नीरज चोप्रा माहिती मराठी | Neeraj Chopra Information In Marathi

नीरज चोप्रा भारतातील मौल्यवान खेळरत्नांपैकी एक रत्न आहे. नीरज चोप्रा भारतीय भालाफेकपटू असून, ०७ ऑगस्ट २०२१ पर्यंत नीरज चोप्रा याने पूर्ण जगभरात सहा सुवर्णपदके स्वतःच्या नावावर केली आहे.

आजच्या नीरज चोप्रा माहिती मराठी या लेखाद्वारे आम्ही आपणास नीरज चोप्रा यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.

Table of Contents

नीरज चोप्रा माहिती मराठी | Neeraj Chopra Information In Marathi

मूळ नाव नीरज चोप्रा
जन्मतारीख २४ डिसेंबर १९९७
जन्म ठिकाण पानिपत हरियाणा
आईचे नाव सरोज देवी
वडिलांचे नाव सतीश कुमार
कार्यक्षेत्र भालाफेक
शिक्षण पदवीधर
उंची१.८२ मीटर
वजन८६ किलो
वय २३ वर्ष

नीरज चोप्रा यांचा जन्म व बालपण

नीरज चोपडा हा एक भारतीय खेळाडू असून, या खेळाडूचा जन्म २४ डिसेंबर १९९७ रोजी हरियाणा मधील पानिपत खांद्रा या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या घराण्यात झाला. नीरजचे वडील हे शेतकरी आहेत. त्यांचे नाव सतीश चोपडा व आईचे नाव सरोजा देवी.

नीरजची आई ही एक गृहिणी आहे. नीरज चोप्राचे बालपण हे अतिशय गरिबीमध्ये गेले. नीरज लहानपणापासूनच अतिशय जिद्दी व कष्टाळू होता  नीरज त्यांच्या भावंडांपैकी सर्वात मोठा आहे. नीरजला बालपणापासूनच मैदानी खेळ खेळायला फार आवडायचे. अभ्यासामध्ये सुद्धा नीरज अतिशय हुशार होता.

नीरजने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये नीरजने असे सांगितले की, “नीरजचे वंशज हे मराठा घराण्याचे होते. त्यामुळे त्याचे मूळ नाव हे चोपडे आहे. चोपडे हे हरियाणा मधील पानिपत या ठिकाणी रोड मराठा समाजामधून येतात.

रोड मराठा हा तोच समाज आहे, ज्या समाजामध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाल्यानंतर, हरियाणातल्या पानिपत सेनापतीकडचा भागात वस्ती करून राहिला.

नक्की वाचा 👉 रवींद्रनाथ टागोर माहिती मराठी 

नीरज चोप्रा यांचे शिक्षण

नीरज चोप्रा याचे प्राथमिक शिक्षण त्याच्या मूळ गावी म्हणजेच हरियाणा या शहरांमध्ये झाले. नीरजने यानंतर बी.बी.ए. ही ग्रॅज्युएशनची पदवी महाविद्यालय मधून प्राप्त केली.

नीरजचे ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्यानंतर त्याला विविध स्पोर्ट्स मध्ये स्वतःचे करिअर घडवावे असे वाटू लागले. नीरजला लहानपणापासूनच मैदानी खेळाची आवड असल्याकारणाने, त्याचा कल जास्त स्पोर्ट कडे वळला.

Neeraj Chopra Information In Marathi
नीरज चोप्रा माहिती मराठी

वयाच्या अवघात २३ व्या वर्षी नीरजने ऑलिंपिक सामन्यांमध्ये सुवर्णपदक मिळवून, त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये स्वतःचे दृढ स्थान प्राप्त केले.

नीरजकडे उत्तम भालाफेक कौशल्य होते. त्याच्या या उत्तम अश्या  कौशल्यामुळे सोशल मीडियाच्या काळात नीरज हा चाहात्यामध्ये अतिशय प्रसिद्ध झाला.

नक्की वाचा 👉

नीरज चोप्रा यांचे सुरुवातीचे जीवन

नीरज चोप्राचा जन्म हरियाणा पानिपत जिल्ह्यातील खांद्रा गावामध्ये झाला. त्या ठिकाणीच नीरजला लहानपणापासून खेळाची आवड निर्माण झाली. मैदानी खेळ खेळायला नीरजला फार आवडायचे. नीरजने कबड्डी व क्रिकेटस इतर सर्व खेळांमध्ये सहभाग दर्शवला होता.

नीरजच्या शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी तो अगदी लहान वयात असताना त्याचे भालाफेकण्याचे कौशल्य जाणून, त्याला भालाफेक करण्यास प्रोत्साहित केले.

Neeraj Chopra family

नीरजचा जन्म हा अतिशय गरीब घरांना झाला असून, वडील शेतकरी, प्रशिक्षणाची पुरेसे सुविधा उपलब्ध नसतानाही नीरजनी हार न मानता जिद्दीने व चिकाटीने प्रयत्न करत, त्याने त्याच्या खेळाच्या कौशल्यामध्ये सुधारणा घडवून आणली.

लष्करातील अधिकारी नीरज चोप्रा 

  • क्रीडापटू बनण्यापूर्वी नीरज चोप्रा भारतीय लष्करात सुभेदार म्हणून काम करत होते. यामध्ये ते ज्यूनिअर कमिशन ऑफीसर होते, त्यावेळी त्यांचे वय फक्त 19 वर्षे होते. आणि ते अशा वयात राजपूताना रायफल्स चालवत असत.
  • नीरज चोप्राने आपल्या नावावर अनेक विक्रम शिक्कामोर्तब करून इतिहास रचला.
  • नीरज चोप्रा या भारतीयाने तब्बल १३ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले.
  • भारताने पहिल्यांदाच भालाफेकमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले आहे. भारताला याआधी एकही पदक मिळालेले नाही.
  • नीरज हा आता ट्रॅक आणि फील्ड स्पर्धेत ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणारा पहिला भारतीय खेळाडू आहे.
  • भारतासाठी पहिले वैयक्तिक सुवर्णपदक २००८ मध्ये नेमबाजीमध्ये अभिनव बिंद्राने जिंकले होते.
  • दुसऱ्यांदा, नीरज चोप्राने भालाफेकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणारा दुसरा भारतीय बनला.
  • नीरज चोप्राने ८८.१३ -मीटर भाला फेकून २० जुलै २०२२ रोजी, यूजीन, यूएसए येथे रौप्य पदक जिंकले.
Neeraj Chopra
  • नीरज चोप्राने पावो नुर्मी गेम्स २०२२ मध्ये १४ जून २०२२ रोजी, स्वतःचा राष्ट्रीय विक्रम मोडला. या विक्रमात त्याचा ८९.३०  मीटरचा सर्वोत्तम थ्रो दाखवण्यात आला.
  • १२१ वर्षांपूर्वी भारताने अॅथलेटिक्समध्ये पहिले पदक जिंकले होते. नीरज चोप्राने आज ऍथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहासातील आपले स्थान पक्के केले.
  • नीरज चोप्राने जून २०२२ मध्ये फिनलंडमधील सध्याच्या क्वार्टन गेम्समध्ये, विजयी अंतर आणि सुवर्णपदकासाठी ८६.६९ मीटर भालाफेक केली.

नीरज चोप्रा यांची कारकीर्द

  • नीरजला लहानपणापासूनच मैदानी खेळांमध्ये अतिशय आवड होती. तो अवघ्या अकरा वर्षाचा असताना त्याने पहिल्यांदा भालाफेक करण्यास सुरुवात केली. व त्यामुळे त्याच्या मनात भालाफेक खेळाबद्दल रुची वाढू लागली.
  • म्हणून त्याने भालाफेक खेळामध्ये पुढे जाण्याचा निर्णय घेतला. व स्वतःला या खेळामध्ये अतिशय मजबूत बनवण्यासाठी वैयक्तिक मार्गदर्शकाचे मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली.
  • वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजेच २०१४ च्या दरम्याने नीरज चोपडा ने स्वतःला पहिला भाला खरेदी केला. तोही तब्बल सात हजार रुपयाचा. यामुळे नीरजच्या मनामध्ये धाडस व आत्मविश्वास वाढू लागला. नीरजने यानंतर राज्यस्तरावर होणाऱ्या भालाफेक स्पर्धेमध्ये स्वतःचा सक्रिय सहभाग दर्शवला.
नीरज चोप्रा
  • जसजसा तो सामने जिंकत होता, तसे तसे त्याच्या मनामध्ये नॅशनल लेवल पर्यंत जाण्याचा आत्मविश्वास हा अतिशय प्रचंड वाढू लागला.
  • २०१२ मध्ये लखनऊमध्ये सोळा वर्षाखाली असणाऱ्या स्पर्धकांसाठी, “नॅशनल ज्युनिअर चॅम्पियनशिप भालाफेक स्पर्धा” ही आयोजित करण्यात आली. या स्पर्धेच्या दरम्यान नीरजने ६८.४६ मीटर लांबीवर भाला फेकून त्या ठिकाणी सुवर्णपदक प्राप्त केले.
  • यानंतर २०१३ दरम्याने नीरजने नॅशनल चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये सुद्धा स्वतःच सक्रिय सहभाग दर्शवला व या स्पर्धेमध्ये नीरजला दुसरे स्थान प्राप्त झाले.
  • २०१३ च्या दरम्याने नीरजने “IAAF वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिप” स्पर्धेमध्ये सुद्धा सहभाग दर्शवून त्या ठिकाणी पुरस्कार पटकावला.
  • हळूहळू नीरजच्या प्रगतीमध्ये वाढ होत गेली. वर्ष वाढत होती, नीरज त्याच्या भालाफेकच्या स्पर्धेत यश प्राप्त करत होता.
  • परत २०१५ च्या दरम्याने आयोजित झालेल्या “इंटर यूनिवर्सिटी चॅम्पियनशिप” मध्ये नीरजने सहभाग दर्शवून ८१.०४ मीटर लांबीवर भाला फेक करून वयोगटाचा विक्रमच मोडून टाकला.
  • यानंतर २०१६ च्या दरम्याने निरजने पुन्हा “ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिप” मध्ये सहभाग दर्शवला व यामध्ये त्याने ८६.८८ मीटर लांबीवर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले.
  • २०१६ मध्ये नीरज दक्षिण आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये सुद्धा सहभाग घेतला. यानंतर त्याने त्या ठिकाणी सुवर्णपदक मिळवले. नीरजने या स्पर्धेमध्ये ८२.२३ लांबीचा भाला फेकला.
  • गोल्ड कोस्ट मध्ये २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेल्या “राष्ट्रकुल” स्पर्धेमध्ये सुद्धा नीरजने ८६.४७ मीटर एवढ्या लांबीचा भाला फेकून, पुन्हा एकदा सुवर्णपदक स्वतःच्या नावावर केले.
  • या सर्व स्पर्धेमुळे नीरज चोप्रांच्या मनातले आत्मविश्वास हा जागरूक व्हायला लागला.
  • नीरज हा भालाफेक या खेळामध्ये स्वतःचे नाव दिवसेंदिवस उंचीवर घेऊन जात होता, नीरजने केलेल्या कष्टाचे जिद्दीचे व मेहनतीचे फळ नीरजला २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ओलंपिक स्पर्धेमधून मिळाले.
  • नीरज चोप्रा हा आशियामध्ये सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय आहे. एवढेच नव्हे तर एशियन गेम कॉमनवेल्थ मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोपडा हा दुसरा भारतीय खेळाडू आहे.
  • नीरज चोपडाने त्याच्या कारकिर्दीमध्ये आत्तापर्यंत स्वतःच्या मेहनतीने भरपूर पुरस्कार व सुवर्णपदके त्याच्या नावावर ती मिळवली आहेत.

नीरज चोप्रा यांचे प्रशिक्षक

उवे होन हे भारताच्या भालाफेकपटू नीरज चोप्रा यांचे प्रशिक्षक होते, परंतु त्यांनी एकेकाळी सर्वात दूरच्या भाला फेकचा जागतिक विक्रम केला होता. नीरज चोप्राने 2018 च्या कॉमनवेल्थ गेम्स आणि 2018 आशियाई गेम्समध्ये उवे होन यांच्या प्रशिक्षणात सुवर्णपदक जिंकले.

नीरज चोप्रा यांचे करिअर

  • नीरज चोप्रा ने 2014 मध्ये स्वतःसाठी भाला खरेदी केला, ज्याची किंमत ₹7000 होती. यानंतर नीरज चोप्रा ने आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी ₹1,00,000 चा भाला खरेदी केला.
  • भाला फेक खेळाडू नीरज चोप्रा ने वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी भाला फेकण्यास सुरुवात केली. त्याचे प्रशिक्षण आणखी मजबूत करण्यासाठी, नीरज चोप्रा ने 2016 मध्ये एक विक्रम प्राप्त केला, जो त्याच्यासाठी खूप फायदेशीर ठरला.
  • नीरज चोप्राने आपल्या Coach सोबत खूप कठोर प्रशिक्षण सुरू केले आणि त्यानंतर त्याने नवीन विक्रम प्रस्थापित केले.
  • 2017 च्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने 50.23 मीटर अंतरावर भाला फेकून सामना जिंकला होता.
  • त्याच वर्षी त्याने IAAF डायमंड लीग स्पर्धेत भाग घेतला होता, ज्यामध्ये तो सातव्या स्थानावर होता.

नीरज चोप्रा यांचे रिकॉर्ड

  • आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोप्रा हा पहिला भारतीय भालाफेकपटू आहे.
  • एशियन गेम आणि कॉमनवेल्थ गेम मध्ये सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी 1958 मध्ये हा विक्रम मिल्खा सिंगने केला होता.
  • लखनऊ येथे आयोजित 16 वर्षांखालील नेशनल जूनियर चॅम्पियनशिपमध्ये 2012 मध्ये नीरज चोप्राने 68.46 मीटर भाला फेकून सुवर्णपदक मिळवले आहे.
  • दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नीरज चोप्राने 2016 मध्ये 82.23 मीटर थ्रो फेकून सुवर्णपदक जिंकले.
  • नीरज चोप्राने नेशनल यूथ चैंपियनशिप स्पर्धेत, दुसरे स्थान मिळवले होते आणि त्यानंतर त्याने IAAF वर्ल्ड यूथ चैंपियनशिप स्पर्धेतही स्थान मिळवले.
  • इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राने 81.04 मीटर थ्रोसह वयोगटातील विक्रम मोडला. ही स्पर्धा 2015 मध्ये आयोजित करण्यात आली होती.
  • 2016 मध्ये नीरज चोप्राने ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 86.48 मीटर भाला फेकून नवा विक्रम स्थापित केला होता आणि सुवर्णपदक जिंकले होते.
  • गोल्ड कोस्ट येथे 2018 मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत नीरज चोपड़ाने 86.47 मीटर भाला फेकून आणखी एक सुवर्णपदक जिंकले.
  • जकार्ता एशियन गेम मध्ये 2018 मध्येच नीरज चोपड़ाने 88.06 मीटर भाला फेकले आणि सुवर्णपदक जिंकून भारताला गौरव मिळवून दिला.

नीरज चोप्रा यांचे सर्वोत्तम थ्रो

टोकियो ऑलिम्पिकच्या भालाफेक अंतिम सामन्यात नीरजचा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट थ्रो ८७.५८ मीटर होता.

तत्पूर्वी, भालाफेकपटूंमध्ये आपल्या गटात १५ व्या क्रमांकावर असलेल्या नीरज चोप्राने ८६.६५ मीटर फेक करून पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरी गाठली.

पहिल्याच प्रयत्नात आपोआप पात्र ठरलेला दुसरा थ्रोअर फिनलंडचा लस्सी अटेलटालो होता.

नीरज चोप्रा यांचा आंतरराष्ट्रीय सहभाग

  • २०२१ मध्ये झालेल्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा चमकला. नीरज चोप्राने भारताचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा उच्च पातळीवर नेऊन ठेवले. याचे मुख्य कारण म्हणजे नीरज चोप्राच्या माध्यमाने भारताला तब्बल तेरा वर्षानंतर सुवर्णपदक मिळाले होते. यामुळे नीरजची संपूर्ण भारतभर व जगभरामध्ये अगदी मनापासून कौतुक झाले.
  • भारताला तब्बल तेरा वर्षानंतर ऑलिम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोपडा हा पहिला खेळाडू ठरला. नीरज चोपडाचा ऑलिंपिक मधला हा सामना नीरजच्या आयुष्यामधील एक वेगळा टर्निंग पॉईंट होता. नीरजने केलेला हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामना,०७ ऑगस्ट २०२१ ला दुपारी साडेचार वाजता सुरू झाला. या सामन्याच्या दरम्याने नीरजने एकूण सहा फेऱ्यांमध्ये सहभागी दर्शवत सहापैकी दोन फेऱ्यांमध्ये ८७.५८ असा भाला फेकून, सर्वात उच्च विक्रम तोडून आपल्या प्रतिस्पर्धींच्या पुढे जाऊन राहिला व त्यानंतर चार सामन्यांमध्ये नीरज चोपडाचा हा विक्रम कोणीच मोडू शकला नाही.
  • त्यामुळे नीरजला या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक देऊन त्याचा गौरव करण्यात आला. नीरज चोपडाने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून भारताचे नाव पूर्ण जगामध्ये सुवर्ण अक्षराने कोरले. नीरज सध्याचे जागतिक पातळीवर म्हणजेच “वर्ल्ड रॅकिंग जेवलीन थ्रो” मध्ये चौथ्या क्रमांकावर स्थान आहे.
  • नीरज चोपड्याने मिळवलेल्या या त्याच्या यशानंतर त्याच्या बरयाच मुलाखती घेण्यात आल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी नीरजने तब्बल एक लाखाचा भाला खरेदी होता. नीरज चोपडा जर्मनीचे माजी भाला फेकपट्टू उवे होन यांच्या मार्गदर्शनाखाली भालाफेक मार्गदर्शन घेत आहे.

नीरज चोप्रा यांची २०२२ जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धा

नीरज चोप्राने २०२२ मध्ये जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेमध्ये ८८.१३ मीटर पर्यंत भाला फेकून, त्यामध्ये रोप्य पदक पटकावले होते. या स्पर्धेच्या दरम्यान भालाफेक प्रकारात पदक मिळवणारा भारताचा पहिला मानकरी हा नीरज चोपडा ठरला.

या स्पर्धेच्या दरम्यान पदक मिळवणारा भारताचा दुसरा भारतीय म्हणून नीरज चोप्राकडे बघितले जाते. यापूर्वी अंजू बॉबी जॉर्ज हिने २००३ सली लांब उडी मध्ये कांस्यपदक मिळवले होते.

नीरज चोप्रा यांची २०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळ टोकियो

नीरज चोप्राने २०२० साली झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये ०७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर एवढ्या लांबीच्या अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. हे सुवर्णपदक भारतीय खेळाडूंनी जिंकलेले ऍथलेटिक्स मधील सर्वात पहिले ऑलम्पिक सुवर्णपदक आहे.

सध्याच्या काळात वैयक्तिक ऑलम्पिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज चोप्रा हा भारताचा दुसरा मानकरी आहे. याआधी ११ ऑगस्ट २००८ रोजी अभिनव बिंद्राणे २००८ च्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये पुरुषांच्या दहा मीटर रायफल मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.

नीरज चोप्रा यांचा २०१८ राष्ट्रकुल खेळ

२०१८ साली गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया या ठिकाणी झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये ८६.४७ मीटर अंतरावर भाला फेकून नीरज चोप्राने सुवर्णपदक प्राप्त केले.

नीरज चोप्रा यांचा २०१८ आशियाई खेळ

२०१८ साली जकार्ता इंडोनेशिया या ठिकाणी झालेल्या, आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये ८८.०६ मीटर अंतरावर भाला फेकून नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भालाफेक मध्ये सुद्धा सुवर्णपदक मिळवणारा नीरज चोपडा हा पहिला भारतीय ठरला.

या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या वेळी भारतीय पथकाचे ध्वजधारक होण्याचा मान सुद्धा नीरज चोप्राने पटकावला. व त्यांनी आपले सुवर्णपदक भारताचे माजी पंतप्रधान कैलासवासी “अटलबिहारी वाजपेयी” यांना समर्पित केले.

नीरज चोप्रा यांना मिळालेले पुरस्कार

  • २०१६   तीसरा विश्व जूनियर अवार्ड
  • २०१८   एशियन गेम्स चॅम्पियनशिप स्वर्ण गौरव
  • २०१८   अर्जुन पुरस्कार
  • २०२१ मध्ये नीरजला भारत सरकारचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देण्यात आला.
  • २०२२  भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार

नीरज चोप्रा यांना मिळालेली पदक

  • २०१२   राष्ट्रीय जूनियर चैंपियनशिप सुवर्णपदक (Gold Medal)
  • २०१३   राष्ट्रीय युवा चैंपियनशिप रौप्य पदक (Silver Medal)
  • २०१६   एशियाई जूनियर चैंपियनशिप रौप्य पदक (Silver Medal)
  • २०१७   एशियन एथलेटिक्स चैंपियनशिप सुवर्णपदक (Gold Medal)
  • २०२१   टोकियो ऑलिम्पिक २०२० सुवर्णपदक (Gold Medal)

नीरज चोप्राची उपलब्धी

  • २०१८ मध्ये कॉमनवेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक
  • २०१८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक
  • २०१९ मध्ये टोकियो ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक
  • २०१६ मध्ये कनिष्ठ गटात राष्ट्रीय विक्रम केला
  • २०२१ मध्ये वरिष्ठ श्रेणीत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला

नीरज चोप्रा बद्दल भविष्यामधील संभावना

नीरज चोप्रा त्याच्या प्रचंड आत्मविश्वासामुळे, कष्टाळू व मेहनतीमुळे, कर्तुत्वामुळे अतिशय कमी वेळात प्रसिद्ध झाला आहे. सध्या नीरज चोप्रा भारतीय ॲथलेटिक्स मधील सर्वात आश्वासक खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून ओळखला जातो.

नीरजच्या अंगभूत प्रतिभा आणि वचनबद्धतेच्या जोरावर सध्याच्या येणाऱ्या काळात अधिक यशस्वी होण्यासाठी नीरज प्रयत्न करत आहे.

नीरजने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितले की, “तो त्याच्या तंत्राचा सन्मान करण्यासाठी व भालाफेकचा जागतिक विक्रम मोडण्यासाठी वचनबद्ध आहे, तो नेहमी भारताचे नाव उंचावत राहील.” नीरज ॲथलेटिक्स सोबत धर्मादाय प्रयत्नांमध्येही सक्रिय असतो.

२०१९ च्या पुलवामा दुर्घटनेमध्ये शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या कुटुंबीयांना मदत करण्यासाठी नीरजने मोठे आर्थिक योगदान सुद्धा दिले. तसेच त्याने भारताच्या covid-19 च्या काळात सुद्धा आर्थिक योगदान देऊन लोकांचे मन जिंकले.

नीरज चोप्रा बद्दल काही महत्त्वाची तथ्ये

  • नीरज चोप्राने जर्मनी मध्ये असताना उवे होन व प्रसिद्ध भाला प्रशिक्षक वर्नाल डॅनियल्स या दोघांसोबत राहून भालाफेकचे मार्गदर्शन घेतले.
  • मिल्खा सिंग, कृष्णा पानिया, आणि विकास गौडा यांच्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारा नीरज चोप्रा हा भारताचा चौथा खेळाडू आहे.
  • भालाफेक मध्ये उत्तम विक्रम करून सुद्धा, नीरज चोप्रा २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक साठी पात्र ठरू शकला नव्हता.
  • नीरज चोप्राने एका मुलाखतीच्या माध्यमाने असा दावा केला की, त्याने भालाफेकचे प्रारंभिक शिक्षण युट्युब व्हिडिओ बघून घेतले.
  • नीरज चोप्राला मैदानी खेळाचा सराव करायला फार आवडायचा.
  • भालाफेक खेळामध्ये जगामध्ये सध्या चौथ्या क्रमांकावर भारताचा खेळाडू नीरज चोप्रा आहे. या व्यतिरिक्त नीरज चोप्राला इतर विविध पदके देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
  • नीरज चोप्राचे वडील हे शेतकरी असूनही, अतिशय खडतर प्रयत्न करून नीरजने भालाफेक मध्ये स्वतःचे नाव कमावले.
  • प्रसिद्ध भालाफेक खेळाडू नीरज चोप्रा हा अवघ्या २३ व्या वर्षाचा असून त्याने अजूनही लग्न केलेले नाही.
  • नीरज चोप्रा याचे शिक्षण डी.एव्ही कॉलेज चंडीगड येथून पूर्ण झाले.
  • नीरज चोपडा याला भारतामधील सर्वोत्कृष्ट पुरस्कारांपैकी एक देण्यात येणारा पुरस्कार म्हणजे “अर्जुन पुरस्कार” २०१८ देऊन सन्मानित करण्यात आले.

नीरज चोप्रा यांना मिळालेली बक्षिसे

टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज यांनी सुवर्णपदक जिंकल्यानंतर केवळ नीरजलाच आनंद झाला असे नाही, तर संपूर्ण भारतात आनंदाची लाट पसरली.

पंतप्रधान मोदी जी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, आणि विविध राज्यमंत्री तसेच सर्व देशवासीय यांनी नीरजच्या या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. यामुळे त्यांच्यासाठी विविध ठिकाणांहून विविध बक्षिसे जाहीर केली गेली.जी खालीलप्रमाणे –

  • पंजाब सरकारने नीरज चोप्राला देशासाठी सुवर्णपदक जिंकले म्हणून 2 कोटी रुपयांची रोख रक्कम जाहीर केली.
  • ऑलिम्पिक पदक विजेत्यांच्या नावावर पंजाबमधील विविध शाळा आणि रस्त्यांना नावे देण्याचे पंजाब सरकारने ही जाहीर केले.
  • आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझीच्या मालकानेही नीरज यांना एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला.
  • हरियाणा राज्यात राहणाऱ्या नीरजला सरकारी नोकरी, अर्ध्या किंमतीत जमीन आणि  6 कोटी रुपये रोख बक्षीस देण्याचा निर्णय हरियाणा सरकारने घेतला आहे.
  • इंडिगो कंपनीने नीरज यांना 1 वर्षासाठी अमर्यादित मोफत प्रवास सुविधाादेण्याची घोषणा केली.
  • गोरखपूर महानगरपालिकेकडून नीरजला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले. भारतात परतल्यावर, त्याचे भव्य स्वागतही केले.
  • भारतासाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज यांना एक कोटी रुपयांचे रोख बक्षीस वितरित करणार असल्याचेही BCCI ने जाहीर केले.

FAQ

१. कोण आहेत नीरज चोप्रा प्रशिक्षक?

नीरज चोपडा जर्मनीचे माजी भाला फेकपट्टू उवे होन यांच्या मार्गदर्शनाखाली भालाफेक मार्गदर्शन घेत आहे.

२. नीरज चोप्राच्या गावाचं नाव काय?

नीरज चोप्रा याचे गाव हरियाणा मधील पानिपत खांद्रा या ठिकाणी आहे.

३. नीरज चोप्राने कोणते ऑलिम्पिक जिंकले आहे?

२०२० उन्हाळी ऑलिंपिक खेळ टोकियो, २०१८ राष्ट्रकुल खेळ, २०२२ जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धा, २०१८ आशियाई खेळ इत्यादी. ऑलिम्पिक नीरज चोप्राने जिंकले आहे.

४. नीरज चोप्रा सैन्यात आहे का?

नीरज चोप्रा भारतीय सैन्यात सुभेदार पदावर आहे.

५. नीरज चोप्राने भालाफेक कधी सुरू केली?

नीरजला लहानपणापासूनच मैदानी खेळांमध्ये अतिशय आवड होती. तो अवघ्या अकरा वर्षाचा असताना त्याने पहिल्यांदा भालाफेक करण्यास सुरुवात केली. व त्यामुळे त्याच्या मनात भालाफेक खेळाबद्दल रुची वाढू लागली.

६. भारतासाठी ॲथलेटिक्स मध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?

नीरज चोप्राने २०२० साली झालेल्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये ०७ ऑगस्ट २०२१ रोजी ८७.५८ मीटर एवढ्या लांबीच्या अंतरावर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले. हे सुवर्णपदक भारतीय खेळाडूंनी जिंकलेले ॲथलेटिक्स मधील सर्वात पहिले ऑलम्पिक सुवर्णपदक आहे.

७. नीरज चोप्रा कशासाठी ओळखले जातात?

नीरज चोप्रा भारतीय ॲथलेटिक्स मधील सर्वात आश्वासक भालाफेक खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणून ओळखला जातो.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस नीरज चोप्रा माहिती मराठी मध्ये दिली आहे. हा लेख तुम्हला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment