स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी : Swatantryaveer Savarkar Information In Marathi

स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी : Swatantryaveer Savarkar Information In Marathi – विनायक दामोदर सावरकर यांना स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून संबोधले जाते. वीर सावरकरांनी भारतीय स्वातंत्र्य युद्धात महत्त्वाचे स्थान मिळवले. आजही भारतातील बहुसंख्य लोक त्यांना महान क्रांतिकारक म्हणून ओळखतात. सावरकरांनी आपल्या साहित्यातून, लिखाणातून हिंदू धर्माबाबतचे त्यांचे विचार वेळोवेळी प्रतिपादित केले आहेत.

जन्मजात देशभक्त, स्वदेशीचा पुरस्कर्ता, प्रखर क्रांतिकारक, विज्ञाननिष्ठ, तर्कसिद्ध हिंदुत्वाचा भाष्यकार, थोर संघटक, आग्रही आणि सक्रीय समाजसुधारक, गतकाळातील घटनांचे संकलन करून स्फूर्तिदायक ग्रंथ लिहिणारा इतिहासकार, नवनवीन शब्द देणारा भाषाशास्त्रज्ञ, द्रष्टा राजकारणी, ओजस्वी वक्ता आणि प्रतिभाशाली साहित्यिक, अशा अनेकविध गुणांच्या माध्यमातून आपले संपूर्ण जीवन केवळ देश, मातृभूमी आणि स्वातंत्र्य यांसाठी झोकून देणाऱ्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची माहिती आज आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. चल तर मग, पाहुयात स्वातंत्र्यवीर सावरकर.

नाव तुमचे विनायक
क्रांतीचे तुम्ही महानायक
बुद्धीचे दैदिप्यमान तेज
आजही तस्वीरीतून जाणवते
केला क्रांतीचा सशस्त्र उठाव
महान आहे तुमचा त्याग
कोणी समजो अगर नको समजो

स्वातंत्र्याच्या चळवळीत तुमचा अजरामर आहे सहभाग
जरी नाही दिसला नोटा वरती आज
तरी ज्यांना तुम्ही कळलात
त्यांच्या हृदयात चिरंजीवी आहात
संकटाचा अवघड सागर
तरुन जाणारे अविचल तारू
निश्चयाचा महामेरू

Table of Contents

स्वातंत्र्यवीर सावरकर माहिती मराठी : Swatantryaveer Savarkar Information In Marathi

पूर्ण नावविनायक दामोदर सावरकर
ओळख वकील, राजकारणी, लेखक आणि कार्यकर्ता
कार्य हिंदुत्वाचा पुरस्कार करणे, प्रचार करणे
जन्मतारीख २८ मे १८८३
जन्मस्थळ नाशिक, महाराष्ट्र, भारत
मूळ गावभगूर, नाशिक, महाराष्ट्र
वडिलांचे नाव दामोदर सावरकर
आईचे नाव राधाबाई सावरकर
पत्नीचे नावयमुनाबाई सावरकर
जातहिंदू, ब्राह्मण
प्रसिद्धी स्वातंत्र्यवीर
कार्य  महान क्रांतिकारक, स्वातंत्र्य सेनानी, समाजसुधारक, विचारवंत, साहित्यिक, इतिहासकार, कवी
मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६

कोण होते स्वातंत्र्यवीर सावरकर ? Swatantryaveer Savarkar Information

भारतीय स्वातंत्र्याच्या इतिहासात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्थान अद्वितीय आहे. प्राचीन व अर्वाचीन काळात त्यांच्या एवढे धर्याचे आणि प्रतिभेचे पुरुष थोडेच होऊन गेले. सावरकरांनी राष्ट्रवादी सांगितले आहे. सावरकरांचे तेज पाहून, त्यांच्या एका शिक्षकांनी त्यांच्या आडनावाची उकल केली ती अशी, “ज्याचे कर राष्ट्राला सावरतात तो सावरकर” सावरकरांची अस्मिता फुलवणारे हे गुरुजन हा त्यांच्या भाग्याचा ठेवा होता.

महाभारतातल्या एखाद्या वीर पुरुषासारखे त्यांचे सारे चरित्र आणि कर्तुत्व वाटते. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी, जास्त त्याग करणाऱ्या आणि धोका पत्करणाऱ्या देशभक्तांमध्ये सावरकरांना अग्रस्थान द्यावे लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पूर्ण जीवनच साहस्य आहे.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अंदमानाच्या काळ कोठडीत दामले, हर प्रकारे छळले, खड्याबिडीत टांगले, तेलाच्या घाण्याला झोपले, नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्ट, या मरणप्राय वेदना सहन करत असतानाही, त्यांच्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूमीचे स्वातंत्र्य. तब्बल अकरा वर्षे हा छळ सहन केल्यानंतरही, सावरकरांचे सर्जनशील कविता व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसू भरही कमी झाले नाही.

बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्य लिहिली. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्याला आक्रमक क्रांतिकारी धगधगते. विचारवंत, हिंदू संघटक, प्रखर वक्ते, तसेच विज्ञान निष्ठेचा प्रचार करणारे, तत्त्वज्ञ व विचारवंत अशा वेगवेगळ्या रूपात दिसतात.

Swatantryaveer Savarkar Information

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे प्रारंभिक जीवन

२८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. याच दिवशी सन १८८३  साली नाशिक मधील भगूर या गावी सावरकरांचा जन्म झाला. वडील दामोदरपंतांच्या तीन अपत्त्यांपैकी विनायक हे दुसरे अपत्य. सावरकरांचे बाबाराव हे मोठे आणि नारायणराव हे धाकटे बंधू होते. सावरकर नऊ वर्षांचे असतानाच त्यांची आई वारली. त्यावेळेस बाबारावांची पत्नी येसू वहिनी यांनी विनायक आणि नारायणराव यांचा अगदी मुलाप्रमाणे सांभाळ केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विवाह

सन १९०१ मध्ये विनायकराव यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यांचे सासरे रामचंद्र त्र्यंबक चिपळूणकर यांनी त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेतली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे शिक्षण

नाशिकच्या शिवाजी विद्यालयात विनायक सावरकरांनी आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच ते अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होते. अगदी वयाच्या १३ वर्षी त्यांनी लिहिलेला “स्वदेशीचा फटका” आणि “स्वतंत्रतेचे स्तोत्र” ह्या रचना त्यांच्या अनन्य साधारण प्रतिभेची साक्ष देतात. लग्नानंतर सन १९०२ साली त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.

नाशिक येथील शाळेत असताना ते शिवजयंती व गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केले होते. मोठ्या या सणांना सावकर देशभक्ती व राष्ट्रवादी नाटके करत असत. १९०२ मध्ये त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये बी.ए.ची डिग्री प्राप्त केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित पुस्तक : द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस १८५७

१९०४ साली पुण्यात सावरकरांनी “अभिनव भारत सोसायटीची” स्थापना केली. ते स्वदेशी आंदोलनातही सहभागी झाले. १९०५ मध्ये बंगालच्या फाळणी नंतर, त्यांनी विदेशी कपड्यांची होळी जाळली. त्यांच्या भडकाऊ देशभक्ती भाषणांनी नाराज होऊन, इंग्रज शासनाने त्यांची डिग्री परत घेतली. १९०६ मध्ये त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा शिष्यवृत्ती मिळाली.

आणि व ही शिष्यवृत्ती सोबत घेऊन जून १९०६ मध्ये ते बॅरिस्टर बनण्यासाठी लंडनला गेले. लंडनमधील इंडिया हाऊस मध्ये राहत असताना, सावरकरांनी एका आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत, सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विशद केले. आणि लंडनच्या इंडिया हाऊस मधून अभिनव भारताचे एक नवे क्रांती पर्व सुरू झाले.

ज्यावेळी ते इंग्लंडमध्ये राहत होते, तेव्हा त्यांनी तेथे भारतीय विद्यार्थ्यांना इंग्रज प्रशासनाविरुद्ध भडकवण्यास सुरुवात केली. जून १९०८ मध्ये त्यांनी “द इंडियन वॉर ऑफ इन इंडिपेंडन्स १८५७” हे पुस्तक लिहिले. परंतु प्रति शासनाने भारत व इंग्लंड दोन्ही ठिकाणी या पुस्तकाच्या प्रकाशनावर बंदी घातली.

नंतर या पुस्तकाला हॉलंड मधील मॅडम भिकाजी कामाद्वारे प्रकाशित करण्यात आले. आणि ब्रिटिश शासनाविरुद्ध देशभरात कार्यरत असलेल्या क्रांतिकारण कार्यापर्यंत हे पुस्तक पोहोचवण्यासाठी त्याची तस्करी करण्यात आली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ब्रिटिशांद्वारे अटक

मदनलाल धिंग्रा हा सावरकरांच्या क्रांतीपरवातून प्रेरित झालेला पहिला हुतात्मा शिष्य. ज्याने ब्रिटीश अधिकाऱ्याचा वध करून हसत हसत फाशी पत्करली. याच काळात सावरकरांनी विविध देशातील क्रांतिकारक गटांची संपर्क साधून, बॉम्ब निर्मितीचे तंत्र आत्मसात केले. हे तंत्रज्ञान आणि २२ पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली.

ज्यापैकी एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा अनंत कान्हेरे या सोळा वर्षाच्या युवकाने वध केला. सन १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतीयांनी केलेल्या उठावास इंग्रज भारतीयांचे बंड मानत असत. परंतु इंग्रजी इतिहासकारांचा हा निष्कर्ष सावरकरांनी १८५७  चे “स्वातंत्र्यसमर” या ग्रंथाच्या माध्यमातून पुराव्यांसहित खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला.

स्वातंत्र्यवीर सावरकर

परंतु सावरकरांच्या साथीदारांनी या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीला प्रसिद्ध करण्यात कसेबसे यश मिळवले. राजदृहो पर लिखाण प्रसिद्ध केल्याचा, आरोप ठेवून ब्रिटिश शासनाने सावरकरांचे थोरले बंधू बाबाराव सावरकर यांना जन्मठेपेची शिक्षा देऊन, काळ्यापाण्यावर धाडले.

या घटनेचा बदला म्हणून लंडनमध्ये मदनलाल इंगळे यांनी कर्जमायलीला गोळ्या घातल्या. तर नाशिक येथे अनंत कान्हेरे यांनी जाकसनला गोळ्या घातल्या. या सर्व प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनायक सावरकर असल्याचा सुगावा लागताच ब्रिटिश शासनाने सावरकरांना लंडन येथून तात्काळ अटक केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मार्सेलिस येथील साहसी उडी

स्वा. सावरकर यांना ब्रिटिशांनी लंडनमध्ये अटक केली. पुढील अभियोग हिंदुस्थानातील न्यायालयात चालवण्यासाठी त्यांना ‘मोरिया’ या आगनावेवर आरक्षींच्या (पोलिसांच्या) पहार्‍यात चढवण्यात आले. प्रवासात आगनाव फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात थांबली. ८ जुलै १९१० ची सकाळ उजाडली. ‘प्रातर्विधीसाठी जायचे आहे’, असे सांगून सावरकर शौचालयात गेले.

आपल्या अंगावरील रात्रवेश (नाईट गाऊन) त्यांनी काचेच्या दारावर टाकून पहारेकर्‍यांना आतील काही दिसणार नाही, अशी व्यवस्था केली. उडी मारून गवाक्ष (पोर्ट होल) गाठले. शरीर आकुंचित करून त्यांनी स्वतःला अपरिचित समुद्रात झोकून दिले. छातीची आणि पोटाची कातडी सोलून निघाली. बंदिवान पळाल्याचे पहारेकर्‍यांच्या त्वरित लक्षात आले.

त्यांनी पाठलाग केला. एव्हाना ९ फूट उंचीचा धक्का सरसर चढून फ्रान्सच्या भूमीवर पाय ठेवल्याने सावरकर स्वतंत्र झाले. काही अंतर पळाल्यावर ते समोर दिसलेल्या फ्रेंच आरक्षीच्या स्वाधीन झाले.

मागून आलेल्या पहारेकर्‍यांनी फ्रेंच आरक्षीला लाच दिली आणि बळाने, तसेच अवैधरीत्या सावरकरांना परत नौकेवर नेले. सार्वभौम फ्रान्सच्या भूमीवर सावरकरांना केलेल्या अटकेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला. ज्याचा अभियोग आंतरराष्ट्रीय न्यायासनासमोर गेला, असा पहिला भारतीय देशभक्त म्हणजे स्वा. सावरकर ! ही उडी देशभक्तांना आजही स्फूर्ती देते !!

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळ्यापाण्याची शिक्षा

सन १९१० मध्ये समुद्र मार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना, सावरकरांनी फ्रान्सच्या मोर्सीलीस बेटा जवळ बोटीतून उडी मारली. ही उडी मारत असताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांमधील कैदी हस्तांतरण आणि तत्सम विचारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. ब्रिटिशांच्या कैदीतून सुटून त्यांनी फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला.

परंतु किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे, सावरकरांचे म्हणणे कळले नाही. ज्यामुळे ब्रिटिश सैनिकांनी त्यांना पुन्हा एकदा अटक केली. आणि भारतात आणून त्यांच्यावर खटला दाखल केला.सन १९११ मध्ये सावरकरांना दोन वेळा जन्मठेपांची म्हणजे सुमारे पन्नास वर्षांची अंदमानच्या तुरुंगातील काळ्यापाण्याची शिक्षा सुनवण्यात आली. अंदमानाच्या त्या काळ कोठडीत सावरकरांनी मरणप्राय यातना सहन केल्या. तब्बल ११ वर्षे छळ सहन करत असताना, सावरकरांनी आपले सर्जनशील कवित्व अबाधित राखले.

काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेलमध्ये दिली. काळ्यापाण्याची शिक्षा भोगणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना कठीण परिश्रम करावे लागायचे. येथील कायद्यानुसार त्यांना मोहरी व नारळाचे तेल काढावे लागायचे. यासोबतच त्यांना जेल व बाहेरील जंगलाची साफसफाई करावी लागायची. काम करीत असताना थांबले तर त्यांना कठीण शिक्षा दिली जायची. त्यांना मारले जायचे. एवढी मेहनत करूनही त्यांना भरपेट जेवण दिले जायचे नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची अंदमानातून सुटका

जवळपास दहा वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा भोगल्यानंतर, १९२० साली बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि वल्लभाई पटेल यासारख्या मोठ्या नेत्यांनी सावरकरांच्या सुटकेची मागणी केली. ०२ मे १९२१ मध्ये त्यांना सेल्युलर जेलमधून रत्नागिरी येथील तुरुंगात पाठवण्यात आले. रत्नागिरी तुरुंगात असताना त्यांनी “हिंदुत्व” हे पुस्तक लिहिले.

६ जानेवारी १९२४ ला त्यांना ते ब्रिटिश कायद्याचे पालन करत, रत्नागिरी जिल्ह्यातच राहतील. या अटीवर सोडण्यात आले. आपल्या सुटकेनंतर सावरकरांनी २३ जानेवारी १९२४ ला “रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना केली”. या संघाचा उद्देश भारतीय प्राचीन संस्कृतीला संरक्षित करून, समाजाचे कल्याण करणे होते. सन १९२४  मध्ये ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य करत, त्यांनी अंदमानातून स्वतःची सुटका करून घेतली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जाती व्यवस्थे विरुद्ध लढा

अंदमनातून सुटल्यानंतर, सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले. येथूनच सावरकरांनी हिंदूंना एकसंघ करण्यासाठी, त्यांनी जाणले की हिंदूंच्या अधपतनाला जाती व्यवस्था आणि चतुर्वर्ण व्यवस्था जबाबदार आहे. तेव्हा आपल्या लेखनाने कुणी सनातने दुखावेल याची चिंता न करता त्यांनी जातीभेद, अंधश्रद्धा, आणि कर्मकांडावर कडाडून टीका केली. आंतरजातीय विवाह लावले. जवळपास ५००  मंदिरे त्यांनी अस्पृश्यांसाठी खुली केली.

सावरकरांनी जातीभेद मोडण्यासाठी असंख्य लेख लिहिले. जातीभेद हा केवळ मनाचा रोग आहे. तो मानला तर धरून राहतो, आणि नाही मानला तर झटकन बरा होतो. असे सावरकर म्हणत. जातीभेद तोडण्यासाठी त्यांनी सहभोजनाचा धडा काढून दिला. सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी त्यांनी पतित पावन मंदिर स्थापन केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदू महासभेचे कार्य

रत्नागिरीतील आपल्या १३ वर्षांच्या स्थानबद्धतेत, सावरकरांनी हिंदू धर्माच्या चिकित्सेचे प्रचंड कार्य केले. त्यानंतर सन १९३७ पासून सुमारे सात वर्षे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष पद भूषविले. नंतर सावरकर लोकमान्य टिळकांची स्वराज्य पार्टीमध्ये सामील झाले. त्यांना हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. नंतरच्या काळात हिंदू महासभेने पाकिस्तान निर्माणाचा विरोध केला. गांधीजींच्या निर्णयाने असमत असलेल्या हिंदू महासभेचा एक तरुण नथुराम गोडसे, यांनी १९४८ मध्ये गोळी मारून गांधीजींची हत्या केली.

गांधी हत्या प्रकरणात भारत सरकारने सावरकरांनाही अटक केली. परंतु त्यांच्याविरुद्ध पुरावे न मिळाल्याने सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निर्दोष घोषित केले. झंजावाती दौरे ,मोठ्या मोठ्या सभा, रॉयल क्लबची स्थापना, अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. सावरकर हे केवळ क्रांतिकारकच नव्हते, तर ते एक ज्वलंत साहित्यिक, समाज सुधारक, हिंदू संघटक, आणि बुद्धिवादी, विज्ञाननिष्ठ, राष्ट्रभक्त होते. स्वातंत्र्यलढ्यात त्यांचे योगदान हे अभूतपूर्व असे आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर लिखित साहित्य रचना

सावरकरांच्या साहित्यकृतीतून, भाषणामधून स्पष्ट लेखनातून प्रकर्षाने जाणवते, ती त्यांची राष्ट्रभक्ती. जयस्तुते या काव्यात ते जेव्हा सांगतात, “तुझ्यासाठी मरणते जनंन, तुजविण जनते मरण” या काव्यमधून त्यांची मातृभूमी विषयीचे अपार तळमळ व्यक्त होतेच. पण प्रखर राष्ट्रवादी राष्ट्र प्रेमाचे शिकवणही दिली जाते. आज मरणात तर भारतरत्न देण्यात सर्वात योग्य आहेत, ते विनायक दामोदर सावरकर तथा तात्याराव सावरकर. त्यांचे वांग्मय मराठी हित्याला भूषण असून, त्यात वैचारिक निबंध, आत्मचरित्र, नाटके, खडकाव्य कविता, इत्यादीचा समावेश आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे निधन

सुमारे साठ वर्षे त्यांनी स्वातंत्र्य आणि स्वराज्य स्थापनेसाठी अथक परिश्रम घेतले. अशा या प्रखर राष्ट्रभक्ती, तेजस्वी विचार आणि ओजस्वी भाषा, असे व्यक्तिमत्व लाभलेल्या महान क्रांतिकारकाने अखेर २६ फेब्रुवारी १९६६  रोजी सावरकरांनी भारत मातेचा अखेरचा निरोप घेतला.

विनायक सावरकरांनी मृत्यूपूर्वी “आत्मसमर्पण नव्हे आत्महत्या” हा लेख लिहिला होता. लेखात आत्मरापण (मृत्यूपर्यंत उपवास) चर्चा केली आहे आणि असे म्हटले आहे की जर एखाद्याचे जीवनातील प्रमुख ध्येय पूर्ण झाले तर एखाद्याला मरणाची परवानगी दिली पाहिजे.

सावरकरांनी १ फेब्रुवारी १९६६ रोजी घोषणा केली की ते मरेपर्यंत उपवास करतील आणि जेवणार नाहीत. २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे मुंबईतील घरी निधन झाले. त्यांचे घर आणि इतर वस्तू आता लोकांसाठी प्रदर्शनात आहेत.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे काव्यसंग्रह

ने मजसी ने परत मातृभूमीला

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी । मी
जगदनुभव-योगे बनुनी । मी
तव अधिक शक्त उध्दरणी । मी

येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता । रे
नवकुसुमयुता त्या सुलता । रे
तो बाल गुलाबही आता । रे

फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा, प्राण तळमळला
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या
भुलविणें व्यर्थं हें आता । रे
बहु जिवलग गमतें चित्ता । रे
तुज सरित्पते । जी सरिता । रे

तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा, प्राण तळमळला
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे
अबला न माझिही माता । रे
कथिल हें अगस्तिस आता । रे
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा, प्राण तळमळला

शत जन्म शोधिताना

शत जन्म शोधिताना । शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्य मालिकांच्या । दीपावली विझाल्या
तेंव्हा पडे प्रियासी । क्षण एक आज गाठी
सुख साधना युगांची । सिद्धीस अंति गाठी ॥
हा हाय जो न जाई । मिठी घालु मी उठोनी
क्षण तो क्षणांत गेला । सखि हातचा सुटोनी ॥

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे

जयोस्तुते श्रीमहन्मंगले ! शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती ! त्वामहं यशोयुतां वंदे
राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती-संपदांची
स्वतंत्रते भगवती ! श्रीमत राज्ञी तू त्यांची
परवशतेच्या नभात तूची आकाशी होसी
स्वतंत्रते भगवती ! चांदणी चमचम लखलखसी
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली
स्वतंत्रते भगवती ! तूच जी विलसतसे लाली
तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्यहि तूची
स्वतंत्रते भगवती ! अन्यथा ग्रहण नष्ट तेची
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
मोक्ष-मुक्ति ही तुझीच रूपे तुलाच वेदांती
स्वतंत्रते भगवती ! योगिजन परब्रम्ह वदती
जे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर ते ते
स्वतंत्रते भगवती ! सर्व तव सहचारी होते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे
हे अधम-रक्तरंजिते, सुजन पूजिते, श्रीस्वतंत्रते
तुजसाठि मरण ते जनन, तुजवीण जनन ते मरण
तुज सकल चराचर शरण, चराचर शरण, श्रीस्वतंत्रते
वंदे त्वामहं यशोयुतां वंदे

हे हिंदुशक्ति संभूत दिप्ततम तेजा

हे हिंदुशक्ति संभूत दिप्ततम तेजा
हे हिंदुतपस्या पूत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्य भूतिच्या साजा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरणज तुज, अभिनंदना
तव चरणिं भक्तिच्या चर्ची । चंदना
गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
हा भग्न तट असे गडागडाचा आजी
हा मग्न आज जयदुर्ग आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धारा
ती म्हणुनी भवानी दे न कुणा आधारा
गड कोट जंजिरे सारे । भंगले
जाहलीं राजधान्यांची । जंगले
परदास्य पराभविं सारीं । मंगले

या जगति जगूं ही आज गमतसे लज्जा
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा
जी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवी
जी बुद्धि पांच शाहींस शत्रुच्या झुलवी
जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी
जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे
ती बुद्धि भाबड्या जीवां । लाहुं दे
ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे
दे मंत्र पुन्हा तो, दिले समर्थें तुज ज्या
हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी ग्रंथ आणि पुस्तके

  • अखंड सावधान असावे
  • १८५७ चे स्वातंत्र्यसमर
  • अंदमानच्या अंधेरीतून
  • अंधश्रद्धा भाग १
  • अंधश्रद्धा भाग २
  • संगीत उत्तरक्रिया
  • संगीत उःशाप
  • ऐतिहासिक निवेदने
  • काळे पाणी
  • क्रांतिघोष
  • गरमा गरम चिवडा
  • गांधी आणि गोंधळ
  • जात्युच्छेदक निबंध
  • जोसेफ मॅझिनी
  • तेजस्वी तारे
  • नागरी लिपीशुद्धीचे आंदोलन
  • प्राचीन अर्वाचीन महिला
  • भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  • भाषा शुद्धी
  • महाकाव्य कमला
  • महाकाव्य गोमांतक
  • माझी जन्मठेप
  • माझ्या आठवणी – नाशिक
  • माझ्या आठवणी – पूर्वपीठिका
  • माझ्या आठवणी – भगूर
  • मोपल्यांचे बंड
  • रणशिंग
  • लंडनची बातमीपत्रे
  • विविध भाषणे
  • विविध लेख
  • विज्ञाननिष्ठ निबंध
  • शत्रूच्या शिबिरात
  • संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष
  • सावरकरांची पत्रे
  • सावरकरांच्या कविता
  • स्फुट लेख
  • हिंदुत्व
  • हिंदुत्वाचे पंचप्राण
  • हिंदुपदपादशाही
  • हिंदुराष्ट्र दर्शन
  • क्ष – किरणें

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा सन्मान

  • वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे पोर्ट ब्लेअर विमानतळाचे नाव आहे जे त्यांचा सन्मान आहे.
  • लाल बहादूर शास्त्री यांचे निधन झाल्यावर आपल्या देशात राजकीय अशांतता सुरू झाली आणि इंदिरा गांधी यांची पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्ती झाली.
  • हा सन्मान वीर सावरकरांना केवळ त्यांच्या राजकीय विरोधकांना तोंड देण्यासाठी देण्यात आला होता. अहिंसेचा पुजारी म्हणून, भारत हा एकमेव देश असू शकतो जिथे राष्ट्रपिता हत्येचा आरोप असलेल्या दोन लोकांना फाशीची शिक्षा दिली जाते आणि दुसर्‍याला राष्ट्रीय सन्मान मिळतो.
  • १९६६ मध्ये वीर सावरकरांच्या निधनानंतर, भारत सरकारने त्यांच्या सन्मानार्थ एक टपाल तिकीट देखील जारी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर नावाच्या संस्था

  • नादब्रह्म (चिंचवड-पुणे) : डॉ.रवींद्र घांगुर्डे,डॉ.वंदना घांगुर्डे आणि सावनी रवींद्र – यांनी चालविलेली ही संस्था सावरकरांच्या वाङ्‌मयावर आधारित अनेक कार्यक्रम रंगमंचावर सादर करते.
  • वीर सावरकर फाउंडेशन (कलकता)
  • वीर सावरकर मित्र मंडळ
  • वीर सावरकर स्मृती केंद्र (बडोदा)
  • समग्र सावरकर वाङ्मय प्रकाशन समिती
  • सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई)
  • सावरकर रुग्ण सेवा मंडळ (लातूर)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर गणेश मंडळ
  • स्वातंत्र्यवीर सावरकर पुस्तकप्रेमी मंडळ ( संस्थापक – शिवम सत्यवान मद्रेवार )
  • स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई). ही संस्था सावरकर साहित्य संमेलने भरविते.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्मारके

  • पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृह क्रमांक १ मधील १७व्या क्रमांकाच्या खोलीत सावरकरांचे इ.स. १९०२ ते १९०५ या काळात वास्तव्य होते. सावरकर जयंतीच्या दिवशी ही एरवी बंद असलेली खोली जनतेला पाहण्यासाठी खुली केली जाते.
  • सावरकरांना अंदमानमधील तुरुंगातल्या ज्या कोठडीत ठेवले होते, ती खोली सावरकरांचे स्मारक म्हणून सांभाळली जाते. पोर्ट ब्लेयरमधील स्वातंत्र्यज्योती स्तंभावर सावरकरांची वचने कोरलेल्या धातूच्या पट्ट्या बसवल्या होत्या. ही वचने ताम्रपट्ट्यांवर कोरण्याचे काम मुंबईच्या गणेश एन्ग्रेव्हरने केले होते. तत्कालीन पेट्रोलमंत्री मणिशंकर अय्यर यांनी ९ ऑगस्ट २००४ रोजी ती वचने हटवली. २०१६ साली ती वचने पुन्हा प्रस्थापित करण्याचे काम चालू आहे.
  • पुण्यात कर्वे रोडवर एक, एस.एम जोशी पुलानजीक एक आणि शिवराम म्हात्रे रोडवर एक अशी सावरकरांची तीन स्मारके आहेत.
  • गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
  • स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
  • स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)
  • इतिहासविषयावरील पुस्तके
  • १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाद्वारे, (इ.स. १८५७च्या युद्धाचा ‘पहिले स्वातंत्र्यसमर’ असा उल्लेख करून तो लढा त्यांनी पहिल्यांदा भारतीय स्वातंत्र्यलढ्यास जोडला)
  • भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने
  • हिंदुपदपातशाही

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कथा

  • सावरकरांच्या गोष्टी भाग – १
  • सावरकरांच्या गोष्टी भाग – २

स्वातंत्र्यवीर सावरकर विषयी कादंबऱ्या

  • काळेपाणी
  • मोपल्यांचे बंड अर्थात्‌ मला काय त्याचे -मल्हार प्रॉडक्शन्सने या कादंबरीची ऑडियो आवृत्ती काढली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील चित्रपट

१९९६ मध्ये, वीर सावरकरांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात आला, ज्यात अन्नू कपूर मुख्य भूमिकेत होते. तमिळ आणि मल्याळममध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे नाव काला पानी होते. २००१ मध्ये पुन्हा एकदा, सावरकरांच्या जीवनावर आधारित वीर सावरकर नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यांना प्रशंसा मिळाली.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य

  • दोन वेळा सात सात दिवस हातकड्या घालून भिंतीवर टांगण्यात आले होते. एवढेच नाही तर सावरकरांना चार महिने साखळदंडाने बांधून ठेवले होते. अशा असह्य यातना सहन करूनही सावरकरांनी इंग्रजांपुढे नतमस्तक होणे मान्य केले नाही.
  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील ते पहिले महानायक होते, ज्यांनी जनसामान्यांमध्ये क्रांतीची आग पेटवली. वीर सावरकर हे असे महान भारतीय क्रांतिकारक आहेत ज्यांना क्रांतीच्या गुन्ह्यासाठी ब्रिटिश सरकारने एकाच जन्मात दोनदा जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
  • 8 ऑक्टोबर 1949 रोजी सावरकरांना पुणे विद्यापीठाने डी.लिट. च्या मानद पदवीने सन्मानित केले. 10 नोव्हेंबर 1957 रोजी नवी दिल्ली येथे 1857 मध्ये झालेल्या पहिल्या भारतीय स्वातंत्र्ययुद्धाच्या शताब्दी समारंभात ते मुख्य वक्ते होते.
  • 1937 मध्ये सावरकर पहिल्यांदा हिंदू महासभेच्या अध्यक्षपदी निवडून आले. त्यानंतर 1938 मध्ये हिंदू महासभेला राजकीय पक्ष म्हणून घोषित करण्यात आले. सलग 6 वेळा अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.
  • हिंदू राष्ट्रवाद (हिंदुत्व) या राजकीय विचारसरणीच्या विकासाचे मोठे श्रेय सावरकरांना जाते. ते वकील, राजकारणी, कवी, लेखक आणि नाटककार देखील होते. त्यांच्या राजकीय तत्त्वज्ञानात उपयुक्ततावाद, बुद्धिवाद, सकारात्मकतावाद, मानवतावाद, वैश्विकतावाद, व्यावहारिकता आणि वास्तववाद हे घटक होते.
  • विनायक दामोदर सावरकरांना लहानपणापासूनच हिंदू या शब्दाची प्रचंड ओढ होती. सावरकरांनी आयुष्यभर हिंदू, हिंदी आणि हिंदुस्थानसाठी काम केले.
  • 1857 च्या उठावाला इंग्रजांनी फक्त शिपायांनी केलेली बंडखोरी मानले होते परंतु सावरकर यांच्या मते तो भारताचा ‘पहिला स्वातंत्र्य लढा’ होता.
  • हिंदु राष्ट्राची राजकीय विचारधारा रुजवण्याचे बरेच श्रेय सावरकरांना जाते. त्यांच्या हिंदूवादी विचारसरणीमुळे, स्वातंत्र्यानंतरच्या सरकारांनी त्यांना ते महत्त्व दिले नाही जे त्यांना खरोखरच द्यायला पाहिजे होते.
  • सावरकर हे या जगातील एकमेव लेखक आहेत ज्यांचे “The Indian War of Independence 1857” हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच ब्रिटिशांनी त्यावर बंदी घातली होती. हे ते पुस्तक आहे ज्याद्वारे सावरकरांनी 1857 ची क्रांती हा भारताचा ‘पहिला स्वातंत्र्य लढा’ होता हे सिद्ध केले होते.
  • सावरकरांनी त्यांच्या “माझी जन्मठेप” या पुस्तकात तुरुंगात दिलेल्या छळाचे वर्णन केले आहे. दोनदा काळ्या पाण्याच्या कठोर शिक्षेदरम्यान त्यांना सहा महिने अंधाऱ्या कोठडीत ठेवण्यात आले. प्रत्येकी एक महिन्यासाठी तीनदा एकांतवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
  • कायद्याची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होणारे वीर सावरकर हे पहिले भारतीय होते. परंतु त्यांनी ब्रिटीश सरकारशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्यास नकार दिला, त्यामुळे त्यांना वकिलाची पदवी देण्यात आली नाही.
  • 1911 मध्ये त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांना अंदमानला तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांचे थोरले भाऊ गणेश सावरकर यांनाही तेथेच कैद करण्यात आले होते. सावरकरांचा तुरुंगात अमानुष छळ झाला जो एक क्रूर इतिहास बनला.
  • वीर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे सेनानी आणि प्रखर राष्ट्रवादी नेते होते. त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वराज्यप्राप्तीसाठी लढण्यात गेले. वीर सावरकर हे जगातील पहिले कवी होते ज्यांनी अंदमानच्या एकांतवासातील तुरुंगाच्या भिंतींवर खिळे आणि कोळशाने कविता लिहिल्या आणि नंतर त्या लक्षात ठेवल्या. अशा प्रकारे तुरुंगातून सुटल्यानंतर सावरकरांनी लक्षात ठेवलेल्या त्या कवितेच्या 10,000 ओळी पुन्हा लिहिल्या.

सावरकरांचे देशभक्तीपर विचार

● देहाकडुन परमेश्वराकडे जात असताना राष्ट लागत असते. आणि ह्या राष्टाचे आपण काही तरी देणे लागत असतो.

सावरकरांचे सामाजिक,धार्मिक शैक्षणिक आणि आधुनिकतावादी विचार

● कुठलाही धार्मिक ग्रंथ ईशवराने निर्माण केलेला नसून तो मानवाने निर्माण केला आहे.

● धर्मग्रंथावर आधारीत समाज संस्था उभी करण्याचे दिवस आता संपुष्टात आले आहेत,म्हणुन आता समाज संस्थेस बुदधीवादापासुन तयार झालेल्या नव्या तत्व आणि ग्रंथांवर उभे करणे फार आवश्यक आहे.

● कुठलेही महान ध्येय प्राप्त करण्यासाठी दिलेले बलिदान कधीच व्यर्थ जात नसते.

सावरकरांचे राजकीय विचार

● खरी युदधकला ती असते ज्यात आपल्या पक्षाची कमी आणि अन्याय करत असलेल्या पक्षाची सर्वाधिक हानी होत असते.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल दहा ओळी

  • १. स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजकीय पक्षाचे म्हणजेच हिंदू महासभा या पक्षाचे नेतृत्व करत. त्यांनी त्यांच्या जीवन शैलीत हिंदुत्व या शब्दाचा प्रसार करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले. व हिंदुत्व या शब्दाचा उपयोग त्यांनी भारताचा आत्मा पकडण्यासाठी केला.
  • २. स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदू तत्त्वज्ञानाचे पालन करणारे एक नास्तिक होते. त्यांनी अभिनव भारत सोसायटी ही गुप्त संस्था स्थापन केली.
  • ३. स्वातंत्र्यवीर सावरकर १९०१ मध्ये यमुनाबाई यांच्याशी विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे म्हणजे यमुनाबाई यांचे खरे नाव हे यशोदा होते.
  • ४. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विविध काव्यरचना व साहित्य रचना केल्या.
  • ५. विनायक दामोदर सावरकर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर हे दुसऱ्या महायुद्धात हिंदू महासभेचे अध्यक्ष स्थान भूषवत होते.
  • ६. १९१० रोजी ब्रिटिश सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अटक केले. व इंडिया हाऊस या क्रांतिकारी संघटनेशी त्यांचे संबंध समजल्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतामध्ये पाठवले.
  • ७. विनायक दामोदर सावरकर हे स्वातंत्र्यवीर म्हणून संबोधले जातात.
  • ८. स्वातंत्र्यवीर अर्थात स्वातंत्र्य सूर्य अशी उपमा विनायक दामोदर सावरकर यांना साजेशी आहे.
  • ९. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी लढाईमध्ये सिंहाचा वाटा होता.
  • १०. स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या महान नेत्याचा मृत्यू २६ फेब्रुवारी १९६६ रोजी झाला.

वीर सावरकर यांच्याबद्दल 10 विशेष गोष्टी

  • वीर सावरकर यांनी राष्ट्रध्वज तिरंगाच्या मधोमध धर्म चक्र लावण्याबद्दल सल्ला दिला होता. राष्ट्राध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी त्यांचा सल्ला मान्य केला.
  • वीर सावरकर प्रथम असे भारतीय राजकारणी होते ज्यांनी सर्वप्रथम विदेशी वस्त्रांची होळी जाळली होती.
  • ते प्रथम असे स्नातक होते ज्यांची पदवी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे ब्रिटिश सरकारने हिसकावून घेतली होती.
  • दुनियेतील पहिले असे कवी ज्यांनी अंदमानच्या एकांत कारागृहात भीतींवर खीळ आणि कोळशाने कविता लिहिल्या आणि त्या पाठ केल्या. या प्रकारे पाठ केलेल्या 10 हजार ओळी त्यांनी जेलहून सुटल्यावर पुन्हा लिहिल्या.
  • विनायक दामोदर सावरकर दुनियेतील एकमेव असे स्वातंत्र्य-योद्धा होते ज्यांना 2-2 जन्मठेपेची शिक्षा झाली असून ती त्यांनी पूर्ण केली आणि पुन्हा राष्ट्र जीवनात सक्रिय झाले.
  • पूर्ण स्वातंत्र्याला भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाचे लक्ष्य घोषित करणारे प्रथम व्यक्ती सावरकर होते. ते प्रथम असे राजकारणी बंदिवान होते ज्यांचे प्रकरण हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात पोहचले.
  • ते पहिले असे क्रांतिकारी होते ज्यांनी राष्ट्राच्या सर्वांगीण विकासाबद्दल चिंतन केले आणि बंदी जीवन समाप्त होताच अस्पृश्यता आणि इतर कुप्रथांविरुद्ध आंदोलन सुरु केले.
  • वीर सावरकर प्रथम असे भारतीय विद्यार्थी होते ज्यांनी इंग्लंडच्या राजा प्रती निष्ठावान असल्याची शपथ घेण्यास नकार दिला होता. परिणामस्वरूप त्यांना वकालत करता आली नाही.
  • विश्वातील पहिले असे लेखक ज्यांची 1857 के प्रथम स्वतंत्रता संग्राम रचनेला 2-2 देशांनी प्रकाशनापूर्व बंदी घातली होती.
  • सावरकर लिखित पुस्तक ‘द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडेंस-1857 एक सनसनाटी पुस्तक ठरली. ब्रिटिश शासनात या पुस्तकामुळे गोंगाट पसरला होता.

वीर सावरकर सारांश 

सावरकरांचा अपमान करणार्यांनी हे समजून घेतले पाहिजे की भारताच्या स्वातंत्र्यात त्यांची उंची महात्मा गांधींपेक्षा कमी नाही. सावरकरांच्या बलिदानाचे वास्तव आणि सत्य जाणून घेतल्याशिवाय, त्यांच्या प्रयत्नांची खोली समजून घेतल्याशिवाय आणि त्यांचा तटस्थपणे अभ्यास केल्याशिवाय, विरोधक त्यांच्यावर खोटे आरोप करत आहेत.

आपल्या देशातील काही बुद्धिजीवी आणि काही राजकीय पक्ष हे स्वातंत्र्यासाठी केलेले बलिदान आणि सर्जनशीलता विसरून इंग्रजांची माफी मागत असल्याचा आरोप करून त्यांचे अविस्मरणीय बलिदान पुसट करण्याचा प्रयत्न करत आहेत.

महान देशभक्त वीर सावरकर यांना भारतरत्न देण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. जे अद्याप पूर्ण झालेले नाही. मात्र केंद्र सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या देशभक्त नेत्याला भारतरत्न देऊन त्यांचा गौरव केला पाहिजे. जेणेकरून सावरकरांनी राष्ट्र आणि समाजासाठी केलेल्या कार्याला खरी श्रद्धांजली वाहता येईल.

अनेक वर्षांपासून त्यांचा अपमान होत आहे. हे किती दिवस चालणार? आता हे थांबले पाहिजे कारण वीर सावरकर हे असे व्यक्ती आहेत ज्यांचे संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या बलिदानाचे खरे उदाहरण आहे. अशा महान माणसावर जेव्हा खोटी निंदा केली जाते तेव्हा कोणाही खऱ्या भारतीयाचे मन अस्वस्थ होते आणि मन दु:खी होते.

वि दा सावरकरांच्या नावावर स्थापित करण्यात आलेल्या संस्थांची नावे

सावरकर यांच्या कार्यास बढती देण्यासाठी ते अजुन पुढे नेण्यासाठी विविध क्षेत्रात भारतात आज अनेक संस्था कार्य करीत आहे.त्यातील काही प्रमुख संस्थांची नावे पुढीलप्रमाणे आहेत-

  • सावरकर गणेश मंडळ
  • समग्र सावरकर साहित्य वाडमय प्रकाशन समिती
  • सावरकर साहित्य अभ्यास मंडळ(ह्या संस्थेकडुन सावरकरांवर लिखित साहित्य संम्मेलन आयोजित करण्यात येते.)
  • सावरकर रूग्णसेवा मंडळ
  • वीर सावरकर फाऊंडेशन

FAQ

१. सावरकर हिंदू महासभेचे अध्यक्ष कधी होते?

रत्नागिरीतील आपल्या १३ वर्षांच्या स्थानबद्धतेत, सावरकरांनी हिंदू धर्माच्या चिकित्सेचे प्रचंड कार्य केले. त्यानंतर सन १९३७ पासून सुमारे सात वर्षे सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्ष पद भूषविले. नंतर सावरकर लोकमान्य टिळकांची स्वराज्य पार्टीमध्ये सामील झाले. त्यांना हिंदू महासभेचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले. नंतरच्या काळात हिंदू महासभेने पाकिस्तान निर्माणाचा विरोध केला.

२. सावरकरांच्या मते हिंदुत्व म्हणजे काय?

रत्नागिरी तुरुंगात असताना त्यांनी “हिंदुत्व” हे पुस्तक लिहिले. ६ जानेवारी १९२४ ला त्यांना ते ब्रिटिश कायद्याचे पालन करत, रत्नागिरी जिल्ह्यातच राहतील. या अटीवर सोडण्यात आले. आपल्या सुटकेनंतर सावरकरांनी २३ जानेवारी १९२४ ला “रत्नागिरी हिंदू सभेची स्थापना केली”. या संघाचा उद्देश भारतीय प्राचीन संस्कृतीला संरक्षित करून, समाजाचे कल्याण करणे होते.

वि. दा. सावरकर यांच्या क्रांती तत्त्वावर कोणाचा प्रभाव होता?

वि.दा. सावरकर यांच्या क्रांती तत्वावर जोसेफ मँझिनी,चाफेकर बंधु आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता.

विनायक दामोदर सावरकर यांनी कोणती संघटना स्थापन केली?

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली होती. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे अभिनव भारत ह्या संघटनेत रूपांतर झाले.

तुरुंगात असताना सावरकरांनी कोणते महाकाव्य लिहिले?

अंदमानच्या तुरुंगात असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी “कमला” हे महाकाव्य लिहिले होते.

वि. दा. सावरकर यांनी कोणता ग्रंथ लिहिला?

वि. दा सावरकर यांनी “1857 चे स्वातंत्र्यसमर” आणि “हिंदुत्व” हे ग्रंथ लिहिले.

वि.दा सावरकर यांचा मृत्यु कधी कोठे आणि कसा झाला होता?

वि.दा सावरकर यांचा मृत्यु 26 फेब्रुवारी 1966 रोजी महाराष्टातील दादर मुंबई येथे झाला होता.सावरकरांचे निधन झाले तेव्हा त्यांचे वय 80 पेक्षा अधिक होते म्हणून असे म्हटले जाते की वृदधाल्पकाळामुळे तसेच खुप अनशन केल्याने वेळेवर गोळया औषध न घेतल्याने झाला होता म्हणजेच सावरकरांनी स्वताच ईच्छामृत्यु स्वीकारला होता.

वि.दा सावरकर यांना एकूण किती अपत्ये होती?

वि.दा सावरकर यांना एकुण चार अपत्ये होती त्यात दोन मुले आणि दोन मुली होत्या.ज्यांची नावे विश्वास,प्रभाकर आणि प्रभा,शालिनी असे होते.

वि.दा सावरकर यांच्या भावंडांची नावे काय होती?

वि.दा सावरकर यांना एकूण दोन भाऊ होते त्यात धाकटया भावाचे नाव हे गणेश असे होते आणि थोरल्या भावाचे नाव नारायण असे होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment