डॉ. काशिनाथ घाणेकर माहिती मराठी | Dr Kashinath Ghanekar information in Marathi

डॉ. काशिनाथ घाणेकर माहिती मराठी Dr Kashinath Ghanekar information in Marathi – डॉक्टर काशिनाथ घाणेकर हे एक प्रसिद्ध नाव असून, त्यांच्या नावाच्या प्रसिद्धीमुळे त्यांच्या प्रत्येक सिनेमाला तिकीट विंडोकडे हाउसफुलचे बोर्ड लागत असत. ज्या नावाने मराठी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले होते, ज्यांच्या पडद्यावरील आगमनानेच रसिकांच्या टाळ्यांचा कडकडात नाट्यगृह दणाणून जात होता, असे सर्वांचे लाडके अभिनेते, सुपरस्टार, मराठी रंगभूमीचे नटश्रेष्ठ डॉक्टर काशिनाथ घाणेकर हे आहेत.

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे चित्रपटसृष्टीला प्राप्त असलेले अतुलनीय योगदान, अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. काशिनाथ घाणेकर यांनी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले, अनेक तरुण अभिनेत्यांसाठी त्यांचे काम हे प्रेरणादायी आहे.

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे प्रभावशाली संवाद फेक विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची कौशल्य शैली ही अतुलनीय व अविस्मरणीय आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या प्रसिद्ध नटसम्राट, सर्वश्रेष्ठ सुपरस्टार, डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी, हा लेख तुम्ही शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

डॉ. काशिनाथ घाणेकर माहिती मराठी | Dr Kashinath Ghanekar information in Marathi

पूर्ण नाव डॉ. काशीनाथ घाणेकर
जन्म तारीख १४ सप्टेंबर १९३२
जन्म स्थळ चिपळूण, महाराष्ट्र, भारत
पत्नीचे नाव इरावती भिडे
कांचन घाणेकर
अपत्य रश्मी घाणेकर
मृत्यू २ मार्च १९८६
मृत्यूचे ठिकाण अमरावती, महाराष्ट्र, भारत

डॉ काशिनाथ घाणेकर यांचा जन्म व शिक्षण

डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जन्म दि. १४ सप्टेंबर १९३० रोजी महाराष्ट्र राज्यामधील, चिपळूण या ठिकाणी झाला. त्यांनी त्यांचे प्रारंभिक शिक्षण चिपळूण या ठिकाणी पूर्ण केले.

कोण होते काशिनाथ घाणेकर ? Dr Kashinath Ghanekar

Dr Kashinath Ghanekar information in Marathi
 • व्यवसायाने दंतचिकित्सक पण मराठी रंगभूमी आणि मराठी चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय. संभाजी महाराजांचा विषय निघाला की डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचा विषय निघणार नाही असे होणार नाही. संभाजी म्हणजे फक्त आणि फक्त डॉ. काशीनाथ घाणेकर
 • एकीकडे मराठी नाटक, चित्रपट गाजवणारे, नावाजलेलं व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर काशिनाथ घाणेकर. काशिनाथ घाणेकर यांचे अनेक सिनेमा त्यांच्या अभिनयासोबतच त्यांचा कणखरपणा, स्पष्ट वक्तेपणा, यासाठी ओळखलं जायचे. त्यांचा “रायगडाला जेव्हा जाग येते” या नाटकातील भूमिका तर चांगलीच लोकप्रिय झाली होती.
 • यासोबतच लक्ष्मी आली घरा, हा खेळ सावल्यांचा, हे सिनेमे चांगलेच गाजले. तर या सोबतच त्यांच्या अनेक गाजलेल्या नाटक सिनेमांची नावे घेतली जातात. अभिनेत्या सोबतच पेशानी डॉक्टर असलेले डॉ. काशीनाथ घाणेकर प्रॅक्टिस आणि आवड म्हणून अभिनयाच्या दोन्ही गोष्टी उत्तमरीत्या सांभाळत होते. त्याकाळी त्यांनी गाजवलेल्या या काळाला काशिनाथ पूर्व असं म्हटलं जात होतं.
 • काशिनाथ घाणेकर हे एक प्रसिद्ध दातांचे डॉक्टर होते. ज्यामुळे त्यांना डॉक्टर ही पदवी प्राप्त होते. डॉक्टर या व्यवसायिकासोबत काशिनाथ घाणेकर हे एक यशस्वी मराठी नाट्य अभिनेते व हिंदी मराठी चित्रपट अभिनेते सुद्धा होते.
 • वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या रायगडला जेव्हा जाग येते या नाटकातल्या संभाजी राजे या त्यांच्या भूमिके नंतर डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट लोकप्रियता प्राप्त झाली.
 • १९६० ते १९९० या दरम्याने डॉक्टर काशिनाथ घाणेकर हे मराठीमधील पहिले सुपरस्टार बनले. त्यांनी मराठी सह इतर हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण कामगिरी केली. “
 • लक्ष्मी आली घरा” ह्या त्यांच्या १९५२ साली आलेल्या पहिल्या मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी उत्तम अभिनय केला होता.

डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा चित्रपट आणि नाटक यातील प्रवास

Dr Kashinath Ghanekar information in Marathi

डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा जन्म कोकणात झाला होता. त्यांच्या जन्माच्या वेळेस त्यांची आत्या काशी यात्रा करून परत आल्यामुळे त्यांचे नाव काशिनाथ असे ठेवण्यात आले होते. त्यांच्या आईचे नाव यमुनाबाई असे होते. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी पुण्याच्या एसपी महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. त्या ठिकाणी एक वर्ष शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी ते रत्नागिरीला आले. त्या ठिकाणी ते खऱ्या अर्थाने नाट्यसृष्टीशी परिचित झाले. व त्यांनी महाविद्यालयाच्या अनेक नाटकांमध्ये काम केले.

एमडी होण्याचे त्यांचे स्वप्न होते, परंतु ते स्वप्न पूर्ण होणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये इंटर सायन्सला प्रवेश घेतला. त्यांना थोडे कमी गुण मिळाल्यामुळे सर्जरीला जाता आले नाही, तसेच मोठ्या भावाच्या सल्ल्यानुसार डॉ. काशिनाथ घाणेकर दंत वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला, काशिनाथ घाणेकर बीडीएसच्या परीक्षेमध्ये मुंबई विद्यापीठांमध्ये पहिले सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. त्यानंतर त्यांनी जे जे महाविद्यालयांमध्ये व्याख्याता म्हणून नोकरी करण्यास सुरुवात केली.

त्यानंतरच्या वर्षभरातडॉ. काशिनाथ घाणेकरनी स्वतःचा दवाखाना देखील सुरू केला. परंतु त्यांच्यातील अभिनय कलेमुळे काशिनाथ घाणेकर यांनी नाटकांमध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी चित्रपटातही काम करायला सुरुवात केली. त्यांचा पाहु रे किती वाट हा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट राजा ठाकूर यांनी दिग्दर्शित केलेला होता.

या चित्रपटांमध्ये सीमा आणि अरुण सरनाईक यांनी देखील अभिनय केला होता. या चित्रपटांमध्ये नायिकेच्या धाकट्या भावाची भूमिका डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी केली होती. त्यानंतर मराठा तितुका मिळवावा या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले. या चित्रपटांमध्ये शूर आम्ही सरदार या त्यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्याची आजही रसिकांना भुरळ पडते.

त्यानंतर डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी अभिनय केलेला सुखाची सावली या नावाचा चित्रपट वृंदा या कादंबरीवर आधारित होता. यामध्ये जयश्री गडकर यांनी देखील भूमिका केली होती. लागोपाठ दोन चित्रपट अपयशी ठरल्यानंतर आपली चित्रपट कारकीर्द संपुष्टात येते की काय, असे वाटत असतानाच डॉ. काशिनाथ घाणेकर यांना श्रीपाद चित्र तर्फे राजाभाऊ परांजपे यांच्या दिग्दर्शनाखाली पाठलाग हा पहिला मराठी रहस्यमय चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

या चित्रपटासाठी डॉ. काशिनाथ घाणेकर यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता नेत्याचा पुरस्कार देखील मिळाला. त्यानंतर त्यांनी केलेल्या लक्ष्मी आली घरा या चित्रपटातील भूमिका देखील चालून गेली. त्यानंतर पड छाया या चित्रपटांमध्ये रमेश देव यांच्या मुलाच्या भूमिकेत ते चमकले.

या दोन चित्रपटातील अभिनय पाहून सुलोचना दिदी यांनी दादी मा या हिंदी चित्रपटासाठी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे नाव सुचवले आणि त्यानंतर या चित्रपटात काम करण्यासाठी त्यांना बोलावण्यात देखील आले. या चित्रपटाचे यशानंतर अभिलाशा या हिंदी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली.

त्यानंतर त्यांनी मधुमती या मराठी चित्रपटासाठी करार केला कालांतराने देव माणूस आणि झेप या चित्रपटांमध्ये देखील काम केले. परंतु हे दोन्ही चित्रपट फ्लॉप झाले. चंद्र आहे साक्षीला या चित्रपटात देखील डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी काम केले, पण तो देखील फार चालला नाही. इरसाल बापूची त्यांची भूमिका असलेला गारंबीचा बापू हा चित्रपट प्रेक्षक प्रिय ठरला.

कलाकार आणि ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी अश्रूंची झाली फुले, तुझे आहे तुझं पाशी, इथे ओशाळला मृत्यू, आनंदी गोपाळ, गारंबीचा बापू, शितू, मधू मंजिरी, आणि सुंदर मी होणार यासारख्या नाटकांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वांच्या मनावर छाप सोडले. तर दादि मा, एकटा, अभिलाषा, धर्मपत्नी, मराठा तीतुका मिळवावा, अजब तुझे सरकार, मधुचंद्र, प्रीत शिकवा मला, देव माणूस, हा खेळ सावल्यांचा यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी केलेला अभिनय सर्वांच्या पसंतीस उतरला. त्यानंतर त्यांनी केलेल्या मानसोपचारतज्ञाची हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील भूमिका देखील लोकप्रिय झाली.

डॉ. काशिनाथ घाणेकर यांची चित्रपटांमध्ये आपली यशस्वी कारकीर्द झाली असली तरी नाटकांमध्ये त्यांना विशेष रस होता. आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या डॉ. काशिनाथ घाणेकर यांचं 2 मार्च 1986 रोजी वयाच्या 52 व्या वर्षी अमरावतीमध्ये तुझे आहे तूज पाशी या नाट्यप्रयोगाच्या दरम्याने झोपेतच हृदयविकाराने निधन झाले. अशा या अष्टपैलू कराकाराची रंगभूमीवरील कला आजच्या पिढीला पाहायला न मिळणे हे या पिढीचे दुर्भाग्य म्हणावे लागेल.

डॉक्टर काशिनाथ घाणेकर

काशिनाथ घाणेकर यांचे वैयक्तिक जीवन

 • डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची दोन लग्न झाली होती. त्यांच्या पहिल्या बायकोचे नाव इरावती भिडे या एक स्त्री रोग तज्ञ होत्या. त्यानंतर त्यांच्यातील मतभेदामुळे पहिल्या पत्नीसोबत डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले.
 • त्यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव कांचन लाटकर असे होते. कांचन लाटकर या प्रसिद्ध अभिनेत्री सुलोचनाबाई यांच्या सुपुत्री होत्या.
 • कांचन हिच्यासोबत काशिनाथ घाणेकर यांचे वैवाहिक जीवन अतिशय सुरळीत चालू होते. डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या निधनानंतर कांचन यांनी “नाथ हा माझा” या चरित्राचे लेखन केले.
डॉ काशिनाथ घाणेकर

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची कारकीर्द

 • डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांना ओळख ही त्यांचं पहिलं नाटक “रायगडाला जेव्हा जाग येते” यातील त्यांच्या संभाजी राजेंच्या भुमिके नंतर प्राप्त झाली.
 • यानंतर इसवी सन १९६० ते १९९० च्या दरम्याने घाणेकर हे मराठी सृष्टीतील पहिले प्रसिद्ध सुपरस्टार झाले
 • १९६० ते १९८० च्या दरम्यान उत्तम व सर्वोत्तम मानधन प्राप्त करणाऱ्या अभिनेत्यांनच्या यादीत डॉक्टर काशिनाथ घाणेकर हे समाविष्ट होते.
 • १९६० मध्ये रिलीज झालेला दादी मां हा हिंदी चित्रपट, या चित्रपटांमध्ये डॉक्टर काशिनाथ यांनी अशोक कुमार आणि बिना रॉय यांच्या मुलाची एक लहान भूमिका केली होती.
 • वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या १९६२ मध्ये “रायगडला जेव्हा जाग येते” या नाटकातील राजे संभाजी यांची भूमिका डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी इतकी उत्तम साकारली की ते रातोरात एक प्रसिद्ध सुपरस्टार बनले.
 • या नाटकांशिवाय डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी प्रचंड नाटकांमध्ये उत्तम अभिनय करून, स्वतःचे स्थान प्राप्त केले.
 • १९६८ मध्ये प्रकाशित झालेला “मधुचंद्र” या चित्रपटांद्वारे घाणेकर यांना एक प्रख्यात स्टेज अभिनेता व एक प्रमुख मराठी चित्रपट म्हणून लोकांसमोर ओळख मिळवून दिली.

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे चित्रपट

 • एकटी
 • पाहू किती रे वाट
 • देव माणूस
 • पाठलाग
 • झेप
 • मधुचंद्र
 • हा खेळ सावल्यांचा
 • धर्मपत्नी
 • अजब तुझे सरकार
 • अन्नपूर्णा
 • चंद्र होता साक्षीला
 • मानला तर देव
 • लक्ष्मी आली घरा
 • घर गंगेच्या काठी

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे हिंदी चित्रपट

 • अभिलाषा
 • दादी मां

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची नाटके

 • अश्रूंची झाली फुले – लेखक वसंत कानेटकर
 • इथे ओशाळला मृत्यू – लेखक वसंत कानेटकर
 • तुझे आहे तुझं पाशी – लेखक पु.ल. देशपांडे
 • रायगडला जेव्हा जाग येते – लेखक वसंत कानेटकर
 • सुंदर मी होणार – लेखक पु ल देशपांडे
 • शितू – लेखक गो. नी. दांडेकर
 • गरिबांचा बापू – लेखक श्री.ना. पेंडसे
 • आनंदी गोपाळ – लेखक राम जोगळेकर
 • मधुमंजिरी – लेखक सुधा करमरकर

काशिनाथ घाणेकर यांच्यावर लिहिलेले पुस्तक

 • नाथ हा माझा – लेखक पत्नी कांचन घाणेकर

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

 • काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित आणि ….. डॉक्टर काशिनाथ घाणेकर नावाचा चित्रपट आला आहे ज्यामध्ये काशिनाथ घाणेकर यांची भूमिका सुबोध भावे यांनी साकारली आहे.

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या बद्दल मनोरंजक तथ्ये

 • डॉक्टर काशिनाथ घाणेकर हे एक लोकप्रिय अभिनेता व नटसम्राट होते.
 • डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिपळूण ह्या त्यांच्या मूळ गावी पूर्ण केले.
 • काशिनाथ घाणेकर व त्यांची पहिली पत्नी इरावती भिडे यांच्यामध्ये तितकेसे चांगले संबंध नव्हते.
 • १९८३ मध्ये डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी पहिल्या पत्नीसोबत घटस्फोट घेऊन, डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी कांचन घाणेकर यांच्या सोबत लग्न केले.
 • डॉक्टर काशिनाथ घाणेकर व्यवसायाने डेंटिस्ट होते.
 • डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे “रायगडला जेव्हा जाग येते” हे नाटक अतिशय गाजले. ज्यामध्ये त्यांनी संभाजी राजे यांची भूमिका साकारली होती
 • “प्रभाकर पंशिकर” हे डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे सगळ्यात जवळचे मित्र होते.

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचे प्रसिद्ध नाटक – “रायगडला जेव्हा जाग येते”

१९६२  साली “रायगडला जेव्हा जाग येते” या प्रसिद्ध नाटकाचे प्रयोग अगदी दणक्यात सुरू होते. या नाटकात डॉक्टरांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्याकाळी हे सर्वाधिक प्रयोग करणारे पहिले नाटक ठरलं. या नाटकातील डॉक्टरांच्या अभिनयाने काशिनाथ घाणेकर म्हणजेच छत्रपती संभाजी महाराज हे समीकरण प्रेक्षकांच्या डोक्यात अगदी पक्क बसले होते. या नाटकामुळेच खरं तर डॉक्टरांना अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आणि चित्रपटसृष्टीतल्या त्यांच्या कारकीर्दीला सुरुवात झाली. एकाच वेळी त्यांना तीन सिनेमाच्या ऑफर आल्या, त्यातला एक सिनेमा होता, “मराठा तितुका मिळवावा”.

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची शेवटची इच्छा

डॉक्टरांचा अभिनय त्यांचे वैयक्तिक आयुष्य हे २०१८ मध्ये आलेल्या “आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर” या सिनेमातून आपल्या समोर आलंच. पण डॉक्टरांची मरणोत्तर इच्छा खूपच विचार करण्यासारखी होती, काशिनाथ यांना कायमच हेच वाटायचं की, मरणानंतर त्यांचा देह हा वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयोगी व्हावा.

त्यांनी त्यांच्या देहावर त्यांचा अभ्यास करावा. पण त्यांच्या पत्नी कांचन घाणेकर यांना ही गोष्ट योग्य वाटली नाही. दि. ०२ मार्च १९८६ ला काशिनाथ यांचे निधन झालं आणि त्यांच्या मरणानंतर त्यांची माफी मागत, कांचन यांनी त्यांचा देह वैद्यकीय शाखेत न देता, त्यावर अंत्यसंस्कार केले.

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचा मृत्यू

अमरावती शहरामध्ये डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या नाटकाचा प्रयोग चालू होता. नाटकाचा प्रयोग चालू असतानाच, डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांना हृदयविकाराचा झटका आला, हृदयविकाराच्या झटक्यातून ते सावरू शकले नाहीत व दि. ०२ मार्च १९८६ रोजी अमरावतीमध्ये डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचा मृत्यू झाला.

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

 • मराठी रंगभूमीवर सुप्रसिद्ध सुपरस्टारचा दर्जा मिळवणारे, डॉक्टर काशिनाथ घाणेकर हे पहिले अभिनेते होते.
 • १९८६ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने काशिनाथ घाणेकर यांचा मृत्यू झाला.
 • अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची मुलगी कांचन लाटकर हिच्यासोबत डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी लग्न केले.
 • डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या चारित्र्यावर आधारित “आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर” हा चित्रपट २०१८ नोव्हेंबर मध्ये प्रकाशित करण्यात आला. या चित्रपटामध्ये काशिनाथ घाणेकर यांच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास दाखविला आहे.
 • “आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर” या चित्रपटांमध्ये डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी साकारली आहे.
 • “रायगडला जेव्हा जाग येते” या नाटकाने रातोरात डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी प्रसिद्धी प्राप्त केली. ज्या नाटकांमध्ये त्यांनी संभाजी राजे यांची भूमिका निभावली होती.
 • मधुचंद्र या चित्रपटाद्वारे डॉक्टर काशिनाथ घाणेकर एक प्रख्यात रंगमंच अभिनेता व मराठी चित्रपट सृष्टी मधील एक प्रमुख कलाकार म्हणून ओळखीस आले.
 • डॉक्टर काशिनाथ घाणेकर हे व्यवसायाने डेंटल सर्जन होते.

FAQ

१. काशिनाथ घाणेकर यांचा जन्म कधी झाला ?

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचा जन्म दि. १४ सप्टेंबर १९३० रोजी महाराष्ट्र राज्यामधील, चिपळूण या ठिकाणी झाला.

२. कोण होते काशिनाथ घाणेकर ?

काशिनाथ घाणेकर हे एक प्रसिद्ध दातांचे डॉक्टर होते. ज्यामुळे त्यांना डॉक्टर ही पदवी प्राप्त होते डॉक्टर या व्यवसायिकासोबत काशिनाथ घाणेकर हे एक यशस्वी मराठी नाट्य अभिनेते व हिंदी मराठी चित्रपट अभिनेते सुद्धा होते.

२. डॉ. काशिनाथ घाणेकर यांना प्रसिद्धी कधी मिळाली ?

वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या १९६२ मध्ये “रायगडला जेव्हा जाग येते” या नाटकातील राजे संभाजी यांची भूमिका डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी इतकी उत्तम साकारली की ते रातोरात एक प्रसिद्ध सुपरस्टार बनले.

४. डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा मृत्यू कधी झाला ?

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांना हृदयविकाराचा झटका आला, हृदयविकाराच्या झटक्यातून ते सावरू शकले नाहीत व दि. ०२ मार्च १९८६ रोजी अमरावतीमध्ये डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांचा मृत्यू झाला.

५. डॉ. काशिनाथ घाणेकर यांची शेवटची इच्छा काय होती ?

डॉक्टरांची मरणोत्तर इच्छा खूपच विचार करण्यासारखी होती, काशिनाथ यांना कायमच हेच वाटायचं की, मरणानंतर त्यांचा देह हा वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयोगी व्हावा. त्यांनी त्यांच्या देहावर त्यांचा अभ्यास करावा.

६. डॉ. काशिनाथ घाणेकर यांची किती लग्न झाली होती ?

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांची दोन लग्न झाली होती. त्यांच्या पहिल्या बायकोचे नाव इरावती भिडे या एक रोग तज्ञ होत्या. त्यानंतर त्यांच्यातील मतभेदामुळे पहिल्या पत्नीसोबत डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न केले.

७. डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित कोणता चित्रपट आला आहे ?

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या चारित्र्यावर आधारित “आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर” हा चित्रपट २०१८ नोव्हेंबर मध्ये प्रकाशित करण्यात आला.

८. डॉ काशिनाथ घाणेकर यांनी त्यांचे शालेय शिक्षण कूठे पूर्ण केले ?

डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिपळूण ह्या त्यांच्या मूळ गावी पूर्ण केले.

९. डॉ. काशिनाथ घाणेकर व्यवसायाने कोण होते ?

डॉक्टर काशिनाथ घाणेकर हे व्यवसायाने डेंटल सर्जन होते.

१०. डॉ. काशिनाथ घाणेकर यांनी दुसरे लग्न कोणाशी केले ?

अभिनेत्री सुलोचना लाटकर यांची मुलगी कांचन लाटकर हिच्यासोबत डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांनी दुसरे लग्न केले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रसिद्ध अभिनेता डॉक्टर काशिनाथ घाणेकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद.

Leave a comment