किशोर कुमार माहिती मराठी | Kishor Kumar Information In Marathi

किशोर कुमार माहिती मराठी | Kishor Kumar Information In Marathi – किशोर कुमार हे एक असे नाव आहे, जे भारतीय संगीताला लाभलेले मोठे यश असून यांचे नाव हे अजरामर आहे. बॉलीवूड इंडस्ट्रीमधील संगीताचा इतिहास लिहायचा असल्यास, किशोर कुमार यांच्या नावाचे स्वतंत्र पुस्तक नक्कीच लिहावे लागेल. किशोरदा यांना भारतीय संगीताचा आत्मा म्हटले गेले. त्यांच्या आवाजाने अनेकांच्या भावना व्यक्त झाल्या, किशोरदा यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही.

किशोर कुमार हे एक प्रसिद्ध संगीतकार, लेखक, पार्श्वगायक, अभिनेता, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता होते. किशोर कुमार यांनी हिंदी चित्रपटांमध्ये गाणी गायली.

या व्यतिरिक्त त्यांनी बंगाली, मराठी, आसाम, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, ओरिसा, उर्दू, अशा अनेक भाषांमध्ये सुद्धा गाणे गाऊन त्यांचा इतर भाषांवर सुद्धा किती प्रभुत्व हे त्यांनी सिद्ध केले. किशोरदा यांना सर्वोत्कृष्ट गायनांचे विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या प्रसिद्ध संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता, पटलेखक, पार्श्वगायक, अभिनेता, किशोर कुमार यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे. ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

किशोर कुमार माहिती मराठी | Kishor Kumar Information In Marathi

मूळ नाव आभास कुमार गांगुली
ओळख किशोर कुमार
जन्म तारीख ४ ऑगस्ट १९२९
जन्म स्थळ खांडवा, मध्य प्रांत (मध्य प्रदेश), ब्रिटिश भारत
व्यवसायपार्श्वगायक, अभिनेता, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक
राष्ट्रीयत्वभारतीय
महाविद्यालय/विद्यापीठख्रिश्चन कॉलेज, इंदौर
शैक्षणिक पात्रतापदवीधर
पदार्पणचित्रपट (अभिनेता) – शिकारी (१९४६) 
पार्श्वगायक – मरने की दुआएं क्यूं मांगू (जिद्दी १९४८)
धर्महिंदू
वैवाहिक स्थितीविवाहित
लग्नाची तारीखमार्च १९७३
मृत्यू १३ ऑक्टोबर १९८७
मृत्यू ठिकाण मुंबई, महाराष्ट्र, भारत
मृत्यूचे कारणहृदयविकाराचा झटका

किशोर कुमार यांचा जन्म व सुरुवातीचे जीवन

Kishor Kumar Information In Marathi

किशोरदा यांचे मूळ नाव हे आभास गांगुली असे होते. किशोरदा यांचा जन्म दिनांक ०४ ऑगस्ट १९२९ रोजी खांडवा मध्य प्रदेश एका छोट्याशा गावामध्ये झाला. किशोरदा अर्थात आभास कुमार यांचा जन्म एका  बंगाली कुटुंबामध्ये झाला.

किशोरदा यांचे कुटुंब संगीत क्षेत्रातले असल्याकारणाने, भावांसोबत वेळ घालवताना किशोरदा यांना सुद्धा चित्रपट व संगीतामध्ये रस येऊ लागला. एक उत्तम अभिनेता व गायक म्हणून त्यांना स्वतःची ओळख निर्माण करायची होती. किशोरदा एलएल सेहगलचे हे खूप मोठे चाहते होते. त्यांना किशोरदाने स्वतःचे गुरु मानले व त्यांच्या गायन शैलीचे अनुकरण करून त्यांनी प्रसिद्धी गाठण्यास सुरुवात केली.

किशोर कुमार यांच्या कुटुंबाचा परिचय

यांच्या वडिलांचे नाव कुंजीलाल गंगोपाध्याय गांगुली असे होते. हे एक प्रसिद्ध वकील होते. तसेच यांच्या आईचे नाव गौरी देवी होते. किशोर कुमार यांना दोन भाऊ व एक बहीण होती. भावांची नावे अशोक कुमार व अनुप कुमार.

हे दोघे एक उत्तम अभिनेता होते. बहिणीचे नाव हे सती देवी. अशोक कुमार यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये उत्तम काम केले. अशोक कुमार यांच्या मदतीने अनुप कुमारने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले. यांची फॅमिली ही बॉलीवूड इंडस्ट्रीच्या क्षेत्रातून, स्वतःची ओळख निर्माण करत होती. त्यातून यांनी सुद्धा स्वतःची ओळख प्रेक्षकांच्या मनात उमटवण्यास सुरुवात केली.

किशोर कुमार यांची कौटुंबिक माहिती

वडिलांचे नाव कुंजलाल गांगुली
आईचे नाव गौरी देवी
भावंडे अशोक कुमार (अभिनेता), अनुप कुमार (अभिनेता),सती देवी
पत्नी रुमा गुहा ठाकुर्ता (बंगाली अभिनेत्री आणि गायिका)
मधुबाला (बॉलिवूड अभिनेत्री)
योगिता बाली (बॉलिवूड अभिनेत्री)
लीना चंदावरकर (बॉलिवूड अभिनेत्री)
अपत्य अमित कुमार, गायक , सुमित कुमार, गायक

किशोर कुमार यांचे शिक्षण

यांना लहानपणापासूनच चित्रपट व संगीत क्षेत्रामध्ये रस होता. त्यामुळे त्यांचा जास्त कल हा संगीत व अभिनय क्षेत्रामध्ये जास्त होता. यांनी इंदोरच्या ख्रिश्चन कॉलेजमधून पदवीचे शिक्षण प्राप्त करून, ते पदवीधर झाले.

Kishor Kumar Information In Marathi

किशोर कुमार यांचे वैयक्तिक जीवन

यांची चार लग्न झाली होती. किशोर कुमार यांच्या चारही बायका एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या व फिल्म इंडस्ट्रीशी त्यांचे जुने नाते होते.

  • किशोरदा यांची पहिली पत्नी रुमा गुहा होती. तिच्यासोबत यांनी १९५१ मध्ये लग्न केले. रूमा गुहा ही एक बंगाली चित्रपट अभिनेत्री व गायिका होती. यांना अमित कुमार नावाचे अपत्य झाले. अमित कुमार हे एक अभिनेता, गायक, संगीत दिग्दर्शक व चित्रपट दिग्दर्शक आहे. यांचे हे लग्न १९५८ पर्यंत टिकले. त्यानंतर किशोरदाने आपली पहिली पत्नी रुमा गुहा हिच्या सोबत घटस्फोट घेतला.
  • १९६० मध्ये यांनी बॉलीवूड चित्रपट अभिनेत्री मधुबाला हिच्या सोबत दुसरे लग्न केले. यांनी मधुबाला सोबत “चलती का नाम गाडी” व झुमर मध्ये काम केले होते. दि. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मधुबालाचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला.
  • त्यानंतर १९७६ मध्ये यांनी योगिता बाली सोबत तिसरे लग्न केले. योगिता बाली सुद्धा इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्री होती. परंतु हे त्यांचे लग्न दोन वर्षांनी संपले.
  • यानंतर यांनी १९८० मध्ये चौथे लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव लीना चंदावरकर असे होते. लीना चंदावरकर किशोरदा यांना एक अपत्य झाले, ज्यांचे नाव सुमित कुमार असे आहे.
किशोर कुमार

किशोर कुमार यांच्या आवडीनिवडी

छंद कादंबरी वाचणे, ड्रायव्हिंग करणे, टेबल टेनिस खेळणे
आवडता संगीतकारएस डी बर्मन, आर डी बर्मन
आवडता अभिनेताअशोक कुमार, अमिताभ बच्चन , राजेश खन्ना
आवडती अभिनेत्रीमधुबाला

किशोर कुमारचे चित्रपट गाणे आणि कारकीर्द

यांनी त्यांच्या हयातीत ९० पेक्षा जास्त  चित्रपटांसाठी स्वतःचा आवाज दिला. अभिनेते राजेश खन्ना, संगीतकार आरडी बर्मन व मोहम्मद रफी हे यांचे अगदी जवळचे मित्र होते.

किशोर कुमारची करिअर सुरू करण्याची वेळ

यांनी कोणत्याही संगीताच्या प्रशिक्षणाशिवाय, चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश करून गाणे गाण्यास सुरुवात केली. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, त्यांचे मोठे बंधू अशोक कुमार यांचा चित्रपटसृष्टी मधील असलेला प्रभाव. अशोक कुमार व किशोरदा यांच्यामध्ये अठरा वर्षाचा फरक होता. अशोक कुमार यांच्या मदतीने यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्थान हे अगदी लहान वयामध्ये निर्माण केले. तारुण्यपणात यांनी बॉम्बे टॉकीज साठी कोरस गायक म्हणून काम केले. ज्यामध्ये अशोक कुमार यांनी काम केले होते.

किशोर कुमारचा पहिला चित्रपट आणि गाणे

किशोर कुमार
  • १९४६ मध्ये यांनी पहिल्यांदा शिकारी या चित्रपटांमध्ये काम केले. त्यावेळी किशोरदा यांचे वय अवघे १७ वर्षे होते. एक उत्तम गायक म्हणून, १९४८ मध्ये आलेला जिद्दी या चित्रपटांमध्ये यांनी एक गाणे गायले, ज्या गाण्याचे बोल “मरने की दुवाए क्यू मांगू” असे आहे.
  • १९४९ मध्ये यांनी चित्रपट सृष्टी मध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले. १९५१ मध्ये “आंदोलन” व १९५४ मध्ये “नोकरी” तसेच १९५७ मध्ये “मुसाफिर” यांसारख्या चित्रपटांमध्ये यांनी मुख्य भूमिका साकारल्या.
  • यांच्या पार्श्वगायनाच्या प्रतिभेचा एसडी बर्मन यांनी “मशाल” चित्रपटादरम्यान यशस्वीपणे वापर केला. त्यानंतर यांनी १९५४ मध्ये “मुनिशी” व १९५७ मध्ये “नौ दो ग्यारह” यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांच्या उत्तम गायनाचे प्रदर्शन केले.

किशोर कुमारचे विनोदी चित्रपट

यांनी त्यांच्या अभिनयामध्ये विविध विनोदी भूमिका सुद्धा साकारल्या. ज्या भूमिकानी रसिक प्रेक्षकांच्या मनात प्रचंड भुरळ पाडली. त्यापैकी १९५७ मध्ये यांचा एक विनोदी चित्रपट आला. यानंतर १९५८ मध्ये “चलती का नाम गाडी” हा चित्रपट आला. ज्या चित्रपटांमध्ये यांनी विनोदी भूमिका साकारली. यानंतर १९६२ मध्ये “हाफ तिकीट” व १९६८ मध्ये “पडोसन” या पिक्चर मध्ये यांनी विनोदी भूमिका साकारली.

किशोर कुमार दिग्दर्शक म्हणून

  • १९६० मध्ये यांनी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करण्यास सुरुवात केली. १९६१ च्या झुमरु चित्रपटासाठी यांनी दिग्दर्शक, गीतकार, निर्माता, संगीतकार, म्हणून काम केले.
  • या चित्रपटांमध्ये यांनी मुख्य भूमिका साकारली. या भूमिकेत मधुबाला ही त्यांची सहाय्यक कलाकार होती.
  • याशिवाय यांनी १९७१ मध्ये “दूर का राही” व १९८० “दूर वादी मे कही” या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनाचे काम केले
  • १९६० दरम्यान यांनी अनेक चित्रपटांसाठी हिट गाणी गायली. ज्यामध्ये १९६४ च्या गाईड चित्रपटातील “गाता रहे मेरा दिल”, १९६७ च्या ज्वेल थिफ चित्रपटातील “ये दिल ना होता बेचारा” ही यांची प्रसिद्ध गाणी अजूनही, लोकांच्या मनात किशोर कुमार यांची छबी निर्माण करतात.
  • १९६९ मध्ये आराधना चित्रपटांमध्ये यांनी गायलेल्या “रूप तेरा मस्ताना” या गाण्याने यांना प्रचंड प्रसिद्धी प्राप्त झाली. या चित्रपटामध्ये राजेश खन्ना व शर्मिला टागोर हिने मुख्य भूमिका साकारली होती

किशोर कुमार आणि राजकारण

१९७० च्या दरम्याने यांना राजकारणाकडे आवड निर्माण झाली. १९७० च्या दरम्याने इंदिरा गांधी ह्या भारताच्या पंतप्रधान होत्या व त्या काळात इंदिरा गांधींनी सुरू केलेल्या आणीबाणीच्या काळामध्ये इंदिरा गांधींचे प्रमुख टीकाकार म्हणून किशोरदा यांच्याकडून पाहिले जाते.

किशोर कुमारचे शेवटचे गाणे

१९८८ मध्ये यांनी “वक्त की आवाज” या चित्रपटासाठी शेवटचे गाणे रेकॉर्ड केले होते.

किशोर कुमार यांच्यावर आधारित चित्रपट

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसू यांनी किशोरदा यांच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवला. ज्या चित्रपटामध्ये रणवीर कपूर किशोरदाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे.

किशोर कुमार पुरस्काराने अचीव्हमेंट व फिल्मफेअर पुरस्कार

  • यांच्या मधुर आवाजामुळे किशोर कुमार यांना प्रत्येक क्षणी उत्कृष्ट गाण्यासाठी प्रसिद्धी प्राप्त झाली. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून त्यांना आठ फिल्म फेअर पुरस्कार देऊन, सन्मानित केले गेले.
  • त्या काळातील सर्वाधिक फिल्म पुरस्कार जिंकण्याचा विक्रम यांनी नोंदवला.
  • १९८५ ते १९८६ च्या दरम्याने यांना मध्य प्रदेश सरकारने, “लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित केले होते.
  • १९९७ मध्ये मध्य प्रदेश सरकारने यांना “किशोर कुमार पुरस्कार” नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित केले.

फिल्मफेयर अवार्ड्स लिस्ट

वर्ष चित्रपट व गाणे पुरस्कार
१९७९खैके पान बनारस वाला – डॉनफिल्मफेयर अवार्ड्स
१९८५मंजिले अपनी जगहा – शराबी फिल्मफेयर अवार्ड्स
१९७६ दिल ऐसा किसीने मेरा तोड – अमानुष फिल्मफेयर अवार्ड्स
१९८६ये सागर कि लेहरो – समुंदर फिल्मफेयर अवार्ड्स
१९८३पग घुंघरू – नमक हलालफिल्मफेयर अवार्ड्स
१९७५कोरा कागदबेस्ट पार्श्वगायक म्हणून बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचा पुरस्कार
१९७३हरे रामा हरे कृष्णा बेस्ट पार्श्वगायक म्हणून बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचा पुरस्कार
१९७०रूप तेरा मस्ताना – आराधना बेस्ट पार्श्वगायक म्हणून बंगाल फिल्म जर्नालिस्ट असोसिएशनचा पुरस्कार
१९५८एक लडकी भिगी भागीसी- चलती का नाम गाडीफिल्मफेयर अवार्ड्स
 १९८५अगर तुम ना होते – थोडीसी बेवफाई फिल्मफेयर अवार्ड्स

किशोर कुमार विवाद

भारत सरकारचा आयकर चुकवल्याचा आरोप

१९६० मध्ये किशोरदा हे वादात अडकले. जेव्हा यांच्यावर भारत सरकारचा आयकर चुकवल्याचा आरोप केला गेला, ज्यामुळे किशोरदा यांच्या प्रतिष्ठेवर खूप खोलवर परिणाम झाला.

मिथुन चक्रवर्ती सोबत वाद

यांचा मिथुन चक्रवर्ती सोबत त्यांची पत्नी योगिता बाली हिच्या सोबत सुद्धा वाद झाला होता, नंतर हा वाद मिटला. त्यानंतर १९८२ मध्ये “डिस्को डान्सर” १९८८ मध्ये “प्यार का मंदिर” सारख्या चित्रपटांमध्ये यांनी मिथुन साठी गाणे सुद्धा गायले.

अमिताभ बच्चन यांच्यासोबत वाद

किशोरदा व अमिताभ बच्चन त्यांच्यामधील वाद हा चर्चेत राहिलेला विषय होता. या वादाचे मुख्य कारण म्हणजे अमिताभ यांनी त्यांच्या ‘ममता की छांओं’ या चित्रपटासाठी पाहुण्या कलाकाराचा प्रस्ताव नाकारला होता. १९८२ ते १९८७ पर्यंत चालला. त्यानंतर अमिताभसाठी यांनी पार्श्वगायन करण्यास नकार दिला. तरीही काही तडजोडीनंतर, १९८९ मध्ये किशोर कुमार यांच्या मृत्यूनंतर, प्रदर्शित झालेल्या “तुफान” चित्रपटासाठी यांनी अमिताभ बच्चनसाठी गाणे गायले होते.

काँग्रेसच्या सभेत गाणे गाण्यास नकार

संजय गांधींच्या विनंती नंतर सुद्धा किशोरदा यांनी काँग्रेसच्या सभेमध्ये गाणे गाण्यास नकार दिला. त्यामुळे किशोर कुमार यांच्या गाण्यावर “ऑल इंडिया रेडिओ”, “दूरदर्शन”, ने दि. ०४ मे १९७६ पर्यंत बंदी घातली होती. आणीबाणीचा काळ संपेपर्यंत ही बंदी कायम होती. याचा परिणाम यांच्या अभिनयावर सुद्धा झाला. यांचा अभिनय सुद्धा त्या काळामध्ये नाकारण्यात आला होता.

किशोर कुमार नेटवर्थ

यांनी बॉलीवूड इंडस्ट्री मध्ये खूप काम केले. त्यामुळे त्यांच्या कामाने त्यांना प्रचंड कमाई प्राप्त झाली. एका तपशीलानुसार यांची एकूण संपत्ती ही साठ कोटी रुपये इतकी होती.

किशोर कुमार यांच्या मृत्यूचे कारण

१९८६ मध्ये यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांनी गाण्यांचे कमी रेकॉर्ड करण्यास सुरुवात केले. आजारी पडल्यानंतर, किशोरदा यांनी त्यांच्या जन्मस्थानी म्हणजेच खंडावा, मध्य प्रदेश या ठिकाणी जाण्याचा विचार केला असतानाच, अचानक दुसऱ्या दिवशी हृदयविकाराच्या झटक्यामुळे किशोर कुमार यांचा मृत्यू झाला.

किशोर कुमार मृत्यू

वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्षी किशोरदा यांचा दिनांक १३ ऑक्टोंबर १९८७ रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. यांच्या पार्थिवावर त्यांची जन्मभूमी खंडावा या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर कुमार यांच्या बद्दल मनोरंजक तथ्ये

  • यांचा जन्म बंगाली कुटुंबामध्ये आभास कुमार गांगुली या मूळ नावाने झाला होता. परंतु फिल्म इंडस्ट्रीमध्ये यांना आभास कुमार ह्या नावापेक्षा किशोर कुमार या नावास जास्त प्रसिद्धी प्राप्त झाली.
  • यांचे वडील कुंजालाल गांगुली हे गंगोपाध्याय म्हणजेच वकील होते. तर त्यांची आई गौरी देवी एका श्रीमंत बंगाली कुटुंबांमधील कन्या होती.
  • किशोरदा लहान असताना, त्यांचा मोठा भाऊ अशोक कुमार बॉलीवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता होता. किशोरदा व अशोक कुमार यांच्यामध्ये अंदाजे १८ वर्षाचे अंतर होते.
  • यांना त्यांच्या भावंडांमुळे चित्रपट आणि संगीत क्षेत्रामध्ये आवड निर्माण झाली.
  • यांनी जिद्दी या चित्रपटातून “मरने की दुवा क्यू मांगू” या गाण्यापासुन हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये पदार्पण केले.

किशोर कुमार यांच्या बद्दल दहा ओळी

  • यांनी संगीताचे कोणतेही प्राथमिक शिक्षण घेतले नव्हते, तरीही यांनी त्यांच्या मधुर आवाजांनी सर्वांचे मन जिंकले व सर्वांच्या मनात स्वतःची छबी निर्माण केली.
  • यांनी भारतीय संगीतांमध्ये नवीन गोष्टी निर्माण करून संगीत क्षेत्रामध्ये एक महत्त्वपूर्ण योगदान दिले. योडलिंग ही संकल्पना पहिल्यांदा बॉलीवूडमध्ये यांनी आणली. जिंदगी एक सफर है सुहाना हे गाणं किशोरदा यांनी गायले. या गाण्यांमध्ये त्यांनी योडलींग हा प्रकार वापरला. हे त्यांनी जिमी रॉजस व टेक्समोर्टन यांच्याकडून प्रेरित होऊन शिकले.
  • रफी, राजेश खन्ना, एस डी बर्मन हे यांचे जवळचे मित्र होते.
  • किशोर कुमार यांचे नाव हे किशोर कुमार नसून, आभास गांगुली असे होते. त्यांच्या चार भावंडांमध्ये किशोर कुमार हे सर्वात लहान होते.
  • यांनी फक्त हिंदी चित्रपटांमध्ये, गाणी गायली नसून ओरिसा, गुजराती, कन्नड, भोजपुरी इत्यादी भाषेमध्ये गाणे गायले व त्यांच्या या मधुरा आवाजामुळे संपूर्ण भारतभर त्यांना लोकप्रियता प्राप्त झाले.
  • किशोर कुमार यांनी त्यांच्या जीवनामध्ये चार लग्न केले. त्यांच्या चारही पत्नी फिल्म इंडस्ट्रीतल्या होत्या.
  • किशोर कुमार यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला.
  • किशोर कुमार यांची एकूण संपत्ती साठ कोटी रुपयांच्या आसपास होती.
  • किशोर कुमार यांनी काँग्रेस सभेत गाणे गाण्यास नकार दिल्यामुळे, दि.०४ मे १९७६ पर्यंत किशोर कुमार यांच्या “ऑल इंडिया रेडिओ” व दूरदर्शनने प्रसारित होणाऱ्या सर्व गाण्यांना बंदी घातली गेली होती.
  • किशोर कुमार यांचा दि. १३ ऑक्टोंबर १९८७ मध्ये वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्ष मृत्यू झाला.

किशोर कुमारचे प्रसिद्ध शब्द

  • ज्यादात्तर हम उसी चीज को पाना चाहते है जो महंगी है और उसी में हम अपनी खुशी को ढूढते है लेकिन सच्चाई यह है कि जीवन में जिन चीजों से वास्तव में हम सन्तुष्ट होते है वह है प्रेम, ख़ुशी और हँसी.
  • दुनिया की हर जगह को अगर प्यार की नज़र से देखो तो वह बहुत ही ज्यादा खुबसूरत लगती है.
  • मै तुम्हारे बिना बिल्कुल ही अधुरा हूँ, मुझे ऐसा महसूस होता है कि जैसे नमक के बिना दाल का सूप, दाल के बिना चावल और चावल के बिना बंगाली अधूरे है, उसी तरह से मै भी तुम बिन अधुरा हूँ.
  • प्रेम या प्यार एक ऐसा अहसास है जो लोगों को बलिदान, त्याग करना सिखाता है.
  • आपका भाई भले ही बड़े पद पर हो लेकिन उससे आपको कोई सहायता की उम्मीद नहीं रखनी चाहिए. यहाँ तक की अपने खुद के बच्चे से भी ज्यादा उम्मीद नहीं रखनी चाहिए क्योकिं इसका कोई फ़ायदा नहीं होता है, अंत में केवल पैसा ही काम आता है, इसके बदौलत ही सब आप से जुड़े भी रहते है.
  • कभी कभी इंसान का भाग्य उसे धोखा दे सकता है लेकिन भगवान उसे कभी भी धोखा नहीं दे सकते.
  • हर रोज, हर सुबह आपके लिए एक नई शुरुआत लेकर आता है. आप हर दिन अपने आप को बेहतर से और बेहतर बनाने का मौका दे और उसका इस्तेमाल करे. आप अपने आप को साबित करने के लिए दुनिया में कुछ अच्छा करने के लिए दृढ निश्चयी बने. 
  • यदि आप किसी चीज को पाना चाहते है जो आपका पहले कभी नहीं था उसके लिए आपको कुछ नया करना पड़ेगा जो पहले आपने कभी नहीं किया है इस तरह से शायद आप उस चीज को पा लें.
  • जब हम स्वास्थ्य रहते है तो राजकुमार की तरह भोजन करते हुए काजू खाते है लेकिन जब हम अस्वस्थ्य रहते है तो हमे अपनी सेहत का ख्याल रखते हुए पर्याप्त रूप से मक्का और गेहूं भी खाने कमी करनी पड़ती है सब कुछ रहते हुए भी हमे भूखे रहना पड़ता है.
  • गरीबी और अमीरी में अंतर कभी भी उसके स्थिति को देख कर नहीं लगाना चाहिए . बहुत लोग अमीर होते हुए भी दिल के बहुत छोटे होते है. इस तरह गरीबी और अमीरी का अंतर स्थिति से ही नहीं दिल से भी तय होता है.
  • एक सच्चा मित्र वही है जो,पूरी दुनिया आपके खिलाफ हो, सभी आपसे दुरी बना ले लेकिन ऐसी परिस्थिति में भी वो आपके साथ खड़ा हो. वो किसी भी हालात में आपसे दुरी नहीं रखना चाहता है और आपका हमेशा साथ देता है.
  • जब तक आप जीवन में कुछ बन नहीं जाते, तब तक आपके प्रिय जन भी आप से अजनबियों जैसा बर्ताव करते है.

FAQ

१. किशोर कुमार यांनी किती वेळा लग्न केले?

किशोर कुमार यांची चार लग्न झाली होती. किशोर कुमार यांच्या चारही बायका एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या व फिल्म इंडस्ट्रीशी त्यांचे जुने नाते होते.

२. किशोर कुमारला किती भाऊ आहेत?

किशोर कुमार यांचे नाव हे किशोर कुमार नसून, आभास गांगुली असे होते. त्यांच्या चार भावंडांमध्ये किशोर कुमार हे सर्वात लहान होते.

३. किशोर कुमार यांचा मृत्यू कोणत्या वयात झाला?

किशोर कुमार यांचा दि. १३ ऑक्टोंबर १९८७ मध्ये वयाच्या अवघ्या ५८ व्या वर्ष मृत्यू झाला.

४. किशोर कुमार श्रेष्ठ आहेत का?

किशोर कुमार हे एक प्रसिद्ध संगीतकार, लेखक, पार्श्वगायक, अभिनेता, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस प्रसिद्ध पार्श्वगायक, अभिनेता, संगीतकार, गीतकार, दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक किशोर कुमार यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला? हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment