राजमाता जिजाऊ माहिती मराठी : Rajmata Jijau Information In Marathi

राजमाता जिजाऊ माहिती मराठी : Rajmata Jijau Information In Marathi – इतिहासाच्या कालपटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसठशीत ठसा उठवणाऱ्या, काही कर्तबगार स्त्रियांच्या मध्ये अग्रक्रमाने नाव घ्यावे अशी व्यक्ती म्हणजे राष्ट्रमाता, स्वराज यांनी राजमाता जिजाऊ मासाहेब. आपल्या मातीच्या स्वाभिमानासाठी अन् अभिमानासाठी शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, लढणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी राजे यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब. राजमाता जिजाऊ यांना आपण जिजाई, जिजामाता आणि जिजाऊ, मासाहेब म्हणून ओळखतो.

Table of Contents

राजमाता जिजाऊ माहिती मराठी : Rajmata Jijau Information In Marathi

संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्थान आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आहे. मित्रांनो इतिहासाच्या पानांवर अधोरेखित केलेल्या शूर वीर पराक्रमी व्यक्तींचा जास्तीत जास्त उल्लेख केला जातो. पण त्यांना प्रेरणा देणाऱ्या, त्यांना इतिहासात अजरामर करणाऱ्या, मार्गदर्शकांची नावे आणि त्यांचा उल्लेख कमी होतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कर्तृत्वाला पण आयुष्यभर हिंदवी स्वराज्याचा संकल्प मनात धरून, प्रतिकूल परिस्थितीत आपल्या पुत्राला अखंड प्रेरणा देणाऱ्या, जिजाऊ मासाहेबांना ह्या स्थितप्रज्ञ, संस्कारमूर्ती, स्वराज्य जननी, जिजाऊ, मासाहेब होत्या.

वाघाची आई बनायला काळीज वाघिणीचे लागते,
म्हणून तर जिजामाता तुमच्या चरणापुढे मान माझी सदैव झुकते.

राजमाता जिजाऊ यांचा जीवन परिचय

नावजिजाबाई शहाजीराजे भोसले
जन्मतारीख १२ जानेवारी १५९८
जन्मस्थळ सिंदखेड, बुलढाणा जिल्ह्यात
वडिलांचे नाव लाखोजीराव जाधव
आईंचे नाव म्हाळसाबाई लखोजीराजे जाधव
पतीचे नाव शहाजीराजे भोसले
अपत्य संभाजीराजे, शिवाजीराजे
निधन १७ जून १६७४
लोकांनी दिलेली पदवीजिजामाता, जिजाऊ, राजमाता, मांसाहेब, वीरमाता

राजमाता जिजाऊ यांचे बालपण

राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील भुईकोट राजवाड्यात झाला. पराक्रमी पिता लखुजीराव आणि संस्कार माता म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला. बावल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात, मुलं दंग असायची. त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ पकडण्यात दंग होत्या. त्या लखुजीरावांकडे लष्करी प्रशिक्षणासाठी हट्ट धरायच्या. मात्यापित्यांकडून शूरवीरांच्या गोष्टी ऐकून, त्यांच्या मनात सुद्धा स्वराजाची प्रेरणा जागी होऊ लागली. डिसेंबर १६०५ मध्ये त्यांच्या लग्नाची बोलणी झाली. आणि अगदी वयाच्या ७ वर्षीच मालोजीराजे भोसले आणि उमाबाई यांचा मुलगा शहाजीराजे भोसले, यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न झाला.

राजमाता जिजाऊ सासर व माहेरमधील राजकीय बेबनावभोसले व जाधवांचे वैर

जाधवांचे नेतृत्व जिजाऊंचे भाऊ दत्ताजीराव जाधव करत होते, आणि भोसल्यांचे नेतृत्व संभाजी राजे म्हणजेच शहाजीराजांचे भाऊ करत होते. दोघांचे भांडण झाले. संभाजी भोसले यांनी दत्ताजीरावांना ठार केले. हे समजताच, जिजाऊंचे पिता लखोजीराव यांनी संभाजीराजे भोसले यांना ठार केले. ही वार्ता शहाजीराजांना कळाली तेही समशेर घेऊन सासऱ्यांवर चालून आले. आणि या चकमकी मध्ये शहाजीराजे भोसले यांच्या दंडावर वार लागला. या प्रसंगा नंतर जिजाऊ खूप दुखावल्या गेल्या. या प्रसंगा नंतर त्यांचे माहेरचे असलेले नाते कायमचे तुटले.

पुढे देवगिरीला भर दरबारात त्यांचे पिता, बंधू, आणि भाच्याला ठार करण्यात आले. या सर्व घटना त्यांना प्रचंड दुखावत होत्या. त्यांच्या मनाला प्रचंड वेदना करत होत्या. आपापसातील गैर संपून एकीने स्वराज्याची स्थापना करण्याचे स्वप्न त्या उराशी बाळगू लागल्या.

राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाऊ कर्तव्यदक्ष पत्नी

जिजाऊनी शहाजी राजानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले आहे. केवळ आपली जहागिरी किंवा वतन याचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे,असे मत राजमाता जिजाऊ यांचे होते. जिजाऊमाता शहाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लाऊन, जिजाऊंनी स्वतःच्या जाधव, भोसले, कुटुंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. त्यामुळे सर्व जाती-धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पणासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊंनी आपले मातृप्रेम शिवरायांप्रमाणे सर्व मावळ्यांवर केले. त्यामुळे जिजाऊ स्वराज्य माता आहे. याप्रसंगी जिजाऊ शिवरायांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या. संकट समय जिजाऊ लढणारे होत्या, रडणाऱ्या नव्हत्या.

शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊनी केले आहे. शिवरायांच्या मोठेपणाचे श्रेया जिजाऊंना जाते. यश मिळण्यासाठी तलवार घ्यावी लागते, प्रयत्नांची पराकाष्टे करावे लागते, कारण जिजाऊ प्रयत्नवादी होत्या. पुत्राप्रमाणे नातवावर उत्तम संस्कार करणारी जिजाऊमाता म्हणजे स्वराज्याचे खरे विद्यापीठ आहे. शिवाजी राजे, संभाजी राजे, मावळे यांच्यामध्ये असणारी उच्च कोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे.

कर्तुत्व मनगटात उतरण्याआधी मनात ठसावे लागते. रात्रीचा दिवस करून, अथक परिश्रम करण्याची मानसिक आणि शारीरिक संपादित करावी लागते. स्वप्नांचा पाठलाग करत असताना समोर येणाऱ्या असंख्य अशा संकटांचा न डगमगता हिमतीने पाठलाग करावा लागतो. आणि तेव्हा कुठे मिळते, स्वप्नपूर्तीचे समाधान. असंच एक स्वप्न पाहिलं होतं, एका मातेने. स्वावलंबनाच, स्वाभिमानाचं आणि स्वराज्याच आणि त्याच स्वप्नपूर्तीसाठी बाळाच्या जन्म अगोदरपासूनच त्याचा ध्येय निश्चित करून, त्या दृष्टीने वाटचाल करणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ.

राजमाता जिजाऊ

राजमाता जिजाबाई यांची मुले

जिजाऊंना एकूण ८ अपत्य झाली त्यातील सहा मुली आणि दोन मुले. मोठा मुलगा संभाजी राजे यांचे नाव त्यांनी त्यांच्या मृत दिराच्या नावाप्रमाणे ठेवले. त्यांचा संभाळ करण्याची पूर्ण जबाबदारी शहाजीराजांनी घेतली होती

राजमाता जिजाऊ यांच्या पोटी जन्मले शिवराय

भवानी माते, माझ्या उदरा मधील जीव मला पुत्ररूपाने दे. जो आमच्या कुळाचे नाव काढेल माय भूमीचे पांग फेडेल, धर्म वाढवेल, व जनतेचा रयतेचा एक न्याय प्रतिष्ठित राजा होईल. असा पुत्र दे जो यवनाचे वाढते अत्याचार संपवेल, अशी कळकळून प्रार्थना जिजाबाईंनी भवानी मातेला केली. त्यांची ही प्रार्थना भवानी मातेने ऐकू,न जिजाबाईंच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

जिजाऊ स्वराज्याची स्वप्न पाहत असतानाच फाल्गुन बद्ध तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी तो सोन्याचा दिवस उगवला. आणि शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला. त्यावेळेस जिजाऊ जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर राहत होत्या.शिवाई देवीच्या नावावरून जिजाबाईनी बाल शिवबाचे नाव शिवाजी असे ठेवले.

मुलांचे संगोपन आणि राज्यकारभार

मावळे अतिशय इमानदा,र कष्टाळू आणि ताकदवान होते. याची जाणीव जिजाऊंना होती. परंतु कितीही पराक्रम केला तरी, सुलतानांच्या दरबारांमध्ये येणाऱ्या वाईट अनुभवांविषयी जिजाऊंना खंत होती. त्यामुळेच त्या स्वराज्य स्थापनेच्या दृष्टीने शिवरायांना घडवत होत्या. वीर पुरुषांच्या गोष्टी सांगून त्यांचा आत्मविश्वास उंचावत होत्या. लष्करातील विविध शस्त्र चालवण्याच्या, त्यांच्या प्रशिक्षणामध्ये ही त्या बारकाईने लक्ष देत होत्या. त्याबरोबरच त्यांना युद्धनीतीचे आणि ज्ञानदानाचे धडे देण्याचे कामही ते अतिशय मन लावून करत होत्या. आई आणि वडील अशा दोन्ही जबाबदाऱ्या तर अचूक बजावण्याचा प्रयत्न करत होत्या.

जिजाऊनी पुण्याची दुरावस्था दूर केली

शहाजीराजांनी कर्नाटकातील राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर जाण्यापूर्वी जिजाऊ आणि शिवराय यांची रवानगी पुण्यामध्ये केली. आज आपण मोठ्या अभिमानाने पुणे येथे काय उणे असे म्हणत जरी असलो, तरी त्यावेळी पुण्याची अवस्था अतिशय दयनीय अशी होती. तेथील सर्व मालमत्तेची नास्तधूस केलेली होती. लोक घर सोडून पळालेली होती. कारण त्यांची घरं मोडली जात होती. देवळे पाडलेली होती. लोक गावामध्ये येण्यास तयार नव्हते. शेतावर ठीक ठिकाणी पहारी रोवून ठेवल्या होत्या. आणि तुटलेल्या चपला त्यावर अडकवलेल्या होत्या. जो कोणी येथील जमीन नांगरेल, तो निर्वंश होईल. असा शाप या जमिनीवर आहे, अशा प्रकारच्या भीतीच वातावरण तेथील जनतेमध्ये पसरवलेलं होतं.

रयत घाबरलेली होती. धास्तावलेली होती. अशा वेळेस जिजाऊ शिवरायांसोबत आल्या त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्मातील बालकांना एकत्र केलं. सोन्याचा फाळ बनवला. सोन्याच्या फाळ असलेल्या नांगराने त्यांनी त्या पाच मुलांना एकत्र घेतलं. आणि ती जमीन नांगरली. लोखंडाला परीसाचा स्पर्श व्हावा आणि त्याचे सोनी व्हावे, याप्रमाणे पुण्याचे सोने झाले. परंतु काही करमट लोकांना ही गोष्ट सहन झाली नाही. आणि आता शिवाजी मरेल अशी भीती सर्व दूर पसरली गेली. परंतु जिजाऊ या सगळ्या भीतीला या धमक्यांना पुरून उरणारे होत्या. त्या म्हणाल्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी निर्वांश झाले तरी चालेल. पण मी माझ्या गोरगरीब रयतेला उपाशी मरू देणार नाही. असे त्यांनी त्यावेळेस ठणकाऊन सांगितले.

हळूहळू रयतेच्या मनातील भीती दूर होऊ लागली. लोक पुन्हा पुण्याकडे परतू लागली. शेती, उद्योगधंदे, पुन्हा चालू होऊ लागले. सन १६३० मध्ये त्यांनी पुण्यात लाल महाल बांधून घेतला. परंतु रयतेकडे कामधंदा नव्हता. शेतीची अवजारे, बी बियाणे नव्हती, जंगली जनावरांनी अगदी धुडकूस घातला होता. जिजाऊंनी आदेश दिला जो कोणी जंगली जनावरांना मारेल त्याचा दरबारामध्ये याचा योग्य असा सत्कार करून योग्य तो मोबदला दिला जाईल. हे ऐकल्यानंतर उपद्रव देणाऱ्या जनावरांचा खात्मा होऊ लागला. या आदेशाने जिजाऊंनी एकाच दगडत अनेक पक्षी मारले होते.

  • ०१) जंगली जनावरे मारली गेली.
  • ०२) रयतेच्या मनातील भीती दूर होऊन, रयत पुन्हा पुण्याकडे परतू लागली.
  • ०३) रयतेला रोजगार मिळाले.
  • ०४) कामाच्या मोबदल्यामध्ये त्यांना मदत करण्याची संधी मिळाली.
  • ०५) सर्वात महत्त्वाचा फायदा झाला तो स्वराज्याच्या उभारणीसाठी आवश्यक अशा बलवान, एकनिष्ठ अशा सैन्यांची फौज उभी राहू लागली.
राजमाता जिजाऊ आणि  शिवराय

शिवरायांचा विवाह

फलटणच्या निंबाळकरांची मुलगी सईबाई हिला शिवबांसाठी पसंत केले. आणि मोठ्या थाटामाटात शिवरायांचा विवाह सोहळा पार पडला.

शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली

जिजाऊंच्या शिकवणी प्रमाणे शिवरायांनी १८ पगड जातीतील लोकांना एकत्र केले. त्यांची आपापसामधील भांडण थांबवली. त्यांच्या गुणांची पारख केली. त्यांच्यामध्ये स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक तो आत्मविश्वास निर्माण केला. आणि १६४५ साली रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी त्यांच्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.

त्यावेळी महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशहा, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज, आणि जंजिराची सिद्धी, अशा चार सत्ता हुकूमत गाजवत होत्या. अशा बिकट परिस्थितीमध्ये शिवरायांनी स्वराज्याची स्वप्न पाहण्याचे धाडस केले होते. कारण त्यांना जिजाऊकडून मिळालेल्या आत्मविश्वासाचा प्रचंड असा वारसा त्यांच्यामध्ये ठासून भरलेला होता.

राजमाता जिजाऊ – एक आदर्श माता

जिजाबाईंची भगवंतावर अतोनात श्रद्धा होती. जिजाबाई दररोज देवदर्शनासाठी जात. तेव्हा त्यांच्यासोबत बाल शिवाजी सुद्धा दर्शन घेण्यासाठी जात असत. देवळा मधील भग्नमूर्ती, तोडफोड दाखवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात जिजाबाई मंदिरांचे पुनरुत्थान करण्याचे बीच पेरत. त्याचवेळी जिजाबाई यवनाचे छळ, अन्याय, विध्वंस, इत्यादी. गोष्टी शिवबांना सांगत. हे ऐकून शिवबा अतिशय क्रोधित होत.

आईने सांगितलेल्या रामायण महाभारतामधील कथा ऐकून, त्यांना नवीन प्रेरणा येत असे. त्यांना असं वाटे, केव्हा एकदा मी पण पापी, अन्याय, जुलमी लोकांना शासन करतो, हाती तलवार घेऊन, शत्रूशी लढतो व प्रजेला संरक्षण देतो. अशी मनोमन ते इच्छा बाळगत असत. या सर्व गोष्टी पारंगतपणे पूर्ण करण्यासाठी जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांना आवश्यक असलेले युद्ध कौशल्य, तलवार, दानपट्टा, भाला व धनुष्यबाण लक्षवेध कुस्ती इत्यादींचे शिक्षण देण्यास सुरुवात केले.

छत्रपती शिवाजी महाराज अश्वपरीक्षा, रत्नपरीक्षा, गडकिल्ले चढणे, वाचणे, लिहिणे, या सर्व गोष्टींमध्ये अगदी पारंगत होते. जिजाऊमाता छत्रपती शिवाजी महाराजांना नेहमी सांगत “आपल्या आजोबा वडिलांसारखा तू पराक्रमी हो, पण तो हिंदवी स्वराज्य स्थापना साठी व सुलतानी सत्ता नामशेष करून स्वराज्य निर्माण करण्यासाठीच”.

राजमाता जिजाऊ - एक आदर्श माता

राजमाता जिजाऊनी केला संभाजी राजांचा संभाळ

शिवरायांना पुत्ररत्न प्राप्त झाले, परंतु अल्पावधीतच सईबाईंचे निधन झाले. आणि जिजाऊंवर संभाजी राजांना सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडली. जिजाऊ नातवाच्या सुद्धा आई झाल्या. संभाजी राजांना सर्वतोपरी शिक्षण आणि संस्कार देण्याचे काम ही जिजाऊंनी मोठ्या ममतेने केले.

स्वराज्याची घोडदौड

शिवरायांनी तोरणा किल्ला जिंकला आणि त्याला प्रचंडगड असे नाव दिले. त्यानंतर सुरू झाला त्यांचा स्वराज्याच्या दिशेने असलेला प्रवास. शिवराय सतत विविध मोहिमांवर जात, जाण्यापूर्वी ते जिजाऊंशी सल्लामसलग करत. ते मोहिमेवर गेले असता, राज्यकारभार सांभाळण्याची संपूर्ण जबाबदारी जिजाऊ वर पडत असे. जिजाई न्यायदानाचे काम ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बघत. एवढेच नाही तर शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेत असताना, जिजाऊंच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरातील रांगणा किल्ला जिजाऊने जिंकला.

स्वतःचा मुलगा आणि नातू कैदेत असताना, रयतेचा आत्मविश्वास जराही दळमळीत होऊ न देता, त्यांच्यात नवचेतना निर्माण करून, त्यांना लढाईची बळ देऊन, जिजाऊने मोहीम यशस्वी केली. यावरून जिजाऊ मध्ये असलेला प्रचंड आत्मविश्वास आणि कर्तव्यनिष्ठेची साक्षा आपल्याला मिळते.

शहाजी राजांचे निधन

२३ जानेवारी १६६४ रोजी शहाजीराजांच्या निधनाची वार्ता कळताच जिजाऊंनी सती जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु शिवराय आणि बाल संभाजी तसेच रयतेचे शब्दाला मान देऊन, त्यांनी तो निर्णय मागे घेतला. आणि आपले उर्वरित जीवन रयतेच्या कल्याणासाठी बहाल केले.

राजमाता जिजाऊ यांचे जीवन व कार्य

जिजाऊ या सद्गुण, शौर्य व दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. या सर्व गोष्टी जिजाऊंनी शिवरायांना दिल्या. जिजाऊ या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशाग्र पद्धतीने तलवार चालवू शकत होत्या. त्यांचा मोठा मुलगा संभाजी याचा वध अफजलखान ने केला. त्याचा सूड घेण्यासाठी जिजाऊंनी शिवरायांना प्रोह्सन दिले. व शिवराय यांनी अफजलखानाचा वध करून मातेला दिलेले वचन पूर्ण केले.

जिजाऊ या अतिशय धाडसी प्रवृत्तीच्या होत्या, पुणे जिल्ह्यातील शहाजीराजे भोसले यांची जहागिरी त्यांनी स्वतः समर्थ पणे चालवून त्याच्या जाहागिरीचा विकास केला. व तिथे कसबापेठ गणपती मंदिराची स्थापना देखील केली. तसेच जिजाऊंनी कावेश्वर मंदिर आणि तांबडी जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सुद्धा केला.

राजमाता जिजाबाई – संयम आणि धैर्याची मूर्ती

समाजकारण, राजकारण, यातून लोकांचे हित पाहणाऱ्या जिजाबाई यांच्यावर कौटुंबिक आपत्तीचे आघात होतच होते. परंतु त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी त्यांचे कार्य शांतपणाने सुरूच ठेवले. १६५५ साली जिजाबाईंचा मोठा पुत्र, संभाजी याला ऐन तारुण्यामध्ये तिसाव्या वर्षी मिळालेली वीरगती. तसेच त्यांची सुन सईबाई.

तिथे बाळंतपणानंतर दोन महिन्यात झालेले देहावसन, खानाकडून स्वतःचे पती शहाजीराजे यांचा अपमान, या सर्व घटना यामुळे जिजाबाई यांवर दुःखाचे डोंगर कोसळले होते. परंतु त्यांनी त्याबाबतीतही संयम ठेवला. धेर्याची मूर्ती असलेल्या जिजाबाईंनी स्वतःला त्यातून सावरले, पुत्र वियोगावर विजय मिळवत. सईबाईंचा मुलगा म्हणजेच संभाजी याला माया व ममतेने शिक्षण देऊन योग्यरीत्या घडवले.

जिजाबाई माता बनली राजमाता जिजाऊ

व्यवहाराची व कर्तव्याची योग्यरीत्या सांगड घालून, अतिशय विचारपूर्वक निर्णय घेणाऱ्या जिजाबाई एक धीरगंभीर व्यक्तिमत्व होत्या. प्रत्येक पराक्रमी पुरुषाचे ध्येय एकच होते, ते म्हणजे पारतंत्र्यात असणाऱ्या रयतेला स्वातंत्र्य मिळवून स्वराज्याची स्थापना करणे. यासाठी राजमाता जिजाऊंनी शिवरायांना शिकवण देण्यास सुरुवात केली. शिवरायांनी मावळे सेना जमवली.

जीवाला जीव देणारे सवंगडी कान्होजी म्हात्रे, जीवा महाल, बाजीप्रभू देशपांडे, येसाजी कंक, बाजी पासलकर, तानाजी मालुसरे, इत्यादी. सवगड्यांना एकत्र केले. शिवबांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन, स्वराज्य स्थापनेसाठी संकल्प केला. जिजाबाईंच्या स्वातंत्र्याच्या गर्भसंस्काराचे, पालकत्वाचे, बालसंगोपन मूळ परिपक्व होते. जिजाबाई यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आशीर्वाद शिवबांच्या पाठीशी नेहमी होता. हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा ध्यास शिवबांना व मावळ्यांना लागला.

शिवराज्याभिषेक

“पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा”. हे जिजाऊंचे स्वप्न शिवरायांनी सत्यात उतरवलं, आणि तो सोन्याचा दिवस उगवला, ०६ जून १६७४ रोजी शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला.

राजमाता जिजाऊचा मृत्यू

जिजाऊंचे स्वप्न साकार झाले. त्यांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. हा सोहळा त्यांनी याची देही याची डोळा पाहिला. आणि अवघ्या बाराव्या दिवशीच म्हणजे १७ जून १६७४ ला त्यांनी स्वराज्य मध्ये शेवटचा श्वास घेतला.

राजमाता जिजाऊ

सर्वश्रेष्ठ तू माता जिजाऊ,
सदैव आम्हा अभिमान सर्वश्रेष्ठ तू,
माता जिजाऊ सदैव आम्हा अभिमान स्वराज्याचे स्वप्न दिले तू,
जागीविला राष्ट्रभिमान स्वराज्याचे स्वप्न दिले तू,
तूच घडवले शिवबा, आणि शंभू छत्रपती
आनंदात मग हसू लागली, महाराष्ट्राची माती.
सह्याद्रीला स्वाभिमानाचा धडा दिलास तू आई,
स्वराज्य जननी, राजमाता, धन्य तू जिजाई. धन्य तू जिजाई.

पारतंत्र आणि गुलामगिरीच्या अंधकारात, स्वराज्याचे बीजपेरून, स्वराजाचे स्वप्न पाहणाऱ्या, छत्रपती शिवाजी महाराजांना कर्तुत्वाने उभे करणाऱ्या, शिल्पकार म्हणजे शिवमाता, राष्ट्रमाता, मातृ शक्तीची प्रेरक प्रतिमा सुरक्षा घडवणारी, शिवशक्ती, स्वराज्य जननी, राजमाता जिजाऊ मासाहेब. इतिहासाच्या कालपटलावर ज्या स्त्रियांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा ठामपणे उमटवला यात महत्वाचे स्थान म्हणजे राजमाता जिजाऊ. श्रीमंत योगी अस ज्यांचं वर्णन केलं जातं, ती सारी पुण्याई ध्येयवेढ्या आईची, निराग्रही मातेची, आणि वीर माता मासाहेब जिजाऊ यांची.

राजमाता जिजाबाई यांच्यावरील पुस्तके

राजमाता जिजाबाईंचे गुणवर्णन करणारी अनेक पुस्तके आहेत, त्यांपैकी काही ही-

  • जिजाऊंची निष्ठा (काव्यसंग्रह, कवयित्री – मेधा टिळेकर
  • जेधे शकावली
  • शिवभारत
  • जिजाऊ (डॉ प्रतिमा इंगोले )
  • जिजाई : मंदा खापरे ट
  • गाऊ जिजाऊस आम्ही : इंद्रजीत भालेराव
  • अग्निरेखा

राजमाता जिजाबाई यांच्यावरील चित्रपट

  • राजमाता जिजाऊ (दिग्दर्शक – यशवंत भालकर)
  • स्वराज्यजननी जिजामाता (दूरचित्रवाणी मालिका, निर्माते : अमोल कोल्हे)

राजमाता जिजाऊ यांबद्दल दहा ओळी

  • १. जिजाबाई या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या.
  • २. त्यांचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराजे भोसले असे होते.
  • ३. जिजाबाई यांना सर्वजण राजमाता व राष्ट्रमाता म्हणून संबोधतात.
  • ४. राजमाता जिजाबाई हा एक कुशल योद्धा होत्या.
  • ५. राजमाता जिजाऊ ह्या त्यांच्या शौर्यासाठी निढरतेसाठी ओळखल्या जातात.
  • ६. जिजाबाई एक आदर्श आई होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली.
  • ७. राजमाता जिजाऊ शिवबांना धैर्य, परोपकार, शौर्य, निर्भयता, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वासाचे धडे दिले.
  • ८. जिजाऊंनी आई व वडील याशी दोन्ही कर्तव्य उत्तमरीत्या पार पडली.
  • ९. राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांच्या आद्य गुरु होत्या.
  • १०. शिवाजी राजे कैदेत असताना त्यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेऊन संपूर्ण जबाबदाऱ्या योग्यरीत्या पार पाडल्या.

FAQ

१. जिजामाता चे पूर्ण नाव काय?

राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील भुईकोट राजवाड्यात झाला.जिजामातेचे पूर्ण नाव जिजाबाई शहाजीराव भोसले.

२. राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला?

राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ रोजी बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील भुईकोट राजवाड्यात झाला. पराक्रमी पिता लखुजीराव आणि संस्कार माता म्हाळसाबाई यांच्या पोटी झाला.

३. जिजाबाईंकडून शिवाजी काय शिकले?

राजमाता जिजाबाई हा एक कुशल योद्धा होत्या.राजमाता जिजाऊ ह्या त्यांच्या शौर्यासाठी निढरतेसाठी ओळखल्या जातात.जिजाबाई एक आदर्श आई होत्या. त्यांनी शिवरायांना स्वराज्याची शिकवण दिली. राजमाता जिजाऊ शिवबांना धैर्य, परोपकार, शौर्य, निर्भयता, राष्ट्रप्रेम, आत्मविश्वासाचे धडे दिले.

४. छत्रपती शिवाजी महाराज कसे झाले?

भवानी माते, माझ्या उदरा मधील जीव मला पुत्ररूपाने दे. जो आमच्या कुळाचे नाव काढेल माय भूमीचे पांग फेडेल, धर्म वाढवेल, व जनतेचा रयतेचा एक न्याय प्रतिष्ठित राजा होईल. असा पुत्र दे जो यवनाचे वाढते अत्याचार संपवेल, अशी कळकळून प्रार्थना जिजाबाईंनी भवानी मातेला केली. त्यांची ही प्रार्थना भवानी मातेने ऐकू,न जिजाबाईंच्या पोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जिजाऊ स्वराज्याची स्वप्न पाहत असतानाच फाल्गुन बद्ध तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० रोजी तो सोन्याचा दिवस उगवला.

५. वीरमाता जिजाबाईंनी शिवाजी महाराजांसाठी कोणते कष्ट घेतले ?

जिजाऊ या सद्गुण, शौर्य व दूरदृष्टीसाठी प्रसिद्ध आहे. या सर्व गोष्टी जिजाऊंनी शिवरायांना दिल्या. जिजाऊ या एक कुशल घोडेस्वार देखील होत्या. त्या अत्यंत कुशाग्र पद्धतीने तलवार चालवू शकत होत्या. त्यांचा मोठा मुलगा संभाजी याचा वध अफजलखान ने केला. त्याचा सूड घेण्यासाठी जिजाऊंनी शिवरायांना प्रोह्सन दिले. व शिवराय यांनी अफजलखानाचा वध करून मातेला दिलेले वचन पूर्ण केले.
जिजाऊ या अतिशय धाडसी प्रवृत्तीच्या होत्या, पुणे जिल्ह्यातील शहाजीराजे भोसले यांची जहागिरी त्यांनी स्वतः समर्थ पणे चालवून त्याच्या जाहागिरीचा विकास केला.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास आजच्या लेखाद्वारे मांसाहेब जिजाऊ यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. ब लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा.

Leave a comment