Sant Dnyaneshwar Information In Marathi : संत ज्ञानेश्वर महाराजांची माहिती मराठी – महाराष्ट्राच्या संत परंपरेमधील सर्वात महत्त्वाचे आणि अढळस्थान ज्यांना त्याला देता येईल असा आध्यात्मिक तेजाचा दिवा म्हणजे संत ज्ञानेश्वर. तेराव्या शतकात, ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या श्री संत ज्ञानेश्वरांनी कोवळ्या वयापासूनच परमेश्वर भक्तीला सुरुवात केली. त्यांचे अलौकिक ज्ञान, त्यांचे पिढ्यानपिढ्या मार्गदर्शक ठरणारे साहित्य आणि परमेश्वराप्रतीची प्रचंड भक्ती यामुळे आज कैक वर्षानंतरही ज्ञानेश्वरांचे नाव हे वारकरी संप्रदायात जवळपास परमेश्वराप्रमाणेच घेतले जाते.
कोवळ्या वयात ज्ञानेश्वरानी रचलेल्या ज्ञानेश्वरीच्या श्लोकांमध्ये भगवद्गीतेच्या पवित्र शिकवणीचा उलगडा केला. परिस्थिती प्रतिकूल असूनही सर्वसामान्य बहुजन वर्गाला ज्ञानेश्वरी कळावी म्हणून हे संस्कृत मधील ज्ञान सरळ सोप्या साध्या मराठी भाषेत त्यांनी समाजापुढे ठेवलं. वारकरी संप्रदायाचा पाया परमपूज्य ज्ञानेश्वरांपासूनच झाला, म्हणूनच ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस असे आपण मानतो.
फक्त महाराष्ट्रातील, वारकरी किंवा नाथा संप्रदायातीलच नाही तर अखिल समाजाला परमेश्वर भक्तीची, चांगल्या वागणुकीची, सर्वसमावश्यकतेची, आणि ज्ञानाची शिकवण देणाऱ्या संतश्रेष्ठ पूजनीय श्री ज्ञानेश्वरांबद्दल आज आपण माहिती पाहू.
संत ज्ञानेश्वर यांची माहिती : Sant Dnyaneshwar Information In Marathi
नाव | ज्ञानेश्वर विठ्ठल पंत कुलकर्णी |
जन्म | सन १२७५ |
जन्मस्थळ | आपेगाव जिल्हा औरंगाबाद महाराष्ट्र. |
आईचे नाव | रुक्मिणीबाई कुलकर्णी |
वडिलांचे नाव | विठ्ठलपंत कुलकर्णी |
गुरु | श्री संत निवृत्तीनाथ महाराज |
शिष्य | सच्चिदानंद महाराज |
संप्रदाय | वैष्णव संप्रदाय, वारकरी ,नाथ संप्रदाय. |
भाषा | मराठी |
साहित्यरचना | ज्ञानेश्वरी अमृतानुभव |
आराध्य दैवत | विठ्ठल |
कार्य | समाज उद्धार |
समाधी मंदिर | आळंदी जिल्हा पुणे |
संत ज्ञानेश्वरांचा जन्म
संत ज्ञानेशवरांचा जन्म मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ – सन १२७५ रोजी महाराष्ट्र राज्यामधील, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये, पैठण जवळील, गोदावरी नदीच्या काठी एका लहानशा गावामध्ये झाला.
संत ज्ञानेशवरांचा जन्म कुलकर्णी घराण्यातील विठ्ठलपंत रुक्मिणीबाई यांच्या घरी झाला. ज्ञानेश्वरांचे मुख्य नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. विठ्ठलपंत यांनी त्या काळात संसाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला होता, त्यानंतर त्यांचे वडील काशीला गेले. परंतु जेव्हा त्यांच्या गुरूंना समजले की विठ्ठल पंत हे विवाहित आहेत. त्यावेळी ते संन्यास घेऊ शकत नाहीत, यासाठी त्यांच्या गुरुने त्यांना परत त्यांच्या घरी पाठवले.
संत ज्ञानेश्वरांचे बालपण आणि संघर्ष
घरामध्ये पुन्हा प्रवेश झाल्यानंतर, विठ्ठलपंत यांना चार मुले झाली. त्यांचे नाव होते निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, व मुक्ताबाई. थोड्या कालांतराने विठ्ठल पंत यांनी विठ्ठलाची तीर्थयात्रा सुरू केली. व ते पुणे जिल्ह्यातील आळंदी या गावात स्थायिक झाले. तत्कालीन कर्मठ सनातन समाजात संन्याश्याने गृहस्थाश्रम स्वीकारण्यास परवानगी नव्हती, म्हणून विठ्ठलपंत व त्यांच्या पूर्ण कुटुंबाला गावातल्यांनी वाळीत टाकले.
ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले. त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्मशास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडाचीच शिक्षा आहे असे ब्राह्मणांनी सांगितले. मुले संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हावे यासाठी विठ्ठलपंतानी व रुक्मिणीबाई यांनी आत्महत्या करून देहान्त प्रायश्चित्त घेतले.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतर, ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचा समाजाकडून छळ होत गेला. त्यांना अन्न, पाणी, यांसारख्या विविध गरजा सुद्धा मिळत नव्हता. या गोष्टींपासून त्यांना वंचित राहावे लागत होते. परंतु संत ज्ञानेश्वरांनी धीर सोडला नाही.
आई-वडिलांच्या मृत्यूनंतरही ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना लोकांकडून फार त्रास दिला गेला. त्यांना अन्न आणि पाणी यासारख्या मूलभूत गोष्टी नाकारण्यात आल्या. पुढे ही भावंडे पैठणला गेली आणि तेथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या सुंदर भाषेत शब्दरचना केली आहे. भिक्षा मागून ते आपला उदार निर्वाह करू लागले आणि हळूहळू या भिक्षा मागणाऱ्या मुलांची कुशाग्र बुद्धी व शास्त्र ज्ञान पाहून पैठणमधील ब्राह्मण दुःखी होत असत. शेवटी 1288 साली पैठण मधील ब्राह्मणांनी चारही भाऊ बहिणींना शुद्ध करून पुनः समाजात सम्मिलित केले.
संत ज्ञानेश्वर महाराजांची समाजावर एक अमूल्य असा छाप पाडली असून, ते महाराष्ट्र राज्यामधील सांस्कृतिक जीवनात असाधारण काम करणारे व्यक्तिमत्व होते.
नक्की वाचा समर्थ रामदास स्वामी संपूर्ण माहिती मराठी
संत ज्ञानेश्वर चरित्र – संत ज्ञानेश्वर यांची माहिती
संत ज्ञानेश्वर महाराज हे जसे करुणामय व आदरणीय होते, तसेच आध्यात्मिक असल्यामुळे, विठ्ठल भक्ती करण्यास ते नेहमी तत्पर असत. त्यांनी विठ्ठलाला आपला आराध्य दैवत मानले होते. ज्ञानेश्वर महाराजांचे चमत्कार हे सगळीकडेच प्रसिद्ध आहेत.
महाराजांच्या काळामध्ये सुरू असलेल्या चालीरीती पाहून ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की, जर माणसाने ध्यानधारणा करून तंत्राचा योग्य वापर केला, तर मानव स्वतःच्या मूळ स्वरूपापर्यंत नक्कीच पोहोचू शकतो. ज्ञानेश्वर महाराज हे एक महान अध्यात्मिक गुरु होते, ज्यांनी आपल्या सर्वांना दाखवून दिले की आपण आपल्या अध्यात्मिक शक्तीचा वापर करून, असाधारण गोष्ट सुद्धा साध्य करू शकतो.
संत ज्ञानेश्वर यांची दीक्षा
ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ हे गुरु गैनीनाथांना भेटले. गैनीनाथ हे विठ्ठलपंत यांचेही गुरु होते. गैनीनाथ गुरुंनी निवृत्तीनाथांना कृष्णाची उपासना करण्यास शिकवले. त्यानंतर निवृत्तीनाथांनी आपला भाऊ ज्ञानेश्वर यांनाही परमेश्वर भक्तीची दीक्षा दिली.
संत ज्ञानेश्वर, आपले मोठे बंधू निवृत्तीनाथ यांना आपल्या गुरुस्थानी मानतात. त्यामुळे पसायदान या विश्व प्रार्थनेत त्यांनी आपल्या गुरुबंधू श्री निवृत्तीनाथांसमोर ओंजळ पसरून हे पसायदान मागितले आहे.
संत ज्ञानेश्वर यांचे चमत्कार
ज्ञानेश्वरांची थोरवी स्पष्ट करण्यासाठी सामान्य समाजामध्ये त्यांच्या चमत्कारांचे अलौकिक वर्णन केले जाते. या चमत्कारांवर विश्वास ठेवणे जरी कठीण असले, तरीही हे चमत्कार म्हणजे त्यांच्या अलौकिक ज्ञान साधनेची आणि तपश्चर्येची फलश्रुती आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
रेड्याच्या मुखी वेद वाणी – ज्ञानेश्वर महाराजांची कथा
आख्यायिकेनुसार अवघ्या १२ व्या वर्षी संत ज्ञानेश्वर महाराजांनी, आपल्या सोबत आपल्या वाळीत टाकलेल्या भावंडांसोबत, पैठणला जाण्याचे ठरवले. पैठणच्या पुजाऱ्यांकडे जाऊन, त्यांनी दया याचना केली. परंतु, तिथेही त्यांना दया मिळाली नाही. त्या ठिकाणी त्यांचा अपमान झाला. त्यांची टिंगल उडवली गेली. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्यावेळी टवाळखोर मुलांना एका म्हाताऱ्या रेड्याला मारताना बघितले, त्यावेळी त्या रेड्याला होणाऱ्या वेदना ज्ञानेश्वर महाराजांना सोसल्या नाही. महाराजांनी त्या माणसांना रेड्याला मारू नये, असे सांगितले.
परंतु तेथील ब्राह्मण पुरोहितांनी ज्ञानेश्वर महाराजांना उलट सुलट बोलून, त्यांच्या बोलण्यावर दुर्लक्ष केले. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या कपाळावर हात ठेवला, व रेडा वेद म्हणू लागला. हे पाहून ते पुरोहित सुद्धा थक्क झाले.
चांगदेव महाराज यांचे गर्वहरण
ज्ञानेश्वर महाराजांना त्यांचे शिष्य चांगदेव यांना त्यांच्या वास्तव्याचे खरे स्वरूप स्मरण करून द्यायचे होते, कारण चांगदेव महाराज हे त्यांच्या अहंकारामुळे ग्रासले होते.
एकदा योगी कौशल्याच्या अप्रतिम प्रदर्शनामध्ये, चांगदेवांनी ज्ञानेश्वर महाराजांना आवाहन केले, त्यावेळी ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाला अगदी सोप्या पद्धतीने पराभूत करून टाकले. चांगदेव महाराज हे ज्ञानेश्वरना भेटण्यासाठी वाघावर बसून आले होते परंतु ज्ञानेश्वरांनी त्यांना निर्जीव भिंत चालवून दाखवली, अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे. त्यांच्या या अलौकिक प्रदर्शनामुळे चांगदेव ज्ञानेश्वर महाराजांचे शिष्य झाले.
लोकांच्या तोंडून त्यांना संत ज्ञानेश्वरांची ख्याती ऐकायला आली. इतक्या कमी वयाच्या मुलाला समाजाकडून एवढी ख्याती कशी मिळत आहे असा प्रश्न त्याच्या मनात आला. त्यांना ज्ञानेश्वरांप्रती मत्सर वाटायला लागला. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्र लिहिण्याचे ठरविले. परंतु जेव्हा त्यांनी पत्रलेखनाला सुरुवात केली तेव्हा पत्राची सुरुवात कशी करावी हेच त्यांना सुचत नव्हते. ज्ञानेश्वराला चिरंजीव म्हणावे की तीर्थरूप, याबद्दल संभ्रम होता.
शेवटी चांगदेवांनी कोरे पत्रच ज्ञानेश्वरांना पाठून दिले. ते पत्र संत ज्ञानेश्वरांच्या बहीण मुक्ताबाईच्या हातात आले. पत्राला पाहून मुक्ताबाई म्हणाल्या 1400 वर्ष जगूनही चांगदेव अजून पण कोराच आहे. चांगदेवांच्या या पत्राला उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी पासष्ट ओव्या लिहून पाठवल्या. हाच तो चांगदेव पासष्टी ग्रंथ होय.
- संत एकनाथ महाराजांची संपूर्ण माहिती मराठी
- राणी लक्ष्मीबाई संपूर्ण माहिती मराठी
- संत मीराबाई संपूर्ण माहिती मराठी
पाठीवर मांडे भाजणे
आणखी एका कथेनुसार असे म्हटले जाते की जेव्हा मुक्ताबाई भिक्षा मागण्यासाठी दारोदारी फिरून आली, तेव्हा तिला भिक्षा मिळाली नाही. त्यावेळी बाल ज्ञानेश्वर मुक्ताताईंना म्हणाले की तू माझ्या पाठीवर मांडे थापून घे. तिने घरात असलेलं पीठ घेऊन ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजून घेतले
संत ज्ञानेश्वर यांचा जीवन प्रवास आणि मृत्यू – Life Of Sant Dnyaneshwar Marathi
अमृतानुभव हा ग्रंथ लिहिल्यानंतर, ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव व त्यांच्या इतर संतांसह विविध तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या या प्रवासाचे वर्णन अभंग द्वारे केले, त्यांच्या कवित्यांच्या आधारे ज्ञानेश्वराने त्यांच्या जीवनप्रवासात विविध धार्मिक आणि अध्यात्मिक स्थळांना भेटी दिल्या आहेत असे समजते.
या तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर ज्ञानेश्वराने त्यांच्या जीवनाचे कार्य पूर्ण झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी तातडीने समाधी घेण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळी त्यांच्या इतर साथीदारांना हे समजले त्यावेळी त्यांना अतिशय दुःख झाले. परंतु ज्ञानेश्वराने त्यांचा निर्णय बदलला नाही.
संत ज्ञानेश्वर यांची संजीवन समाधी
साल १२९६ मध्ये कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी या ठिकाणी समाधी घेतली. या असाधारण घटनेचे वर्णन नामदेव महाराजांनी त्यांच्या समाधीचे अभंग या अभंगांमध्ये केले आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मृत्यूनंतर, ज्ञानेश्वर महाराजांच्या इतर भावंडांनी सुद्धा या जगाचा निरोप घेण्याचे ठरविले, व ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर अवघ्या वर्षभरातच त्यांच्या भावंडांनी सुद्धा या जगाचा निरोप घेतला.
संत ज्ञानेश्वर यांचे कार्य
ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हरीभजनपाठ, अमृतानुभव, इत्यादींसारख्या विविध साहित्यरचनेचे रचना केली आहे. त्यांच्या या लेखनामध्ये, विविध प्रकारच्या कल्पना, उपमा, अलंकार वापरले गेले आहेत. त्यांनी लिहिलेले ते लेख वाचताना, माणूस अगदी मंत्रमुग्ध होऊन जातो. कारण महाराजांनी लिहिते वेळी सर्व तत्त्वज्ञान विषयक पुस्तकांचे, तसेच जीवनाच्या विविध सिद्धांताचे ज्ञान पुस्तकांमध्ये प्रकट केलेले आहे.
महाराजांनी कधी रेड्याच्या तोंडून श्लोक म्हणून घेतले, तर कधी पाठी वरती भाकऱ्या भाजल्या, तर कधी भिंत पळवली, इत्यादी. महाराजांचे विविध चमत्कार आपल्याला माहिती आहेत. ज्ञानेश्वर महाराज हिंदू संतांपैकी एक प्रसिद्ध संत होऊन गेले, जे की एक उच्चशिक्षित वैदिक विठ्ठलपंत यांच्या घरामध्ये जन्मले होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी अवघ्या सोळाव्या वर्षी भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला.
ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी अगदी सोप्या व स्पष्ट भाषेमध्ये लिहिला आहे जो अगदी सामान्यातल्या सामान्य माणसाला सुद्धा समजू शकेल. ज्ञानेश्वरींनी त्यांच्या लेखनामधून अध्यात्माचे महत्त्व त्याचे वैशिष्ट्य व मार्गदर्शन लोकांपर्यंत पोहोचवले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठमधील अभंग लिहिले आहे. त्या २७ अभंगातील ज्ञानेश्वरांनी हरिभक्तीच्या श्रेष्ठतेची महत्त्वतेची स्तुती अगदी मन भरून केलेली आहे. मित्रहो, जर तुम्ही राम कृष्ण हरी मंत्राचा जप केल्यास, तुम्हाला अनंत जन्माचे पुण्य प्राप्त होईल, तसेच संजीवनी मंत्रासोबत राम कृष्ण हरी मंत्राचा जप केल्यास, माणसाचे जीवन सुख आणि समृद्धीने परिपूर्ण होईल असे ज्ञानेश्वर महाराजांनी जनांना अमूल्य संदेश दिला आहे.
ज्ञानेश्वरांचे लेखन – संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध ग्रंथ
संत ज्ञानदेवांची भाषा इतकी मधुर होती की, त्या शब्दांची गोडी तुम्ही एकदा चाखली की, त्यांचे शब्द त्यांचे अभंग, मनामध्ये घर करून राहतात. संत ज्ञानेश्वर प्रसिद्ध ग्रंथ शब्दांचे सौंदर्य, रूप, रंग, गंध इत्यादी अतिशय सुंदर व मनमोहक आहे, की त्यांच्या शब्दांना केवळ अभंगातच नाही, तर त्यांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेवपासष्टी, इत्यादी सर्व ग्रंथांमध्ये तुम्ही अनुभवू शकता.
पसायदान
हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ महाग्रंथ भगवद्गीता मूळ संस्कृत भाषेत आहे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेतील संस्कृत अध्यायांचे सर्वसामान्य माणसाला समजावे असे मराठी सुलभ भाषेत भाषांतर केले. हे फक्त भाषांतर नसून अगदी ओघवत्या शैलीत, सर्वसामान्य बहुजनांना समजावे अशा ओव्यांच्या रूपात या भगवद्गीतेची मांडणी केली आणि हा वांग्मयरुपी यज्ञ पूर्ण करून संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर परमेश्वराकडे अखिल विश्वासाठी आशीर्वाद रुपी प्रसाद पसायदानाच्या रूपाने मागत आहेत.
ज्ञानेश्वरी/भावार्थ दीपिका
एकनाथ, नामदेव, ज्ञानदेव, सोपान, निवृत्ती, मुक्ताबाई, तुकाराम हे महाराष्ट्र राज्यांमधील वारकरी संप्रदायाच्या मुखी बसलेला एक सर्वसामान्य संतांचा वारसा आहे. निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु होते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी, निवृत्तीनाथांच्या कृपाशीर्वादाने नेवासा या त्यांच्या गावी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका असे म्हटले जाते. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संत संपूर्ण भारत देशातील हिंदू धर्माचा धर्मग्रंथ लोकभाषेत आला.
ज्ञानयोग, भक्तियोग, कर्मयोग, असे विविध योग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरीत संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुमारे ९,००० ओव्या लिहिल्या. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ सन १२९० साली लिहिला असे म्हटले जाते.
चांगदेव पासष्टी
चांगदेव पासष्टी या ग्रंथाच्या माध्यमाने, संत ज्ञानेश्वर महाराजांनी चांगदेवाना अहंकारापासून मुक्तता देऊन, त्यांना उपदेश दिला आहे. चांगदेव हे महान योगी असल्याकारणाने, चौदाशे वर्ष जगले असे समजले जाते. तरीही त्यांचा अहंकार गेला नव्हता, यासाठी त्यांचा अहंकार जावा. व त्यांचे गर्वहरण व्हावे यासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना एक उपदेश पत्र लिहिले. त्या पत्रामध्ये ६५ ओव्यांचा समावेश होता. याला चांगदेव पासष्टी असे म्हटले जाते.
अमृतानुभव किंवा अनुभवामृत
अमृतानुभव हा ग्रंथ विशुद्ध, तत्त्वज्ञानाचा जीवऐक्याचा दुसरा ग्रंथ समजला जातो. यामध्ये अंदाजे ८०० ओव्या लिहिल्या आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास, अनुभवामृत सर्वश्रेष्ठ ग्रंथ समजला जातो. या ग्रंथाच्या लेखणी नंतर, संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांची तीर्थयात्रा आरंभ केली.
हरिपाठ
संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ हा त्यांचा ईश्वर भक्तीचा नित्यपाठ लिहिला आहे व हरिनामाचे महत्त्व या हरिपाठ द्वारे संपूर्ण समाजामध्ये महाराजांनी सांगितले आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज अभंग, स्फुट काव्य
ज्ञानेश्वर महाराजांनी स्फुटकाव्य लिहिली. यामध्ये अभंग, विराण्या इत्यादींचा समावेश आहे.
ज्ञानेश्वर माऊली यांचा प्रभाव आणि वारसा
ज्ञानेश्वरांनी आपल्या आध्यात्मिक कार्याद्वारे समाजातील सर्व घटकांना एकत्र करून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक समतावादी वारकरी चळवळीच्या संस्कृतीला आकार दिला. तसेच भक्तीचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आणि केंद्रबिंदू म्हणून विकसित केला.
दरवर्षी आषाढ महिन्यामध्ये वारकरी संप्रदायाचे भक्त हे आळंदीतील ज्ञानेश्वरांच्या मंदिरापासून पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरापर्यंत होणाऱ्या वारी नावाच्या वार्षिक यात्रेत सामील होतात. या पालखीमध्ये ज्ञानेश्वरांच्या प्रतिकात्मक पादुका नेल्या जातात. ज्ञानेश्वरांचे तत्त्वज्ञान हे नामदेव आणि एकनाथ यांसारख्या वारकरी लेखकांनी त्यांच्या स्वतःच्या कृतींमध्ये स्वीकारले.
आषाढ महिन्यात आळंदीवरून दरवर्षी पंढरपूरकडे पालखीचे प्रस्थान होत असून अनेक वर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे. त्यावेळी मंदिराचा कळस हलल्याशिवाय माउलींच्या पालखीचं प्रस्थान होत नाही.
संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी साहित्य
The Eternal Wisdom of Dnyaneshwari (इंग्रजी, डॉ. वसंत शिरवळकर)
इंद्रायणीकाठी (कादंबरी, रवींद्र भट)
गीतादर्शन : श्री ज्ञानेश्वर आणि श्री रमण महर्षी (डॉ. सुधाकर नायगावकर)
The Genius of Dnyaneshvar (रविन थत्ते)
ताटी उघडा ज्ञानेश्वरा (स.कृ. जोशी)
दैनंदिन ज्ञानेश्वरी (माधव कानिटकर)अमृतानुभव (रा.ब. रानडे)
अमृतानुभव (पंडित सातवळेकर)
अमृतानुभव अधिक सार्थ सान्वय चांगदेवपासष्टी (विष्णूबुवा जोगमहाराज)
अमृताचा अनुभव : ज्ञानदेवांच्या अमृतानुभवाचा छंदानुवाद (हेमंत राजाराम)
आजची ज्ञानेश्वरी – मूळ सांप्रदायिक ज्ञानेश्वरीसहित (कर्मकांडासह अनुवाद – त्र्यंबक मगनराव चव्हाण)
संत ज्ञानेश्वर : समाधी रहस्य आणि जीवन चरित्र (प्रवचन संग्रह, प्रवचनकार आणि लेखक – तत्त्वदर्शक सरश्री)
संत ज्ञानेश्वरांचा अमृतानुभव (सोप्या पद्यमय मराठीत अमृतानुभव – (विंदा करंदीकर)
संत ज्ञानेश्वर यांच्या विषयी चित्रपट
- ज्ञानेश्वरांच्या जीवनावर संत ज्ञानेश्वर नावाचा मराठी चित्रपट प्रभात फिल्म कंपनीने काढला होता. तो १८ मे १९४० रोजी एकाच वेळी मुंबईत आणि पुण्यात प्रकाशित झाला. पुण्यात तो ३६ आठवडे चालला. या चित्रपटामुळे प्रभातची कीर्ती जगभर पसरली. आजही हा चित्रपट गर्दी खेचतो.
- संत ज्ञानेश्वर नावाचा हिंदी चित्रपट सन १९६४ मध्ये बनला होता.
ज्ञानेश्वर महाराजांची स्मारके
- अहमदनगर जिल्ह्यामधील, नेवासे या ठिकाणी श्री संत ज्ञानेश्वर महाविद्यालय नावाचे विद्यालय आहे. तसेच या शहरामध्ये, संत ज्ञानेश्वर नावाच्या उद्यानाची सुरुवात झाली असून, याची देखभाल श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान करते.
- गोंदिया जिल्ह्यामधील पांढरा बोडी येथे संत ज्ञानेश्वर आदिवासी निवास आश्रमशाळा आहे.
- संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्था इस्लामपूर, सांगली जिल्हा.
- संत ज्ञानेश्वर पार्क निगडी, पुणे जिल्हा.
- आळंदी ज्ञानेश्वर शिक्षण संस्था आणि ज्ञानेश्वर विद्यालय या शाळा आहेत.
ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग
ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर अभंग रचना केलेली आहे. त्यांच्या अभंग रचना मधील शब्द हे अतिशय कोमल व नाजूक आहे. या शब्दांची ताकद इतकी मोठी आहे की, ज्ञानेश्वर महाराजांच्या अभंगांना ७०० वर्षाहून अधिक काळ उलटूनही, त्यांच्या अभंग रचनेमधील गोडवा, त्यांच्या शब्दांमधील गोडवा अजूनही तितकाच कायम आहे. व आजही या शब्दांवर त्यांच्या अभंगावर मन मंत्रमुग्ध होऊन जाते. सर्वांच्या मनावर आज देखील त्यांचे अभंग राज्य करत आहेत.
ज्ञानेश्वर महाराजांनी जे पत्र त्यांच्या शिष्य चांगदेवराय यांना लिहिले होते, त्या पत्रांमधील असाधारण सिद्धांताचे संपूर्ण वर्णन करून चांगदेवांना त्यांच्या सत्याची तपासणी करण्यासाठी महाराजांनी विनंती केली होती. देव हा एक प्रेमाचा अनुभव आहे. देव प्रेम आहे. जसजसे आपण देवावरती अधिक प्रेम करतो, त्या प्रेमाच्या भावनेतून आपण परिपूर्ण होऊन जातो. त्यामुळे आपल्या मधील असणारी भक्ती देवाबद्दलची आदराची भावना ही जागरूक होते. यालाच भक्ती म्हणतात.
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदानाची सुद्धा रचना केली ज्याचे बोल हे अतिशय सुंदर व मनमोहक आहेत.
ज्ञानेश्वरांचे पसायदान मराठी रचना आणि भावार्थ
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे,
तोषोनि मज द्यावे, पसायदान हे ||१||
जे खळांचि व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे ||२||
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो,
जो जे वांछील तो ते लाहो, प्राणिजात ||३||
वर्षत सकळ मंडळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी,
अनवरत भूमंडळी, भेटतु भूता ||४||
चला कल्पतरूंचे आरव, चेतनाचिंतामणींचे गाव,
बोलती जे अर्णव, पीयूषांचे ||५||
चन्द्रमेंजे अलांछन, मार्तण्ड जे तापहीन,
ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु ||६||
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होवोनि तिहीं लोकी,
भजिजो आदिपुरुषीं, अखण्डित ||७||
आणि ग्रंथोपजिवीये, विशेषी लोकी इये,
दृष्टादृष्टविजये, होआवेजी ॥८॥
येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दानपसावो,
येणे वरे ज्ञानदेवो, सुखिया झाला ||९||
FAQ
संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म कधी झाला ?
श्री विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या वंशत संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचा जन्म आपेगाव येथे बाराव्या शतकात, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ (इ. स. १२७५) रोजी झाला
संत ज्ञानेश्वरांची शिकवण काय होती?
ज्ञानेश्वरांनी आपल्या आध्यात्मिक कार्याद्वारे समाजातील सर्व घटकांना एकत्र करून महाराष्ट्राच्या आध्यात्मिक समतावादी वारकरी चळवळीच्या संस्कृतीला आकार दिला. तसेच भक्तीचा महत्त्वपूर्ण स्त्रोत आणि केंद्रबिंदू म्हणून विकसित केला.
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी कधी लिहिली?
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर केवळ १६ वर्षांचे असताना त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरी बाराव्या शतकात लिहिली गेली.
कोणत्या संताने पसायदान नावाची भक्ती कविता लिहिली?
श्री ज्ञानेश्वर यांनी पसायदान मराठी ही प्रार्थना लिहिली. निर्मळ मनाने अखिल विश्वाच्या कल्याणासाठी, एका भक्ताने हात जोडून प्रत्यक्ष जगन्नीयंत्याकडे केलेली विश्वप्रार्थना म्हणजे पसायदान. मनात यक्तींचीतही आपपरभाव न ठेवता शुद्ध आणि निरागसतेने परमेश्वराकडे विश्व कल्याणासाठी केलेले आर्त मागणे म्हणजे पसायदान.
संत ज्ञानेश्वरांचा जन्म किती साली झाला?
संत ज्ञानेश्वर महाराज यांचा जन्म महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील पैठण जवळील गोदावरी नदीच्या असलेल्या आपेगाव या गावात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी, मध्यरात्री श्रावण कृष्ण अष्टमी, शके ११९७ – सन १२७५ रोजी विठ्ठल पंत आणि रुक्मिणी बाईच्या घरी झाला.
ज्ञानेश्वर महाराजांचे गुरू कोण होते?
निवृत्तीनाथ (काल – 11 फेब्रुवारी 1273 – 24 जून 1297) हे 13 व्या शतकातील महान मराठी भक्ती संत, कवी, तत्त्वज्ञ आणि वैष्णव नाथ परंपरेतील योगी होते. ते पहिले वारकरी संत तसेच ज्ञानेश्वरांचे थोरले भाऊ आणि गुरू होते.
ज्ञानेश्वरी ग्रंथाचे दुसरे नाव काय आहे?
संत ज्ञानेश्वर महाराज यांनी स. १६९१मध्ये लिहिलेल्या ज्ञानेश्वरीला भावार्थदीपिका या नावाने संबोधिले जाते.
अमृतानुभव या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
अमृतानुभव या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर महाराज असून ज्ञानेश्वरी नंतर काही दिवसांनी ज्ञानदेवांनी ‘अमृतानुभव‘ हा ग्रंथ लिहिला. ‘अमृतानुभव‘ हा ग्रंथ ज्ञानोत्तर भक्तीच्या म्हणजेच भागवत धर्माच्या पायाभूत सिद्धान्ताच्या सिद्धीसाठी लिहिला आहे.
ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी का घेतली?
तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यानंतर ज्ञानेश्वराना त्यांच्या जीवनाचे कार्य पूर्ण झाल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी तातडीने समाधी घेण्याचा निर्णय घेतला. परंतु ज्ञानेश्वराने त्यांचा निर्णय बदलला नाही. साल १२९६ मध्ये कार्तिक महिन्याच्या शेवटच्या दिवशी संत ज्ञानेश्वरांनी पुणे जिल्ह्यातील आळंदी या ठिकाणी समाधी घेतली.
संत ज्ञानेश्वर किती वर्ष जगले?
संतवर्य ज्ञानदेवांनी वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ. स. १२९६, गुरुवार रोजी संजीवन समाधी घेतली.
संत ज्ञानेश्वर माहिती निष्कर्ष
मित्रहो Sant Dnyaneshwar Information In Marathi या आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाबद्दल माहिती दिली आहे. संत ज्ञानेश्वर यांची माहिती, हा लेख आपणास कसा वाटला ? हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा.