अण्णाभाऊ साठे माहिती मराठी : Annabhau Sathe Information In Marathi

अण्णाभाऊ साठे माहिती मराठी : Annabhau Sathe Information In Marathi – १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट १९४७ रोजी मुंबईच्या रस्त्यावर सुमारे वीस हजार लोकांचा मोर्चा निघाला. या मोर्चाचे नेतृत्व करत होते, अण्णाभाऊ साठे. या मोर्चामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी घोषणा दिली. “ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी है”

आज लेखाद्वारे आम्ही आपणास साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे यांच्या बद्दल महिती दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.

Table of Contents

अण्णाभाऊ साठे माहिती मराठी : Annabhau Sathe Information In Marathi

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक उत्कृष्ट लेखक, लोककवी, आणि समाजसुधारक होते. त्यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालला देणारे होते. महाराष्ट्राच्या जडणघडणेत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान महत्वपूर्ण आहे. आजही विद्यार्थी व अभ्यासक त्यांनी लिहिलेल्या साहित्याचा संशोधक अभ्यास करतात.

अण्णाभाऊ यांनी मराठी भाषेत ३५ कादंबरया लिहिल्या. त्यामध्ये फकीरा ही कादंबरी अत्यंत लोकप्रिय आहे. या कादंबरीला राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे. त्यांनी अनेक पोवाडे आणि लावण्या देखील लिहिलेले आहेत.

अण्णाभाऊ साठे यांचा अल्प परिचय

पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे
टोपण नाव अण्णा भाऊ साठे
जन्मतारीख १ ऑगस्ट १९२०
जन्म ठिकाण वाटेगाव, तालुका वाळवा, सांगली जिल्हा, महाराष्ट्र, भारत
वडिलांचे नाव भाऊराव साठे
आईचे नाव वालबाई साठे
पत्नीचे नाव कोंडाबाई साठे,
जयवंता साठे
मुलांची नावे मधुकर, शांता आणि शकुंतला
व्यवसाय लेखक, साहित्यिक
अण्णांचे आदर्श बाबासाहेब आंबेडकर, श्रीपाद अमृत डांगे, कार्ल मार्क्स
मृत्यू १८ जुलै १९६९

कोण आहेत अण्णाभाऊ साठे ?

प्रसिद्ध लेखक, आणि साहित्यिक वि.स.खांडेकर हे अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी म्हणतात “अण्णाभाऊंच्या वस्तीत अथवा लिखाणात विनोद नसतो, असं नाही. पण त्यांचा प्रकृती धर्म आहे गंभीर लेखकाचा, ज्यानं फार भोगले आहे. सात पडद्यातून नव्हे तर, समोरासमोर जीवनातल्या क्रूर सत्याचं ज्याला दर्शन घडलं आहे, अशा लिहिणाऱ्या साहित्यिकाचा आत्मा त्यांना लाभला आहे”. म्हणून साहजिकच त्यांच्या गोष्टी मोठ्या वैशिष्ट्यपूर्ण असतात.

म्हणून तत्कालीन सर्व मोठ्या कथाकारांपेक्षा ते निराळे आहेत. या लेखकाला प्रतिभेचे देणं लाभलं आहे. जीवनात हार करण्याच्या गोष्टींचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांच्या मनात एक प्रकारचा पीळ आहे. ते अन्यायाविरुद्ध बंड उभारणाऱ्या वृत्तीचे पूजक आहेत. अशा या थोर लेखकाला, झुंजार व्यक्तिमत्त्वाच्या समाजसुधारकाला, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ यांना मानाचा मुजरा.

अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे यांचा जन्म आणि बालपण

अण्णा भाऊ साठे यांना साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाते. अण्णाभाऊ साठेंचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या, वाटेगाव नावाच्या गावात मातंग या समाजात म्हणजेच, दलित समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे होते. तर आईचे नाव वालुबाई साठे असे होते. त्यांचे वडील अत्यंत गरीब असल्याने, मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांची आई दोर ओढण्याच्या कामाला जात असे.  

अण्णाभाऊ साठे यांचे शिक्षण

अण्णाभाऊ यांचे शालेय शिक्षण झाले नव्हते. अण्णाभाऊ यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले. त्यांचा शाळेशी जास्त काय संबंध आला नाही. कारण ते एक फक्त दीड दिवस शाळेत गेले. नंतर तिथे जातीपातीवरून होणाऱ्या भेदभाव त्यांच्या मनाशी काही रुचला नाही. आणि म्हणून अण्णाभाऊ साठे यांनी शाळा व शिक्षणाचा त्याग केला. त्यांचे वडील भाऊराव साठी मुंबई येथे काम करण्यासाठी गेले होते.

गावाकडे अण्णाभाऊ आणि त्यांचे आई व भावंडे राहत असत. मुंबईमध्ये शिक्षण घेणारी मुलं पाहिली की भाऊराव यांना वाटी की आपल्या मुलांनी शिकावं मोठं व्हावं. त्यामुळे परत एकदा त्यांनी अण्णाभाऊंना शाळेत पाठवले. परंतु तिथल्या शिक्षकांनी परत उच्च नीच यावरून त्यांना मारहाण करून, घरी पाठवले. तेव्हापासून पुन्हा त्यांचा आणि शाळेचा प्रवास संपला. परंतु सर्वजण त्यांना अण्णाभाऊ या नावाने ओळखतात.

अण्णाभाऊ यांना शिक्षणाची आवड कशी निर्माण झाली ?

अण्णाभाऊ साठे

त्या काळात जातीभेद अस्पृश्यता जास्त प्रमाणात असल्यामुळे काही दिवसानंतर ते सर्व कुटुंबाच्या सोबत मुंबईला आले. एका छोट्याशा चाळीत ते एका खोलीत राहू लागले. काहीतरी काम करावं, म्हणून ते कामाच्या शोधात फिरू लागले. तेव्हा त्यांना अनेक माणसे भेटली खरंतर इथूनच त्यांची वैचारिक यात्रा सुरू झाली. काही दिवसातच त्यांना एका कपडे विक्रेत्याकडे काम मिळाले. मग ती गल्ली बोळत फिरून कपडे विकत घेत. असेल हे काम करत असताना त्यांची भेट ज्ञानदेव नावाच्या नातेवाईकांची झाली. काही दिवसानंतर त्यांच्या दोघात जवळीक निर्माण झाली.

ज्ञानदेव हे कलावंत असल्याने त्यांना अनेक ग्रंथांचे ज्ञान होते. त्यांनी हिंदू धर्मातील अनेक ग्रंथ अण्णाभाऊ यांना सांगितले. त्यांनीही ती आवडीने पाठ केली. तेथून पुढे पुन्हा एकदा शिकण्याची इच्छा निर्माण होऊन, अण्णाभाऊ यांनी शिकण्याचा ध्यास घेतला. काही दिवसातच शिकण्याचा ध्यास घेतलेले अण्णाभाऊ साठे यांना हळूहळू अक्षर ओळख व्हायला लागली.

त्या काळात ब्रिटिश सरकारला हाकलून देण्यासाठी अनेक राजकीय पक्ष व संघटना तयार झाल्या होत्या. परंतु वेगवेगळ्या पक्षाची विचारसरणी वेगळी होती. अण्णाभाऊ यांच्यावर देखील त्या काळात कम्युनिस्ट पक्षाचा प्रभाव पडला होता. त्यामुळे ते पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होऊ लागले. त्यांच्याकडे असलेली गायनाची कला व लेखनाची आवड यामुळे ते सर्व लोकांचे प्रिय होत गेले.

अण्णाभाऊ साठे यांच्या गुरुचे नाव

दलवाई हे एक प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते, ज्यांनी समाजातील उपेक्षित घटकांच्या, विशेषतः मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी अथक परिश्रम घेतले. ते धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि सामाजिक न्यायाचे जोरदार समर्थक होते आणि अण्णा भाऊ साठे यांच्या स्वतःच्या राजकीय आणि सामाजिक विचारांवर त्यांच्या विचारांचा खोलवर परिणाम झाला. अण्णा भाऊ हे त्यांचे गुरू, समाजवादी नेते आणि विचारवंत हमीद दलवाई यांच्यावर खूप प्रभावित होते.

अण्णाभाऊ साठे यांच्यावर कोणाच्या विचारसरणीचा प्रभाव होता ?

अण्णाभाऊ कवी, लेखक, आणि समाज सुधारक होते. ते कृतिशील लेखक होते. सामाजिक आणि राजकीय विषयांवर त्यांनी लेखन केले. अण्णाभाऊ साठे पहिल्यांदा कॉम्रेड श्रीपाद, अमृत डांगे, यांच्या विचाराने म्हणजेच कम्युनिस्ट विचाराने प्रभावित झाले होते.

अण्णाभाऊ साठे यांचे कार्य

  • शाहीर दत्ता गव्हाणकर आणि शाहीर अमर शेख यांच्याबरोबर त्यांनी १९४४ मध्ये लालबावटा कलापथक स्थापन केले. या कलापथकांच्या माध्यमातून, त्यांनी अनेक सरकारी निर्णयांना आव्हान देण्याचे कार्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त उच्चवर्णी यांनी देशावर शासन करावे, आणि बहुजनांनी कष्ट सहन करून हालाखीचे जीवन जगावे. हे त्यांना मान्य नव्हते. आणि म्हणूनच स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १६ ऑगस्ट १९४७ रोजी अण्णाभाऊ साठे यांनी मुंबई येथे, वीस हजार लोकांचा मोर्चा काढला. आणि त्या मोर्चात त्यांनी घोषणा दिली. “ये आजादी झुटी है, देश की जनता भुकी है” स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी अशी घोषणा देणे, म्हणजे किती मोठ्या हिंमतीचे कार्य होते.
  • काही काळानंतर “जग बदल घालूनी घाव, माझं सांगून गेले भीमराव” असे म्हणत अण्णाभाऊ साठे यांच्या गुरुचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित झाले. आणि दलित कार्याकडे वळले. त्यांनी दलित आणि कामगारांच्या जीवनातील अनुभव व्यक्त करण्यासाठी, त्यांच्या लेखणीचा वापर केला.
  • बॉम्बेमध्ये ( मुंबई ) १९५८ साली स्थापन झालेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात त्यांनी आपल्या भाषणात प्रखरतेने म्हटले की, पृथ्वी हे शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून, दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे. त्यांच्या या शब्दातून फक्त देशाच्याच नव्हे तर, जगाच्या जडणघडणीत दलित आणि कामगारांचे महत्त्व काय आहे, हे त्यांच्या भाषणातून त्यांनी अधोरेखित केले.
  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात ज्या विविध चळवळी भारतामध्ये झाल्या, त्या चळवळींपैकी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही एक मोठी आणि लोकशाहीवादी चळवळ म्हणून आधुनिक भारताच्या इतिहासात ओळखली जाते. या चळवळीमध्ये मनोरंजनातून लोकशिक्षण आणि जनजागृती करून, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकमत जागृत करण्याचे कार्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले.
  • अण्णांचे शब्द, अण्णांचा शाहिरी बाणा, या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा दीपस्तंभ होता. अण्णांच्या शाहिरीने उभा महाराष्ट्र पेटला. त्यांच्या कार्यांनी त्यावेळी चळवळीची एक मोठी फळी उभी केली. आणि शेवटी मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी झाली.

अण्णाभाऊ साठे यांची साहित्यरचना

अण्णाभाऊ यांनी लिहिलेल्या अनेक लघुकथा या अनेक भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाले आहेत. त्यांचे एकूण १५ लघुकथांचे संग्रह प्रकाशित झाले आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी नाटक रशियातील भ्रमंती, १२ पटकथा आणि मराठी पोवाडा सारखी दहा गाणी लिहिली. “माझी मैना गावावर राहिली” हे त्यातील अतिशय प्रसिद्ध असे गाणे आहे.

अण्णाभाऊ यांनी लिहिलेली पुस्तके, अण्णाभाऊ साठे प्रतिनिधी कथा, अमृत तारा, आघात रानबोका, संघर्ष, हावडी, गुऱ्हाळ, गुलाम, चंदन, चिखलातील कमळ, चित्रा, मथुरा, माकडीचा माळ, रत्ना, रानगंगा, अलगुज, त्यानंतर कायदेशीर व लावण्या या सुद्धा लिहिल्या. वैजयंता टिळा लावते, मी रक्ताचा डोंगरची, मैना मुरली मल्हारीरायाची, वारणेचा वाघ, अशीही साताऱ्याची तरा, फकीरा हे चित्रपट त्यांनी लिहिलेल्या कादंबरीवर आधारित बनवले गेले.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची सर्वोत्तम कादंबरी फकीरा

फकीरा ही अण्णाभाऊ यांनी मराठी मध्ये लिहिलेली व लोकप्रसिद्ध झालेली नावाजलेली कादंबरी आहे फकीरा या कादंबरीला महाराष्ट्रामध्ये उत्तम कादंबरीचा सन्मान प्राप्त झाला आहे फकिराया कादंबरीमध्ये अण्णांनी संपूर्ण दलित समाजाच्या जीवनाचे चित्र साकारले आहे दलित लोकांच्या समस्या त्यांच्या पोटापाण्यासाठीच संघर्ष संघर्ष या सर्व गोष्टी या फकीरा कादंबरी मध्ये साकारले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५  कादंबऱ्या लिहिल्या. आणि त्यामध्ये फकीरा या कादंबरीचा सुद्धा समावेश होतो. फकीरा या कादंबरीला १९६१ मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला होता.

अण्णाभाऊ यांची प्रतिमा असलेले खास पोस्टाचे तिकीट ०१ ऑगस्ट २००१ रोजी भारतीय पोस्टाने छापून वितरित केले. पुणे शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावे, शासनाने स्मारक बनले. कुर्ला येथील एक उड्डाणपूल आणि अनेक इमारतींना अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले आहे. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने, साहित्य संमेलन सुद्धा आयोजित केले जाते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने महाराष्ट्र शासन विकास महामंडळ सुद्धा चालवते.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे प्रेरणादायी विचार

  • पृथ्वी ही शेष नागाच्या मस्तकावर तरलेली नसून, दलित व कामगार लोकांच्या तळहातावर तरलेली आहे.
  • नैराश्य हे धारधार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते. धूळ झटकली कि ती तलवार पुन्हा धारदार बनते.
  • जात हे वास्तव आहे. गरीबी ही कृत्रिम आहे. गरीबी नष्ट करता येऊ शकते, पण जात नष्ट करणे आपल्या सर्वांचे काम आहे.
  • तू गुलाम नाहीस, तू तर या वास्तव जगाचा निर्माण कर्ता आहेस.
  • आम्हाला गंगेसारखी निर्मळ साहित्य हवे आहेत. आम्हाला मांगल्य हवे आहेत. आम्हाला मराठी साहित्याच्या परंपरेचा अभिमान आहे. कारण मराठी साहित्याची नांदी आमच्या जीवन संघर्षाने झडली आहे.
  • जग बदल घालुनी घाव मज सांगून गेले, भीमराव मी जे जीवन जगतो, जगत आहे, आणि जे मी अनुभवले आहे, तेच मी लिहितो. माझी माणसे मला कुठे ना कुठे भेटलेली असत, त्यांचा जगणं मरण मला ठाऊक असतं.
  • जो कलावंत जनतेची कदर करतो, त्याचीच कदर जनता करते. हे मी प्रथम शिकून नंतर लेखन करीत असतो.
  • माझा माझ्या देशावर, जनतेवर, आणि तिच्या संघर्षावर सढळ विश्वास आहे. हा देश सुखी, समृद्ध, आणि सभ्य व्हावा. इथे समानता नांदावी. या महाराष्ट्र भूमीचा नंदनवन व्हावं. अशी मला रोज स्वप्न पडत असतात. ती मंगल स्वप्न पहात, पहात मी लिहीत असतो.
  • केवळ कल्पकतेचे कृत्रिम डोळे लावून, जीवनातील सत्य दिसत नसतं. हे सत्य हृदयात मिळवावे लागत. डोळ्याने सर्वच दिसते, परंतु ते सर्व साहित्याला हात देत नाही. उलट दगा मात्र देते.
  • प्रतिभेला सत्याचं जीवनाचे दर्शन नसेल, तर प्रतिभा, अनुभूती वगैरे शब्द निरर्थक आहेत. सत्याला जीवनाचा आधार नसला की, प्रतिभा आंधकारातील आरशाप्रमाणे निरुपयोगी ठरते. मग कितीही प्रयत्न करून त्यात प्रतिबिंब दिसत नाही. आणि कल्पकता निर्मळ ठरते.
  • आजचे साहित्य आरशासारखे स्वच्छ असावे, त्यात आपले प्रतिबिंब स्पष्ट असावे, एवढीच त्याची मागणी आहे. आपला चेहरा आहे, तसा दिसावा. असं वाटणं गैर नाही.
  • दलितात ही सर्व भावना इतरांप्रमाणे सदैव जागृत असतात. पण तो इतरांपेक्षा जरा निराळा असतो. कारण तो हाडामासाचा केवळ गोळा नसतो, तो निर्मितीक्षम असतो, तो वास्तव जगात कष्टाचे सागर उपसून, दौलतीचे डोंगर रचतो.
  • दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाजराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पहा, कारण जावे ज्यांच्या वंशा तेव्हा कळे हे तुकारामांचे म्हणणे खोटे नाही.
  • जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलावंतांनी वाङ्मय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे. आणि तो डोळा सदैव पुढे व जनतेबरोबर असणे जरुरी आहे.
  • मला कल्पनेची पंख लावून भरारी मारता येत नाही. त्याबाबतीत मी स्वतःला बेडूक समजतो.

अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी केव्हा दिली गेली ?

संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर म्हणून ओळखले जाते. अण्णाभाऊ यांच्या माहिती मधून समजते की, अण्णाभाऊंनी तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मान प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अण्णाभाऊंनी सादर केलेल्या त्यांच्या प्रसिद्ध पोवाडातून गीत व लावण्या मधून गरीब कष्टकरी जनतेसाठी विचारांचे बीज प्रेरणाचे व त्यांचा प्रसार जनसामान्यामध्ये करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. आहे. त्या सर्वामुळे अण्णाभाऊ यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली गेली आहे.

अण्णाभाऊ साठे यांचे निधन/अण्णाभाऊ साठे पुण्यतिथी

अण्णांचे अनेक पोवाडे आणि लावण्या जनसमुदायात नावारूपाला आले आहेत. त्या काळात एक शाहीर म्हणून ते अत्यंत लोकप्रिय ठरले. ते उत्कृष्ट कवी होते. त्यामुळे त्यांना बालपणीपासूनच कविता लिहिण्याची आवड होती. त्यांच्या काव्यसंग्रहातील कविता आजही गायल्या जातात. त्यांच्या अनेक कविता सुप्रसिद्ध आहेत. अशा या थोर साहित्य अण्णाभाऊ साठे यांचा मृत्यू १८ जुलै १९६९ रोजी झाला.

अण्णाभाऊ साठे जयंती केव्हा साजरी केली जाते ?

अण्णाभाऊ यांची जयंती ही ०१ ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. संपूर्ण दलित समाजामध्येच नव्हे, तर सर्व जमातीतील देखील लोके अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहाने व जल्लोषाने साजरी करतात. अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला गावागावातून नाचत गाजत मिरवणुका काढल्या जातात. तसेच अण्णांच्या जयंतीनिमित्त निबंध लेखन व इतर स्पर्धा आयोजित केल्या जातात.

अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे काव्यसंग्रह/अण्णाभाऊ साठे कविता

माझी मैना गावाकड राहिली

माझी मैना गावाकड राहिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||
ओतीव बांधा | रंग गव्हाळ | कोर चंद्राची | उदात्त गुणांची |
मोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |
हसून बोलायची | मंद चालायची | सुगंध केतकी | सतेज कांती |
घडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची | काडी दवन्याची |
रेखीव भुवया | कमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हि-याची |
काठी आंधळ्याची | तशी ती माझी गरीबाची |
मैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |
नसे सुखाला वाण | तिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |
माझ्या जिवाची होतिया काहिली ||

कथा मुंबईची

कथा मुंबईची सुरू आता करतो
इथं माणूस भवऱ्यावाणी फिरतो
इथं दिसती उंच माड्या,
लांब झिपऱ्या शेंड्या दाढ्या
इथं मोकळ्या जागेत गाढवावाणी
खुशाल लोळती कैक झोपड्या
कोण फिरतो देऊन इथे,
कमरेला चिंध्यांच्या तिड्यावर तिड्या
कोण भीक मागतो इथं टेकीत
काठी मारीत उड्यावर उड्या
आणि त्याच्या पुढून उंदरावाणी,
कैक पळती रंगीत मोटारगाड्या
इथं बोळामधील बोळ,
गल्लीमधील पोळ,
रस्त्या रस्त्यावरती खेळ करतो ||१||

जग बदल घालुनी घाव

जग बदल घालूनी घाव,
सांगूनी गेले मज भीमराव !
गुलामगिरीच्या या चिखलात,
रूतून बसला का ऐरावत !
अंग झाडूनी निघ बाहेरी,
घे बिनीवरती घाव !
धनवंतानी अखंड पिळले,
धर्मांधांनी तसेच छळले !
मगराने जणू माणिक गिळले,
चोर जहाले साव !
ठरवून आम्हा हीन अवमानीत,
जन्मोजन्मी करूनि अंकित !
जिणे लादून वर अवमानित,
निर्मुन हा भेदभाव !
एकजूटीच्या या रथावरती,
आरूढ होऊनी चलबा पुढती !
नव महाराष्ट्रा निर्मुन जगती,
करी प्रगट निज नाव ||१||

महाराष्ट्राच्या अंगणात

महाराष्ट्राच्या अंगणात,
सरिता या खेळ खेळत !
पंचगंगा शीतल शांत,
महाराष्ट्रा शांतवीत!
कोयना कृष्णा चालत,
घालून हातामध्ये हात!
जाऊनी पुढे धावत,
आंध्रलाहि कुरवाळीत!
वारणा वाहे वेगात,
वायूला लाजवीत!
पैठण परभणीत,
गोदाचे रमले चित्त!

अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली पुस्तके

कादंबरी कथासंग्रहलोकनाट्यनाटक
अमृतखुळंवाडाअकलेची गोष्टइनामदार
आघात आबीकापऱ्या चोरपेंग्याचं लगीन
आवडी गजाआड देशभक्त घोटाळे मूक मिरवणूक
गुलाम कृष्णाकाठच्या कथाशेटजींचे इलेक्शन चिखलातील कमळ
चंदनसंघर्षलोकमंत्र्यांचा दौरा
गुऱ्हाळसुगंधाबेकायदेशीर
फकिरापिसाळलेला माणूस माझी मुंबई
पाझर फरारीपुढारी मिळाला
चित्रा बरबाद्या कंजारी
मथुरा चिरानगरची भुतं

अण्णाभाऊ साठे यांच्या कथांवरील चित्रपट

  • वैजयंता (१९६१, कादंबरी – वैजयंता)
  • टिळा लावते मी रक्ताचा (१९६९, कादंबरी – आवडी)
  • डोंगरची मैना (१९६९, कादंबरी – माकडीचा माळ)
  • मुरली मल्हारीरायाची (१९६९, कादंबरी – चिखलातील कमळ)
  • वारणेचा वाघ (१९७०, कादंबरी – वारणेचा वाघ)
  • अशी ही साताऱ्याची तऱ्हा (१९७४, कादंबरी – अलगूज)
  • फकिरा (कादंबरी – फकिरा)

अण्णाभाऊ साठेंवरील पुस्तके

  • अण्णाभाऊंचा संदेश (विनिमय पब्लिकेशन्स)
  • अण्णा भाऊ सांगून गेले (विलास रणसुभे)
  • अण्णा भाऊ साठे (मराठी कवी) लेखक: बजरंग कोरडे, अनुवाद : विलास गिते, प्रकाशन : साहित्य अकादमी
  • अण्णा भाऊ साठे (बालवाङ्मय, लेखक – बाबुराव गुरव)
  • अण्णा भाऊ साठे (हिंदी, प्रा. रतनलाल सोनग्रा)
  • अण्णा भाऊ साठे (डॉ.संजीवनी सुनील पाटील)
  • अण्णा भाऊ साठे : चरित्र आणि कार्य – विजयकुमार जोखे, नालंदा प्रकाशन[१४]
  • अण्णा भाऊ साठे विचारधन (विठ्ठल साठे)
  • अण्णाभाऊ साठे व्यक्ती आणि वाङ्मय ( प्रा. डॉ. अंबादास सगट)
  • अण्णा भाऊ साठेलिखित ‘फकीरा’ची समीक्षा (डॉ. श्रीपाल सबनीस)
  • क्रांतिकारी अण्णाभाऊ साठे (प्रा. गौतम निकम)
  • समाज सुधारक लोकशाहीर अण्णा भाऊ साठे (संपादित, संपादक -ॲड. महेंद्र साठे)

अण्णाभाऊ साठे माहिती व्हिडिओ

FAQ

१. अण्णाभाऊ साठे यांच्या आईचे नाव काय?

अण्णा भाऊ साठे यांना साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाते. अण्णाभाऊ साठेंचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते. त्यांचा जन्म १ ऑगस्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असलेल्या, वाटेगाव नावाच्या गावात मातंग या समाजात म्हणजेच, दलित समाजात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव साठे होते. तर आईचे नाव वालुबाई साठे असे होते.

२. साहित्यसम्राट कोण आहे?

फकीरा ही अण्णाभाऊ साठे यांनी मराठी मध्ये लिहिलेली व लोकप्रसिद्ध झालेली नावाजलेली कादंबरी आहे फकीरा या कादंबरीला महाराष्ट्रामध्ये उत्तम कादंबरीचा सन्मान प्राप्त झाला आहे फकिराया कादंबरीमध्ये अण्णांनी संपूर्ण दलित समाजाच्या जीवनाचे चित्र साकारले आहे दलित लोकांच्या समस्या त्यांच्या पोटापाण्यासाठीच संघर्ष संघर्ष या सर्व गोष्टी या फकीरा कादंबरी मध्ये साकारले आहे. अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत ३५  कादंबऱ्या लिहिल्या.

३. कोण आहेत अण्णाभाऊ साठे?

संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर म्हणून ओळखले जाते. अण्णाभाऊ साठे यांच्या माहिती मधून समजते की, अण्णाभाऊंनी तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मान प्राप्त करून देण्याचे महत्त्वाचे कार्य केले आहे. अण्णाभाऊंनी सादर केलेल्या त्यांच्या प्रसिद्ध पोवाडातून गीत व लावण्या मधून गरीब कष्टकरी जनतेसाठी विचारांचे बीज प्रेरणाचे व त्यांचा प्रसार जनसामान्यामध्ये करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. आहे. त्या सर्वामुळे अण्णाभाऊ साठे यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली गेली आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास आजच्या लेखाद्वारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या बद्दल महिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment