नेल्सन मंडेला माहिती मराठी Nelson Mandela Information In Marathi

नेल्सन मंडेला माहिती मराठी Nelson Mandela Information In Marathi – समाजामध्ये बहुतांश महान व्यक्ती होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने समाजावर स्वतःची एक वेगळी छाप सोडलेली आहे. अशाच एका महान व्यक्तिमत्वाने भारत सरकार द्वारा भारतरत्न सर्वोच्च सन्मान प्राप्त करून समाजामध्ये स्वतःची एक वेगळी छाप सोडली, ते म्हणजे ”नेल्सन मंडेला. संयुक्त राष्ट्रसंघाने नेल्सन यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास नेल्सन यांच्या बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. हा लेख तुम्ही शेवटपर्यंत सविस्तर वाचा.

Table of Contents

नेल्सन मंडेला माहिती मराठी Nelson Mandela Information In Marathi

मूळ नाव नेल्सन रोलिहलाहला मंडेला
जन्मतारीख १८ जुलै १९१८ 
जन्मठिकाण मेवेझो, दक्षिण आफ्रिका
वडिलांचे नाव हेन्री मंडेला
राष्ट्रीयत्वदक्षिण आफ्रिका
शिक्षणलॉ (विटवॉटरसँड विद्यापीठ)
ओळख माजी राष्ट्रपती (दक्षिण आफ्रिका)
पुरस्कारनोबेल शांतता पुरस्कार , भारतरत्न, इतर देश आणि संस्थांकडून २५०+ सन्मान
आंदोलन वर्णभेद चळवळ 
मृत्यू ०५ डिसेंबर २०१३

नेल्सन मंडेला चरित्र

  • नेल्सन संपूर्ण जगात वर्णभेदाच्या विरोधासाठी ओळखले जातात. सर्व कृष्णवर्णीय लोकांच्या हक्काचे समर्थन करण्याचे व त्यांचे संरक्षण करण्यासाठी वर्णभेदाला विरोध करण्यासाठी मंडेलाने मोठे कार्य केले. त्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारून कोणाचेही रक्त न सांडता, न युद्ध करता, देशाला या दुष्कृत्यातून मुक्त केले.
Nelson Mandela Information In Marathi
  • त्यांनी या केलेल्या कृष्णवर्णीय लोकांच्या हक्काच्या समर्थनासाठी त्यांना आयुष्याची सत्तावीस वर्ष तुरुंगामध्ये काढावी लागली. या काळात त्यांनी रॉबिन आयलँड तुरुंगात कोळसा खाण कामगार म्हणून काम केले. १९९० मध्ये श्वेत सरकारशी करार करून, त्यांनी नवीन दक्षिण आफ्रिका निर्माण केल्यावर, त्याचा संघर्ष संपला. अशा रीतीने नेल्सन दक्षिण आफ्रिकेतील लोकशाहीचे पहिले संस्थापक, राष्ट्रीय मुक्तिदाता आणि तारणहार म्हणून संबोधले जातात.
  • ज्याप्रमाणे आपल्या देशात महात्मा गांधींना सन्मानित केले जाते, त्याप्रमाणे दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन यांना “राष्ट्रपिता” मानले जाते. लोकांमध्ये मंडेला यांच्या बद्दल अतिशय प्रेम व आदर आहे. नेल्सन यांच्या स्मरणार्थ संयुक्त राष्ट्राने त्यांचा जन्मदिवस मंडेला “आंतरराष्ट्रीय दिवस” साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या अविश्वसनीय व प्रशंसनीय कार्यासाठी आणि वर्णविरोधी लढ्यात त्यांनी दर्शवलेल्या सक्रिय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
  • भारतामध्ये देखील १९९० मध्ये नेल्सन यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्कार “भारतरत्न” प्रदान करून त्यांना गौरविण्यात आले आहे. भारतरत्न सन्मान प्राप्त करणारे मंडेला पहिले परदेशी आहेत.

नेल्सन मंडेला यांचे सुरुवातीचे जीवन

नेल्सन यांचा जन्म दि. १८ जुलै १९१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या पूर्व केप मधील मेवेझो या ठिकाणी झाला. त्यांच्या आई वडिलांचे नाव हे गेडेला हेन्री म्फाकेनिस्वा होते. त्यांची तिसरी पत्नी एनकुफी न्सेकेनी होती.

Nelson Mandela Information In Marathi

मंडेला त्यांच्या आई नोस्केनीचा पहिला मुलगा होता. नेल्सन यांचे वडील शहराचे प्रमुख आदिवासी होते. स्थानिक भाषेमध्ये सरदारच्या मुलाला “मंडेला” असे संबोधले जाते. ज्यावरून नेल्सनला त्यांचे टोपणनाव मंडेला प्राप्त झाले. मंडेला अवघ्या बारा वर्षाचे असताना त्यांचे वडील यांनी यांचे निधन झाले. नेल्सनच्या वडिलांनी त्यांना रोहीलाल असे पहिले नाव दिले होते. ज्याचा खरा अर्थ “रौडी” आहे.

नक्की वाचा 👉 लाल बहादूर शास्त्री संपूर्ण माहिती

नेल्सन मंडेला यांचे शिक्षण

नेल्सन त्यांचे प्राथमिक शिक्षण क्लार्क्सबेरी मिशनरी स्कूल मधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे शालेय शिक्षण मेथोडिस्ट मिशनरी स्कूलमध्ये झाले. ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी नेल्सनी हेल्डटाऊन मध्ये प्रवेश घेतला. या कॉलेजची विशेष गोष्ट म्हणजे हे कॉलेज विशेष करून कृष्णवरणीय लोकांसाठी बनवले होते.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर नेल्सनी जोहान्सबर्ग मध्ये राहण्याचा निर्णय घेतला. उदरनिर्वाहासाठी विविध कामे केली. सोन्याच्या खाणीत वॉचमन म्हणून, याशिवाय एका लॉकरमध्ये कारकुन म्हणून सुद्धा मंडेलांनी काम केले.

नक्की वाचा 👉 डॉ. विक्रम साराभाई संपूर्ण माहिती

नक्की वाचा 👉 अल्बर्ट आईन्स्टाईन माहिती मराठी

नक्की वाचा 👉 मुंशी प्रेमचंद माहिती मराठी

नेल्सन मंडेला यांचे वैवाहिक जीवन

नेल्सन यांनी तीन वेळा लग्न केले. त्यांच्या तिन्हीही अर्धांगिनींनी त्यांना त्यांच्या आयुष्याच्या विविध टप्प्यात विशेष साथ दिली. नेल्सन यांना तीन विवाहातून एकूण तीन अपत्ये आहेत. त्यानंतर त्यांना एकूण १७ नातवंडे आहे.

पहिला विवाह

मंडेला यांचा पहिला विवाह ऑक्टोंबर १९४४ मध्ये संपन्न झाला. मंडेला यांचे मित्र व सहकारी वॉल्टर सिसूलू यांची बहीण “एव्हेलीन मेसशी” लग्न केले होते.

दुसरा विवाह

१९६१ मध्ये नेल्सन यांच्या देशद्रोहाच्या खटला दरम्यान त्यांच्या दुसऱ्या पत्नीशी त्यांची भेट झाली. तिचे नाव “नोमजामो विनी मादीकिजाला” असे होते.

तिसरा विवाह

नेल्सन यांनी त्यांच्या वयाच्या अवघ्या ८० व्या वर्षी म्हणजे १९९८ मध्ये तिसरे लग्न केले. त्यांच्या पत्नीचे नाव “ग्रेस मेइकल” होते.

नेल्सन मंडेला यांचा वर्णभेद विरोधी सक्रियता

दक्षिण आफ्रिकेमधील स्वातंत्र्याच्या लढ्याशी एकजुटी आंतरराष्ट्रीय चळवळ ही जगाने पाहिलेली सर्वात मोठी सामाजिक चळवळ होती. विश्वातील प्रत्येक देशाच्या विविध स्वरूपात वर्णभेद विरोधी क्रियाकलापांचा इतिहास आहे.

नेल्सन मंडेला

बहुतांश देशांमध्ये वर्णभेद विरोधी क्रियाकलाप अनेक प्रकारच्या दबावाविरुद्ध स्थानिक संघर्षांची जोडलेले आहे. बहुतांश वर्णविरोधी चळवळीने नेल्सन यांचे कार्य दक्षिण आफ्रिकेपुरतेच मर्यादित ठेवले नाही, परंतु दक्षिण आफ्रिकेमधील मुक्ती चळवळीला अधिक व्यापकपणे समर्थन दिले गेले. 1952 च्या सुरूवातीस, त्याच्यावर अधूनमधून बंदी घालण्यात आली होती, म्हणजे त्याला प्रवास, सहवास आणि भाषणात प्रतिबंधित करण्यात आले होते.

त्याला डिसेंबर 1956 मध्ये इतर शंभरहून अधिक लोकांसह देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती ज्याची रचना रंगभेदविरोधी कार्यकर्त्यांना त्रास देण्यासाठी करण्यात आली होती. त्याच वर्षी, त्याच्यावर खटला चालला आणि अखेरीस 1961 मध्ये त्याची निर्दोष सुटका झाली.

नक्की वाचा 👉 तुकडोजी महाराज माहिती मराठी

नेल्सन मंडेला यांचे राजकीय जीवन

  • नेल्सन यांनी राजकीय जीवनामध्ये अनेक चढ-उतार पाहिले. मंडेला यांनी वयाच्या १८ व्या वर्षी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. १९४४ मध्ये त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे सदसत्व भूषवले. १९५२ मध्ये नेल्सन यांची ट्रान्सवाला शाखेचे अध्यक्ष आणि नंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
  • आपल्या पूर्वजांच्या शौर्याच्या कहाण्या ऐकून, आपल्या लोकांच्या स्वातंत्र्यलढात योगदान देण्याचे मंडेलांनी ठरवले होते.वर्ण भेदभावाविरुद्ध निर्देशन १९४८ मध्ये सुरू झाली. मंडेला यांना १९५२ मध्ये पहिल्यांदाच तुरुंगवास भोगावा लागला.
  • १९५६ ते १९६१ च्या कालावधीमध्ये नेल्सन यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. परंतु नंतर त्यांना त्यातून वगळण्यात आले. १९६० च्या दरम्याने फुटीरतावादी धोरणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या ६९ लोकांना पोलिसांनी मारहाण केली.
  • हे हत्याकांड “शार्पिविले हत्याकांड” म्हणून ओळखले जाते. या दुखाच्या पार्श्वभूमीवर सरकारने ए.न.सी.ची घोषणा केली. नेल्सन पक्षांतर्गत लष्करी शाखा निर्माण करण्याच्या गरजेचा विचार सुद्धा करत होते.
नेल्सन मंडेला

नेल्सन मंडेला यांचा – २७ वर्षे तुरुंगवास

  • मंडेला यांना १९६२ मध्ये अधिकाराशिवाय देश सोडल्याबद्दल व निर्देशनाचे नेतृत्व केल्याबद्दल दुसऱ्यांदा अटक करण्यात आली व त्यांना पाच वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांच्या इतर सहकारी सदस्यांना पुढील वर्षी अटक करण्यात आली. नेल्सल मंडेला यांच्यावर जबरदस्तीने सरकारला हटवण्याचा कट रचल्याबद्दल खटले दाखल करण्यात आले.
  • १२ जून १९६४ च्या दरम्याने जन्मठेपेची नेल्सल मंडेला यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि केपटाऊनच्या किनाऱ्याजवळील रॉबर्ट बेटावर उच्च सुरक्षा तुरुंगात मंडेला यांना ठेवण्यात आले. नेल्सल यांनी अनेक वर्ष तुरुंगात घालवले, आणि त्या दरम्यान त्यांची कीर्ती ही वाढतच गेली. तुरुंगामध्ये असताना सुद्धा त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि त्यांची कीर्ती दक्षिण आफ्रिकेच्या सरकारवर वर्ण भेदभाव संपवण्यासाठी दबावू लागली.
  • मंडेला यांच्या आजारपणामुळे १९८८ मध्ये रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले, यानंतर जेव्हा ते पुन्हा तुरुंगामध्ये गेले, तेव्हा त्यांच्या अटकेच्या अटी मोठ्या प्रमाणात शिथिल केल्या गेल्या. जरी त्यांनी स्वातंत्र्याच्या बदल्यात कोणतीही राजकीय तडजोड नाकारली असली, तरीही अखेर राष्ट्रीय दबावामुळे मंडेला यांना तुरुंगवासातून माफ करण्यात आले.

नेल्सन  मंडेला यांचे – अध्यक्ष पद

११ फेब्रुवारी १९९० च्या दरम्याने नेल्सन यांची तुरुंगातून सुटका झाली. त्यावेळी त्यांचे वय हे ७२ वर्षे होते. तरीही मंडेला यांनी वर्णभेदाचे धोरण संपवणे हाच उद्देश मनाशी बाळगला होता. दक्षिण आफ्रिकेमध्ये १९९४ च्या दरम्याने पहिल्या लोकशाही निवडणुका चालू झाल्या. या निवडणुकीमध्ये नेल्सल यांच्या पक्षाला ६० टक्के पेक्षा अधिक मतदान प्राप्त झाले. त्या क्षणी मंडेला यांची दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

नेल्सन मंडेला यांच्या जीवन आणि संघर्षाबद्दल

  • नेल्सन त्यांच्या धैर्य, संयम, लोकांशी असलेले नाते, त्यागाची भावना, यामुळे केवळ आफ्रिकेमध्येच नाही तर जगभरातील कृष्णवर्णीय आणि उपेक्षित लोकांसाठी एक महत्त्वाचे नेते बनले. त्यांच्या वाढत्या प्रसिद्धीमुळे त्यांच्यावरती बंदी घालण्यात आल्या. वर्णभेदाच्या आरोपाखाली त्यांना जोहान्सबर्गच्या बाहेर सुद्धा पाठवण्यात आले. नेल्सन मंडेला यांना कोणत्याही बैठकीला येण्यास सरकारने बंदी घातली होती.
  • सरकारी दडपशाहीच्या चक्रातून सुटण्यासाठी नेल्सन व ऑलीव्हर यांनी एक उत्तम प्लॅन “एम” तयार केला. काँग्रेस पक्षाचे तुकडे करून कामे करायची आणि बदलत्या परिस्थितीनुसार भूमिगत कामे करण्याचे त्यांनी ठरवले. बंदी असताना सुद्धा नेल्सन क्लिपटाऊनला गेले. आणि तिथल्या काँग्रेसच्या कार्यक्रमांना उपस्थित राहून, त्यांनी कृष्णवर्णीयांच्या  स्वातंत्र्यासाठी संघर्ष करण्याच्या सर्व संघटनांसोबत काम सुद्धा केले.

नेल्सन मंडला यांच्या आयुष्यातील एक छोटासा किस्सा

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मंडेला आपल्या सहकाऱ्यांसोबत शहरात फिरायला गेले. फिरून भूक लागल्यानंतर दुपारचे जेवण घेण्यासाठी, ते सर्वजण एका साध्या हॉटेलमध्ये गेले. व जेवणाची ऑर्डर दिली. जेवणा अगोदरच नेल्सन यांचे समोरच्या टेबल वर बसलेल्या व्यक्तीकडे गेली. ज्याने अगोदरच जेवणाची ऑर्डर दिली होती, आणि तो वाट पाहत बसला होता. मंडेला यांनी एका सुरक्षारक्षकाला सांगून त्या व्यक्तीला सोबत जेवणासाठी बोलावले. तेवढ्यात त्याचेही जेवण आले आणि तो व्यक्ती जेवण घेऊन नेल्सन सोबत जेवायला बसला.

तेव्हा त्याचे हात थरथर कापत होते. तरीही त्याने पटपट जेवण केले आणि कोणालाही काहीही न बोलता तिथून निघून गेला. ती व्यक्ती निघून गेल्यावर मंडेला यांचा एक सहकारी म्हणाला सर तुम्ही पाहिलं का त्याला ? त्याचे हात कसे थरथर कापत होते ते, मला वाटतं तो आजारी असेल, यावर नेल्सन मेंटल हसले आणि म्हणाले, “तसं काही नाही. आंदोलन काळात मी जेव्हा तुरुंगात होतो, तेव्हा मला ज्या तुरुंगात ठेवले होते, तिथे हा सुरक्षा रक्षक होता. माझा छळ करणे हे त्याच्यासाठी आवडीची गोष्ट होती. मला छळण्यात त्याला आनंद वाटायचा, मी जेव्हा थकून जायचो आणि पाणी मागायचो तेव्हा हा यायचा आणि हसत हसत माझ्या तोंडावर पाणी फेकून मारायचा.

आता राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर, मी ही त्याला बोलावून त्याच्यासोबत तसाच व्यवहार करतो की काय, या भीतीने तो थरथर कापत होता. मला संधी होती सूड घेण्याची, पण ते माझ्या नैतिकतेत बसत नाही. हे ऐकल्यानंतर मात्र सोबतच्या सहकाऱ्यांना नेल्सन यांचा अभिमान वाटला. सर्वांनी त्यांचे कौतुक केले. सूड आणि द्वेषाची भावना विनाशाकडे घेऊन जाते, तर सहनशीलता आपल्या प्रगतीसाठी पोषक ठरते.

नेल्सन मंडेला यांचे प्रेरणादायी विचार

  • जोपर्यंत काम करत नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट अशक्य वाटत राहते.
  • जेव्हा तुम्ही काही बोलू शकता, तेव्हा तुम्ही काही गोष्टी प्राप्त करू शकता.
  • जर तुम्ही तुमच्या कामासाठी विशिष्ट आणि उत्साही असाल, तर तुमची प्रगती निश्चित आहे.
  • माझी सफलता बघून कोणते मत बनवू नका. हे पहा की, मी ही सफलता मिळवण्यासाठी किती वेळा असफल झालो आहे. व पुन्हा उठून यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केला आहे.
  • शिक्षा सर्वात मोठा शस्त्र आहे. ज्याचा वापर जगासाठी केला जाऊ शकतो.
  • मनुष्य हा चांगल्या ज्योती समान आहे, तो शोधून काढू शकतो, पण समजू शकत नाही.
  • पैशामुळे यशस्वी होता येत नाही. पैसे कमावण्यासाठी प्राप्त होणारी स्वतंत्रता यशामुळेच प्राप्त होते.
  • कोणतीही गोष्ट करण्यासाठी कोणतीही वेळ नसते, एक गोष्ट लक्षात ठेवा वेळेवर काम करायला शिका.
  • लोकांना त्यांचे मानवी हक्क हिरावून घेणे म्हणजे त्यांच्या खऱ्या मानवतेला आवाहन देणे होय.
  • तुम्हाला काही आजार झाला तरी, मूर्खासारखे दुःखी होऊन बसू नका. जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या आणि तुमच्या आजाराला आवाहन द्या.

नेल्सन मंडेला यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी

  • नोबेल शांतता पुरस्कार
  • यूएस प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम
  • सोव्हिएत युनियनचा लेनिन शांतता पुरस्कार
  • लिबियन अल-गद्दाफी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार.
  • भारतरत्न (१९९०)
  • निशान-ए-पाकिस्तान (१९९२)
  • तुर्कीचा अतातुर्क शांतता पुरस्कार (१९९२, १९९९ मध्ये स्वीकारला)
  • आंतरराष्ट्रीय समजून घेण्यासाठी फुलब्राइट पुरस्कार
  • १८ जुलै, “मंडेला दिवस” ​​साजरा केला जातो.

नेल्सन मंडेला यांची भाषणे

तुरुंगामध्ये कैद असताना मंडेला यांनी त्यांच्या भाषणांद्वारे व पत्रांमधून राजकीय प्रसिद्धी प्राप्त केली. २०१८ मध्ये नेल्सन मंडेला यांनी तुरुंगामधून पाठवलेली, २५५ पत्रे “द प्रिसन लेटर ऑफ नेल्सन मंडेला” मध्ये संकलित करण्यात आली होती. नेल्सल यांच्या पत्रांचा हा संग्रह तुरुंगामध्येच कैद असताना, त्यांच्या वैयक्तिक आणि राजकीय जीवनाबद्दल एक अनोखी अंतर दृष्टी देते.

नेल्सन मंडेला यांची भाषणे “द पेंग्विन बुक ऑफ मॉर्डन स्पीचेस” “कॉन्व्हर्सेशन” व “नेल्सन मंडेला यांची निवडक भाषण आणि लेखन” यांसह अनेक पुस्तकांमध्ये प्रकाशित करण्यात आली.

नेल्सन मंडेला यांची काही प्रसिद्ध भाषणे खालील प्रमाणे –

  • नो इझी वॉक टू फ्रीडम (१९५३)
  • द स्ट्रगल इज माय लाईफ ( १९६१)
  • आय एम रेडी टू डाय (१९६४)

नेल्सन मंडेला यांचा वारसा

नेल्सन यांनी त्यांच्या प्रत्येक कृती मधून व शब्दांमधून वर्णभेद विरोधी चळवळीचा संघर्ष केला. त्यामुळे वर्णभेद विरोधी चळवळीचा मुख्य चेहरा म्हणून नेल्सन मंडेला यांच्याकडे पाहिले जाते. समान हक्काच्या लढाईतील एक प्रतिकात्मक व्यक्तिमत्व म्हणून नेल्सन मंडेला यांचे योगदान हे अतुलनीय व अविस्मरणीय आहे.

नेल्सन मंडेला यांची पुस्तके

मंडेला यांच्या जीवनशैलीमध्ये प्रसिद्ध झालेले, सर्वात लोकप्रिय पुस्तक म्हणजे, १९९४ मधील आत्मचरित्र, “लॉंग वॉक टू फ्रीडम” नेल्सन यांच्या निधनानंतर म्हणजेच दि. ०५ डिसेंबर २०१३ नंतर या आत्मचरित्राचा पुढील भाग, “डेअर नॉट लिंजर : द प्रेसिडेन्शियल इयर्स” या शीर्षकाचे २०१७ मध्ये प्रकाशन करण्यात आले.

नेल्सन मंडेला यांचा मृत्यू

  • दक्षिण आफ्रिकेचा राजकीय नेता म्हणून मंडेला यांची एक ओळख आहे. त्यांनी वर्ण विरोधात लढाईत  वीस वर्षाहून अधिक काळ तुरुंगात घालवला. १९९० मध्ये त्यांची सुटका झाली. नंतर १९९४ ला ते दक्षिण आफ्रिकेचे पहिले नेते म्हणून दक्षिण आफ्रिकेत जिंकून आले.
  • कृष्णवंशीय भेदभाव रोखण्यास मदत केल्याच्या कार्याबद्दल, त्यांना “नोबल पुरस्कार” मिळाला. दक्षिण आफ्रिकेत नेल्सन हे लोकशाहीचे जनक म्हणून ओळखले जातात. वर्णभेदाने विभाजित राष्ट्र एकत्र करण्याच्या त्याच्या कौशल्याची आज सर्वत्र प्रशंचा केली जाते.
  • मंडेला यांचा मृत्यू त्यांच्या राहत्या घरी फुफ्फुसातील संसर्ग रोगामुळे ०५ डिसेंबर २०१३ मध्ये साऊथ आफ्रिका मध्ये झाला.

नेल्सन मंडेला यांचा व्हिडीओ

नेल्सन मंडेला यांच्याबद्दल मनोरंजक तथ्ये

  • नेल्सन हे जन्मतः अतिशय श्रीमंतीमध्ये वाढले. त्यांच्या पंजोबांनी थेंम्बु राज्यावर राज्य केले होते.
  • १९५३ च्या दरम्याने नेल्सन मंडेला यांनी ऑलिव्हर टोम्बो सोबत मंडेला अँड टोम्बो नावाची लॉ फॉर्म सुरू केली सुरू केली.
  • मंडेला आणि टोम्बो ही दक्षिण आफ्रिकेमधील एकमेव आफ्रिकन रन लॉ फर्म होती.
  • २००९ मध्ये दि.१८ जुलै हा दिवस नेल्सन मंडेला यांच्या जन्मदिनानिमित्त, संयुक्त राष्ट्रांनी मंडेला “आंतरराष्ट्रीय दिवस” म्हणून घोषित केला.

नेल्सन मंडेला यांच्याबद्दल थोडक्यात माहिती.

  • नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेमधील एक प्रमुख वर्णभेद विरोधी कार्यकर्ते आणि राजकीय नेते होते. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी समर्पित केले. देशातील जातीय विभेक व असमानते विरुद्ध लढण्यासाठी त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले.
  • त्यांना २७ वर्ष तुरुंगवास भोगाव लागला. परंतु अखेरीस ते तुरुंगामधून मुक्त झाले. दक्षिण आफ्रिकेचे पहिले लोकशाही पद्धतीने निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष म्हणून नेल्सल मंडेला यांकडे पाहिले जाते.
  • १९९४ ते १९९९ च्या दरम्याने ते राष्ट्राध्यक्ष पदावर होते. शांतता, क्षमा आणि एकतेचे प्रतीक म्हणून नेल्सन मंडेला यांचा वारसा जगभरातील लोकांना प्रेरणा देत आहे.
  • १९९० दरम्याने मंडेला यांनी ब्रिटिश सरकार सोबत करार केल्यानंतर, एक नवीन दक्षिण आफ्रिका देश निर्माण केला. दक्षिण आफ्रिकेमध्ये व संपूर्ण जगात नेल्सन मंडेला हे वर्णभेदाच्या विरोधाचे प्रतीक बनले. नेल्सन मंडेला यांचा जन्मदिवस संयुक्त राष्ट्र संघाने “आंतरराष्ट्रीय दिवस” म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. यानंतर १९९० च्या दरम्यान भारत सरकारने नेल्सल मंडेला यांना देशाचा सर्वोच्च सर्वश्रेष्ठ पुरस्कार “भारतरत्न” देऊन गौरवीत केले. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च मान प्राप्त करणारे नेल्सेल मंडेला हे पहिले परदेशी होते.
  • दि. १० मे १९९४ रोजी नेल्सन मंडेला हे देशाचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्रपती बनले. वर्णभेद विरोधात लढण्यात नेल्सन मंडेला यांचे योगदान हे अतुलनीय व अविस्मरणीय आहे.

नेल्सन मंडेला यांच्याबद्दल दहा ओळी

  • नेल्सन मंडेला हे दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष होते.
  • नेल्सन मंडेला यांचा जन्म दि. १८ जुलै १९१८ साली दक्षिण आफ्रिका या ठिकाणी झाला.
  • कृष्णवर्णीय असल्यामुळे ब्रिटिश सरकार दक्षिण आफ्रिकेतील लोकांना हीन वागणूक देत होते. म्हणून नेल्सन मंडेला यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.
  • भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी नेल्सन मंडेलांचे आदर्श होते
  • नेल्सन मंडेला यांनी आयुष्याचे २७ वर्ष कारावासामध्ये काढले.
  • आपल्या देशाला ब्रिटिशांच्या तावडी मधून, सोडण्यासाठी नेल्सन मंडेला यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
  • वयाच्या ७७ व्या वर्षी नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय पंतप्रधान बनले
  • नेल्सल मंडेला यांना त्यांच्या कार्यासाठी जगातील सर्वश्रेष्ठ “नोबेल पुरस्कार” देऊन गौरवित करण्यात आले.
  • नेल्सन मंडेला हे महान व प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते.

FAQ

१. नेल्सन मंडेला प्रसिद्ध का आहेत?

दक्षिण आफ्रिकेमध्ये नेल्सन मंडेला यांना “राष्ट्रपिता” मानले जाते. नेल्सन मंडेला दक्षिण आफ्रिकेतील लोकशाहीचे पहिले संस्थापक, राष्ट्रीय मुक्तिदाता आणि तारणहार म्हणून संबोधले जातात.

२. नेल्सन मंडेला यांना भारतरत्न का देण्यात आला?

नेल्सन मंडेला संपूर्ण जगात वर्णभेदाच्या विरोधासाठी ओळखले जातात. सर्व कृष्णवर्णीय लोकांच्या हक्काचे समर्थन करण्याचे व त्यांचे संरक्षण करण्यासाठी वर्णभेदाला विरोध करण्यासाठी नेल्सन मंडेलाने मोठे कार्य केले. भारत सरकारने १९९० मध्ये मंडेला यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित केले आणि सर्वात खास गोष्ट म्हणजे मंडेला हे भारतरत्न मिळवणारे पहिले परदेशी नागरिक होते.

३. मंडेला दिन काय साजरा केला जातो?

समाजामध्ये बहुतांश महान व्यक्ती होऊन गेले, ज्यांनी त्यांच्या कर्तुत्वाने समाजावर स्वतःची एक वेगळी छाप सोडलेली आहे. अशाच एका महान व्यक्तिमत्वाने भारत सरकार द्वारा भारतरत्न सर्वोच्च सन्मान प्राप्त करून समाजामध्ये स्वतःची एक वेगळी छाप सोडली, ते म्हणजे ”नेल्सन मंडेला. संयुक्त राष्ट्रसंघाने नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे

४. मंडेला दिन काय साजरा केला जातो?

संयुक्त राष्ट्रसंघाने नेल्सन मंडेला यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

५. मंडेला यांनी वर्णभेद कसा संपवला?

१९९१ मध्ये वर्णभेद रद्द करण्यात आला. आणि १९९४ मध्ये, लोकशाही निवडणुकीत ६२ टक्क्यांहून अधिक लोकप्रिय मते नेल्सन मंडेलांच्या पक्षास मिळाली.

६. नेल्सन मंडेला यांचा मृत्यू कधी झाला ?

नेल्सेल मंडेला यांचा मृत्यू त्यांच्या राहत्या घरी फुफ्फुसातील संसर्ग रोगामुळे ०५ डिसेंबर २०१३ मध्ये साऊथ आफ्रिका मध्ये झाला.

७. नेल्सन मंडेला यांनी कोणत्या वयात राजकीय क्षेत्रात पदार्पण केले ?

मंडेला यांनी वयाच्या १८ व्या वर्षी राजकीय क्षेत्रात पदार्पण केले. १९४४ मध्ये त्यांनी आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचे सदसत्व भूषवले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस नेल्सन मंडेला यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment