लता मंगेशकर या संगीताच्या राणी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतामधील अमूल्य रत्नांपैकी, लता मंगेशकर ह्या एक आहेत. लताजींच्या मधुरा आवाजामुळे, लताजी देश विदेशामध्ये नावाजल्या आहेत. लताजींना संगीताची देवी समजले जाते.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रसिद्ध गायिका व भारताची गान कोकिळा म्हणून प्रसिद्धीस आलेल्या लता मंगेशकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे, ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत संपूर्ण वाचा.
लता मंगेशकर माहिती मराठी | Lata Mangeshkar Information In Marathi
पूर्ण नाव | लता दिनानाथ मंगेशकर ( हेमा ) |
जन्म तारीख | २८ सप्टेंबर १९२९ |
जन्म स्थळ | इंदूर, मध्य प्रदेश |
प्रसिद्धी | भारताची गान कोकिळा |
वडिलांचे नाव | दिनानाथ मंगेशकर |
आईचे नाव | शेवंती मंगेशकर |
भावंडे | मीना, आशा, उषा आणि हृदयनाथ |
वैवाहिक स्थिती | अविवाहित |
पुरस्कार | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक पुरस्कार, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, बंगाल चित्रपट पत्रकार संघटना पुरस्कार, फिल्मफेअर विशेष पुरस्कार, भारतरत्न |
मृत्यू | ६ फेब्रुवारी २०२२ |
वय | ९२ |
मृत्यू ठिकाण | मुंबई |
लता मंगेशकर यांचे जीवनचरित्र
भारताची गान कोकिळा, भारतरत्न, अद्भुत, अद्वितीय आणि जगातील सर्वोत्तम आवाजाच्या मानकरी, संगीत विश्वात सात दशकांपासून भारत देशातील ख्यातनाम गायिका सुमारे १००० चित्रपटांमध्ये ज्यांच्या आवाजाच्या जादूने भुरळ घातली, अशा आपल्या भारताची गान कोकिळा लतादीदी अर्थात लता मंगेशकर.
लतादीदींची गाणी संपूर्ण विश्वभरात गाजतात आणि वाजतात सुद्धा. लतादीदीच्या गाण्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा मधुरपणा आढळून येतो. सुख आणि दुःख कुठल्याही भावनेत, विचारात असाल तरीही, लता मंगेशकरच्या गीताने मानसिक समाधान नक्की मिळते.
अमेरिकेतील वैज्ञानिकांनी लतादीदीच्या कंठावर संशोधन करून म्हटले की, असा आवाज इतिहासात नाही आणि भविष्यात कोणाचा होईल असं वाटतही नाही. अशी महान गायिका आपल्या भारत देशात जन्माला आले, याचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे.
१९६३ मध्ये कवी प्रदीप यांनी लिहिलेले आणि श्री रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले, “ए मेरे वतन के लोगो” हे गीत एका कार्यक्रमात गाताना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डोळ्यात पाणी आले. एम.एस सुब्बालक्ष्मी नंतर भारतातील लतादीदी दुसऱ्या महिला कलाकार आहे.
- नक्की वाचा 👉👉 सिंधुताई सपकाळ माहिती मराठी
- नक्की वाचा 👉👉 अब्राहम लिंकन बायोग्राफी मराठी
- नक्की वाचा 👉👉 डॉ तात्याराव लहाने यांची माहिती
- नक्की वाचा 👉👉 शांता शेळके यांची माहिती मराठी
लता मंगेशकर यांचा जन्म, बालपण व कुटुंब
लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला मध्य प्रदेशातील इंदौर येथे झाला. परंतु लतादीदी मूळच्या महाराष्ट्र मधील कारण लतादीदी यांचे मुळगाव ठाणेर हे धुळे जिल्ह्यात आहे. आपले वडील मास्टर दिनानाथ मंगेशकर यांनाच गुरु मानून १९४२ ला लतादीदीच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. लतादीदीतेरा वर्षाच्या असताना दिनानाथ मंगेशकर यांचे हृदयविकाराने निधन झाले.
पित्याच्या पश्चात नवयुक्त चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी लतादीदींच्या परिवाराची काळजी घेतली आणि त्यांनी लतादीदीला गायक आणि अभिनेत्री कामाचा शुभारंभ करून दिला.
किती हसाल (इ.स. १९४२) चित्रपटासाठी नाचू या गडे, खेळू सारी मनी हौस भारीया हे पहिले गीत गायले. परंतु, हे गीत चित्रपटातून वगळले गेले. त्यानंतर मास्टर विनायकांनी नवयुक्तच्या पहिली मंगळागौर साठी १९४२ ला चित्रपटात दीदीला छोटी भूमिका दिली. यानंतर लतादीदीचा प्रवास सुरू झाला.
उषा मंगेशकर, आशा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची लहान भावंड आणि आई शेवंती मंगेशकर या लतादीदींच्या आई. लता दीदीच्या सुरुवातीच्या जीवनात अनेक संगीतकारांनी त्यांचा पातळ आणि कर्कश आवाज म्हणून अवहेलना केली.
परंतु दीदी न खचता चालत राहिल्या आणि आज विश्वातील नामांकित मोजक्याच सर्वोत्कृष्ट गायकांच्या यादीत समाविष्ट झाल्या. त्यांच्या आवाजाने कुणाच्या डोळ्यात अश्रू आले, तर कधी सीमेवरील जवानांना स्फूर्ती आली.
हेमा आणि लताची गोष्ट
लताजींचे मूळ नाव हेमा होते. लताजींनी “भावबंधन” या नाटकामधील लतिका या स्त्री पात्राने लोकांवर भुरळ पाडली. त्यामुळे वडिलांनी लता असे त्यांचे नामकरण केले व तेव्हापासून हेमाजींना लता या नावाने ओळख प्राप्त झाली.
लता मंगेशकर यांचे शिक्षण
लताजींच्या शिक्षणाबद्दल फारशी माहिती ज्ञात नाही. लताजींनी शालेय शिक्षण घेतले नाही. त्यांना बालपणापासूनच संगीतामध्ये रस होता. त्यांना गाण्याची प्रचंड आवड होती. लतादीदी यांना सहा विद्यापीठानी डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले.
लतादीदी यांचे वैयक्तिक जीवन
लतादीदी यांनी आपले संपूर्ण जीवन संगीतासाठी समर्पित केले. त्यांनी आपल्या आयुष्यातील ८० वर्ष संगीतासाठी दिली. लता मंगेशकर हे त्यांचे संपूर्ण आयुष्य अविवाहित राहिल्या.
लता मंगेशकर यांची राहणी
एवढे मोठे नाव असूनही लता मनासारखीच साधी व्यक्ती राहिल्या आहेत. पारंपारिक वेशभूषा हे त्यांची ओळख राहिली आहे. त्यांची नम्रता आणि लाजाळू व्यक्तिमत्व देखील अपरिवर्तित राहिली आहे. तिचा आवाज देशभरात लाखो लोकांपर्यंत पोहचला आहे एवढेच नव्हे तर भारतीय संगीताची जादू जगभर पसरली आहे.
लताजींचा जीवन संघर्ष
लताजींचे वडील दीनानाथ मंगेशकर हे संगीतकार होते, वयाच्या पाच वर्षापासून लताजींना त्यांच्या वडिलांनी गाण्याची शिकवण दिली. उस्ताद अमानत अली खान, पंडित तुलसीदास शर्मा, गुलाम हैदर, यांसारख्या संगीतकारांनी लताजींना संगीताचे शिक्षण प्रदान केले.
लताजी या वयाच्या तेरा वर्षाच्या असताना १९४२ मध्ये लताजींच्या वडिलांचे म्हणजेच दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फार बिकट झाली.
लताजींना पाच भावंडे होती. लतादीदी या पाच भावंडांमध्ये सर्वात मोठ्या. कुटुंबाची सर्व जबाबदारी लताजींच्या खांद्यावर आली. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास लताजीनी सुरुवात केली.
अभिनय क्षेत्रामध्ये लताजींना तितकासा रस नव्हता. लताजींनी पहिला चित्रपट, “पहिली मंगळागौर” या चित्रपटासाठी पहिले सॉंग रेकॉर्ड केले. परंतु ते गाणे रिलीज होऊ शकले नाही. लताजींनी त्यांच्या जीवन काळामध्ये २० पेक्षा अधिक भाषांमध्ये ३०००० हून अधिक गाणी गायली आहेत.
लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीची सुरुवात
वयाच्या अठराव्या वर्षी प्रसिद्ध संगीतकार उस्ताद, गुलाम हैदर, यांनी गायलेली गाणी लता मंगेशकर यांनी ऐकायला सुरुवात केली. त्यांच्या गाण्यांमुळे लता मंगेशकर या प्रभावीत झाल्या. त्याच काळात लताजींची ओळख शशीधर मुखर्जी, यांच्यासोबत झाली.
शशिधर मुखर्जी यांनी लताजींच्या आवाजाला तितकेसे महत्त्व दिले नाही. त्यांना पातळ व कर्कश आवाज असे म्हणून त्यांच्या गाण्याची त्यांनी अवहेलना केली. लताजींना पहिला ब्रेक प्रसिद्ध संगीतकार गुलाम हैदर यांनी दिला. गुलाम हैदर यांच्या मदतीने लताजींनी संगीत क्षेत्रामध्ये त्यांची असलेली कुवत सिद्ध केली.
१९४८ मध्ये लताजींनी मजबूर चित्रपटासाठी एक गाणे गायले होते, त्या गाण्याचे बोल दिल मेरा तोडा असे होते. व हे गाणे लताजींचे पहिले वहिले गाणे सुपरहिट झाले. १९४९ साली “महल” चित्रपटात लताजींनी गायलेले “आयेगा आनेवाला” हे गाणे सुद्धा अतिशय सुपरहिट झाले. सलग सुपरहिट गाण्यानंतर लताजींनी मागे अजिबात वळून पाहिले नाही.
लताजींना विविध चित्रपटांच्या गाण्यांची मागणी यायला लागली व लताजी विविध चित्रपटांमध्ये गाणे गाऊ लागल्या. रोमँटिक गाणी, देशभक्तीपर गाणी, भजन अशा विविध प्रकारच्या गाण्यांमध्ये लताजींनी त्यांची उत्तम गायकी दाखविली. लताजींचे देशभक्तीपर गीत “ये मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी” हे ऐकून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू गहिवरून गेले.
लताजींचे संगीत क्षेत्रातील योगदान
लताजींच्या कंठामध्ये देवी सरस्वतीचा वास आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. लताजींना गाण्याची देवी म्हणून संबोधले जाते. चित्रपटांमध्ये पार्श्वगायिका म्हणून लताजींचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जवळपास सर्वच भाषेत गाण्यासाठी लताजींनी स्वतःचा मधुर आवाज दिला.
लताजींनी त्यांचे संपूर्ण आयुष्य संगीतासाठी समर्पित केले. तीस हजार हून अधिक गाणी लता मंगेशकर यांनी गायली. आजही लता मंगेशकर यांच्या गाण्यांमध्ये तीच परीपक्वता आहे. लताजींनी एस.डी बर्मन, मदन मोहन, जय किशन, नौशाद अली, इत्यादी. अनेक दिग्गज संगीतकारांसोबत काम केले.
लताजींनी श्री ४२०, चोरी चोरी, देवदास, घर क्रमांक ४२०, बैजू बावरा, कोहिनूर, मुगल-ए-आजम, अशा अनेक चित्रपटांमध्ये सुपर सुपरहिट गाणी गायली. लतादीदीयांनी आयुष्यामधील ८० वर्ष संगीताला समर्पित केली. लताजींनी पहिल्यांदा व्यासपीठावर गाणे म्हटले. त्यावेळी लतादीदींना २५ रुपये मानधन म्हणून दिले. ही लता मंगेशकर यांच्या आयुष्यातील पहिली कमाई होती.
लता मंगेशकर यांची काही प्रसिद्ध गाणी
लता मंगेशकर यांना जग प्रेमाने “लतादीदी” म्हणून ओळखते. लता मंगेशकर यांनी त्यांच्या गायनाने केवळ भारतातच नाही, तर जगभरामध्ये स्वतःचे प्रभुत्व प्रस्थापित केले आहे. लता मंगेशकर यांचा आवाज इतका मधुर आहे की, त्यांचे गाणे ऐकल्याशिवाय कोणीच राहू शकत नाही. लता मंगेशकर यांनी विविध भाषांमध्ये विविध आवाजामध्ये गाणे गायले आहे. लताजींची काही प्रसिद्ध गाणी खालील प्रमाणे –
- यारा सिली सिली
- शीशा हो या दिल हो
- अजी रुठ कर अब ( आरजू – 1965 )
- सलाम ए-इश्क मेरी जान
- मैं चली मैं चली
- ऐ दिले नादाँ (रजिया सुल्तान 1983)
- मेरी आवाज ही पहचान है
- बाहों में चले आओ
- आएगा आनेवाला (महल 1949)
- लग जा गले (वो कौन थी 1964)
- गुमनाम है कोई ( गुमनाम – 1965 )
- तुझसे नाराज नहीं जिंदगी (मासूम 1983)
- आ जाने जां (इंतकाम 1969)
आनंदघन या टोपणनावाने मराठी चित्रपटांसाठी संगीत
- १९९० – लेकीन (हिंदी)
- 1963 – मराठा तितुका मेळवावा
- १९५३ – वादळ (मराठी)
- १९५५ – कांचन गंगा (हिंदी)
- 1965 – साधी माणसे
- १९५३ – झांझर (हिंदी), सी. रामचंद्र यांच्यासोबत सहनिर्मिती
- 1960 – राम राम पाव्हणं
- १९६९ – तांबडी माती साधी माणसे या चित्रपटासाठी तिला महाराष्ट्र राज्य सरकारचा सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक पुरस्कार मिळाला. याच चित्रपटातील “ऐरनिच्या देवा तुला” या गाण्याला सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. उत्पादन लता मंगेशकर यांनी चार चित्रपटांची निर्मिती केली आहे.
- 1963 – मोहित्यांची मंजुळा
लता मंगेशकर यांना मिळालेले पुरस्कार
लतादीदी यांना भारतरत्न पुरस्कार २००१ साली प्रदान करण्यात आला. १९७४ ते १९९१ च्या काळात सर्वात जास्त ध्वनीमुद्रणांच्या उच्चांकासाठी त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले. भारतात असा एकही व्यक्ती नाही, ज्याने लतादीदींच्या गाण्याचा आनंद घेतला नसेल, कारण विविध भाषेत तीस हजारांपेक्षा जास्त गाणे त्यांनी गायले.
ज्यामध्ये मराठी आणि हिंदी भाषेत, सर्वाधिक गाणे आहेत. लता दीदींना भारतरत्न, दादासाहेब फाळके पुरस्कार, पद्मभूषण, पुरस्कार आणि यासारखे विविध उच्च पुरस्कार सुद्धा मिळाले. प्राप्त झालेल्या पुरस्कारांची यादी खालील प्रमाणे :
वर्ष | पुरस्कार |
१९५८,१९६२,१९६५,१९६९,१९९३,१९९४ | फिल्मफेअर पुरस्कार |
१९६६, १९६७ | महाराष्ट्र शासन पुरस्कार |
१९६९ | पद्मभूषण |
१९७२, १९७५, १९९० | राष्ट्रीय पुरस्कार |
१९७४ | जगात सर्वाधिक गाणी गाण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड |
१९९६ | स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार |
१९८९ | दादासाहेब फाळके पुरस्कार |
१९९७ | राजीव गांधी पुरस्कार |
१९९३ | फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड |
१९९९ | पद्मविभूषण, N.T.R. झी सिने जीवनगौरव पुरस्कार |
२००१ | भारतरत्न, स्टारडस्ट जीवनगौरव पुरस्कार नूरजहाँ पुरस्कार, महाराष्ट्र भूषण |
२००० | I.I.A. एफ. जीवनगौरव पुरस्कार |
२००८ | जीवनगौरव पुरस्कार |
बंगाली चित्रपट पत्रकार संघ पुरस्कार
- 1987 – अमरसंगी बंगाली चित्रपट
- 1973 – बॉन पलाशी पद बली चित्रपट
- 1964 – ती कोण होती
- 1991 – पण
- 1985 – राम तेरी गंगा मैली
- 1973 – अभिमान
- 1969 – सरस्वतीचंद्र
- 1967 – मिलान
- 1971 – तेरे मेरे सपने
- 1968 – किंग आणि रंक
- 1975 – कोरा कागद
- 1983 – लताजींचे पोर्ट्रेट
- 1972 – पाकीजा
- 1970 – दोन मार्ग
लता मंगेशकर यांना सुपरहिट गाण्यासाठी मिळालेले पुरस्कार
- १९५९ साली “आजा रे परदेसी” या गाण्यासाठी
- १९६३ मध्ये, “कहीं दीप जले कहें दिल के लिए” हे गाणे.
- १९६६ मध्ये “तुम्ही मेरे मंदिर, तुम्ही मेरी पूजा” या गाण्यासाठी
- १९७० मध्ये “आप मुझे अच्छे लगने लगे” या गाण्यासाठी
- १९९५ साली “दीदी तेरा दिवार दिवाना” या गाण्यासाठी फिल्मफेअर विशेष पुरस्कार मिळाला.
लता मंगेशकर यांना मिळालेले इतर पुरस्कार
- 1996 – राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार
- 1996 – स्टार स्क्रीन जीवनगौरव पुरस्कार
- 1974 – सर्वाधिक गाणी गायल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
- 1987 – ह्युस्टन टेक्सास येथे युनायटेड स्टेट्सचे मानद नागरिकत्व
- 1999 – एनटीआर राष्ट्रीय पुरस्कार
- 2000 – चतुरंग प्रतिष्ठान तर्फे जीवनगौरव पुरस्कार
- 2002 – आशा भोसले पुरस्कार
- 2011 – श्री चंद्रशेखर इंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार
- 2010 – प्राईस ऑफ इंडिया कला सरस्वती संगीत पुरस्कार
- 2011 – पुणे महानगरपालिकेतर्फे स्वभास्कर पुरस्कार
- 2000 – जीवनगौरव पुरस्कार
- 1997 – राजीव गांधी पुरस्कार
- 1990 – श्रीराजा लक्ष्मी फाउंडेशन चेन्नई तर्फे राजा लक्ष्मी पुरस्कार
- 1980 – दक्षिण अमेरिकेतील सुरीनाम प्रजासत्ताक चे मानद नागरिकत्व
- 1998 – साउथ इंडियन एज्युकेशनल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार
- 2001 – नुरजहा पुरस्कार
- 2002 – वर्षाचा स्वर रत्न सह्याद्री नवरत्न पुरस्कार
- 2007 – फोरेवर इंडियन अवॉर्ड
- 2002 – हकीम खान सूर पुरस्कार
- 2010 – जी आय एम ए चा जीवनगौरव पुरस्कार
- 2010 – नाईट ऑफ द लीजन ऑफ ऑनर फ्रेंच सर्वोच्च नागरी पुरस्कार
- 1998 – साउथ इंडियन एज्युकेशनल सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार
- 1985 – टोरंटो ओंटारियो कॅनडा येथे त्यांच्या आगमनाच्या सन्मानार्थ ९ जून हा आशिया दिन म्हणून घोषित करण्यात आला.
- 2020 – टीआरएच्या मोस्ट डिझायर पर्सनॅलिटी लिस्ट 2020 मध्ये भारतातील 23व्या क्रमांकावरील एकमेव गायक.
- संपूर्ण जगभरातील विविध आठ विद्यापीठाकडून लता मंगेशकर यांना डॉक्टर ऑफ लेटर्स पदवी.
- 28 सप्टेंबर रोजी – नरेंद्र मोदी सरकारने लतादीदी या दिग्गज पार्श्वगायिकेला ९० वर्षाची झाल्यावर डॉटर ऑफ द नेशन या उपाधीने सन्मानित केले.
लताजींना मिळालेले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
- “परिचय” चित्रपटातील गाण्यासाठी १९७२ मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार
- “कोरा कागज” चित्रपटातील गाण्यासाठी १९७४ मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार
- १९९० मध्ये, “लेकिन” चित्रपटातील गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार देण्यात आला.
लता मंगेशकर यांंच्या जीवनावर आणि कार्यावर लिहिलेली पुस्तके
- लता : संगीत क्षेत्रातील चंद्रमा (सांज शकुन प्रकाशन)
- लतादीदी आणि माझ्या कविता (सुचित्रा कातरकर)
- लतादीदी : अजीब दर्शन हैं यह (मूळ लेखक : हरीश भिमाणी-हिंदी)
- गाये लता, गाये लता- डॉ.मंगेश बिच्छू. प्रकाशक- पल्लवी प्रकाशन
- मोगरा फुलला (संपादक : रेखा चवरे)
- लता मंगेशकर – संगीत लेणे (मोरया प्रकाशन)
- लता मंगेशकर (चरित्र)- राजू भारतन
- लता मंगेशकर गंधार स्वरयात्रा (१९४५- १९८९) – संपादन : विश्वास नेरूरकर
- लता मंगेशकर यांचे व्यक्तिचित्रण करणारे ’स्वरयोगिनी’ नावाचे पुस्तक मधुवंती सप्रे यांनी लिहिले आहे. त्या पुस्तकाच्या परिशिष्टात लता मंगेशकरांनी गायिलेल्या चित्रपटगीतांची यादी आहे.
- Lata in her own voice (नसरीन मुन्नी कबीर)
- संगीतक्षेत्रातील चंद्रमा (प्रसाद महाडकर, विवेक वैद्य)
- हे रत्न भारताचे – लता मंगेशकर (लेखक : रेखा चवरे)
- लता – इसाक मुजावर
- ऐसा कहाँ से लाऊँ ( हिंदी- पद्मा सचदेव )
- The Voice of a Nation (मूळ लेखिका पद्मा सचदेव, मराठी अनुवाद : ‘अक्षय गाणे’ – जयश्री देसाई)
- In search of Lata Mangeshkar. ( इंग्रजी – हरिष भिमाणी )
- सप्तसुरांच्या पलीकडे : लता मंगेशकर – हरिष भिमाणी
भारतरत्न लताजींचे देशभक्तीपर गीत
लता मंगेशकर यांनी २६ जानेवारी १९६३ रोजी दिल्लीत नॅशनल स्टेडियम मध्ये देशभक्तीपर गीत गायले. ज्या गाण्याचे बोल होते, “ये मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी” जो शहीद हुई है उनकी, जरा याद करो कुर्बानी” हे गाणं लताजींनी शहिदांना समर्पित केले. लताजींच्या आवाजाने पंतप्रधान नेहरू व देशातील जनतेच्या डोळ्यांमधून अश्रू आले.
ऐ मेरे वतन के लोगों
तुम खूब लगा लो नारा
ये शुभ दिन है हम सबका
लहरा लो तिरंगा प्यारा
पर मत भूलो सीमा पर
वीरों ने है प्राण गवाएं
कुछ याद उन्हें भी कर लो
कुछ याद उन्हें भी कर लो ओ
जो लौट के घर ना आये
जो लौट के घर ना आये
ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
ऐ मेरे वतन के लोगों
ज़रा आँख में भर लो पानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
तुम भूल ना जाओ उनको
इसलिए सुनो ये कहानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
जब घायल हुआ हिमालय
खतरे में पड़ी आज़ादी
जब तक थी साँस लड़े वो
जब तक थी साँस लड़े वो
फिर अपनी लाश बिछा दी
संगीन पे धर कर माथा
सो गये अमर बलीदानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
जब देश में थी दीवाली
वो खेल रहे थे होली
जब हम बैठें थे घरों में
जब हम बैठें थे घरों में
वो झेल रहे थे गोली
थे धन्य जवान वो अपने
थी धन्य वो उनकी जवानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
कोई सिख कोई जाट मराठा
कोई सिख कोई जाट मराठा
कोई गुरखा कोई मदरासी
कोई गुरखा कोई मदरासी
सरहद पर मरनेवा..ला
सरहद पर मरनेवाला
हर वीर था भारतवासी
जो खून गिरा पर्वत पर
वो खून था हिंदुस्तानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
थी खून से लथ-पथ काया
फिर भी बन्दूक उठाके
दस-दस को एक ने मारा
फिर गिर गये होश गँवा के
जब अन्तसमय आया तो
जब अन्तसमय आया तो
केह गये के अब मरते हैं
खुश रेहना देश के प्यारों..
खुश रेहना देश के प्यारों
अब हम तो सफ़र करते हैं
अब हम तो सफ़र करते हैं
क्या लोग थे वो दीवाने
क्या लोग थे वो अभीमानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
तुम भूल ना जाओ उनको
इसलीये कही ये कहानी
जो शहीद हुए हैं उनकी
ज़रा याद करो क़ुरबानी
जय हिन्द.. जय हिन्द..जय हिन्द की सेना
जय हिन्द.. जय हिन्द..जय हिन्द की सेना
जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द
जय हिन्द, जय हिन्द, जय हिन्द
लता मंगेशकर यांचे वाद
लता मंगेशकर यांनी संगीतकार एस.डी बर्मन, यांना सहकार्य करण्यासाठी नकार दिला. याचे कारण असे की, त्यांच्या यशाचे श्रेय एस.डी बर्मन यांनी घेतले. १९६२ च्या दरम्यान लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यामध्ये रॉयल्टी वरून भांडण झाले होते. लता मंगेशकर यांना गाण्याच्या अल्बमचा भाग व्हायचे होते, तर रफींना फक्त पगार हवा होता. यावरून दोघांमध्ये वाद झाले.
लता मंगेशकर यांच्या बद्दल दहा ओळी
- लता मंगेशकर यांना भारताची गाण कोकिळा म्हणून संबोधले जाते.
- त्या एक प्रसिद्ध संगीतकार होत्या, त्यानी त्यांचे संपूर्ण आयुष्य संगीतासाठी समर्पित केले.
- लता मंगेशकर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये २० वेगवेगळ्या भाषांमध्ये ३०००० पेक्षा जास्त गाणी गायली.
- लता मंगेशकर यांचा आवाज अतिशय मधुर होता.
- लता मंगेशकर यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
- दादासाहेब फाळके पुरस्कार, भारतरत्न, पद्यभूषण, राष्ट्रीय व फिल्म पुरस्कार सुद्धा लता मंगेशकर यांना प्राप्त झाले.
- गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये लता मंगेशकर यांचे नाव नोंदवण्यात आले आहे.
- लता मंगेशकर यांना संपूर्ण जग गाणसम्राज्ञी म्हणून ओळखते.
- लता मंगेशकर यांना चार भावंडे आहेत मीना आशा उषा व हृदयनाथ,यामध्ये लता मंगेशकर ह्या सर्वात मोठ्या होत्या.
- संगीत क्षेत्रामध्ये लता मंगेशकर यांचे योगदान सर्वश्रेष्ठ आहे.
- दिनांक ०६ फेब्रुवारी२०२२ रोजी मुंबईच्या “ब्रिज कँडी” रुग्णालयामध्ये वयाच्या ९२ वर्षी लता मंगेशकर यांचे निधन झाले.
लता मंगेशकर यांचा मृत्यू
सात दशके भारतीयांच्या हृदयावर अधिराज्य गाजवलेली गान कोकिळा म्हणजे लता दीदी हीच भारताची धकधक अर्थात भारताची धडकन प्रत्येकाच्या काळजातील आवाज, प्रत्येक भारतीयच्या आयुष्यात संगीताची विविध रंगीत उसळवणारी, भारताला आपल्या आवाजातून भुरळ घालणारी, भारताची गान कोकिळा दिनांक ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी आपल्या संगीताच्या अथांग सागराला मागे ठेवून, निघून गेली. लतादीदीचा आवाज चंद्र सूर्य असेपर्यंत या ब्रम्हांडात कायम राहणार यात शंकाच नाही.
FAQ
१. लता मंगेशकर यांना भारतरत्न कधी मिळाला?
२००१ मध्ये लता मंगेशकर यांना भारतरत्न पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरवित केले.
२. लता मंगेशकर यांच्या वडिलांचे नाव काय?
लताजींचे वडील दीनानाथ मंगेशकर हे संगीतकार होते, वयाच्या पाच वर्षापासून लताजींना त्यांच्या वडिलांनी गाण्याची शिकवण दिली.
३. लता मंगेशकर यांचे पूर्ण नाव काय?
लताजींचे मूळ नाव हेमा होते. लताजींनी “भावबंधन” या नाटकामधील लतिका या स्त्री पात्राने लोकांवर भुरळ पाडली. त्यामुळे वडिलांनी लता असे त्यांचे नामकरण केले व तेव्हापासून हेमाजींना लता या नावाने ओळख प्राप्त झाली.
४. लता मंगेशकर यांनी गायलेली गाणी किती?
लता मंगेशकर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये २० वेगवेगळ्या भाषांमध्ये ३०००० पेक्षा जास्त गाणी गायली.
५. लता मंगेशकर का प्रसिद्ध आहेत?
लता मंगेशकर या संगीताच्या राणी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतामधील अमूल्य रत्नांपैकी, लता मंगेशकर ह्या एक आहेत. लताजींच्या मधुरा आवाजामुळे, लताजी देश विदेशामध्ये नावाजल्या आहेत. लताजीना संगीताची देवी समजले जाते.
६. दीनानाथ मंगेशकर यांचा मृत्यू कसा झाला?
दिनांक ०६ फेब्रुवारी२०२२ रोजी मुंबईच्या “ब्रिज कँडी” रुग्णालयामध्ये वयाच्या ९२ वर्षी लता मंगेशकर यांचे निधन झाले.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास लता मंगेशकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा.धन्यवाद.