स्टीफन हॉकिंग माहिती मराठी Stephen Hawking Information In Marathi

शास्त्रज्ञांच्या वाट्याला एखादा वलयांकित नेता व अभिनेता इतकी लोकप्रियता लाभण्याची शक्यता कमीच.थरारक कथा लिहिणाऱ्या लेखकांच्या पुस्तकांवर, वाचकांच्या जशा उड्या पडतात, तशा शास्त्रीय पुस्तकांवर पडतील, ही कल्पनाही करवत नाही.

मात्र स्टीफन यांनी या दोन्ही अवघड गोष्टी सहज साध्य करून दाखविल्या. जे आजच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय शास्त्रज्ञ होते. त्यांचे नाव केवळ शास्त्रीय जगापुरतेच मर्यादित राहिले नव्हते.

शास्त्राच्याच नव्हे तर, देशाच्या आणि भाषेच्या ही सीमा ओलांडून ते जन सामान्यांपर्यंत पोहोचले. मोटार न्यूरॉन डिसीज या दुर्धर रोगाशी आयुष्यभर झटत, आरोग्य विषयी सर्व प्रतिकूलतेवर मात करीत आणि मृत्यूची झुंज करून हॉंकिंग यांनी जे काम केले त्याला खरोखर तोड नाही.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्टीफन हॉकिंग यांच्या बद्दल माहिती दिली आहे, हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

स्टीफन हॉकिंग माहिती मराठी Stephen Hawking Information In Marathi

नाव स्टीफन हॉकिंग
जन्म तारीख दि. ०८ जानेवारी १९४२
जन्म स्थळ ऑक्सफर्ड, इंग्लंड
वडिलांचे नाव फ्रँक हॉकिंग
आईचे नाव एलीझाबेल
ओळख सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्र
मृत्यू दि. १४ मार्च २०१८
मृत्यूचे कारण मोटार न्यूरॉन डिसीज

स्टीफन हॉकिंग एक अविश्वसनीय संशोधक

वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना व्याधी जडल्यानंतर, अवघ्या दोन वर्षाचे आयुष्य डॉक्टरांनी दिले असताना, मृत्यूवर मात करीत ते पुढे अर्ध्या शतकावून अधिक काळ कार्यरत राहिले.

हे वाचा –

हॉकिंग यांची हालचाल मंदावली, जवळ जवळ थांबली. वाचा गेली, परंतु ते हरले नाहीत, मृत्यूची त्यांनी झुंज दिली, आपले काम करत राहिले त्यांच्याच भाषेत सांगायचे झाले तर, त्यांचे उद्दिष्ट अतिशय साधे व सोपे होते.

Stephen Hawking Information In Marathi

त्यांना विश्व जाणून घ्यायचे होते. ते का अस्तित्वात आले ? आणि ते जसे आहे तसे का आहे ? याचा शोध स्टीफन हॉकिंग यांना घ्यायचा होता.

आपले पाऊणशे वर्षाचे सारे आयुष्य हॉंकिंग यांनी या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात खर्च केली आणि त्यातून जे हाती आले, ते त्यांनी शास्त्रीय चौकटीत मांडले. भौतिकशास्त्राच्या, खगोलशास्त्राच्या, रूढ सिद्धांतांना त्यांनी धक्का दिला.

विश्वाच्या निर्मिती मागच्या महास्फोटाचा सिद्धांत उलगडताना महास्फोटाच्या आधी काहीच नव्हते, असे त्यांनी थेट सांगितले आणि चंगळवाडी बनत चाललेल्या मानव जातीला इशारा सुद्धा दिला. त्यांच्या मांडणीवर शास्त्रज्ञांच्या मते घनघोर मतभेद झाले, आव्हानही दिले गेले, विज्ञानाला वाद विवाद मतभेद नवीन नाहीत.

साधारण आकाराच्या कृष्ण विवरातून उत्सर्जनाची प्रक्रिया कमालीची संथ असते, परंतु छोट्या कृष्ण विवारातून ती गतिमान असते, असा दावा करून, स्टीफन हॉकिंग यांनी नव्या शास्त्रीय वादाला तोंड फोडले.

पुंजवादाच्या मूलभूत नियमाला छेद देणाऱ्या, त्यांच्या या सिद्धांतांवर स्वाभाविक शास्त्रज्ञांमध्ये एकमत नव्हते. ८० च्या दशकात हॉंकिंग याने काळाचा संक्षिप्त इतिहास लिहिला.

काळाबद्दल त्यांनी मांडलेल्या शास्त्रीय विचारांच्या पुस्तकात, मिळालेल्या प्रतिसादानेही इतिहास घडविला. जगभरातील ४० भाषात अनुवादित झालेले हे पुस्तक तब्बल २३७ आठवडे बेस्ट सेलर ठरले.

त्यामुळे पुस्तकाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सुद्धा घेतली. प्रतिकूलतेशी सामना करत शास्त्रीय संशोधन करणारे, हॉंकिंग विचारवंत सुद्धा होते.

Stephen Hawking

शास्त्रीय मांडणीतून त्यांनी जसे वाद घडवले तसेच विचारातूनही नवे वाद केले. विज्ञान आणि धर्म या दोन्ही भिन्न बाबी आहेत, असे सांगत काही शास्त्रज्ञ वैयक्तिक जीवनात सश्रद्ध असतात, देव मानतात आणि त्यांची आराधना ही करतात, हॉंकिंग यांचे याबाबतचे विचार मात्र सुस्पष्ट होते.

देव नाही, असे ते स्पष्ट सांगत. या जगाची निर्मिती कोणीच केलेली नाही आणि आपले नशीब घडवणारा ही कोणी नाही आणि यामुळेच स्वर्गही नाही आणि मृत्यू नंतरचे जीवनही नाही, असे हॉकिंग सांगतात.

आपल्याला हे एकमेव आयुष्य लाभलेले असून, याच आयुष्यात विश्वाला समजून घ्यायचे आहे आणि मी तेच करतो आहे, असे म्हणणाऱ्या हॉकिंग आणि संपूर्ण आयुष्यभर विश्वाच्या रहस्यांचा शोध घेतला.

त्यांनी आपल्या शारीरिक व्याधीचे भांडवल ही कधी केले नाही, मरणाने आज त्यांच्यावर मात केली असली तरी, जिद्द विजीगिशू वृत्ती, संशोधन आणि विचार यामुळे भौतिक जगत त्यांचे कायमस स्मरण करत राहील.

कोण होते स्टीफन हॉकिंग ?

विज्ञानातील एक महान शास्त्रज्ञ, आयुष्यामध्ये प्रत्येक संकटाला तोंड दिलं. प्रत्येक संकटांच्या पुढे आ म्हणून उभा राहिला, परंतु कित्येक वेळेस मृत्यू सुद्धा त्यांच्या दारावर येऊन धडका देत होती, पण मृत्यूला सुद्धा शरण यायला लावणारा, मृत्यूला सुद्धा परत जाण्यास लावणारा, हा एक महान शास्त्रज्ञ म्हणजेच ज्या व्यक्तीचं नाव ऐकल्याच्या नंतर, शरीरावर शहारे उभा राहतात, अशा या प्रचंड महानशास्त्रज्ञाच नाव आहे, स्टीफन हॉकिंग.

Stephen Hawking

आपण कित्येक वेळेस आजाराची कारणे सांगत असतो, प्रकृती संदर्भात आपल्या सातत्याने कारणे सांगत असतो आणि प्रत्येक कामापासून आपण दूर जाण्याचा प्रयत्न करत असतो, पण जेव्हा या स्टीफन या प्रचंड विद्वत्ता असणाऱ्या व्यक्तीचा चेहरा डोळ्याच्या समोर येतो ना, तेव्हा प्रत्येक गोष्टीतला आळस शरीराच्या बाहेर कधी निघून जातो, हे आपणास कळणार नाही.

स्टीफन विल्यम हॉकिंग हे सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्र होते. त्यांची पुस्तके आणि जाहीर कार्यक्रम यांनी त्यांना मोठी लोकप्रियता मिळवून दिली. ते रॉयल सोसायटी ऑफ आर्ट मानस चे सदस्य होते. सन २००९ मध्ये त्यांना प्रेसिडेन्शिअल मिडल फॉर फ्रीडम या अमेरिकेतील सर्वोच्च नागरी सन्मानाने या महान शास्त्रज्ञाला गौरविण्यात आले.

केंब्रिज विद्यापीठात ३० वर्ष त्यांनी गणिताचे प्राध्यापक म्हणून काम केले. विश्वशास्त्र ज्याला आपण कॉस्मोलॉजी असे म्हणतो, आणि पुंज गुरुत्व त्याला आपण काँटम ग्रॅव्हिटी म्हणून ओळखतो, या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.

कृष्णविवरे ही किरणोत्सर्जजीत करत असावीत हे त्यांचे सैतान्तिक अनुमान प्रसिद्ध आहे. सुरुवातीला यांच्या या अनुमानाला शास्त्रज्ञ मधूनच काय, पूर्ण जगातून खूप विरोध झाला. परंतु प्रतीक्षा मध्ये जेव्हा शास्त्रज्ञाना अनुमान आला, तेव्हा मात्र त्यांनी त्याला मान्यता दिली आणि स्टीफन विल्यम रेडिएशन असं त्याला नाव देण्यात आलं.

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म व शिक्षण व प्रारंभिक जीवन

हॉकिंग यांनी लिहिलेला अ ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम या त्यांच्या ग्रंथांनी जगभरात लोकप्रियता मिळवून दिली. अशा या महान शास्त्रज्ञाचा जन्म दि. ०८ जानेवारी १९४२ या दिवशी ऑक्सफर्ड या शहरांमध्ये इंग्लंड या देशांमध्ये झाला.

त्यांचे वडील डॉक्टर फ्रँक हॉकिंग जीवशास्त्राचे संशोधक होते, तसेच त्यांचे आई सुद्धा सुशिक्षित होती, तिचं नाव एलीझाबेल. या विद्यापीठाचीच पदवीधर होती. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी होत्या आणि एडवर्ड हा एक दत्तक घेतलेला भावंड होता.

स्टीफन हॉकिंग

हॉकिंग यांच्या जन्माच्या वेळी डॉक्टर फ्रेंक आणि इसाबेल या दांपत्याने उत्तर लंडन होऊन ऑक्सफर्डला स्थलांतर केलं, कारण का त्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाची प्रक्रिया चालू होती. जगामध्ये अराजकता माजलेली होती आणि जेव्हा त्यांना हे ठिकाण राहण्यासाठी योग्य नाही असं त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा त्यांनी ऑक्सफर्डला स्थलांतर केलं.

हॉकिंग यांना लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती, स्टीफन हे लहानपणी शिक्षणामध्ये तेवढे जबरदस्त नव्हते, म्हणजे त्यांची बौद्धिकता तेवढी जास्त नव्हती. स्टीफन हॉकिंग यांच्या जन्मानंतर हॉकिंग कुटुंबाने परत लंडनला स्थलांतर केले कारण त्यांचे वडील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये विभागाचे प्रमुख झाले होते.

१९५० मध्ये हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे स्थलांतर केले. येथेच १९५० ते १९५३ अशी तीन वर्षे त्यांचे शिक्षण झाले.

सेंट अल्बान्स स्कूल या शाळेत त्यांचं शिक्षण झालं. हॉकिंग यांना संगीत, वाचन, गणित आणि भौतिकशास्त्राचा म्हणजे फिजिक्सचा अभ्यास करण्याची खूप आवड होती. हॉकिंग यांना पहिल्यापासून विज्ञान विषयांमध्ये खूप रस होतं.

गणिताच्या शिक्षकाच्या प्रेरणेने त्यांना विद्यापीठात गणिताचे शिक्षण घ्यावयाचे होते, पण त्यांच्या वडिलांची अशी धारणा होती की, गणिताचे शिक्षण घेतलं तर फक्त प्राध्यापक होऊ शकतो, पण त्याच्यापुढे मात्र जाता येत नाही आणि जर विज्ञानाचा अभ्यास केला तर, डॉक्टर होता येईल आणि बऱ्याच गोष्टींमध्ये स्वतःच संशोधन सुद्धा करता येईल, यासाठी त्यांनी विज्ञानाकडे लक्ष त्यांना देण्यासाठी प्रवृत्त केलं.

या नंतर हॉकिंग यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑक्सफर्ड येथे प्रवेश घेतला, त्यांनी १९५१ साली वयाच्या सतरा वर्षे कॉस्मोलॉजी हा विषय निवडून प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्यांना स्कॉलरशिप सुद्धा मिळाली.

स्टीफन हॉकिंग यांचे वैयक्तिक आयुष्य

सन १९६५ मध्ये त्यांची ओळख जान्नेवली या युतीशी नवीन वर्षाचे स्वागत करत असताना झाली. नंतर त्यांनी एकमेकांशी लग्न केलं, परंतु १९९५ मध्ये त्यांच्या ह्या पहिल्या पत्नीने त्यांना घटस्फोट दिला आणि घटस्फोटाचे कारण मानले जाते की, स्टीफन हॉकिंग हे नास्तिक होते.

ते देवाचे अस्तित्व मान्य करत नव्हते, देव आहे, हे त्यांना मान्य नव्हतं. परंतु जान्नेवली मात्र धार्मिक होती, आस्तिक होती आणि याच मुद्द्यावर त्या दोघांचे पटत नव्हतं, म्हणून १९९५ मध्ये या युतीने त्यांच्याशी घटस्फोट घेतला.

नंतर स्टीफन यांनी इलियाना मेसन या तरुणीशी लग्न केलं, पुन्हा या सुद्धा व्यक्तीने २००६ मध्ये त्यांना घटस्फोट दिला. परंतु नंतर स्टीफन हॉकिंग थांबले नाही, थकले नाही.

स्टीफन यांनी स्वतःच आयुष्य तिथे थांबवलं नाही, मेहनत थांबवली नाही आणि पुढे सातत्याने पीएचडीचे कार्य वगैरे तशाच पद्धतीने चालू ठेवलं आणि स्टीफन हॉकिंग यांचा आयक्यू हा १६० होता.

स्टीफन हॉकिंग यांच्या आजारासंबंधी माहिती

मित्रांनो आपणास साधी सर्दी झाली तर, आपण दोन दिवसांतून उठत नाही, परंतु स्टीफन हॉकिंग यांनी पूर्ण आयुष्यभर व्हीलचेयर वर बसून काढलं. परंतु स्वतः तो कधीच डगमगला नाही.

१९६२ मध्ये हिवाळी सुट्ट्यासाठी स्टीफन आपल्या घरी गेले असताना, त्यांना अचानक त्रास झाला आणि चक्कर येऊन पायऱ्यावरून खाली पडले आणि खाली पडल्यानंतर त्यांना उचलून डॉक्टरकडे नेलं आणि डॉक्टरकडे नेल्याच्या नंतर डॉक्टरांनी सांगितलं की, यांना एक छोटासा आजार आहे, तेव्हा घरच्यांना वाटलं काहीतरी छोटासा आजार असेल आणि त्यावर तेवढे लक्ष दिलं नाही.

त्यांना परत परत तसंच होऊ लागलं, मग ०८ जानेवारी १९६३ त्यांच्या एकविसावा वाढदिवस साजरा करत असताना, स्टीफन यांना मोठा आजार झाल्याचे स्पष्ट झाले, या रोगाला इंग्लंडमध्ये मोटार न्यूरॉन डिसीज ज्याला आपण एम.एन.डी म्हणतात.

या रोगामुळे शरीरातील स्नायूचे नियंत्रण संपून जाते, व्यक्ती बुद्धीने तंदुरुस्त राहतो परंतु अवयव मात्र त्यांचे काम करू शकत नाही, यांच्या सुरुवातीच्या काळात अशक्तपणा जाणवतो, मग अडखळत बोलणे, अन्न गिळताना त्रास होणे, हळूहळू चालणे फिरणे आणि बोलणे सुद्धा बंद होते.

मित्रांनो स्टीफन जेमतेम दोन वर्ष जगतील असे त्यांना सांगण्यात आले, आधी स्टीफन हॉकिंग खूप निराश झाले, पण त्यातच एका रोग्याला असाध्य रोगाशी झगडताना स्टीफन हॉकिंग यांनी पाहिलं आणि तेव्हाच तिथे त्यांचा आशेचा किरण जागा झाला आणि त्यांनी ठरवलं जसा हा रोगी एका आजाराशी झगडत आहे, तसाच मी आयुष्यभर या आजाराशी झगडत राहीन, पण निश्चितच जगत राहीन.

असं त्यांनी ठरवलं आणि म्हणून स्टीफन यांना चालण्या फिरण्यासाठी व्हील चेअरलाच एक संगणक जोडण्यात आला. फक्त एक बोट वापरून, स्टीफन या संगणकावर हवे ते काम करू शकत.

१९८५ साली हॉकिंग यांना न्युमोनिया रोग झाला. केवळ श्वासनलिकेला छिद्र करूनच, शस्त्रक्रिया होऊ शकणार असल्याने तशी शस्त्रक्रिया हॉकिंग यांच्यावर करण्यात आली आणि त्यामुळे हॉकिंग यांचा कायमचा आवाज सुद्धा गेला.

यावर संगणक तज्ञ म्हणजे त्यांचाच एक विद्यार्थी याने हॉकिंग यांच्या संगणकासाठी एक नवी आज्ञावली लिहून, ती त्या संगणकात कार्यरत करून दिली. त्यामुळे संगणकाच्या आवाजाच्या माध्यमातून बोलणे स्टीफन यांना शक्य झाले.

स्टीफन हॉकिंग यांच्या अविश्वसनीय संशोधनाबद्दल माहिती

एकदा लंडनमध्ये गणितज्ञ रॉजर पेंद्रोज यांचे भाषण ऐकायला हॉकिंग गेले होते, तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूवत होऊ शकतो, असे निष्कर्ष रॉजर पेंद्रोज यांनी त्या भाषणात मांडले होते, यावरून हॉकिंग यांनी स्वतंत्र अभ्यास करून, संपूर्ण विश्वाचाही ताऱ्याप्रमाणेच अंत शकतो, असा निष्कर्ष काढला.

या प्रबंधावर स्टीफन यांना डॉक्टरेट मिळाली. याच प्रबंधाचा पुढचा भाग सिमिलरिटीज अँड जॉमेट्री ऑफ स्पेस टाईम हा प्रबंध स्टीफन हॉकिंग यांनी लिहिला.

या प्रबंधासाठी १९६६ साली त्यांना अँडम प्राईझ त्यांना मिळाले. हॉकिंग यांनी नंतर कृष्णविवर या विषयाकडे आपले लक्ष वळवले, ज्याला आपण ब्लॅक होल असे म्हणतो. यावर आईन्स्टाईनच्या सापेक्षता वादाचा सिद्धांताची जोड देऊन, हायपोथीसिस मांडण्यास सुरू केली.

त्यावेळी हॉकिंग आपल्या शरीराची हालचाल करू शकण्यास असमर्थ होत गेले, एवढी अवघड गणिते त्यांनी केवळ मनातल्या मनात सोडवली. विचार करा एक अक्षर सुद्धा लिहिता येत नव्हतं, मनातले मनात चित्र उभा करून, एकदम अवघड अशी गणितं हॉकिंग यांनी सोडवली.

स्टीफन हॉकिंग पुरस्कार व सन्मान

  • १९७४ साली हॉकिंग यांनी पहिल्यांदा पुंजियामिक आणि सापेक्षता वादाचा सिद्धांताची सांगड घालून दोन सिद्धांताला एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. हॉकिंग यांच्या या प्रबंधाला अधिक जोरदार विरोध झाला, पण नंतर स्टीफन हॉकिंग यांचे मत पटल्यावर त्या नव्या निष्कर्षा प्रमाणे होणाऱ्या किरणोत्सर्जाला हॉकिंग उत्सर्जन असे नाव देण्यात आले.
  • १९७४ या वर्षी स्टीफन यांच्या कृष्णविवर या विषयावर प्रबंध इंग्लंडच्या निचर या नियतकालिका मध्ये प्रसिद्ध झाला आणि त्यांचे रॉयल्स सोसायटीचा फेलो म्हणून निवड झाली.
  • मित्रांनो, १९८० च्या दशकात हॉकिंग यांना ऑक्सफर्ड विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लँकेस्टर विद्यापीठ, या विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन या महान व्यक्तीचा सन्मान केला.
  • विज्ञान विषयात काम करीत असतानाच हॉकिंग यांनी अपंग लोकांसाठी, त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांच्यावरील अन्यायासाठी लढा दिला. यासाठी हॉकिंग यांना १९७९ साली रॉयल असोसिएशन फॉरिटीशन या संस्थेकडून मॅन ऑफ द इयर हा किताब देण्यात आला. कारण ज्या व्यक्तीला बोलता येत नव्हतं, ज्या व्यक्तीला हात उचलता येत नव्हता, ज्या व्यक्तीला मान वळवता येत नव्हती, अशा महान व्यक्तीने अपंग लोकांसाठी सुद्धा कार्य केल.

स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यू

स्टीफन यांनी एक अंतरिक्ष यात्रा सुद्धा केली. ते म्हणत असत, या अंतरिक्ष यात्रेमध्ये माझा मृत्यू झाला तरी चालेल, परंतु माझी अंतराळ यात्रा करण्याची माझी खूप इच्छा आहे.

या महान शास्त्रज्ञांची प्राणज्योत दि. १४ मार्च २०१८ या दिवशी मालवली. अशा या महान शास्त्रज्ञाकडून आपणास बरेच काही शिकण्यासारखा आहे, त्यातून जितकं जमेल तितका आपण शिकण्याचा प्रयत्न करूयात.

स्टीफन हॉकिंग यांचे प्रेरणादायी विचार

अनेक संकटे आल्यावर देखील निराश न होता, जीवनाशी संघर्ष कसा करावा, हे आपण महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांच्याकडून शिकू शकतो. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा आजार झाला, त्यामुळे त्यांची हालचाल बंद झाली.

कायमस्वरूपी व्हीलचेयर वर बसण्याची वेळ आली. डॉक्टरांनी ते फक्त दोन वर्षे जगू शकतील, असे सांगितले. त्यांचा आवाजही गेला, त्यामुळे सुरुवातीला ते निराश झाले, परंतु डॉक्टरांना चुकीचे ठरवून त्यांनी सर्वांना चकित केले.

त्यांनी आपल्या अपंगत्वाला कधीही आपल्या यशाच्या मार्गातला अडथळा बनू दिला नाही. आपल्या विचारला आपली ताकद मानली. विश्वाची निर्मिती कशी झाली ? आकाशातील ब्लॅक होल्स कशी तयार होतात ? या रहस्यांची उकल करण्याचा त्यांनी ध्यास घेतला. आपल्या बुद्धीच्या जोरावर माणूस जगू शकतो, हे त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिले. अशा महान शास्त्रज्ञाचे प्रेरणादायी विचार आज आपण यालेखाद्वारे बघणार आहोत.

  • कोणतीच गोष्ट परिपूर्ण नाही, हा विश्वाचा सर्वसामान्य नियम आहे. परिपूर्णता अस्तित्वातच नाही, अपरिपूर्णते शिवाय माझे आणि तुमचेही अस्तित्व नाही.
  • मी एकवीस वर्षाचा होतो, तेव्हापासून अपेक्षा ठेवणे सोडून दिले आणि त्यानंतर मिळालेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी बोनस ठरली.
  • ज्ञानाचा सर्वात मोठा शत्रू अज्ञान नसून, आपण ज्ञानी असल्याचा भास होणे हा आहे.
  • जर तुम्ही सतत रागावलेले असाल आणि तक्रार करत असाल तर, लोकांकडे तुमच्यासाठी कधीच वेळ नसेल.
  • आयुष्यात मजा नसेल तर, ती एक शोकांतिका होईल.
  • मी कॉलेजमध्ये चांगला विद्यार्थी नव्हतो, मी कॉलेजमध्ये जास्त वेळ घालवला नाही, मी स्वतःच्या सोबतीचा आनंद घेण्यात व्यस्त असायचो.
  • शांत लोकांची मन बोलकी असतात.
  • बुद्धिमत्ता म्हणजे बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता होय.
  • आपण सर्वात जास्त महत्त्व असलेले काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. परिस्थितीशी जुळून घेताना, स्वतःमध्ये बदल करण्याची क्षमता असणे हे हुशारीचे लक्षण आहे.
  • अपंगत्व हे यशाच्या मार्गात अडथळा ठरता कामा नये.
  • वर ताऱ्यांकडे पाहण्याचे लक्षात ठेवा, खाली पायांकडे नाही.
  • कधीही काम सोडू नका, काम आपल्याला अर्थ आणि उद्देश देते आणि त्याशिवाय आयुष्य रिकामे आहे.
  • तुम्ही प्रेम शोधणे एवढे भाग्यवान असल्यास, त्याला टाकून देऊ नका.
  • आपण अगदी सरासरी तारे असलेल्या किरकोळ ग्रहावर माकडांचे प्रगत प्रजाती आहोत, पण आपण ब्रह्मांडाला समजून घेऊ शकतो, हेच आपल्याला खूप विशेष बनवते.
  • जीवन कितीही कठीण असो, तुम्ही नेहमीच काही ना काही करू शकता आणि यशस्वी होऊ शकतात. मी असे लोकही बघितले आहेत, जे म्हणतात की सर्व काही आधीच ठरलेले आहेत आणि ते बदलण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही, ते लोक सुद्धा रस्ता ओलांडताना आधी इकडे तिकडे बघतात.
  • इतर अपंग लोकांना माझा असा सल्ला आहे की, अशा गोष्टींकडे लक्ष द्या, ज्यांना करण्यापासून आपले अपंगत्व आपल्याला थांबवत नाही आणि त्या गोष्टींचा पश्चाताप करू नका, ज्या गोष्टी करण्यात अपंगत्व बाधा आणते.
  • आत्म्याने आणि शरीराने ही अपंग होऊ नका, जेव्हा एखाद्याची अपेक्षा बिलकुल नष्ट होते तेव्हा तो त्याच्याजवळ असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे महत्त्व समजू शकतो.
  • मी फक्त एक मुल आहे, जो कधीच मोठा झाले नाही. मी अजूनही कसे आणि का हे प्रश्न विचारत राहतो. कधी कधी मला उत्तर सापडते, माझ्याकडे खूप काही आहे, जे मला करायचे आहे. मला वेळ वाया घालवणे आवडत नाही.
  • असे काहीही नाही जे नेहमी अस्तित्वात राहू शकत नाही.
  • माझे ध्येय स्पष्ट आहेत, या ब्रह्मांडाला पूर्णपणे समजून घ्यायचे आहे. हे जसे आहे, तसे का आहे ? आणि याचे अस्तित्व काय आहे ?
  • विज्ञान लोकांना गरीबीतून बाहेर काढू शकते आणि बिमारी ठीक करू शकते आणि त्याच्या बदल्यात ते सामाजिक अशांती नष्ट करू शकते.
  • कधी कधी मला आश्चर्य वाटते की, मी माझ्या व्हीलचेअर आणि अपंगत्वासाठी तेवढाच प्रसिद्ध आहे का ? जेवढा मी माझ्या संशोधनासाठी आहे.
  • मी मरणाला घाबरत नाही. परंतु मला मरण्याची घाई नाही. माझ्याकडे आधी करण्यासाठी खूप काही आहे.
  • आपण अंतराळात पसरल्याशिवाय, मानव जात पुढील हजार वर्षे टिकेल असे मला वाटत नाही.
  • स्त्रिया पूर्णपणे एक रहस्य आहेत.
  • माझा विश्वास आहे की, गोष्टी स्वतः स्वतःला अशक्य बनवू शकत नाही.
  • दिव्यरचनाच्या आधी देव काय करत होता, मी असे मानतो की भ्रमण विज्ञानाच्या नियमांद्वारे संचालित होतो, कदाचित देवाने हे नियम बनवलेली असतील. पण देव हे नियम तोडण्यात हस्तक्षेप करीत नाही.
  • जर तुम्ही ब्रह्मांडाला समजू शकता तर, तुम्ही त्याला एका प्रकारे नियंत्रित करू शकता.
  • वास्तविकतेचे कोणतेही विशेष चित्र नसते. आपण येथे का आहोत ? आपण कोठून येतो ? पारंपरिकपणे हे तत्त्वज्ञानाचे प्रश्न आहेत. परंतु तंत्रज्ञान मरून गेले आहे.
  • मला माझी आत्मकथा लिहिण्याची इच्छा नाही, कारण मी एक सार्वजनिक संपत्ती बनून जाईल आणि माझी प्रायव्हसी राहणार नाही.
  • ब्रह्मांडापेक्षा मोठे किंवा जुने काहीच नाही.
  • मला विश्वास आहे की, सर्वात सोपे स्पष्टीकरण असे आहे की, देव नाही. कोणीही विश्वाची निर्मिती केली नाही आणि कोणीही आपले भविष्य घडवत नाही. मला याची जाणीव झाली आहे की, कदाचित स्वर्ग ही नाही आणि दुसरा जन्मही नाही. विश्वाच्या भव्यरचनाचे कौतुक करण्यासाठी आपल्याकडे हे एकच जीवन आहे आणि त्यासाठी मी अत्यंत आभारी आहे.
  • जेव्हा लोक मला विचारतात की देवाने हे विश्व निर्माण केले आहे का ? तेव्हा मी त्यांना सांगतो की या प्रश्नात काही अर्थच नाही. बिग बँक च्या आधी वेळेचे अस्तित्वच नव्हते, त्यामुळे देवाकडे विश्व निर्माण करण्यासाठी वेळच नव्हता.
  • येत नाही आणि कम्प्युटर द्वारे बोलावे लागते तरी, मी माझ्या मनात मुक्त आहे.
  • हुशार लोकांबद्दलची गोष्ट अशी आहे की, ते मूर्ख लोकांना वेड्यासारखे वाटतात.
  • वाचण्यापेक्षा आणि जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यापेक्षा, अधिक चांगले काहीच नाही.
  • जर तुम्ही हार मानली नाही, तर नक्कीच फरक पडतो.
  • मानवांना स्वातंत्र्य आहे असे म्हणण्याचे कारण असे आहे की ते काय करतील याचा आपण अंदाज लावू शकत नाही.

FAQ

१. स्टीफनला काय सापडले?

विश्वशास्त्र ज्याला आपण कॉस्मोलॉजी असे म्हणतो, आणि पुंजग्रुप त्याला आपण काँटम ग्रॅव्हिटी म्हणून ओळखतो, या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भाने त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे. कृष्णविवरे ही किरणोत्सर्जजीत करत असावीत हे त्यांचे सैतान्तिक अनुमान प्रसिद्ध आहे

२. स्टीफन हॉकिंग यांना कोणता आजार होता?

स्टीफन वयाच्या २१ व्या वर्षी मोटार न्यूरॉन डिसीज हा आजार होता. या दुर्धर रोगाशी आयुष्यभर झटत, आरोग्य विषयी सर्व प्रतिकूलतेवर मात करीत आणि मृत्यूची झुंज करून हॉंकिंग यांनी जे काम केले त्याला खरोखर तोड नाही.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महान संशोधक स्टीफन हॉकिंग यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा.धन्यवाद .

Leave a comment