भारत ही एक अनेक यशस्वी नेते आणि व्यक्तिमत्त्वांची भूमी आहे. या नेत्यांनी आणि व्यक्तिमत्त्वांनी आपल्या कर्तबगारिने आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे. आणि अशाच थोर व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणजे किरण बेदी.
आपले कष्ट आणि हुशारीच्या जोरावर, या भारताच्या पहिल्या उच्चपदी महिला पोलीस ऑफिसर बनल्या. किरण या एक सामर्थ्यशाली पोलीस ऑफिसर, एक समाजसेविका, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून नाव रूपास आल्या.
त्यांनी भारतामधील जनतेसमोर आणि प्रामुख्याने महिलांसमोर एक आदर्श स्थापित करून दिला. भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि हे शक्य होऊ शकले, भारतीयांच्या बुद्धी आणि कामामुळे, पण खूप वेळा आपण अशा थोर लोकांची कामगिरी विसरून जातो.
सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माता, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, ऐश्वर्या राय, सानिया मिर्झा, सायना नेहवाल, मेरी कोम, अशा अनेक महिलांनी आपल्या कामगिरीतून भारताचे नाव जगभर पोचवले आहे.
मग ते राजकारण विज्ञान, मनोरंजन, खेळ, बिझनेस, तंत्रज्ञानाच्या, प्रत्येक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत आहेत.
जेव्हा पण महिलांच्या थोर कामगिरीबद्दल बोलतो, तेव्हा भारताच्या पहिल्या महिला IPS किरण हे नाव आपोआप आपल्या ओठांवर येते. किरण या भारतीय पोलीस दलातील पहिल्या उच्चपदी महिला होत्या. आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी भारतीयांच्या मनात आपले घर केले आहे
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस भारताच्या पहिल्या महिला IPS किरण बेदी यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
किरण बेदी माहिती मराठी Kiran Bedi Information In Marathi
नाव | किरण पेशावरिया बेदी |
जन्म तारीख | दि. ०९ जून १९४९ |
जन्म ठिकाण | अमृतसर, पंजाब |
आईचे नाव | प्रेमलता |
वडिलांचे नाव | प्रकाश पेशवारिया |
बहिणींचे नाव | अनु, रिटा आणि शशी |
पतीचे नाव | ब्रजवेदी |
मुलीचे नाव | सायना वेदी |
शाळा | सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल अमृतसर |
कॉलेज | गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमन, अमृतसर पंजाब युनिव्हर्सिटी दिल्ली युनिव्हर्सिटी आयआयटी दिल्ली |
पोस्ट | माजी आयपीएस अधिकारी राज्यपाल (पाँडेचेरी) सामाजिक कार्यकर्ते |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष (भाजप) |
नागरिकत्व | भारतीय |
धर्म | हिंदू |
कोण आहेत किरण बेदी ?
अभयच्या उदाहरणाच्या रूपात जर आपण मागील काही वर्तमानात आणि दशकात पाहिलं तर, अशी काही लोक आहेत, जी आपल्या जीवनात नेहमी निर्भय राहिली आहेत.
हे सुद्धा –
- गोपाळ गणेश आगरकर माहिती मराठी
- दादाभाई नौरोजी यांची माहिती मराठी
- सुखदेव माहिती मराठी
- मंगल पांडे माहिती मराठी
ते कधीच कुणाला घाबरले नाही आणि नेहमीच निर्भय राहून, आपल्या कर्तव्याचे पालन करत राहिले. त्या नावांपैकी एक नाव, ज्यांच्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्या आहेत पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी.
देशाची जबाबदारी खऱ्या अर्थाने, ऑफिसरच्या खांद्यावर असते. जर लोकशाही बरोबर असेल तर न्यायव्यवस्था उत्तम राहते, जसं की भ्रष्टाचाराची कीड लोकशाहीच्या जाळ्याला पोखरत आहे.
लोकांचा त्यावरील विश्वास उडत चालला आहे, पण असेही काही आयएस आणि आयपीएस ऑफिसर आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाच्यासाठी स्वाधीन केले.
तुम्हाला ऐकवतोय देशाची पहिली महिला आयपीएस ऑफिसर किरण यांची गोष्ट, ज्यांना सगळे लेडीज सिंघम या नावाने ओळखतात. ज्यांचे नाव ऐकून अजूनही गुन्हेगार थरथर कापतात.
किरण बेदी यांच्याबद्दल ठळक मुद्दे
- भारतीय पोलीस सेवा निवृत्त अधिकारी
- सामाजिक कार्यकर्ता
- भूतपूर्व टेनिस खेळाडू
- भारतीय जनता पक्षातील राजकीय नेता.
- १९७२ मध्ये भारतीय पोलीस सेवेमध्ये सक्रिय सहभाग दर्शवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी.
- ३५ वर्ष पोलीस सेवा मध्ये सेवा दिल्या नंतर इसवी सन २००७ मध्ये स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेतली.
किरण बेदी जन्म व शिक्षण, प्रारंभिक जीवन
किरण यांचा जन्म दि. ०९ जून १९४९ रोजी पंजाबच्या, अमृतसर मध्ये झाला. यांच्या वडिलांचे नाव प्रकाश पेशवारिया आणि आईचे नाव प्रेमलता आहे.
किरण यांचे खापर पंजोबा लाला हर गोविंद हे एक व्यापारी होते आणि १९६० मध्ये त्यांनी पेशावर मधून निघून, पंजाब मधील अमृतसर मध्ये स्थायिक झाले आणि पेशवारीया हे नाव स्वीकारले.
किरण बेदी कौटुंबिक माहिती
बेदींचे आई वडील प्रकाश लाल आणि प्रेम लता यांना शशि, किरण, रिटा आणि अनु अशा चार मुली होत्या. चारीही मुली अतिशय हुशार होत्या.
त्यांचे आई वडील दोघेही पुरोगामी विचारांचे होते. ज्यामुळे मुलींना हुंड्यामुळे ओझे असे समजले जायचे, त्यावेळी त्यांनी चारी मुलींना उच्च शिक्षण दिले आणि त्यांना हवे ते करून देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. यासाठी त्यांना खूप अडथळ्यांचा सामना सुद्धा करावा लागला होता.
बेदींच्या आजोबांनी त्यांच्यावरचा हक्क काढून घेऊन, त्यांना नाकारले. सर्व अडथळे पार करून, किरण यांच्या आई वडिलांनी चारी मुलींना उच्च शिक्षण तसेच खेळा मध्येही तरबेज केले.
बेदींचे वडील अतिशय चांगले टेनिस खेळाडू होते, त्यांनी आपल्या चारही मुलींना टेनिस खेळण्यास शिकवले आणि त्यात अतिशय कुशल बनवले. टेनिस खेळताना बेदींनी कित्येक बक्षीस मिळवली आहे. त्या टेनिसच्या विजेता पण राहिल्या आहेत.
किरण बेदी यांचे शिक्षण
यांचं प्राथमिक शिक्षण सेक्रेट हार्ड कॉमेंट स्कूल, अमृतसर येथे झालं. सोबत पॉलिटिकल सायन्स मध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे. १९६८ मध्ये किरण यांनी अमृतसर मधील गव्हर्मेंट कॉलेज ऑफ वुमन मधून बी.ए.ची पदवी संपादन केली.
नंतर पंजाब युनिव्हर्सिटी मधून राज्यशास्त्र विषयांमध्ये मास्टर डिग्री प्राप्त केली, आणि सर्वप्रथम आल्या. १९८८ मध्ये किरण यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी मधून, कायदा विषयांमध्ये बॅचलर डिग्री मिळवली. तसेच १९९३ मध्ये आय आय टी दिल्ली मधून, सोशल सायन्स मध्ये पीएचडी मिळवली.
किरण बेदी यांच्यावर असणारा प्रभाव
बेदींचे आजोबा लाला मुनी लाल आहे. ते त्यांच्या संपूर्ण परिवारातील एक प्रभावशाली व्यक्तिमत्व होते, आणि बेदींवर त्यांचा प्रचंड प्रभाव होता.
किरण बेदी लूक
केसांचा रंग | काळा |
डोळ्यांचा रंग | तपकिरी |
लांबी | ०५ फूट ३ इंच |
किरण बेदी यांचे वैयक्तिक जीवन
बेदींची आपल्या भावी पती सोबत टेनिस मैदानावर पहिल्यांदा ओळख झाली, आणि तेव्हापासून त्यांच्या गाठी जुळल्या. बेदींचे पती ब्रिज बेदी हे एक देखील युनिव्हर्सिटी टेनिस खेळाडू आणि व्यवसायाने कापड उद्योगपती होते.
मार्च १९७२ मध्ये किरण यांचे ब्रिज बेदी यांच्या सोबत लग्न झाले आणि १९७५ साली त्यांना कन्या रत्न प्राप्त झाले. तिचे नाव सायना असे ठेवण्यात आले. त्यनंतर १९९९ मध्ये किरण यांच्या आईंचे निधन झाले आणि जानेवारी २०१६ मध्ये त्यांचे पती ब्रिज बेदी यांचे निधन झाले.
आयपीएस ऑफिसर म्हणून वाटचाल
वयाच्या ३० वर्षा पर्यंत किरणने आपला टेनिसचा प्रवास चालूच ठेवला. पण त्यासोबत त्यांची भारतीय पोलीस स्पर्धा परीक्षेची तयारी ही जोमाने सुरू होती.
भारतीय पोलीस सेवेत आपली वाटचाल सुरू करण्याआधी १९७० मध्ये ते अमृतसर मधील खालचा महिला महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका होत्या.
जुलै १९७२ मध्ये भारतीय पोलिसांमध्ये भरती होण्यासोबतच, त्यांना भारतीय पहिली महिला आयपीएस ऑफिसर होण्याचा मान देखील मिळाला. पोलीस ऑफिसरच्या नात्याने किरण त्यांच्या कामामुळे, नेहमी चर्चेत राहिल्या.
त्यांनी अमली पदार्थांचे नियंत्रण, दळणवळण नियंत्रण, आणि व्हीआयपी सुरक्षा, यासारखी प्रमुख कामे हाताळली. १९७७ मध्ये त्यांनी इंडिया गेट दिल्लीवर अकाली आणि निरंकार यामध्ये उद्भवलेल्या शिख दंगलीला ज्या पद्धतीने नियंत्रित केलं, ते पोलीस इतिहासात एक उदाहरण आहे.
किरण बेदी कश्या झाल्या क्रेन बेदी ?
१९८३ मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी काही कामानिमित्ताने विदेशी गेल्या होत्या, त्याची मोटर दुरुस्तीसाठी गॅरेज मध्ये आणली होती आणि रस्त्यावर चुकीच्या बाजूला लावली होती.
त्या दिवसांमध्ये किरणजी चुकीच्या जागी उभ्या असलेल्या गाड्यांना क्रेनच्या मदतीने उचलत असत, दंड भरल्यानंतरच त्या गाड्या परत केल्या जात असत. त्यांनी त्या वेळी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांची गाडी सुद्धा उचली. त्यानंतरच त्यांना क्रेन बेदी हे नाव पडलं.
किरण बेदी तिहार जेल कारकीर्द
किरणचा १९९३ चा कार्यकाळ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. त्या आय.जी जेल या नात्याने सर्व जेलच्या अधिकारी बनल्या.
त्यांनी यादरम्यान देशाची सर्वात मोठी जेल तिहार जेलला आदर्श बनवण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान त्यांनी गुन्हेगारांचे मानवीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्या म्हणाल्या त्या जेल ला आश्रम बनवतील.
बेदींनी तेथे योगा, ध्यान, खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम सोबतच, शिक्षणाची सुद्धा व्यवस्था केली. या जेल मधल्या दहा हजार कैद्यांपैकी, बरेचसे कैदी असे होते की, त्यांच्यावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नव्हता आणि ते वर्षांपासून तुरुंगात होते. त्यांच्या शारीरिक स्वास्थ्या सोबतच, मानसिक विकासावर ही किरणने लक्ष दिले.
कैद्यांनी जेल मधूनच परीक्षा दिल्या आणि आपली योग्यता वाढवली. कविता आणि मुशायराद्वारे कैद यांना देण्यात आले. किरण यांच्या या कामाबद्दल त्यांचेखूप कौतुक झाले. त्यांना त्यांच्या कामाबद्दल, १९९४ मध्ये रमण मॅक्स पुरस्कार मिळाला.
किरण अशा पहिल्या महिला होत्या, ज्यांना २००३ मध्ये युनायटेड स्टेट नागरिक पोलीस सल्लागार बनवले. किरण यांच्या जीवनावर एक सिनेमा यस मॅडम सर बनला आहे,ज्या ऑस्ट्रीलीयान निर्माताने बनवला.
आता बेदींनी पोलीस विभागाच्या इंडियन ब्युरो ऑफ रिसर्च आणि डेव्हलपमेंट मध्ये डायरेक्टर जनरल हे पद सांभाळले. त्या संयुक्त राष्ट्र संघाच्या पीसकिपी विभागाच्या, पोलिस सल्लागार सुद्धा आहेत. किरण चे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
भारतीय पोलीस सेवेमध्ये ३५ वर्ष पोलीस महासंचालक म्हणून काम केल्यानंतर, किरण यांनी २००७ साली स्वैच्छिक निवृत्ती घेतली.
दि. २२ मे २०१६ रोजी किरण यांची पोंडीचेरीचा राज्यपाल पदी निवड करण्यात आली. बेदी यांनी आपल्या कामगिरीतून पूर्ण जगाला दाखवून दिले की, परिश्रम आणि जोडणीच्या जोरावरती काहीही साध्य केले जाऊ शकते.
एक सामाजिक कार्यकर्त्या
पोलीस सेवा व्यतिरिक्त बेदींनी समाजकार्यामध्येही आपले नाव मिळवले. २००८ ते २०११ मध्ये त्यांच्या टीव्हीवरील आपकी कचेरी हा कार्यक्रम जनतेमध्ये अतिशय लोकप्रिय ठरला.
त्यांनी महिलांविरुद्ध होणाऱ्या हुंडाबळी, बलात्कार, घरगुती हिंसा, ऍसिड हल्ला या सारख्या समस्यांवर आळा घालण्यासाठी स्वतंत्र टेलिफोन हेल्पलाइन सुरू केल्या.
स्थानिक पोलीस जर समस्यांचे निवारण करत नसतील, तर अशा जनतेच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी संकेतस्थळ ही सुरू केले.
एक सामाजिक कार्यकर्त्या सोबत त्या एक कुशल वक्त्याही होत्या. अनेक शाळा, महाविद्यालयांमध्ये, त्यांना मार्गदर्शनासाठी बोलावले जाते. अशाच एका जगप्रसिद्ध कार्यक्रम मध्ये त्यांना त्यांचे विचार मांडण्यासाठी वॉशिंग्टनला देखील बोलवण्यात आले होते.
२००७ मध्ये बेदींनी नव ज्योती दिल्ली फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेला समाजाच्या काना कोपऱ्यातून समर्थन मिळाले. या संस्थे मार्फत त्यांनी जवळपास २५ हजार जणांची नशा मुक्ती करून, त्यांना चांगले उपचार दिले.
त्यांनी भारतामधील अनेक दुर्मिळ ठिकाणी, लोकांसाठी सोयी उपलब्ध केल्या. त्यांनी महिलांच्या समान हक्कासाठी कायम आपली झुंज चालू ठेवली.
किरण बेदी यांची राजकीय कारकीर्द
आपल्या समाज सेवेचा प्रवास असाच चालू ठेवण्यासाठी, किरण यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी २०१० मध्ये आम आदमी पार्टी मध्ये प्रवेश केला.
यानंतर २०१५ मध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री पद मिळाल्यानंतर, त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री निवडणूक पदासाठी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
किरण बेदी पुरस्कार व सन्मान
नशा मुक्तीच्या क्षेत्रात मोठी कामगिरी केल्याबद्दल, यांना नॉर्वे मधील गुड टेम्पलर्स आंतरराष्ट्रीय संस्थेने आशिया पुरस्कार दिला. किरण यांनी निर्भय व निडर दृष्टिकोनाने पोलीस कामकाजामध्ये व तुरुंगातील सुधारणांमध्ये विविध आधुनिक गोष्टींचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
कर्तव्या प्रती नेहमी दक्ष असणाऱ्या, निस्वार्थी व्यक्तिमत्व असणाऱ्या, किरण यांना शौर्य पुरस्कार प्राप्त करण्याबरोबरच, त्यांच्या अनेक कार्यान जगभरामध्ये मान्यता प्राप्त झाली. ज्यामुळे त्यांना रॅमन मॅगसेससे पुरस्कार देऊन, त्यांचा गौरव करण्यात आला.
ज्या पुरस्काराला आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून संबोधले जाते. तसेच किरण यांना मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीमध्ये जर्मन फाउंडेशनचा जोसेफ ब्युईस पुरस्कार देऊन, सन्मानित करण्यात आले.
किरण बेदी प्रसिद्ध पुस्तके
आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक पुस्तके लिहून लोकांचे मार्गदर्शनही केले.
- इट्स ऑल्वेज पाॅसिबल
- Broom & Groom (इंग्रजी, सहलेखक : पवन चौधरी)
- India Protests (इंग्रजी, सहलेखक : पवन चौधरी)
- आवो आपणे सभ्यता केळवीए (गुजराथी, सहलेखक : पवन चौधरी)
- आय डेअर
- Be The Change (भ्रष्टाचाराशी लढा). मराठी अनुवादक – सुप्रिया वकील
- निडर बनो : नई पीढ़ी के लिए (हिंदी)
- ॲज आय सी… स्त्रियांचे सक्षमीकरण
- Swachh Bharat : Checklist (इंग्रजी/हिंदी, सहलेखक : पवन चौधरी)
- कायदे के फायदे (हिंदी, सहलेखक : पवन चौधरी)
- इंडियन पोलीस
- नीडर बनो : नवी पीढी माटे(गुजराथी)
- व्हॉट वेंट रॉंग अँड व्हाय (मराठी)
- ॲज आय सी… नेतृत्व आणि प्रशासन
- लीडरशिप अँड गव्हर्नर
- Uprising 2011 (इंग्रजी, सहलेखक : पवन चौधरी)
- ॲज आय सी… भारतीय पोलीस सेवा
- कायदे नेक फायदे अनेक (सहलेखक : पवन चौधरी)
- Kiran Bedi – Issues & Views (इंग्रजी, आत्कथन)
- मजल दरमजल (आत्मकथन)
हि त्यांनी लिहिलेली काही पुस्तके आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी भारतीय जनता, प्रामुख्याने तरुण पिढीला प्रोत्साहित करण्याचे काम केले आहे.
किरण बेदी प्रमुख पदे
- गुप्तचर विभागाचे विशेष पोलीस आयुक्त
- U.N. नागरी पोलीस सल्लागार
- महासंचालक, गृहरक्षक आणि नागरी संरक्षण
- महासंचालक, पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो
- तुरुंग महानिरीक्षक, तिहार
- दिल्लीतील लेफ्टनंट गव्हर्नर यांचे विशेष सचिव
- दिल्ली वाहतूक पोलीस प्रमुख
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो
- पोलीस महानिरीक्षक, चंदीगड
- पोलीस प्रशिक्षण सहआयुक्त
- पोलिस उपमहानिरीक्षक, मिझोराम
किरण बेदी यांच्या विषयी वाद
- १९९४ मध्ये किरण यांना तिहार तुरुंगाच्या तुरुंग महानिरीक्षकांना एक अंडर ट्रायल कैदीला वैद्यकीय मदत देण्याच्या, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेकडे दुर्लक्ष केल्याबद्दल, सर्वोच्च न्यायालयाने बेदींच्या विरोधात अपमानाच्या कारवाईच्या प्रारंभापासून त्यांना काढून टाकण्यात आले होते.
- १९८८ मध्ये वाधवा आयोगाने बेदींच्या कार्यालया बाहेर सहकार्याला अटक केल्याच्या निषेधार्थ वकिलावर केलेल्या लाठीचार्ज भूमिकेबद्दल किरण यांच्यावर टीका केली होती.
- लोकपाल विधेयकावर सरकार सोबतच्या चर्चेत किरण ह्या कट्टर असल्याची, टीका त्यांच्यावर करण्यात आली होती.
- सवलतीचे भाडे प्राप्त होऊनही, बेदी यांच्यावर त्यांच्या हवाई तिकिटासाठी होस्ट करून पूर्ण भाडे आकारल्याचा आरोप केला गेला होता. इकॉनोमिक क्लास उडवताना किरण किरण यांनी होस्ट बिझनेस क्लासचे भाडे आकारल्याचा आणि खोट्या पावत्या सादर केल्याचा, आरोप ही त्यांच्यावर होता.
किरण बेदी यांचे प्रेरणादायी विचार
- आयुष्यातील सर्व गोष्टी ह्या एका मिश्रणासारखे असतात. हे आपल्यावर निर्भर करतं की, आपण कोणत्या गोष्टीची निवड करतो.
- महिलांना आपल्याला सशक्त बनवण्याची गरज आहे, त्यांना त्यांच्या योग्य स्थानावर पोहोचवण्याची गरज आहे, ज्या ठिकाणी त्या त्याग नाही, तर निवड करतील.
- त्या शिक्षणाचे काहीही महत्त्व नाही, जे शिक्षण मनुष्याला त्याच्या भीतीपासून दूर नेऊ शकत नाही, व त्या व्यक्तीमध्ये प्रेरणा स्त्रोत जागृत करू शकत नाही.
- मी नेहमीच माझ्या स्वतःमध्ये वंचित लोकांसाठी सेवा करण्याची क्षमता निर्माण केलेली आहे व उत्साह वाढवला आहे.
- आयुष्यामध्ये कोणतीही गोष्ट अशक्य नाही किंवा असंभव नाही. कोणत्याही लक्षात पर्यंत पोहोचायचे असेल, तर आपल्याला फक्त प्रयत्न करणे गरजेचे आहे.
- जोपर्यंत आपल्या देशातील महिला देण्या ऐवजी नेहमी घेण्याच्या पदावर ती विराजमान असतील, तोपर्यंत सतत त्यांना अन्यायाचा सामना करावा लागेल.
- कोणत्याही परिस्थितीमध्ये मोह व अन्यायाला स्वतःच्या जवळ फिरकू सुद्धा देऊ नका, कारण आयुष्यामध्ये “परत कधी” व “परंतु” या शब्दांना कोणतेही महत्त्व नाही.
- काम केल्यामुळे मला खुशी मिळते व मी माझ्या प्रत्येक कामामध्ये काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करत असते.
- भ्रष्टाचार भले कुठेही असो, तो मानवीय समजासाठी हानिकारक आहे.
- अशा शिक्षणाचे काय महत्त्व, जे आपल्याला चुकीच्या गोष्टी सुधारण्याची क्षमता प्रदान करत नाही व आपल्यामध्ये धाडसी नेतृत्व जागवू शकत नाही.
किरण बेदी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती
आय डेअर बेदीनी मिळवला पहिला महिला आयपीएस होण्याचा बहुमोल, मनसे नेतृत्व आणि कर्तव्यदक्ष निष्ठेमुळे मिळाला रेरमण मॅक्सेस हा सर्वोच्च सन्मान, भारतातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी म्हणून किरण यांना ओळखले जाते.
जेव्हा फक्त पुरुष आयपीएस अधिकारी बनू शकतात हि धारणा होती, त्यावेळेस त्यांनी आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न मनी बाळगले व ते पूर्ण देखील केले. मसूर येथील राष्ट्रीय कदम येथील पोलीस ट्रेनिंग मध्ये अंशी पोलीस तुकडीतील त्या एकमेव महिला होत्या.
आयपीएस किरण यांचा जन्म पंजाब मधील अमृतसर येथे झाला. त्यांचे वडील प्रकाशनाल पेशवारिया हे कापड व्यावसायिक होते. त्याचबरोबर ते टेनिस खेळाडू होते.
किरण यांचे प्राथमिक शिक्षण अमृतसर मधील सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल मधून झाले. त्यांना तीन बहिणी होत्या. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. त्या शिक्षणा बरोबरच खेळातही चपळ होत्या, त्या ऑल इंडिया हार्ट कोड टेनिस चॅम्पियन होत्या.
१९७४ च्या चंदीगड मधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमधील महिला चॅम्पियन होत्या. श्रीलंका विरुद्ध दोन वेळा भारताचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कार्याला सुरुवातिला एक प्राध्यापक म्हणून केली.
१९७२ मध्ये ते यूपीएससी परीक्षेमध्ये यश मिळवून पहिल्या आयपीएस अधिकारी झाल्या. पोलीस विभागात ज्यावेळी पुरुषांचे वर्चस्व जास्त होते, त्यावेळी बेदींनी आयपीएस होऊन समाजात एक वेगळाच बदल घडवून आणला.
मसुरी येथे राष्ट्रीय पोलीस अकादमी मध्ये ट्रेनिंग मध्ये ८० पुरुष तुकडीमध्ये बेदी या एकमेव महिला होत्या. त्यांची पहिली पोस्टिंग नवी दिल्ली येथील चाणक्य पोलीस स्टेशन उपमंडळ अधिकारी म्हणून झाली.
त्याच वर्षी दि. ०९ मार्च १९७२ मध्ये त्यांचा ब्रजवेदी यांच्यासोबत झाला. त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले, जिचे नाव सायना वेदि आहे. त्यांनी स्वतः नेतृत्व आणि प्रशासन भारतीय पोलीस सेवा अशी अनेक पुस्तके लिहिली आहे.
आयपीएस किरण यांना १९९४ मध्ये रमण मॅगसेस पुरस्काराने गौरवले गेले व त्यानंतर त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्या एक कठोर पोलीस अधिकारी होत्या. त्यांनी भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या गाडीला १९८२ साली अवध्य पार्किंग अभियाना दरम्यान दंड दिला होता.
२००७ साली त्यांनी पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली. त्यांच्या आयुष्यावरती खूप पुस्तके लिहिली, चित्रपट बनवले गेले होते, मित्रहो असे काही नाही या जगात सगळं काही शक्य आहे. कुठलेही लक्ष प्राप्त करण्यासाठी, केवळ प्रयत्नांची आवश्यकता आहे.
किरण बेदी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट
किरण यांच्यावर अनेक चित्रपट मालिका बनलेले आहेत. जसे की, तेजस्विनी – हिंदी चित्रपट, विजया शांती – तमिळ चित्रपट, तसेच इन्स्पेक्टर किरण बेदी दूरचित्रवाणी मालिका.
FAQ
१. किरण बेदी यांना किती मुले आहेत?
मार्च १९७२ मध्ये किरण बेदी यांचे ब्रिज बेदी यांच्या सोबत लग्न झाले आणि १९७५ साली त्यांना कन्या रत्न प्राप्त झाले.तिचे नाव सायना असे ठेवण्यात आले.
२. किरण बेदी का प्रसिद्ध आहेत?
जुलै १९७२ मध्ये भारतीय पोलिसांमध्ये भरती होण्यासोबतच, त्यांना भारतीय पहिली महिला आयपीएस ऑफिसर होण्याचा मान देखील मिळाला. पोलीस ऑफिसरच्या नात्याने किरण बेदी त्यांच्या कामामुळे, नेहमी चर्चेत राहिल्या. त्यांनी आमली पदार्थांचे नियंत्रण, दळणवळण नियंत्रण, आणि व्हीआयपी सुरक्षा, यासारखी प्रमुख कामे हाताळली. १९७७ मध्ये त्यांनी इंडिया गेट दिल्लीवर अकाली आणि निरंकार यामध्ये उद्भवलेल्या शिख दंगलीला ज्या पद्धतीने नियंत्रित केलं, ते पोलीस इतिहासात एक उदाहरण आहे.
३. किरण बेदी यांचा जन्म कधी झाला ?
किरण बेदीचा जन्म दि. ०९ जून १९४९ रोजी पंजाबच्या, अमृतसर मध्ये झाला. यांच्या वडिलांचे नाव प्रकाश पेशवारिया आणि आईचे नाव प्रेमलता आहे. किरण बेदी यांचे खापर पंजोबा लाला हर गोविंद हे एक व्यापारी होते आणि १९६० मध्ये त्यांनी पेशावर मधून निघून, पंजाब मधील अमृतसर मध्ये स्थायिक झाले आणि पेशवारीया हे नाव स्वीकारले.
४. किरण बेदी यांनी कोणती पुस्तके लिहिली ?
इट्स वेल्स पॉसिबल, आय डेअर, इंडियन पोलीस, लीडरशिप अँड गव्हर्नर
निष्कर्ष
मित्रहो , आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पहिल्या महिला IPS किरण बेदी यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला कमेंट , हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.