क्रिस्टीयानो रोनाल्डो माहिती मराठी Cristiano Ronaldo Information In Marathi

ग्रेटनेस मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. युरोप अमेरिके सह संपूर्ण जगातला सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचे एक स्टार खेळाडू, जे जगातले सर्वात लोकप्रिय आणि महागडे खेळाडू तर आहेतच, पण त्याचबरोबर जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते.

फुटबॉलच्या मैदानावर आपल्या अप्रतिम खेळाचा प्रदर्शन करत, त्यांनी स्वतःला आज ज्या उंचीवर नेऊन ठेवले, तिथे पोहोचणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, मग तो खेळ कोणताही का असेना, त्या प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूचे नाव आहे क्रिस्टीयानो रोनाल्डो.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास क्रिस्टीयानो रोनाल्डो यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती व लेख जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

क्रिस्टीयानो रोनाल्डो माहिती मराठी Cristiano Ronaldo Information In Marathi

नाव क्रिस्टीयानो रोनाल्डो डॉस सॅटोंस एवेरो
जन्म तारीख दि. ०५ फेब्रुवारी १९८५
जन्म स्थळ फंचल वाईन
प्रसिद्धी स्ट्रायकर
राष्ट्रीयत्व सॅटोअँटोनियो
व्यवसायपोर्तुगीज व्यावसायिक फुटबॉलपटू
कोणत्या संघासाठी खेळतोस्पॅनिश क्लब रियल मद्रिद पोर्तुगाल राष्ट्रीय संघ
आईचे नाव मारिया डॉस सॅटोंस एवेरो
वडिलांचे नाव डॉस सॅटोंस एवेरो

कोण आहे क्रिस्टियानो रोनाल्डो ?

फुटबॉल म्हटलं की, सर्वात आधी ओठांवर नाव येते ते म्हणजे, क्रिस्टियानो रोनाल्डो. फुटबॉल च्या विश्वात जगातील सर्वात उत्तम खेळाडू म्हणून क्रिस्टियानो रोनाल्डो ची ओळख आहे.

हे वाचा –

पूर्ण विश्वात त्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाने नाव कमावले. त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांनी अगदी लहानपणापासूनच फुटबॉल खेळायला सुरुवात केली. त्यांना या खेळात आवड निर्माण झाली आणि त्यांनी पुढे फुटबॉल वरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

Cristiano Ronaldo Information In Marathi

क्रिस्टियानो रोनाल्डो अगदी गरीब परिस्थिती मधून वर आले आहेत. क्रिस्टियानो रोनाल्डो एका लहान घरांमध्ये राहायचे आणि एक खोली त्यांच्या बहिण भावासोबत शेअर करावी लागायची. क्रिस्टियानो रोनाल्डो याने फुटबॉल मध्ये अनेक रेकॉर्ड बनवलेले आहेत.

फुटबॉल मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे करिअर एवढे मोठे आहे की, असा कुठलाच अवार्ड नाही तो त्यांनी मिळवला नसेल. त्यांची मेहनत, संघर्ष आणि जिद्द हि तेवढीच मोठी आहे, जेवढे मोठे त्यांचे यश आहे.

क्रिस्टीयानो रोनाल्डो यांचा जन्म व प्रारंभिक जीवन

क्रिस्टीयानो रोनाल्डोचे पूर्ण नाव आहे, क्रिस्टीयानो रोनाल्डो डॉस सॅटोंस एवेरो. क्रिस्टीयानोचा जन्म दि. ०५ फेब्रुवारी १९८५ रोजी पोर्तुगालच्या एका बेटावरल्या फंचल वाईन शहरात झाला.

त्यांचे वडील डॉस सॅटोंस एवेरो नगरपालिकेत बांधकाम करायचे आणि आई मारिया डॉस सॅटोंस एवेरो एक गृहिणी होत्या. या दांपत्याला दोन मुलं आणि दोन मुली अशी चार अपत्य होती. रोनाल्डो सर्वात लहान एका छोट्याशा खोलीत राहायचे.

रोनाल्डो चे वडील खूप दारू प्यायचे, एकतर घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची, दारूच्या पूर्णपणे आहारी गेलेले पती आणि त्यात पदरात तीन मुलं, अशा भवऱ्यात सापडल्यामुळे रोनाल्डो च्या वेळी गरोदर असताना त्यांच्या आईने गर्भपात करून घ्यायचा निर्णय घेतला होता, पण डॉक्टरांनी तसं करायला नकार दिला आणि रोनाल्डो चा जन्म झाला.

क्रिस्टीयानो रोनाल्डोची फुटबॉल क्षेत्राकडे समर्पण

अटलांटिक समुद्रांने वेढलेल्या ज्या बेटावर ते राहायचे, तिथली जनता खूप गरीब होती. तिथला सगळ्यांचा आवडता खेळ अर्थातच फुटबॉल. तिथे लहान मुलं दिवसभर खेळायची, त्यांच्याकडे बॉल तर नसायचा, पण बॉल सारखं काहीतरी घेऊन ते खेळत राहायची.

Cristiano Ronaldo Information In Marathi

त्यामुळे लहानपणीच रोनाल्डो ही फुटबॉलकडे आकर्षित झाले. ते ही त्या मुलांसोबत संपूर्ण दिवस फुटबॉल खेळण्यात घालवायचे. फुटबॉल त्यांच्या डोक्यात असा काही गेला की, रात्रंदिवस फक्त फुटबॉल आणि फुटबॉलच त्यांच्या डोक्यात फिरत राहायचा.

फुटबॉल खेळल्यामुळे सगळ्यांना कळून चुकलं की, रोनाल्डो एक जबरदस्त फुटबॉल प्लेयर आहे. क्रिस्टीयानो रोनाल्डो यांच्यातील टॅलेंट बघून अँड्रॉइन्हा नावाच्या एका लोकल क्लब ने, त्यांना सपोर्ट केला आणि टीम मध्ये घेतलं.

१९९२ ते १९९५ ही तीन वर्ष हे अँड्रॉइन्हा क्लब कडून खेळले, तर पुढची दोन वर्ष म्हणजे १९९७ पर्यंत ते शहरातल्या मोठ्या नॅशनल क्लब कडून खेळले.

या दोन क्लब कडून खेळताना, रोनाल्डोनी असा काही जबरदस्त परफॉर्मन्स दिला की, रोनाल्डोने एक प्रोफेशनल फुटबॉल प्लेयरच व्हाव हे बाहेरच्या लोकांचच नाही तर, घरातल्यांच सुद्धा ठाम मत झाल.

क्रिस्टीयानो रोनाल्डो याने फुटबॉलसाठी शिक्षण अर्धवट सोडले

१९९७ साली वयाच्या बाराव्या वर्षी, त्यांनी पोर्तुगालच्या स्पोर्टिंग क्लब मध्ये आपली फुटबॉल ची ट्रायल दिली. त्यांचा खेळ बघून, स्पोर्टिंग क्लबने त्यांना पंधराशे पौंड देऊन साइन केलं.

त्यामुळे या क्लबच्या फुटबॉल अकॅडमीची ट्रेनिंग घेण्यासाठी त्यांना घर सोडून, पोर्तुगालची राजधानी लेसबंड मध्ये जावं लागलं.

Cristiano Ronaldo

लेसबंड जाताना त्यांना खूप वाईट वाटलं ते खूप रडले, पण घरच्यांनी त्यांची समजूत काढली आणि ते ट्रेनिंग साठी गेले. तिथे ट्रेनिंग मध्ये त्यांनी स्वतःला अक्षरशः झोकून दिल. प्रचंड मेहनत घेतली. स्वतःच्या अनेक फुटबॉल स्किल्स डेव्हलप केल्या.

वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांना स्वतःच्या खेळाबद्दल इतका जबरदस्त आत्मविश्वासाला की, फुटबॉल वर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून देण्याच्या निर्णय त्यांनी घेतला. त्याबद्दल त्यांनी आईलाही विचारल, आपल्या मुलाचा प्रचंड आत्मविश्वास आणि त्याची मेहनत बघून रोनाल्डोच्या आईने हि त्यांना संमती दिली.

क्रिस्टीयानो रोनाल्डो यांच्या आयुष्यतील संघर्षाचा काळ

रोनाल्डो पंधरा वर्षांचे असताना त्यांच्या आयुष्यात एक अत्यंत वाईट घटना घडली, त्यांना हार्टशी रिलेटेड असलेला रेसिंग हार्ट हा आजार झाला. डॉक्टरांनी त्यांना जास्त धावपळ करायला मनाई केली, पण रोनाल्डो याला दुःख तेव्हा झालं, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना फुटबॉल कायमचं सोडून द्याव लागेल असं सांगितलं.

क्रिस्टीयानो रोनाल्डो

त्यावेळी रोनाल्डोकडे केवळ दोनच पर्याय होते, एक म्हणजे फुटबॉल कायमचं सोडून द्यायचं आणि दुसरा म्हणजे एक अतिशय रिस्की सर्जरी करून घ्यायची, ज्यात त्यांचा जीवही जाऊ शकणार होता. फुटबॉल खेळणे म्हणजे रोनाल्डोचा श्वास होता.

फुटबॉल शिवाय ते जगू शकणार नव्हते त्यांनी हार्ट सर्जरी करण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि काही दिवसांच्या विश्रांती नंतर नव्या जोमाने पुन्हा मैदानात उतरुन फुटबॉल खेळायला रोनाल्डो सज्ज झाले.

क्रिस्टीयानो रोनाल्डो यांच्या फुटबॉल क्षेत्रास मिळाले नवे वळण

वयाच्या सोळाव्या वर्षी स्पोर्टिंग क्लब टीमकडून रोनाल्डोला पुढे खेळण्यासाठी प्रमोट करण्यात आलं. त्यामुळे एखाद्या क्लब कडून अंडर १६, अंडर १७ आणि अंडर १८ मधून ते ही एकाच सीजन मध्ये खेळणारे ते पहिले फुटबॉल प्लेयर ठरले.

त्याच्या पुढच्याच वर्षी दि. २९ सप्टेंबर २००२ रोजी रोनाल्डोने प्रीमियर लीग मध्ये पदार्पण केलं. दि. ०७ ऑक्टोबर २००२ रोजी झालेल्या एका मॅच मध्ये अप्रतिम असे दोन गोल्स करत, क्रिस्टीयानो रोनाल्डो याने आपल्या टीमला ३ – ०, असं नेत्र दीपक विजय मिळवून दिला.

याच दोन गोष्टी मुळे क्रिस्टीयानो रोनाल्डो यांच्या करिअरला नवी दिशा मिळाली. कारण इंग्लंडच्या मँचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबचे मॅनेजर अलेक्स फर्ग्युसन यांनी रोनाल्डोचे टॅलेंट बरोबर हेरलं आणि १२.२४ मिलियन पौंड देऊन क्रिस्टीयानो रोनाल्डो यास साइन केले.

क्रिस्टीयानो रोनाल्डो यांचे फुटबॉल करियर

मँचेस्टर युनायटेड करून खेळणारे क्रिस्टीयानो रोनाल्डो हे पहिलेच पोर्तुगीज खेळाडू होते आणि त्याचबरोबर इंग्लिश फुटबॉलच्या इतिहासातले ते सर्वात महागडे किशोरवयीन खेळाडू ही होते.

मँचेस्टर युनायटेड कडून खेळताना येथे FA CUP, ३ प्रीमियर लीग टायटल्स, एक चॅम्पियन्स लीग आणि मग फिफा क्लब वर्ल्ड कप, अशा स्पर्धा मँचेस्टर युनायटेड ला जिंकून देण्यात, क्रिस्टीयानो रोनाल्डो यांचा सिंहाचा वाटा होता.

२००३ पासून २००९ सालापर्यंत ते मँचेस्टर युनायटेड कडून खेळले २००९ साली स्पेनच्या रियल मॅट्रिक क्लब ने मँचेस्टर युनायटेड ला ८० मिलियन पौंड देऊ रोनाल्डोना आपल्या टीम मध्ये घेतलं. इतकी मोठी रक्कम त्यापूर्वी कोणत्याही खेळाडूसाठी मोजण्यात आलेली नव्हती. त्यामुळे अर्थातच वयाच्या २४ व्या वर्षी क्रिस्टीयानो रोनाल्डो हे जगातले सर्वात महागडे खेळाडू ठरले.

रियल मॅट्रेट क्लब कडून, खेळतानाही त्यांनी त्यांचा करिष्मा दाखवत, १५ ट्रॉफी जिंकून आणल्या. २०१८ साला पर्यंत ते रियल मद्रिद पोर्तुगाल राष्ट्रीय संघ क्लब कडून खेळले.

२०१८ मध्ये या क्लब ने त्यापूर्वी कोणत्याही खेळाडूसाठी इतकी मोठी रक्कम खर्च केली नव्हती, इतकच काय तर जगातल्या कोणत्याही क्लब ने वयाची ३० शी पार केलेल्या खेळाडूसाठी दिलेली ही आजवरची सर्वात मोठी किंमत होती.

तिथेही रोनाल्डोच्या यशाचा आलेख चढताच राहिला. एक टॉप क्लास फुटबॉल प्लेयर म्हणून क्रिस्टीयानो रोनाल्डो यांना जगात मान्य आहे. त्यांची लोकप्रियता इतकी आहे की, जगभर त्यांचे लाखो चाहते आहेत.

पाच वेळा चॅम्पियन्स लीग ट्रॉफी जिंकणारे ते पहिले फुटबॉल प्लेयर आहेत. पोर्तुगालच्या टीमचे ते कॅप्टन राहिले होते. पोर्तुगीज फुटबॉल फेडरेशन ने २०१५ साली बेस्ट पोर्तुगीज प्लेयर ऑफ ऑल टाइम हा किताब देऊन, त्यांचा गौरव केला.

टाईम मॅक्झिन ने २०१४ सालच्या १०० मोस्ट इन्फ्लुन्येन्श्ल पीपल इन द वर्ल्ड मध्ये क्रिस्टीयानो रोनाल्डो यांचा समावेश केला.

फोर्ब्सने २०१६ आणि २०१७ सालच्या वर्ल्डस हायेस्ट पेड अथलेटच्या लिस्टमध्ये क्रिस्टीयानो रोनाल्डो यांचा समावेश केला. ESPN कडून २०१६ ते २०१९ ही चार वर्षे क्रिस्टीयानो रोनाल्डो वर्ल्डस मोस्ट फेमस अथलेट राहिले.

आपल्या करिअरमध्ये एक बिलियन डॉलर्स पेक्षा ही जास्त संपत्ती कमावणारे, क्रिस्टियानो रोनाल्डो हे जगातले पहिले फुटबॉल प्लेयर आहे आणि प्रचंड पैसा मिळवूनही आज समाज कल्याणासाठी त्यातला बरासचा पैसा ते खर्च करतात. वर्ल्ड मोस्ट CHARITEBAL स्पोर्ट्स पर्सन अशीही क्रिस्टियानो रोनाल्डो यांची ओळख आहे.

क्रिस्टीयानो रोनाल्डो यांचे सामाजिक कार्य

२०१५ साली नेपाळमध्ये झालेल्या भूकंपात आठ हजार माणसं मारली गेली आणि शेकडे घर उध्वस्त झाली. रोनाल्डोने त्यांच्या पुनर्वसनासाठी पाच मिलियन पौंड इतकी मोठी मदत केली.

२०१२ साली क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी त्यांच्या गोल्डन बूटचा लिलाव केला. त्यातून आलेले १.२ मिलियन पौंड  त्यांनी गाजा मध्ये शाळांच्या बांधकामासाठी दिले.

क्रिस्टियानो रोनाल्ड अनाथाश्रम चालवतात. जात ६०० पेक्षाही जास्त मुलांचा संपूर्ण खर्च ते स्वतः उचलतात.

त्याचप्रमाणे क्रिस्टियानो रोनाल्डो नियमितपणे रक्तदान ही करतात.

हार्ट सर्जरीसाठी त्यांनी त्यावेळी हिम्मत दाखवली नसती आणि त्यातून बरे झाल्यावर नव्या उमेदीने मेहनत केली नसती, तर आजचे क्रिस्टियानो रोनाल्डो जगाला दिसलेच नसते.

हा लेख फक्त फुटबॉल प्रेमींसाठी नसून, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, ज्याला आपल्या क्षेत्रात काहीतरी मोठ करून दाखवायचे आहे. अपयश पचवून नव्या उमेदीने मेहनत केली, तरच ग्रेटनेस पणा येतो, कारण तो मिळवायला कोणताही शॉर्टकट नसतो.

क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे प्रेरणादायी विचार

क्रिस्टियानो रोनाल्डो हे एवढे महान आहेत ह्या महान खेळाडूचे विचारही तेवढेच महान आहेत. तर आज या लेखाद्वारे आपण जगातील सर्वोत्तम फुटबॉलर क्रिस्टियानो रोनाल्डोचे प्रेरणादायी सुविचार बघणार आहोत. त्यांच्या यशाचे रहस्य या विचारांमध्ये तुम्हाला शिकायला मिळेल.

 • मी स्वतःला जगातील सर्वोत्तम फुटबॉलर म्हणून पाहतो, जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल की, तुम्ही सर्वोत्कृष्ट आहात तर, तुम्ही जे करण्यासाठी सक्षम असाल, ते तुम्ही कधीही मिळू शकणार नाही.
 • मी एक स्वप्न जगत आहे, ज्यातून मला कधीही जागे व्हायचे नाही आहे.
 • लोकांचा तिरस्कार मला वाईट वाटत नाही, त्यांचा तिरस्कार मला प्रेरणा देतो.
 • माझ्या वडिलांनी मला नेहमी शिकवले की, जेव्हा तुम्ही इतरांना मदत करता, तेव्हा देव तुम्हाला दुप्पट देतो, माझ्या बाबतीत हेच घडलेल आहे, जेव्हा मी इतर गरजू लोकांना मदत केली आहे, तेव्हा देवाने मला अधिक मदत केलेली आहे.
 • जेव्हा आपण आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती गमावतो, तेव्हा त्या व्यक्तीला गमावण्याचे नुकसान घेऊन जीवन जगणे खूप कठीण असते.
 • अनेक लोक माझ्याकडे बघतात आणि त्यांना वाटते की, ते मला ओळखतात, पण ते मला अजिबात ओळखत नाहीत. मी एक नम्र आणि भावूक व्यक्ती आहे, असा व्यक्ती जो इतरांची काळजी करतो, ज्याला इतरांची मदत करायची इच्छा आहे.
 • जिंकणे हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे.
 • मला वाटते की कधी कधी फक्त आराम करणे हीच सर्वोत्तम ट्रेनिंग असते.
 • असे अनेक लोक आहेत जे माझा तिरस्कार करतात, ते मला गर्विष्ठ आणि खूप काही म्हणतात, हे सर्व माझ्या यशाचाच एक भाग आहे. मी सर्वोत्तम बनण्यासाठीच बनलो आहे.
 • मी जग बदलणार नाही आहे किंवा तुम्ही जग बदलणार नाही आहात, पण आपण सर्वजण जग बदलण्यासाठी मदत करू शकतो.
 • खोटं का बोलायचं, मी ढोंगी बनणार नाही आहे आणि मला जे वाटते, त्याच्या उलटही बोलणार नाही आहे. जशी इतर लोक नेहमी करतात, माझ्यातही दोष आहेत, पण मी एक प्रोफेशनल आहे, ज्याला चुकणे किंवा हारणे आवडत नाही.
 • फुटबॉल मध्ये मला जास्त मित्र नाही आहेत, मी ज्यांच्यावर खरोखर विश्वास ठेवतो, अशा लोकांची संख्या जास्त नाही, बहुतेक वेळा मी एकटाच असतो.
 • इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात, या विचारात आपण जगू शकत नाही, असे जगणे अशक्य आहे. देव सुद्धा संपूर्ण जगाला संतुष्ट करू शकला नाही.
 • मला सातत्याने चांगले खेळायचे आहे आणि टायटल जिंकायचे आहेत, ही तर माझी फक्त सुरुवातच आहे.
 • तुमचे प्रेम मला मजबूत बनवते आणि तुमचा द्वेष मला अनस्टॉपेबल बनवते.
 • मला शिकण्याची, सुधारण्याची आणि विकसित करण्याची गरज आहे. फक्त कोच ला किंवा फॅन्सला खुश करण्यासाठी नाही, तर स्वतःला समाधानी वाटण्यासाठी. आज अशा संधी आहेत ज्या भविष्यात पुन्हा येतील की नाही हे कोणालाही माहीत नाही.
 • जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू होण्याचे स्वप्न पाहण्यात काहीही वाईट नाही, सर्वोत्कृष्ट बनण्याचा प्रयत्न करणे, सर्व काही आहे. मी ते मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत राहील आणि ते माझ्या क्षमतेतही आहे.
 • आम्हाला आमची स्वप्न बोलून दाखवायची नाही आहेत, आम्हाला ती सत्यात उतरून दाखवायची आहेत.
 • सर्वोत्कृष्ट बनणे हा माझा हेतू आहे, हे मी कधीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही.
 • मी जेव्हाही बोलतो, तेव्हा लोकांच्या हातात दोन दगड असतात. मी संत नाही पण मी सैतानही नाही.
 • गोल करणे ही एक आनंद देणारी गोष्ट आहे. परंतु माझ्यासाठी टीमचे यशस्वी होणे, सर्वात महत्त्वाचे आहे. जोपर्यंत आपण जिंकत आहोत, तोपर्यंत गोल कोण करतो, त्याने फरक पडत नाही.
 • आपण जीवनाचा पुरेपूर उपयोग केला पाहिजे, आपण जीवनाचा आनंद घ्यावा, कारण जीवन हे आनंद घेण्यासाठीच आहे. माझा असा विश्वास आहे की, इथे शिकण्याला मर्यादा नाहीत. ते कधीही थांबू शकत नाही. मग आपले वय काहीही असो.
 • जर तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही आधीच परफेक्ट आहात, तर तुम्ही कधीही परफेक्ट बनणार नाही.
 • मी एक खेळाडू म्हणून जे करतो, ते केवळ तेव्हाच महत्वाचे असते, जेव्हा ते टीमला जिंकण्यास मदत करते, हीच सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
 • जर आपण आपल्या कुटुंबाची मदत करू शकत नाही, तर मग आपण कोणाला मदत करणार आहोत.
 • समर्पण आणि मेहनत हे सर्वोत्तम शब्द आहेत. या प्रकारचे यश मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तुमच्या कामाबद्दल सिरीयस राहा आणि मी सुद्धा हेच करण्याचा प्रयत्न करतो.
 • आपल्या सर्वांमध्ये टॅलेंट असते, पण कृतीशिवाय, कामाशिवाय, टॅलेंट काहीच नसते.
 • सर्वोत्तम खेळाडू नेहमी एका सर्वोत्तम खेळाडूच्या अनुसरण करत असतो, कारण त्यांनाही त्या खेळामध्ये सर्वोत्तम बनून राहायचे असते.
 • तुम्ही झोपू शकत नाही आणि आरामही करू शकत नाही, कारण तुम्ही आराम केला तर, ते तुमच्या समोर निघून जातील.
 • यशाचे कोणतेही रहस्य अस्तित्वात नाही आहे, जे अस्तित्वात आहे ते म्हणजे मेहनत, समर्पण.
 • जीवनात काहीतरी बनण्याची इच्छा ठेवा आणि आपले स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फुटबॉल प्लेअर बनायचे असेल, इंजिनियर बनायचे असेल, जे काही बनायचे असेल त्यासाठी स्वतःला समर्पित करा, मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा.
 • मी आज जेथे आहे, त्या पोझिशन वर राहण्यासाठी शंभर टक्के डेडिकेशनने मेहनत करतो. येथे पोहोचण्यासाठी आणि या स्थितीवर टिकून राहण्यासाठी, एक वर्ष नाही तर दहा ते बारा वर्षे लागलेली आहेत. तुम्हाला स्वतःला पूर्णपणे समर्पित करावे लागेल.
 • तुम्ही किती वेळ ट्रेनिंग करतात, त्याने फरक पडत नाही. तुम्ही कशा प्रकारे ट्रेनिंग करतात, हे महत्त्वाचे आहे. तुम्ही एकाच तासाची ट्रेनिंग करा, पण ते एका तासात स्वतःला पूर्णपणे झोकून द्या आणि हे मी माझ्यासाठी करतो.
 • तुम्हाला काम करावे लागेल, मेहनत करावी लागेल, मी हे रोज करतो, यामुळेच मी इतक्या वर्षांपासून टॉप लेव्हलवर आहे. हा काही योगायोग नाही आहे, मी पिच्या बाहेर अधिक मेहनत करतो.
 • जेव्हा मी बारा वर्षांचा होतो, तेव्हा मला लोक म्हणायचे की क्रिस्टीयानो तू खूप चांगला प्लेयर आहेस, पण तू खूप बारीक आहेस. मी हे मनावर घेतलं, आपण आपल्या शरीराला सुधारू शकतो, जिम मध्ये जाऊन, मेहनत करून, आपण आपले शरीर बदलू शकतो आणि मी तेच करून स्वतःला बदलले.
 • मी आज जे काही आहे, हे यश आकाशातून येत नाही आहे, मी स्वतःला यात झोकून दिलेले आहे. त्यामुळेच माझे ध्येय आणि सर्व यश माझ्या समर्पणातून आणि मेहनतीतून आलेले आहे.
 • आमच्यात स्पर्धा असते, जगातील सर्वोत्तम खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करतात, पण ही स्पर्धा चांगली असते. आम्ही सर्वोत्तम बनण्यासाठी स्पर्धा करतो, हीच माझी प्रेरणा आहे. त्या सर्वांपेक्षा उत्तम बनणे, हेच माझे मोटिवेशन आहे.
 • माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे माझी मानसिकता. प्रोफेशनल बनवून राहणे, टीमला मदत करणे, योग्य मानसिकता ठेवणे आणि स्वतः सोबत सकारात्मक गोष्टी बोलणे, या सर्व गोष्टी करणे तुमच्यावर अवलंबून आहेत.
 • मी जगातील सर्वोत्तम फुटबॉल प्लेअर आहे. माझ्या मनात मी नेहमी सर्वोत्तम आहे. लोक काय म्हणतात, काय विचार करतात, याने मला काही फरक पडत नाही. माझ्या मनात मी नेहमीच उत्तम आहे. सर्वजण आपल्या क्षेत्रांमध्ये उत्तम असतात, तसा मी माझ्या क्षेत्रामध्ये उत्तम आहे.
 • मेसी माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे एक मत आहे. मी लोकांच्या मतांचा त्यांच्या विचारांचा आदर करतो, कदाचित तुमच्या मते मेसी माझ्यापेक्षा चांगला असू शकतो, पण माझ्यासाठी मी त्याच्यापेक्षा चांगला आहे.
 • माझ्यासाठी शत्रूंचे, प्रतिस्पर्ध्यांचे अस्तित्वच नाही. शत्रू आणि प्रतिस्पर्धी युद्धामध्ये असतात, फुटबॉल मध्ये नाही. हा केवळ गेम आहे.
 • त्याग केल्याशिवाय आपण काहीही जिंकू शकत नाही. मी अविश्वासनीय गोष्टी सोडल्या आहेत, माझ्या परिवारांनी खूप त्याग केला आहे आणि मला असे वाटते की, मी योग्य पर्याय निवडलेला आहे.

FAQ

१. जगातील प्रथम क्रमांकाचा फुटबॉल खेळाडू कोण आहे?

क्रिस्टियानो रोनाल्डो याने फुटबॉल मध्ये अनेक रेकॉर्ड बनवलेले आहेत. फुटबॉल मध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो यांचे करिअर एवढे मोठे आहे की, असा कुठलाच अवार्ड नाही तो त्यांनी मिळवला नसेल. त्यांची मेहनत, संघर्ष आणि जिद्द हि तेवढीच मोठी आहे, जेवढे मोठे त्यांचे यश आहे.

२. रोनाल्डो इतका प्रसिद्ध का आहे?

युरोप अमेरिके सह संपूर्ण जगातला सर्वात लोकप्रिय खेळ असलेल्या फुटबॉलचे एक स्टार खेळाडू, जे जगातले सर्वात लोकप्रिय आणि महागडे खेळाडू तर आहेतच, पण त्याचबरोबर जगातल्या श्रीमंत व्यक्तींमध्ये त्यांची गणना होते, फुटबॉलच्या मैदानावर आपल्या अप्रतिम खेळाचा प्रदर्शन करत, त्यांनी स्वतःला आज ज्या उंचीवर नेऊन ठेवले, तिथे पोहोचणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते, मग तो खेळ कोणताही का असेना, त्या प्रसिद्ध फुटबॉल खेळाडूचे नाव आहे क्रिस्टीयानो रोनाल्डो.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास क्रिस्तियानो रोनाल्डो यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. हा लेख तुम्हाला आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद .

Leave a comment