अमिताभ बच्चन माहिती मराठी | Amitabh Bachchan Information In Marathi

अमिताभ बच्चन माहिती मराठी Amitabh Bachchan Information In Marathi – ऑल इंडिया रेडिओमध्ये रेडिओ प्रेझेंटरचे काम न मिळणे, बॉलीवूडमध्ये सुरुवातीच्या १२ फिल्म फ्लॉप जाणे, संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टीवर अनेक वर्ष राज्य करणारा, कुली चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी झालेल्या, अपघातामधून जीवावर बेतलेल्या संकटातून थोडक्यात बचावणे, राजकारणात येणे, पण तिथं वाईट अनुभव आल्यामुळे, पुन्हा सिनेमाकडे आवड निर्माण करणे, प्रचंड कर्जबाजारी झाल्यामुळे, दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन अस्तित्व टिकवण्यासाठी, पुढे दुसरा कोणताही पर्याय नसल्यामुळे सिनेमाकडून टीव्हीकडे वळणे, केबीसी करत छोटा पडदा गाजवून, पुन्हा सिनेमात दणदणीत एन्ट्री करणे, पुन्हा एकदा बॉलीवूडचा शहेनशहा होणे.

मित्रांनो हा संपूर्ण घटनाक्रम आपल्याला हेच सांगतो की, इंडियन फिल्म इंडस्ट्रीचा स्टार ऑफ द मिलेनियम होणारे असे अमिताभ बच्चन यांच्यासाठी केवळ एक योगायोग नव्हता. कोणत्याही विपरीत परिस्थितीत आपल्यातल्या गुणांवर विश्वास ठेवून आणि देवाने आपल्याला जे काही दिले, त्याचा सकारात्मकरित्या पुरेपूर उपयोग करून, आयुष्यात यशस्वी कसं होता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे महानायक अमिताभ बच्चन.

भारत सरकारने १९८४ साली पद्मश्री २००१ साली पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. २०१८ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. जो सिनेमातला सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याचबरोबर अनेक देशी आणि विदेशी पुरस्कारानी अमिताभ बच्चन यांचा गौरव करण्यात आले आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस अमिताभ बच्चन यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

अमिताभ बच्चन माहिती मराठी | Amitabh Bachchan Information In Marathi

नाव अमिताभ बच्चन
जन्म तारीख ११ ऑक्टोबर १९४२
जन्म स्थळ अलाहाबाद (उत्तर प्रदेश)
ओळख बिग बी, अँग्री यंग मॅन, बॉलिवूडचा शहेनशाह
व्यवसाय अभिनेता, निर्माता, गायक, लेखक
एकूण मालमत्ताअंदाजे एक हजार कोटी
भाषाहिंदी, इंग्रजी
राष्ट्रीयत्वभारतीय
इंस्टाग्राम खाते@amitabhbachchan
फेसबुक पेजअमिताभ बच्चन
ट्विटर पेज @srBachchan

अमिताभ बच्चन यांचा जन्म आणि कौटुंबिक माहिती

अमिताभ यांचा जन्म दि. ११ ऑक्टोबर १९४२ रोजी उत्तर प्रदेश मधल्या, अलाहाबाद येथे झाला. त्यांच्या आईचा नाव तेजी आणि वडिलांचे नाव होतं हरिवंशराय. हरिवंशराय हे हिंदीतले सुप्रसिद्ध कवी होते. त्यांना दोन मुलं होती. हरिवंशराय यांनी अमिताभ यांचे नाव ठेवलं होतं. त्याकाळी जोरावर असलेल्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इन्कलाब जिंदाबाद या नाऱ्यावरून ते प्रेरित झाले होते.

Amitabh Bachchan Information In Marathi

अमिताभ बच्चन यांचे मूळ आडनाव होतं, श्रीवास्तव. पण हरिवंशराय यांनी आपल्या कवितांसाठी आणि इतर कामकाजांसाठी बच्चन हे आडनाव ठेवलं होतं. पुढे तेच बच्चन आडनाव त्यांच्या संपूर्ण परिवाराचे आडनाव झाले.

अमिताभ यांच्या आईला एक्टिंगमध्ये खूप इंटरेस्ट होता आणि त्यांना फिल्ममध्ये रोल साठी ऑफरही आली होती. पण त्यांनी गृहिणी म्हणून राहण पसंत केले. असं म्हटलं जातं की, फिल्ममध्ये करिअर करण्याच्या अमिताभ यांच्या निर्णयांमध्ये, त्यांच्या आईचा मोठा वाटा होता.

अमिताभ बच्चन यांची कौटुंबिक माहिती

आईचे नावतेजी बच्चन
वडिलांचे नावहरिवंशराय बच्चन
वैवाहिक स्थिती विवाहित
पत्नीचे नावजया बच्चन
अपत्य श्वेता बच्चन नंदा , अभिषेक बच्चन
सुन ऐश्वर्या रॉय बच्चन
जावई निखिल नंदा
नातवंडे आराध्या अभिषेक बच्चन , नव्या-नवेली नंदा
भाऊअजिताब बच्चन
वहिनीरमोला बच्चन
खास मैत्रिणी झीनत अमान, रेखा
अमिताभ बच्चन फॅमिली

अमिताभ बच्चन यांची शैक्षणिक माहिती

अमिताभ यांनी नैनितालच्या शिरवळ कॉलेज आणि नंतर दिल्ली युनिव्हर्सिटीच्या करोडीमल कॉलेजमधून, आपलं शिक्षण पूर्ण केलं. कलकत्त्याला जाऊन त्यांनी आपली पहिली नोकरी केली शॉप वाल्याचा कंपनीमध्ये, त्यानंतर ती नोकरी सोडून देऊन, त्यांनी गोल्डन कंपनीमध्ये काम केलं. एक्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी तीही नोकरी सोडून देऊन, मग ते मुंबईला आले.

Amitabh Bachchan

हे वाचा

अमिताभ बच्चन यांचे वर्णन

शरीराचा आकारछाती- ४० इंच, कंबर- ३२, बायसेप- १४ इंच
वजन८० किलो
रंगगोरा
उंची६.१ फिट
केसांचा रंगपांढरा
डोळ्यांचा रंगकाळा

अमिताभ बच्चन यांचा संघर्ष

  • एक्टिंग मध्ये करिअर करण्यासाठी त्यांना एक रेडिओ प्रेझेंटर व्हायचं होतं. आजपर्यंत आपण हे ऐकत आलोय की, अमिताभ यांच्या जाड आणि मोठ्या आवाजामुळे, ऑल इंडिया रेडिओ यांनी त्यांना जॉब द्यायला नकार दिला होता. पण त्यासंबंधीचा असाही एक किस्सा ऐकायला मिळतो की, अमिताभ बऱ्याचदा अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय आपली व्हॉइस ऑडिशन देण्यासाठी ऑल इंडिया रेडिओच्या स्टुडिओमध्ये गेले होते, पण प्रत्येक वेळी ऑल इंडिया रेडिओचे ख्यातनाम रेडिओ प्रेझेंटर यांनी अमिताभ यांना आधी अपॉइंटमेंट घेऊन यायला सांगा, असे सांगीतले, त्यामुळे अमिताभ आपली व्हॉइस ऑडिशन देऊ शकले नाहीत.
अमिताभ बच्चन
  • आपल्या एका मुलाखतीत ऑल इंडिया रेडिओचे ख्यातनाम रेडिओ प्रेझेंटर म्हणतात, माझा सगळ्या दिवस स्टुडिओमध्ये निघून जायचा. इतर कुठल्याही कामासाठी माझ्याकडे वेळ नसायचा, अमिताभ बच्चन नावाचा एक सडपातळ तरुण अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय, आपली व्हॉइस ऑडिशन देण्यासाठी आला होता. तो माझी वाट बघून निघून गेला. त्यानंतरही तो बऱ्याचदा आला होता. पण प्रत्येक वेळी मी माझ्या रिसेप्शनला हे सांगून त्याला परत पाठवायचो की, त्याला आधी अपॉइंटमेंट घेऊन यायला सांगा.
  • काही वर्षांनी मी त्याला आनंद फिल्ममध्ये पाहिलं आणि मला झटकाच लागला. आज मी त्या गोष्टीचा जेव्हा विचार करतो, तेव्हा मला असं मनापासून वाटतं की, त्यावेळेस जे काही झालं ते आम्हा दोघांसाठीही चांगलं झालं. कारण त्यावेळी जर मी त्याच वाईस ऑडिशन घेतलं असतं, तर आज मी स्वतः रेडिओच्या बाहेर असतो आणि तो रेडिओच्या दुनियेचा शहेनशा झाला असता आणि इंडियन सिनेमाला एक महानायक मिळाला नसता. आपल्यातल्या फार कमी लोकांना माहिती आहे की, फिल्म इंडस्ट्रीतली पहिली कमाई अमिताभ यांनी त्यांचा आवाज देऊनच केली होती.

अमिताभ बच्चन यांची कारकीर्द

चित्रपटांमध्ये करिअर

  • १९६९ साली मृणाल सेन यांच्या भुवन शोम या फिल्ममध्ये कथा वाचकाच्या रूपात, त्यांनी आपला आवाज दिला होता. हि त्यांची पहिली फिल्म होती.
  • १९६९ सालची के अब्बास निर्देशित सात हिंदुस्तानी या फिल्म साठी अमिताभ बच्चन यांना बेस्ट न्यू कमर्ज नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला होता.
  • १९७० साली बॉम्बे टॉकीज ही फिल्म आली. ज्या त्यांचा फक्त एक स्पेशल अँपिअरन्स होता.
  • १९७१ साली अमिताभ यांच्या ६ फिल्म रिलीज झाल्या, त्यातल्या चार फिल्म चालल्या नाहीत. पण ऋषिकेश मुखर्जी यांच्या दोन्ही फिल्म आनंद व गुड्डी हिट झाल्या. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबरोबर काम केलेल्या आनंद मधील कारकिर्दी साठी त्यांना बेस्ट सपोर्टिंग एक्टर्स अवार्ड मिळाला.
  • १९७२ साली अमिताभ यांच्या आठ फिल्म रिलीज झाल्या त्यातली बॉम्बे टू गोवा ही एकच फिल्म हिट झाली. फिल्म त्यांना मिळत होत्या, पण काही खास चालत नव्हत्या, कधी कधी ते उदास व्हायचे.
  • कालांतराने अमिताभ यांचं काम फिल्म इंडस्ट्रीतल्या काही दिग्गजांच्या नजरेत हळूहळू येऊ लागलं होतं. दिग्दर्शक प्रकाश मेहरा त्यावेळी जंजीर नावाची फिल्म बनवत होते.
  • धर्मेंद्र यांना साइन करण्यात आलं होतं. पण नंतर धर्मेंद्र यांनी त्या फिल्ममध्ये काम करण्यास नकार दिला. त्याच रोल साठी नंतर देवानंद, राजकुमार, राजेश खन्ना, यांनाही विचारण्यात आलं. पण सगळ्यांनीच तो रोल नाकारला.
  • जंजिराचे लेखक सलीम जावेद हे बॉम्बे टू गोवा मध्ये अमिताभ यांनी केलेल्या कामामुळे, इम्प्रेस झाले होते. सलीम जावेद यांनीच अमिताभ यांचे नाव जंजीरसाठी प्रकाश मेहरा यांना सुचवलं आणि जंजीर अमिताभ यांना मिळाली. पण जंजीरसाठी अमिताभ यांचे सिलेक्शन झाल्यामुळे, दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांच्यापुढे एक नवीनच अडचण उभी टाकली. फिल्म इंडस्ट्रीतली त्याकाळची कोणतीही सेट अभिनेत्री अमिताभ यांच्याबरोबर काम करायला तयार होईना, या उंटाबरोबर कोण काम करेल ? असं म्हणून धर्मेंद्र यांच्याबरोबर काम करायला तयार झालेल्या सगळ्या मोठ्या अभिनेत्रींनी, आपलं नाव मागे घेतलं.
  • तेव्हा केवळ एकच सेट अभिनेत्री अमिताभ यांच्याबरोबर काम करायला तयार झाल्या आणि त्यांचं नाव होतं जया बादुरी, जंजीर सुपरहिट झाली आणि अमिताभ रातोरात स्टार झाले. अशी त्यांची नवी ओळख तयार झाली, त्या काळात जंजीरने सहा कोटी रुपयांची कमाई केली. जंजिरासाठी त्यांना पहिल्यांदा बेस्ट अभिनेता फिल्म नॉमिनेशन मिळालं होतं.
  • गुड्डी सिनेमाच्या सेटवर अमिताभ आणि जया भादुरी यांची घनिष्ठ मैत्री झाली होती. १९७३ साली अमिताभ आणि जया भादुरी यांची अभिमान ही फिल्म सुद्धा सुपरहिट झाली. अभिमान रिलीज होण्याच्या एक महिना आधीच, अमिताभ आणि जया भादुरी या दोघांनी लग्न केलं. त्यानंतर अमिताभ यांनी मागे वळून पाहिलं नाही.
  • १९७३ साली आलेल्या नमक हराम फिल्म साठी, त्यांना बेस्ट सपोर्टिंग अवॉर्ड मिळाला. त्यांनी एका मागोमाग एक मजबूर, दिवार, शोले, त्रिशूल, डॉन, अमर अकबर अँथोनी, अशा ब्लॉकबस्टर सुपरहिट फिल्म दिल्या.
  • २६ जुलै १९८२ रोजी बंगलोर युनिव्हर्सिटी कॅम्पस मध्ये कुली फिल्मच्या शूटिंगच्या वेळी एक फायटिंग सीन करत असताना, त्यांचा अपघात झाला आणि त्यात त्यांच्या पोटाजवळ दुखापत झाली. त्यांना मुंबईत हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले, दुखापत एवढी गंभीर होती की, अमिताभ आता जगू शकणार नाही, अशी भीती निर्माण झाली. पण डॉक्टरांचे परिश्रम आणि लाखो चाहत्यांनी त्यांच्यासाठी केलेली प्रार्थना फळाला आली आणि अमिताभ जीवावर बेतलेल्या संकटातून सुखरूप बरे झाले. कुली सुपरहिट तर झाली, पण त्यावर्षीची सर्वात जास्त कमाई करणारी फिल्म ठरली.

अमिताभ बच्चन यांची राजकारणातील कारकीर्द

अमिताभ बच्चन यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८४ ते १९८७ अशी तीन वर्ष ते राजकारणात सक्रिय राहिले. पण तिथे आलेल्या वाईट अनुभवामुळे, राजकारणाला राम राम ठोकत ते पुन्हा सिनेमाकडे वळले.

अमिताभ बच्चन यांची टेलिव्हिजनमधील कारकीर्द

  • १९८८ साली आलेली शहेनशहा मुव्ही सुपरहिट झाली. पण त्यानंतर मात्र त्यांच्या फिल्म फारश्या चालल्या नाही. त्यांचे फिल्मी करिअर आता संपते कि काय ? असं वाटू लागलं, त्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड , ही प्रोडक्शन कंपनी स्थापन केली. पण ती इतकी फेल झाली की, त्यामुळे अमिताभ दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आले.
  • त्यावेळी त्यांच्याकडे त्यांच्या नोकरांना देण्यासाठी पैसे नव्हते. त्यांची रोजची लाईफ स्टाईल ते भागवू शकत नव्हते, एवढेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. सगळे रस्ते बंद झाले होते. अमिताभ यांच्या लाईफ मधला हा सर्वात कठीण काळ होता. त्यांच्याकडे त्यावेळी ना काम होतं, ना पैसे शिल्लक होते, हाच तो काळ होता, जेव्हा सगळेच म्हणायला लागले की, हा महानायक आता संपला. अशा कठीण परिस्थितीत ते यश चोप्रा यांच्याकडे काम मागायला गेले. आणि यश जी ने त्यांना मोहबते मध्ये एक रोल दिला.
  • काम तर मिळालं पण डोक्यावर प्रचंड कर्ज होतं. त्याचदरम्यान एक ऑफर त्यांच्याकडे आली. टीव्हीवर एक गेम शो करण्याची ऑफर, त्यावेळी बॉलीवूड मधला एकही मोठा ॲक्टर सिनेमा सोडून टीव्हीकडे वळण्याचा विचारही करू शकत नव्हता, पण अमिताभ यांनी ती रीस्क घेतली. कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. त्यांनी त्या शोसाठी स्टार प्लसला होकार कळवला. तो गेम शो होता केबीसी म्हणजेच कौन बनेगा करोडपती , केबीसीच्या प्रत्येक एपिसोडसाठी त्यांनी मोठी रक्कम घेतली.
  • याच कौन बनेगा करोडपतीने अमिताभ यांना छोट्या पडद्यावर मोठ्या पडद्यापेक्षाही, मोठा सुपरस्टार बनवले. दि. ०३ जुलै २००० रोजी केबीसीचा पहिला एपिसोड सुरू झाला आणि अमिताभ यांचे गेलेल ऐश्वर्या परत यायला सुरुवात झाली. केबीसीचे आज एवढे सीजन झाले, पण लोकांच प्रेम काही कमी झालं नाही. अमिताभ त्यांच्या सगळ्या कर्जातून बाहेर आले. ही त्यांची सेकंड इनिंग होती आणि या सेकंड इनिंग मध्ये ते पहिल्या इनिंग पेक्षाही मोठे सुपरस्टार म्हणून पुढे आले.

अमिताभ बच्चन यांच्या अलीकडील चित्रपटांचे वर्णन

पा, पिकू, पिंक, बागबान, अशा फिल्म्स त्यांनी केल्या. ज्या त्यांनी मेन स्ट्रीम रोल पासून जरा हटके काहीतरी नवीन करून दाखवलं आणि आज या वयातही अमिताभ बच्चन हेच हिंदी फिल्म इंडस्ट्रीतले सर्वात मोठे सुपरस्टार आहेत.

अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडकडे भले एक फार मोठे अपयश म्हणून हे जग बघत असेल, पण याच मोठ्या अपयशातून पुन्हा कसं उभं राहायचं आणि यश कसं खेचून आणायचं यासाठी अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि अमिताभ यांचं उदाहरण सगळ्यांच्या नक्कीच प्रेरणादायी आहे.

अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध चित्रपट

१९७९काला पत्थर
१९७१आनंद
१९८४शराबी
१९७५शोले
१९७३जंजीर
१९८३कुली
१९९२ खुदा गवाह
२०००मोहबत्ते
१९७८डॉन
२००१कभी ख़ुशी कभी गम
२००९ पा
२०१८नॉट आउट 102
१९९०शोले
१९८१दोस्ती

अमिताभ बच्चन यांची ब्रँड अॅम्बेसेडर लिस्ट

  • कल्याण ज्वेलर्स
  • मारुती सुझुकी कार
  • नवरत्न तेल
  • तनिष्क
  • कॅडबरी
  • आयसीआयसीआय बँक
  • गुजरात टुरीजम
  • पल्स पोलिओ

अमिताभ बच्चन यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी

फिल्मफेअर पुरस्कारअमर अकबर अँथनी
फिल्मफेअर पुरस्कारआनंद
फिल्मफेअर पुरस्कारडॉन
फिल्मफेअर पुरस्कारनमक हराम
शक्ती पुरस्कारमिली
विशेष पुरस्कारमिली
समीक्षक पुरस्कारपिंक
स्टार स्क्रीन पुरस्कारपा
जीवनगौरव पुरस्कारशोले
रौप्य कमळ पुरस्कारशोले
फिल्मफेअर पुरस्कारकालिया
फिल्मफेअर पुरस्कारपा

अमिताभ बच्चन: नागरी पुरस्कार

1- पद्मश्री– 1984 मध्ये भारत सरकारकडून भारताचा चौथा-सर्वोच्च नागरी पुरस्कार.

2- 1991 मध्ये अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतीतर्फे ऑर्डर ऑफ अफगाणिस्तान. 

3- पद्मभूषण– 2001 मध्ये भारत सरकारकडून भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान.

4- नाइट ऑफ द लीजन ऑफ ऑनर– 2007 मध्ये “सिनेसृष्टी आणि त्यापुढील जगातल्या अपवादात्मक कारकिर्दीसाठी फ्रान्स सरकारकडून फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान. 

5- पद्मविभूषण– 2015 मध्ये भारत सरकारकडून भारताचा दुसरा-सर्वोच्च नागरी सन्मान.

अमिताभ बच्चन: मानद डॉक्टरेट

1- 2004 मध्ये भारताच्या झाशी विद्यापीठाने मानद डॉक्टरेट.

2- 2006 मध्ये त्यांच्या अल्मा मॅटर युनिव्हर्सिटी ऑफ दिल्ली, भारताने मानद डॉक्टरेट पदवी.

3- 2006 मध्ये यूकेमधील लीसेस्टर येथील डी मॉन्टफोर्ट विद्यापीठाने डॉक्टर ऑफ आर्ट्सची मानद पदवी.

4- युनिव्हर्सिटी ब्रॅंडन फॉस्टर द्वारे यॉर्कशायर, यूके येथील लीड्स मेट्रोपॉलिटन युनिव्हर्सिटी द्वारे 2007 मध्ये डॉक्टर ऑफ आर्ट्सची मानद पदवी.

5- 2011 मध्ये ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथील क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीने मानद डॉक्टरेट.

6- 2013 मध्ये भारताच्या जोधपूर राष्ट्रीय विद्यापीठाने मानद डॉक्टरेट. 

7- 2015 मध्ये प्रतिष्ठित कला अकादमी (इजिप्त) कडून मानद डॉक्टरेट. 

8- रवींद्र भारती विद्यापीठ, भारत कडून 2018 मध्ये मानद डॉक्टरेट. 

इतर पुरस्कार

पुरस्कारजिंकलेल्या पुरस्कारांची संख्या
स्क्रीन अवॉर्ड्स११
बॉलीवूड चित्रपट पुरस्कार
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार
नागरी पुरस्कार
मानद डॉक्टरेट
आयफा पुरस्कार
फिल्मफेअर पुरस्कार१५
राष्ट्रीय सन्मान१२
आशियाई फिल्मफेअर पुरस्कार
इंडियन टेली अवॉर्ड्स
भारतीय दूरदर्शन पुरस्कार
बिग स्टार एंटरटेनमेंट अवॉर्ड्स
आंतरराष्ट्रीय पुरस्कार१६
मोठे दूरदर्शन पुरस्कार
अप्सरा फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्यूस गिल्ड अवॉर्ड्स
इंडियन टेलिव्हिजन अकादमी पुरस्कार
स्टारडस्ट पुरस्कार१२
स्टार परिवार पुरस्कार

अमिताभ बच्चन: राष्ट्रीय सन्मान

1- 1980 मध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून अवध सन्मान. 

2- यश भारती– 1994 मध्ये उत्तर प्रदेश सरकारकडून उत्तर प्रदेशचा सर्वोच्च सन्मान. 

3- दयावती मोदी पुरस्कार– 2002 मध्ये कला, संस्कृती आणि शिक्षण क्षेत्रातील भारतातील सर्वोच्च पुरस्कारांपैकी एक. 

4- 2002 मध्ये मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय किशोर कुमार पुरस्कार.

5- FICCI द्वारे 2004 मध्ये लिव्हिंग लिजेंड पुरस्कार. 

6- 2005 मध्ये दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. 

7- 2009 मध्ये IIFA-FICCI फ्रेम्स द्वारे दशकातील सर्वात शक्तिशाली मनोरंजन करणारा पुरस्कार.

अमिताभ बच्चन यांचे उत्पन्न

वार्षिक उत्पन्नएक हजार कोटी
ब्रँडच्या भूमिकेसाठी५० दशलक्ष
चित्रपटातील भूमिकांसाठी २०० दशलक्ष
बँक बॅलन्सअंदाजे आठ हजार कोटी
आयकरऐंशी कोटी
देणग्यांसाठीदोन कोटी

अमिताभ बच्चन यांच्या आवडी

आवडता गायकलता मंगेशकर आणि किशोर कुमार
आवडता खेळक्रिकेट
आवडता रंगपांढरा
आवडती कारबीएमडब्ल्यू, मर्सिडीज
आवडते क्रिकेटपटूयुवराज सिंग, हरभजन सिंग
आवडती मिष्टान्नजिलेबी, खीर, गुलाब-जामुन, भेंडीची भाजी
आवडती अभिनेत्रीवहिदा रहमान
नेट वर्थएक हजार कोटी (वर्ष २०१८ मध्ये)
आवडता अभिनेतादिलीप कुमार
आवडते ठिकाणलंडन, स्वित्झर्लंड

अमिताभ बच्चन यांनी लिहिलेल्या चार अतिशय सुंदर ओळी

“परिवर्तन इस मनुष्य जीवन की प्रकृति है,

जिसमे चुनौती इस जीवन का भविष्य है.

इसलिये परिवर्तनों को चुनौती दे,

लेकिन उन चुनौतीयों को कभी ना बदले.”

अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील मनोरंजक तथ्य

  • अमिताभ बच्चन हे त्यांच्या तत्त्वावर ठाम असून, अतिशय वक्तशीर व योग्य वेळेनुसार आपले जीवन जगतात.
  • अमिताभ यांना काळानुसार बदलायला आवडते. त्यामुळे ते त्यांच्या राहणीमानाची सुद्धा पुरेपूर काळजी घेतात व खूप स्टायलिश तसेच ट्रेंडी लुक मध्ये सुद्धा सर्वांसमोर येण्यास ते अधिक पसंती दर्शवतात.
  • एका काळामध्ये अमिताभ बच्चन यांच्या जड आवाजामुळे, त्यांना ऑल इंडिया रेडिओ मध्ये नाकारले होते. तोच अमिताभ बच्चन यांचा आवाज आज संपूर्ण देशामध्ये व विदेशामध्ये प्रसिद्ध आहे.
  • आपल्या चित्रपट कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात चित्रपट कलाकार मेहमूदने त्यांना खूप मदत केली, त्यांना खूप काही शिकवले आणि छोट्या छोट्या गोष्टी,बारकावे सांगितले.
  • गुजरात पर्यटनाला चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सांगण्यावरून, अमिताभ बच्चन हे गुजरातचे ब्रँड अँबेसिडर बनले. ज्यासाठी त्यांनी एक रुपया शुल्क सुद्धा आकारला नाही ते त्यांनी पूर्णपणे विनामूल्य केले.
  • “यह खुद को एक बार यह जरुर बोलते है “हर किसी को यह स्वीकार करना चाहिये हम उम्र है ना कि हम उम्र के गुलाम है.” ही खूप मोठी गोष्ट आहे जी त्यांनी आयुष्यात अंगिकारली आहे, एवढ्या वयातही ते स्वतःला कोणापेक्षा कमी समजत नाहीत. दररोज एक नवीन काम ते पूर्ण उत्साहाने करतात आणि कधीही हार मानत नाहीत.
  • अमिताभ बच्चन यांचा प्रसिद्ध बंगला जलसा हा अंधेरी जुहू या ठिकाणी आहे. दर रविवारी ते त्यांच्या बंगल्याच्या बाहेर उभे राहून त्यांच्या चाहत्यांना अभिवादन करतात.
  • कुली चित्रपटाचे शूटिंग करताना, अमिताभ बच्चन यांच्या पोटाला दुखापत झाली. त्यामुळे अमिताभ बच्चन हे खूप घायाळ झाले. असंख्य चहात्यांच्या प्रार्थनेने अमिताभ बच्चन मरणाच्या दारावरून परत आले.
  • त्यांची स्मरणशक्ती खूप तीक्ष्ण आहे, ते त्यांच्या जवळच्या लोकांचे वाढदिवस कधीच विसरत नाहीत, ते नेहमीच त्यांचे अभिनंदन करण्यासाठी वेळ काढतात.
  • त्यांना लहानपणापासूनच वाचनाची आणि लेखनाची आवड होती, जी आजही कायम आहे, त्यामुळे त्यांना पेन संग्रहाची खूप आवड आहे. ही सवय त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली आहे.
  • अमिताभ बच्चन हे पहिले आशियाई अभिनेता आहे, ज्यांचे वॅक्स मॉडेल लंडनच्या मादाम तुसाद मध्ये ठेवण्यात आले आहे.
  • खुदा गवाहच्या शूटिंगदरम्यान अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या देशाचे अर्धे हवाई दल तैनात केले होते, हा क्षण स्वतःच ऐतिहासिक होता.
  • 1995 मध्ये झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेचे ते एकमेव न्यायाधीश होते.
  • लॉरेन्स ऑलिव्हर, चार्ली चापलीन, यांसारख्या मोठ्या व्यक्तीं व्यतिरिक्त बीबीसी ऑनलाईन ने अमिताभ बच्चन यांची स्टार ऑफ मिलेनियम म्हणून निवड केली आहे.
  • अमिताभ हे महत्त्वाकांक्षी आहेत, ते दोन्ही हातांनी लिहू शकतात आणि यासोबतच त्यांना अभ्यासात खूप रस होता. त्यांना इंजिनियर व्हायचे होते. तसेच दुसरा पर्याय म्हणून त्यांनी भारतीय हवाई दलात भरती होण्याचा विचार देखील केला होता.

अमिताभ बच्चन यांचा वाद

एबीसीएल कंपनी प्रकरण

१९९९ च्या दरम्याने अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेडची स्थापना झाली. यानंतर या कॉर्पोरेशनची कामे सुरू झाली. परंतु, कंपनीचा बाजारामध्ये चांगला परिणाम दिसून आला नाही व कंपनीला तोट्यामध्ये जावे लागले. यामुळे एबीसीएल कंपनी दिवाळखोर घोषित करण्यात आली. या कंपनीतील तोट्यामुळे लोकांचा पैसा हा बुडला व काम करणाऱ्या मजुरांनाही योग्यरित्या मजुरी मिळाली नाही. त्यामुळे अमिताभ बच्चन यांची प्रतिमा डागाळली होती.

पनामा पेपर वाद

१९९३ मध्ये पनामा पेपर वादामध्ये अमिताभ बच्चन यांचे सर्वप्रथम नाव आले. ज्यामध्ये अमिताभ बच्चन हे परदेशी शिपिंग कंपन्यांमध्ये, संचालक पदावर कार्यरत असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु अमिताभ बच्चन या आरोपावर प्रतिउत्तर करून, आपण या आरोपाला पात्र ठरत नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा वाद अजूनही सुरूच आहे.

अमिताभ बच्चन यांचे अफेयर्स

८० च्या दशकामधील अमिताभ बच्चन हे सर्वांच्या लाडकीचे अभिनेता होते. लग्न अगोदर अमिताभ बच्चन यांचे नाव तीन अभिनेत्रींसोबत जोडले गेले.

परवीन बॉबी

अमर अकबर अँथनी, नमक हलाल, यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांनी परवीन बॉबी यांच्यासोबत काम केले. यानंतर मीडिया मधून अमिताभ बच्चन व परवीन बॉबी यांच्या अफेअर्सची चर्चा सुरू झाली.

झीनत अमान

यानंतर अमिताभ बच्चन यांचे झीनत अमान सोबत नाव जोडले गेले. परंतु अमिताभ बच्चन यांनी ते कधीही स्वीकारले नाही. ही केवळ अफवा असल्याचे, अमिताभ बच्चन यांनी स्पष्ट केले.

रेखा

यानंतर अमिताभ बच्चन यांचे नाव अभिनेत्री रेखा हिच्यासोबत जोडले गेले. जे रिलेशन खरे असल्याची बातमी मीडियांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली गेली. अमिताभ बच्चन दो अजनबी सेटवर रेखाला पहिल्यांदा भेटले होते. या दोघांची जोडी संपूर्ण बॉलीवूड सृष्टीत सर्वात आवडती जोडी म्हणून ओळखली जात असे. हळूहळू रेखा व अमिताभ यांची मैत्री अतिशय घट्ट झाली. यामुळे मीडियाद्वारे अमिताभ व रेखाच्या अफेयर्स चर्चा सुरू झाली.

अमिताभ बच्चन यांचे विचार

  • सच कहता हूँ मैंने कभी खुद को एक महान नायक या एक आइकॉन के रूप में नहीं लिया | मैंने बस यही सोच कर हर काम किया हैं कि मुझे अपना हर एक काम पूरी योग्यता के साथ करना हैं |
  • भारत के नायक/नायिका हॉलीवुड के नायक नायिका से ज्यादा अच्छे हैं क्यूंकि जिस तरह की भारत की फिल्मे हैं उनके लिए किसी भी भारतीय अभिनेता/अभिनेत्री को एक्टिंग, डांसिंग, गायिकी के साथ- साथ कहानी के अनुसार एक्शन आना जरुरी होता हैं |इस तरह एक नायक को बहुत कुछ आना जरुरी हैं |
  • मैंने जिन्दगी में कुछ आश्चर्यजनक पल देखे हैं जिसमे हमारे साथ कुछ अलग अनुभव होते हैं इसलिए मुझे आश्चर्य नहीं कि मैं धार्मिक बन गया क्यूंकि तुम नहीं जानते कभी कभी तुम्हारे साथ क्या होता हैं और किस तरह तुम पीछे की तरह आ जाते हो |
  • हर व्यक्ति को यह स्वीकार करना चाहिए कि हम सबकी उम्र बढ़ेगी और अधिक उम्र हमेशा उड़ान नहीं भरती अर्थात सुखद नहीं होती |
  • वास्तव में, मैं अपने काम के किसी भी स्तर पर अपने करियर के बारे में आश्वस्त नहीं हूँ |
  • मैं सिनेमा बनाने वाले एक ऐसे समूह को चयन करता हूँ जो यथार्थवादी सीनेमा बनाते हैं जो पश्चिमी सदस्यों को ध्यान में रखकर फ़िल्म बनाते हैं ऐसे बहुत कम हैं |
  • मैं कोई तकनीक का इस्तेमाल नहीं करता हूँ ना मैं मैंने अभिनय का शिक्षण लिया हैं मैं अपने काम को ख़ुशी से करता हूँ |
  • टीवी मीडिया और वेन्स जो मेरे घर के बाहर हैं कृपया इतना ज्यादा तनाव में रहकर ऐसे कठिन परिश्रम ना करें |. 
  • मैंने बोफोर्स कांड के कारण राजनीति नहीं छोड़ी | मैंने राजनीति इसलिए छोड़ी क्यूंकि मुझे ओछी राजनीति करते नहीं आता| ना मुझे इस राजनीति से वापस लौटना आता था और शायद अब तक नहीं आता |
  • मुझे कई बार यह सोच कर दुःख होता हैं कि मेरे पास पूरी तरह से रोग मुक्त शरीर नहीं  है |

अमिताभ बच्चन यांचा व्हिडीओ

FAQ

अमिताभ बच्चन चा जन्म कुठे झाला?

अमिताभ यांचा जन्म दि. ११ ऑक्टोबर १९४२ रोजी उत्तर प्रदेश मधल्या अलाहाबाद येथे झाला.

अमिताभ बच्चन यांचा पहिला चित्रपट कधी होता?

१९६९ सालची के अब्बास निर्देशित सात हिंदुस्तानी या फिल्म साठी अमिताभ बच्चन यांना बेस्ट न्यू कमर नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला होता.

अमिताभ यांना राष्ट्रीय पुरस्कार किती वेळा मिळाला?

अमिताभ यांना राष्ट्रीय पुरस्कार ५ वेळा मिळाले.

अमिताभ बच्चन का प्रसिद्ध आहेत?

कोणत्याही विपरीत परिस्थितीत आपल्यातल्या गुणांवर विश्वास ठेवून आणि देवाने आपल्याला जे काही दिले, त्याचा सकारात्मकरित्या पुरेपूर उपयोग करून, आयुष्यात यशस्वी कसं होता येतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे महानायक अमिताभ बच्चन.

अमिताभ यांचे वडिल कोण होते ?

अमिताभ यांच्या वडिलांचे नाव होतं हरिवंशराय. हरिवंशराय हिंदीतले सुप्रसिद्ध कवी होते.

अमिताभ बच्चन यांना मिळालेले पुरस्कार कोणते ?

भारत सरकारने १९८४ साली पद्मश्री २००१ साली पद्मभूषण आणि २०१५ साली पद्मविभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. २०१८ सालचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊ गौरव करण्यात आला. जो सिनेमातला सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याचबरोबर अनेक देशी आणि विदेशी पुरस्कारानी अमिताभ बच्चन यांचा गौरव करण्यात आला आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस अमिताभ बच्चन यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment