सी व्ही रमण यांची माहिती CV Raman Information In Marathi

सीव्ही रमण यांचे संपूर्ण नाव सर चंद्रशेखर वेंकट रमण असे आहे. सीव्ही रमण भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते. ज्याने १९३० मध्ये भौतिकशास्त्रासाठी, प्रतिष्ठित असलेला नोबेल पारितोषिक प्राप्त केला. यानंतर १९५४ मध्ये त्यांना भारत सरकारने, भारतातील सर्वश्रेष्ठ पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवीत केले.

पंधरा वर्ष म्हणजेच, १९३३ ते १९४८ च्या दरम्याने सीव्ही रमण हे कलकत्ता विद्यापीठामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्स संचालक पद हाती घेतले. सायन्स असोसिएशनचे ते अध्यक्ष सुद्धा होते. आज तेच असोसिएशन विज्ञान संघटना म्हणून ओळखली जाते.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सीव्ही रमण यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

सी व्ही रमण यांची माहिती CV Raman Information In Marathi

पूर्ण नाव चंद्रशेखर व्यंकट रमण
टोपण नाव सी व्ही रमण
जन्म तारीख ७ नोव्हेंबर १८८८
जन्म स्थळ तिरुचिरापल्ली, तामिळनाडू
आईचे नावपार्वती अंमल
वडिलांचे नाव चंद्रशेखर अय्यर
उच्च शिक्षण विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी
प्रमुख व्यवसाय संशोधन
पुरस्कारनोबेल पारितोषिक आणि भारतरत्न
शोधरामन इफेक्ट
मृत्यूची तारीखदि. २१ नोव्हेंबर १९७०
मृत्यूचे ठिकाणबेंगळुरू, कर्नाटक

सीव्ही रामन यांचा जन्म

आजपर्यंत फक्त एका भारतीय शास्त्रज्ञाला नोबेल पारितोषिक मिळाले आहे हे पारितोषिक त्यांच्या प्रकाश विकरणच्या सिद्धांतासाठी मिळाले होते. त्याच्या सिद्धांताला जागतिक मान्यता मिळाली.

CV Raman Information In Marathi

त्या महान शास्त्रज्ञाचा जन्म मद्रासी इलाख्यातील तिरुचिरापल्ली, तामिळनाडू या प्रसिद्ध शहरात दि. ०७ नोव्हेंबर १८८८ रोजी झाला. वडिलांपासून धैर्य व आईकडून उत्कटता व चिकाटी या गुणांचा योग्य मिलाप रामन यांच्यातही झाला. एक हुशार व बुद्धिमान विद्यार्थी म्हणून लवकरच त्यांची ख्याती झाली.

सीव्ही रामन यांचे शिक्षण

वयाच्या बाराव्या वर्षी सन १९०० मध्ये रामन मॅट्रिकची परीक्षा पास झाले. चौदाव्या वर्षी ते इंटरची परीक्षा उत्तीर्ण झाले. इतक्याला अन्वयात उच्च परीक्षा दिल्याबद्दल, त्यांचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. पुढील शिक्षणासाठी ते मद्रास येथे आले व प्रेसिडेन्सी कॉलेजात दाखल झाले.

हे वाचा –

गंमत म्हणजे एका प्राध्यापकास चुकून, हा छोटा मुलगा कॉलेजमध्ये आला असावा असे वाटले. तेव्हा रामन यांनी निर्भयपणे सांगितले की, मी चुकून येथे आलो नसून, या वर्गात माझे नाव दाखल केले आहे, म्हणून आलो आहे. या छोट्या मुलाबद्दल कौतुक वाटत असतानाच, बीए च्या पदवी परीक्षेत पहिल्या वर्गात पाहिले आले.

पदार्थ विज्ञान शास्त्र मध्ये त्यांना सर्वाधिक गुण मिळाले व त्यांनी सुवर्णपदक पटकावले. एमएच्या परीक्षेतही त्यांनी प्रथम श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला. आपल्या मनाविरुद्ध घरच्या मंडळींच्या दबावामुळे ते हिंदुस्थान सरकारच्या खात्याच्या परीक्षेत बसले. आश्चर्य म्हणजे या परीक्षेत ते सर्व भारतात पहिले आले.

सीव्ही रमण यांचे वैयक्तिक जीवन

०६  मे १९०७ मध्ये सीव्ही रामण यांचे लग्न लोकसुंदरी अम्माला यांच्यासोबत करण्यात आले. लोकसुंदरी या वीणा अतिशय अप्रतिम वाजवायच्या. ज्यामुळे सीव्ही रमण यांनी लोकसुंदरी अम्माला यांना लग्नाचा प्रस्ताव दिला.

CV Raman Information In Marathi

लग्न झाल्यानंतर सीव्ही रामन रमण व लोकसुंदरी यांना दोन अपत्य झाली. एका मुलाचे नाव चंद्रशेखर तर दुसऱ्या मुलाचे नाव राधाकृष्णन असे होते. राधाकृष्णन हे खगोलशास्त्रज्ञ होते .

सीव्ही रामन यांची कारकीर्द

कलकत्त्यात प्रमुख डेप्युटी अकाउंटंट जनरल म्हणून नेमणूक झाली. परंतु या लठ्ठ पगाराच्या नोकरीत त्यांचे मन लागेना. मात्र त्यांनी आपले पदार्थ विज्ञानातील संशोधन सुरूच ठेवले. त्याच सुमारास अन्य पोट जातीतील लंका सुंदर नावाच्या तरुणीची विवाहबद्ध झाले.

एकदा डॉक्टर रामन जहाजाने इंग्लंडला जात होते. तेव्हा त्यांनी पाहिले की, समुद्राचे पाणी निळे दिसते. परंतु, त्यांनी एका ग्लासात ते पाणी घेतले असता, ते रंगहीन असल्याचे त्यांना आढळून आले. त्यातच त्यांनी संशोधन केले.

CV Raman

प्रकाश जेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून जात असतो, तेव्हा त्याच्या तरंग लांबीत वाढ होते किंवा तरंग लांबी कमी होते. याचा सिद्धांताला प्रकाशाचे विकीकरण असे म्हणतात.

यालाच प्रकाशाचे अनियमित परावर्तन असेही म्हणतात. या सिद्धांताने त्यांना जागतिक दर्जाचे संशोधन म्हणून मान्यता मिळवून दिली आणि त्यांची नोबेल पारितोषकासाठी निवड झाली.

राष्ट्रीय विज्ञान दिवस

  • २८ फेब्रुवारी विज्ञान दिन विज्ञान म्हणजे असे ज्ञान की ज्यामुळे अश्मयुगातील माणूस आज डिजिटल युगात येऊन पोहोचला आहे. माणसाने जी काही स्वप्न त्याच्या जीवितसाठी किंवा भौतिकासाठी पाहिली की, प्रत्यक्षात आणण्याची ताकद उपयोगात आलेले ज्ञान म्हणजेच विज्ञान.
  • विज्ञान म्हणजे निरीक्षण व चिकित्सक प्रयोगातून, पद्धतशीर आणि तर्कसुसंगत माहिती मिळवणे. अर्थात जसे  मुले आजूबाजूच्या गोष्टी घटना याचे निरीक्षण करता आणि त्याबद्दल अचूक प्रश्न विचारून ज्ञान मिळवता.
  • १९८७  सालापासून भारतामध्ये २८ फेब्रुवारी हा दिवस रामनांचे संशोधन आणि त्यांचे विज्ञान प्रसाराचे कार्य याच्या स्मरणार्थ राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर सीव्ही रामन यांना १९३१ साली नोबेल पारितोषिक मिळाले. त्या सणाची आठवण म्हणून, भारत सरकारने २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले. भारत सरकारने ही त्यांना भारतरत्न देऊन, उचित गौरव केला. २८ फेब्रुवारी हा दिवस त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
सीव्ही रामन

सीव्ही रमण यांचे महत्त्वाचे शोध

  • सीव्ही रामन यांचा जन्मदिवस ०७ नोव्हेंबर १८८८ आणि मृत्यू दिनांक आहे, २१ नोव्हेंबर १९७०. २८ फेब्रुवारीला सीव्ही रामन यांच्या स्मरणार्थ, संपूर्ण भारतभर विज्ञान दिन साजरा केला जातो. याचे कारण आहे, रामन इफेक्ट हा त्यांचा शोध निबंध जगापुढे सादर केला होता. भौतिक शासनातील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकाशाच्या विकरण संबंधीचे संशोधन करणारे आणि या विषयाचा वैशिष्ट्यपूर्ण शोधनिबंध जागतिक पातळीवर सादर करणारे हे पहिले आशियाई शास्त्रज्ञ ठरले.
  • त्याबद्दल त्यांना १९३० साली नोबेल पुरस्कारही प्राप्त झाला. अजरामर झालेल्या शोधाची कहाणी फारच मनोरंजक आहे. भौतिक विषयाचे प्राध्यापक या नात्याने रामन परदेशात एका संमेलनात भाग घेण्यासाठी मेडिटेरियन समुद्रा मार्गे निघाले होते, प्रवासात वेळ जावा म्हणून त्यांनी सवयीप्रमाणे पॉकेट स्पेक्ट्रोस्कोप यासारखी उपकरणे बरोबर घेतली होती आणि प्रयोग चालूच होते. असाच प्रयोग चालू असताना त्यांच्या लक्षात आले की, समुद्राच्या निळ्याशार रंगामागे पाण्याच्या थेंबाद्वारे, होणाऱ्या सूर्यप्रकाशाचे विक्रीणच कारणीभूत आहे. कलकत्त्यास परतल्यावर त्यांनी यावर सखोल संशोधन सुरू केले आणि चार वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्यांनी जगमान्य रमण प्रभाव जगासमोर आणला.
  • म्हणजे एक प्रकारचे, प्रकाशाचे विक्रीण हा एक दृश्य परिणाम आहे. यामध्ये प्रकाश किरण विशेषतः मनोक्रमातिक लाईट जेव्हा एखाद्या मोलेक्युल म्हणजे रेणु वर पडते, तेव्हा सामान्य तरंग लांबी म्हणजे वारंवारता ठेवते, तर त्या प्रकाश किरण मधून, प्रवेश करण्यापूर्वी मधून बाहेर पडल्यानंतरची, एनर्जी दोन्ही समान असते.यालाच रामन इफेक्ट किंवा रामन केटरिंग असे म्हणतात.
  • म्हणजे एखाद्या वस्तूवर प्रकाश टाकला असता, त्याचे परावर्तन होते. या परावर्तनाची प्रकाशामध्ये काही विशिष्ट लक्षणे असतात. परावर्तित प्रकाश किरणाची तरंग लांबी व वारंवारतेमध्ये भिन्नता आढळते. वास्तवात ही लक्षणे प्रकाश परावर्तित करणाऱ्या वस्तूची असतात.

रामन इफेक्ट्सचा व्यवहारात आणि दैनंदिन जीवनात उपयोग

  • जगातील प्रत्येक वस्तू स्वतःचं असं वैशिष्ट्य बाळगून असते. त्यामुळेच आपल्याला ढोबळ मानाने दोन वस्तूंमधला फरक जाणवतो. तसाच फरक पदार्थाच्या विविध रेणूमध्ये असतो. म्हणजेच ज्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या बोटांचे ठसे हे भिन्न असतात. त्याचप्रमाणे प्रत्येक मॉलिक्युलमधून होणारे प्रकाशाच्या विक्र्णाचा परिणामही वेगळा असतो. म्हणजे त्या प्रकाश किरणाचा आणि एनर्जी ही प्रत्येक मॉलिक्युलस साठी निश्चितपणे, पूर्णतः वेगळी असते.
  • त्यामुळेच आपण विशिष्ट मिश्रणातील घटक पदार्थ अगदी नेमके ओळखू शकतो. म्हणजे समजा जर तुम्हाला एखाद्या द्रावण किंवा मिस्टरी लिक्विड भरलेला ग्लास दिला आणि त्यात कोणते घटक वापरले आहे ते फक्त पाहून सांगा असे सांगितले तर, तुम्हाला ते ओळखता येतील का ? शक्य नाही. पूर्णपणे विद्राव्य असलेल्या द्रावणातून, त्यातील घटक नुसते पाहून सांगणे शक्यच होणार नाही. परंतु रामना इफेक्ट्सच्या साह्याने पदार्थाची चव, गंध न घेता त्यातील घटक अचूक ओळखता येतात.आणि त्यासाठी उपयुक्त ठरते रामण स्पेक्ट्रोग्राफी.
  • आता हि रमण स्पेक्ट्रोस्कोपी नेमकं काम कसे करते ते पाहू यासाठी एक उदाहरण घेऊ समजा – आपल्या घराबाहेर एखादा सुरुंग किंवा मोठा फटका फुटला, तर या स्फोटामुळे घरातील खिडक्यांच्या काचा कंप पावतात. म्हणजेच काय तर, ध्वनीमुळे खिडक्यांच्या काचा कंप पावतात. त्यामध्येही कंपने निर्माण होतात आणि नाद घुमतो. अगदी तसेच पदार्थ हे रेणुनी बनलेले असतात. रेणू हे आकाराने अतिसूक्ष्म असतात. त्यामुळे साध्या प्रकाश किरणामुळे, देखील या रेणूंमध्ये कंपने निर्माण होतात. परंतु, रेणू अतिशय लहान असल्याने, ही कंपने, अतिशय लहान असतात. अनेक कंपनानी मिळून बनला आहे. यात जांभळ्या रंगाची कंपने वेगळी, तर लाल प्रकाशाची कंपने वेगळी, प्रत्येक पदार्थांमध्ये असलेल्या अणु रेणूंच्या रचनेत, या प्रकाशातील कुठल्या ना कुठल्या कंपन्यांशी जुळवून, घेण्याची क्षमता असते. मग ती कंपने, तात्पुरत्या स्वरूपात वस्तूमध्ये अडकतात आणि क्षणभराने ती बाहेर पडतात.
  • ही कंपने मोजता आली की, वस्तूची रचना आपल्याला कळते आणि त्यामुळे पदार्थाची चिरफाड न करता देखील त्यातील घटक द्रव्य आपल्याला समजून घेता येते. वस्तूमधील निर्माण झालेल्या विक्रीणाच्या प्रकाशाची नोंद घेणे, यालाच रामनवर्णपट किंवा रामण स्पेक्टोग्राफ असे म्हणतात.
  • आता संगणकाच्या सहाय्याने हा रामनवर्णपट अधिक मोठा करून, त्यातील बारकावे अभ्यासणे आपल्याला शक्य झाले आहे. लेझर किरण इलेक्ट्रॉनिक संवेदक आणि वेगाने गणिती तपासणी करणारे संगणक यामुळेच रमण वर्णपटाचे विश्लेषण अधिक सोपे जलद आणि अचूक करणे शक्य झाले आहे. यामुळे दैनंदिन आणि व्यवहारी जीवनात याच्या अनेक ठिकाणी वापर केला जात आहे. उदाहरणार्थ कृषी क्षेत्रामध्ये, कीटकनाशके बनविण्यासाठी, औषधे याचा वापर केला जातो. शेतातील पिकावर वाढणाऱ्या किट किटकांमध्ये कोणते रसायन आहे ते नेमके ओळखून त्याला मारक रसायनांचा वापर करून, कीटकनाशके तयार केली जातात. तसेच रामण परिणामांचा वापर आज वेगवेगळ्या क्षेत्रात अगदी सहज केला जात आहे. यातील अजून एक उदाहरण म्हणजे फार्मासिटिकल इंडस्ट्रीज म्हणजे औषध उद्योग, औषध गोळ्यांमधील रासायनिक घटकांचे वितरण करण्यासाठी, औषधांमधील रासायनिक घटकांचे विश्लेषण आणि प्रमाण तपासण्याकरिता, तसेच कच्च्या सामग्रीची गुणवत्ता व शुद्धता तपासण्या करीत आहे रामण परिणामांचा वापर केला जातो.

पुरातत्त्व संशोधनासाठी किंवा फॉरेन्सिक विभागातील कामांसाठी रामन इफेक्टचा वापर

  • पुरातत्त्व संशोधनासाठी किंवा फॉरेन्सिक विभागातील कामांसाठी रामन इफेक्टवर आधारित उपकरणांचा वापर केला जातो. याचबरोबर यासारख्या प्रकरणांमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेऊन, त्यातील अल्कोहोलचे प्रमाण तपासण्यासाठी, रामण इफेक्टवर आधारित तपासणी केली जाते. रामन यांच्या प्रयोगाने द्रव व वायुतील विकीरणांचा अभ्यास सहज साजरा झाला. रासायनिक रेणुच्या रचना समजण्यासाठी, रामण परिणामांचा खूप उपयोग झाला. या शोधा नंतर केवळ दहा वर्षात दोन हजाराहून, अधिक संयुगांची रचना निश्चित करणे, शक्य झाले.
  • उपकरणास बारकाव्यांनी तपासणी करण्याची क्षमता मिळाल्याने, अत्यंत प्रमाणात असलेली भेसळ सुद्धा सहज ओळखता येऊ लागली. एखाद्या पदार्थांमध्ये मीठ नेमके किती प्रमाणात आहे, हे कळू लागले. तसेच पेट्रोलमध्ये किती अल्कोहोल आहे, हे ही सांगता येऊ लागले. अनेक रासायनिक क्रिया पूर्ण झाल्या आहेत की नाही, त्या रासायनिक क्रिया कोणत्या टप्प्यात आहे, हे देखील रामणवर्णपटलांच्या अभ्यासामुळे, समजू शकले. रामनवर्णपट हा अशाच प्रकारे जगाचे चित्र बदलणारा एक मोठा शोधा आहे.

सीव्ही रमण यांचा वाद

कृष्णन यांना नोबेल पारितोषिक प्राप्त झाले नाही, त्यावेळी कृष्णन हे रमण यांचे चांगले व्यावसायिक मित्र असूनही, सुद्धा त्यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. याची चर्चा रामन स्पेक्ट्रोस्कोपी मध्ये करण्यात आली.

सीव्ही रमण यांना मिळालेले पुरस्कार आणि उपलब्धी

  • १९३० मध्ये सीव्ही रमण यांना प्रकाश विखुरणे व रमण प्रभावाच्या शोधासाठी भौतिकशास्त्रामधील नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित केले. विज्ञान क्षेत्रामध्ये नोबेल पारितोषिक मिळवणारे सीव्ही रमण हे पहिले आशियातील व्यक्ती होते. याआधी रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन सन्मानित केले गेले.
  • १९३४ मध्ये बंगळूर या ठिकाणी झालेल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स संचालक म्हणून, सीव्ही रमण यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर १९०९ च्या दरम्याने जेएन टाटा यांनी भारताच्या वैज्ञानिक ज्ञानाच्या विकासासाठी, बेंगलोर मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची स्थापना केली. सीव्ही रमण यांचा सर उंचावण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. थोड्या संस्थेचे नाव जगभर झाले.
  • १९२९ मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसच्या सोळाव्या अधिवेशनाचे अध्यक्ष पद सीव्ही रमण यांनी भूषवले. त्यांना विविध विद्यापीठांमधून, मानद पदव्या, नाईट हुड व इतर अनेक पदव्या देऊन सन्मानित केले गेले.
  • १९४७ मध्ये भारत सरकारने सीव्ही रमण यांना राष्ट्रीय व्याख्याता पद दिले.
  • १९३२ मध्ये रमण आणि सुरी भगवंत यांनी स्पेन मध्ये क्वांटम फोटॉनचा शोध लावला, या शोधामध्ये दोघांनी सुद्धा एकमेकांना अतोनात सहाय्यता दिली होती.
  • १९४८ मध्ये अमेरिकन केमिकल सोसायटी आणि इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स द्वारे, रासायनिक लागवड विज्ञानामधील रमणच्या शोधांबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले.
  • १९५७ मध्ये सीव्ही रमण यांना लेनिन शांतता पुरस्कार तर १९५४ मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवित केले गेले.

सीव्ही रमण यांचे प्रेरणादायी विचार

  • ज्ञानाच्या शोधाबाबत सीव्ही रमण यांनी म्हटले आहे की, आपण अनेकदा शोध कुठून आणायचा या संधीचा शोध घेत असतो, परंतु आपण पाहतो की, नवीन शाखेचा विकास हा नैसर्गिक घटनेच्या सुरुवातीच्या बिंदूमध्येच दडलेला असतो.
  • आधुनिक भौतिकशास्त्र बाबत सीव्ही रमण यांचे असे मत आहे की, आधुनिक भौतिकशास्त्र हे पूर्णपणे अनुघटनेच्या मूळ गृहीतकांवर आधारित असते.
  • यश अपयशामध्ये सीव्ही रमण यांनी आपले मत मांडताना, असे सांगितले की, त्यांनी त्यांच्या अपयशालाच जबाबदार ठरवले आहे. जर आपण यशस्वी झालो नाही तर, आपण कधीही काहीही शिकणार नाही, अपयशातूनच आपल्याला यश मिळवण्याची प्रेरणा मिळते.
  • मूलभूत विज्ञानामध्ये सीव्ही रमण यांनी आपले मत व्यक्त करताना म्हणाले की, माझा मूलभूत विज्ञानावर पूर्ण विश्वास आहे आणि ते कोणत्याही औद्योगिक उपदेशात्मक व सरकर तसेच कोणत्याही लष्करी शक्तीने प्रेरित होऊ नये.
  • तुमच्या आयुष्यात कोण येईल ते तुम्ही नेहमी निवडू शकत नाही. पण तुमच्या सोबत जे घडेल त्यांच्याकडून नेहमीच शिकता येईल, ते तुम्हाला नेहमीच धडा शिकवतील.
  • जर कोणी तुमच्याबद्दल, त्यांच्या पद्धतीने विचार करत असेल तर, ते त्यांच्या मनातील सर्वोत्तम जागा वाया घालवतात आणि ही त्यांची समस्या असू शकते तुमची नाही.
  • आण्विक विवर्तन विषयाचे मूळ महत्व लॉर्ड रेले यांच्या सिद्धांतिक कार्यातून दिसून आले. जेव्हा आकाशाचा निळा रंग निळा दिसतो, तेव्हा तो ओळखला जातो. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की, हा वातावरणातील वायुद्वारे सूर्यप्रकाशांच्या विखुरण्याचा परिणाम आहे.

सीव्ही रामन यांचा मृत्यू

नोबेल पारितोषिक विजेता राष्ट्रप्रेमी ध्येयवादी, अशा या भारतीय शास्त्रज्ञाने भारतीय विज्ञानाची विजय पताका जगभर फडकवले. अतिशय २० नोव्हेंबर १९७०  रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी डॉक्टर रामन मृत्यू पावले.

सीव्ही रमण यांच्याबद्दल थोडक्यात सारांश

  • सीव्ही रमण यांची माहिती जाणून घेऊ, सीव्ही रामण यांचा जन्म ०७ नोव्हेंबर १८८८ मध्ये तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथे व शिक्षण चेन्नईमध्ये झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७ ते १९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. काही काळ बंगलोर मध्ये होते. १९४७ साली संशोधन संस्थेचे संचालक झाले. रमण यांचे ०६ मे १९०७ रोजी लोकासुंदरीअम्माला बरोबर लग्न झाले होते. त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्ण हे दोन पुत्र होते.
  • रमण हे चंद्रशेखर सुब्रमण्यन यांचे काका होते. त्यांना १९३१ मध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी आणि तारखे उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अनु प्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या त्यानंतरच्या कार्यासाठी, भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार १९८३ मध्ये मिळाला.
  • सीव्ही रामण यांनी आयुष्यभर दगड व अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केला, आणि या खनिजांच्या प्रकाश विकिरणाच्या गुणधर्माचा अभ्यास केला. यासाठी त्यांना काही साहित्य देशभरातून व विदेशातून भेट म्हणून मिळाले. नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी हिंदू, तामिळ, भाषेचा त्यांनी अभ्यास केला. त्याने सेंटच्या इंडियन हायस्कूल मधून अनुक्रमे ११ आणि १३ वर्षाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
  • वयाच्या १६ वर्षी प्रेसिडेन्सी कॉलेजमधून, भौतिकशास्त्रात सन्मान आणि त्यांनी मानद विद्यापीठात पदवी परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावला. पदवीधर विद्यार्थी असताना, १९६६ साली त्यांचा पहिला संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आला. पुढच्या वर्षी त्यांनी एमए ची पदवी मिळवली.
  • कोलकाता येथील इंडियन फायनान्स सर्विसेस मध्ये, असिस्टंट अकाउंटंट जनरल म्हणून रुजू झाले. तेव्हा ते १९ वर्षाचे होते. तेथे त्यांची इंडियन असोसिएशन फॉर द अप्लिकेशन ऑफ सायन्स या भारतातील पहिल्या संशोधन संस्थेची ओळख झाली. ज्यामुळे त्यांना स्वतंत्र संशोधन करण्याची परवानगी मिळाली आणि ध्वनी आणि ऑप्टिक्स मध्ये त्यांनी मोठे योगदान दिले.
  • १९१७ मध्ये कलकत्ता विद्यापीठाच्या विज्ञान विद्यालयात अशीतोष मुखर्जी यांनी त्यांना बहुतेक शास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून नियुक्त केले. आपल्या पहिल्या युरोप दौऱ्यात भूमध्य समुद्र पाहून त्यांना समुद्राच्या निळ्या रंगाचे वर्णन करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी १९२६ मध्ये इंडियन जर्नल ऑफ फिजिक्सची स्थापना केली. रमण आणि कृष्ण यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी प्रकाश विखुरण्याची एक अभिनव घटना शोधून काढली. ज्याला त्यांनी सुधारित विकीरणे असे संबोधले. पण त्याला रमण इफेक्ट म्हणून ओळखले जाते.
  • भारत सरकार तर्फे दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. रमण १९३३ साली बेंगळूर येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये पहिले भारतीय संचालक बनले. तेथे त्यांनी त्याच वर्षी इंडियन अकॅडमी ऑफ सायन्सची स्थापना केली.
  • त्यांनी १९४८ साली रमण रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना केली. तेथे त्यांनी शेवटच्या काळात काम केले. त्यांच्यासाठी ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रमण यांना मिळाले होते, ऑक्टोबर १९७० च्या शेवटी रमण त्यांच्या प्रयोगशाळेत कोसळले. त्यांना रुग्णालयात घालविण्यात आले आणि डॉक्टरांनी त्यांना चार दिवस जगण्यासाठी मदत दिली. ते वाचले आणि काही दिवसांनी त्यांनी रुग्णालयात जाण्यास नकार दिला. कारण त्यांनी त्यांच्या अनुयायांनी वेढलेल्या त्यांच्या संस्थेच्या बागेमध्ये मरण पसंत केले.

सीव्ही रमण यांचा व्हिडिओ

FAQ

१. सी व्ही रामन यांचे पूर्ण नाव काय?

सीव्ही रमण यांचे संपूर्ण नाव सर चंद्रशेखर वेंकट रमण असे आहे. सीव्ही रमण भारतीय भौतिक शास्त्रज्ञ होते. ज्याने १९३० मध्ये भौतिकशास्त्रासाठी, प्रतिष्ठित असलेला नोबेल पारितोषिक प्राप्त केला.

२. रामन प्रभाव म्हणजे काय आणि त्याचे महत्त्व काय?

एखाद्या वस्तूवर प्रकाश टाकला असता, त्याचे परावर्तन होते. या परावर्तनाची प्रकाशामध्ये काही विशिष्ट लक्षणे असतात. परावर्तित प्रकाश किरणाची तरंग लांबी व वारंवारतेमध्ये भिन्नता आढळते. वास्तवात ही लक्षणे प्रकाश परावर्तित करणाऱ्या वस्तूची असतात.

३. सी व्ही रामन यांचा मृत्यू कधी झाला ?

नोबेल पारितोषिक विजेता राष्ट्रप्रेमी ध्येयवादी, अशा या भारतीय शास्त्रज्ञाने भारतीय विज्ञानाची विजय पताका जगभर फडकवले. अतिशय २० नोव्हेंबर १९७०  रोजी वयाच्या ८२ व्या वर्षी डॉक्टर रामन मृत्यू पावले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस सीव्ही रमन यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा धन्यवाद.

Leave a comment