होते. सिंधुताई मुळच्या विदर्भातील वर्धा जिल्ह्यामधील पिंपरी मेघे. ही त्यांची जन्मभूमी.

५. सिंधूताई सपकाळ यांच्या मुलीचे नाव काय?

वयाच्या विसाव्या वर्षी सिंधुताई ज्यावेळी चौथ्यांदा गर्भवती असताना, नऊ महिन्याच्या गर्भवती सिंधुताई यांना त्यांच्या पतीने भरपूर मारहाण करून, गोठ्यामध्ये गायींच्या पायाखाली लाथा बुक्क्यांसाठी मरायला सोडले. त्या अर्ध मेल्या अवस्थेमध्ये गोठ्यातच सिंधुताई सपकाळ यांनी त्यांची मुलगी ममता हिला जन्म दिला. सिंधुताई यांच्या मुलीच्या नावावर त्याने दुसरे आश्रम स्थापन केले. त्या आश्रमाचे नाव “ममता बाल भवन” असे ठेवण्यात आले.

६. सिंधुताई सपकाळ यांनी स्वतःच्या मुलीसोबत काय केले?

स्वतःची मुलगी ममता हिला माईनी दगडूशेठ हलवाई मंदिर सदृश्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे सांभाळण्यास दिले. ममता पुण्याच्या सेवा सदर मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या, पण एखाद्या दिवशी मुलांच्या उपाशी राहण्याची वेळ आली, तर बाकीचे मुले पाणी पिऊन झोपतील, ममताला पाहून माईंची माया जागृत झाली असती, आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते, पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता. म्हणून माईंनी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाशी घातले.

७.सिंधुताई सपकाळ यांना किती मुले होती?

अनाथांची माता, ज्यांना माई म्हणून ओळखले जायचं,  संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात ज्या आदरणीय स्त्रीच नाव घेतलं जाई. १००० पेक्षा जास्त अनाथ मुलांचे ज्या मातेने संगोपन केले, अश्या महान व्यक्तिमत्व म्हणजे सिंधुताई सपकाळ.

८. महाराष्ट्रात अनाथांची आई म्हणून कोणाला ओळखले जाते?

सामाजिक कार्यकर्ते आणि अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, कार्यकर्त्या, सिंधुताई अर्थात माई या आपल्या महाराष्ट्र राज्यांमधील एक महान सामाजिक कार्यकर्त्या. सिंधुताईंनी समाजातील अनाथ मुलांच्या कल्याणासाठी हुरहुरीने प्रयत्न केला. त्यांनी विविध अनाथाश्रमे बांधून अनाथ मुलांना सहारा देऊन, काहींना वकील, काहींना डॉक्टर, अशा रीतीने जीवनामध्ये यशस्वी बनवले. वंचित पत्नीपासून, ते रस्त्यावर भीक मागण्यापर्यंत, ते आता अनाथ आणि असाह्य मुलांची आई बनली आहे, त्या म्हणजे सिंधुताई सपकाळ.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सिंधुताई सपकाळ यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment