मेरी क्युरी माहिती मराठी Marie Curie Information In Marathi

सामाजिक, राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, असं कोणतं क्षेत्र नाही ज्या ठिकाणी महिलांनी आपलं वर्चस्व गाजवलेले नाही. आजच्या लेखाद्वारे आपण विज्ञान या क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी विज्ञानातील परी मेरी क्युरी यांच्या विषयीची माहिती बघणार आहोत.

मेरीचे आयुष्य म्हणजे समोर यशाचे उंच शिखर, तर कधी मागच्या बाजूला दुःखाची खोल दरी. तरी मेरी यांनी त्यातून शेवटपर्यंत मार्ग काढला.

दोन वेळा विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारी, आपल्या वैयक्तिक जीवनात अनेक संघर्षाने अपमानित होणारी, प्रत्येक ठिकाणी पहिलं असण्याचा मान मिळवणारी, निराशेला आशेची किनार देणारी, दोन मूलद्रव्यांचा शोध लावणारी, विज्ञान निष्ठा.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास मेरी क्युरी यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती शेवट पर्यत वाचा.

मेरी क्युरी माहिती मराठी Marie Curie Information In Marathi

पूर्ण नाव मारिया सालोमिया स्कोडोव्स्का 
जन्म तारीख ७ नोव्हेंबर १८६७ 
जन्म स्थळ वॉर्सा, पोलंड 
ओळख संशोधक
शोध रेडियम व पोलोनियम मूलद्रव्य
वडिलांचे नाव व्लाडीस्लॉ स्क्लॉडोव्स्की
आईचे नाव ब्रोनिस्लाव्हा 
व्यवसाय शास्त्रज्ञ 
शिक्षण M.A, Ph.D 
पतीचे नावपेयर क्युरी
मुले जॉलियट क्युरी इरन्स, इव्ह क्युरी
आदर नोबेल पारितोषिक
मृत्यू ४ जुलै १९३४

मेरी क्युरी जन्म, शिक्षण, कौटुंबिक माहिती व प्रारंभिक जीवन  

वैज्ञानिक मॅडम मेरी यांचा जन्म दिनांक दि. ०७ नोव्हेंबर १८६७ मध्ये पोलंड मधील वॉर्सा या ठिकाणी झाला. मॅडम क्युरी यांचे मूळ नाव मान्या स्कलोडोवस्का असे होते. मेरी यांचे बालपण अतिशय हलाखीचे व गरिबी मध्ये गेले.

हे वाचा –

त्यांना शिक्षण घेत असताना, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अडचणी उद्भवल्या. क्युरी या दहा वर्षाच्या असताना, त्यांच्या आईचे क्षयरोगाच्या विकाराने निधन झाले. लहानपणापासूनच मेरी यांची स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती.

Marie Curie Information In Marathi

वॉर्सा येथील हायस्कूलमध्ये आणि रशिया येथील लाइसी येथील शाळेमधून मेरी आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. वयाच्या अवघ्या १७ वर्षी मेरी यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. पॅरिस येथील विद्यापीठातून १८९४ साली पद्व्युतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर, मेरी प्रथम आल्या.

पुढील वर्षी गणिताची परीक्षा क्युरीने दिली व त्यामध्ये त्या दुसऱ्या आल्या. तिचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे प्राध्यापक तर आई एका खाजगी मुलींच्या शाळेत मुख्याध्यापिका होती. लहान वयात मेरी शाळेत जरी हुशार असतील तरी काहीशी भित्री शांत, पण आपल्या भावंडांची काळजी करणारी होती.

वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी तिन्ही शाळेत गोल्ड मेडल ही जिंकलं होतं, त्यावेळेस पोलंड मधील वातावरण फार काही चांगलं नव्हतं, कारण पोलंड रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली होते. लहान वयातच तिला आई-वडिलांकडून दया, कामातील तत्परता, आत्मनिरीक्षण, तंतोतंतपणा, या गोष्टी अवगत झाल्या.

असे जरी असले तरी तिचे एकंदरीत आयुष्य काही नाट्यमय शोकांतिक घटनेने भरलेलं होतं. त्याचं कारण ती फक्त ९ वर्षांची असताना, तिची मोठी बहीण मरण पावली तर तिच्यावर उत्तम संस्कार, प्रेम करणारी तिची आई तिला कधीही मायेने जवळ करत नसण्याची तिला कायम खंत वाटत असे.

पण नंतर तिची आई मेल्यानंतर, तिला हे समजलं की तिच्या आईला क्षय आजार होता, त्यामुळे ती मुलांना काळजीपोटी जवळ करत नसे. त्यातून ती स्वतःला सावरत असे.

तिचे वडील रशियन झारच्या अन्यायाविरुद्ध बोलल्यामुळे आणि गुंतवणुकीत असत असल्याने आर्थिकदृष्ट्या फारच दुर्बल झाले. त्यातूनही सावरून तिन्ही शिकवणी चालू केली आणि कुटुंबासाठी पैसे कमावू लागली, तर कोणालाही न सांगता पोलंड मध्ये वनस्पतीशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांना प्रवेश घेतला.

त्याचबरोबर तिच्या एका नातेवाईकाची केमिकल लायब्ररी होती, त्या ठिकाणी तिने केमिस्ट्री प्रशिक्षण घेतलं. तिथेच तिला संशोधनाची आवड निर्माण झाली. आता ती पहिल्यापेक्षा अधिक प्रमाणात शिक्षणाकडे ओढल्या गेल्यामुळे, तिला आणि तिच्या दुसऱ्या मोठ्या बहिणीला म्हणजे ब्रोनीला उच्च शिक्षण घ्यायचं होतं.

पण तिथल्या युनिव्हर्सिटी मध्ये मुलींना उच्च शिक्षण घेण्यास परवानगी नव्हती. मग त्या दोघी बहिणीने ठरवलं की, परदेशात जाऊन घ्यायचं पण पुन्हा समोर आर्थिक प्रश्न होता. त्या दोघा बहिणीनी एक सामंजस्य करार केला.

तो असा की, पहिल्यांदा मोठ्या बहिणीने परदेशी जाऊन शिक्षण घ्यायचं आणि मेरी यांनी येथे मायदेशात राहून गव्हर्नर म्हणून काम करायचं आणि मिळतील ते पैसे बहिणीला पाठवायचे.

ठरल्याप्रमाणे आपल्या बहिणीला त्या पॅरिसला पैसे पाठवत होत्या, त्याच दरम्यान गव्हर्नर काम करताना मेरी तिथल्या मालकाच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि परत जे व्हायचं ते झालं, त्यांचे प्रेम तेथील व्यवस्थेला मान्य नव्हतं.

त्यातून मेरीला कामावरून काढून टाकण्यात आलं आणि पुन्हा एकदा हाती निराशा आली. पण तोपर्यंत ब्रोनीचं पॅरिसमधील शिक्षण पूर्ण झालं होतं. करारा नुसार पुढील शिक्षण मारियाच म्हणजेच मेरीचे होते, १८९१ मध्ये मारिया सोर्व्हंट पॅरिसला गेली, तिथे महान व्याख्यांकारकांची व्याख्याने एकदा आली. काही नवीन गोष्टी शिकता आल्या, त्या ठिकाणी तिची काही भौतिक शास्त्रज्ञांसोबत ओळख देखील झाली.

त्या विद्यापीठात गेल्यावर मारियाने आपलं नाव मेरी असे रजिस्टर केलं आणि मारियाची मेरी क्युरी झाली. सुरुवातीला काही काळ तिच्या बहिणीकडे राहिली, नंतर मुलींच्या वसती गृहात काम करणाऱ्या स्त्रियां बरोबर वसतिगृहाच्या व्हरांड्यात झोपून, त्या ठिकाणी ती स्वतःची उपजीविका ब्रेड बटर खाऊन करत असे. हे सगळं घडल तरी तिच्या कामावर काहीही फरक पडत नव्हता.

मेरी क्युरी वैयक्तिक जीवन

१८९३ साली ती ग्रॅज्युएट होऊन पुन्हा वोर्साला नोकरी शोधू लागली, पण त्यावेळेस युरोपमध्ये यशस्वी असूनही स्त्रियांना योग्य नोकरी मिळत नसे. पुन्हा एकदा तिच्या पदरी निराशा आली त्याच दरम्यान तिला एक शिष्यवृत्ती मिळाली, ती शिष्यवृत्ती परदेशी गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येत असे.

Marie Curie Information In Marathi

ती फेलोशिप घेऊन पुन्हा ती पॅरिसला गेली, तिथे ती मॅग्नेटिझम प्रॉपर्टीज अँड केमिकल कंपोझिशन या विषयावर प्रोफेसर लिफ्टमन बरोबर काम करू लागली. पण काही प्रयोग करण्यासाठी तिला प्रयोग शाळेची गरज होती, मग लिफ्टमन यांची भेट फ्रेंच भौतिक शास्त्रज्ञ पेयर यांच्याबरोबर करून दिली.

पेयर खूपच हुशार आणि श्रीमंत होता. पेयर क्रिस्टीयालोग्राफी वर काम करत होता. त्याने पायझो  इलेक्ट्रिक इफेक्टचा हि शोध लावला होता. मेरी आणि पेयर दोघेही एकमेकांसोबत बोलण्यात खूप वेळ घालवत असे आणि दोघांमध्ये काही वैचारिक साम्य देखील होते. १८९५ साली दोघांनी लग्न केलं.

मेरी क्युरी संशोधानात्मक कारकीर्द  

१८९५ साली जर्मन शास्त्रज्ञ यांनी शोध लावला होता, त्याच्या कामांमध्ये इलेक्ट्रो मग्नेटिक रेडिएशन काही रसायना मधून विशिष्ट पद्धतीला बाहेर पडत होते, त्या कामाचा मेरीवर खूपच प्रभाव पडला. दरम्यान हेनरी बॅक्कवर्ड युरेनियम मधून काही रेडिएशन कसे बाहेर पडतात, हे बांधलं होतं.

त्यात मेरीची अजूनच उत्सुकता वाढली. मग तिने काही टेस्ट करायचं ठरवल, त्यासाठी तिने पीच ब्लेंड नावाचं मिनरल घेतलं, शास्त्रज्ञांना तिथपर्यंत माहीत होतं कि पीच ब्लेंड मध्ये युरेनियम व ऑक्सिजन हे दोनच घटक आहेत, पण मेरीने सांगितल कि पीच ब्लेंड मधून जेवढे रेडिएशन बाहेर पडतात किंवा एनर्जी बाहेर पडते, तेवढे एका मूलद्रव्यातून बाहेर पडत नाही.

मेरी क्युरी

नंतर तिच्या असं लक्षात आलं की, त्याच्यामध्ये अजून नवीन न शोधलेले मूलद्रव्य असू शकतात, ते काम करण्यासाठी पेयरने आपल हातातलं काम सोडून दिलं आणि मेरीला मदत केली. तिने प्रयोग करायचं ठरवलं आणि सुरुवात केली.

एका मोठ्या भांड्यामध्ये पीच ब्लेंड घेऊन ते उकळवल आणि त्याची बारीक पावडर केली. त्यामध्ये काही रसायन घातली, नंतर त्यातून काही मूलद्रव्य वेगळे होतात का ? याचा अभ्यास करू लागली.

प्रत्येक दिवशी सकाळी ती प्रयोगशाळेत त्या भांड्यांमध्ये मोठ्या लोखंडी रोडच्या सहाय्याने काही रसायन टाकत असेल आणि मिसळत असे, खूप अथक परिश्रमानंतर तिला एक मूलद्रव्य सापडून ते मूलद्रव्य बाकीच्या मूलद्रव्यांपेक्षा चारशे पटीने अधिक रेडीओ ॲक्टिव्ह होते.

आता या मूलद्रव्यांना नाव काय द्यायचं ? हा प्रश्न तिच्या समोर आला, पण विज्ञान निष्ठ आणि देशभक्त असलेल्या मेरीने त्या मूलद्रव्याला स्वतःचं नाव न देता, तिने आपल्या देशाच्या नावावर पोलंड वरून पोलोनियम असं नाव दिल.

तिने आपलं काम तसंच चालू ठेवलं. पुढील काही वर्षात तिने अजून एका मूलद्रव्याचा शोध लावला. आणि त्या मूलद्रव्याला रेडियम असं नाव दिलं. रेडियम पोलोनियम पेक्षा ९०० पट जास्त रेडिओ ॲक्टिव्ह होता. नंतर मग रेडिओ ॲक्टिव्ह हि संकल्पना जास्त प्रचलित झाली. खरंतर रेडियम शोधण्यासाठी तिला खूप वेळ खर्च करावा लागला होता.

त्याच्यात एक गंमत पण झाली. एके दिवशी ती रात्रीच्या वेळेस प्रयोगशाळेत गेली असता, काचेच्या भांड्याचे रूप तिला तेजस्वी पाहायला मिळालं, आणि ती चमकलीच, कारण ति चकाकी होती रेडियम मूलद्रव्याची असे तिच्या लक्षात आलं.

रेडियम किंवा पोलोनियम खूप ऊर्जा किंवा रेडिएशन देत होते. इतर संशोधका पेक्षा मेरीच मत काहीस वेगळ होत. ती सांगत होती, ऊर्जा ही कोणत्याही पदार्थाच्या पृष्ठभागावर बाहेर न पडता ती अणुच्या आतून तयार होते, हा तिचा शोध पुढे जाऊन अणुच्या अभ्यासासाठी खूप उपयुक्त ठरणार होता.

मेरी क्युरी सन्मान व पुरस्कार

मेरीच्या संशोधनाच्या योगदानामुळे तिला  १९०३ मध्ये डॉक्टर रेट ही पदवी मिळाली. तिथेही तिला पहिला असण्याचा मान मिळाला. कारण सायन्स मध्ये डॉक्टर रेट मिळवणारी ती पहिली महिला वैज्ञानिक ठरली.

मेरी क्युरी नोबेल

त्याच वर्षी मेरीला पेयर आणि अजून एका संशोधकासोबत रेडिओ ॲक्टिव्हिटीसाठी नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. पुन्हा तेच गुणवत्ता असूनही ते वाटायला नाकारले. पण, ती महिला शास्त्रज्ञ असल्याची अडचण. इतर शास्त्रज्ञांना नाही तोपर्यंत महिला शास्त्रज्ञ असल्याचे रुचत नव्हते.

नोबेल समितीने पेयर आणी बेक्केरेल या दोघांचीही नाव पुढे समितीला समजावून सांगितलं, की हे मूळ नाव मेरीचे आहे. आजारपणामुळे मेरी आणि पेयर पुरस्कार घ्यायला गेले नाही. नोबेलची मिळालेली रक्कम पोलंड मधील गरीब लोकांना दान केली.

युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस मध्ये पेयरची प्रोफेसर म्हणून निवड झाली. त्याच वेळेस मेरी सुद्धा चीफ असिस्टंट म्हणून काम करू लागली. पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात भयंकर घटना घडली, १९०६  मध्ये रहदारीच्या रस्त्यावरून फिरत असताना, तिचा नवरा गाडीने उडवला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

वयाच्या अवघा ३९ व्या वर्षी पेयर आपल्या वैज्ञानिक कामातील आणि आयुष्यातील जोडीदाराला सोडून गेला. त्या दुःखातून सावरण्यासाठी मेरी पुन्हा आपल्या दोन मुलींना सांभाळण्यासाठी विज्ञानाच्या कामात व्यस्त झाली.

१९०६ साली युनिव्हर्सिटी मध्ये महिला प्रोफेसर म्हणून रुजू झाली. हे त्यावेळी पहिल्यांदाच घडत होते. १९०९ मध्ये पॅरिस मध्ये रेडियम इंस्टीटूट नावाची संस्था सुरु झाली. त्यातील एका प्रयोग शाळेची संस्थापक होती.

१९११ ला ब्रुसेलला झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेतील तिला हजेरी लावण्याचा मान मिळाला होता. त्या परिषदेमध्ये ती एकटीच महिला शास्त्रज्ञ होती. बाकीचे रुदरफोर्ड, मॅक्स प्लान, आईन्स्टाईन असे सगळे पुरुष शास्त्रज्ञ उपस्थित होते.

१९११ ला पुन्हा तिला नोबेल पारितोषिक देण्यात आले. ते तिच्या रसायनशास्त्राच्या कामासाठी. आयुष्य म्हणजे समोर यशाचे उंच शिखर तर कधी मागच्या बाजूला दुःखाची खोल दरी. तरी ती त्यातून शेवटपर्यंत मार्ग काढत राहिली.

तिला वॉर्सो पोलंड मधून संशोधन करण्यासाठी काही आमंत्रण मिळाली, पण तिने इन्स्टिट्यूटला काम करण्याच ठरवलं. पहिल्या महायुद्धात तिने मोबाईल रेडिओग्राम आणि जखमी सैनिकांवर उपचार देखील केले. यासाठी तिने काही डॉक्टरांना त्या कामात प्रशिक्षण दिलं.

मेरी क्युरी हिचा मृत्यू  

१९१८ मध्ये पोलंड देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं, तेव्हा मेरी वॉर्सो मध्ये रेडिओ इन्स्टिट्यूट ची सक्रिय सहभागी झाली. त्यात तीचे काम हे कॅन्सर पेशंट वर उपचार करणं होते. मेरीला दोन मुली होत्या, मोठी इरीन तर लहान इवा. मुलगी इरीन, व जावई फेडरिक ज्युलीयट यांना आर्टिफिशियल रेडियो ऍक्टिव्हिटी या शोधाबद्दल १९३४ सालचे नोबेल पारितोषिक देण्यात आलं.

पण ते पाहायला खरंतर मेरी नव्हती. ज्यावेळेस मेरी रेडियो ऍक्टिव्हिटी वर काम करत होती, त्यावेळेस त्याचे दुष्परिणाम कोणालाच माहीत नव्हते. मेरी बद्दल सांगायचं झाल्यास, मेरी तर या मूलद्रव्यांच्या टेस्ट खिशात घेऊन फिरत असे.

रात्री झोपताना बाजूला कपाटाच्या ड्रॉवरमध्ये देखील ती या टेस्ट ठेवत असे, शेवटी व्हायचं तेच झालं, मेरीला रेडियो ऍक्टिव्हिटीच्या अति वापरामुळे ल्युकेमिया कॅन्सर झाला. त्यात ती मरण पावली.

एवढेच काय तर, मेरी आणि पेयर याने लिहून ठेवलेल्या नोंद वहीवर सुद्धा रेडियो ऍक्टिव्हिटीचा परिणाम झाला. म्हणूनच ही वही लेड बॉक्समध्ये जतन करून ठेवली गेली. दि. ०६ जुलै १९३४ ला मेरी क्युरी यांचा मृत्यू झाला.

मेरी क्युरी वारसा

मेरीने केलेल्या कामाचा उपयोग जगाला मोठ्या प्रमाणात झाला. तिच्या कामाचा उपयोग आज न्युक्लीयर एनर्जी, तसेच कॅन्सरच्या उपचारासाठी करण्यात येतो. तिने ४८३ शोध निबंध प्रसिद्ध केले, तर ३४ विद्यार्थ्यांना डॉक्टरेट दिली.

मेरी युरोप मधील पहिली महिला होती, जिने सायन्स मध्ये डॉक्टरेट मिळवली होती. तिच्या विज्ञान रुपी कर्तुत्वामुळे ती मृत्यू नंतरही नावाने जिवंत राहिली. रेडियम इन्स्टिट्यूट पॅरिसचे नाव बदलून, इन्स्टिट्यूट करण्यात आलं. तिचा रसायनशास्त्राच्या नोबेल पुरस्काराला १०० वर्षे झाली, म्हणून २०११  हे वर्ष इंटरनॅशनल इयर ऑफ केमिस्ट्री म्हणून साजरा केला.

जेव्हा १९८४ ला एक नवीन मूलद्रव्याचा शोध लावला, तेव्हा त्याचं नाव क्युरी दाम्पत्य सन्मानाचे ठेवण्यात आलं. १९९५ साली फ्रेंच अध्यक्षांच्या विनंतीवरून मेरी आणि पेयरचे काही उरलेले अंश फ्रान्सच्या, राष्ट्रीय स्मारकात दफन करण्यात आले.

नंतरच्या काळात आईन्स्टाईनचे मत तिच्याबद्दल काहीच वेगळं झालं होतं आणि तो असा म्हणाला होता की, मेरी अशी एक व्यक्ती आहे जी कधीही प्रसिद्धीमुळे भ्रष्टाचारी झाली नाही. तिच्यामुळे विज्ञानाची गतीमा बदलेल. मेरीचे योगदान, कर्तृत्व, रेडियम सारखं चमकत राहील, यात शंकाच नाही.

प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून, कार्य करत आहे, असं कुठलं क्षेत्र नाही, ज्या ठिकाणी महिला नाही. आज स्वतःच वर्चस्व गाजवत नाही. बऱ्याच क्षेत्रात महिला तर पुरुषांपेक्षा देखील पुढे निघून गेल्या आहेत.

मेरी क्युरी हिच्याबद्दल १० ओळी

  • मॅडम मेरी यांचा जन्म दिनांक ०७ नोव्हेंबर १८६७ मध्ये पोलंड मधील वॉर्सा या ठिकाणी झाला.
  • मॅडम मेरी यांचे मूळ नाव मान्या स्कलोडोवस्का असे होते. क्युरी यांचे बालपण अतिशय हालाकीचे व गरिबीमध्ये गेले.
  • त्यांना शिक्षण घेत असताना, आर्थिक परिस्थितीमुळे अनेक अडचणी उद्भवल्या. क्युरी या दहा वर्षाच्या असताना त्यांच्या आईचे क्षयरोगाच्या विकाराने निधन झाले.
  • लहानपणापासूनच मेरी यांची स्मरणशक्ती अतिशय तीव्र होती.
  • वॉर्सा येथील हायस्कूलमध्ये आणि रशिया येथील लाइसी येथील शाळेमधून मेरी आणि त्यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
  • वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी मेरी यांनी सुवर्णपदक प्राप्त केले. पॅरिस येथील विद्यापीठातून १८९४ साली पदवीचे शिक्षण पूर्ण केल्या नंतर, मेरी प्रथम आल्या. पुढील वर्षी गणिताची परीक्षा मेरी क्युरी दिली व त्यामध्ये त्या दुसऱ्या आल्या.
  • मेरी यांचे संशोधन व त्याचा मानव जातीसाठी झालेला महत्त्वाचा फायदा अग्रगण्य आहे.
  • इसवी सन १८९६ मध्ये बेक्केरल यांनी पीच ब्लेंड म्हणून बाहेर पडणाऱ्या किरणांचा शोध लावला. त्यास बेक्केरल रेज असे नाव दिले होते, परंतु मॅडम मेरी क्युरी यांनी यावर व्यापक संशोधन करून व उत्सर्जना सारख्या या क्रियेचे नाव किरणोत्सारी रेडिओ ॲक्टिव्हिटी असे ठेवले आणि या किरणांना किरणोत्सारी किरण म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्हिटी रेज असे नाव दिले.
  • जुलै १९९८ मध्ये मेरी आणि पेयर क्युरी यांनी एक मूलद्रव्य शोधल्याचे घोषित केले गेले आणि या मूलद्रव्याचे नाव पोलंडच्या नावावरून पोलेनियम असे ठेवले, परंतु त्यांचा शोध हा इथ पर्यंतच थांबला नाही, त्यांनी त्यांचे प्रयोग सतत चालूच ठेवले आणि स्फटकी करणाच्या प्रक्रियेच्या शेवटी त्यांना नवे द्रव्य रूप असलेल्या रेडियमचे काही स्फटिक सापडले.
  • १९९० मध्ये मेरी यांना विशुद्ध रेडियम वेगळे करण्यात यश आले.
  • शालेय जीवना मध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी मेरी क्युरी यांना सुवर्ण पदक मिळाले होते. त्यानंतर १९३० मध्ये मेरी दाम्पत्याला हेन्री बेक्केरेल यांच्या बरोबर विभागून पदार्थ विज्ञानाचा नोबेल पुरस्कार मिळाला.
  • १९९१ मध्ये त्यांना पुन्हा एकदा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी हा पुरस्कार त्यांना रसायनशास्त्रासाठी देण्यात आला होता.
  • विज्ञानाच्या दोन वेगवेगळ्या शाखांमध्ये पुरस्कार मिळवणाऱ्या मेरी या पहिल्या व एकमेव स्त्री वैज्ञानिक आहेत.

मेरी क्युरी यांचे विचार

  • “कोणीही काय पूर्ण झाले ते बघत नसते, काय अपूर्ण आहे या कडेच सर्वांचे लक्ष असते.”
  • “लोकांबद्दल नाही तर कल्पनांबद्दल उत्सुक रहा.”
  • “मला वाटते, प्रगती हि लवकर आणि सहजा सहजी घडून येत नाही.”
  • “परिपूर्णतेची भीती बाळगू नका, आपण त्या पर्यंत कधीही पोहचू शकत नाही.”
  • “असे काही वैज्ञानिक असतात जे सत्य स्थापित करण्याऐवजी चुका शोधण्याची घाई करतात.”
  • “चांगले जग निर्माण करायचे असेल तर स्वतः पासून सुरुवात करा.”

FAQ

१. मेरी क्युरी यांनी कोणत्या मूलद्रव्याचा शोध लावला?

जुलै १९९८ मध्ये मेरी क्युरी आणि पेयर क्युरी यांनी एक मूलद्रव्य शोधल्याचे घोषित केले गेले आणि या मूलद्रव्याचे नाव पोलंडच्या नावावरून पोलेनियम असे ठेवले, परंतु त्यांचा शोध हा इथ पर्यंतच थांबला नाही, त्यांनी त्यांचे प्रयोग सतत चालूच ठेवले आणि स्फटकी करणाच्या प्रक्रियेच्या शेवटी त्यांना नवे द्रव्य रूप असलेल्या रेडियमचे काही स्फटिक सापडले.

२. मेरीला किती नोबेल पारितोषिक मिळाले?

शालेय जीवना मध्ये वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी मेरी क्युरी यांना सुवर्ण पदक मिळाले होते. त्यानंतर १९३० मध्ये मेरी दाम्पत्याला हेन्री बेक्केरेल यांच्या बरोबर विभागून पदार्थ विज्ञानाचा नोबेल पुरस्कार मिळाला.
१९९१ मध्ये त्यांना पुन्हा एकदा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला. यावेळी हा पुरस्कार त्यांना रसायनशास्त्रासाठी देण्यात आला होता.

३. रेडियम या किरणोत्सर्गी मूलद्रव्याचा शोध कोणी लावला?

इसवी सन १८९६ मध्ये बेक्केरल यांनी पीच ब्लेंड म्हणून बाहेर पडणाऱ्या किरणांचा शोध लावला. त्यास बेक्केरल रेज असे नाव दिले होते, परंतु मॅडम मेरी क्युरी यांनी यावर व्यापक संशोधन करून व उत्सर्जना सारख्या या क्रियेचे नाव किरणोत्सारी रेडिओ ॲक्टिव्हिटी असे ठेवले आणि या किरणांना किरणोत्सारी किरण म्हणजेच रेडिओ ॲक्टिव्हिटी रेज असे नाव दिले.

४. मॅडम क्युरीचे लग्न कधी आणि कोणासोबत झाले?

मेरी आणि पेयर दोघेही एकमेकांसोबत बोलण्यात खूप वेळ घालवत असे आणि दोघांमध्ये काही वैचारिक साम्य देखील होते. १८९५  साली दोघांनी लग्न केलं.

५. मेरी क्युरी यांचा मृत्यू कधी झाला ?

मेरी बद्दल सांगायचं झाल्यास, मेरी तर या मूलद्रव्यांच्या टेस्ट खिशात घेऊन फिरत असे. रात्री झोपताना बाजूला कपाटाच्या ड्रॉवरमध्ये देखील ती या टेस्ट ठेवत असे, शेवटी व्हायचं तेच झालं, मेरीला रेडियो ऍक्टिव्हिटीच्या अति वापरामुळे ल्युकेमिया कॅन्सर झाला. त्यात ती मरण पावली. एवढेच काय तर, मेरी आणि पेयर याने लिहून ठेवलेल्या नोंद वहीवर सुद्धा रेडियो ऍक्टिव्हिटीचा परिणाम झाला. म्हणूनच ही वही लेड बॉक्समध्ये जतन करून ठेवली गेली. दि. ०६ जुलै १९३४ ला मेरी क्युरी यांचा मृत्यू झाला.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास मेरी क्युरी यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment