रतन टाटा यांचे जिवनचरित्र : Ratan Tata Biography In Marathi

रतन टाटा यांचे जिवनचरित्र : Ratan Tata Biography In Marathi – फक्त थोडी, अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतपत काही माणसं असतात, ज्यांच्या विषयी फक्त आणि फक्त चांगलंच बोललं जातं आणि असं म्हटल्यावर डोक्यात पहिलं कुठलं नाव येतं तर ते म्हणजे टाटा इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा, बिझनेस आयकॉन, टाटा रतन टाटांचं. काम इतकं मोठं, त्यांचं योगदान इतकं मोठं आहे की, आज आपल्या देशातला प्रत्येक जण त्यांचं नाव आदरानेच उच्चारतो.

जीवनात येणाऱ्या चढ-उतारांना खूप महत्त्व आहे. कारण, अगदी इ.सी.जी. मधल्या सरळ रेषेचा अर्थही आपण जिवंत नाही, हाच आहे. लोखंडाचा नाश त्याच्या स्वतःच्या गंजाशिवाय दुसरं कोणीच करू शकत नाही. त्याचप्रमाणे माणसाचा सर्वनाश त्याची स्वतःची चुकीची मानसिकताच करू शकते. आपल्या सर्वांकडे समान बुद्धिमत्ता नसते, पण तरीही ती विकसित करण्याची संधी मात्र आपल्या सर्वांकडे समान असते.

Table of Contents

रतन टाटा यांचे जिवनचरित्र : Ratan Tata Biography In Marathi

पूर्ण नाव रतन नवल टाटा
जन्मतारीख २८ डिसेंबर इ.स. १९३७ मुंबई, ब्रिटीश भारत
निवासस्थान कुलाबा, मुंबई, भारत
वडिलांचे नाव नवल टाटा
आईचे नाव सोनू टाटा 
धर्म पारसी
मालकटाटा उद्योगसमूह
शिक्षण कॉर्नेल विद्यापीठ, हार्वर्ड विद्यापीठ,
बी.एस. स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि आर्किटेक्चरमध्ये पदवी प्रगत व्यवस्थापन कार्यक्रम
पुरस्कार २००० साली पद्मभूषण, पद्मविभूषण (२००८) 

मी कधीच या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत, की मी योग्य निर्णय घेतोय की नाही, आधी निर्णय घेऊन मग तो योग्य आहे हे सिद्ध करण्यावर मी विश्वास ठेवतो. हे सुप्रसिद्ध वाक्य आहेत, टाटा ग्रुप आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन आणि भारतातले सर्वात दानशूर उद्योगपती म्हणून ज्यांना अख्खा देश ओळखतो त्या श्री रतन टाटा यांचे.

ज्यांनी आपल्या देशासाठी आणि देशातील लोकांच्या हितासाठी आपल्या नीती मूल्यांना जपत प्राणापलीकडे जाऊन टाटा ग्रुपला आपल्या मेहनतीने मोठे केले, ते महान उद्योगपती रतन टाटा. आजच्या या लेखाद्वारे आम्ही आपणास रतन टाटा यांच्या जीवन प्रवासाबद्दल माहिती दिली आहे.

कोण आहेत रतन टाटा ? Ratan Tata Information In Marathi

२८ डिसेंबर २०१२ रोजी आपल्या ७५ व्या वाढदिवसाच्या दिवशी रतन टाटा यांनी टाटा ग्रुपच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला. असे एकही क्षेत्र नाही ज्या क्षेत्रात टाटांची कंपनी नाही. देशा, विदेशात, बहुतेक क्षेत्रात टाटांच्या कंपन्या दिग्गज म्हणून ओळखल्या जातात. टाटा ग्रुप हा रिलायन्स पेक्षाही खूप मोठा आहे. असं असूनही, रतन टाटांचे नाव मात्र जगातल्या तर सोडाच पण भारतातल्या ही श्रीमंतांच्या यादीत येत नाही.

याचं कारण असं की, टाटा म्हणजे विश्वास. अशी टाटांची प्रतिमा अगदी कंपनीच्या स्थापनेपासूनच प्रत्येक भारतीयांच्या मनात कोरली गेली. टाटा नुसता व्यवसाय नाही करत, तर स्वतःपेक्षा ते देशाच्या विकासाला जास्त प्राधान्य देतात. म्हणूनच टाटा ग्रुपची होल्डिंग कंपनी टाटा संस्थेचे ६६%  शेअर्स टाटांच्या चारिटेबल ट्रस्ट कडे आहेत. त्यातला प्रॉफिट हे दानधर्म आणि समाजकल्याण साठी खर्च करण्यात येते. रतन टाटांकडे फक्त १ टक्का शेअर्स आहेत.

रतन टाटांनी ठरवलं असतं तर, भारतातले सर्वात श्रीमंत व्यक्ती ते सहज ठरले असते. शिवाय जगातल्या श्रीमंतांच्या यादीतही त्या आघाडीवर राहिले असते. कंपनीचे संस्थापक जमशेदजी टाटांपासून ते जेआरडी टाटा पर्यंत प्रत्येकाने टाटा ग्रुपची इमेज तयार केली आणि ती जपली. तसेच ती रतन टाटांनी जपली. रतन टाटा आजही अविवाहित आहेत.

Ratan Tata Biography In Marathi

हे सुद्धा वाचा👉 सिंधुताई सपकाळ माहिती मराठी 

रतन टाटा यांचा जन्म आणि बालपण

रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला. टाटा ग्रुपचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे ते नातू. मित्रांनो आपला साधारण समज असा असतो की, श्रीमंता घरी जन्माला आलेल्या मुलांना कसलच टेन्शन नसतं. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या या मुलांच्या जीवनात फक्त आनंद आणि सुखच असतं. पण असं नसतं. १९४८  साली रतन टाटा दहा वर्षांचे असताना, त्यांचे आई-वडील नवल आणि सोनू टाटा विभक्त झाले. आई-वडिलांबरोबरच्या एकत्रित प्रेमाचं सुख त्यांना उपभोक्त आलं नाही. त्यानंतरच्या काळात त्यांच्या आजीने त्यांचा सांभाळ केला.

रतन टाटा फॅमिली ट्री

1- जमशेदजी नुसरवानजी टाटा- टाटा समूहाचे संस्थापक, भारतातील सर्वात मोठी समूह कंपनी. हिराबाई दाबू यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.

2- दोराबजी टाटा- जमशेदजी टाटा यांचा मोठा मुलगा आणि टाटा समूहाचे दुसरे अध्यक्ष. त्यांची पत्नी मेहेरबाई टाटा, प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होमी जे. भाभा यांच्या मावशी होत्या.

3- रतनजी टाटा- जमशेदजी टाटा यांचा धाकटा मुलगा. त्यांचा विवाह नवजबाई टाटा यांच्याशी झाला होता. त्यांच्या पत्नीने नवल या अनाथ मुलाला दत्तक घेतले, जो हिराबाई टाटांचा नातू होता आणि त्याला स्वतःचा मुलगा म्हणून वाढवले.

4- नवल टाटा- नवजबाई टाटा यांचा दत्तक मुलगा. त्यांचे जैविक पिता होर्मुसजी टाटा होते. त्यांची आजी हिराबाई टाटांची बहीण होती. अनेक टाटा कंपन्यांचे संचालक, ILO सदस्य आणि पद्मभूषण पुरस्कार प्राप्त नवल टाटा यांना दोन विवाहांतून तीन मुलगे- रतन टाटा (टाटा समूहाचे 5 वे अध्यक्ष), जिमी टाटा आणि नोएल टाटा (ट्रेंट लिमिटेडचे अध्यक्ष) होते.

5-रतनजी दादाभॉय टाटा- ते टाटा समूहाची सेवा करणाऱ्या सुरुवातीच्या दिग्गजांपैकी एक होते. त्यांचे वडील दादाभॉय आणि आई जमशेदजी टाटा, जीवनबाई, हे भावंड होते. त्यांनी सुझान ब्रिएरशी लग्न केले आणि या जोडप्याने जेआरडीसह पाच मुलांना जन्म दिला. टाटा आणि सिला टाटा.

6- जे.आर.डी. टाटा- त्यांनी टाटा समूहाचे चौथे अध्यक्ष म्हणून काम केले. ते टाटा एअरलाइन्सचे (नंतर एअर इंडिया) संस्थापक आहेत.

7- सिला टाटा- जे.आर.डी.ची मोठी बहीण टाटा यांचा विवाह भारतातील पहिल्या कापड गिरणीचे संस्थापक दिनशॉ मानेकजी पेटिट यांच्याशी झाला होता. तिची मेहुणी रतनबाई पेटिट यांचा विवाह पाकिस्तानचे संस्थापक मुहम्मद अली जिना यांच्याशी झाला होता. जिना यांचा एकुलता एक मुलगा दीना जिना यांचा विवाह नेव्हिल नेस वाडिया यांच्याशी झाला होता.

रतन टाटा यांचे शिक्षण

रतन टाटा यांचे शालेय शिक्षण मुंबई आणि शिमला येथे झाले. १९५५ साली न्यूयॉर्क मधल्या रिव्हरडेल कंट्री स्कूल मधून ते ग्रॅज्युएट झाले. त्यांचे आर्किटेक्ट होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे ते आपल्या पुढील शिक्षणासाठी, अमेरिकेतील कॉर्नेल युनिव्हर्सिटी मध्ये गेले. रतन टाटा हे खूप लाजाळू स्वभावाचे होते.

आपल्या टाटा या आडनावास न वापरता स्वतःच्या हिमती वरती शिक्षण घ्यायचे, या जिद्दीने ते अमेरिकेस गेले. आपले शिक्षण संपेपर्यंत त्यांनी हॉटेलमध्ये भांडी घासण्यापासून, ते अगदी क्लार्क पर्यंत कितीतरी छोटी मोठी कामे केली. १९५९ मध्ये त्यांना बॅचलर इन आर्किटेक हि डिग्री मिळाली. आणि १९७५  साली हार्वर्ड बिजनेस स्कूल मधून त्यांनी ऍडव्हान्स मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला.  

रतन टाटा यांच्या कारकिर्दीची सुरुवात

१९६१ साली त्यांनी त्यांच्या टाटा स्टील कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. त्यावेळी कंपनीचे चेअरमन होते, जेआरडी टाटा. १९७० साली रतन टाटा यांच्यावर टाटा ग्रुपच्या नॅशनल रेडिओ आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच नेल्को या टीव्ही आणि रेडिओ बनवणाऱ्या कंपनीची जबाबदारी आली. १९७२ ते १९७५ या तीन वर्षात कंपनीचा सगळ्यात तोटा भरून काढत नेल्कोचा मार्केट शेअर दोन टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत वर गेला. पण १९७५ ते १९७७ साली देशात लागू झालेल्या, आणीबाणीमुळे काही वर्षांनी ही कंपनी नाईलाजाने बंद करावी लागली.

पण त्या काळात नेल्को च्या टीव्हीने बाजारात नाव कमवायला नुकतीच सुरुवात केली होती हे खरे. त्याच दरम्यान म्हणजे १९७७ साली टाटा टेक्स्टाईलच्या एम्प्रेस मिलची जबाबदारी रतन टाटा यांच्याकडे देण्यात आली. ही कंपनी ही बंद होण्याच्या मार्गावर होती, तिला पुन्हा उभारी देण्यासाठी तिच्या आधुनिकीकरणाची फार गरज होती.

त्यासाठी रतन टाटा यांनी बॉम्बे हाऊस कडे म्हणजे टाटा ग्रुपच्या हेड ऑफिस कडे ५० लाखांच्या फंडाची विनंती केली, पण ती नाकारली गेली. अखेर एम्प्रेस मिल १९८६ साली बंद पडली. मित्रांनो, यश मिळवण्यापूर्वी अपयशाशी गाठ पडणं खूप आवश्यक आहे. कारण, त्यातूनच आपल्याला काहीतरी नाही तर बरंच काही शिकायला मिळतं.

रतन टाटा यांच्या जीवनातली ही दोन अपयश होती जी, त्यांनी त्यांच्या पुढच्या यशस्वी वाटचालीसाठी खूप काही शिकण दिली. १९९१ साली जेआरडी टाटा ग्रुपच्या चेअरमन पदावरून पायउतार झाले. आणि त्यांनी रतन टाटा यांची टाटा ग्रुपचे चेअरमन म्हणून नेमणूक केली. रतन टाटा संपूर्ण टाटा ग्रुपचे पाचवे चेअरमन झाले. टाटा ग्रुप मध्ये आपल्या २१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी टाटा ग्रुपच्या सगळ्याच कंपन्यांची भरभराट केली. टाटा ग्रुपचा रेवेन्यू ४० पटींनी तर प्रॉफिट ५० पटींनी वाढला.

Ratan Tata Biography In Marathi

रतन टाटा यांची व्यवसायिक कारकीर्द

ट्रक आणि टेम्पो यांसारख्या हेवी कमर्शियल वेहिकल्समध्ये टाटा ग्रुपची मक्तेदारी होतीच, यापुढे जाऊन क्षेत्रात पुढे ३० डिसेंबर १९९८ रोजी टाटानी इंडिका कार लॉन्च केली. सुरुवातीला या कारच्या बऱ्याच कंप्लेंट झाल्याने विक्री घसरली आणि इंडिका कार फ्लॉप ठरली. टाटा मोटर्सचे त्यामुळे खूप मोठा नुकसान झालं. ते भरून काढण्यासाठी कार कंपनी विकण्याचा त्यांच्यावर दबाव येऊ लागला. कार कंपनी विकायला ते तयारही झाले आणि त्याच डील करण्यासाठी ते अमेरिकेत फोर्ड कंपनीच्या मुख्यालयात गेले.

पण तिथे झालेल्या अपमानामुळे रतन टाटा ते डील कॅन्सल करून भारतात परतले ते विकायला काढलेली कंपनी पुन्हा उभी करण्याचा चंग बांधूनच. आणि खरोखरच त्यांनी पुढच्या दोन वर्षातच इंडीकाचे दुसरे नाव वर्जन सक्सेसफुल करून दाखवलं. इंडिका कार त्या सेगमेंटमध्ये नंबर वन ठरली. २००६-०७ या वर्षात इंडिका कारची विक्री ०१ लाख ४४००० च्या घरात गेली.

२००९ सालापर्यंत दर महिन्याला जवळपास आठ हजार कार्स विकला जाऊ लागल्या. एवढेच नाही, तर युरोप आणि आफ्रिकन देशांमध्ये त्यांची निर्यात झाली. रतन टाटांच्या कारकिर्दीत परदेशातल्या बाजारपेठा काबीज करण्यासाठी टाटा ग्रुपने परदेशातल्या मोठ्या कंपन्या विकत घ्यायचा सपाटा लावला.

हे पण वाचा👉 मदर टेरेसा माहिती मराठी

रतन टाटा यांची उपलब्धी

  • २००० साली टाटा ग्रुपने युके आणि कॅनडा मधली सर्वात मोठी चहा कंपनी टेटली ग्रुप विकत घेतला. टेटली विकत घेतल्यामुळे टाटा ग्रुपची टाटा कन्स्युमर प्रोडक्ट ही कंपनी जगातली दुसरी सर्वात मोठी चहा उत्पादन करणारी कंपनी झाली.
  • २००१ साली इन्शुरन्स क्षेत्रातल्या अमेरिकेतल्या अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप म्हणजेच ए.आय.जी. या कंपनीची ७४ टक्के हिस्सेदारी टाटा ग्रुपने खरेदी केली. कंपनीचे नाव झाले टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड.
  • मार्च २००४ मध्ये दक्षिण कोरियातली डेबू कमर्शियल वेहिकल कंपनी टाटांनी १०२ मिलियन डॉलर्सला खरेदी केली. कंपनीचे नविन नाव टाटा डेबू कमर्शियल व्हेईकल कंपनी असे ठेवण्यात आले.
  • २००४  साली टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस म्हणजेच टी.सी.एस या आयटी कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग झाली. आज टी.सी.एस भारतातली दुसरी सर्वात मोठी टेक कंपनी आहे. जगातल्या ४६ देशांमध्ये १४९ ठिकाणी या कंपनीची ऑफिसेस आहेत. सर्विस सेक्टर हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. आणि यात टाटा कन्सल्टन्सी सर्विसेसचे सर्वात मोठे योगदान आहे.
  • जुलै २००५ मध्ये कॅनडातली टेलिग्राम इंटरनॅशनल होल्डिंग ही कंपनी टाटा ग्रुपने २३९  मिलियन डॉलर्सला खरेदी केली. कंपनीचे नवीन नाव टाटा इंटरनॅशनल कॅनडा असं ठेवण्यात आले.
  • जानेवारी २००७ मध्ये युके मधला कोरस ग्रुप तब्बल १२ बिलियन डॉलर्सला टाटा ग्रुपने विकत घेतला, टाटा स्टील युरोप लिमिटेड असं कंपनीचं नाव ठेवण्यात आलं.

विकत घेतल्या जॅग्वार कार्स, लँड रोवर

1999 मध्ये, टाटा समूहाला आपला नवीन कार व्यवसाय फोर्डला विकायचा होता. रतन टाटा त्यांच्या टीमसह डेट्रॉईटला गेले आणि फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांची भेट घेतली. तीन तास चाललेल्या या बैठकीत रतन टाटा यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. बिल यांनी त्यांना स्पष्टपणे सांगितले होते की त्यांना कारबद्दल काहीच माहिती नाही आणि फोर्ड त्याच्या कार डिव्हिजन विकत घेऊन टाटांवर उपकार करत आहे.

त्या बैठकीनंतर, रतन टाटा यांनी कार विभाग न विकण्याचा निर्णय घेतला आणि ते भारतात परतले. त्यांनी आपले सर्व लक्ष टाटा मोटर्सवर केंद्रित केले आणि आणखी मेहनत घेतली. ते म्हणतात, अपयश ही सर्वात मोठी प्रेरणा आहे.

नऊ वर्षांनंतर टेबल उलटले आणि रतन टाटा यांनी त्यांचा क्षण पकडला. 1999 मध्ये अमेरिकेत झालेल्या अपमानानंतर, टाटांनी फोर्डवर त्याचा बदला घेतला. त्यांनी फोर्ड कंपनीची jaguar विकत घेतली.

फोर्डचे चेअरमन बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांचे आभार मानले, “तुम्ही जेएलआर खरेदी करून आमच्यावर मोठा उपकार करत आहात.” टाटांनी केवळ JLR खरेदीच केले नाही तर ते त्यांच्या सर्वात यशस्वी उपक्रमांपैकी एक बनले.

Ratan Tata Biography In Marathi

रतन टाटा यांचा सन्मान आणि पुरस्कार

  • २००० साली पद्मभूषण
  • २००१ मध्ये ओहायो स्टेट युनिव्हर्सिटीने व्यवसाय प्रशासनात मानद डॉक्टरेट दिली.
  • २००४ उरुग्वेयन ओरिएंटल रिपब्लिक मेडल
  • २००४ मध्ये एशियन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने तंत्रज्ञानात मानद डॉक्टरेट दिली.
  • २००५ युनिव्हर्सिटी ऑफ वॉरविक मानद डॉक्टर ऑफ सायन्स
  • २००५ मध्ये प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय कामगिरीसाठी पुरस्कार
  • २००६ इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास मानद डॉक्टर ऑफ सायन्स
  • २००७ कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीस कार्नेगी मेडल ऑफ सर्विस
  • २००८  साली पद्मविभूषण
  • २००८ ऑनररी फेलोशिप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी फॉर इंजिनीअरिंग
  • २००८ सिंगापूर सरकारचा मानद नागरिक पुरस्कार
  • २००८ मानद डॉक्टर ऑफ सायन्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूर
  • २००८ मानद डॉक्टर ऑफ सायन्स इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई
  • २००८ केंब्रिज विद्यापीठातून कायद्याचे मानद डॉक्टर
  • २००८ लीडरशिप अवॉर्ड दिला जातो.
  • २०१० बिझनेस लीडर आशियाई पुरस्कार
  • २०१२ रॉयल अॅकॅडमी ऑफ इंजिनियरिंग मानद फेलोशिप
  • २०१४ कॅनडाच्या न्यूयॉर्क विद्यापीठातून कायद्याचे मानद डॉक्टर
  • २०१५ क्लेमसन विद्यापीठातील ऑटोमोटिव्ह इंजिनिअरिंगचे मानद डॉक्टर

रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार

  • जर तुम्हाला लवकर पुढे जायचे असेल, तर एकटेच जा परंतु तुम्हाला दूरवर जायचे असेल, तर सर्वांना सोबत घेऊन चला.
  • जगातील प्रत्येक जण कठोर परिश्रम करतो, परंतु प्रत्येकास त्याच्यानुसार परिणाम मिळत नाहीत, आणि यासाठी आपले कार्य करण्याची पद्धत जबाबदार आहे, म्हणून आपण आपल्या कामाची पद्धत सुधारणे महत्त्वाचे आहे.
  • लोखंडाला कोणीही नष्ट करू शकत नाही, पण त्याचा स्वतःचा गंज त्याला नष्ट करू शकतो. तसेच माणसालाही कोणीही पराभूत करू शकत नाही, पण त्याची मानसिकता त्याला पराभूत करू शकते.
  • सत्ता आणि संपत्ती ही माझी मुख्य तत्वे नाहीत. जे लोक तुमच्यावर दगड फेकतात, त्यांना तुम्ही त्या दगडांनी उत्तर देऊ नका, तर त्या दगडांचा संग्रह करून, तुम्ही तुमच्या स्वप्नांच्या इमारतीची गरज पूर्ण करू शकता.
  • आपण सर्व मानव आहोत, संगणक नाही. प्रत्येक क्षणी जीवनाचा आनंद घ्या, त्याला गंभीर बनवू नका.
  • मी भारताचे भवितव्य आणि संभावतेबद्दल खूप आनंदी आहे. कारण आपला देश महान आहे. आपल्या महान देशातही मोठी क्षमता आहे.
  • माझ्या निर्णयामुळे लोक दुखी होऊ शकता. परंतु मला अशी व्यक्ती म्हणून ओळखले जाते ज्याने प्रत्येक परिस्थितीत योग्य गोष्ट करण्यासाठी तडजोड केली नाही.
  • केवळ पैसा आणि प्रसिद्धी मिळवणे पुरेसे नाही. आपण सर्व या जगात थोडे दिवसांचे पाहुणे आहोत, त्यामुळे जीवनाचा आनंद घ्या.
  • झाड कापण्याआधी कुऱ्हाडीची धार बघणे आवश्यक आहे. त्यामुळे जर आठ तासात झाड कापायचे असेल, तर सहा तास कुऱ्हाडीचे धार लावल्यास, यश मिळण्याची शक्यता वाढते.
  • कोणत्याही कामाला ठराविक वेळेच्या आत पूर्ण करायला पाहिजे आणि तेच काम करायला पाहिजे, ज्यामध्ये सुख प्राप्त होईल.
  • तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट असेल, जेव्हा संघटनेला आव्हाने देणे गरजेचे असेल. मी जे काही कमावतो त्यात मला आवड आहे, मला माझ्या प्रगतीत आवड आहे. लोक अजूनही विश्वास ठेवतात की, ते जे वाचतात ते सत्य आहे.
  • अशी अनेक कामे आहेत, जी आपल्या देशात व्हायला हवी होती. परंतु ते नाही होऊ शकले. यासाठी त्या मानसिकतेचे लोक जबाबदार आहेत. जे म्हणतात की हे काम करणे अशक्य आहे. येणाऱ्या वर्षात तुम्ही या देशाचे लीडर्स बनाल. या देशाचे भवितव्य तुमच्याच खांद्यावर आहे.
  • हे काम करणे अशक्य आहे, हे होऊ शकत नाही. अशा विचारांना मनात जागा देऊ नका. आपल्या आजूबाजूला बघा हे जग यशाच्या उदाहरणांनी भरलेले आहे. सर्व मोठ्या कंपन्यांचे उदाहरण आहेत मायक्रोसॉफ्ट गुगल या कंपन्या तेव्हाच अस्तित्वात आल्या, जेव्हा कोणीतरी विचार केला की, हे काम केले जाऊ शकते. ते करणे शक्य आहे. तुमच्याकडून हीच आशा आहे की, नकारात्मकतेकडे बघू नका. निश्चय केला तर मोठे काम केले जाऊ शकते.
  • लक्षात ठेवा जीवनात कितीही यश मिळवले, तरीही विनम्रता कधीही सोडू नका. तुम्ही किती पैसे कमावले, तुम्ही कोणत्या पदावर पोहोचले, किंवा समाजात तुमची किती प्रतिष्ठा आहे, तुमच्या यशाचे मोजमाप हे असायला पाहिजे की, जेव्हा रात्री तुम्ही घरी परत याल तेव्हा, मनात समाधान असले पाहिजे की, आपला देश आणि समाजाच्या प्रगतीमध्ये मी योगदान दिले आहे. मग ते योगदान कितीही छोटे असो, माझ्या विश्वास आहे की खरा लिडर तोच असतो. जो भविष्याच्या गर्भात लपलेल्या संधीला अगोदरच ओळखतो. आणि त्यानुसार काम करतो.
  • कोणतेही काम कितीही छोटे असो, तुम्ही काही ना काही असे काम करत राहिला पाहिजे, जे देशाच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या करोडो लोकांच्या जीवनात बदल घडवून आणेल. आणि त्यांचे जीवन उत्तम बनवेल. जर तुम्ही असे करू शकला तर तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी व्हाल.
  • लोक तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाहीत. त्यामुळे आधी स्वतःला सिद्ध करा. कॉलेजचे शिक्षण पूर्ण करून पाच आकड्यांची पगार मिळवण्याचा विचार करू नका. एका रात्रीमध्ये कोणीही व्हाईस प्रेसिडेंट बनत नाही. त्यासाठी आपण मेहनत करावी लागते.
  • तुमची चूक फक्त तुमची आहे. तुमचा पराभव फक्त तुमचा आहे. कोणालाही दोष देऊ नका. आपल्या चुकांपासून शिका आणि सामोरे जा.
  • तुमच्या आई वडील तुमच्या जन्माच्या आधी एवढे कंटाळवाले नव्हते, जेवढे ते तुम्हाला आता वाटतात. तुमचे पालन पोषण करण्यास त्यांनी एवढे कष्ट भोगले की, त्यांचा स्वभाव बदलला.
  • अपयश आले तर वाईट वाटून हार पत्करण्यापेक्षा अपयशाची कारणे शोधा. त्यावर मात करा.

रतन टाटा – माणुसकीचे जिवंत उदाहरण

रतन टाटांच्या समाजकार्याविषयी, त्यांच्या योगदानाविषयी, अनेकदा आपण माध्यमातून ऐकत असतो. त्यांचे अनेक किस्से ऐकत असतो, त्यापैकीच काही निवडक किस्से खालील प्रमाणे –

१) रतन टाटांनी त्यांच्या कुत्र्यांच्या प्रेमापोटी एकदा ब्रिटनच्या घराण्याकडून पुरस्कार नाकारला होता. त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचा ठरवलं होतं. हा कार्यक्रम बकिंगहम पॅलेस इथे आयोजित करण्यात आला होता. यासाठी रतन टाटा यांना विचारणा करण्यात आली आणि त्यांनी कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं होतं. कार्यक्रमाची तारीख ठरली. ०६ फेब्रुवारी २०१८ पुरस्कार घेण्यासाठी रतन टाटा इंग्लंडला जाणार होते. पण त्याचवेळी नेमकी त्यांच्याकडे असलेल्या टीटू आणि टॅंगो या दोन कुत्र्यांपैकी टीटू आजारी पडला. अशा स्थिती त्याला एकटं सोडून इंग्लंडला कसं जायचं ? असा विचार करून टाटांनी पुरस्कार घेण्यासाठी इंग्लंडला जाणार रद्द करून टाकलं होतं.

२)  रतन टाटांनी करिअरच्या सुरुवातीला स्वतःच्याच कंपनीत नोकरी केली होती. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे प्रत्येक यशस्वी माणसाची त्याने केलेल्या कष्टाची स्टोरी असते. तशीच रतन टाटांची सुद्धा आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या हातात आयबीएम कडून तगड्या पगाराची जॉब ऑफर सुद्धा होती. पण ती जॉब ऑफर न स्वीकारतात त्यांनी स्वतःच्याच कंपनीत कामाचा फक्त अनुभव घेण्यासाठी कमी पगाराची नोकरी पत्करली होती.

३)  रतन टाटा खरंच एवढे ग्रेट का आहेत हे सांगणार आणखी एक उदाहरण म्हणजे मोठ्या लोकांची पद्धत असते, कार मध्ये बसताना मालक नेहमी मागे बसतो. म्हणजे ड्रायव्हरच्या बाजूला बसत नाही. मागे बसतो का तर त्याला त्याची इज्जत सांभाळायची असते अगदी दोन-तीन लोक गाडीत जास्त असतील, तर ड्रायव्हरच्या बाजूला बसणं होतं. पण रतन टाटा कायम एक नियम पाळतात. ते नेहमी कुठेही जात असले तरी, कितीही कमी किंवा जास्त वेळासाठी जात असले तरी आणि सोबत कोणी असेल किंवा नसेल तरी, कायम त्यांच्या ड्रायव्हरच्याच बाजूला बसतात.

४)  रतन टाटा एकदा त्यांच्या आजारी कर्मचाऱ्याला त्याच्या घरी जाऊन भेट दिली होती. टाटा ग्रुपचा डोलारा किती मोठा आहे हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे इतक्या मोठ्या कंपनीत हजारो लाखो कर्मचाऱ्यांनी आजवर काम केलं असेल, पण इथे रतन टाटांचं आपल्या कर्मचाऱ्यांना प्रती असलेले प्रेम त्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी असणारी काळजी, आपल्याला त्यांच्या कृतीतून वेळोवेळी दिसून येते. आणि असंच रतन टाटा आपला कर्मचारी आजारी आहे हे कळताच एकदा त्याला आजारी कर्मचाऱ्याला म्हणून भेटायला गेले होते. रतन टाटा मुंबईतून त्यांच्या एम्प्लॉईला भेटण्यासाठी पुण्यात आले होते.

५)  रतन टाटा आपल्या देशाचे एक रत्नच. रतन टाटांना भारतरत्न द्यावं अशी आपल्या अख्या देशाची इच्छा होती. परंतु टाटांनी अशी मागणी न करण्याचे लोकांना आवाहन केलं होतं. मी या पुरस्कारासाठी पात्र नाही. असं रतन टाटांचा ठाम मत होतं. एवढंच नाही तर रतन टाटा यांनी जी काही कॅम्पिंग सुद्धा राबवली जात होती. ती थांबवण्याचा सुद्धा आव्हान केलं होतं.

6)  जेव्हा बिझनेस आयकॉन असलेले रतन टाटा एका ग्रुप फोटोसाठी गुडघ्यावर बसले होते. २०१२ साली टी.सी.एस लीडरशिप प्रोग्रॅममध्ये, त्यात जॉईन झालेल्या कार्यकर्त्यांसाठी एक छोटासा प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. तेव्हा प्रमुख पाहुणे म्हणून रतन टाटांना बोलवण्यात आलं. तेवढ्यात ग्रुप फोटोचा विषय निघाला. सगळे फोटोसाठी अड्जस्ट होत होते. तेवढ्यात रतन टाटा ग्रुपच्या पहिल्या रांगेत गुडघ्यावर बसले. इतका मोठा माणूस फोटोसाठी इतरांसारखा गुडघ्यावर बसला होता. आणि हे समजायला पण बाकीच्यांना थोडा वेळ लागला. नक्की काय घडले हे थोडे कळेपर्यंत टाटा म्हणाले, लवकर फोटो काढा मला फार वेळ गुडघ्यावर बसता येत नाही. गोष्ट साधी नव्हती, पण रतन टाटांचा पराकोटीचा साधेपणा दाखवणारी होती. हे आहे भारताचे आदर्श व्यक्तिमत्व.

रतन टाटा यांनी लग्न का केले नाही ?

अमेरिकेतल्या फेमस विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांचे एका मुलीसोबत जुळले होते. दोघांचा रिलेशन होतं आणि दोघांना आपापल्या आयुष्यात काय करायचे हेही पक्क माहित होतं. पण त्या मुलीला भारतात यायचं नव्हतं. कारण, तिला भारत देश नेहमीच असुरक्षित वाटायचा. दरम्यान भारत आणि चीनचे युद्ध सुद्धा सुरू झालं. त्यामुळे भारतातल्या असुरक्षिततेवर तर तिने शिक्काचमोर्तब केला आणि असे एकदा नाहीतर त्यांच्या बाबतीत चार वेळा झालं होतं. त्यांचं लग्न जमता जमता राहिलं होतं.

रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व

एक चांगला नेता बनवणारे अनेक गुण तन टाटामध्ये आहेत. ते बुद्धिमान, निर्णायक आहेत आणि त्यांच्या कंपनीबद्दल स्पष्ट दृष्टी आहे.

टाटा हे एक अतिशय नम्र माणूस आहेत. तो नेहमी आपल्या ग्रुपला त्यांच्या यशाचे श्रेय देण्यास तत्पर असतात आणि त्यांच्या अपयशाची जबाबदारी घेतात.

रतन टाटा हे एक उत्कृष्ट नेते आणि त्याहूनही चांगले माणूस आहेत. त्याच्याकडे इतरांना प्रेरित करण्याची आणि त्यांना महान गोष्टी साध्य करण्याची क्षमता आहे.

रतन टाटा यांची संपत्ती

Economic Times च्या अहवालानुसार, रतन टाटा यांची एकूण संपत्ती INR 3,800 कोटी इतकी आहे. याचे सर्वाधिक श्रेय टाटा सन्स या प्राथमिक गुंतवणूक होल्डिंग कंपनी आणि टाटा कंपन्यांचे प्रायोजक यांना आहे. आयटी आणि ग्राहकोपयोगी वस्तूंसारख्या प्रमुख उद्योगांमध्ये अस्तित्व असलेल्या टाटा समूहाचे बाजार मूल्य INR 23.6 ट्रिलियन आहे. 

टाटा त्यांच्या परोपकारासाठी ओळखले जातात.  टाटा कंपन्यांच्या इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये हे योगदान 66 टक्के आहे. आणि टाटा ग्रुप्स मध्ये जवळपास 9,35,000 लोक कार्यरत आहेत.

रतन टाटा कॅन्सर हॉस्पिटल

रतन टाटांनी आसाम मध्ये कॅन्सर हॉस्पिटल बांधण्यात येणार आहेत अशी घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या हस्ते या हॉस्पिटलच्या पायाभरणीचा कार्यक्रम पार पडला. दरम्यान रतन टाटा म्हणाले, “माझे शेवटचे एक मिशन म्हणजे, माझ्या आयुष्याची शेवटची वर्ष मी आरोग्यासाठी समर्पित केली आहे”. एखादा देश करू शकत नाही, इतकं काम एखाद्या संस्थेमार्फत पार पडले. यात महत्त्वाचं नाव म्हणजे “टाटा मेमोरियल सेंटर”.

हे सेंटर सुरू होण्यामागचं कारण होतं, ते म्हणजे दोरांजी टाटा यांच्या पत्नी लेडी मेहरबानी टाटा यांचा १९३२ मध्ये ब्लड कॅन्सर मुळे निधन झालं होतं. त्यानंतर दोराजी टाटा यांनी भारतात कॅन्सर हॉस्पिटल उभारण्याचा स्वप्न पाहिलं. ते स्वप्न जेआरडी टाटा यांच्या प्रयत्नानंतर साकार झालं. आणि टाटा मेमोरियल सेंटर उभं राहिलं.

जगभरातील कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केले जातात. जी उपचार पद्धती खर्चिक मानली जाते आणि फक्त अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्येच उपलब्ध आहे. ती टाटांच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असते. टाटा मेमोरियलच्या देशभरात अनेक ठिकाणी ब्रांचेस आहेत. मुंबई, नवी मुंबई, विशाखापट्टणम, पंजाब, वाराणसी, गुवाहाटी, त्यातलेच एक म्हणजे कोलकत्यातील टाटा मेडिकल सेंटर. हे सेंटर रतन टाटा यांच्या आरोग्य क्षेत्रातील निस्वार्थ योगदानाचा जिवंत पुरावा म्हणायला लागेल.

रतन टाटा यांच्याबद्दल १० ओळी

  • 1) रतनजींनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले आहे.
  • २) रतन टाटा हे सामाजिक बांधिलकी, वचन बद्धता, प्रामाणिकपणा यासाठी ओळखले जातात.
  • 3) 1999 मध्ये जेव्हा ते टाटा मोटर्स विकायला गेले होते तेव्हा बिल फोर्ड (फोर्डचे अध्यक्ष) यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले होते.
  • 4) नंतर 2008 मध्ये त्यांनी फोर्ड मोटर कंपनीच्या लँड रोव्हर आणि जग्वार या दोन उपकंपन्या विकत घेतल्या.
  • 5) कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरमध्ये आर्किटेक्चरचा अभ्यास करण्यासाठी ते अमेरिकेत गेले होते.
  • ६) जरी ते अतिशय श्रीमंत घराण्यात जन्मले असले तरी ते साधेपणाने जीवन जगतात.
  • 7) अमेरिकेत शिकत असताना हॉटेल्समधील स्वयंपाकघरात ते काम करायचे.
  • 8) टाटा नेहमी म्हणतात – “लोखंड कोणीही नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंज नष्ट करू शकतो! त्याचप्रमाणे माणसाला कोणीही नष्ट करू शकत नाही, परंतु त्याची स्वतःची मानसिकता करू शकते.”
  • 9) टाटा 10 वर्षांचे असताना त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि ते वेगळे झाले.
  • 10) रतन टाटा हे त्यांच्या धर्मादाय कार्यासाठी देखील ओळखले जातात, ते नेहमीच वाईट काळात त्यांच्या देशासाठी उभे राहतात.

FAQ

१. रतन टाटा यांचे पूर्ण नाव काय?

रतन टाटा यांचे संपूर्ण नाव रतन नवल टाटा आहे. रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी मुंबईत झाला.

२. श्री रतन टाटा यांची पहिली नोकरी कोणती होती?

रतन टाटांनी करिअरच्या सुरुवातीला स्वतःच्याच कंपनीत नोकरी केली होती. ऐकून आश्चर्य वाटेल, पण हे खरे आहे प्रत्येक यशस्वी माणसाची त्याने केलेल्या कष्टाची स्टोरी असते. तशीच रतन टाटांची सुद्धा आहे. रतन टाटा यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात जमशेदपूरच्या टाटा स्टीलमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांच्या हातात आयबीएम कडून तगड्या पगाराची जॉब ऑफर सुद्धा होती. पण ती जॉब ऑफर न स्वीकारतात त्यांनी स्वतःच्याच कंपनीत कामाचा फक्त अनुभव घेण्यासाठी कमी पगाराची नोकरी पत्करली होती.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास रतन टाटा यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

संदर्भ

Ratan Tata Indian businessman

Ratan Tata Biography: Birth, Age, Education, Family, Successor, Net Worth, Awards, Lessons, and More

Leave a comment