Sant Gadge Baba Information In Marathi | संत गाडगेबाबा माहिती मराठी – स्वच्छतेच्या माध्यमातून गावाची घाण आणि अस्वच्छता साफ करणारे, आणि आपल्या प्रभावी कीर्तनाच्या माध्यमातून समाजाच्या मनातील अंधश्रद्धेची घाण साफ करणारे, कर्मयोगी संत गाडगे महाराज शिकलेले नव्हते. पण वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे, प्रसिद्ध महान समाज सुधारक होते. स्वच्छता आणि दीनदलित व पिडीत लोकांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले. ते आपले कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करायचे.
जे का रंजले गांजले। त्यासी म्हणे जो आपुले।
तोचि साधू ओळखावा। देव तेथेचि जाणावा।।
संत गाडगे महाराजानी समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. आणि स्वच्छता तसेच चारित्र्याची शिकवण दिली. त्यांचे विचार माणसाला आपल्या वागण्यावर विचार करायला लावणारे आहेत. देवाच्या नावावर लोक काय काय करतात आणि कसे ते देवाला जगात नाही तर दगडात बघतात, हे त्यांनी सांगितले आहे. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास कर्मयोगी संत गाडगेबाबा यांची माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही संपूर्ण वाचा.
संत गाडगेबाबा माहिती मराठी : Sant Gadge Baba Information In Marathi
मूळ नाव | डेबोजी झिंगराजी जानोरकर |
ओळख | संत गाडगे महाराज आणि गाडगे बाबा |
जन्मतारीख | २३ फेब्रुवारी १८७६ |
जन्मस्थळ | शेंडगाव, महाराष्ट्र |
आईचे नाव | सखुबाई |
वडिलांचे नाव | झिंगराजी जानोरकर |
प्रसिद्धी | आध्यत्मिक गुरु/ संत |
मृत्यू | २० डिसेंबर १९५६ |
मृत्यू ठिकाण | अमरावती |
संत गाडगेबाबा यांचे बालपण
संत गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेंडगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबोजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या आईच्या माहेरी मूर्तीजापुर तालुक्यातील दापुरी येथे त्यांच्या मामाकडे त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता. विशेषतः गुरांची निगराणी राखायला, त्यांना फार आवडे.
त्यांचे वडील झिंगराजी हे धोबी होते. आई सखुबाईने त्यांचे नाव डेबुजी असे ठेवले होते. लहान असतानाच त्यांचे वडील दारूच्या व्यसना पायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने, लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे, अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता.
संत गाडगे महाराजांचा विवाह
१८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांना चार मुली होत्या. त्यांच्या मुलींच्या बारशाच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारू व मटणाच्या ऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाची काही अडले, नडले, कोठेही काही काम करावयाचे असले, की गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे सर्वजणांनी एक वटून केली पाहिजे, हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला होता.
गाडगे बाबा यांचा गृहत्याग
नंतरच्या काळात घरदार सोडून गाडगे महाराज संसार सुधारण्यासाठी घराबाहेर पडले. स्वच्छता हा त्यांच्यातील विशेष गुण होता. गावात कोठेही काम असो गाडगे महाराज स्वतः हून पुढे यायचे. सार्वजनिक हिताची कामे सर्वांनी एकत्र येऊन करायला हवीत असे त्यांचे मत होते. घर सोडल्यानंतर जिकडे रस्ता दिसेल तिकडे ते चालत चालत निघाले.
गाडगे बाबा फाटलेले कपडे आणि अंगावर एक जुनी गोधडी पांघरून पायी प्रवास करत असत. त्यांच्या एका हातात काठी व दुसऱ्या हातात एक मातीचे गाडगे असायचे, ज्यात ते जेवण करत असत. त्यांचे असे रूप पाहून लोक त्यांना भिकारी समजत असत. बऱ्याचदा त्यांना लोकांद्वारे अपमानित पण व्हावे लागले. परंतु त्यांनी आपले कार्य सुरू ठेवले.
गाडगे बाबा यांचे संक्षिप्त चरित्र
- कीर्तनाच्या माध्यमातून गाडगे महाराजांनी अनाममोचन (विदर्भ) गावात लोकशिक्षणाचे कार्य सुरू केले.
- अनरामोचन येथे त्यांनी “लक्ष्मीनारायण” मंदिर उभारले.
- पूर्णा नदीवर 1908 मध्ये घाट बांधण्यात आला.
- 1925: मूर्तिजापूरमध्ये गोरक्षक म्हणून काम करताना शाळा आणि धर्मशाळा बांधली.
- चोखामेळ धर्मशाळा पंढरपूर येथे 1917 मध्ये बांधण्यात आली.
- “मी कोणाचा शिक्षक नाही आणि कोणीही माझा अनुयायी नाही,” असे म्हणून त्यांनी कोणत्याही पंथाचा प्रचार करण्यास नकार दिला.
- 8 फेब्रुवारी, इसवी सन 1952 मध्ये त्यांनी “श्री गाडगे बाबा मिशन” ची स्थापना केली आणि संपूर्ण महाराष्ट्रात शाळा आणि धर्मशाळा उघडल्या.
- 1932 मध्ये अनाममोचनचे सदावर्त संत गाडगे बाबा सुरू झाल्यानंतर गाडगे महाराजांनी कीर्तनातून जनजागृतीचा मार्ग अवलंबला.
- गाडगे महाराजांचे ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे भजन होते. त्यांच्या जीवनावर आधारित देवकीनंदन गोपाला हा चित्रपटही प्रदर्शित झाला आहे. मन्ना डे यांनी ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ हे गाणे सादर केले.
- गाडगे बाबांबद्दल आचार्य अत्रे म्हणाले, ‘जंगलात सिंह दिसला पाहिजे, जंगलात हत्ती दिसला पाहिजे आणि गाडगे बाबा कीर्तनात दिसले पाहिजेत.
- 1 फेब्रुवारी 1905 रोजी पहाटे 3 वाजता घर सोडले.
- 1921 मध्ये पंढरपूरमध्ये कायमस्वरूपी मराठा धर्मशाळा सुरू केली.
- 1 मे 1923 रोजी आई सखुबाई यांचे निधन झाले.
- एकुलता एक मुलगा गोविंदा यांचे 5 मे 1923 रोजी निधन झाले.
- कर्मवीर भाऊराव पाटील आणि संत गाडगे बाबा यांची 1926 मध्ये एका कार्यक्रमाचा भाग म्हणून भेट झाली.
- नाशिकमध्ये 1932 मध्ये सदावर्त सुरू केले.
- 1931 मध्ये वरवंडे येथे गाडगे बाबांच्या प्रबोधनाने पशुहत्या थांबवली.
- गांधी जी आणि गाडगे बाबा यांची पहिली भेट वर्धा येथे 27 नोव्हेंबर 1935 रोजी झाली.
- बाबासाहेब आंबेडकर यांना 14 जुलै 1949 रोजी सुपूर्द केलेल्या डॉ.
- 1952 – पंढरपूर येथे झालेल्या कीर्तन परिषदेत त्यांनी कीर्तनकारांना अस्पृश्यता निर्मूलनासाठी कठोर भूमिका घेऊन दलितांच्या मदतीसाठी पुढाकार घेण्याचे प्रामाणिक आवाहन केले.
- कराडमध्ये रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 1954 मध्ये सदगुरू गाडगे महाराज विद्यालयाची स्थापना केली.
- गाडगे बाबा, मुंबईतील जे.जे. धर्मशाळा, रूग्णालयातील रूग्णांच्या कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी 1954 मध्ये बांधण्यात आली होती.
- कर्मवीर भाऊराव पाटील व गाडगे बाबा डॉ.पंजाबराव देशमुख यांचे सहकार्य लाभले.
- डॉ.आंबेडकरांनी त्यांना गुरुस्थानी मानले.
संत गाडगे बाबा जयंती | sant gadge baba jayanti
संत गाडगे महाराजांचा जन्म शेंडगाव या ठिकाणी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा इत्यादी समाजातील दोष दूर करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले. संत गाडगेबाबा खऱ्या अर्थाने समाजाचे एक महान समाज सुधारक म्हणून संबोधले जाते. महाराष्ट्र सरकारने संत गाडगेबाबांच्या स्मरणार्थ “संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान” राबवण्यात सुरू केली. संत गाडगेबाबा यांची जयंती २३ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते.
गाडगेबाबा यांचा पारमार्थिक मार्गाचा अवलंब
गाडगेबाबा संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. दिनांक १ फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून, संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले. अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसभेचे वृत्त सोडले नाही. कोठे कोणी अडीअडचणीत सापडलेला असल्यास, त्याला आपण होऊन मदत करायला जायचे. मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता, आपल्या वाटेने निघून जायचे.
हा त्यांचा स्वभाव असायचा. ते ज्या गावात जात ते गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जीवापाड प्रयत्न केले. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा भोळ्या समजुती, अनिष्ट, रूढी, परंपरा, मोडण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.
गाडगेबाबा यांचा अज्ञान, अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न
गाडगेबाबा शिकलेले नव्हते, पण तरी देखील ते खूप बुद्धिमान होते. ‘देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराण, तंत्र-मंत्र, चमत्कार यावर विश्वास ठेवू नका’, अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी समाजाला शिक्षण, स्वच्छतेचं महत्त्व पटवून दिलं. गाडगेबाबा दिवसभर गाव स्वच्छ केल्यानंतर रात्री लोकांचं मन स्वच्छ करण्यासाठी कीर्तन करत असत. कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत. अंधश्रद्धा दूर करत, परिश्रम, परोपकार याची शिकवण देत. देव दगडात नसून तो माणसांत आहे, हे त्यांनी लोकांच्या मनावर ठसवण्याचा प्रयत्न केला. मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य म्हणायचं नाही, असे ते म्हणायचे.
गाडगे महाराजांचा पेहराव
अंगावर गोधडी, फाटके तुटके कपडे, आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेश होता. त्यामुळेच लोक त्यांना गाडगेबाबा म्हणून ओळखू लागले. ते सतत खराटा जवळ बाळगायचे.
संत गाडगे महाराजांचे कीर्तन
त्यांचे उपदेशही साधे सोपे. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद अस्पृश्यता पाळू नका, असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून, तो माणसात आहे. हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानत. “मी कोणाचा गुरु नाही. मला कोणी शिष्य नाही” असे ते काय म्हणत. आपले विचार साध्यामुळे लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा उपयोग करत असत.
गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही केला. वेळोवेळी ते शहरी नास्तिकापर्यंत कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबांना आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत. आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे, “माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे”. असे उद्गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.
महाराष्ट्रातील संत परंपरेबाबत “ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस” असे म्हटले जाते. संत गाडगेबाबांच्या कार्यामुळे या भागवत धर्मांच्या कळसावर, गाडगेबाबांनी विसाव्या शतकात कर्मयोगाची ध्वजा चढवली असे म्हटले जाते. “महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ” असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी यांनी संत गाडगेबाबांबद्दल काढले आहेत.
संत गाडगे बाबा यांची स्वयंसेवा
१९०५ मध्ये त्यांनी गौतम बुद्धांप्रमाणे, पीडित लोकांना मदत करण्यासाठी आणि सामाजिक कार्य करण्यासाठी, महाराष्ट्रात गाडगे म्हणून ओळखले जाणारे लाकडी आणि मातीचे भांडे घेऊन घर सोडले. दया, करुणा, बंधुता, समरूपता, मानव कल्याण, परोपकार, गरजूंना मदत करणे आणि इतर सद्गुण बुद्धाचे आधुनिक रूप असलेल्या डेबूजीमध्ये विपुल प्रमाणात होते. १९०५ ते १९१७ मध्ये पदत्याग केल्यापासून ते साधक अवस्थेत राहिले.
गाडगे महाराज हे भटके विमुक्त समाजशिक्षक होते. चप्पल घालून आणि डोक्यावर मातीची वाटी घालून पायी चालत असे. गाडगे महाराज समाजात येताच गटारी आणि रस्ते स्वच्छ करायचे. गावातील स्वच्छतेचे काम पूर्ण झाल्यावर ते स्थानिकांचे कौतुक करायचे. गावातील लोक त्यांना पैसे द्यायचे, जे बाबाजी समाजाच्या सामाजिक आणि भौतिक विकासासाठी लावायचे.
महाराजांनी लोकांकडून मिळालेल्या पैशाचा उपयोग गावोगावी शाळा, धर्मशाळा, दवाखाने आणि प्राण्यांचे निवारा बांधण्यासाठी केला. दुसरीकडे या महामानवाने स्वत:साठी झोपडीही बांधली नाही. गावोगावी साफसफाई करून संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करून ते आपल्या कीर्तनातून लोकोपयोगी व समाजहिताचा संदेश देत असत. आपल्या कीर्तनांदरम्यान ते लोकांना अंधश्रद्धेच्या धोक्यांचे प्रबोधन करत असत. आपल्या कीर्तनात त्यांनी संत कबीर दोहेही वापरले.
संत गाडगेबाबा यांचे सामाजिक कार्य
- गाडगेबाबा यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधले.
- गोरगरीब जनतेसाठी छोटी मोठी रुग्णालय बांधली.
- अनेक नद्यांसाठी घाट बांधले.
- अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्राची व्यवस्था केली.
- कुष्ठरोग्यांची सेवा केली.
- संत गाडगे महाराजांनी शाळा, वस्तीगृह, धर्मशाळा, वृद्ध, अंध, अपंग, महारोगी यांच्यासाठी अन्नदान सुरु केले.
- “गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला” ही अमृतवाणी गाणाऱ्या, गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाची, पशुत्त्य बंदीचे कार्य, तसेच गो-पालन आणि शेती यांचा समन्वय साधून, भक्तीला कर्माची जोड दिली.
- महाराष्ट्रात लोकजीवन उजळण्यासाठी, हाती खरडा घेऊन, गावचे रस्ते स्वच्छ केले. आणि उत्तम ज्ञान, महान विचार, विवेकांच्या खऱ्या अर्थाने लोकांची मने स्वच्छ केली. लोकना शिक्षणाचे महत्त्व पटवून देऊन,
- लोक जागृती साधणारे हे फिरते विद्यापीठ होते. संपूर्ण आयुष्य जनतेसाठी समर्पित केले.
संत गाडगेबाबा यांचे निधन
लोकसभेच्या या धकाधकीच्या प्रवासातच त्यांची अमरावती जवळ वलगाव येथे पिढी नदीच्या पुलाजवळ २० डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला. प्रसार करणाऱ्या कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या, या सदपुरुषाची आणि कर्त्य समाज सुधारकाची समाधी अमरावती येथे आहे. अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ असे नाव दिले आहे.
संत गाडगेबाबा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
१४ जुलै १९४१ ला गाडगेबाबांची प्रकृती ठीक नव्हती. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब भारताचे कायदेमंत्री होते. आणि त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. गाडगेबाबाचा निरोप मिळताच, त्यांची त्यांनी सर्व कामे बाजूला ठेवली. दोन घोंगड्या विकत घेऊन, ते गाडगेबाबांना बघायला रुग्णालयात गेले. कोणाकडून काहीं न घेणाऱ्या बाबांनी, बाबासाहेबांकडून घोंगड्या स्वीकारल्या. डॉक्टर तुम्ही कशाला आले ? तुमचा एक मिनिट सुद्धा महत्त्वाचा आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही, पण तुमचा अधिकार मोठा आहे. याप्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.
संत गाडगेबाबा यांचे प्रेरणादायी विचार
- जशी हवा आहे, लाल आहे, हिरवी आहे, पिवळी आहे, ते समजत नाही. आणि त्याचे ठिकाण नाही, असाच परमेश्वर आहे.
- हे जे तीर्थ देव बसलेले आहेत ना ते पोट भरण्याची देव आहेत, संत तुकाराम महाराज म्हणाले देवदेव करता शिनले माझे मन. मी खूप फिरलो, मी थकलो, पण देव दिसला नाही.
- देव पाहिला नाही, देव दिसला नाही, आणि देव कोणाला दिसणारहि नाही.
- कोणी म्हणते रात्री स्वप्नात परमात्मा दिसले, शंख, चक्र, गदा, सर्व साहित्य सोबत घेऊन परमात्मा दिसला नाही. जे मनी असे तेथे स्वप्नात दिसते. माझा बाप स्वप्नात तुम्ही पाहिला होता का ? कधी मग जे पाहिलं नाही ते दिसतच नाही. मग जो फोटो पाहतो तो फोटो तुला देव दिसतो. देव दिसत नाही. देव दिसायची गोष्ट नाही.
- देवाचा देवळापुरता तरी उजेड पडतो का ? नाही. मग दिवा वीजला मंडळी दर्शनाला आली, बापूराव दिवा लावा. मग देव कोणी दाखवला, दिव्यांने. मग दिवा मोठा की, देव मोठा, दिवा.
- माणसाचे धन तिजोरी नाही, सोनं नाही, मोटर नाही, माणसाचं धन कीर्ती आहे.
- चार महिने बरसात परमात्मा देते. मग जमीन पिकते. चार महिने बरसात नाही पडली तर, जमीन पिकेल का ? हजारो, करोडो लोक मरतील.
- देवाला आपण फुल वाहतो, फुल कोणी पैदा केली ? देवाने केली. मग त्याचेच फुल, त्याचीच बरसात, आपण त्यालाच देतो.
- गरिबांसाठी बायाचे दवाखाने बांधा, गोरगरिबाला औषधी द्या, गोरगरिबाला कपडे द्या, पावशेर चावलदार गोरगरिबांवर दया करा.
गाडगे महाराजांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार
अंगावर खिगड्यांचा सदरा हातात गाडगे आणि खराटे घेऊन ग्राम स्वच्छतेचे महत्व पटवून देणाऱ्या, संत गाडगे महाराजांना महाराष्ट्र शासनाने “ग्राम स्वच्छता पुरस्कार” सुरू केला.
गाडगे महाराजांची चरित्रे
- असे होते गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
- ओळख गाडगेबाबांची (प्राचार्य रा.तु. भगत)
- कर्मयोगी गाडगेबाबा (मनोज तायडे)
- गाडगेबाबा (चरित्र, प्रबोधनकार ठाकरे)
- गाडगे बाबांचा पदस्पर्श (केशव बा. वसेकर)
- श्री गाडगेबाबांचे शेवटचें कीर्तन (गो.नी. दांडेकर)
- Shri Gadge Maharaj (इंग्रजी, गो.नी. दांडेकर)
- प्रबोधन पंढरीचा क्रांतिकारी संत-गाडगेबाबा (संतोष अरसोड)
- गाडगेबाबांच्या सहवासात (जुगलकिशोर राठी)
- गाडगे माहात्म्य (काव्यात्मक चरित्र, नारायण वासुदेव गोखले)
- गोष्टीरूप गाडगेबाबा (विजया ब्राम्हणकर)
- निवडक गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
- मुलांचे गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
- लोकशिक्षक गाडगेबाबा (रामचंद्र देखणे)
- लोकशिक्षणाचे शिल्पकार (रा.तु. भगत)
- लोकोत्तर : गाडगेबाबा जीवन आणि कार्य (डॉ. द.ता. भोसले)
- The Wandering Saint (इंग्रजी, वसंत शिरवाडकर)
- संत गाडगेबाबा (गिरिजा कीर)
- संत गाडगेबाबा (दिलीप सुरवाडे)
- संत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
- Sant Gadagebaba (इंग्रजी, प्राचार्य रा.तु. भगत)
- संत गाडगेबाबांची भ्रमणगाथा (प्राचार्य रा.तु. भगत)
- श्रीसंत गाडगे महाराज (मधुकर केचे)
- श्री संत गाडगे महाराज ऊर्फ गोधडे महाराज यांचे चरित्र (पां.बा. कवडे, पंढरपूर)
- संत श्री गाडगे महाराज (डॉ. शरदचंद्र कोपर्डेकर)
- गाडगे महाराजांच्या गोष्टी (सुबोध मुजुमदार)
- समतासूर्य गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत )
- स्वच्छतासंत गाडगेबाबा (प्राचार्य रा.तु. भगत)
संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश
- गाडगेबाबा प्रबोधन काव्य
- भुकेलेल्यांना – अन्न
- तहानलेल्यांना – पाणी
- उघड्यानागड्यांना – वस्त्र
- गरीब मुलामुलींना – शिक्षणासाठी मदत
- बेघरांना – आसरा
- अंध, पंगू रोगी यांना – औषधोपचार
- बेकारांना – रोजगार
- पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना – अभय
- गरीब तरुण-तरुणींचे – लग्न
- दुःखी व निराशांना – हिंमत
- गोरगरिबांना – शिक्षण
गाडगे बाबा यांनी केलेली समाजसुधारणेची कामे
गाडगे बाबा यांना समाजाला पुढे नेण्याची प्रबळ इच्छा होती.
ते स्वतः अशिक्षित राहिले पण तरुण पिढीला वाचता यावे म्हणून त्यांनी शिक्षणाची भीक मागितली.
गावातील नालेही स्वच्छ केले आणि मग ते स्वतः अभिनंदन करायचे की आता तुमचे गाव स्वच्छ झाले आहे. साफसफाईच्या बदल्यात गावकरी त्यांना पैसे देत असत. यातून मिळालेला पैसा त्यांनी सामाजिक विकासाच्या कामात वापरला.
मात्र या महामानवाने आपल्या संपूर्ण आयुष्यात स्वत:साठी झोपडीही बांधली नाही. आपले संपूर्ण आयुष्य धर्मशाळेच्या व्हरांड्यात किंवा जवळच्या झाडाखाली घालवले. त्यांच्याकडे खाण्यासाठी भांडीही नव्हती आणि सर्व काही विकून त्याने आपले जीवन समाजासाठी समर्पित केले.
हातात झाडू घेऊन जिथे जिथे घाण दिसली तिथे गाव स्वच्छ करणे हा त्यांचा ट्रेडमार्क होता. संत गाडगे यांनी समाजाला स्वच्छता व शिक्षण दिले. या माध्यमातून लोकांमधील घाण दूर करून मानवतेचा संदेश देण्यात आला. आपल्या कीर्तनाने आणि सत्यकर्मातून कमावलेल्या पैशातून क्रांती घडवून त्यांनी इतिहास घडवला. स्वच्छतेमुळे आपले वातावरण शुद्ध राहतेच, परंतु हे आपल्याला निरोगी आणि विकसित जीवन देखील देते. स्वच्छतेचे जनक संत गाडगे महाराज जाणत होते
गाडगेबाबा यांच्या कविता
कीती पुजला देव तरी,
देव अजुन पावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही..||धृ ||
मंदिरासमोर लुटली इज्जत,
हा बघत बसला पोरीला,
रक्षण करतो म्हणाला, अन् स्वत:च गेला चोरीला,
हातात असुन धारदार शस्र,
कधी चोरामागे धावला नाही..
कुठं राहतो कुणांस ठाऊक अजुनपर्यंत घावला नाही…||१||
सगळं काही तोच देतो,
तोच पुरवतो सगळ्यांची हौस…
शेतक़री बघतो आभाळांकडं,
मग गेला कुठं पाऊस…
खुप केलं हरी हरी तरी,
मुखांत कधी मावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||२||
कधी स्वत: राहून उपाशी, भुक त्याची भागवली…
हा म्हणे नैवद्यावर थोडी,
साखर का नाही मागवली…
आहार त्याचा वाढतं गेला,
कधी एका बक-यावर भागला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत घावला नाही…||३||
आंघोळ करतो दुधाने,
जणू सगळ्याच गाई त्याच्या बापाच्या…
तोच घागरी भरतो म्हणे,
पुण्य अन् पापाच्या…
पाप-पुण्याचा हीशोब कधी,
त्यानं दावला नाही…
कुठं राहतो कुणांस ठाऊक,
अजुनपर्यंत मला घावला नाही…||४||
संत गाडगे महाराज
FAQ
१. संत गाडगेबाबा यांना काय म्हणतात?
संत गाडगे बाबांना गाडगे महाराज, गोधडे बाबा असे संबोधले जात असे. “गोपाला गोपाला, देवकीनंदन गोपाला” ही अमृतवाणी गाणाऱ्या, गाडगेबाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलनाची, पशुत्त्य बंदीचे कार्य, तसेच गो-पालन आणि शेती यांचा समन्वय साधून, भक्तीला कर्माची जोड दिली.
२. गाडगे बाबा कीर्तनातून काय सांगायचे?
गाडगे बाबा कीर्तनातून चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, देवाधर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातीभेद अस्पृश्यता पाळू नका, असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून, तो माणसात आहे. हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
३. संत गाडगे महाराजांचा जन्म कुठे झाला?
संत गाडगे महाराजांचा जन्म शेंडगाव या ठिकाणी २३ फेब्रुवारी १८७६ रोजी झाला. त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा इत्यादी समाजातील दोष दूर करण्यासाठी स्वतःचे संपूर्ण आयुष्य वेचले. संत गाडगेबाबा खऱ्या अर्थाने समाजाचे एक महान समाज सुधारक म्हणून संबोधले जाते.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत गाडगे बाबा यांच्या बद्दल महिती दिली आहे. संत गाडगेबाबा माहिती मराठी हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत शेयर करा. धन्यवाद.