शहीद भगतसिंग माहिती मराठी | Bhagat Singh Information In Marathi

Bhagat Singh Information In Marathi | शहीद भगतसिंग यांची माहिती मराठी – आपल्या भारत देशामध्ये विविध क्रांतिकारक होऊन गेले, ज्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे बलिदान दिले. त्या शूर क्रांतीकारांपैकी एक नाव म्हणजे भगतसिंग. भगतसिंग हे त्यांच्या नावाप्रमाणे महान क्रांतिकारक होते. लहानपणापासून भगतसिंग यांना देश प्रेमाचे, देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे धडे मिळाले. लहानपणापासूनच भगतसिंग आपला देश स्वतंत्र करण्यासाठी स्वप्न पाहत होते. भगतसिंग यांची विचारसरणी ही अतिशय वेगळी होती. व त्यांच्या विचारसरणीमध्ये देशाला स्वातंत्र्य मिळवून, देशांमध्ये क्रांती घडवून आणायची होती.

Bhagat Singh Information In Marathi

Table of Contents

भगतसिंग यांची संपूर्ण माहिती मराठी | Bhagat Singh Information In Marathi

भगतसिंग यांनी आपल्या भारत देशातील अनेक तरुण पिढीला, ब्रिटिश इंग्रजांविरुद्ध आवाज उठवण्यासाठी प्रेरणा दिली. परंतु हिंसक मार्गाने शहीद भगतसिंग यांनी काम केले, त्यामुळे वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी भगतसिंग यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास भगतसिंग बद्दल माहिती देणार आहे तुम्ही सविस्तर वाचा.

भगतसिंग जीवन परिचय – Shaheed Bhagat Singh

मूळ नाव भगतसिंग
जन्मतारीख २८ सप्टेंबर १९०७
जन्मस्थळ बंगा, ल्यालपुर जिल्हा
आईचे नाव विद्यावती
वडिलांचे नाव सरदार किशन सिंग
पत्नीचे नाव दुर्गादेवी
धर्म शीख
लग्न अविवाहित
मृत्यू २३ मार्च १९३१

भगतसिंग यांची माहिती मराठी – Information About Bhagat Singh

भगतसिंग यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही, १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या, स्वातंत्र्यलढ्यातील भगतसिंग क्रांतिकारी आहे. भगतसिंग यांनी देशाला स्वतंत्र मिळवून देण्याचे स्वप्न पाहिले होते, भगत सिंगानि  युरोपियन क्रांतिकारक चळवळीबद्दल वाचले होते, व यामुळे ते समाजवादाकडे आकर्षित झाले. त्यांना असे वाटत होते की, ब्रिटिश सत्ता भारतातून घालून टाकण्यासाठी, व आपला भारत देश हा लोकशाही बनवण्यासाठी भारतीय जनतेमध्ये पुनर्रचनेसाठी राजकीय सत्ता असणे आवश्यक होते.

ब्रिटिश सरकारने भगतसिंग यांना त्यांच्या हिंसक वृत्तीमुळे, दहशतवादी घोषित केले होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, भारतातील जनतेमध्ये क्रांतिकारक चळवळीला एक नवीन दिशा दिली. ब्रिटिश साम्राज्यांचा भारतामधून समूळ नाश करणे, हा भगतसिंग यांचा एकमेव उद्देश होता.

शहीद भगतसिंगसाठी क्रांती म्हणजे अन्यायामुळे निर्माण झालेली परिस्थिती, गुलामगिरी, बदलून काढणे. शहीद भगतसिंग यांनी अतिशय दृढ निश्चय केला होता की, त्यांना आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून सोडवायचा आहे. त्यासाठी त्यांचे व्यक्तिमत्व हे इतर राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांपेक्षा थोडे वेगळेच होते.

सरदार वल्लभभाई पटेल माहिती मराठी

भगतसिंग यांचे सुरुवातीचे जीवन

भगतसिंग हे देशाचे एक शूर क्रांतीकारक होते. यांचा जन्म हा दिनांक २८ सप्टेंबर १९०७ रोजी पंजाब मधील ल्यालपुर जिल्ह्यामध्ये बंगा या गावांमध्ये झाला. भगतसिंग यांचा जन्म शीख कुटुंबामध्ये झाला होता. भगतसिंग यांनी केलेल्या अतोनात प्रयत्नमुळे व देशाला इंग्रजांच्या गुलामगिरी मधून बाहेर काढण्यासाठी दिलेल्या बलिदानामुळे, ल्यालपुर जिल्ह्याचे नाव “शहीद भगतसिंग नगर” असे ठेवण्यात आले आहे.

भगतसिंग यांच्या वडिलांचे नाव सरदार किशन सिंग व आईचे नाव विद्यावती असे होते . भगतसिंग यांना दोन भावंडे होती. भगतसिंग यांचे कुटुंब हे सुद्धा एक क्रांतिकारी कुटुंब असल्यामुळे, देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्यलढात, भगतसिंग यांचे कुटुंब सक्रियपणे सहभागी असत.

त्यांचे वडील किशन सिंग हे गदर पक्षाचे सदस्य होते, गदर पार्टीची स्थापना अमेरिकेत ब्रिटिश राजवट भारतामधून कायमची घालवण्यासाठी केली होती. भगतसिंग यांचे रक्त सळसळते होते, स्वतःचे वडील व काका यांना भारतातून गुलामगिरी हटवून टाकण्यासाठी करत असलेल्या अतोनात प्रयत्न, या सर्व गोष्टींचा त्यांच्या मनावर मोठा परिणाम झाला, व आपण सुद्धा देशाला स्वातंत्र्य द्यावे व ब्रिटिशांना भारतातून हद्दपार करून टाकावे, अशी प्रेरणा त्यांच्यामध्ये निर्माण झाली.

भगतसिंग

भगतसिंग यांचे बालपण

भगतसिंग हे स्वातंत्र्यलढ्यात खोलवर गुंतलेल्या कुटुंबातील होते. त्यांचे वडील किशन सिंग आणि काका भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संघटनांमध्ये सक्रियपणे सहभागी होते. लहानपणापासूनच भगतसिंग यांना देशभक्ती आणि क्रांतिकारी विचारांचा परिचय होता. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच झाले, जिथे त्यांना भारताचा समृद्ध इतिहास आणि संस्कृती, तसेच ब्रिटीश राजवटीने केलेल्या अन्यायाविषयी शिकवले गेले.

लायलपूर जिल्ह्यातील बंगा गावात ही घटना घडली आहे.भगतसिंह यांची जन्मतारीख २८ सप्टेंबर १९०७ आहे. आणि त्याच दिवशी त्या महापुरुष भगतसिंह यांची जयंतीही साजरी केली जाते. जिथे भगतसिंह यांचे कुटुंब राहत होते. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीत ती जागा आता पाकिस्तानात आहे. पण त्यांचे मूळ गाव खटकर काळा आहे. ते गाव आजही पंजाब राज्यात आहे. भगतसिंह पाच वर्षांचे असताना त्यांचा खेळही लहानपणी अनोखा होता.

तो आपल्या मित्रांसोबत खेळायचा. मग ते दोन गट बनवायचे. आणि तो त्याच्यासमोर भांडायचा, असे खेळ तो लहानपणी खेळायचा. जालियनवाला बाग हत्याकांडानंतर त्यांचे जीवन बरेच बदलले, त्यांनी लाहोरमधून ताबडतोब शिक्षण सोडले आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी नौजवान भारत सभेची स्थापना केली.

भगतसिंग यांचे शिक्षण

भगतसिंग यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातील स्थानिक प्राथमिक शाळेत झाले. तो एक हुशार आणि जिज्ञासू मुलगा होता, त्याच्या कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी आणि साहित्य आणि पुस्तकांमध्ये रस म्हणून ओळखला जातो. नंतर त्यांनी D.A.V मध्ये प्रवेश घेतला. लाहोरमधील हायस्कूल, जिथे त्यांनी शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्ट कामगिरी केली.

भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद हातमिळवणी

भारतीयांवर इंग्रजांचे अत्याचार वाढत होते. त्यावेळी देशात हिंसक घटना जन्म घेत होत्या. त्याचवेळी काकोरी घटनेत चंद्रशेखर आझाद यांचा पक्ष “हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन” चे रामप्रसाद बिस्मिल यांच्यासह चार क्रांतिकारकांना फाशीची तर १६ जणांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली, ज्यामुळे भगतसिंगांना मोठा धक्का बसला.

या घटनेमुळे ते इतके अस्वस्थ झाले की, त्यांनी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाची योजना आखली होती. त्यानंतर सप्टेंबर १९२८ मध्ये दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर गुप्त बैठक झाली. ज्यामध्ये भगतसिंगांच्या नौजवान भारत सभेचे सर्व सदस्य “हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन”मध्ये विलीन झाले.

भगतसिंग

आणि बराच विचार करून, सर्वांच्या संमतीने पक्षाचे नाव “हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (HARA)” असे ठेवण्यात आले. “हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन (एचएसआरए)” हा एक मूलभूत पक्ष होता ज्यात लाला लजपतराय हे भारताच्या स्वातंत्र्याचे नायकही होते. तसेच भगतसिंग यांच्या प्रभावानेच आझाद यांच्या काही ब्राह्मणवादी प्रतिबंधांना मागे टाकले होते ज्यात ते मोठे झाले होते. आणि हे आझाद होते, ज्यांच्यावर भगत यांनी अनेक प्रसंगी त्यांच्या सहकारी क्रांतिकारकांचे प्राण वाचवणाऱ्या संघटनात्मक कृतींच्या अनुभवासाठी अवलंबून होते.

भगतसिंग यांचे कार्य

नौजवान भारत सभेची स्थापना

भगतसिंग यांनी वयाच्या १८ व्या वर्षी तरुणांना संघटित करून त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी १९२६ ला ‘नौजवान भारत सभा’ नावाची संघटना स्थाप केली. हि संघटना स्थापन करण्यात सुखदेव, भगवतीचरण आणि यशपाल यांनी मदत केली. या सभेचे पहिले अध्यक्ष म्हणून रामकिसन (नंतर पंजाबचे मुख्यमंत्री बनले) तर जनरल सेक्रेटरी म्हणून भगतसिंग यांची निवड करण्यात आली. ही क्रांतिकारी संघटना क्रांतिकारी आदर्शांना चालना देण्यासाठी, तरुणांमध्ये राजकीय चेतना वाढवण्यासाठी आणि वसाहतवादी दडपशाहीविरुद्ध लढण्यासाठी समर्पित होती. तरुणांना संघटित करण्यात आणि क्रांतिकारी उपक्रमांसाठी व्यासपीठ निर्माण करण्यात संस्थेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

क्रांतिकारी कार्यात सहभाग

दडपशाही सार्वजनिक सुरक्षा विधेयक आणि व्यापार विवाद कायद्याचा निषेध करण्यासाठी 1929 मध्ये दिल्लीतील केंद्रीय विधानसभेत घातक नसलेल्या बॉम्ब फेकण्यासारख्या निषेधाच्या कृत्यांमध्ये त्यांचा सहभाग होता. या कृतींचा उद्देश ब्रिटीश राजवटीचे शोषणात्मक स्वरूप उघडकीस आणणे आणि जनतेला स्वातंत्र्याच्या गरजेबद्दल जागृत करणे हे होते. भगतसिंग यांनी ब्रिटीश राजवटीला आव्हान देण्याच्या उद्देशाने क्रांतिकारी कार्यात सक्रिय सहभाग घेतला.

क्रांतिकारी साहित्याचे प्रकाशन

भगतसिंग हे एक उत्सुक लेखक होते आणि त्यांनी क्रांतिकारी साहित्यात योगदान दिले. त्यांनी अनेक लेख आणि पत्रके लिहिली ज्यात औपनिवेशिक राजवटीच्या अन्यायांवर प्रकाश टाकला, ब्रिटीश सरकार उलथून टाकण्याची मागणी केली आणि समाजवादी तत्त्वांचा पुरस्कार केला. “मी नास्तिक का आहे” या त्यांच्या प्रसिद्ध निबंधासह त्यांचे लेखन क्रांतिकारक कल्पनांचा प्रसार आणि समर्थन एकत्रित करण्यासाठी शक्तिशाली साधन म्हणून काम करते.

लाहोर कट प्रकरणात भूमिका

भगतसिंग यांनी लाहोर षडयंत्र खटल्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली, जी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात प्रमुख खटल्यांपैकी एक होती. त्याचे सहकारी सुखदेव थापर आणि शिवराम राजगुरु यांच्या सोबतच त्याच्यावर ब्रिटीश पोलीस अधिकारी जॉन सॉंडर्स यांच्या हत्येचा आरोप होता. या चाचणीने व्यापक लक्ष वेधले आणि ते वसाहती राजवटीविरुद्धच्या प्रतिकाराचे प्रतीक बनले.

कारागृहात उपोषण

तुरुंगात असताना, भगतसिंग यांनी राजकीय कैद्यांना चांगले उपचार मिळावेत, चांगली वागणूक मिळावी या मागणीसाठी आपल्या सहकारी क्रांतिकारकांसह उपोषण सुरू केले. उपोषणाने राजकीय कैद्यांच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले आणि त्यांच्या कारणाविषयी भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जागरुकता निर्माण केली.

तरुणाईवर प्रभाव

भगतसिंग यांचे विचार आणि बलिदान आजही देशभरातील युवा चळवळी आणि कार्यकर्त्यांमध्ये गुंजत आहे. भगतसिंग यांच्या क्रांतिकारी कृतींचा आणि विचारसरणीचा भारतातील तरुणांवर खोलवर परिणाम झाला. ते तरुण क्रांतिकारकांसाठी एक प्रतीक बनले, त्यांना स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील होण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा दिली.

जालियनवाला बाग हत्याकांड

भगतसिंग यांच्या मनात इंग्रजांविरुद्ध खूप द्वेष असल्यामुळे, त्यांनी इंग्रजी शाळेमध्ये शिकण्यास नकार दिला. व राष्ट्रीय डी.ए.व्ही. शाळेमध्ये शिक्षण घेण्यास सुरुवात केली. ही शाळा लाहोर मध्ये होती. १९१६ रोजी भगतसिंग यांची भेट लाला लजपत राय व राजबिहारी बोस तेव्हा पंजाब राजकीय दृष्ट्या खूपच आक्रमक होते.

ज्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड घडले, तेव्हा भगतसिंग फक्त बारा वर्षाचे होते. जालियन बागेमध्ये इंग्रजांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी, तमाम लोक जमले होते. त्या लोकांवरती ब्रिटिश सरकारचे जनरल मेजर डायर यांनी त्यांच्या सैनिकांना गोळीबार करण्याचा आदेश दिला, या झालेल्या गोळीबारामध्ये तिथे जमलेल्या लोकांपैकी हजारो लोकांचा जीव गेला.

जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये, लहान मुलांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये समावेश होता. या हत्याकांडामुळे भगतसिंग यांच्या मनावर खूप खोल परिणाम झाला. व ब्रिटिश सरकार विरोधात त्यांच्या मनामध्ये द्वेष भावना निर्माण झाली. १९१६ मध्ये झालेल्या जालियनवाला भाग हत्याकांड नंतर, भगतसिंग हे हत्याकांडच्या दुसऱ्याच दिवशी जालियनवाला बाग मध्ये गेले, व तेथून रक्ताने माखलेली माती स्वतः सोबत घरी घेऊन आले. व मातीवर हात ठेवून भगतसिंग यांनी ब्रिटिश सरकारला भारत देशातून घालवण्याची शपथ घेतली. व आपले संपूर्ण जीवन देशाच्या समर्पणात घालवण्याचे त्यांनी ठरविले.

भगतसिंग

भगतसिंग आणि स्वातंत्र्यलढा

ब्रिटिशांनी केलेल्या जालियनवाला बाग हत्याकांडामुळे, भगतसिंग यांच्या मनामध्ये मोठा परिणाम झाला होता. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी गुरुद्वारात नानका साहेब येथे असंख्य लोकांना ठार मारण्याविरुद्धच्या, आंदोलनामध्ये भगतसिंग सामील झाले. १९२१ मध्ये ज्यावेळी महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकार विरुद्ध असहकार चळवळीस सुरुवात केली, तेव्हा भगतसिंग यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे शिक्षण अपूर्ण सोडून, असहकार चळवळीमध्ये भाग दर्शवला. १९२२ मध्ये गोरखपूरच्या चौरी चौरा येथे गांधीजींनी असहकार चळवळ थांबवली.

भगतसिंग यांनी विविध चळवळी, आंदोलने, यामध्ये सक्रियपणे सहभाग दर्शविला. परंतु गांधीजींनी असहकार चळवळ बंद केल्यानंतर, भगतसिंग निराश झाले. व पुन्हा स्वतःचा अभ्यास सुरू ठेवण्यासाठी लाला लजपत राय यांनी स्थापन केलेल्या लाहोर या ठिकाणी राष्ट्रीय शाळेमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.

शाळेमध्ये असताना  भगतसिंग यांना सुखदेव, भगवती चरण वर्मा, इत्यादी क्रांतिकारी मिळाले. व ब्रिटिश सरकारचा अहिंसक पद्धतीने नाही, तर हिंसक पद्धतीने समूळ नाश करावा,अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली.

स्वतःला वैवाहिक जीवनापासून लांब ठेवण्यासाठी, भगतसिंग हे कानपूरला आले. व गणेश शंकर विद्यार्थी नावाच्या क्रांतिकारकाशी त्यांची भेट झाली. त्यांच्याकडून त्यांनी प्रथम क्रांतीचा धडा शिकला. क्रांतिकारक भगतसिंग यांना त्यांच्या आजीची तब्येत खालावली आहे असे समजतात, भगतसिंग परत त्यांच्या घरी परतले, व भगतसिंग यांनी स्वतःहून लाहोरला जाऊन “नवजवान भारत सभा” अशा नावाची एक क्रांतिकारी संस्था स्थापन केली.  

त्यांनी स्वतःच्या गावातून क्रांतिकारक कामे चालूच ठेवली. आपल्या देशाला स्वातंत्र्य देण्यासाठी पंजाब मध्ये त्यांनी स्वातंत्र्यतेचा उपदेश प्रत्येक जनतेला दिला. १९२८ रोजी दिल्लीमध्ये क्रांतिकारकाच्या बैठकीला चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत भगतसिंग यांची भेट झाली, व या दोघांनी मिळून “हिंदुस्तान सोशॅलिस्ट डेमोक्रॅटिक युनियनची” स्थापना केली भारतामध्ये प्रजासत्ताक स्थापित करणे हे या युनियनचे मुख्य उद्दिष्ट होते.

फेब्रुवारी १९२८ मध्ये इंग्लंडच्या एका “सायमन कमिशन” नावाच्या आयोगाने भारतामध्ये, त्यांचा दौरा केला. या सायमन कमिशन आयोगाचा मुख्य उद्देश्य, हा लोकांची स्वायत्तता आणि राजशाही मध्ये त्यांचा सहभाग करून घेणे हा होता. या आयोगामध्ये कोणताही भारतीय सदस्य नव्हता, त्यामुळे या सायमन आयोगाचा विरोध करण्याचा भारतीय आणि निर्णय घेतला. व यासाठी लाहोर मध्ये सायमन कमिशन विरोधात घोषणाबाजी करत असताना लाला लजपतराय यांच्यावर निर्घुणपणे लाठीमार केला गेला, त्यामुळे लाला लजपतराय हे गंभीर जखमी झाले, व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

भगतसिंग यांना ते बघवले नाही, व लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, ब्रिटिश अधिकारी स्कॉटला ठार मारण्याचा त्यांनी निर्णय घेतला, व रागाच्या भरात भगतसिंग यांनी स्कॉटला समजून सहायक अधीक्षकची हत्या केली, व हत्या केल्यामुळे होणाऱ्या फाशीच्या शिक्षेपासून स्वतःला वाचवण्यासाठी भगतसिंग यांना लाहोर सोडावे लागले.

भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशी – Bhagat Singh Death

दिनांक ०८ एप्रिल १९२९ रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोन्ही क्रांतीकारकांनी मिळून केंद्रीय विधानसभेच्या अधिवेशनामध्ये बॉम्ब टाकले. बॉम्बस्फोटामुळे कोणाचेही नुकसान झाले नाही. परंतु, त्या दोघांनी या घटनास्थळावरून पळापळ न करता स्वतःला इंग्रजांच्या स्वाधीन केले. सुनावणीच्या वेळी भगतसिंग यांनी स्वतःचा बचाव करण्यास नकार दिला, भगतसिंग हे दोन वर्ष तुरुंगामध्ये शिक्षा भोगत होते.

तुरुंगामध्ये असतानाच, भगतसिंग यांनी एका लेखाच्या माध्यमाने, स्वतःच्या क्रांतिकारक मतांची मांडणी केली. तुरुंगात असतानाही, त्यांनी त्यांचा अभ्यास सोडला नाही, तो चालूच ठेवला. भगतसिंग यांनी लिहिलेल्या त्यांच्या लेखांमध्ये भांडवलदार हे त्यांचे शत्रू आहेत असे त्यांनी वर्णन केले. तसेच प्रत्येक कामगाराचे शोषण करणारा एखादा भारतीय जरी असला, तरी तो त्यांचा शत्रूच आहे, असे सुद्धा त्यांचे मत त्यांनी त्या लेखात लिहिले होते.

तुरुंगात असताना त्यांनी इंग्रजीमध्ये एक लेख लिहिला होता. त्याचे नाव मी नास्तिक का ? आहे असे होते. तुरुंगात असते वेळी भगतसिंग याने अधिकाऱ्यांनी केलेल्या राजकीय कैद्यावरील भयानक वागणुकीचा निषेध व्हावा म्हणून, ६४ दिवस उपोषण सुद्धा केले, त्यांच्यासोबत यतीन्द्रनाथ दास यांनी सुद्धा हे उपोषण केले व त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दि. ०७ ऑक्टोंबर १९३० रोजी भगतसिंग सुखदेव, राजगुरू, यांना उच्च कोर्टाकडून फाशीची शिक्षा सुनवण्यात आली. व २३ मार्च १९३१ रोजी क्रांतीकारक भगतसिंग यांना फाशी देण्यात आली.

भगतसिंग यांचे हौतात्म्य आणि वारसा

भगतसिंग यांचे कार्य आणि योगदान यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. यामुळे त्यांचा क्रांतिकारी आत्मा, लेखन आणि बलिदान पिढ्यांना प्रेरणा देत आहे. भगतसिंग यांच्या हौतात्म्याने त्यांना राष्ट्रीय नायक आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनवले. आणि यापुढे प्रेरणा देत राहील. एक निर्भय स्वातंत्र्य सेनानी आणि दूरदर्शी नेता म्हणून त्यांचा वारसा भारताच्या इतिहासात खोलवर रुजलेला आहे.

23 मार्च 1931 रोजी भगतसिंग यांच्या फाशीने त्यांना शहीद आणि स्वातंत्र्याच्या लढ्याचे प्रतीक बनवले. त्यांच्या बलिदानाने स्वातंत्र्य चळवळीला चालना दिली. त्याच्या बलिदानाने स्वातंत्र्याच्या शोधात नि:स्वार्थीपणा आणि निर्भयपणाची भावना दर्शविली. त्यांची उत्कट देशभक्ती, आदर्शवादाशी जोडलेली होती.आणि असंख्य लोकांना ब्रिटीश राजवटीविरुद्धच्या लढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली. ते आपल्या पिढीतील तरुणांसाठी एक आदर्श व्यक्ती बनले. त्यांच्या हौतात्म्याचे स्मरण केले जात आहे आणि ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या आहुतीचे स्मरण म्हणून कार्य करते.

भगतसिंग यांच्यावरील पुस्तके

  • मार्टियर ॲज ब्राइड-ग्रूम (इंग्रजी, ईश्वरदयाल गौर)
  • देस मांगता है कुर्बानिया (शिवाजी भोसले)
  • शहीद भगतसिंग – जीवन व कार्य अशोक चौसळकर २००७
  • भगतसिंग : निवडक भाषणे व लेखन, भगतसिंगांवरचे पोवाडे (नॅशनल बुक ट्रस्ट)
  • अमर शहीद भगत सिंह (हिंदी, लेखक : वि़ष्णु प्रभाकर)
  • शहीद भगत सिंह : समग्र वाङ्मय (संपादक – दत्ता देसाई)
  • सरदार भगतसिंग (संजय नहार)
  • मी नास्तिक आहे का ? (मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद चित्रा बेडेकर
  • आम्ही कशासाठी लढत आहोत? मूळ लेखक -भगतसिंग; अनुवाद चित्रा बेडेकर
  • भगतसिंग चरित्र, च. ह. पळणितकर
  • भगतसिंग यांचा अखेरपर्यंतचा प्रवास – भगवान दातार
  • विदाउट फिअर, द ट्रायल ऑफ भगतसिंग इंग्रजी, कुलदीप नय्य
  • Krantiveer Bhagatsingh इंग्रजी, लेखिका – नयनतारा देसाई

भगतसिंग यांच्यावरील चित्रपट – bhagat singh movies

भगतसिंग यांचे जीवन आणि त्यागाचे चित्रण गेल्या काही वर्षांत विविध चित्रपटांमध्ये करण्यात आले आहे. येथे काही उल्लेखनीय चित्रपट आहेत जे भगतसिंगची कथा चित्रित करतात:

शहीद भगत सिंह – हिंदी चित्रपट, १९६३. दिग्दर्शक : के.एन. बन्साल; प्रमुख भूमिका : शम्मी कपूर, शकीला, प्रेमनाथ, आशा सचदेव.

२३ मार्च १९३१ – शहीद (हिंदी चित्रपट, २००२). प्रमुख भूमिका : बाॅबी देवल, सनी देवल; दिग्दर्शक : गुड्डू धानोआ; संगीत : आनंदराज आनंद, सुरिंदर सोधी.

“शहीद” 1965 – एस. राम शर्मा दिग्दर्शित, “शहीद” हा भगतसिंग यांच्यावरील सर्वात प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. यात मनोज कुमार मुख्य भूमिकेत आहेत आणि भगतसिंग यांच्या क्रांतिकारी उपक्रम, त्यांची देशभक्ती आणि त्यांचे अखेरचे हौतात्म्य यांचे चित्रण आहे.

शहीदे आझम (हिंदी चित्रपट, २००२) प्रमुख भूमिका : सोनू सूद

“द लीजेंड ऑफ भगतसिंग” (2002): राजकुमार संतोषी दिग्दर्शित या चरित्रात्मक चित्रपटात अजय देवगण भगत सिंगच्या भूमिकेत आहे. एक क्रांतिकारक म्हणून त्यांचा प्रवास, त्यांची विचारधारा आणि ब्रिटिश दडपशाहीविरुद्धचा त्यांचा संघर्ष यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. चित्रपटाला त्याच्या अभिनयासाठी आणि ऐतिहासिक घटनांच्या चित्रणासाठी समीक्षकांची प्रशंसा मिळाली.

शहीदे आझम भगत सिंह – (हिंदी चित्रपट, १९५४). दिग्दर्शक : जगदीश गौतम; प्रमुख भूमिका : प्रेम अबीद जयराज, स्मृती विश्वास, आशिता मुजुमदार.

गगन दमामा बाज्यो (हिंदी नाटक, लेखक : पीयुष मिश्रा). ह्या नाटकात स्वतः पीयुष मिश्रा भूमिका करत.

“रंग दे बसंती” (2006): केवळ भगतसिंग यांना समर्पित जीवनचरित्रात्मक चित्रपट नसला तरी, राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित “रंग दे बसंती” मध्ये भगतसिंगच्या विचारधारा आणि बलिदानापासून प्रेरणा घेणारे समांतर कथानक समाविष्ट आहे. हे आधुनिक काळातील विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या कथा भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांच्या ऐतिहासिक कथेशी जोडलेले आहे.

या चित्रपटाद्वारे त्यांनी नवीन पिढ्यांना भगतसिंग यांचे जीवन, आदर्श आणि त्यांच्या हौतात्म्याची ओळख करून देण्यात मदत केली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, माहितीपट आणि टीव्ही शो देखील असू शकतात ज्यात भगतसिंगची कथा देखील दर्शविली गेली आहे. या चित्रपटांनी भगतसिंगची कथा लोकप्रिय संस्कृतीत जिवंत ठेवण्यात आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या योगदानाची प्रेक्षकांना आठवण करून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती

भगतसिंग यांचे विचार आणि मते – Bhagat Singh Thoughts & Opinions

  • सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है ज़ोर कितना बाजु-ए-कातिल में है |
  • स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिध्द हक्क आहे.
  • आपण ज्या ध्येयासाठी झगडा देत आहोत त्याबद्दल स्पष्ट आकलन असणे नेहमीच आवश्वक आहे.
  • “निर्दयी टीका आणि स्वतंत्र विचार हे क्रांतिकारक विचारांचे दोन आवश्यक गुण आहेत.”
  • जीवन स्वतःच्या बळावर जगले जाते, दुसऱ्यांच्या खांद्यावर तर फक्त अंतयात्रा जाते.
  • स्वातंत्र्य हा सर्वांचा कधीही नष्ट न होणारा जन्मसिध्द हक्क आहे.
  • ते मला मारू शकतात, पण ते माझ्या कल्पनांना मारू शकत नाहीत.” ते माझ्या शरीराला चिरडून टाकू शकतील, पण ते माझ्या आत्म्याला चिरडू शकणार नाहीत.”
  • “प्रगतीच्या बाजूने उभ्या असलेल्या कोणत्याही माणसाला जुन्या धर्मातील प्रत्येक गोष्टीवर टीका करावी लागते, अविश्वास दाखवावा “क्रांती हा मानवजातीचा अविभाज्य अधिकार आहे. स्वातंत्र्य हा सर्वांचा अविनाशी जन्मसिद्ध हक्क आहे.”लागतो आणि आव्हान द्यावे लागते.”
  • “श्रम हा समाजाचा खरा पालनकर्ता आहे.

भगतसिंग यांच्याविषयी तथ्ये – भगतसिंग माहिती मराठी

  • लहानपणी ज्यावेळी ते आपल्या वडिलांसोबत शेतावर कामासाठी जायचे त्यावेळी ते आपल्या वडिलांना विचारायचे की, आपण जमिनीत बंदूक का वाढवू शकत नाही?
  • भगतसिंग यांनी महाविद्यालयीन काळामध्ये असताना ‘राष्ट्रीय युवा संघटने’ ची स्थापना केली.
  • ज्यावेळी जालियनवाला बाग हत्याकांड झाले त्यावेळी भगतसिंग अवघ्या १२ वर्षांचे होते. या घटनेनमुळे ते कायमचे क्रांतिकारक बनले.
  • महाविद्यालयीन काळात भगतसिंग देखील एक चांगले अभिनेता होते . त्याने अनेक नाटकांमध्ये भाग घेतला. भगतसिंग यांना कुस्तीची आवड होती.
  • भगतसिंग लग्न करायला तयार नव्हते. जेव्हा त्याचे पालक त्यांच्या लग्नाचे नियोजन करीत होते, तेव्हा ते घराबाहेर पडले आणि कानपूरला गेले. “ते म्हणाले की आता आझादी माझी वधू होईल.
  • भगतसिंग यांनी आपला धर्म आणि नियम बाजूला ठेऊन वेश बदलण्यासाठी आपले केस कापले आणि आपली दाढी देखील साफ केली. इंग्रजांना चकमा देण्यासाठी हे करणे आवश्यक होते.
  • भगतसिंग हे एक चांगले लेखकही होते, ते उर्दू आणि पंजाबी भाषेतील बर्‍याच वर्तमानपत्रांसाठी नियमित लिहायचे.
  • हिंदू-मुस्लिम दंगलीमुळे दु: खी होऊन भगतसिंग यांनी आपण नास्तिक असल्याची घोषणा केली.
  • भगतसिंग महात्मा गांधींच्या अहिंसेच्या धोरणांशी सहमत नव्हते. भगतसिंग यांना वाटायचे की, शस्त्रे न घेता स्वातंत्र्य मिळू शकत नाही.
  • भगतसिंग यांनी ‘इन्किलाब जिंदाबाद’ सारख्या घोषणांची सुरुवात केली.
  • देशाचे सरकार भगतसिंग यांना हुतात्मा मानत नाही, तरी स्वातंत्र्यासाठी आपला प्राण अर्पण करणारे भगतसिंग प्रत्येक भारतीयांच्या हृदयात राहतात.
  • भगतसिंग व त्याच्या साथीदारांनी ‘सेंट्रल असेंबली’ ठिकाणी फेकलेले बॉम्ब खालच्या स्तराच्या स्फोटकांनी बनवले होते, कारण त्यांचा हेतू कोणालाही ठार मारण्याचा नव्हता तर त्यांना त्यांचा संदेश द्यायचा होता.
  • भगतसिंग यांना चित्रपट पहाणे आणि रसगुल्ला खाणे फार आवडे . जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते राजगुरू आणि यशपाल म्हणजे त्यांचा जिगरी दोस्त याच्यासोबत चित्रपट बघायला जायचे . चार्ली चॅपलिन यांच्या चित्रपटांची त्यांना फार आवड होती. या गोष्टीमुळे चंद्रशेखर आझाद त्यांच्यावर खूप रागवायचे.
  • भगतसिंग यांचे बूट, घड्याळ आणि शर्ट आजही सुरक्षित आहेत.
  • भगतसिंग व त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली कारण त्यांनी राष्ट्रीय विधानसभेत (सेंट्रल असेंबली) बॉम्ब सोडला.
  • भगतसिंग याला फाशीची शिक्षा सुनावणारे न्यायाधीश जी. सी. हिल्टन होते.
  • त्यांना गोळ्या घालून ठार मारण्यात यावे अशी भगतसिंग यांची शेवटची इच्छा होती. परंतु, ब्रिटीश सरकारनेही त्यांच्या या इच्छेकडे दुर्लक्ष केले.
  • महात्मा गांधींना हवे असते तर भगतसिंग यांना फाशी देण्यापासून थांबवू शकले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही.
  • इंग्रज आदेशानुसार, २४ मार्च १९३१ रोजी सकाळी ८ च्या सुमारास भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात येणार होती. परंतु २३ मार्च १९३१ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास या तिघांना फाशी देण्यात आली. कारण भगतसिंग व इतर क्रांतिकारकांची वाढती लोकप्रियता आणि २४ मार्च रोजी होणाऱ्या संभाव्य बंडखोरीमुळेच इंग्रजांनी भगतसिंग व इतरांना २३ मार्च रोजी फाशी दिली. आणि त्यांचा मृतदेह नातेवाईकांना न देता व्यास नदीच्या काठी रात्रीच जाळण्यात आला.
  • भगतसिंग यांचा मृतदेह एकदा नव्हे तर दोनदा जाळण्यात आले.

प्रश्न

भगतसिंग कोण होते?

भगतसिंग हे एक प्रमुख भारतीय क्रांतिकारक होते ज्यांनी 20 व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटीश राजवटीपासून भारताच्या स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भगतसिंग यांचा जन्म कधी झाला?

भगतसिंग यांचा जन्म 28 सप्टेंबर 1907 रोजी बांगा, पंजाब येथे झाला, जो आता पाकिस्तानात आहे.

भगतसिंग यांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान काय होते?

भगतसिंग 1929 मध्ये प्रसिद्ध सेंट्रल असेंब्ली बॉम्बस्फोट आणि ब्रिटीश पोलीस अधिकारी जेम्स ए. सॉन्डर्स यांना फाशी देण्यासह विविध क्रांतिकारी कार्यांमध्ये सक्रियपणे सहभागी होते. त्यांनी अनेक भारतीय तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सामील होण्याची प्रेरणा दिली.

भगतसिंग यांना भारतात राष्ट्रीय नायक का मानले जाते?

भगतसिंग हे त्यांच्या निर्भयता, बलिदान आणि भारतीय स्वातंत्र्यासाठीच्या अतुलनीय बांधिलकीमुळे भारतात राष्ट्रीय नायक म्हणून पूज्य आहेत. ते देशासाठी शौर्य आणि हौतात्म्याचे प्रतीक बनले.

भगतसिंग यांच्या आयुष्यात लाहोर कट प्रकरणाचे महत्त्व काय आहे?

लाहोर षडयंत्र प्रकरण हा भगतसिंग यांच्या जीवनातील एक महत्त्वाचा क्षण होता, जिथे त्यांच्यावर आणि त्यांच्या साथीदारांवर सॉंडर्सच्या हत्येचा आरोप ठेवण्यात आला होता. खटल्यादरम्यान, भगतसिंग यांनी त्यांच्या कृती आणि आदर्शांचे रक्षण करण्यासाठी जोरदार विधाने केली.

भगतसिंग यांच्या समाजवादी समजुती काय होत्या?

भगतसिंग यांच्यावर समाजवादी आणि मार्क्सवादी विचारसरणीचा प्रभाव होता. समतापूर्ण समाजाची गरज, कामगार वर्गाचे उत्थान आणि संपत्तीचे पुनर्वितरण यावर त्यांचा विश्वास होता.

भगतसिंगांचा महात्मा गांधींप्रमाणे अहिंसेवर विश्वास होता का?

भगतसिंग यांनी महात्मा गांधींचे कौतुक केले, परंतु स्वातंत्र्य मिळवण्याचे एकमेव साधन म्हणून अहिंसेच्या त्यांच्या विचारसरणीशी ते असहमत होते. भगतसिंग यांना जुलमी शासकांविरुद्ध शक्ती वापरण्याची गरज होती यावर विश्वास होता.

भगतसिंग यांच्या जीवनाचा अंत कसा झाला?

राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह भगतसिंग यांना २३ मार्च १९३१ रोजी लाहोर सेंट्रल जेलमध्ये फाशी देण्यात आली. त्यांच्या फाशीमुळे व्यापक संताप पसरला आणि स्वातंत्र्यलढ्याला आणखी तीव्रता आली.

शहीद भगतसिंग यांच्या ‘इन्कलाब झिंदाबाद’ या घोषणेचे महत्त्व काय?

भगतसिंग यांची “इन्कलाब झिंदाबाद” (“क्रांती चिरंजीव हो”) ही घोषणा स्वातंत्र्य चळवळीची रॅली बनली आणि असंख्य लोकांना ब्रिटीशांच्या दडपशाहीविरुद्ध उभे राहण्यास प्रेरित केले.

आज शहीद भगतसिंग यांची आठवण कशी केली जाते?

भगतसिंग यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक शूर शहीद आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून स्मरण केले जाते. शहीद दिनी त्यांच्या बलिदानाचे स्मरण केले जाते आणि त्यांचा वारसा न्याय आणि स्वातंत्र्यासाठी लढण्यासाठी पिढ्यांना प्रेरणा देत आहे. त्यांची जीवनकथा पुस्तके, चित्रपट आणि कला आणि साहित्याच्या विविध प्रकारांमध्ये अमर झाली आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास क्रांतिकारक शहीद भगतसिंग बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांसोबत सुद्धा नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment