राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती | Mahatma Gandhi Information In Marathi

Mahatma Gandhi Information In Marathi | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती – देशाच्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे, सर्वांना सत्य आणि अहिंसेच्या मार्ग दाखवणारे गांधीजी, अर्थात महात्मा गांधी यांना देशाचे राष्ट्रपिता म्हणून संबोधले जाते. मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी या नावाने ओळखले जाते. गांधीजी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते. गांधीजींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाचे योगदान दिले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली.

ज्याचा अर्थ होतो “महान आत्मा.” भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणायचे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १९९४ मध्ये पहिल्यांदा त्यांना “राष्ट्रपिता” असे संबोधले. गांधीजींच्या वचनांचा भारतीय समाजावर खोल प्रभाव आहे.त्यांचा जन्म, त्यांचे बालपण, त्यांनी केलेली कार्ये याबाबतची सगळी माहिती आज आम्ही मराठी झटका डॉट कॉम या वेब पेजद्वारे घेऊन आलो आहोत. चल तर मग, पाहुया महात्मा गांधींची माहिती.

Table of Contents

महात्मा गांधी माहिती मराठी | Mahatma Gandhi Information In Marathi

पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी
जन्मतारीख २ ऑक्टोबर १८६९
जन्मस्थळ पोरबंदर, गुजरात
आईचे नाव पुतळीबाई गांधी
वडिलांचे नाव करमचंद गांधी
राष्ट्रीयत्व भारतीय
पत्नी कस्तुरबा
अपत्य हरिलाल गांधी, मणिलाल गांधी, रामदास गांधी आणि देवदास गांधी
व्यवसाय वकील, राजकारणी, कार्यकर्ते, लेखक
मृत्यू ३० जानेवारी १९४८
मृत्यूचे स्थळ दिल्ली, भारत

राष्ट्रपिता महात्मा गांधी जन्म आणि बालपण

महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे होते. त्यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ साली पोरबंदर येथे झाला. सत्य, अहिंसा, यावर प्रेम करणारे महात्मा गांधी जगप्रसिद्ध आहेत. यांचे वडील करमचंद हे पोरबंदर संस्थानाचे दिवाण होते. आणि आई पुतळी बाई अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या. बालपणी महात्मा गांधींना काही वाईट मुलांची संगत लागली, परंतु त्यांना अल्पावधीतच आपल्या वागण्याचा पश्चाताप झाला.

Mahatma Gandhi Information In Marathi
Mahatma Gandhi

वडिलांनी आणलेली पितृभक्तीचे नाटक एकाग्रतेने वाचले. आणि राजा हरिश्चंद्र यांचे नाटक पाहिले. हरिश्चंद्र यांच्या सत्यपालनाचा त्यांच्या मनावर फार परिणाम झाला. हरिश्चंद्र सारखेच आपणही सत्यवादी व्हावे, असे त्यांना वाटू लागले. लहानपणी त्यांना भुताची भीती वाटत असे, त्यावेळी आईने गांधीजींना रामनामाचा जप करण्यास सांगितले.पुढील जीवनात त्यांना त्याचा फार उपयोग झाला. तसेच तुलसी रामायणाच्या वचनाने ईश्वर भक्तीची ज्योत त्यांच्या हृदयात प्रचलित झाली. वयाच्या अवघ्या तेराव्यावर्षी त्यांचा विवाह कस्तुरबांशी झाला.

महात्मा गांधी यांचे शिक्षण

१८८५ मध्ये त्यांचे वडील वारले आणि दोन वर्षानंतर ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्या वडील भावाने त्यांना बॅरिस्टर होण्यासाठी इंग्लंडला पाठवण्याचे ठरविले. परंतु यासाठी गांधीजींच्या आईची परवानगी नव्हती. मात्र महात्मा गांधींनी मी अमली पदार्थाचे सेवन करणार नाही. अपक्ष भक्षण करणार नाही. परिस्थितीला स्पर्श करणार नाही. असे आईला वचन देऊन ते इंग्लंडला गेले.

👉लाल बहादूर शास्त्री यांचे प्रेरणादायी जीवनचरित्र

जून १८९१ साली महात्माची बॅरिस्टर पदवी घेऊन, भारतात आली. त्यांनी मुंबई येथे वकिलीचा व्यवसाय सुरू केला. मात्र त्यांना वकिलीच्या व्यवसायात फारसे यश मिळाले नाही. अतिशय बुद्धिमत्ता असलेल्या गांधीजींना दक्षिण आफ्रिकेतील एका कृष्णवर्णीय व्यापाऱ्यांनी आपला दावा चालवण्यासाठी एक वर्षाच्या कालावधीसाठी दक्षिण आफ्रिकेला नेले. अत्यंत कौशल्याने महात्माजींनी कृष्णवर्णीय व्यापाऱ्याला न्याय मिळवून दिला.

महात्मा गांधी यांची कौटुंबिक माहिती

मित्रांनो, महात्मा गांधी यांचे १८८३ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी, १४ वर्षांच्या कस्तुरबाशी लग्न झाले. महात्मा गांधी जेव्हा १५ वर्षांचे होते, तेव्हा त्याना पहिले बाळ झाले पण ते काही दिवसच जगले. महात्मा गांधीचे वडील करमचंद गांधी यांचेही त्याच वर्षी (१८८५) निधन झाले. त्या  नंतर मोहनदास आणि कस्तुरबा गांधी यांना चार मुले झाली. त्यांची नावे – हरीलाल गांधी (१८८८), मणीलाल गांधी (१८९२), रामदास गांधी (१८९७) आणि देवदास गांधी (१९००) अशी होती.

महात्मा गांधी यांचे कार्य

दक्षिण आफ्रिकेतील एका वर्षाच्या कालावधीत, महात्माजींना प्रस्थापित शासनाच्या अन्यायकारक जुलमी धोरणाची माहिती झाली. कृष्णवर्णी यांना न्याय मिळावा या उद्देशाने महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना संघटित केले. प्रस्थापित शासनाच्या विरोधात सत्याग्रह केला. गौरवर्णीय प्रमाणेच कृष्णवर्णी यांना वागणूक मिळावी यासाठी महात्माजींनी जे कार्य केले.

ते सुवर्ण अक्षरात कोरल्यासारखेच आहेत. गांधीजींनी “बुद्धचरित्र” आणि “भगवद्गीता” वाचली. गीतेचे सखोल चिंतन केले. व त्यातील विचारांचा त्यांच्यावर सखोल परिणाम झाला. महात्मा गांधींनी वैकुंठ माझ्या हृदयात आहे नावाचे पुस्तक वाचले. राजकीयचे सर्वोदय हे पुस्तक जाणून घेतले. सर्वांच्या कल्याणात आपली कल्याण सामावलेले आहे. याची त्यांना जाणीव झाली.

👉महात्मा गांधी जयंती निमित्त भाषण मराठी

बहुतेक शिक्षणापेक्षा त्यांनी हृदयाच्या शिक्षणाला म्हणजेच चारित्र्याच्या विकासाला प्रथम स्थान दिले. महात्मा गांधींना सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग अधिक श्रेष्ठ वाटत होता. हिंस अपेक्षा त्यांचे मते प्रचंड सामर्थ्य आहे. याची त्यांना जाणीव होती. त्यांची राहणीमान साधी होती. पण विचारसरणी उच्च होती. त्यांना फिरोजशहा मेहता हिमालयासारखे वाटले लोकमान्य टिळक समुद्रासारखे व नामदार गोखले गंगेसारखे वाटले.

Mahatma Gandhi Information In Marathi

भारतात मजुरांवर होणारा अन्याय त्यांनी पाहिला. व त्यांनी दूर केला. सत्याग्रह, सविनय कायदेभंग, शस्त्रांशिवाय प्रतिकार असहकार अशा नवीन साधनांचा पुरस्कार केला. देशातील विषमतेची तरी दूर करण्याच्या उद्देशाने विश्वस्त सिद्धांत मांडला. हिंदू मुसलमान यांच्यातील संबंध चांगले राहावे म्हणून, त्यांनी प्रयत्न केले. जातिभेद त्यांना मान्य नव्हता. त्यासाठी त्यांनी अनेक उपोषणे केली. अस्पृश्यांना हरिजन असे नाव दिले. हे सर्व कार्य ते निस्वार्थ बुद्धीने करत होते.

गीतेतील निष्काम कर्मयोग ते आचरत होते. जनतेने त्यांना महात्मा ही उपाधी दिली. राष्ट्रपिता म्हणून राष्ट्रपिता म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आली. महात्मा गांधीजींचे कार्य पाहून, स्वातंत्र्यासाठी सारी जनता त्यांच्या मागे उभी राहिली. १९४२ साली चले जाव, भारत छोडो, असे इंग्रजांना त्यांनी ठणकावून सांगितले. भारतीय जनता आता जागृत झाली होती. इंग्रजांनी लाठीमार गोळीबार केला. अनेकांना तुरुंगात घातले. पण इंग्रजांचे काही चालले नाही. १९४७ ला देश स्वतंत्र झाला.

भारतीय कॉंग्रेसची स्थापना

गांधीजी ज्यावेळी दक्षिण आफ्रिकेला गेले होते, तेव्हा त्यांना वर्णभेदाचा सामना करावा लागला. एकदा ट्रेनमध्ये प्रथम श्रेणी प्रशिक्षकाकडे वैध तिकीट आल्यावर तिसर्‍या श्रेणीच्या डब्यात प्रवेश करण्यास त्यांनी नकार दिल्यामुळे त्यांना ट्रेनमधून बाहेर फेकण्यात आले.

या काळात त्यांच्याबरोबर अशाप्रकारच्या अनेक घटना घडल्या. या सर्व घटना त्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा ठरल्या. आणि प्रचलित सामाजिक आणि राजकीय अन्याय जागरूकतेचे कारण बनल्या. दक्षिण आफ्रिकेत भारतीयांवर होणारा अन्याय लक्षात घेऊन त्यांच्या मनात भारतीयांचा सन्मान आणि ब्रिटीश साम्राज्याअंतर्गत त्यांची स्वतःची ओळख याविषयी प्रश्न निर्माण होऊ लागले.

त्यानंतर गांधीजींनी रंगभेदांविरोधात आवाज उठविला आणि १८९४ मध्ये लढा देण्यासाठी “नाताळ भारतीय कॉंग्रेस“ ची स्थापना केली. अशा प्रकारे महात्मा  गांधींनी आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्णभेदाचा मुद्दा उपस्थित केला.

महात्मा गांधी यांचा मृत्यू

भारताची फाळणी झाली. भारताची फाळणी अनेक लोकांना अयोग्य वाटली. परिणामी नथुराम गोडसे या तरुणाने दिल्लीत गांधीजींना प्रार्थना करत असताना ३० जानेवारी १९४८ साली गोळी मारून ठार केले. गांधीजींच्या मुखात त्यावेळीही “हे राम” हे शब्द होते. महात्मा गांधींना हुतात्म्याचे मरण आले. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या त्रिसूत्रीचा पुरस्कार करणाऱ्या महात्मा गांधींना १९ व्या शतकातील एक महामानव साऱ्या जगाने मानले. त्यामुळे त्यांचा जन्मदिन २ ऑक्टोबर हा दिवस भारतात गांधी जयंती म्हणून तर जगामध्ये आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो.

Mahatma Gandhi death

महात्मा गांधीजीनी केलेली आंदोलने आणि चळवळी

महात्मा गांधींची चंपारण आणि खेडा चळवळ

१९१७ चा चंपारण सत्याग्रह हा इंग्रज भारतातील महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिला सत्याग्रह होता. हा एक शेतकरी उठाव होता. आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बंड मानला जातो. भारतातील बिहारच्या चंपारण जिल्ह्यात इंग्रजांच्या काळात झाला होता. पैसे देऊन त्यांना नीळ पिकवावा लागत होता.

त्यामुळे या विरोधात शेतकरी आंदोलन करत होते. ज्यावेळी गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले त्यावेळे नीळ बागायतदारांकडून शेतकऱ्यांवर अन्याय अत्याचार होत असताना पहिले. त्यावेळी आफ्रिकेत ज्या पद्धती वापरल्या त्याच पद्धतीने उठाव घडवून आणला त्यानंतर गांधीजींनी चंपारणमध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आंदोलन केले. ज्याला चंपारण सत्याग्रह म्हणून ओळखले गेले आणि या आंदोलनात शेतकऱ्यांना २५ टक्के रक्कम परत मिळवून देण्यात यश आले.

या आंदोलनात महात्मा गांधींनी अहिंसक सत्याग्रह हे आपले शस्त्र केले आणि ते जिंकले. त्यामुळे लोकांमध्ये त्यांची वेगळी प्रतिमा निर्माण झाली. यानंतर खेडा येथील शेतकऱ्यांवर अकालीचा डोंगर कोसळल्याने शेतकरी कर भरण्यास असमर्थ ठरले. गांधीजींनी ही बाब इंग्रज सरकारसमोर ठेवली आणि गरीब शेतकऱ्यांचे घरभाडे माफ करण्याचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर ब्रिटीश सरकारने तेजस्वी गांधीजींचा हा प्रस्ताव स्वीकारला आणि गरीब शेतकऱ्यांचे भाडे माफ केले.

मीठ सत्याग्रह / दांडी यात्रा

महात्मा गांधीजींची असहकार चळवळीच्या वेळी अटक झाली होती. त्यांनंतर गांधींना फेब्रुवारी १९२४ मध्ये सोडण्यात आले नंतर ते १९२८ पर्यंत राजकारणापासून दूर राहिले. या काळात त्यांनी स्वराज पक्ष आणि कॉंग्रेसमधील विरक्ती कमी केली आणि या व्यतिरिक्त अस्पृश्यता, मद्यपान, अज्ञान आणि दारिद्र्याविरूद्ध लढा दिला. गांधीजींच्या नेतृत्वाखाली भारतातील तत्कालीन ब्रिटिश शासनाने मिठासारख्या जीवनावश्यक गोष्टीवर लावलेल्या कराच्या विरोधात इ.स. १९३० साली घडलेला सत्याग्रह होता. यालाच दांडी सत्याग्रह असेही म्हणतात.

Mahatma Gandhi in dandi yatra
Mahatma Gandhi in dandi yatra

महात्मा गांधींनी ब्रिटीश सरकारच्या विरोधात ही चळवळ सुरू केली होती. गांधीजींच्या बरोबर त्यांचे ७८ निवडक अनुयायी होते. यामध्ये इला भट, सरोजिनी नायडू होत्या. यात्रा जसजशी पुढे निघाली तशी लोकांची गर्दी वाढली. यात्रा दांडी येथे समुद्रकिनारी ६ एप्रिल १९३०ला पोहोचली. त्या दिवशी जेव्हा सकाळी साडे सहा वाजता गांधीजींनी चिमूटभर मीठ उचलून कायदेभंग केला, तेव्हा कायदेभंगाच्या मोठ्या प्रमाणावरील चळवळीची ती सुरुवातच ठरली. 

दांडीनंतर गांधीजी मीठ बनवत आणि सभांमध्ये भाषणे करत ते समुद्रकिनाऱ्याने दक्षिणेकडे जात राहिले. त्याच वेळी ही चळवळ वाढत असल्याचे पाहून सरकारने तत्कालीन वायसराय लॉर्ड इर्विनला तोडगा काढण्यासाठी पाठवले होते, त्यानंतर गांधीजींनी हा करार मान्य केला.

महात्मा गांधींची खिलाफत चळवळ (१९१९ – १९२४ )

गरीब, मजुरांनंतर गांधीजींनीही मुस्लिमांनी चालवलेल्या खिलाफत चळवळीला पाठिंबा दिला होता. तुर्कस्तानच्या खलिफाचे पद पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी ही चळवळ सुरू करण्यात आली. या आंदोलनानंतर गांधीजींनीही हिंदू-मुस्लिम ऐक्याचा विश्वास जिंकला होता. त्यानंतर महात्मा गांधींच्या असहकार चळवळीचा पाया बनला. काही मुस्लिम हितसंबंधांना प्रोत्साहन दिले आणि मुस्लिमांना राष्ट्रीय लढ्यात आणले.

भारत छोडो आंदोलन 

महात्मा गांधींनी भारत छोडो आंदोलन १९४२ मध्ये सुरू केले. करा किंवा मरा ह्या संदेशाने या आंदोलनाची सुरुवात झाली. महात्मा गांधींनी ब्रिटीश राजवटीविरूद्ध तिसरी सर्वात मोठी चळवळ उभी केली. या चळवळीला ‘अंग्रेजों भारत छोड़ों’ असे नाव देण्यात आले. परंतु गांधीजींनाही या चळवळीत तुरुंगात जावे लागले.

गांधीजींना पुण्याच्या आंगा खां पॅलेसमध्ये नेले गेले आणि तिथे त्यांना दोन वर्षे बंदी  म्हणून ठेवले गेले.आणि काही काळानंतर गांधीजींनाही मलेरियाने ग्रासले.त्या दरम्यानच त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचे २२ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले. आवश्यक उपचारांसाठी ६मे १९४४ रोजी त्यांना मुक्त करण्यात आले. देशातील युवा कार्यकर्त्यांनी संप आणि तोडफोडीच्या माध्यमातून ही चळवळ चालूच ठेवली होती, त्यावेळी देशातील लोक गुलामीमुळे अस्वस्थ झाले होते आणि त्यांना स्वतंत्र भारतात राहायचे होते. त्यांच्या आदेशाने भारतातली जनता पेटून उठली. तिने उत्स्फूर्तपणे गावागावात सरकारच्या विरोधात आंदोलन केले. 

आंशिक यश मिळाल्यानंतरही भारत छोडो चळवळीने भारताला एकत्र केले आणि दुसरे महायुद्ध संपेपर्यंत ब्रिटीश सरकारने लवकरच सत्ता भारतीयांच्या ताब्यात देण्याचे स्पष्ट संकेत दिले होते. ऐतिहासिक ‘चले जाव’ आंदोलनात ८ ऑगस्ट रोजी गोवालिया टँक मैदानावर ‘ वंदे मातरम् ‘ हे प्रेरणादायी, वंदनीय गीत संपूर्ण कडव्यांसहीत मास्तर कृष्णराव यांनी झिंझोटी रागात तयार केलेल्या स्वकृत चालीत गाऊन सादर केले.

यावेळी पेटून उठलेल्या भव्य जनसमुदयासमोर हे तेजस्वी गीत गाण्यासाठी प्रसिद्ध गायक व कट्टर देशभक्त असलेल्या मास्तर कृष्णरावांचीच निवड करण्यात आली होती. या गीतावर इंग्रजांनी बंदी घातलेली असतानादेखील स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या गीताचे संपूर्ण कडव्यांसहित जाहीर गायन करणे हे फार मोठे धाडस होते. या आंदोलनात जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी झाली. देशभरात ९ लाख लोकांंनी स्वतःला अटक करवून घेतली.

गांधीजींनी भारत छोडो आंदोलन संपवले आणि सरकारने सुमारे १ लाख राजकीय कैदी सोडले. गांधीजींचे भारत छोडो आंदोलन यशस्वी झाले नाही, परंतु या चळवळीने ब्रिटिश राज्यकर्त्यांना निश्चितच जाणीव करून दिली होती की आता भारतातील आपली सत्ता यापुढे चालणार नाही आणि त्यांना भारत सोडावा लागेल. महात्मा गांधींजीच्या शांतता आणि अहिंसेच्या मार्गावरील चळवळींनी गुलाम भारताला मुक्त करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रत्येकाच्या जीवनावर खोल प्रभाव टाकला. 

महात्मा गांधींची असहकार चळवळ (1919-1920)

रोलेक्स कायद्याच्या निषेधार्थ अमृतसरच्या जालियन वाला बाग येथे झालेल्या सभेदरम्यान, ब्रिटिश कार्यालयाने निरपराध लोकांवर विनाकारण गोळीबार केला, ज्यामध्ये तेथे उपस्थित १००० लोक मारले गेले आणि २००० हून अधिक लोक जखमी झाले. या घटनेमुळे महात्मा गांधींवर खूप आघात झाला, त्यानंतर महात्मा गांधींनी शांतता आणि अहिंसेच्या मार्गाने ब्रिटिश सरकारविरुद्ध आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या अंतर्गत गांधीजींनी ब्रिटिश भारतातील राजकीय, सामाजिक संस्थांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली.

या आंदोलनात महात्मा गांधींनी प्रस्तावाची रूपरेषा तयार केली, ती पुढीलप्रमाणे –

 • सरकारी न्यायालयांवर बहिष्कार
 • परदेशी मालवर बहिष्कार
 • सरकारी महाविद्यालयांवर बहिष्कार
 • १९१९ च्या कायद्यानुसार होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार

महात्मा गांधींचे चौरी-चौरा कांड (१९२२)

५ फेब्रुवारी रोजी चौरा-चौरा गावात काँग्रेसने मिरवणूक काढली, त्यात हिंसाचार उसळला, प्रत्यक्षात पोलिसांनी मिरवणूक रोखण्याचा प्रयत्न केला मात्र गर्दी अनियंत्रित होत होती. १ ऑगस्ट १९२० रोजी गांधीजींनी सरकारविरोधात असहकार आंदोलन सुरू केले होते. त्यात स्वदेशी वापरणे आणि परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणे, विशेषत: यंत्राने बनवलेले कापड, आणि कायदेशीर, शैक्षणिक आणि प्रशासकीय संस्था, “कुशासन करणाऱ्या राज्यकर्त्याला मदत करण्यास नकार देणे” यांचा समावेश होता.

यावेळी आंदोलकांनी एका पोलीस ठाण्याला आणि पोलीस ठाण्यातील २१ हवालदारांना टाळे ठोकून पेटवून दिले. या आगीत होरपळून सर्व लोकांचा मृत्यू झाला होता. महात्मा गांधींचे हृदय या घटनेने हादरले. यानंतर त्यांनी यंग इंडिया वृत्तपत्रात लिहिले की, “आंदोलन हिंसक होण्यापासून वाचवण्यासाठी मी प्रत्येक अपमान, अत्याचार, बहिष्कार, अगदी मृत्यूही सहन करण्यास तयार आहे”

महात्मा गांधींच्या चळवळींच्या महत्त्वाच्या गोष्टी

 • महात्मा गांधी हे एक महान स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी तसेच एक महान समाजसेवक होते. ज्यांनी देशातील जातिवाद, अस्पृश्यता यांसारख्या सर्व दुष्कृत्या दूर करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सर्व जाती, धर्म, वर्ग, लिंग यांच्या लोकांकडे त्यांचा दृष्टिकोन होता.
 • सत्य आणि अहिंसेच्या बळावर चळवळी चालवल्या गेल्या.
 • गांधीजींच्या सर्व हालचाली शांततेत पार पडल्या.
 • आंदोलनादरम्यान हिंसक कारवाया झाल्यामुळे काही आंदोलने रद्द करण्यात आली.
 • सत्य आणि अहिंसेचे पुजारी महात्मा गांधी यांनाही राष्ट्रपिता ही पदवी देण्यात आली होती. त्यांच्या आदर्श आणि महान व्यक्तिमत्त्वामुळे, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 4 जून 1944 रोजी सिंगापूर रेडिओवरून प्रसारित करताना सर्वप्रथम गांधीजींना “देशाचे पिता” म्हणून संबोधले.
 • ६ जुलै १९४४ रोजी रेडिओ रंगूनवरून संदेश प्रसारित करताना नेताजींनी गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले. त्याच वेळी, 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींच्या हत्येनंतर, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या मृत्यूची दुःखद बातमी रेडिओवरून भारतीयांना दिली आणि सांगितले की “भारताचे राष्ट्रपिता आता राहिले नाहीत” .
 • त्यांनी जातीभेदमुक्त भारताचे स्वप्न पाहिले होते. गांधीजींनी निम्न, मागास आणि दलित वर्गाला ‘हरिजन’ असे देवाचे नाव दिले होते आणि त्यांना समाजात समान हक्क मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले होते.

हे पण वाचा👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संपूर्ण माहिती

गांधीजींचे प्रेरणादायी विचार

 • तुम्हाला आनंद तेव्हाच प्राप्त होईल, जेव्हा तुम्ही जे विचार करता, तुम्ही जे म्हणता, आणि तुम्ही जे करता ते सुसंगतपणे असेल.
 • आपण आपल्या माणसांना गमावल्याशिवाय, आपल्यासाठी कोण महत्त्वाचे आहे, हे आपल्याला समजत नाही.
 • अहिंसा मानवतेसाठी सर्वात मोठी शक्ती आहे. ती मनुष्याने तयार केलेल्या शक्तिशाली शस्त्रांपेक्षा अधिक शक्तिशाली आहे.
 • एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणे, परंतु त्या गोष्टी बरोबर न जगणे, तिचा अनुभव न घेणे, हे अप्रामाणिकपणा आहे.
 • इतरांना संतुष्ट करण्यासाठी किंवा समस्येपासून मुक्त होण्यासाठी, हो म्हणण्यापेक्षा पूर्ण खात्रीसह नाही म्हणणे चांगले आहे.
 • ज्या दिवसापासून स्त्रिया सुरक्षितपणे रात्री रस्त्यावर चालू शकतील, त्या दिवसापासून आपण असे म्हणू शकतो की भारताने खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळवले आहे.
 • मित्रांची मैत्री करणे सोपे आहे, पण तुम्ही त्याला शत्रू समजता त्याच्याशी मैत्री करणे म्हणजे खऱ्या धर्माचे सार आहे.
 • आपल्या कामाचा परिणाम काय होईल, हे आपल्याला कधीच माहीत नसते. परंतु आपण काहीही केले नाही तर निकाल लागणार नाही.
 • माणुसकी वरील विश्वास गमावू नका. कारण मानवता म्हणजे समुद्र सारखी आहे, जर समुद्राचे काही थेंब दूषित असतील तर संपूर्ण समुद्र दूषित होणार नाही.
 • सध्या घरात इतकी छान शाळा आणि चांगल्या पालकांसारखा चांगला शिक्षक नाही.
 • सोन्या चांदीचे तुकडे नव्हे तर, आरोग्य हीच संपत्ती आहे.
 • तारुण्य हे वाया घालवण्यासाठी नाही तर, ते विकारांवर विजय मिळवण्यासाठी मिळालेले आहे.
 • स्वतःवर प्रभुत्व असल्याशिवाय, इतर सर्वांवर प्रभुत्व गाजवणे हे भ्रमाचे व निराशेचे ठरणारे असते.
 • सहानुभूती, गोड शब्द, ममतेची दृष्टी, यांनी जे काम होते ते पैशाने कधीच होत नाही.
 • राष्ट्रातील प्रत्येक घर ही शाळा आहे. आणि घरातील माता पिता हे शिक्षक आहेत.
 • माझ्या परवानगीशिवाय मला कोणीही दुखावू शकत नाही.
 • मनाला योग्य विचारांची सवय लागली की, योग्य कृती आपोआप घडते.
 • जे प्रेमाने मिळते ते कायम टिकून राहते. जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदला.
 • खराब अक्षर ही अर्धवट शिक्षणाची निशाणी आहे. कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला. तरी संयम पाळणे हेच शौर्याचे लक्षण आहे.
 • आपण एखादे काम हाती घेतले तर, आपले अंतकरण त्यात ओतावे. पण त्याचे फळ ईश्वरावर सोपवावे.
 • डोळ्याच्या बदल्यात डोळा या तत्त्वज्ञानाने संपूर्ण जग आंधळे होईल.
 • भविष्यात काय घडेल मला त्याबद्दल विचार करायचा नाही. मला वर्तमानाची काळजी आहे.
 • येणाऱ्या क्षणांवर देवाने मला काही नियंत्रण दिले नाही. चूक करणे हे पाप आहे. परंतु चूक लपवणे हे त्याहीपेक्षा मोठे पाप आहे.
 • गुलाबाला उपदेश करण्याची गरज नाही. तो तर त्याचा आनंद पसरवतो. त्याचा सुगंध त्याचा संदेश आहे.
 • चूक करण्याची स्वातंत्रता नसेल तर, त्या स्वातंत्र्याचा काही अर्थ नाही.
 • आपण ज्याची पूजा करतो, त्याचप्रमाणे आपण बनतो.
 • जे आपल्याला जमत असेल, ते काम दुसऱ्यांकडून करून घेऊ नका.
 • व्यक्ती त्याच्या विचारांपासून बनलेला एक प्राणी आहे. तो जसा विचार करतो तसाच तो बनतो.
 • काही लोक यश मिळवण्याचे स्वप्न पाहतात. तर इतर लोक जागृत असतात आणि मेहनत घेतात.
 • जेव्हा आपल्याला प्रतिस्पर्ध्याचा सामना करावा लागतो, तेव्हा त्याला प्रेमाने जिंका.
 • आपल्या ज्ञानावर गरजेपेक्षा जास्त विश्वास ठेवणे, मूर्खपणाचे आहेत.
 • हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, की सर्वात बलवान व्यक्ती कमजोर असू शकतो. आणि सर्वात बुद्धिमान व्यक्ती चूक करू शकतो.
 • जर एखाद्या व्यक्तीला शिकायचे असेल तर, प्रत्येक चूक त्याला काहीतरी शिक्षण देऊ शकते. दुःख भोगल्याशिवाय सुख मिळणार नाही.
 • कोणत्याही देशाची संस्कृती त्या देशाच्या लोकांच्या हृदयात व आत्म्यास असते.
 • आनंद बाहेरून मिळणारी गोष्ट नाही, पण अहंकार सोडल्याशिवाय ती मिळणार नाही.
 • प्रेमाची शक्ती, दंडाच्या शक्ति पेक्षा हजार पटीने प्रभावशाली व स्थायी असते.
 • आपलं मत, आपले विचार बनतात. आपले विचार, आपले शब्द होतात. आपले शब्द आपले कार्य होतात. आपले कार्य आपली सवय बनते. आपली सवय आपली मूल्य बनते. आपले मूल्य आपले भाग्य बनते.
 • भित्रेपणापेक्षा जास्त चांगले आहे, लढून मरावं.
 • पुस्तकांचे मूल्य रत्नांपेक्षा अधिक आहे. कारण पुस्तके अंतकरण उजळवतात.

हे पण वाचा👉 सावित्रीबाई फुले संपूर्ण माहिती

महात्मा गांधी यांच्या घोषणा

साधी राहणी, उच्च विचारसरणीचे महान व्यक्तिमत्व असलेले महात्मा गांधीजींनी त्यांच्या काही महान विचारांसह प्रभावी घोषणा दिल्या आहेत. जे देशवासियांमध्ये देशप्रेमाची भावना तर विकसित करतातच, पण त्यांना सत्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात, महात्मा गांधींच्या काही लोकप्रिय घोषणा पुढीलप्रमाणे आहेत-

 • करा किंवा मरा – महात्मा गांधी
 • आज तुम्ही काय करत आहात यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे – महात्मा गांधी
 • प्रथम ते तुमच्याकडे लक्ष देणार नाहीत, मग ते तुमच्यावर हसतील, आणि मग ते तुमच्याशी लढतील, मग तुम्ही नक्कीच जिंकाल – महात्मा गांधी
 • देवाला धर्म नसतो – महात्मा गांधी
 • शक्ती शारीरिक क्षमतेने येत नाही, ती अदम्य इच्छाशक्तीने येते – महात्मा गांधी
 • आनंद तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही जे काही विचार करता, तुम्ही जे काही बोलता आणि जे करता ते सुसंगत असेल – महात्मा गांधी
 • तुम्ही उद्या मरणार आहात असे आयुष्य जगा, असे शिका की तुम्ही कायमचे जगणार आहात – महात्मा गांधी
 • सत्य कधीही न्याय्य कारणाला इजा करत नाही – महात्मा गांधी
 • कानांच्या गैरवापराने मन प्रदूषित आणि अस्वस्थ होते – महात्मा गांधी

हे पण वाचा👉 राणी लक्ष्मीबाई माहिती मराठी

गांधीजींच्या आयुष्यातील काही किस्से

१) पंडित नेहरू प्रमाणेच महात्मा गांधीजींनाही लहान मुले खूप प्रिय होती. एकदा एक मुलगा बापूजींकडे आला व बापूजींना म्हणाला की बापूजी तुम्ही कपडे पूर्ण का घालत नाहीत? एवढेच का कपडे घातलेत? त्यावेळेस बापूजी म्हणाले की अरे मला मी फार गरीब आहे. मी नवीन कपडे खरेदी नाही करू शकत.

त्यावर तो मुलगा म्हणाला की एवढंच ना मी माझ्या आईला सांगून तुमच्यासाठी नवीन कपडे शिवून आणतो. त्यावेळेस बापूजी त्याला म्हणाले की अरे तू माझ्यासाठी कपडे आणशील, पण माझ्या कुटुंबातील इतर माणसांचं काय त्यावर तो मुलगा म्हणाला की, तुमच्या कुटुंबातील इतर माणसांना सुद्धा मी माझ्या आईकडून कपडे शिवून नक्की आणतो.

मुलगा म्हणाला बापूजी सांगा किती जणांना कपडे शिवून आणू, त्यावेळेस बापूजी हसले आणि म्हणाले अरे मला माझे कुटुंब म्हणजे हा माझा भारत देश आहे. या भारत देशातील ३७ कोटी लोक हे माझ्या कुटुंबातील सदस्य आहेत. जोपर्यंत यांना पूर्ण कपडे मिळणार नाहीत, तोपर्यंत मी माझ्या अंगावर पूर्ण कपडे घालू शकत नाही. या गोष्टीवरून आपल्या लक्षात आले की, बापूजींना भारतातील प्रत्येक लोकांची काळजी होती. प्रत्येक लोकांबद्दल त्यांना तळमळ होती.

२) बापूजी शाळेत शिकत असतानाची ही गोष्ट- बापूजी ज्या वर्गात शिकत होते, त्या वर्गाची तपासणी करण्यासाठी एक अधिकारी आले व त्यांनी इंग्रजी स्पेलिंग लिहिण्यात सांगितले, सर्व मुलांनी स्पेलिंग बरोबर लिहिलेलं होत्या. पण गांधीजी चुकीची स्पेलिंग लिहीत होते, हे त्यांच्या शिक्षकांनी पाहिले. शिक्षकांनी गांधीजींना इशारा केला व शेजारील मुलाची स्पेलिंग पाहून लिहिण्यास सांगितले.

बापूजींनी शिक्षकांकडे दुर्लक्ष केले व चुकीचे स्पेलिंग लिहिले. अधिकारी निघून गेल्यानंतर शिक्षकांनी विचारले की अरे मी तुला इशारा केला होता. तु का लक्ष दिला नाही ? त्यावेळेस बापूजी म्हणाले की एक वेळ उत्तर चुकले तरी चालेल, पण मी चुकीचा मार्ग कधी सुद्धा स्वीकारणार नाही.

हे पण वाचा👉 महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी 

३) गांधीजींच्या साबरमती आश्रमातील हा किस्सा आहे- रात्रीची वेळ होती सर्वजण शांत झोपलेले होते. एक चोर चोरी करण्याच्या उद्देशाने, आश्रमामध्ये शिरला. आश्रमातील काही लोकांच्या प्रसंगावधानामुळे त्या चोराला पकडले गेले. आणि एका खोलीमध्ये बंदिस्त करण्यात आले. सकाळ झाली गांधीजींना ही गोष्ट समजली गांधीजी त्या चोराच्या खोलीमध्ये गेले,. सर्वांना वाटले की आता गांधीजी त्या चोराला शिक्षा करणार चोर सुद्धा मनापासून खूप घाबरले. घडले वेगळेच, गांधीजी चोरा जवळ गेले आणि म्हणाले की नाश्ता केला का ?

गांधीजींचे हे वाक्य ऐकून चोराला आश्चर्य वाटले व आजूबाजूचे लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यावेळेस शेजारील एक व्यक्ती म्हणाला बापूजी हा तर चोर आहे. नाश्त्याचा प्रश्न येतोच कुठे, त्यावेळेस गांधीजी म्हणाले की हा चोर जरी असला तरी तो माणूस आहे. चोराला आपली चूक समजली. त्याच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले. तो गांधीजींच्या पाया पडला व मनाला की इथून पुढे मी कधीच चोरी करणार नाही.

गांधीजींचे नाव मोहन करमचंद गांधी. गुजरात मधील पोरबंदर येथे त्यांचा जन्म झाला. आणि आपल्या कर्तुत्वाने ते मोहनचे महात्मा झाले. कुणीतरी एकदा त्यांना म्हणले की, संदेश द्या. आणि वही पुढे केली. तेव्हा गांधीजी म्हणाले, मी वेगळा काय संदेश देणार. माझं जीवन हाच संदेश आहे. “माय लाईफ इज माय मेसेज.”

अल्बर्ट आईन्स्टाईन नावाचे एवढे मोठे शास्त्रज्ञ ते गांधीजी बद्दल असं म्हणतात, अशा प्रकारचा हाडा मांसाचा मनुष्य या पृथ्वीतलावर होऊन गेला. याच्यावर कदाचित पुढच्या पिढ्या विश्वास ठेवणार नाहीत.

महात्मा गांधी जेव्हा दुसऱ्या गोलमेज परिषदेला गेले, तेव्हा इंग्लंडमध्ये कामगार वस्तीमध्ये राहिले. बाकीचे आपले भारतीय पुढारी मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहिले. पण गांधीजी म्हणायचे सर्वसामान्यांची माझं नातं म्हणून कामगार वस्तीमध्ये छोटीशी खोली घेऊन राहिली. आणि गोलमेज परिषदेच्या मिटींग ते अटेंड करत असत. तेव्हा इंग्लंडमध्ये थोर लेखक विचारवंत वक्ते नाटककार जॉर्ज बर्नार्ड यांना ही गोष्ट कळली की, गांधीजी कामगार वस्तीमध्ये राहिले आहेत. त्यांना वाटलं समजून घ्यावं गांधीजींचे काय तत्वे, सत्य आहे. म्हणून त्यांनी गांधीजींची भेट घेतली.

एके दिवशी ठरलेल्या वेळी जॉर्ज बर्नार्ड गांधीजींना भेटायला गेले. नाटककार असले तर ते फार घमेंडखोर होते. ते नेहमी असं म्हणत की जगामध्ये फक्त तीन शहाणे लोक आहेत. त्या तीन पैकी दोन लोकांचे नाव ते सांगत असत. आणि एकाच नाव सांगत नसत. याचा अर्थ तो तिसरा शहाणा म्हणजे मीच इतका घमेंडखोर मनुष्य गांधीजींना भेटायला गेला. त्यांची गाठ भेट झाली, चर्चा झाली, विचारांची देवाण-घेवाण झाली. आणि चर्चा संपवून जॉर्ज बर्नार्ड बाहेर आले.

पण ही बातमी इंग्लंड मधल्या पत्रकारांना, छायाचित्रकारांना कळली ते सगळे तिथे जमा झाले होते. मग पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार केला आणि जॉर्ज बर्नार्ड यांना विचारले की गांधीजींशी  तुम्ही बोललात,तुम्हाला गांधीजी बद्दल काय सांगायचे आहे? तुमची मतं काय तयार झाली ? काय वाटतं तुम्हाला गांधीजींच्या बद्दल ? तेव्हा ते म्हणाले, थांबा, थांबा, थांबा, आणि शांतपणे ते म्हणाले की, हिमालयाबद्दल आपलं मत कुठे विचारायचं असतंक, हिमालयाच्या पुढे नतमस्तक व्हायचं असतं.

महात्मा गांधी यांचे सामाजिक कार्य

महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेते होते आणि अहिंसक सविनय कायदेभंगाच्या तत्त्वज्ञानासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते सामाजिक कार्यातही सखोलपणे गुंतलेले होते आणि भारतातील गरीब आणि उपेक्षित समुदायांच्या उन्नतीसाठी त्यांनी वकिली केली होती. स्वयंपूर्णतेच्या कल्पनेला चालना देणे आणि स्थानिक संसाधने आणि पारंपारिक कौशल्यांचा वापर करण्यास प्रोत्साहन देणे.

अस्पृश्यता निर्मूलन आणि दलितांच्या उत्थानासाठी म्हणजेच पूर्वी “अस्पृश्य” म्हणून ओळखले जाणारे अभियान. शिक्षणासाठी वकिली करणे आणि मूलभूत साक्षरता आणि संख्या कौशल्यांच्या महत्त्वावर जोर देणे. “सर्वोदय” (सर्वांसाठी कल्याण) या कल्पनेचा प्रचार करणे आणि न्याय्य आणि न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी कार्य करणे. महिलांच्या हक्कांसाठी वकिली करणे आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी काम करणे.

गांधींच्या सामाजिक कार्याच्या पद्धती अहिंसा आणि सत्याग्रह (सत्य शक्ती) च्या तत्त्वांवर आधारित होत्या आणि त्यांचा सामूहिक कृती आणि शांततापूर्ण प्रतिकाराद्वारे सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी व्यक्तींच्या शक्तीवर विश्वास होता. त्यांच्या कल्पना आणि पद्धती जगभरातील सामाजिक कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांना प्रेरणा देत आहेत.

गांधीजींची प्रेरणादायी कथा

ज्यावेळेला महात्मा गांधीजी पुण्याचा पर्णकुटी मध्ये राहायला आले, त्यावेळेस पुण्याच्या पर्णकुटीमध्ये राहायला आल्यानंतर, गांधीजी त्या ठिकाणी लोकांना भेटत असत. एक दिवस मनुदेवींच्या असं लक्षात आलं की गांधीजींचे चप्पल आहे ते चप्पल तुटलेला आहे. म्हणून गांधीजींची पूर्वपरवानगी न घेताच त्यांनी ते चप्पल एका चर्मकार दुरुस्तीसाठी दिली.

गांधीजींना भेटण्यासाठी बरेचसे लोक आले होते. त्यांची भेट घेतल्यानंतर लोक जायला निघाले. काही कामानिमित्त गांधीजी आपल्या पर्णकुटीतून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांनी आपली चप्पल पाहिली तर त्यांना कुठेच दिसली नाही, त्यांनी मनुदेवींना विचारलं की, अरे माझी चप्पल कुठे गेली ? त्यांनी  सांगितलं की, तुमची चप्पल तुटली होती आणि म्हणून मी एका चर्मकाराकडे शिवण्यासाठी दिलेली आहे.

लगेच गांधीजीनी प्रश्न केला की, त्याच्यासाठी किती पैसे लागतील म्हणून,मनुदेविनी उत्तर दिलं की त्यासाठी दोन पैसे लागतील. त्यावर गांधीजी म्हणाले की हे पैसे तू कुठून देणार आहे ? त्यावर मनुदेवी उत्तर दिलं की, माझ्याकडे वर्गणीचे बरेचसे पैसे जमा झाले आहेत, त्यावर गांधीजींना थोडंसं वाईट वाटलं, आणि गांधीजी म्हणाले, हे बघ ते पैसे आपले नाहीयेत. ते आपण हरिजनांसाठी गोळा केलेले पैसे आहेत. तू कमावत नाहीस आणि मी कमावत नाही, त्यामुळे आपण इतरांसाठी गोळा केलेले पैसे आपल्या स्वतःच्या कामासाठी खर्च करणे,. चुकीचे आहे.

तू पटकन जा आणि जसा आहे तसा चप्पल परत माझं घेऊन ये. त्या त्याच्याकडे गेल्या पण चर्मकार मात्र चप्पल द्यायला तयार नव्हता. तो म्हणाला की, गांधीजींची चप्पल माझ्याकडे पुन्हा कधी शिवण्यासाठी येणार नाही. आणि त्यामुळे मी काही पैसे घेत नाही. चर्मकारच गांधींचा चप्पल शिवून घेऊन गांधींच्या जवळ आला. गांधीजींनी त्याला पाहताच त्याला जवळ घेतलं, आणि पर्णकुटीमध्ये पांढऱ्या वस्त्रावर अगदी आपल्याबरोबर बसवलं.

हे पाहून आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटलं. गांधीजींनी त्याला सांगितलं की तू मला हे चप्पल कसं शिवायचं हे शिकवशील का ? मला ह्या गोष्टी येत नाही, आणि मला तुझ्याकडून हे शिकायला आवडेल. आजूबाजूच्या लोकांना आश्चर्य वाटले की, गांधीजींनी एका सामान्य व्यक्तीला सुद्धा आपल्या गुरुस्थानी बसवले आणि त्याच्याकडून बरेचसे चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या शिकण्यास सुरुवात केली. आणि त्यानंतर गांधीजींनी ते चर्मकार कडून चप्पल कशी शिवायची हेच ज्ञान घेतलं. किंवा त्याची कला शिकून घेतली.

ही छोटीशी गोष्ट गांधीजींच्या आयुष्यातली आपल्याला सांगते की, आपल्याही बाबतीमध्ये आपण अनेक व्यक्तींना आयुष्यात भेटत असतो. त्यांच्या प्रत्येकाकडे काही ना काही तरी चांगला गुण असतो. आपल्याकडेही गुणग्राहकता असायला हवी. आपल्याला जर आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल, किंवा काहीतरी वेगळं करायचं असेल तर, आपल्याला अशा सर्व व्यक्तींच्याकडून जे चांगले गुण आहेत.ते घेतले पाहिजे. आणि आपल्या आतमध्ये असणारा विद्यार्थी आहे तो कायम जागा ठेवला पाहिजे. तरच आपण या छोट्या छोट्या गोष्टी शिकू शकतो.

महात्मा गांधी पुरस्कार व सन्मान

 • इ.स. १९३० मध्ये टाइम मासिकाने गांधी यांना ‘द मॅन ऑफ दी इयर’ म्हणून संबोधित केले.
 • नागपूर विद्यापीठाने त्यांना एलएल.डी. ही पदवी इ.स. १९३७ मध्ये दिली.

महात्मा गांधींनी लिहिलेली पुस्तके

 • Indian Home Rule (हिंद स्वराज्य)
 • गांधीजींची संक्षिप्त आत्मकथा
 • गांधीजीचे जीवन त्यांच्याच शब्दांत
 • गांधी विचार दर्शन : अहिंसाविचार
 • गांधी विचार दर्शन : राजकारण
 • गांधी विचार दर्षन : सत्याग्रह प्रयोग
 • गांधी विचार दर्शन : सत्याग्रह विचार
 • गांधी विचार दर्शन : सत्याग्रहाची जन्मकथा
 • गांधी विचार दर्शन : हरिजन
 • नैतिक धर्म
 • भगवद्गीता : गांधीजींच्या चिंतनातून (महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवद्गीतेचे केलेले नेमके विवेचन; मराठी अनुवाद : भगवान दातार)
 • माझ्या स्वप्नांचा भारत

महात्मा गांधींवरील पुस्तके

 • महात्मा गांधींवर अनेक लेखकांनी पुस्तके लिहिली आहेत. एका अहवालानुसार गांधींवर एक लक्ष पेक्षा अधिक पुस्तक देशी-विदेशी भाषांमध्ये लिहिली गेली आहेत.
 • अखंड प्रेरणा गांधीविचारांची (डॉ. रघुनाथ माशेलकर)
 • असा झाला पुणे करार (प्रभाकर ओव्हाळ; प्राजक्त प्रकाशन)
 • अस्त गांधीयुगाचा आणि नंतर (अनंत ओगले)
 • अज्ञात गांधी नावाचे पुस्तक नारायणभाई देसाई यांनी लिहिले आहे. सुरेशचंद्र वारघडे यांनी त्याचे मराठीत भाषांतर केले आहे.
 • आपले बापू (माया बदनोरे)
 • गंगेमध्ये गगन वितळले (अंबरीश मिश्र)
 • Gandhi-An Illustrated Biography (प्रमोद कपूर)
 • गांधी आणि अली बंधू : एका मैत्रीचे चरित्र (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक – राखहरी चॅटर्जी; मराठी अनुवादक – ?)
 • गांधी आणि आंबेडकर (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका – एलिनाॅर झेलियट; मराठी अनुवाद – ?)
 • गांधी आणि आंबेडकर (गं.बा. सरदार)
 • गांधी : गीता (प्रा. डाॅ. विश्वास पाटील)
 • गांधीजी आणि त्यांचे टीकाकार (सुरेश द्वादशीवार, आधी भाषणमाला, मग लेखमाला (दोन्ही १५ ऑगस्ट २०१७ ते २४ फेब्रुवारी २०१८) आणि नंतर पुस्तक (२८ फेब्रुवारी २०१८)
 • गांधी उद्यासाठी (५० लेखांचा संग्रह, संपादक दिलीप कुलकर्णी)
 • गांधी – जसे पाहिले जाणिले विनोबांनी (विनोबा भावे)
 • गांधीजींचे असामान्य नेतृत्व
 • गांधीजींचे जीवन त्यांच्याच शब्दांत
 • गांधीजींच्या आठवणी (शांतिकुमार मोरारजी, स्वामी आनंद; मराठी अनुवाद – अंबरीश मिश्र)
 • गांधीजी होते म्हणून (बाळ पोतदार)
 • गांधींनंतरचा भारत (मूळ इंग्रजी लेखक रामचंद्र गुहा, मराठी अनुवाद शारदा साठे)
 • गांधी नावाचे महात्मा (अनेक विद्वानांनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह-संपादक रॉय किणीकर)
 • गांधी पर्व (दोन खंड, गोविंद तळवलकर)
 • गांधी : प्रथम त्यांस पाहता (मूळ थॉमस वेबर, मराठी अनुवाद सुजाता गोडबोले)
 • गांधी भारतात येण्यापूर्वी (अनुवादित, मूळ लेखक – रामचंद्र गुहा; अनुवादक – शारदा साठे)
 • गांधी-विचार (ठाकुरदास बंग)
 • गांधी, विनोबा आणि जयप्रकाश (मिलिंद बोकील)
 • चले जाव आंदोलन (बा.बा. राजेघोरपडे)
 • डी. जी. तेंडुलकर यांचे आठ खंडी “महात्मा : लाईफ ऑफ मोहनदास करमचंद गांधी”
 • द डेथ ॲन्ड आफ्टरलाईफ ऑफ महात्मा गांधी (इंग्रजी पुस्तक, २०१५; लेखक : मकरंद आर. परांजपे)
 • दुसरे प्रॉमिथियस : महात्मा गांधी (वि.स. खांडेकर)
 • बहुरूप गांधी (मूळ अनू बंदोपाध्याय, मराठी अनुवाद – शोभा भागवत)
 • बापू-माझी आई (मूळ मनुबहेन गांधी, मराठी अनुवाद – ना.गो. जोशी)
 • बापूंच्या सहवासात (संपादक – अरुण शेवते)
 • मराठीमध्ये पु.ल. देशपांडे आणि अवंतिकाबाई गोखले यांनी गांधीजींचे चरित्र लिहिले आहे.
 • प्यारेलाल आणि सुशीला नायर यांचे दहा खंडी “महात्मा गांधी”. (उल्लेखनीय)
 • महात्मा आणि मुसलमान (यशवंत गोपाळ भावे)
 • महात्मा गांधी आणि आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय” (नामदेव कांबळे)
 • महात्मा गांधी आणि त्यांचा भारतीय संघर्ष (अनुवादित, मूळ इंग्रजी Great Soul Mahatma Gandhi and His Struggle with India, लेखक – जोसेफ लेलिव्हेल्ड , मराठी अनुवाद – मुक्ता देशपांडे)
 • महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना (नरेंद्र चपळगावकर)
 • महात्मा गांधींची विचारसृष्टी (लेखक – यशवंत सुमंत)
 • महात्मा गांधी : जीवन आणि कार्य (अनुवादित, मूळ इंग्रजी The Life of Mahatma Gandhi, लेखक – लुई फिशर; मराठी अनुवादक : वि.रा. जोगळेकर). हेच पुस्तक वाचून रिचर्ड ॲटनबरो याने ‘गांधी’ सिनेमा बनवला..
 • “मोहनदास” (राजमोहन गांधी (इंग्लिश पुस्तक); मराठी अनुवाद: मुक्ता शिरीष देशपांडे)
 • लेट्स किल गांधी (मूळ तुषार गांधी, अनुवाद अजित ठाकुर)
 • विधायक कार्यक्रम
 • शोध गांधींचा (चंद्रशेखर धर्माधिकारी)
 • सत्याग्रही समाजवाद व व मार्क्सवादाचा समन्वय : आचार्य शं. द. जावडेकरकृत मीमांसा (प्राचार्य डॉ. शिरीष पवार)
 • सूर्यासमोर काजवा : गांधीहत्येचा इतिहास (चुनीभाई वैद्य)

गांधींच्या विचारांवर आधरित हिंदी चित्रपट

 • अछूतकन्या
 • चंडीदास : चित्रपटाची सुरुवात अशी आहे – एक ब्राह्मण आणि एक धोबीण एका नदीच्या घाटावर कपडे धुवायला आली आहेत. दोघांची प्रतिबिंबे पाण्यात पडली आहेत. एक लाट येते, दोन्ही प्रतिमा एकमेकांत मिसळून जातात, आणि एका प्रेमकथेची सुरुवात होते. दिग्दर्शक – देवकी बोस
 • दो ऑंखे बारा हाथ : दिग्दर्शक, निर्माता – व्ही. शांताराम
 • महात्मा विदूर : या चित्रपटात विदुराला चष्मा आहे आणि त्याच्या हातात काठी आहे. चित्रपटाचे निर्माते द्वारकादास संपत.
 • सुजाता : दिग्दर्शक – बिमल
 • चित्रपट- ‘गांधी’ (1982) दिग्दर्शन – रिचर्ड अॅटनबरो गांधीजींची भूमिका साकारली – किन्सले हॉलिवूडचा कलाकार झाला
 • 2- चित्रपट- “गांधी माय फादर” (2007) दिग्दर्शक- फिरोज अब्बास मस्तान गांधीजींची भूमिका साकारली – दर्शन जरीवाला
 • 3- चित्रपट- “हे राम” (2000) दिग्दर्शक- कमल हासन गांधीजींची भूमिका साकारली – नसीरुद्दीन शाह
 • ४- चित्रपट- “लगे रहो मुन्नाभाई” दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (2006) गांधीजींची भूमिका केली – दिलीप प्रभावळकर
 • 5- चित्रपट- “द मेकिंग ऑफ गांधी” (1996) दिग्दर्शक- श्याम बेनेगल गांधीजींची भूमिका साकारली – रजित कपूर
 • 6- चित्रपट- “मी गांधींना मारले नाही” (2005) दिग्दर्शन – जाह्नू बरुआ याशिवाय गांधीजींच्या जीवनावर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

प्रश्न

महात्मा गांधींना कोण कोणत्या नावाने ओळखतात?

मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी, बापू किंवा राष्ट्रपिता.

गांधींना पहिल्यांदा बापू कोणी संबोधले?

६ जुलै १९४४ रोजी सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधींना बापू” ही पदवी दिली होती. गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी सिंगापूर रेडिओद्वारे त्यांच्या भाषणावर ही पदवी देण्यात आली होती.

गांधी जयंती हा राष्ट्रीय सण का आहे?

महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध भारतीय स्वातंत्र्य चळवळीत उत्प्रेरक म्हणून काम करणाऱ्या अहिंसक प्रतिकाराचा वापर केला. देशासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करण्यासाठी, गांधी जयंती ही भारतातील राष्ट्रीय सुट्टीपैकी एक म्हणून ओळखली जाते.


लोक गांधी जयंती कशी साजरी करतात?

गांधी जयंती ही संपूर्ण भारतभर त्यांची आठवण म्हणून तसेच प्रार्थना, सेवा आणि श्रद्धांजली द्वारे साजरी केली जाते. गांधींच्या स्मारक, राज घाट, नवी दिल्ली येथे श्रद्धांजली अर्पण केली जाते. ज्याठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले होते.  प्रार्थना सभा, महाविद्यालये, स्थानिक सरकारी संस्था आणि सामाजिक-राजकीय संस्थांद्वारे विविध शहरांमध्ये स्मरण समारंभ यांचा समावेश होतो.

निष्कर्ष – mahatma gandhi biography in marathi

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महात्मा गांधीजी बद्दल माहिती सांगितली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. या लेखात दिलेली महात्मा गांधी माहिती मराठी व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

15 thoughts on “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची माहिती | Mahatma Gandhi Information In Marathi”

 1. I am not sure where you’re getting your info, but good topic. I needs to spend some time learning much more or understanding more. Thanks for magnificent info I was looking for this information for my mission.

  Reply
 2. What i don’t understood is in reality how you’re now not really a lot more smartly-favored than you might be now. You’re very intelligent. You understand therefore significantly in terms of this topic, produced me personally believe it from a lot of numerous angles. Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga! Your own stuffs outstanding. Always care for it up!

  Reply
 3. you are truly a just right webmaster. The site loading speed is incredible. It kind of feels that you’re doing any distinctive trick. In addition, The contents are masterwork. you have done a great activity in this matter!

  Reply
 4. I do not even know how I ended up here, but I thought this post was great. I don’t know who you are but definitely you’re going to a famous blogger if you aren’t already 😉 Cheers!

  Reply
 5. I loved as much as you will receive carried out right here. The sketch is tasteful, your authored subject matter stylish. nonetheless, you command get got an edginess over that you wish be delivering the following. unwell unquestionably come further formerly again as exactly the same nearly very often inside case you shield this hike.

  Reply
 6. What i don’t understood is in reality how you’re now not really a lot more smartly-favored than you might be now. You’re very intelligent. You understand therefore significantly in terms of this topic, produced me personally believe it from a lot of numerous angles. Its like women and men are not interested except it is one thing to accomplish with Woman gaga! Your own stuffs outstanding. Always care for it up!

  Reply
 7. obviously like your web-site but you need to test the spelling on quite a few of your posts. Several of them are rife with spelling problems and I to find it very troublesome to inform the reality on the other hand I’ll certainly come back again.

  Reply
  • Basically this article is written in indian Marathi language. as i m not fluent in english. As per the location, you are viewing the google translated version of the original post.
   thus there may be some problems .

   Reply

Leave a comment