पी व्ही सिंधू माहिती मराठी | pv sindhu information in marathi – ऑलम्पिक खेळामध्ये भारत देश स्वतःचे नाव उंचावत आहे. भारत देशाला गौरवित करण्यासाठी भारत देशातील मुलींचे सुद्धा मोठ्या प्रमाणत योगदान आहे. यामध्ये बॅडमिंटन प्लेयर पी. व्ही. सिंधू ही पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे, जिने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक सिल्वर मेडल जिंकले आहे. त्यासोबतच ती भारताची पाचवी महिला ऑलिंपिक मेडलिस्ट बनली आहे.
पी व्ही सिंधू ही टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकणारी व रियो ओलंपिक मध्ये रौप्य पदक जिंकून भारताला जगामध्ये एक विशिष्ट स्थान मिळवून देणारी प्रसिद्ध खेळाडू आहे. सुपरसीरीज बॅडमिंटन स्पर्धेत सिंधूने जेतेपद पटकवून, भारताचे नाव उंचावले. ऑलिंपिक जेतेपद पटकवणारी सिंधू ही भारताची पहिली महिला बॅडमिंटनपटू आहे.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पी. व्ही. सिंधू बद्दल माहिती दिली आहे. ही माहिती संपूर्ण पाहण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.
पी व्ही सिंधू माहिती मराठी | pv sindhu information in marathi
पूर्ण नाव | पुसारला वेंकट सिंधु |
जन्मतारीख | ५ जुलै १९९५ |
जन्मठिकाण | हैदराबाद, तेलंगाना, भारत |
वडिलांचे नाव | पी. वी. रमण (पूर्व वॉलीबॉल खेळाडू) |
आईचे नाव | पी. विजया (पूर्व वॉलीबॉल खेळाडू) |
भावंडे | पी. वी. दिव्या |
स्थानिक | हैदराबाद, भारत |
व्यवसाय | संपूर्ण महिला बॅडमिंटन खेळाडू |
राष्ट्रीयता | भारतीय |
कॉलेज | सेंट एन्न्स कॉलेज फॉर वुमेन, मेहदीपटनम (एमबीए पर्स्युइंग) |
प्रशिक्षक | पुलेला गोपीचंद |
१९९ (सर्वोच्च रँकिंग) | ९ (१३ मार्च २०१४) |
वर्तमान स्थान | १० (०७ एप्रिल, २०१६) |
हाताचा वापर | उजवा हात |
पी व्ही सिंधू यांचे चरित्र
पुसारला वेंकटा सिंधू म्हणजेच पीव्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहेत. विद्यमान विश्व बॅडमिंटन क्रमांक तीन यामध्ये सिंधूने प्रथम भारतीय महिला खेळाडू म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. ज्यामध्ये तिने ओलंपिक रजत पदक जिंकले आहे. वर्ष २०१२ च्या दरम्याने अवघ्या सतरा वर्षाच्या वयामध्ये सिंधूने विश्व बँडमिंटन खेळामध्ये सगळ्यांना आश्चर्यचकित केले. सिंधूच्या या आश्चर्यजनक खेळामुळे सिंधूला सातत्याने यश प्राप्त होत राहिले.
२०१३ विश्व चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला खेळाडू बनली. यानंतर सिंधुने २०१६ च्या दरम्याने रिओ डी जेनेरिओ ऑलिंपिकमध्ये रजत पदक प्राप्त करून एक वेगळा इतिहास रचला. सायना नेहवाल नंतर सिंधू ही बॅडमिंटनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारी दुसरी भारतीय महिला बनली.
कोण आहे पी व्ही सिंधू ?
पी व्ही सिंधू ही भारतातली स्टार बॅडमिंटन खेळाडू आहे. जी हैदराबादची स्थायिक आहे. सिंधूने टोकियो ओलंपिक २०२० मध्ये कास्यपदक, तर रियो ओलंपिक २०१६ मध्ये सिल्वर मेडल स्वतःच्या नावे केले. सतत दोन वेळा ऑलिंपिक मॅडम जिंकणारी सिंधू बनली. सिंधूने बर्मिंगहॅम आयोजित कॉमनवेल्थ गेम २०२२ मध्ये झालेल्या बॅडमिंटन स्पर्धेत गोल्ड मेडल स्वतःच्या नावे करून घेतले. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुद्धा पदके जिंकली.
- नक्की वाचा 👉👉 सानिया मिर्झा माहिती मराठी
- नक्की वाचा 👉👉 पी टी उषा यांची माहिती मराठी
पी व्ही सिंधू यांचा जन्म आणि बालपण
पुसारला वेंकट सिंधू अर्थात पीव्ही सिंधू यांचा जन्म दि.०५ जुलै १९९५ रोजी हैदराबाद या ठिकाणी झाला. पीव्ही सिंधूचे माता- पिता पीव्ही रम, पी.विजया पूर्व वॉलीबॉल खेळाडू आहेत. पीव्ही सिंधू यांची बहीण तिचे नाव पीव्ही दिव्या आहे. २००० साली मध्ये पीव्ही सिंधूंच्या वडिलांना पीव्ही रमण यांना त्यांच्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरविले. त्यांच्या घरामध्ये बॅडमिंटन खेळाची रुची असल्याकारणाने, सिंधूला सुद्धा खेळण्याची आवड निर्माण झाली. वयाच्या अवघ्या आठ वर्षाच्या काळात सिंधूने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.
पी.व्ही सिंधूने बॅडमिंटनची निवड का केली ?
पी.व्ही सिंधूचे आई-वडील दोघेही व्हॉलीबॉल खेळाडू होते. सिंधूला सुद्धा बॅडमिंटनमध्ये अतिशय आवड होती. पुलेला गोपीचंद यांच्या कर्तुत्वाने प्रभावित होऊन, सिंधुने बॅडमिंटन खेळामध्ये पदार्पण केले.
पी.व्ही सिंधूची नोकरी
पी.व्ही सिंधू हिने जुलै २०१३ पासून भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड हैदराबाद कार्यालयामध्ये सहाय्यक्रीडा व्यवस्थापक म्हणून काम केले. रिओ ऑलम्पिक मध्ये पदक जिंकल्यानंतर सिंधूने पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये उपक्रीडा व्यवस्थापक म्हणून काम केले. याशिवाय सिंधूची ब्रिज स्टोन इंडियाची पहिली ब्रँड अँबेसिडर म्हणून निवड करण्यात आली. पी.व्ही सिंधू ही देशांमध्ये प्रीमियम बॅडमिंटन लीग मध्ये हैदराबाद हंटर्सची कर्णधार म्हणून सुद्धा राहिली होती.
पी. व्ही. सिंधू यांचे कुटुंब
वडील | पी. वी. रमण (पूर्व वॉलीबॉल खेळाडू) |
आई | पी. विजया (पूर्व वॉलीबॉल खेळाडू) |
बहिण | पी. वी. दिव्या |
पी व्ही सिंधूंचे शिक्षण
पी व्ही सिंधू यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळातील शिक्षण ऑक्सीलियम हायस्कूल सिकंदराबाद या ठिकाणी घेतले, जे हायस्कूल हैदराबाद या ठिकाणी आहे. पुढच्या शिक्षणासाठी सेंट एन कॉलेज विमेन मेहदीपट्टनम, हैदराबाद मध्ये शिक्षण घेतले व त्या ठिकाणी तिने एमबीए ही डिग्री संपादित केली.
पी व्ही सिंधू प्रारंभिक प्रशिक्षण आणि प्रशिक्षक
पी व्ही सिंधू हिने बॅडमिंटन शिकण्यासाठी सुरुवातीच्या काळात सिकंदराबाद या ठिकाणी भारतीय रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग आणि टेलिकम्युनिकेशन मध्ये मेहबूब अली यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तिने पुलेला गोपीचंद यांच्या बॅडमिंटन अकादमी मध्ये बॅडमिंटन प्रशिक्षणासाठी सुरुवात केली.
त्यांचे प्रशिक्षक गोपीचंद पुलेला यांनी सांगितले की, “सिंधूचे व्यक्तिमत्व सगळ्यात अनोखे आहे. ती कधीच कोणत्या गोष्टीबाबत हार मानत नाही. प्रयत्न करत राहते. त्यांनी सांगितले की, कोचिंग कॅम्प हा सिंधूच्या घरापासून ५६ किलोमीटर दूर असला, तरीही रोजच्या वेळी ती प्रशिक्षणासाठी न चुकता वेळेवर हजार राहायची. ती तिच्या खेळाच्या प्रती खूप समर्पण पाळते.
पीव्ही सिंधू – बॉयफ्रेंड आणि नातेसंबंध
आमच्या माहितीनुसार पीव्ही सिंधू कोणत्याही प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये नाही. ती बॅडमिंटनसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि तिला अधिकाधिक यश मिळवायचे आहे. तिची खूप यशस्वी कारकीर्द आहे पण तिची भूक आणि इच्छा कधीही न संपणारी आहे.
पी. व्ही. सिंधू हिची कारकीर्द – पीव्ही सिंधूच्या उपलब्धी / रेकॉर्ड
राष्ट्रकुल खेळ
- २०१४ राष्ट्रकुल खेळांमध्ये कांस्य पदक
- २०१८ राष्ट्रकुल खेळांमध्ये रजत पदक
आशियाई चॅम्पियनशिप
- २०१४ मध्ये कांस्य पदक
ओलंपिक खेळ
- २०१६ मध्ये रजत पदक
- २०२० मध्ये कांस्य पदक
बीडब्ल्यूएफ वर्ल्ड चैंपियनशिप
- २०१३ विश्व चैम्पियनशिप में कांस्य पदक
- २०१४ विश्व चैम्पियनशिप में कांस्य पदक
- २०१७ विश्व चैम्पियनशिप रजत पदक
- २०१८ विश्व चैम्पियनशिप मध्ये रजत पदक
- २०१९ विश्व चैम्पियनशिप मध्ये स्वर्ण पदक
दक्षिण आशियाई खेळ
- २०१६ मध्ये रजत पदक
आशियाई खेळ
- २०१८ आशियाई खेळमध्ये रजत पदक
ऑलिम्पिक खेळांची पदके- जागतिक स्पर्धा
२०१६ रिओ ऑलम्पिक मधील पीव्ही सिंधूची कामगिरी आणि यश
पी व्ही सिंधू ने २०१६ च्या उन्हाळी ऑलिंपिक मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते. ज्यामध्ये तिला ब्राझीलच्या रिओ दि जानेरो या ठिकाणी झालेल्या, या रियो ओलंपिक स्पर्धेमध्ये महिला एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी सिंधू ही प्रथम भारतीय महिला ठरली. उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये सिंधूने जपानच्या नोझोमी ओकोहाराच्या २९-१९ व २१-१० अशा सरळ स्टेट मध्ये पराभव केला. अंतिम फेरीत सिंधूचा सामना जागतिक क्रमांकवारे अव्वल मानांकित कॅरोलिना मारिन हिच्यासोबत झाला, त्यामध्ये सुद्धा सिंधूने पहिला गेम २१-१९ असा खेळून जिंकला. परंतु मारीनने २१-१२ असा करून दुसरा गेम जिंकला. त्यामुळे सामना तिसऱ्या गेम पर्यंत कायम राहिला. तिसऱ्या गेम मध्ये सिंधूला रौप्य पदक प्राप्त झाले.
टोकियो ओलंपिक २०२१ मधील पीव्ही सिंधूची कामगिरी आणि यश
पी व्ही सिंधूने टोकियो मध्ये आयोजित केलेल्या, ऑलिंपिक स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवला. यामध्ये सुवर्णपदक प्राप्त करणारी, चीनची प्रसिद्ध खेळाडू चिनी ताईपे की ताई जू यिंग हिने सेमीफायनल मध्ये २१-१८, २१-१२ सिंधू सोबत प्रतिस्पर्धीमध्ये हारून, भारताला सुवर्णपदक प्राप्त करून दिले. पीव्ही सिंधू हिने रविवारी ०१ ऑगस्ट २०२१ च्या दरम्याने झालेली, ऑलम्पिक स्पर्धेमध्ये चीनची खिलाडी बिंगजियाओ कोसीट सेटो हिला हरवून भारताला कांस्यपदक मिळवून दिले. ऑलम्पिक स्पर्धेमध्ये दोनदा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला बनली.
कॉमनवेल्थ गेम्स २०२२ बर्मिंघम मध्ये सिंधूने भारताला आणखी एक सुवर्ण पदक मिळवून दिले
दोन वेळा ऑलंपिक पदक जिंकणारी पीव्ही सिंधू ही भारताची पहिली महिला ठरली. जिने सोमवार दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ मध्ये बर्मिंघम या ठिकाणी राष्ट्रमंडळ खेळ २०२२ मध्ये बॅडमिंटन खेळामध्ये कॅनडाच्या मिशेल हिला २१-१५, २१-१३ अशा गुणांनी हरवून भारताला पुन्हा एकदा सुवर्णपदक प्राप्त करून दिले.
पी व्ही सिंधू बद्दल वाद
जपानमध्ये झालेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अकाने यामागुची हिच्या विरुद्धच्या सामन्यामध्ये पंचांनी अयोग्य निर्णय घेतल्याकारणाने, पी व्ही सिंधूला तिथे अश्रू थांबवणे अनावर झाले. शनिवारी झालेल्या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत, जपानच्या अकाने यामागुची कडून तीन गेम मध्ये पराभव प्राप्त झाल्यानंतर, दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी व्ही सिंधूने रेफ्रीकडे मदत मागितली. सिंधूने पंचानी केलेल्या अन्यायकारक निर्णयामुळे नाराजी व्यक्त केली. त्यामुळे सिंधूला या बॅडमिंटन आशिया चॅम्पियनशिप मध्ये सुवर्णपदक मिळवता आले नाही व त्यावेळी सिंधूने कांस्यपदक पटकावले होते.
पी व्ही सिंधूचा संघर्षाचा काळ
जागतिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवण्यापूर्वी, पी व्ही सिंधूवर एक महत्त्वपूर्ण टीका करण्यात आली. कारण तिला सुवर्णपदक नव्हे तर फक्त रौप्य व कांस्यपदक प्राप्त होत होती. यातूनच पी व्ही सिंधू ला सुवर्णपदक जिंकण्याची प्रेरणा प्राप्त झाली. सिंधूच्या मते, खेळामध्ये अनेक वेळा विजय – पराभव हा होतच असतो. खेळात पराभूत होताना पी व्ही सिंधू सुद्धा निराश होत असे. परंतु तिने कधीच हार न मानता चिकाटीने व धैर्याने मेहनत करून, सुवर्णपदक जिंकण्याच्या ध्येयासाठी वाटचाल सुरूच ठेवली व जागतिक स्पर्धेत शेवटच्या गेम मध्ये पी व्ही सिंधू ने सुवर्णपदक जिंकवून, तिच्यावर झालेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
ती म्हणते, आशावादी दृष्टिकोनामुळे सामना जिंकण्यास तिला मदत झाली. बॅडमिंटन स्पर्धेमध्ये रौप्य पदक जिंकणारी, पहिली भारतीय महिला म्हणून, पी व्ही सिंधूकडे पाहिले जाते. परंतु ऑलम्पिकच्या सामन्या पहिले सिंधूच्या घोट्यातील स्ट्रेस फ्रॅक्चर मुळे तिला हालचाल करायला जमली नाही, त्यामुळे तिने न डगमगता व न धैर्य सोडता, स्वतःचे सातत्य ऑलिंपिकच्या खेळामध्ये स्थिर ठेवले व उन्हाळी ऑलिंपिक मध्ये तिने भाग घेऊन रौप्य पदक जिंकले.
पी.व्ही. सिंधू अचिव्हमेंट्स /उपलब्धी
पी.व्ही. सिंधू वैयक्तिक शीर्षके –
२०१६ | चाइना ओपन | सुन यू | २१-११, १७-२१, २१-११ |
२०१७ | सय्यद मोदी इंटरनेशनल | ग्रेगोरिया मारिस्का | २१-१३, २१-१४ |
२०१७ | इंडिया ओपन | कॅरोलिना मरीन | २१-१९, २१-१६ |
२०१७ | कोरिया ओपन | नोज़ोमी ओकुहारा | २२-२०, ११-२१, २१-१८ |
२०१८ | वर्ल्ड टूर फाइनल | नोज़ोमी ओकुहारा | २१-१९, २१-१७ |
पी.व्ही. सिंधू वैयक्तिक उपविजेते पद –
२०१७ | बीडब्लूऍफ़ सुपर सीरीज फाइनल | अकाने यामागुची | २१-१५, १२-२१, १९-२१ |
२०१८ | इंडिया ओपन | बेईव्हन | १८-२१, २१-११, २०-२२ |
२०१८ | थाईलैंड ओपन | नोज़ोमी ओकुहारा | १५-२१, १८-२१ |
पीव्ही सिंधू राष्ट्रीय पुरस्कार
- अर्जुन पुरस्कार (२०१३)
- पद्मश्री (२०१५)
- राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२०१६)
- पद्मभूषण पुरस्कार (२०२०)
पी. व्ही. सिंधू इतर पुरस्कार
- FICCI ब्रेकथ्रू स्पोर्ट्स पर्सन ऑफ़ द ईयर २०१४
- एनडीटीव्ही इंडियन ऑफ़ डायर २०१४
- वर्ष २०१५ मध्ये मकाऊ ओपन बैडमिंटन चैंपियनशिप जिंकल्यावर बैडमिंटन एसोसिएशन ऑफ़ इंडिया कडून १० लाख रूपये दिले.
- वर्ष २०१६ मध्ये मलेशिया मास्टर्स जिंकल्यावर बैडमिंटन एसोसिएशन ऑफ़ इंडिया कडून ०५ लाख रूपये दिले
पी.व्ही. सिंधू आवडनिवड
आवडती व्यंजने | बिर्याणी , इटालियन व्यंजने |
छंद | बॅडमिंटन खेळणे |
आवडता अभिनेता | ऋतिक रोशन, प्रभास, महेश बाबु |
पी.व्ही. सिंधूचा लूक
उंची | ५ फूट १०.५ इंच |
वजन | ६५ किलो |
शरीराचे मापन | ३४-२६-३६ |
डोळ्याचा रंग | काळा |
केसांचा रंग | काळा |
पीव्ही सिंधूची सोशल मेडीया खाती
क्लिक करा Twitter
क्लिक करा Instagram
पीव्ही सिंधूची संपत्ती 2023
PV सिंधूची एकूण संपत्ती अंदाजे 6 दशलक्ष USD (44 कोटी) आहे, जी भारतीय चलनात अंदाजे 44 कोटी भारतीय रुपये आहे. पुसारला वेंकट सिंधू उर्फ पीव्ही सिंधू ही भारतातील सर्वोत्कृष्ट बॅडमिंटनपटूंपैकी एक आहे. गेल्या काही वर्षांत पीव्ही सिंधूच्या नेट वर्थमध्ये 25% वाढ झाली आहे. तसेच, पीव्ही सिंधूची बहुतांश कमाई ब्रँड एंडोर्समेंट आणि वैयक्तिक गुंतवणुकीतून येते.
नाव | पीव्ही सिंधू |
नेट वर्थ | $6 दशलक्ष |
व्यवसाय | भारतीय बॅडमिंटनपटू |
पगार | रु. 6 कोटी + |
मासिक उत्पन्न | रु. 50 लाख + |
शेवटचे अद्यावत | 07-10-2023 |
पीव्ही सिंधू हिची मालमत्ता
पीव्ही सिंधूच्या गाड्या : पीव्ही सिंधूकडे एक BMW X5 SUV आणि दुसरी BMW कार आहे. तिच्या दोन्ही कार तिला अनुक्रमे एका अभिनेत्याने आणि एका राजकारण्याने भेट दिल्या होत्या.
पीव्ही सिंधूचे घर : पीव्ही सिंधू तिच्या कुटुंबासह हैदराबादमध्ये राहते आणि तिने नुकतेच तेथे दुसरे घर घेतले आहे. के चंद्रशेखर राव यांच्या हस्ते तिला २०१७ मध्ये चाव्या देण्यात आल्या.
पीव्ही सिंधू: प्रायोजक, ब्रँड एंडोर्समेंट, व्यवसाय उपक्रम
फोर्ब्सने नोंदवल्यानुसार सिंधू कोर्टवरच्या खेळासोबतच, सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंपैकी एक आहे . सिंधू एक ब्रँड फिगर असल्याने, या लेखात आम्ही तीच्या गेल्या काही वर्षांतील व्यवसाय उपक्रमांवर एक नजर टाकू.
सध्याचे प्रायोजक, ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसाय उपक्रम
Biryani By Kilo | A23 Games | Visa |
Asian Paints | Spinny | Bank of Baroda |
Airtel | Li-Ning | Natural Ice Cream |
Maybelline | Stayfree | PNB MetLife |
Pooja Crafted Homes | Myntra | Gatorade |
पूर्वीचे प्रायोजक, ब्रँड एंडोर्समेंट आणि व्यवसाय उपक्रम
Yonex | JBL | Bridgestone | |
Nokia | Boost | Visakhapatnam Steel Plant | |
Apis | Moov | Bengaluru Lions | |
GST | Panasonic | Ojasvita |
पी.व्ही.सिंधू विषयी मनोरंजक तथ्ये
- सिंधू लहानपणापासूनच खूप मेहनती होती. सिंधू बॅडमिंटनचे ट्रेनिंग रोज सकाळी ४.१५ वाजता सुरू होत असे.
- इसवी सन २००० मध्ये सिंधूचे पिता पी.व्ही.रमण राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाच्या अविस्मरणीय योगदानासाठी त्यांना सर्वोच्च “अर्जुन पुरस्कार” देऊन सन्मानित केले होते.
- सिकंदराबाद मध्ये भारतीय रेल्वे संस्थाचे महबूब अली यांच्याकडून सिंधूने बॅडमिंटनचे मार्गदर्शन प्राप्त केले.
- यानंतर सिंधूने गोपीचंद बॅडमिंटन अकादमी मध्ये प्रवेश घेतला.
- गोपीचंदन इंडियन बॅडमिंटन टीमचे मुख्य प्रशिक्षक होते.
- २०१४ साल हे एनटीडीटीव्ही द्वारे “इंडियन ऑफ द इयर” म्हणून घोषित केले गेले.
- सिंधूचे माता पिता पूर्व व्हॉलीबॉल खेळाडू होते.
पी.व्ही सिंधू बद्दल थोडक्यात माहिती
- पी.व्ही सिंधूकडे भारतीय बॅडमिंटनचा चेहरा म्हणून पाहिलं जातं. अनेक विक्रम सिंधूच्या नावावर नोंदवले गेले आहेत. स्वतःवरचा आढळ विश्वास हीच सिंधूची सगळ्यात मोठी ताकद आहे.
- पी.व्ही सिंधूचे आई वडील हैदराबाद मध्ये व्हॉलीबॉल खेळायचे. आई-वडिलांना व्हॉलीबॉल खेळताना लहानपणापासून ती पाहायची. वयाच्या आठव्या वर्षापासूनच पी.व्ही सिंधूने बॅडमिंटन शिकायला सुरुवात केली. असं म्हटलं जातं की, ती प्रशिक्षण केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी रोज जवळपास ५५ किलोमीटरचा प्रवास करायची. कदाचित हीच मेहनत काही दिवसानंतर यशाच्या रूपात परिवर्तित होणार होती. आणि अखेर तसेच झालं.
- सुरुवातीला मेहबूब अली या प्रशिक्षकाकडून प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. तीने आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी प्राप्त केली. भारतात बऱ्याच स्पर्धांमध्ये पी.व्ही सिंधूची निवड होऊ लागली. दरवर्षी वेगवेगळ्या स्पर्धांमधून अनेक मेडल्स पटकावणाऱ्या सिंधूला जगभरात प्रसिद्धी मिळत होती. याचा परिणाम असा झाला की, केवळ वयाच्या सतराव्या वर्षी बीडब्ल्यूएफ च्या जागतिक क्रमवारीमध्ये तीने पहिल्या वीस खेळाडूंच्या क्रमवारी मध्ये झेप घेतली.
- दोन ओलंपिक पदक जिंकणारी सिंधू एकमेव भारतीय महिला खेळाडू आहे. प्रत्येक पदकांसाठी सिंधूने कडवी झुंज दिली. सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या २०२२च्या यादीत पी.व्ही सिंधू बाराव्या क्रमांकावर आहे.
- बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियन बनणारी ती पहिली आणि एकमेव भारतीय आहे. तसेच ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सलग दोन पदके जिंकणारी भारतातील दुसरी वैयक्तिक ऍथलीट आहे.
- २ एप्रिल २०१७ मध्ये तिने तिच्या कारकिर्दीतील उच्च असलेला जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावला.
- सिंधूला झालेल्या दुखापती आणि पराभवामुळे सिंधूचा यशाचा मार्ग हा खडतर बनला होता. सिंधूची घोडदौड सुरूच आहे. अलीकडेच बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनच्या ऍथलेट्स कमिशनची सदस्य म्हणून सिंधूची नेमणूक झाली.
- सिंधूचा हा कानमंत्र आहे, फक्त काही महिन्यांची मेहनत पुरत नाही, अनेक वर्ष मेहनत करावी लागते. तुम्ही मेहनत करत राहिलात, तर यश नक्की मिळेल.
- २०१३ मध्ये महिलांच्या एकेरी बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सिंधूने मेडल पटकावले. याचा परिणाम असा झाला की, त्याच वर्षी भारत सरकारने तिला अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. तिच्या वडिलांना सुद्धा २००० साली भारत सरकारने अर्जुन पुरस्काराने गौरविले होते. स्वतःला मिळालेला पुरस्कार पुन्हा एकदा आपल्या मुलीने पटकावला, हे पाहून वडिलांचे डोळे खरंच आनंदाने पाणवले.
- अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होणारी पी.व्ही सिंधू कधी जिंकून यशाची शिखर चढायची, तर कधीही तिला हार पत्करावी लागायची. पण तिच्या प्रत्येक खेळीमध्ये तिची जिद्द आपल्याला पाहायला मिळते.
- चीनमधील ग्वांगझू येथे झालेल्या २०१३ च्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत एकेरी पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला बॅडमिंटनपटू आहे. यामध्ये तिने ऐतिहासिक कांस्यपदक पटकावले. अव्वल मानांकित 18 वर्षीय सिंधूने अवघ्या 37 मिनिटे चाललेल्या विजेतेपदाच्या लढतीत मिशेलचा 21-15, 21-15 असा सरळ गेममध्ये पराभव करून तिचे दुसरे ग्रांप्री गोल्ड जेतेपद पटकावले.
- २०१५ साली सिंधूला भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने गौरविले. सर्वात कमी वयामध्ये पद्मश्री पुरस्कार पटकावणारी ही सिंधू पहिली भारतीय खेळाडू आहे.
- या विज्ञान युगामध्ये पुरुषांच्या बरोबरीत स्त्रिया सुद्धा मागे राहिलेल्या नाहीत, याचे उत्तर उदाहरण म्हणजेच पी.व्ही सिंधू.
पी व्ही सिंधू बद्दल दहा ओळी
- पी व्ही सिंधूचा जन्म दि. ०५ जुलै १९९५ मध्ये झाला.
- पुसारला वेंकट सिंधू हे पी व्ही सिंधूचे पूर्ण नाव आहे .
- पी व्ही सिंधूचा जन्म एका तेलगू कुटुंबामध्ये झाला. ती लहानपणापासूनच खेळाकडे आकर्षित होती, तिचे पालक हे व्हॉलीबॉल खेळाडू होते.
- वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी पी व्ही सिंधूने निर्णय घेतला की, ती बॅडमिंटन खेळामध्ये तिचे करिअर करेल.
- पी व्ही सिंधू हिला सगळ्यात जास्त प्रसिद्धी २०१६ मधील रिओ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवल्यानंतर प्राप्त झाली.
- वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी पी व्ही सिंधूने विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके जिंकली.
- पी व्ही सिंधूने जागतिक चॅम्पियनशिप मध्ये पाच मेडल्स जिंकली.
- ऑलम्पिक स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवल्यानंतर, पी व्ही सिंधूला “राजीव गांधी खेलरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
- पी व्ही सिंधू ही तरुण पिढीसाठी एक प्रेरणा स्त्रोत आहे.
- पी व्ही सिंधू हिने बॅडमिंटन खेळामध्ये जागतिक विक्रम नोंदवला आहे.
तुम्ही दुसऱ्या कुणासाठी खेळत नाही, तुम्ही स्वतःसाठी खेळता. फक्त तुम्ही आहात आणि त्यासाठी तुम्ही काहीही करू शकता.…..पी. व्ही. सिंधू
FAQ
पी व्ही सिंधू चे पूर्ण नाव काय आहे?
पुसारला वेंकट सिंधू अर्थात पीव्ही सिंधू यांचा जन्म दि.०५ जुलै १९९५ रोजी हैदराबाद या ठिकाणी झाला. ही एक भारतीय बॅडमिंटनपटू आहे.
पी व्ही सिंधूने सुवर्ण जिंकले का?
दिनांक ०८ ऑगस्ट २०२२ मध्ये बर्मिंघम या ठिकाणी राष्ट्रमंडळ खेळ २०२२ मध्ये बॅडमिंटन खेळामध्ये कॅनडाच्या मिशेल हिला २१-१५, २१-१३ अशा गुणांनी हरवून भारताला सुवर्णपदक प्राप्त करून दिले.
पी व्ही सिंधूने कोणत्या वयात बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली?
घरामध्ये बॅडमिंटन खेळाची रुची असल्याकारणाने, सिंधूला सुद्धा खेळण्याची आवड निर्माण झाली. वयाच्या अवघ्या आठ वर्षाच्या काळात सिंधूने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.
पी व्ही सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
पी व्ही सिंधू बॅडमिंटन खेळामध्ये भारत देशाचे नाव उंचावत आहे. पी व्ही सिंधू ही टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकणारी व रियो ओलंपिक मध्ये रौप्य पदक जिंकून भारताला जगामध्ये एक विशिष्ट स्थान मिळवून देणारी प्रसिद्ध खेळाडू आहे.
५. दोन ऑलिम्पिक पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण?
ऑलम्पिक स्पर्धेमध्ये दोनदा जिंकणारी सिंधू ही पहिली भारतीय महिला बनली.
६. पी व्ही सिंधू का प्रसिद्ध आहे ?
ऑलम्पिक खेळामध्ये भारत देश स्वतःचे नाव उंचावत आहे. भारत देशाला गौरवित करण्यासाठी भारत देशातील मुलींचे सुद्धा मोठ्या प्रमाणत योगदान आहे. यामध्ये बॅडमिंटन प्लेयर पी.व्ही.सिंधू ही भारतीय पहिली महिला आहे, जिने अंतिम राष्ट्रीय ऑलिम्पिक सिल्वर मेडल जिंकले आहे. व त्यासोबतच भारताची पाचवी महिला ऑलिंपिक मेडलिस्ट पी.व्ही.सिंधू बनली आहे.
पी व्ही सिंधू ही टोकियोमध्ये कांस्यपदक जिंकणारी व रियो ओलंपिक मध्ये रौप्य पदक जिंकून भारताला जगामध्ये एक विशिष्ट स्थान मिळवून देणारी, प्रसिद्ध खेळाडू आहे.
७. पी व्ही सिंधूच्या वडिलांचे नाव काय ?
२००० साली मध्ये पीव्ही सिंधूंच्या वडिलांना, पीव्ही रमण यांना त्यांच्या खेळासाठी अर्जुन पुरस्कार देऊन भारत सरकारने गौरविले.
८. पी व्ही सिंधू हिला प्रसिद्धी कधी प्राप्त झाली ?
पी व्ही सिंधू हिला सगळ्यात जास्त प्रसिद्धी २०१६ मधील रिओ समर ऑलिंपिक स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवल्या नंतर प्राप्त झाली.
९. पी व्ही सिंधूला “राजीव गांधी खेळ रत्न” पुरस्कार कधी मिळाला ?
ऑलम्पिक स्पर्धेत सिल्वर मेडल मिळवल्यानंतर, पी व्ही सिंधूला 2016 साली “राजीव गांधी खेलरत्न” पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले.
१०. पी व्ही सिंधू बद्दल थोडक्यात माहिती लिहा .
पुसारला वेंकटा सिंधू म्हणजेच पीव्ही सिंधू या भारतीय बॅडमिंटन खेळाडू आहे. विद्यमान विश्व बॅडमिंटन क्रमांक तीन यामध्ये सिंधूने प्रथम भारतीय महिला खेळाडू म्हणून प्रसिद्धी मिळवली आहे. ज्यामध्ये तिने ओलंपिक रजत पदक जिंकले आहे. वर्ष २०१२ च्या दरम्याने अवघ्या सतरा वर्षाच्या वयामध्ये सिंधूने विश्व बँडमिंटन खेळामध्ये सगळ्यांना आश्चर्यचकित करून सोडले. सिंधूच्या या आश्चर्यजनक खेळामुळे सिंधूला सातत्याने यश प्राप्त होत राहिले.
पीव्ही सिंधूला विश्वविजेतेपद कोणत्या वर्षी मिळालं?
पीव्ही सिंधूने 2014 मध्ये आणखी एक कांस्यपदक जिंकले आणि 2017 मध्ये तिच्या पहिल्या जागतिक विजेतेपदाची अंतिम फेरी गाठली. तिच जपानच्या जुन्या प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहाराकडून रौप्य पदकासाठी पराभव झाला.
पीव्ही सिंधूने 2018 मध्ये पुन्हा अंतिम फेरीत प्रवेश केला, यावेळी स्पेनच्या
कॅरोलिना मारिनने रौप्यपदक जिंकले.
भारतीयाने शेवटी 2019 मध्ये पीव्ही सिंधूची सलग तिसरी जागतिक चॅम्पियनशिप फायनल – ओकुहाराला 38 मिनिटांत हरवून जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय बनली .
पी व्ही सिंधू कोणत्या राज्याची आहे
पी व्ही सिंधू हैदराबाद राज्याची आहे
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पी.व्ही.सिंधू हिच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा,लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.