पर्यावरण आणि आपल्या प्रत्येकाचं एक वेगळं नातं आहे. आपण जेव्हा जन्माला येतो, तेव्हा आपलं नातं या पर्यावरणाशी जोडले जाते. आपण पहिला श्वास घेतो आणि या निसर्गाशी जोडले जातो, म्हणून पर्यावरणाचा आणि आपला संबंध शोधण्याची ही वेळ आहे.
आपण या पर्यावरणात राहतो, आपला विकास करून घेतो, म्हणून आपल्याला या पर्यावरणाची आणखी व्यवस्थितपणे ओळख व्हावी हाच दृष्टिकोन ह्या लेखाचा आहे. पर्यावरण माहिती हि माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवट पर्यंत वाचा.
पर्यावरण माहिती मराठी Environment Information In Marathi
पर्यावरण म्हणजे काय ?
पर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली असणारी जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा आपण विचार करतो. तेव्हा आपल्याला पर्यावरण दिसून येते.
परी अधिक आवरण म्हणजेच पर्यावरण. पर्यावरणाचे जैविक व अजैविक घटक असून, जैविक मध्ये परस्पर सहयोगी, सजीव, प्राणी, वनस्पतींचा समावेश होतो. पाणी, ऊर्जा, तापमान, उष्ण प्रवाह, इत्यादींचा समावेश अजैविक घटकांमध्ये होतो.
पर्यावरण माहिती – पर्यावरण हे स्थिर नसून, ते बदलणारे आहे. हे देखील आपला माहीत असणे आवश्यक ठरतं. सजीव त्यांच्या अनुकूल क्षमतेनुसार, या पर्यावरणामध्ये राहत असतो.
पर्यावरणासंबंधित व्याख्या
- सजीवांच्या आजूबाजूच्या नैसर्गिक परिसरास पर्यावरण असे म्हणतात. सजीव जिथे राहतो आणि त्या सजीवाच्या भोवतांचा जो परिसर असतो त्या संपूर्ण गोष्टीला पर्यावरण असं म्हणतात.
- पर्यावरणात विविध फुले आहेत, फुलांचे झाड आहेत, फळ झाड आहेत, छोट्या वनस्पती आहेत, रोपटे आहेत, हे सगळं निसर्गामध्ये आपला अनुभवता येते आणि त्याच्या बरोबरीने काही सजीव इथे राहताना आपला दिसतात. सर्वसाधारणपणे आपल्या सभोवताली जे काही दिसते, त्यांचा परस्पर संबंध म्हणजे पर्यावरण होय.
- जॅकी स्मिथ असं म्हणतात, सजीवाने अनुभवलेल्या प्राकृतिक, रासायनिक व जैविक परिस्थितीतिची एकूण बेरीज म्हणजे पर्यावरण.
- विविध परिसंस्थांमधील परस्पर संबंधातील संतुलनाच्या तत्वांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेले अध्ययन म्हणजे पर्यावरण.
हे वाचा –
- बहुगुणी कोरफडीचे फायदे
- इतिहास म्हणजे काय ?
- प्रदूषण म्हणजे काय
- केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय
- डोळे जड होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय
पर्यावरणशास्त्र
पर्यावरण माहिती – पर्यावरणशास्त्र आपण त्याचा विज्ञान म्हणून विचार करतो आहोत, विज्ञान म्हणून त्याचा वापर आपण करीत आहोत. आपल्या प्रत्येकाला जगण्यासाठी काही गोष्टी आवश्यक असतात, जसे कि, अन्न, वस्त्र, निवारा, या गोष्टींची आपला आवश्यकता आहे.
या आपल्या मूलभूत गरजा आहेत. या तीन मूलभूत गरजांपेक्षा देखील सर्वात महत्त्वाची गरज कोणती तर ती, ऑक्सिजन आहे. काही काळ आपण अन्नाविना राहू शकतो, परंतु ऑक्सिजन शिवाय आपण काही क्षण देखील राहू शकणार नाही, म्हणूनच आपलं आणि या निसर्गाचं किंवा पर्यावरणाचं नातं हे अत्यंत निकटचं नातं आहे.
जेव्हा ऑक्सिजन संपेल, तेव्हा मनुष्य राहणार नाही. पर्यावरण शास्त्र म्हणजेच सभोवतांचे जैविक व अजैविक घटक, त्यांची वैशिष्ट्ये, त्यांच्यातील अंतरक्रिया व त्यांचा मानवावर पडणारा प्रभाव. तसेच मानवाचा या निसर्गावर, पर्यावरणावर प्रभाव पडणारा आहे.
त्या सर्वांचा अभ्यास किंवा एकमेकांचा अभ्यास किंवा या निसर्गातील प्रत्येकच घटकाचा अभ्यास इथे केला जातो. त्यालाच आपण पर्यावरण असं म्हणतो. पर्यावरण माहिती ही आपल्यासाठी आहे आणि म्हणून झाडे जगवा, पृथ्वि वाचवा, हा संदेश आपण सर्वांनी घ्यायला हवा.
पर्यावरणाचे स्वरूप
पर्यावरणाचा अभ्यास करीत असताना, नेहमीच आपण पर्यावरण आणि आपले स्वतःचे नाते यांना जोडून घेत असतो. जसा आपण विचार आपल्या कुटुंबाचा आपल्या शिवाय करू शकत नाही, तसाच विचार पर्यावरणाशिवाय आपला स्वतःचा होऊ शकत नाही.
मी आणि माझे पर्यावरण असं जेव्हा मी विचार करतो, तेव्हा पर्यावरण सुरक्षित राहत. पर्यावरण हे माझ्या नातलगांप्रमाणे आहे हाच विचार आपण करायला हवा आणि म्हणून त्यासाठी या पर्यावरणाचे स्वरूप आपण जाणून घेणे आज काळाची गरज आहे.या पर्यावरणाच्या स्वरूपामध्ये खालील गोष्टिंचा समावेश होतो.
सजीव निर्जीव घटकांचा समावेश
पर्यावरण माहिती – सजीव आणि निर्जीव घटकांचा समावेश या पर्यावरणामध्ये होतो. सजीवांमध्ये मनुष्य आहे, कीटक आहेत, पशुपक्षी, वनस्पती, छोटे रोपटी असतील, या सगळ्यांचा सजीव घटकांमध्ये समावेश होतो.
तर दगड, माती, पाणी, हे घटक निर्जीव घटक म्हणून आपल्यासमोर येतात आणि या दोन्हीही घटकांचा संबंध हा एकमेकांशी असतो, म्हणूनच पर्यावरणामध्ये सजीव आणि निर्जीव यांचा एकमेकांवरती परिणाम हा होत असतो.
मानव आणि पर्यावरण यांचा जवळचा संबंध आहे, हे आपल्याला माहितीच आहे. तेव्हा मानवी जीवनावर पर्यावरणातील विविध घटकांचा परिणाम जसे की हवामान, वनस्पती प्राणी किंवा भू रचना इत्यादींचा परिणाम हा पर्यावरणीय घटकांवर होत असतो.
स्वरूप प्रचंड व्यापक
पर्यावरणाचे स्वरूप हे अत्यंत मोठे आहे, व्यापक आहे, किंवा प्रचंड असं स्वरूप आहे.
नद्या, नाले, समुद्र प्रचंड अश्या पर्वतरांगा आपला दिसतात, डोंगररांगा आहेत, या सर्व घटकांचा घटकांचा विचार आपला पर्यावरणाच्या व्यापक स्वरूपामध्ये करावा लागतो.
मानवाच्या क्रिया प्रक्रियांचा पर्यावरणावर प्रभाव
पर्यावरण माहिती – पर्यावरणशास्त्रामध्ये, विद्यानाच्या शाखांमध्ये देखील पर्यावरण माहितीचा अभ्यास आपण करतो. मानवाच्या क्रिया प्रक्रियांचा पर्यावरणावर प्रभाव पडतो.
मनुष्य स्वतःच्या राहणीमानासाठी निसर्गातल्या काही घटकांवरती आक्रमण करत असल्याचा आपण पाहतो, डोंगर रांगांवरती घर बांधले जातात, नद्यांचे प्रवाह बदलले जातात, या क्रिया प्रक्रियांचा परिणाम निश्चितच पर्यावरणावर होतो आणि त्याचा अनुभव आपल्याला येताना दिसतो.
मिठी नदीला माणसांनी मिठीत घेतलं आणि म्हणून मिठी नदीने आजूबाजूच्या लोकांनाच मिठीत घेतल्यास आपला दिसत. नदीचा नैसर्गिक प्रवाह थांबवला गेला त्यामध्ये माती टाकून घर बांधले गेले, म्हणजे भराव करून नद्यांचे जे व्यापक स्वरूप होतं, मोठ स्वरूप होतं, ते छोटे केलं गेलं.
नैसर्गिकता नद्यांच्या पद्धतीने वाहतात त्या पद्धतीने वाहण्यामध्ये अशा प्रकारे घर बांधल्यावर अडथळा निर्माण झाला आणि या अडथळ्यांमुळे येणार निसर्गातून पाणी त्या पाण्याने आजूबाजूच्या लोकांच्या रहिवासाच्या ठिकाणांमध्ये हे पाणी गेलं.
म्हणजे जेव्हा मनुष्य निसर्गावर आक्रमण करतो, निसर्ग देखील त्याला प्रतिक्रिया म्हणून मानवी वस्तीवर आक्रमण करतो. म्हणूनच मानवाच्या ज्या क्रिया किंवा प्रक्रिया आहेत, यांचा पर्यावरणावरती प्रभाव नक्कीच पडतो.
मग ते प्रदूषणाच्या बाबतीत असेल, प्रदूषण जेवढे जास्त मनुष्याकडून वाढवले जाईल, तेवढा जास्त त्याचा पर्यावरणावर प्रभाव पडताना आपला दिसतो. कुठे उष्णता वाढते, तर कुठे पाऊस अधिक पडतो, अशी विपरीत परिस्थिती निर्माण होते. या सगळ्यांचे जे मूळ आहे, ते मानवाच्या क्रिया किंवा प्रक्रिया आहेत.
विविध घटकांचा अभ्यास
पर्यावरण माहिती – विविध घटकांचा अभ्यास या पर्यावरणामध्ये केला जातो. आता विविध घटक कोणते ? मानवी घटक, नैसर्गिक घटक, भौगोलिक घटक किंवा काही नैसर्गिक समस्या आहेत, मानवनिर्मिती समस्या आहेत, अशा विविध प्रकारच्या घटकांमुळे सुद्धा पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो.
यामुळे सर्व घटकांचा अभ्यास पर्यावरण माहितीमध्ये करणे अत्यंत आवश्यक आहे. मानवाची प्रगती होत असताना पर्यावरणाचे संवर्धन कसे करता येईल ? याचाही अभ्यास पर्यावरणामध्येच केला जातो.
पर्यावरणाचा अनेक शास्त्रांशी संबंध
पर्यावरण माहिती – पर्यावरण शास्त्र हे अत्यंत गुंतागुंतीचे शास्त्र आहे, असेही आपल्या लक्षात येतं. पर्यावरण शास्त्राचा अनेक शास्त्रांशी संबंध आहे. मग ते भूगोल असेल, इतिहास असेल, अर्थशास्त्र आहे.
विविध प्रकारची विज्ञान म्हणजे रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आहे या सर्वांवर पर्यावरणाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. प्रामुख्याने आपल्याला त्यावर होणारा परिणाम लगेच लक्षात येतो.
शेतीवरती, मानवी आरोग्यावरती देखील पर्यावरणाचा परिणाम होतो. जेव्हा स्वच्छ पर्यावरण असतं, तेव्हा मनुष्य कमी आजारी पडतात, मात्र प्रदूषण पर्यावरणामध्ये वाढल तर नक्कीच माणसं जास्त आजारी पडतात. शिवाजी महाराजांनी देखील पर्यावरणाचा अभ्यास करून पर्यावरण पूरक किल्ले बांधले. त्यावरची व्यवस्था जी पर्यावरण पूरक अशी होती.
अनुभवनिष्ठता
पर्यावरण माहिती – पर्यावरणामध्ये जेव्हा जेव्हा आपण कोणतीही गोष्ट करतो, तेव्हा ती अनुभवनिष्ठ असते. आपण जर पर्यावरणाला कमीत कमी हानी पोहोचवली, तर आपले आयुष्य हे उत्तमरीत्या चालते.
परंतु विविध घटकांमुळे पर्यावरण आता प्रदूषित होत चाललेले आहे, याचे मुख्य कारण असे आहे की माणसाची बदललेली जीवनपद्धती.
पर्यावरणाचे प्रकार
पर्यावरण माहिती – पर्यावरणाचे एकूण दोन प्रकार आपल्या दिसतात. अ) नैसर्गिक पर्यावरण, ब) मानवनिर्मित पर्यावरण या दोन्हीही घटकाचा पर्यावरणाबाबतीत विचार करत असताना, नैसर्गिक पर्यावरणात कोणते घटक येऊ शकतात आणि मानवनिर्मित पर्यावरणामध्ये कोणते घटक येऊ शकतात, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
नैसर्गिक पर्यावरण
पर्यावरण माहिती – नैसर्गिक पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक असू शकतात किंवा कोणकोणत्या गोष्टींचा समावेश हा नैसर्गिक पर्यावरणात होतो, याचा विचार आपण करणार आहोत. त्यामध्ये स्थान, आकार, त्याचप्रमाणे क्षेत्र, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे पर्यावरण माहिती असू शकते.
वेगवेगळे आकार, वेगवेगळी क्षेत्र. प्रत्येक ठिकाणचे नैसर्गिक पर्यावरण हे वेगवेगळे असू शकते. त्याचप्रमाणे हवामान, भूगर्भ रचना, वेगवेगळ्या भागात वेगवेगळे हवामान आपला दिसून येते.
भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये एकाच वेळी वेगवेगळे हवामान असू शकते. हिमालयातले हवामान कन्याकुमारीच्या हवामानापेक्षा वेगळे असेल असेल यामध्ये आपल्याला बदल दिसतात.
भूगर्भ रचनेमध्ये देखील प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी भूगर्भ रचना दिसते. अंटार्टिका वरची भूगर्भ रचना वेगळी असेल, भारतातील वेगळी असेल, ऑस्ट्रेलिया मधली वेगळी आहे किंवा इंग्लंड, अमेरिकेमध्ये देखील वेगळी असल्यामची आपला दिसते.
म्हणजेच काय तर, नैसर्गिक पर्यावरणाचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा यातली प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी वेगळे असल्याचे आढळून येते.
एकाच देशात अनेक प्रकारचे हवामान, अनेक प्रकारची भूगर्भ रचना किंवा मृदा वेगवेगळी असल्याचेही आपल्या जाणीवते. यात काही प्राकृतिक रचना असतात त्यादेखील विविध प्रकारच्या असतात. त्याचाही इथे आपला विचार करता येतो.
जलप्रणाली आहेत, प्राणी आहेत, वनस्पती आहेत, सूक्ष्मजीव आहेत, हे सगळे घटक प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आढळतात. नैसर्गिक पर्यावरणाचे वेगवेगळे घटक हे सर्व घटक एकमेकांशी निगडित आहेत आणि ते आपआपले कार्य ही व्यवस्थित पणे पार पडतात.
या निसर्गामध्ये जसे निसर्गातील जलचक्र नेहमी चालू असतं. पावसाचे पडणारे पाणी जमिनीवरून वाहून, नदीच्या मार्गे ते समुद्रामध्ये पोहोचते, त्यातील काही पाण्याचे बाष्पीभवन होतं आणि मग ते हवेत पाणी बाष्पात निर्माण होऊन, त्यातून ढगांची निर्मिती होते, नंतर पर्जन्याच्या स्वरूपाने पुन्हा जमिनीवर पडते व पुन्हा जमिनीवर वाहू लागते, अशा प्रकारचे हे एक जलचक्र आपल्या अनुभवता येते.
या जलचक्रामध्ये पर्जन्यवृष्टी, पाणी वाहन, पाण्याचे बाष्पीभवन, हवेत बाष्प फेकले जाणे आणि साध्वी भवन यांचा जलचक्रामध्ये समावेश होतो.
मानवनिर्मित पर्यावरण
पर्यावरण माहिती – मानवनिर्मित पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक असू शकतात, असा विचार केला असता, आपल्या लक्षात येतं की, कार्य पर्यावरण, त्याचप्रमाणे लोकसंख्या, वसाहती, विविध प्रकारच्या वस्त्या कुठेतरी एकत्र येतात, नद्यांचे प्रवाह जिथे वाहतात, त्या नद्यांच्या प्रवाहांच्या कडेने लोकवस्ती निर्माण झाल्याचे दिसत. आर्थिक परिस्थिती जी असते, ती देखील मानवनिर्मित पर्यावरणाचा एक भाग आहे.
मानवनिर्मित पर्यावरणामध्ये सामाजिक घटक असतात. माणसं एकमेकांच्या जोडीने एकमेकांच्या सानिध्यात राहत असतात. राजकीय गोष्टी देखील या मानवनिर्मित समाजाचा एक भाग आहे. विविध धर्म आहेत, मानवनिर्मित समाजात मध्ये किंवा मानवनिर्मित पर्यावरणामध्ये धार्मिक गोष्टींचा देखील समावेश होतो.
विचार आणि कौशल्य यांचा अंतर्गत समावेश मानवनिर्मित पर्यावरणामध्ये होतो. माणसाच्या कल्पना आहेत, कार्यक्षमता आहे, त्याचप्रमाणे तो काही गोष्टींच्या बाबतीत पुढाकार घेतो, आणि त्यावर विकासाला वेग आणि दिशा मिळते. माणसाने शेती केली, उद्योग, व्यापार क्षेत्रात अनेक बदल केलेले आहेत आणि ते आपल्या अनुभवाला येतात.
या आर्थिक क्रियांवर दुष्काळ, आवर्षण, पूर, भूकंप, धोके, बर्फ, ढगफुटी, इत्यादी नैसर्गिक शक्तींचा परिणाम होताना नेहमीच जाणवतो. त्याचबरोबर लोकसंख्येची गुणवत्ता, आर्थिक, सामाजिक, राजकीय, परिस्थिती त्याचप्रमाणे केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, इत्यादी घटकांचा सुद्धामानवनिर्मित पर्यावरणावर परिणाम होताना आपल्याला दिसतो.
मानवनिर्मित पर्यावरणामध्ये रस्ते, इमारती, रेल्वे, कृषी, कारखाने, इंधन, कामगार, इत्यादी स्थिर घटक नसून, त्यात राजकीय, विचारसरणी, आर्थिक धोरण, प्रोत्साहन, पुढाकार, इत्यादी दृश्य व अदृश्य घटकांचा समावेश देखील होतो.
पर्यावरणाचे महत्त्व
पर्यावरण माहिती – उगवणारा प्रत्येक दिवस मानवा पुढे नवनव्या समस्या निर्माण करीत असतो. पण या विसाव्या शतकाच्या अखेरीस पृथ्वी पुढे जी भयावह समस्या निर्माण झाली आहे, त्यामुळे हा पृथ्वी पुत्र हादरून गेला आहे. मानवा पुढील ही समस्या मानवानेच निर्माण केली आहे.
त्यानेच आपल्या पृथ्वी मातेला संकटात ढकलले आहे. खरे पाहता, मानव हे निसर्गाचे अपत्य आहे. निसर्गाच्या कुशीत मानव मोठा झाला. आपला विकास साधण्यासाठी त्यांनी याच निसर्गाचा आधार घेऊन, आदर्श निर्माण केला. निसर्गात त्याने आपले घरकुल निर्माण केले.
उंच उंच आभाळात जाऊन, भिडणारी वृक्षराज पाहून माणसाचे आकाशाकडे लक्ष गेले. आभाळा स्वच्छंद भरारी मारणाऱ्या विहगाकडे पाहून मानवाला ही आकाशात विहार करावासा वाटू लागला. निसर्गाबरोबर सुखात रमलेल्या माणसाच्या स्वार्थी वृत्तीला पंख फुटले.
स्वतःच्या बुद्धिमत्तेचा गर्व झालेला हा माणूस दूरदृष्टी न ठेवता, निसर्गाचा नाश करू लागला आणि त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला. माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने औद्योगिक क्षेत्रात खूप प्रगती साधली आहे. स्वतःच्या यशाने उदमत झालेल्या माणसाने कारखान्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा विचारच केला नाही.
त्यामुळे भू-तलावरचे वातावरण दूषित झाले. कारखान्यातील दूषित पाणी, नदी, नाले, सागर, यात सोडून दिल्यामुळे सर्वच पाणी खराब होऊ लागले. लोकसंख्या अतोनात वाढल्यामुळे माणूस स्वच्छ हवेला वंचित झाला. माणसाने निर्माण केलेल्या आणि उपभोगला विविध वस्तूंचा कचरा इतका वाढला की, सुंदर वसुंधरा ओंगळ झाली.
स्वतःसाठी उंच इमारती उभारण्यासाठी माणसाने प्रचंड वृक्षतोड केली. निसर्गाने दिलेल्या पाण्याचा प्रचंड अपव्य केला. मानवाला उपलब्ध असेलेली निसर्ग संपत्ती आता हळूहळू संपू लागली आहे.
पृथ्वीवर उष्णता वाढली, पावसाचे प्रमाण घटू लागले, ओझोन वायूचे वातावरणातील प्रमाण कमी झाले, हवा पाणी आणि जमीन यावरील प्रदूषण वाढले, तेव्हा माणूस खडबडून जागा झाला व त्यांनी वसुंधरा वाचवा ही आरोळी फोडली. पर्यावरणातील संकट विशिष्ट देशापुरतेच मर्यादित नाही, कारण पर्यावरण हे सर्वांचे आहे.
सर्वांना सारखीच दुःखे सोसावी लागत आहेत, हे जाणवले तेव्हा १९७२ साली संयुक्त राष्ट्राने मानवी करण्यात पर्यावरण विषयक परिषद स्टॉक होम येथे भरवली व १९७२ मध्ये ब्राझील मधील रिओ दि जेनेरो येथे सारे जण राष्ट्रीय वसुधा वाचवण्याचा विचार करण्यासाठी एकत्रित जमली.
पर्यावरण प्रदूषण व प्रदूषण रोखण्याचे उपाय
पर्यावरण माहिती – सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ, पर्यावरणात मिसळण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते ती म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा, जल व मुद्रा अशा घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळल्याने, पर्यावरण दूषित बनते.
प्रदूषणाची तीव्रता वाढल्यास, अशी पर्यावरण स्थिती सजीवांना अपायकारक बनते. प्रदूषण बहुतेक करून मानवी कृतीमुळे घडून येते. ऐतिहासिक काळापासून हवेतील प्रदूषण आणि मानवी संस्कृती यांचा परस्पराशी संबंध आहे. इतिहास पूर्व काळात मानवाला अग्नीचा शोध लागल्यानंतर, त्याने अग्नीचा वापर सुरू केला आणि तेव्हापासून प्रदूषणाला सुरुवात झाली असे म्हणता येईल.
प्राचीन गुहांच्या छतावर आढळलेले काजळीचे थर, याची साक्षता देते. त्यानंतर मानवाने धातू वितळवण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे बाहेरील हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली. तेव्हापासून प्रदूषणात निरंतर वाढ होत राहिली आहे.
जगातील मोठमोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या वाढल्याने, लाकूड व दगडी कोळसा यांचा इंधन म्हणून वापर वाढला. तसेच वाहतुकीसाठी घोड्यांचा होत असलेला वापर यामुळे शहरे प्रदूषणमय व ओंगळ झाली.
औद्योगिक वाढीमुळे अपायकारक रसायने व अपघटके स्थानिक जलप्रवाह सोडली जाऊ लागली आणि अणु विज्ञानाच्या विकासानंतर, अणु तंत्रज्ञानावर आधारित संयंत्र विकसित झाली आणि त्याबरोबर किरणोत्सारी प्रदूषके वातावरणात मिसळण्यास सुरुवात झाली.
दुसऱ्या महायुद्धानंतर अणुचाचण्या, अणु वस्त्रांच्या परिमाणांचे अहवाल, ज्ञान झाल्यानंतर प्रदूषणाची तीव्रता, लोकांना लक्षात येऊ लागली. मागील काही दशकात आंतरराष्ट्रीय आपत्ती ठरणाऱ्या तेलगळतीच्या व वायू गळतीच्या घटना घडल्यामुळे, लोक भयावह झाले.
प्रदूषण हे मुख्यतः रासायनिक पदार्थांच्या रूपात असते. वातावरणात रसायने आणि धुलीकरण मिसळल्यामुळे, हवा प्रदूषण होते. या रसायनांमध्ये उद्योगांनी मोटार, यांद्वारे निर्माण झालेले कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डाय ऑक्साईड, क्लोरोफ्लोरो कार्बन संयोग, नायट्रोजन ऑक्साईड, इत्यादी घटकांचा समावेश होतो.
मातीमध्ये सोडलेली रसायने किंवा सांडपाणी वाहून येणाऱ्या वाहिन्यातून झालेली गळती, यामुळे मुद्रा प्रदूषण होते. तसेच हायड्रोकार्बन, जड धातू, कीटकनाशके, तणनाशके युक्त हायड्रो कार्बन, इत्यादीमुळे मुद्रा प्रदूषित होते. औद्योगिक क्षेत्रातून सोडलेली रसायने किंवा सांडपाणी वाहून येणाऱ्या वाहिन्यातून झालेली गळती यामुळे जलप्रदूषण होते.
तसेच पर्यावरणात प्लास्टिक साचून राहिल्यास, याचा वाईट परिणाम त्यातील सजीव त्यांचा अधिवास आणि मानवी जीवनावर होतो. मोकळ्या जागेवर फेकलेले अन्न, मलमूत्र, रसायने, तुटलेल्या वस्तूंचे ठिकाण, इलेक्ट्रॉनिक कचरा, इत्यादी जैविक आणि अजैविक उपविष्ठांमुळे प्रदूषणाच्या जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत.
अणुऊर्जामुळे निर्मित व अण्वस्त्रनिर्मित याकरिता केले जाणारे संशोधन यामुळे पर्यावरणात किरणोत्सारी प्रमाण वाढले आहे. प्रदूषण हे केवळ रासायनिक पदार्थाच्या स्वरूपात नसून, ध्वनी, उष्णता किंवा प्रकाश अशा ऊर्जेच्या रूपात देखील असते.
या ऊर्जांच्या बाबतीत त्यांच्या सामन्यात पातळीपेक्षा अतिरिक्त वाढ झाली, तर प्रदूषण होते. रस्त्यावरील वाहने, आकाशात भरारी घेणारी विमान, औद्योगिक क्षेत्र, बांधकाम, इत्यादीमुळे ध्वनी प्रदूषण होते.
ध्वनी प्रदूषणाला मुख्यतः मोटारी कारणीभूत असून, ९० टक्के अनावश्यक आवाज निर्माण होत असतो. औष्णिक विद्युत केंद्रांसाठी, जलस्त्रोत्रांचे पाणी वापरल्यामुळे पाण्याचा तापमानात बदल होऊन, औष्णिक प्रदूषण होते.
पर्यावरणातील प्रदूषण रोखण्याचे उपाय
पर्यावरण माहिती – प्रदूषण कमी करण्यासाठी उपविष्ठांचे केलेले योग्य व्यवस्थापन म्हणजे, प्रदूषण नियंत्रण. मानवी आरोग्य आणि पर्यावरणीय गुणवत्ता, प्रदूषण यंत्रणावर अवलंबून असते. प्रदूषण नियंत्रण सामान्यपणे पुढील प्रकारांनी करता येते.
प्रदूषण करणारे उद्योग कमी करणे, औद्योगिक क्षेत्रातून प्रदूषके कमीत कमी बाहेर पडतील अशा आधुनिक पद्धती वापरणे, प्रदूषकांची हानी कमी करण्यासाठी ती मोठ्या क्षेत्रात पसरवणे, उपविष्ठे पर्यावरणात सोडण्यापूर्वी, त्यावर प्रक्रिया करून ती सौम्य करणे, खाजगी वापरलेल्या वस्तूंचे पुनचक्रीकरण, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर, उपविष्ठांची किमान निर्मिती, प्रदूषण रोखणे, अशा कृती द्वारा प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
पर्यावरण विषयक महत्त्वाच्या घटना घडामोडी व कायदे
खाली आपण पर्यावरण माहितीविषयी महत्त्वाच्या काही घटना, घडामोडी व कायदे या विषयी माहिती घेणार आहोत.
- भारतीय वनस्पती शास्त्रीय सर्वेक्षण १८९०
- पहिले वन धोरण १९१६
- भारतीय प्राणी शास्त्रीय सर्वेक्षण १९१६
- प्राण्यांच्या छळाविरुद्ध संरक्षण कायदा १९६०
- वन्यजीव संरक्षण कायदा १९७२
- केंद्रीय प्रदूषण नियंत्रण बोर्ड १९७४
- जल प्रदूषण संरक्षण व नियंत्रण कायदा १९७४
- वनसंवर्धन कायदा १९८०
- भारतीय वन सर्वेक्षण १९८१
- दलदली प्रदेश संवर्धन कार्यक्रम १९८७
- खारफुटी वने संवर्धन कार्यक्रम १९८७
- राष्ट्रीय नदी धोरण १९८८
- जैवविविधता कायदा २००२
- दलदली प्रदेश व खारफुटी वने संवर्धन कार्यक्रम दहावी योजना
- राष्ट्रीय वनीकरण व इको विकास बोर्ड १९९२
- वायु प्रदूषण संरक्षण व नियंत्रण कायदा १९८१
- पर्यावरण संरक्षण कायदा १९८६
- राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखडा २००२ ते २०१६ (२००२)
- राष्ट्रीय पर्यावरण धोरण २००६
- अनुसूचित जमाती आणि इतर वन निवासी कायदा २००६
FAQ
१. पर्यावरण म्हणजे काय आणि त्याचे प्रकार?
पर्यावरणाचे एकूण दोन प्रकार आपल्या दिसतात. अ) नैसर्गिक पर्यावरण, ब) मानवनिर्मित पर्यावरण या दोन्हीही घटकाचा पर्यावरणाबाबतीत विचार करत असताना, नैसर्गिक पर्यावरणात कोणते घटक येऊ शकतात आणि मानवनिर्मित पर्यावरणामध्ये कोणते घटक येऊ शकतात, याबद्दल थोडक्यात जाणून घेऊ.
२. पर्यावरण म्हणजे काय in marathi?
पर्यावरण म्हणजे मानवाच्या सभोवताली असणारी जी परिस्थिती आहे, त्या परिस्थितीचा आपण विचार करतो. तेव्हा आपल्याला पर्यावरण दिसून येत. परी अधिक आवरण म्हणजेच पर्यावरण. पर्यावरणाचे जैविक व अजैविक घटक असून, जैविक मध्ये परस्पर सहयोगी, सजीव, प्राणी, वनस्पतींचा समावेश होतो. पाणी, ऊर्जा, तापमान, उष्ण प्रवाह, इत्यादींचा समावेश अजैविक घटकांमध्ये होतो. पर्यावरण हे स्थिर नसून, ते बदलणारे आहे. हे देखील आपला माहीत असणे आवश्यक ठरतं. सजीव त्यांच्या अनुकूल क्षमतेनुसार, या पर्यावरणामध्ये राहत असतो.
३. प्रदूषण म्हणजे काय?
सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ, पर्यावरणात मिसळण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते ती म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा, जल व मुद्रा अशा घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळल्याने, पर्यावरण दूषित बनते. प्रदूषणाची तीव्रता वाढल्यास, अशी पर्यावरण स्थिती सजीवांना अपायकारक बनते. प्रदूषण बहुतेक करून मानवी कृतीमुळे घडून येते.
४. वायू प्रदूषणाची कारणे काय आहे?
वातावरणात रसायने आणि धुलीकरण मिसळल्यामुळे, हवा प्रदूषण होते. या रसायनांमध्ये उद्योगांनी मोटार, यांद्वारे निर्माण झालेले कार्बन डाय-ऑक्साइड, सल्फर डाय ऑक्साईड, क्लोरोफ्लोरो कार्बन संयोग, नायट्रोजन ऑक्साईड, इत्यादी घटकांचा समावेश होतो.
५. प्रदूषणाचा पर्यावरणावर कसा परिणाम होतो?
माणसाने आपल्या बुद्धिमत्तेने औद्योगिक क्षेत्रात खूप प्रगती साधली आहे. स्वतःच्या यशाने उदमत झालेल्या माणसाने कारखान्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा विचारच केला नाही. त्यामुळे भू-तलावरचे वातावरण दूषित झाले. कारखान्यातील दूषित पाणी, नदी, नाले, सागर, यात सोडून दिल्यामुळे सर्वच पाणी खराब होऊ लागले. लोकसंख्या अतोनात वाढल्यामुळे माणूस स्वच्छ हवेला वंचित झाला. माणसाने निर्माण केलेल्या आणि उपभोगला विविध वस्तूंचा कचरा इतका वाढला की, सुंदर वसुंधरा ओंगळ झाली.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पर्यावरणाबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.