राकेश शर्मा माहिती मराठी Rakesh Sharma Information In Marthi

राकेश शर्मा हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर राकेश शर्मा यांनी पटकावला, तो ०२ एप्रिल १९८४ मध्ये.

अंतराळातून भारत कसा दिसतो ? या प्रश्नाला शर्मा यांनी , सारे जहासे अच्छा हिन्दोस्ताँ हमारा, असे अभिमानाने उत्तर दिले होते.

त्यांच्या याच कारकर्दीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत, हा जगातील १४ वा देश ठरला आणि भारताने जागतिक पटलावर आपली छाप सोडली. व ही अवकाश संशोधनातील यशाकरिता एक अत्यंत महत्त्वाची पायरी ठरली.

चला मग, आज आपण या लेखाद्वारे जाणून घेऊया, जगाच्या इतिहासामध्ये स्वतःचे आणि आपल्या देशाचे नाव सुवर्णक्षणांनी नोंदविणाऱ्या या ग्रेट व्यक्तिमत्त्वाबद्दल काही रंजक गोष्टी.

Table of Contents

राकेश शर्मा माहिती मराठी Rakesh Sharma Information In Marthi

नाव राकेश शर्मा
जन्म तारीख दि. १३ जानेवारी १९४९
जन्म स्थळ पटियाला पंजाब
ओळख अंतराळात जाणारा पहिला भारतीय व जगातील १३८ वे अंतराळवीर
अंतराळात पहिली झेप दि. ०२ एप्रिल १९८४ रोजी
राष्ट्रीयत्व भारतीय
जात ब्राह्मण
पुरस्कार अशोक चक्र , संग्राम पदक , देश सेवा सेवा पदक , ९ वर्ष दीर्घ सेवा पदक , सोव्हिएत युनियनचा नायक
वैवाहिक स्थिती विवाहित

कोण आहे राकेश शर्मा ?

सर्वसामान्य माणसांपासून ते अंतराळवीर होण्यापर्यंतचा त्यांचा हा प्रवास त्यांच्यासाठी नेहमीच काल्पनिक राहिला आहे. आज जग खूप पुढे निघून आले आहे.

हे वाचा –

आज असा कुठलाही देश नाही, ज्याने अंतराळात झेप घेतली नसेल. परंतु भारत हा अंतराळ या विषयाच्या बाबतीत नेहमीच कुठे ना कुठे पुढे राहिला आहे. मग चंद्रयान असू दे, किंवा मंगळयान, अशा अनेक मोहिमा भारताने अत्यंत यशस्वीरित्या पार पाडले आहे.

Rakesh Sharma Information In Marthi

माणसाला नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेण्याची आवड असते आणि त्यामध्ये अंतराळामध्ये काहीतरी करण्याची संधी मिळणे व जगाला अजून नवीन गोष्टीची ओळख करून देणे, अवकाश संशोधन करण्यास सगळ्यांमध्ये भारत एका अव्वल स्थानावर आहे.

आज संपूर्ण जग अवकाश संशोधनाच्या पाठीला लागला आहे, पृथ्वी शिवाय कुठला दुसरा असा ग्रह आहे, जिथे मानवी वावर असू शकतो किंवा केला जाऊ शकतो ? त्याचा शोध सर्वत्र चालू आहे.

अशा मध्ये कल्पना चावला, शर्मा यांसारखे दिग्गज अंतराळात संपर्क करून, वेगळे संशोधन करून भारताला अवकाश संशोधनात पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत.

राकेश शर्मा यांचा जन्म व वैयक्तिक आयुष्य

राकेश यांचा जन्म दि. १३ जानेवारी १९४९ रोजी भारताच्या पंजाब प्रांतातील पटियाला या जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचं बालपण अत्यंत मजेशीर गेलं. पुढे शिक्षणासाठी त्यांनी हैदराबाद येथे स्थलांतर केलं आणि तिकडूनच आपले प्राथमिक शिक्षण सुरू केलं.

सेंट जॉर्ज ग्रामर स्कूल या हैदराबाद येथील शाळेतून राकेश यांचे प्राथमिक शिक्षण पार पडलं. पुढे ग्रॅज्युएशनसाठी त्यांनी निजाम कॉलेज या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन, आपली ग्रॅज्युएशनची पदवी देखील प्राप्त केली.

राकेश यांना रशियन भाषा माहिती होती. कारण ते त्यांच्या कुटुंबासह म्हणजेच पत्नी व मुलांसह इसवी सन १९९२ साली रशियातच राहत होते. त्यांचा मुलगा कपिल शर्मा हा दिग्दर्शक आहे आणि मुलगी कृतिका शर्मा ही मीडिया आर्टिस्ट आहे.

राकेश यांनी लहानपणापासूनच पायलट बनण्याचे स्वप्न पाहिलं आणि त्यासाठी त्यांनी साम, दाम, दंड, भेद, एक करून आपल्या स्वप्नला सत्यात साकारलं आणि ते जगलं.

राकेश शर्मा कौटुंबिक माहिती

आईचे नाव तृप्ता शर्मा
वडिलांचे नाव देवेंद्रनाथ शर्मा
पत्नीचे नाव मधु शर्मा
अपत्य कपिल शर्मा (चित्रपट दिग्दर्शक) , कृतिका शर्मा ( मीडिया आर्टिस्ट )

राकेश शर्मा यांची कारकीर्द  

लहानपणापासूनच राकेश यांना अंतराळातील घडणाऱ्या गोष्टी जाणून घेण्याची उत्सुकता असायची. राकेश फक्त अठरा वर्षाचे होते, जेव्हा त्यांनी भारतीय वायुसेनेमध्ये प्रवेश केला. शर्मा यांची अंतराळात जाण्याची सुरुवात १९७० सालापासून झाली.

Rakesh Sharma

इसवी सन १९६६ मध्ये शर्मा यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. पुढे ३५ व्या राष्ट्रीय सुरक्षा अकॅडमी मधून पास होऊन, शर्मा यांनी भारतीय वायुसेनेत टेस्ट पायलट म्हणून प्रवेश घेतला.

१९७० मध्ये भारतीय वायुदल टेस्ट पायलट म्हणून त्यांची सेवा सुरू झाली. इसवी सन १९७१ साल पासून एअरक्राफ्ट द्वारे उड्डाण करण्यास राकेश शर्मा यांनी सुरुवात केली. राकेश यांचे या क्षेत्रातील कौशल्य अतिशय आधुनिक होते, यांच्या कामामुळे त्यांची उच्च पदावर नियुक्ती होऊ लागली.

इसवी सन १९८४ मध्ये राकेश शर्मा यांची भारतीय वायुसेनेत स्कवॉर्डन लीडर व पायलट या पदावर नियुक्ती करण्यात आली. इस्त्रो आणि सोवियत इंटर कॉसमॉस्प्रेस यांच्या संयुक्त विद्यामानाने जी मोहीम आयोजित केली होती, त्या मोहिमेमध्ये अवकाश यात्री सदस्यांच्या यादीमध्ये शर्मा यांची निवड करण्यात आली.

राकेश शर्मा यांचा अंतराळातील प्रवास

राकेश यांनी SOYUZ T11 या मोहिमे अंतर्गत अवकाश यांमधून, दि. ०३ एप्रिल १९८४ रोजी सोवियत स्प्रेस स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली. त्यांच्या या कारकिर्दी मुळे भारताचे नाव अवकाश संशोधनात मोठ्या शिखरावर जाऊन पोहोचलले.

Rakesh Sharma

अंतराळातील राकेश यांचा वावर जवळपास ०७ दिवस २१ तास आणि ४० मिनिटे इतका होता. अंतराळात राहून, राकेश यांनी शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास केला.

बायो मेडिसीन आणि रिमोट सेन्सिंग या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी तिथे संशोधन केले. ते जवळपास ०७ दिवस, २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळामध्ये वावरले. शर्मा यांच्या बरोबरीने युरीमाली शेव आणि गेनाडी स्ट्रेक लोव्ह हे दोघे होते.

अंतराळात पाऊल ठेवण्या आधी ०३ वर्ष राकेश शर्मा यांनी कठोर परिश्रमाने प्रशिक्षण घेतलं. इतकेच नव्हे तर, सुप्त कॉलास्ट्रॉफोबियाची चाचणी घेण्यासाठी, बेंगलोर मधील हवाई दलाच्या सुविधेने त्यांना तब्बल ७२ तास एका खोलीत बंद करून ठेवलं होतं.

राकेश यांनी रशियन भाषेच देखील प्रशिक्षण घेतलं, कारण बहुतांश सूचना या रशियन भाषेत असायच्या.

ज्यावेळी राकेश मास्को मध्ये अंतराळात जाण्यासाठी प्रशिक्षण घेत होते, तेव्हा त्यांना त्यांच्या सहा वर्ष मुलीचा मृत्यू झाल्याची बातमी देखील कळाली, परंतु तरीही त्यांनी स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवत, आपले ध्येय पूर्ण करून, दाखवलं.

विंग कमांडर पदावरून निवृत्ती दिल्यानंतर, इसवी सन १९८७ मध्ये राकेश यांनी हिंदुस्तान एरोनॉस्टिकलिमिटेड मध्ये प्रवेश घेतला.

राकेश शर्मा यांच्या अंतराळवीर यात्रे दरम्यान घडलेला एक किस्सा

पुढे काही काळ राकेश यांनी H.A.L नाशिक डिव्हिजन या ठिकाणी चीफ टेस्ट पायलट म्हणून सेवा दिली. पुढे याच पदावर राहत त्यांची बदली बेंगलोर मध्ये करण्यात आली.

राकेश शर्मा

ज्यावेळी राकेश अंतराळवीर यात्रेवर होते, त्यावेळी घडलेला एक किस्सा आवर्जून सांगावासा वाटतो, तर झालं असं, त्यावेळी भारतीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी आणि राकेश यांच्या सोबतच्या कॉन्फरन्स कॉल वर राकेश यांना अंतराळातून, आपला भारत कसा दिसतो ? हा प्रश्न केला होता.

या प्रश्नाचे उत्तर देताना राकेश म्हणाले, सारे जहाँ से अच्छा. हे उत्तर एकताच इंदिरा गांधीजी यांच्या चेहऱ्यावर एक अभिमानास्पद हास्य आलं, खरंच हे वाक्य सर्व भारतीयांचा अभिमान आहे. अंतराळातून देखील आपला भारत इतका सुंदर दिसतो, याची कल्पना आपल्याला राकेश यांच्यामुळे झाली.

अवकाशात मनुष्य पाठवणारा आपला भारत देश चौदाव्या क्रमांकावर आहे. शर्माचे अंतरिक्ष यात्रेस गेले होते, तेव्हा त्याने तिकडे वेगवेगळे भारतीय उपक्रम केले.

त्यातीलच काही म्हणजे त्याने, भारतीय जेवणाचा डब्बा आकाशात नेला होता. जेवणाच्या डब्यामध्ये सुजीचा हलवा, आलू छोले, भाजी, पुलाव इत्यादी पदार्थ त्यांनी नेले होते.

राकेश शर्मा यांनी अंतराळा मध्ये केले उपक्रम

याशिवाय अवकाशात गेल्यावर, तिकडच्या वातावरणाचा परिणाम शरीरावर होऊ नये म्हणून, त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे योगा देखील करून पाहिले. पुढे त्यांनी अंतराळात जाणाऱ्या यात्रेकरूंना तिकडे होणाऱ्या आजारांपासून वाचण्यासाठी योगा करण्याचा सल्ला दिला होता.

लहानपणापासून राकेश शर्मा यांचे स्वप्न होतं की मोठे होऊन त्यांना देखील पायलट बनवायचा आहे. आज त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं. शिवाय संपूर्ण जगभरात त्यांच्या कार्याची वाह वाह झाली.

अंतराळातून आल्यावर काही वर्षांनी त्यांनी पुन्हा एकदा अंतराळ जाण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु या वेळेला काही कामानिमित्त नाही तर अंतराळा विषय अधिक माहिती जाणून घेण्यासाठी.

भारतीय राकेश यांनी अंतराळात भारतीय म्हणून पहिला पाऊल ठेवला आणि त्यानंतर पहिली भारतीय महिला म्हणून कल्पना चावला यांनी अंतराळात पाऊल ठेवलं आणि आपल्या देशाचे नाव खूप मोठं केलं.

राकेश शर्मा यांना मिळालेले पुरस्कार व सन्मान

  • राकेश यांनी अवकाश संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल व त्यांच्या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्रदान करण्यात आले.
  • राकेश यांची अंतरिक्ष यात्रा पार पडल्यावर, त्यांना हिरो ऑफ सोवियेत संघ या पदाचे सन्मानित करण्यात आले.
  • भारत सरकारने देखील शर्मा यांचा अशोक चक्र देऊन सन्मान केला आणि त्यांच्या कार्याबद्दल कौतुकाची थाप दिली.
  • राकेश यांना पश्चिम स्टार, संग्राम मेडल, विदेश सेवा सर्विस मेडल, असे वेगवेगळे पुरस्कार जाहीर झाले आहेत.
  • राकेश यांसारखा थोर व्यक्तिमत्व आपल्या भारताला लाभल्यामुळे, भारताचे नाव सातासमुद्रा पार गेलं. राकेश हे अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
  • बेंगलोरच्या एअरक्राफ्ट अँड सिस्टीम टेस्टिंग एस्टॅब्लिशमेंट मधून, शर्मा यांनी वैमानिकांसाठी असलेला प्रायोगिक चाचणी अभ्यासक्रम पूर्ण केला. मिग व्हेरीयंट  एचएस ७४८, कॅनबेरा हंटर, कॅरीबू, इसकारा, किरण, अजित, मरुत व एचपीटी ३२ आदी विविध प्रकारच्या विमानांच्या उड्डाणाचा १७०० तासांचा अनुभव, राकेश शर्मा यांच्या नावावर नोंदविला गेला आहे.
  • एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाचे राकेश शर्मा हे सन्माननीय सदस्य असून, इंडियन रॉकेट सोसायटीचे सदस्य आहेत. नवी दिल्ली येथील अवकाश खात्यात ते कार्यरत असून, अशोक चक्र, ऑर्डर ऑफ लेनिन या रशियाचा सर्वोच्च पुरस्कार, तसेच हिरो ऑफ युनियन व गोल्ड स्टार पदक आधी बहुमानाने शर्मा यांना सन्मानित करण्यात आले आहे.

राकेश शर्मा यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

भारतातील पहिले व जगामधील १३८ वे अंतराळवीर राकेश यांचा जन्म, दिनांक १३ जानेवारी १९४९ मध्ये पंजाब राज्यातील पटियाला जिल्ह्यामध्ये झाला.

राकेश यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती. त्यांना खराब वस्तू व्यवस्थित करण्याच्या, तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर बारीक नजर ठेवण्याची सवय होती.

राकेश मोठे झाल्यावर ते आकाशात उडणारी विमाने डोळ्या समोरून जाईपर्यंत पाहत असत, लवकरच राकेश यांच्या मनात आकाशात उडण्याची इच्छा जागृत झाली आणि मग त्यांनी त्या दिशेने वाटचाल सुरू केली. पटियाला येथील हिंदू गौर ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मलेल्या राकेश यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून पदवी प्राप्त केली.

राकेश १९६६ मध्ये एन.डी.ए उत्तीर्ण झाल्यानंतर, भारतीय वायुसेनेचे कॅडेट बनले आणि १९७० मध्ये भारतीय हवाई दलामध्ये ते सामील झाले. मग इथून त्यांच्या नशिबाने यु टर्न घेतला.

वयाच्या २१ व्या वर्षी भारतीय वायुसेनेत दाखल झाल्या नंतर, राकेश यांनी १९७१ च्या भारत पाकिस्तान युद्धा दरम्यान त्यांच्या, मिग एअरक्राफ्ट विमानाने महत्त्वपूर्ण यश मिळवले. या युद्धानंतर राकेश प्रसिद्धीच्या झोतात आले आणि लोकांनी त्यांच्या क्षमतेचे कौतुक केले. शर्मा यांनी कठीण प्रसंगांमध्ये सुद्धा चमकदार काम करून आपले नाव कमावले.

१९८४ मध्ये शर्मा भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि १९८४ मध्ये सोवियत युनियनच्या इंटर कॉसमॉस कार्यक्रमाच्या संयुक्त अवकाश मोहिमेचा भाग म्हणून, आठ दिवस अंतराळामध्ये राहिले. त्यावेळी ते भारतीय हवाई दलाचे लीडर आणि वैमानिक होते.

शर्मा यांनी दि. ०३ एप्रिल १९८४ मध्ये सोउझ टी ११ मध्ये दोन अन्य सोव्हियत अंतराळ वीरासह उड्डाण  केले. या उड्डाणात आणि सल्युत ७ अंतराळ स्थानकावर त्यांनी उत्तर भारतातले छायाचित्रण केले आणि गुरुत्वाकर्षण हिन योगाभ्यास केला.

भारत सरकारने राकेश शर्मा यांना अशोक चक्र देऊन सन्मानित केले. विंग कमांडर म्हणून, निवृत्त झाल्यानंतर शर्मा यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये चाचणी पायलट म्हणून सेवा दिली.

त्यानंतर २००६ मध्ये राकेश शर्मा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या समितीमध्ये भाग दर्शवला. त्यांनी नवीन भारतीय अंतराळ उड्डाण कार्यक्रमास मान्यता दिली.

राकेश शर्मा यांच्या बद्दल दहा ओळी

  • राकेश भारताचे पहिले व जगाचे १३८ वे अंतरिक्ष यात्री होते.
  • राकेश यांचा जन्म दि. १३ जानेवारी १९४९ मध्ये पंजाब मध्ये पटियाला या शहरांमध्ये झाला.
  • राकेश यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र शर्मा व आईचे नाव तृप्ता शर्मा असे होते.
  • राकेश यांचे प्राथमिक शिक्षण हैदराबाद मधील सेंट जॉर्ज ग्रामर स्कूल या ठिकाणी झाले.
  • राकेश यांनी हैदराबाद मधील उस्मानिया युनिव्हर्सिटी मधून शिक्षा घेतली.
  • राकेश यांना लहानपणापासूनच विज्ञानामध्ये प्रचंड आवड होती. बिघडलेल्या गोष्टींना योग्यरीत्या बनवणे, इलेक्ट्रॉनिक वस्तूवरती बारकाईने निरीक्षण करणे, हे त्यांचे छंद होते.
  • राकेश यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात १९६६ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा आकारणी मधून केली व यानंतर इंडियन एअर फोर्स मध्ये कॅडेट च्या रूपात ते सहभागी झाले
  • दि. २० सप्टेंबर १९८२ मध्ये राकेश शर्मा यांची इंडियन स्पेस रिसर्च सेंटर मध्ये निवड झाली व सोवियत संघ यातील एका संयुक्त अंतरिक्ष मिशनमध्ये त्यांची निवड करण्यात आली.
  • अंतरिक्ष मधून परतल्या नंतर, भारत सरकारने राकेश यांना सर्वोच्च अशोक चक्र देऊन सन्मानित केले.
  • राकेश हे भारताचे पहिले अंतराळवीर होते. त्यांना सोवियत संघाच्या द्वारे हिरो ऑफ सोव्हीयत संघ हे पद देऊन सन्मानित केले गेले.

FAQ

१. राकेश शर्मा अंतराळात किती दिवस राहतात?

अंतराळात राहून, राकेश शर्मा यांनी शास्त्रीय आणि तांत्रिक बाबींचा अभ्यास केला. बायो मेडिसीन आणि रिमोट सेन्सिंग या दोन महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांनी तिथे संशोधन केले. ते जवळपास ०७ दिवस, २१ तास आणि ४० मिनिटे अंतराळामध्ये वावरले. राकेश यांच्या बरोबरीने युरीमाली शेव आणि गेनाडी स्ट्रेक लोव्ह हे दोघे होते.

२. राकेश शर्मा अवकाशात कसे गेले?

शर्मा यांनी SOYUZ T11 या मोहिमे अंतर्गत अवकाश यांमधून, दि. ०३ एप्रिल १९८४ रोजी सोवियत स्प्रेस  स्टेशनच्या दिशेने अंतराळात झेप घेतली. त्यांच्या या कारकिर्दी मुळे भारताचे नाव अवकाश संशोधनात मोठ्या शिखरावर जाऊन पोहोचलले.

३. राकेश शर्मा कशासाठी प्रसिद्ध आहेत?

राकेश हे अंतरिक्षात जाणारे पहिले भारतीय आहेत. भारताचा पहिला आणि जगाचा १३८ वा अंतराळवीर बनण्याचा सन्मान विंग कमांडर शर्मा यांनी पटकावला, तो ०२ एप्रिल १९८४ मध्ये. अंतराळातून भारत कसा दिसतो ? या प्रश्नाला राकेश यांनी , सारे जहासे अच्छा हिंदोस्तान हमारा, असे अभिमानाने उत्तर दिले होते. त्यांच्या याच कारकर्दीमुळे अंतराळात झेप घेणारा भारत, हा जगातील १४ देश ठरला आणि भारताने जागतिक पटलावर आपली छाप सोडली. व ही अवकाश संशोधनातील यशाकरिता एक अत्यंत महत्त्वाची पायरी ठरली.

४. राकेश शर्मा यांचा जन्म कधी झाला ?

राकेश यांचा जन्म दि. १३ जानेवारी १९४९ रोजी भारताच्या पंजाब प्रांतातील पटियाला या जिल्ह्यामध्ये झाला. त्यांचं बालपण अत्यंत मजेशीर गेलं. पुढे शिक्षणासाठी त्यांनी हैदराबाद येथे स्थलांतर केलं आणि तिकडूनच आपले प्राथमिक शिक्षण सुरू केलं.

५. राकेश शर्मा यांच्या आई वडिलांचे नाव काय ?

राकेश यांच्या वडिलांचे नाव देवेंद्र शर्मा व आईचे नाव तृप्ता शर्मा असे होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रसिद्ध अंतराळवीर राकेश शर्मा यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment