काही लोक असतातच अशी, कुंती पुत्रांसारखी, अपराजित. त्यांच्या कर्तुत्वाच्या तेजापुढे, बड्या बड्या रती महारथींची कीर्ती धुसर होते.
असाच एक तारा, ब्रिटिश कालीन भारतात जन्माला आला. जो पुढे हॉकीचा जादूगार म्हणून ओळखला जाऊ लागला. नाव होतं ध्यानसिंग उर्फ ध्यानचंद.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास हॉकीचा जादुगार ध्यानचंद सिंग यांच्या बद्दल माहिती दिली आहे, हि माहिती व हा लेख जाणून घेण्यासाठी लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.
मेजर ध्यानचंद माहिती मराठी Dhyan chand Information In Marathi
पूर्ण नाव | मेजर ध्यानचंद |
जन्म तारीख | दि. २९ ऑगस्ट १९०५ |
जन्म स्थळ | अलाहबाद |
वडिलांचे नाव | सोमेश्वर सिंग |
ओळख | हॉकीचे जादुगार |
नागरिकत्व | भारतीय |
मृत्यू | दि. ०३ डिसेंबर १९७९ |
मृत्यू ठिकाण | दिल्ली |
मृत्यूचे कारण | कन्सर |
कोण होते मेजर ध्यानचंद ?
हॉकीचे जादूगार ध्यानचंद, जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हॉकीचे खेळाडू आहे. ध्यानचंद यांचा जन्म उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला.
हे वाचा –
- खो खो खेळाची संपूर्ण माहिती मराठी
- सचिन तेंडुलकर माहिती मराठी
- कपिल देव माहिती मराठी
- विराट कोहली माहिती मराठी
- पी टी उषा यांची माहिती
- सानिया मिर्झा माहिती
वडील ब्रिटिश सैन्यात होते. ध्यानचंद यांना हॉकीचे बाळकडू लहानपणापासूनच मिळाले होते. मेजर ध्यानचंद यांचे मूळ नाव ध्यान सिंग असे होते.
हॉकीचा सराव करत ज्या कारणाने त्यांच्या जवळच्या मित्रांनी रात्रीच्या चंद्राची उपमा देऊन, ध्यानसिंग यांच्या नावापुढे चंद्र हा शब्द जोडला, तेव्हापासून ध्यानसिंग यांना ध्यानचंद या नावाने ते ओळखले गेले.
हॉकी खेळतील पराक्रमा मुळे त्यांना पंजाब रायफल्स फलटणीत नोकरी मिळाली. ध्यानचंद यांची प्रॅक्टिस भन्नाट आणि जगा वेगळी असायची. रेल्वे रुळावर ते हॉकीचा सराव करायचे.
अशा सरावाने ते इतके निपुण झाले की, प्रत्यक्ष खेळा दरम्यान त्यांचा खेळ बघून असे वाटायचे की, जणू त्यांच्या हॉकी स्टिक मध्ये चुंबकच आहे. नेदरलँडच्या हॉकी ऑथॉरिटीने अक्षरशः त्यांच्या हॉकी स्टिकचे तुकडे करून चाचणी घेतली होती.
ती तर एक सर्वसाधारण स्टिक होती, पण ती हाती घेऊन जो खेळाडू मैदान गाजवायचा, तो असामान्य होता. चित्याची चपळाई, स्टिक ने चेंडू वळवीत नेण्याचे कसब आणि लढाऊ बाणा या गुणांमुळेच ध्यानचंद हॉकीचे जादुगार ठरले.
१९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलम्पिक स्पर्धेमध्ये, मेजर ध्यानचंद यांनी हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक मधील अंतिम सामन्यात भारताने जर्मनीचा ८-१ असा पराभव केला.
त्या ८ पैकी ६ गोल ध्यानचंद यांनी केले. होते. त्यांच्या अप्रतिम, मंत्रमुग्ध करणारा खेळ पाहून, जर्मनीचा हुकूमशः हिटलर त्यांचा चाहता झाला.
हिटलर ने स्वतः खाली स्टेडियम मध्ये येऊन ध्यानचंद यांच्याशी हस्तांदोलन केले होते आणि त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच, इंग्लिश इंडियन आर्मी मध्ये कर्नल पद देण्याची ऑफर दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.
मेजर ध्यानचंद जन्म व प्रारंभिक जीवन
दि. २९ ऑगस्ट १९०५ मध्ये ध्यानचंद यांचा अलाहबाद मध्ये जन्म झाला. मेजर यांचे वडील सोमेश्वर सिंग हे सैन्यांमध्ये असल्यामुळे, त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर कायमचे ठरलेलं. त्यामुळे त्यांना फारसं शिक्षण घेता आले नाही.
सहावी पर्यंत शाळा नावाचे जग अनुभवल्या नंतर, वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांनी सैन्याची नोकरी पत्करली. सोळाव्या वर्षी दिल्लीतल्या ब्राह्मण रेजिमेंटमध्ये ध्यानचंद रुजू झाले.
मेजर ध्यानचंद यांचे हॉकी खेळाकडे वळण
त्यांचे कुटुंब झाशीमध्ये स्थायिक झाले. पैलवान बनण्याच स्वप्न पाहणाऱ्या ध्यानसिंग यांना सुरुवातीच्या काळात हॉकी बद्दल फारसं आकर्षण नव्हतं, पण सैन्य दलात रंगणाऱ्या सामन्यामुळे त्यांची हॉकीची ओळख झाली.
तत्कालीन मेजर बल्ले सिंग तोमर यांनी ध्यानसिंग यांच्या हातात हॉकी स्टिक सोपवली आणि त्याच हॉकी स्टिकने ध्यानसिंग यांना ध्यानचंद बनवले.
मेजर ध्यानचंद यांची आंतरराष्ट्रीय सामन्याचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा
काम संपल्यानंतर ध्यानसिंग चंद्राच्या प्रकाशात हॉकीची प्रॅक्टिस करत. याच साधनेमुळे लोक त्यांना ध्यानसिंग ऐवजी ध्यानचंद म्हणू लागले. १९२६ भारतीय सैन्य दलाच्या हॉकी संघाचा, पहिला विदेशी दौरा ठरला.
खेळाडूंची शोधा शोध सुरू झाली, या विदेशी दौऱ्यामध्ये आपणही प्रतिनिधित्व करावं अशी मनोमन इच्छा ध्यानचंद यांची होती. शेवटी कमांडिंग ऑफिसरने ध्यानचंद यांना त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना थेट विदेशी दौऱ्याला जाण्याची ऑफर दिली. कमांडिंग ऑफिस ने दिलेल्या आदेशामुळे ध्यानचंद यांची स्वप्नपूर्ती झाली होती.
मेजर ध्यानचंद यांची आंतरराष्ट्रीय हॉकी कारकीर्द
वयाच्या २१ व्या ध्यानचंद विदेशाच्या दौऱ्यावरती निघाले होते. १९२६ मध्ये न्युझीलँड या ठिकाणी ब्रिटिशकालीन भारतीय सैन्य दलाच्या हॉकी संघाचा पहिलाच विदेशी दौरा आणि संपूर्ण हॉकी विश्वाला चक्रावून सोडणारा अद्भुत पूर्व पराक्रम, २१ सामन्यां पैकी १८ सामन्यां मध्ये सैन्य दलाच्या संघाने विजय मिळवला.
संपूर्ण दौऱ्यात त्यांनी तब्बल १९२ गोल केले. त्यातले १०० गोल ध्यानचंद यांच्यावर होते. या भीम पराक्रमाने अवघ्या क्रीडा विश्वाची नजर ध्यानचंद यांच्यावर पडली.
१९२६ साली विजयी होऊन आलेल्या हॉकी संघाचे भारतामध्ये ढोल ताशांच्या गजरात जोरदार स्वागत झालं. ध्यानचंद यांना शिपाई पदावरून लान्स नायक पदावरती बढती मिळाली आणि इथूनच ध्यानचंद यांच्या जादुई खेळायला सुरुवात झाली.
ऑलम्पिक गेम्स १९२८ मध्ये ग्रेट ब्रिटन आपल्याच घरात गुलामी राष्ट्राकडून पराभव स्वीकारावा लागेल, असे ब्रिटनने कधीही स्वप्नातही पाहिलं नसेल. लंडन ऑलम्पिक साठी भारतीय संघ ब्रिटनमध्ये पोहोचला.
ऑलिंपिकच्या आधी होल स्टोन फेस्टिवल मध्ये भारतीय संघ आणि ब्रिटनचा संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. भारताने ब्रिटनला ११ सामन्यांमध्ये हरवले. आपल्या गुलाम राष्ट्राकडून झालेला, पराभव ब्रिटनच्या जिवारी लागला, त्यानंतर ऑलिंपिक सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला ६-० ने, बेल्जियमला ९-० ने, स्विझर्लंडला ६-० ने, डेनमार्कला ५-० ने, आणि नेदरलँडला ३-० ने अशी पराभवाची धूळ चारली आणि भारताने हॉकीच्या पहिल्या सुवर्णपदकावर भारताचे नाव कोरल.
१९२८ साली हॉकी मधून पाहिलं सुवर्ण पदक घेऊन येणाऱ्या भारतीय संघाला विशेषता या हॉकीच्या जादूगाराला, पाहण्यासाठी मुंबई वरती लोकांनी गर्दी केली होती. केरळ पासून पेशावर पर्यंत लोकांना फक्त ध्यानचंद यांना पहायचं होतं.
त्या दिवशी तब्बल २४ तास डॉकियार वरती जहाजांची ये-जा बंद होती. भारतात हे पहिल्यांदाच घडत होतो. आत्तापर्यंत ध्यानचंद हे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होत.
आता १९३२ साली होणाऱ्या ऑलिंपिक साठी भारतीय संघासमोर मोठे आव्हान होते, ऑलम्पिक मध्ये जपानला ११-१ ने अशी मात देऊन भारताने अंतिम फेरीत धडक दिली. अंतिम सामना ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवणाऱ्या अमेरिकेशी होणार होता.
भारताने २४ गोल करत, अमेरिकेचा अक्षरशा धुवा उडवला. यात ८ गोल ध्यानचंद यांचे होते. त्या सामन्यात ध्यानचंद यांच्या पेक्षा जास्त गोल करणारा दुसरा तिसरा कोणी नसून, त्यांचा धाकटा बंधू रूप सिंग होता. रूप सिंगने तब्बल १० गोल केले. ध्यानचंद यांच्या खेळापासून प्रभावित होऊन, रूप सिंगने हॉकी खेळायला सुरुवात केली होती.
१९३२ मध्ये भारताने दुसर सुवर्णपदक मिळवलं. १९३२ ते १९३६ या चार वर्षात भारतीय हॉकी संघाने ३७ सामने खेळले. त्यात ३४ सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्यामुळे जागतिक स्तरावर भारतीय हॉकी संघाचा आणि ध्यानचंद यांच्या नावाचा दबदबा तयार झाला होता.
ध्यानचंद असा खेळ करायचे की, चेंडू त्यांच्या स्टिकला चुकून राहायचा. हॉलंडमध्ये तर त्यात चुंबक असल्याची शंका हि उपस्थित करून हॉकी स्टिक तोडून सुद्धा बघितली आणि आता सगळ्या जगाचे लक्ष होतं बर्लिन ऑलिंपिककडे, भारतीय हॉकी संघाचे नेतृत्व स्वतः ध्यानचंद यांच्याकडे होते. याच बर्लिन मध्ये ध्यानचंद यांनी इतिहास घडवला, ज्यामुळे आपली मान अभिमानाने उंचावते.
बर्लिन ऑलिम्पिक १९३६
बर्लिन शहर एखाद्या नव वधू सारख सजलल, जगात सर्वात मोठा हुकूमशः हिटलर स्वतः या सामन्यावर नजर ठेवून होता. अवघ्या जगाच लक्ष बर्लिन कडे आणि भारताचे लक्ष मात्र ध्यानचंद यांच्याकडे होत.
प्रसार माध्यमां मध्ये फक्त ध्यानचंद यांच्याच नावाची चर्चा होती. ही पहिली ओलंपिक होती, त्याचे चित्रीकरण करण्यात आलं. या ऑलम्पिक मध्ये भारतीय हॉकी संघांनी जबरदस्त खेळ केला.
हंगेरीला ४-० ने, अमेरिकेला ७-० ने, जपानला ९-० ने, आणि सेमी फायनल ला फ्रान्स ला १०-० ने, मात दिली आणि एकही गोल न हरता थेट फायनल मध्ये धडक मारली.
अपेक्षेप्रमाणे जर्मनी फायनल मध्ये भारतीय संघाची वाटच पाहत होता. अंतिम सामना बघण्यासाठी खुद्द हिटलर उपस्थित होता. या सामन्या आधी भारतीय संघाचे मॅनेजर पंकज गुप्ता यांनी संपूर्ण टीमला ड्रेसिंग रूम मध्ये बोलावलं, त्यांनी आपल्या बॅगेतून काँग्रेसच्या आंदोलनांचा तिरंगा बाहेर काढला आणि त्या तिरंगाची शपथ देत सांगितले, हिटलरचे दडपण अजिबात घेऊ नका. निर्भीड खेळ करा.
अखेर भारतीय संघ ध्यानचंद यांच्या नेतृत्वात मैदानावर उतरला. काही मिनिटामध्ये ध्यानचंद यांनी गोल करायला सुरुवात केली. जर्मनीची दाणा दाण उडालेली पाहून, हिटलरने मैदानातून काढता पाय घेतलामुळे, भारताने हा सामना ८-१ ने जिंकला.
हिटलरने मेजर ध्यानचंद यांस जर्मनीचे नागरिकत्व देण्याची ऑफर दिली
ध्यानचंद यांच्या जादुई खेळामुळे भारताने हॅट्रिक मारली. भारताला सुवर्णपदक मिळाले. या सामन्या नंतर हिटलर इतका प्रभावित झाला की, त्यांनी ध्यानचंद यांना जर्मनीचे नागरिकत्व देण्याची आणि सैन्यात कर्नल पद देण्याची ऑफर दिली.
पण ध्यानचंद हिटलरला म्हणाले, पंजाब रेजिमेंट वर मला गर्व आहे. माझ्या भारत भूमीचा मला अभिमान आहे. जशी तुझी इच्छा असे हिटलर म्हणाला. या
मेजर ध्यानचंद हॉकी खेळात किती निपुण होते, हे सांगणारा एक प्रसंग
एका ऑलम्पिक खेळा दरम्यान अनेकदा प्रयत्न करून सुद्धा ध्यानचंद गोल करण्यात अपयशी ठरत होते, असं त्यांच्या सोबत यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. सामन्याचा अर्धा वेळ झाला, भारताच्या खात्यात एकाही गोलची नोंद झाली नव्हती,सगळे खेळाडू चिंता ग्रस्त झाले.
ध्यानचंद यांना म्हणू लागले, आज तुला झालय काय ?एकही गोल तू करू शकत नाही आहेस, अश्याने तर आपण हा सामना गमावून बसू, तेव्हा ध्यानचंद सामना रेफ्री कडे गेले आणि त्यांना म्हणाले, मला गोल पोस्टच्या लांबी विषयी शंका येते आहे तुम्ही सामना थांबून आधी गोल पोस्टचे अंतर मोजा.
रेफ्री म्हणाले की, ऑलिंपिक सारख्या स्पर्धेत चूक होणे शक्य नाही,पण ध्यानचंद काही मानायला तयार नव्हते, ते त्यांच्या जिद्दीवरच अडून होते, ध्यानचंद यांचा क्रीडा विश्वात खूप मोठा सन्मान होता, त्यामुळे मॅच रेफ्रीला ध्यानचंद यांचे ऐकणे भाग पडले.
रेफ्रीने मॅच थांबवून, जेव्हा गोल पोस्टचे अंतर मोजले, तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ते अंतर दोन फुटांनी कमी होते. या प्रसंगाने सगळ्या जगाला ध्यानचंद यांच्या नावाचा जणू महिमाच कळाला. त्यांचा सराव, त्यांच्या खेळातील नैपुण्य किती अफाट होते ह्याची प्रचीती साऱ्यांनाच आली.
ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ न्यूझीलंड ला गेला आणि तेथील सर्व ४८ सामने भारताने तर जिंकलेच पण ५८४ गोल हि करून दाखवले, त्यापैकी ध्यानचंद यांनी ४३ सामन्यां मध्ये व्यक्तिगत २०१ गोल करून, एक आगळा उच्चांक प्रस्थापित केला.
ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांची जेव्हा ध्यानचंद यांच्याशी भेट झाली, तेव्हा ते ध्यानचंद यांना म्हणाले होते की, तुम्ही तर हॉकीमध्ये अशा प्रकारे गोल करताय, जणू क्रिकेट मध्ये कोणी रन्स बनवत आहेत.
मित्रांनो एखाद्या व्यक्तीचं आपल्या ध्येयप्रती किती समर्पण असावं, ध्येय गाठण्याकरिता किती प्रॅक्टिस करावी, तसेच एखाद्या व्यक्तीचा त्याच्या देशावर किती प्रेम असावं, याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे मेजर ध्यानचंद म्हणता येईल.
मेजर ध्यानचंद यांचा प्रसिद्ध सुविचार
मला पुढे नेणे हे माझ्या देशाचे कर्तव्य नाही तर, माझ्या प्रयत्नांनी व माझ्या कष्टाने माझ्या देशाला पुढे नेणे व देशाचे नाव उंचावणे हे माझे कर्तव्य आहे.
मेजर ध्यानचंद पुरस्कार व सन्मान
१९५६ मध्ये मेजर ध्यानचंद यांना भारताचा प्रतिष्ठित नागरिक सन्मान पद्मभूषण देऊन गौरवित केले गेले.
मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या दिवशी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार, अर्जुन आणि द्रोणाचार्य पुरस्कार देऊन सन्मान केला जातो.
मेजर ध्यानचंद यांचा मृत्यूशी संघर्षाचा काळ
महान हॉकीपटू ध्यानचंद सिंग यांचे शेवटचे दिवस अगदी दयणीय आणि दुःखद होते, हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. आजार आणि घरातील अडचणीमुळे, एके काळचे भारताचे सुप्रसिद्ध हॉकीपटू व माजी कर्णधार ध्यानचंद सिंग खूप दुःखी आणि नाराज होते.
त्याचबरोबर देशात हॉकीचा रस तरुणांच्या मनातून कमी होत चालला होता. देशाचा राष्ट्रीय खेळ समजला जाणारा हा खेळ, एक दिवस संपून जाणार की काय ? ही भीतीही ध्यानचंद यांच्या मनाला खात होती.
एकेकाळी ध्यानचंद यांची खेळी पाहून, भलेभले अवाक होत असत, तेव्हा त्यांना लोक हॉकीचा जादुगार म्हणून संबोधत असत. रिटायरमेंट नंतर त्यांची आर्थिक परिस्थिती खूपच ढासळली. जबाबदाऱ्या वाढल्या होत्या, तर बँक बॅलन्स संपत आलं होतं.
त्यांना एक मुलगी आणि तीन मुलं होते. त्यांच्या शिक्षणाची आणि लग्नाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यातल्या त्यात त्यांचा आजार त्यांची पाठ सोडत नव्हता. परिणामी ते अतिशय चिंतेत जीवन व्यतीत करत होते.
या खेळाडूंनी मैदानात प्रतिस्पर्धीला कितीदा तरी हरवलं, पण आयुष्याच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यात त्यांना यश येत नव्हतं आणि विचारांच्या जाळ्यात अडकून आजारी पडले.
निवृत्त झाल्याने तर त्यांचे चाहते हॉकी फेडरेशन आणि महत्त्वाचं म्हणजे सरकार सुद्धा त्यांना विसरून गेली होती. त्यांना कळून चुकलं की, ज्या हॉकीसाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं, कुटुंबालाही खेळासमोर प्राधान्य दिले नाही, त्याची जाणीव आता कोणालाही राहिली नाही.
हा धक्का त्यांना सहन झाला नाही. शेवटच्या काळात तर ते खूपच उदास आणि एकटे राहू लागले. ते म्हणायचे, मी जर मेलो तर माझ्या मरणावर सगळं जग रडेल पण भारतीय रडतील असं मला वाटत नाही.
खरंतर ही आश्चर्याची बाब आहे की, इतके मोठे खेळाडू असूनही, कधीच त्यांना कोणीही काही मदत केली नाही. अगदी सरकारने सुद्धा नाही. आजारपणामध्ये त्यांच्याकडे उपजीविकेचे काही साधनही नव्हते, सरकारनेही याची कधी काही दखल घेतली नाही.
यात केवळ सरकारचीच नाही तर, हॉकी फेडरेशनची ही तितकीच मोठी चूक होती, यात काही शंका नाही. ध्यानचंद एक आत्मसन्मानी व्यक्ती होते, त्यामुळे त्यांनी पैशांसाठी कधीच कुणासमोर हात पसरले नाहीत.
त्यांच्या मृत्यूच्या सहा महिन्यांपूर्वी त्यांचे एक मित्र पंडित वैजनाथ शर्मा यांनी ध्यानचंद यांच्यासाठी व्यवस्था केली.
पंडित वैजनाथ यांच्या मते, ध्यानचंद बाहेर देशातील हॉकी खेळाडूंच्या भेटीला जातील तर त्यांना चांगले वाटेल व खेळाडूंनाही मार्गदर्शन मिळेल, परिणामी ध्यानचंद यांना पुन्हा नावलौकिक मिळेल, विमानाची तिकीट देखील काढण्यात आली होती मात्र ध्यानचंद यांची परिस्थिती फारच बिघडली व ते जाऊ शकले नाही.
आजारपणात ध्यानचंद यांच्यावर अनेक दिवस झाशीमध्ये उपचार चालू होते. १९७८ मध्ये त्यांच्या अनेक मित्रांनी जर्मनीला जाऊन उपचार करायचे सुचवले. अर्थात त्यांचा खर्च करायला देखील ते तयार होते, मात्र ध्यानचंद यांनी नकार दिला.
ध्यानचंद म्हणायचे माझे मन भरलं आहे, आता जगण्याची इच्छा नाही. १९७९ मध्ये त्यांची परिस्थिती फारच बिघडली होती, त्यांना झाशीवरून रेल्वेने दिल्लीच्या ऑल इंडियन दवाखान्यामध्ये नेण्यात आले, या दवाखान्यामध्ये त्यांना सुरुवातीला बेड सुद्धा मिळाला नाही. बऱ्याच वेळ त्यांना लॉबी मध्ये ठेवण्यात आलं. एका महान राष्ट्रीय खेळाडूला आजारपणात या वेदनात घ्याव्या, यापेक्षा मोठे दुर्भाग्य ते काय ?
ध्यानचंद यांचा सर्व परिवार झाशीवरून दिल्लीला आला होता, ते कधी बरे होणारी याची सर्व वाट पाहत होते, मात्र मेडिकल रिपोर्टवरून कळलं की, त्यांना लिव्हर कॅन्सर आहे. आपल्या शेवटच्या दिवसात त्यांनी परिवारातील सदस्यांना सांगितलं की, माझ्या पदांची आणि पुरस्कारांची काळजी घ्या.
त्यांनी असं सांगितलं कारण, यापूर्वी देखील त्यांचे काही पदक चोरी झाले. इतक्या कळकळीने सांगू सुद्धा शेवटी झाशीमध्ये झालेल्या एका प्रदर्शनात त्यांचे ऑलम्पिक मेडल चोरी गेलंच. ध्यानचंद यांचे त्यांच्या खेळावर खूप प्रेम होते, ते डॉक्टरांशी कायम खेळाबद्दल बोलत.
शेवटी दि. ०३ डिसेंबर १९७९ मध्ये ध्यानचंद यांचा मृत्यू झाला. ते आजारी होते, तेव्हा त्यांना कोणी पहायलाही आले नाही, आणि ज्यावेळी ते निधन पावले तेव्हा दवाखान्या बाहेर गर्दी जमा झाली.
आजारी असताना त्यांना कसं कसं रेल्वेने दवाखान्यात आणलं होतं, मात्र त्यांचं पार्थिव नेण्यासाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली, दुसऱ्या दिवशी सन्मानपूर्वक त्यांचे अंत्यविधी पार पडले.
त्यात राजकीय नेते, मंत्री, खेळाडू, हॉकी फेडरेशन, यांनी सहभाग दर्शवला व दुःख व्यक्त केले. मात्र जेव्हा खरी गरज होती, तेव्हा कोणीही आलं नाही.
मेजर ध्यानचंद यांचे निधन
हॉकीच्या जादूगाराला त्यांच्या उतरत्या काळात खूप वेदना सहन कराव्या लागल्या. दि. ०३ डिसेंबर १९७९ रोजी कॅन्सरशी लढता लढता ध्यानचंद यांच्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं.
FAQ
१. मेजर ध्यानचंद यांचा मृत्यू कुठे आणि केव्हा झाला?
हॉकीच्या जादूगाराला त्यांच्या उतरत्या काळात खूप वेदना सहन कराव्या लागल्या. दि. ०३ डिसेंबर १९७९ रोजी कॅन्सरशी लढता लढता ध्यानचंद यांच्या दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झालं.
२. ध्यानचंद का प्रसिद्ध आहेत?
१९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलम्पिक स्पर्धेमध्ये, मेजर ध्यानचंद यांनी हॉकी संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला. १९३६ च्या बर्लिन ऑलिंपिक मधील अंतिम सामन्यात भारताने जर्मनीचा ८-१ असा पराभव केला. त्या ८ पैकी ६ गोल ध्यानचंद यांनी केले. होते. त्यांच्या अप्रतिम, मंत्रमुग्ध करणारा खेळ पाहून, जर्मनीचा हुकूमशः हिटलर त्यांचा चाहता झाला. हिटलर ने स्वतः खाली स्टेडियम मध्ये येऊन ध्यानचंद यांच्याशी हस्तांदोलन केले होते आणि त्यांना जर्मन नागरिकत्व देण्याची तसेच, इंग्लिश इंडियन आर्मी मध्ये कर्नल पद देण्याची ऑफर दिली होती, पण देशप्रेमी व स्वाभिमानी ध्यानचंद यांनी ती नम्रपणे नाकारली होती.
३. मेजर ध्यानचंद कोण होते आणि त्यांच्या मनात हॉकीची आवड कशी निर्माण झाली?
पैलवान बनण्याच स्वप्न पाहणाऱ्या ध्यानसिंग यांना सुरुवातीच्या काळात हॉकी बद्दल फारसं आकर्षण नव्हतं, पण सैन्य दलात रंगणाऱ्या सामन्यामुळे त्यांची हॉकीची ओळख झाली. तत्कालीन मेजर बल्ले सिंग तोमर यांनी ध्यानसिंग यांच्या हातात हॉकी स्टिक सोपवली आणि त्याच हॉकी स्टिकने ध्यानसिंग यांना ध्यानचंद बनवले.
४. मेजर ध्यानचंद यांच्या वडिलांचे नाव काय होते?
मेजर ध्यानचंद यांचे वडील सोमेश्वर सिंग हे सैन्यांमध्ये असल्यामुळे, त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर कायमचे ठरलेलं. त्यामुळे त्यांना फारसं शिक्षण घेता आले नाही.
मेजर ध्यानचंद यांना मेजर का म्हणतात?
भारताने फील्ड हॉकीवर वर्चस्व गाजवलेल्या 1928, 1932 आणि 1936 मध्ये युगात, तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके मिळवण्याव्यतिरिक्त, तो त्याच्या बॉल नियंत्रण आणि गोल-गोल करण्याच्या पराक्रमांसाठी प्रसिद्ध होता. भारताचा सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार त्यांच्या नावावर आहे.
मेजर ध्यानचंद यांचा मुलगा कोण आहे?
भारतीय हॉकीपटू ध्यानचंद यांचा मुलगा अशोक कुमार आहे. अशोक कुमार (जन्म 1 जून 1950) हा एक भारतीय माजी व्यावसायिक फील्ड हॉकी खेळाडू आहे.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रसिद्ध हॉकी विश्वातील जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.