महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी | MS Dhoni Information In Marathi

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी | MS Dhoni Information In Marathi – महेंद्रसिंग धोनी हा जगभरामध्ये महान क्रिकेटपटूपैकी एक आहे. महेंद्र सिंह धोनी प्रसिद्ध खेळाडू बनलेला आहे. परंतु अतिशय खडतर प्रयत्नातून धोनीने हे यश प्राप्त केले.

क्रिकेटर बनण्याचा धोनी साठीचा मार्ग इतका साधा नव्हता, धोनीला एका सामान्य व्यक्ती पासून एक महान क्रिकेटर बनण्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर संघर्ष करावा लागला.

अतिशय लहानपणापासूनच म्हणजे धोनीने शालेय शिक्षणापासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्याच्या या खडतर प्रयत्नाने भारतीय संघाचा सहभागी होण्यासाठी धोनीला बरेच वर्षे लागली. परंतु, आपल्या भारत देशाकडून धोनीला खेळण्याची संधी प्राप्त झाल्यानंतर, त्या संधीचा सदुउपयोग करून धोनीने त्या संधीचे सोने केले.

व हळूहळू क्रिकेटच्या जगामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज धोनीचे पूर्ण जगभरामध्ये एवढे चहाते आहेत की, धोनीच्या प्रत्येक मॅचला भरभरून चाहत्यांचे प्रेम मिळते.

आजच्या mahendra singh dhoni information in marathi या लेखाद्वारे आम्ही आपणास महेंद्र सिंह धोनी बद्दल माहिती दिलेली आहे, हा लेख तुम्ही शेवटपर्यंत सविस्तर वाचावा.

Table of Contents

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी | MS Dhoni Information In Marathi

पूर्ण नाव महेंद्र सिंह धोनी
टोपणनावमाही, एमएस, एमएसडी, कॅप्टन कूल
जन्मतारीख७ जुलै १९८१
जन्म ठिकाणरांची, बिहार, भारत
शैक्षणिक पात्रता १२ वी पास
वडिलांचे नावपान सिंग
आईचे नावदेवकी देवी
भावंडेजयंती गुप्ता, नरेंद्र सिंग
पत्नीचे नावसाक्षी सिंह रावत
अपत्य
व्यवसायक्रिकेटपटू आणि भारताचा माजी कर्णधार
भारतीय क्रिकेट संघातील त्यांची भूमिकायष्टिरक्षक आणि फलंदाज
फलंदाजीची शैलीउजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली डाव्या हाताचा गोलंदाज
पहिला कसोटी सामना (कसोटी पदार्पण)०२ डिसेंबर २००५ विरुद्ध श्रीलंका संघ
पहिला एकदिवसीय (ODI पदार्पण)२३ डिसेंबर २००४ विरुद्ध बांगलादेश संघ
पहिला T20 (T20 पदार्पण)०१ डिसेंबर २००६ विरुद्ध दक्षिण आफ्रिका 
आयपीएल संघचेन्नई सुपर किंग्स

महेंद्र सिंह धोनी याचा जन्म आणि शिक्षण

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – भारतातील झारखंड राज्यामध्ये ७ जुलै १९८१ च्या दरम्यान महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी याचा जन्म झाला. महेंद्रसिंग धोनीने त्याचे शालेय शिक्षण झारखंड राज्यांमध्ये डीएव्ही जवाहर विद्यामंदिर शाळेमधून पूर्ण केले. बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, त्याने सेंट झेवियर कॉलेजमध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

MS Dhoni Information In Marathi

शालेय शिक्षण सुरू असताना धोनीने क्रिकेटसाठी अभ्यास सुद्धा सुरू केला होता, त्यामुळे अभ्यासाशी त्याला नेहमी तडजोड करावी लागत असे, या कारणाने धोनीने स्वतःचे शिक्षण क्रिकेटसाठी अर्धवट सोडून क्रिकेटचा अभ्यास सुरू केला.

महेंद्र सिंह धोनी याचे कुटुंब

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – महेंद्रसिंग धोनीच्या वडिलांचे नाव पानसिंग व आईचे नाव देवकी देवी असे आहे. धोनीचे वडील मेकॉन कंपनीमध्ये काम करायचे व आई गृहिणी होती.

महेंद्रसिंग धोनीचे कुटुंब उत्तराखंड राज्यांमध्ये होते, परंतु वडिलांच्या कामामुळे महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी यांच्या परिवाराला उत्तराखंड सोडून झारखंड राज्यांमध्ये स्थायिक व्हावे लागले, व तिथेच राहून नंतर झारखंड राज्याचे महेंद्रसिंग धोनी यांचे कुटुंब रहिवाशी झाले.

धोनीच्या कुटुंबामध्ये धोनीला दोन भावंडे आहेत. बहिणीचे नाव जयंती गुप्ता व भावाचे नाव नरेंद्र सिंग. महेंद्रसिंग धोनीची भावंडे व्यवसायाने मोठी बहिणी शिक्षिका तर मोठा भाऊ हा राजकारणी आहे.

महेंद्र सिंह धोनी याची लव्हलाईफ

प्रियांका झा आणि धोनीची लव्हस्टोरी

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – महेंद्रसिंग धोनी याचे प्रियांका झा या मुली सोबत प्रेम संबंध होते. प्रियांका झा धोनीची घनिष्ठ मैत्रीण होती.

परंतु २००२ मध्ये एका कार अपघातामध्ये मध्ये, प्रियांकाचा मृत्यू झाला व त्यामुळे धोनीची प्रियांकाच्या सोबत प्रेम कहाणी ही अर्धवटच राहीली. महेंद्र सिंह धोनी माहिती मराठीच्या आयुष्यामधील हा पैलू एम.एस धोनी या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोहोचला.

धोनी आणि साक्षीची प्रेम कहाणी

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – महेंद्रसिंग धोनी याने ०४ जुलै २०१० रोजी साक्षी सिंग रावत हिच्यासोबत लग्न केले. धोनीचे साक्षीसोबत प्रेम होते. त्या कारणाने दोघांचा हा प्रेम विवाह संपन्न झाला. असे सांगण्यात येते की, साक्षी व धोनी एका शाळेमध्ये शिकत होते.

परंतु साक्षी ही लहान असतानाच तिचे वडील डेहराडूनला शिफ्ट झाले, त्यामुळे साक्षीला तिची शाळा अर्धवटच सोडावी लागली.

२००७ मध्ये साक्षीची पुन्हा भेट झाली

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – साक्षी डेहराडूनला वडिलांच्या कामामुळे शिफ्ट झाल्यानंतर, धोनी व साक्षी बराच काळ एकमेकांना या कारणास्तव भेटू शकले नाहीत. परंतु पुन्हा २००७ मध्ये साक्षी व धोनी यांची कोलकत्ता या ठिकाणी भेट झाली.

इंडियाची टीम कोलकत्ता मध्ये ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, त्याच हॉटेलमध्ये साक्षीही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. यादरम्यानच महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी याची साक्षी सोबत पुन्हा भेट झाली.

या भेटीनंतर दोघेही बराच काळ एकमेकांना बघत होते, तब्बल तीन वर्षांनी दोघांनी लग्न केले. दोघांनी लग्न केल्यानंतर त्यांना एक अपत्य झाले. धोनीच्या मुलीचे नाव जीवा आहे.

MS Dhoni family

महेंद्र सिंह धोनीची क्रिकेट कारकीर्द

देशांतर्गत क्रिकेट कारकीर्द

पहिला रणजी सामना
  • महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – महेंद्रसिंग धोनीला १९९९ मध्ये पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी खेळण्याची संधी चालून आली, हा पहिला रणजी सामना बिहार या ठिकाणी खेळवण्यात आला होता. हा सामना आसाम क्रिकेट संघाविरुद्ध खेळला गेला होता.
MS Dhoni
  • धोनीने या सामन्याच्या दुसऱ्या डावात नाबाद ६८ धावा केल्या, तर या ट्रॉफीच्या संघात त्याने पाच सामन्यात एकूण २८३ धावा केल्या, या रणजी ट्रॉफी नंतर धोनीने इतर स्वदेशी झालेल्या सामन्यांमध्ये उत्तम फलंदाजी करून प्रसिद्धी प्राप्त केली.
  • धोनीने केलेल्या उत्तम फलंदाजी व त्याची उत्कृष्ट कामगिरी असून सुद्धा ईस्ट जॉनने निवड करताना धोनीची  क्रिकेटसाठी निवड केली नाही, यामुळे धोनीने स्वतःला खेळापासून दूर केले.
  • पुढे २००१ मध्ये कोलकत्ता राज्यातील रेल्वे विभागात तिकीट कलेक्टर म्हणून काम करण्यास धोनीने सुरुवात केली.
  • परंतु धोनीला क्रिकेटचे वेड असल्याकारणाने, नोकरीमध्ये मन लागत नव्हते म्हणून त्याने अवघ्या तीन वर्षातच तिकीट कलेक्टरची नोकरी सोडून दिली व पुन्हा त्याने क्रिकेट करिअर वर स्वतःचे लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केले.
  • २००१ च्या दरम्याने धोनीची “दुलिप ट्रॉफीसाठी” निवड झाली, मात्र धोनीला त्याच्या निवडीची माहिती योग्य वेळी मिळू शकली नाही, त्यामुळे धोनी या ट्रॉफीमध्ये सहभागी होऊन क्रिकेट खेळू शकला नाही.
  • २००३ च्या दरम्यान जमशेदपूर मध्ये “टॅलेंट रिसोर्स डेव्हलपमेंट” आयोजित केलेल्या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये धोनीला बंगालचा माजी कर्णधार प्रकाश पोद्दार यांनी खेळताना पाहिले होते. त्यानंतर प्रकाशने धोनीच्या खेळाची माहिती राष्ट्रीय क्रिकेट अकादमीला दिली. अशा प्रकारे ध्वनीची बिहारच्या अंडर-१९ संघामध्ये निवड झाली.
  • महेंद्रसिंग धोनीने २००३ ते २००४ च्या “देवधर ट्रॉफी” स्पर्धेमध्ये सुद्धा स्वतःच सक्रिय सहभाग दर्शवला आणि धोनी पूर्व विभागीय संघाचा सुद्धा भागीदार होता.
  • देवधर ट्रॉफीचा हा मोसम त्याच्या संघाने पटकावून धोनीने मोसमात एकूण चार सामने खेळले, ज्यामध्ये धोनीने २४४ धावा करून एक वेगळी प्रतिमा निर्माण केली.
  • २००४ मध्ये झालेल्या भारतीय संघात महेंद्र सिंह धोनी माहिती मराठीची निवड करण्यात आली, धोनीने पहिला सामना इंडिया संघासाठी यष्टीरक्षक म्हणून खेळला, यानंतर झिंबाब्वे सांघाविरुद्ध धोनीने चांगली कामगिरी करून दाखविली.
  • तीन देशांमध्ये अर्थात केनिया अ,  भारत अ, आणि पाकिस्तान अ, या मालिकेतही महेंद्रसिंग धोनीने अतिशय उत्कृष्ट कामगिरी केली आणि पाकिस्तान संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या क्रिकेटच्या सामनामध्ये आपल्या अर्धशतकाच्या जोरावर, धोनीने भारतीय संघाला एक उत्कृष्ट विजय प्राप्त करून दिला.

महेंद्र सिंह धोनीचा पहिला एक दिवसीय सामना आणि कारकीर्द

  • २००४ च्या दरम्याने महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी ला भारतीय संघासाठी पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्याची संधी स्वतःहून चालून आली व त्याने बांगलादेश संघा विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला.
महेंद्र सिंह धोनी
  • पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात धोनी असे विशेष काही करू शकला नाही, आणि शून्यावर परतून आला. मात्र धोनीच्या खराब कामगिरीनंतरही, पाकिस्तान सोबत खेळल्या जाणाऱ्या पुढील एकदिवसीय सामन्यात धोनीची पुन्हा निवड करण्यात आली.
  • पाकिस्तान सोबत सामना खेळल्यानंतर, धोनीने उत्कृष्ट कामगिरी केली. या खेळाच्या सामन्यात धोनीने एकूण १४८ धावा केल्या. ज्यामध्ये तो इतका धावा करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक फलंदाज म्हणून प्रसिद्ध झाला.

एकदिवसीय सामन्यांमध्ये धोनीच्या कामगिरीबद्दल माहिती

धोनीने खेळलेले एकदिवसीय सामने ३१८
एकूण डाव खेळला२७२
एक दिवसीय सामन्यात एकूण धावा ९९६७
एकदिवसीय सामन्यात एकूण चौकार मारले ७७०
एकदिवसीय सामन्यात षटकार मारले २१७
एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण शतके१०
एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण द्विशतके0
एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण अर्धशतके६७

महेंद्र सिंह धोनीची कसोटी कारकीर्द

पहिला कसोटी सामना

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – महेंद्रसिंग धोनीला २००५  साली  भारतीय क्रिकेट संघासाठी पहिला कसोटी सामना खेळण्याची संधी चालून आली. आणि या कसोटी सामन्यांमध्ये श्रीलंका संघ विरुद्ध महेंद्रसिंग धोनीने पहिला कसोटी सामना खेळला.

या कसोटी सामन्यामध्ये धोनीने पहिल्या डावात एकूण ३० धावा केल्या. मात्र पावसाअभावी हा सामना मध्येच थांबवावा लागला.

२००६ मध्ये झालेल्या पाकिस्तान विरुद्ध सामन्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीने पहिले कसोटी शतक स्वतःच्या नावावर पटकावले व त्यामुळे भारताला या कसोटी सामन्यात फॉलोऑन टाळता आला.

शेवटचा कसोटी सामना

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – महेंद्रसिंग धोनीने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना २०१४ मध्ये ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध खेळला. त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात त्याने एकूण ३५ धावा केल्या.

हा सामना झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने कसोटी सामन्यांमधून निवृत्तीची माहिती प्रसार माध्यमांद्वारे संपूर्ण लोकांपर्यंत शेअर केली, आणि त्यामुळे धोनीच्या आयुष्यातील हा कसोटी सामना शेवटचा कसोटी सामना ठरला असे समजले जाते.

धोनीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल माहिती

धोनीने खेळलेले एकूण कसोटी सामने ९०
एकूण डाव खेळला १४४
कसोटी सामन्यात एकूण धावा ४८७६
कसोटी सामन्यात एकूण चौकार५४४  
कसोटी सामन्यात षटकार मारले ७८
कसोटी सामन्यांमध्ये एकूण शतके 
कसोटी सामन्यांमध्ये एकूण द्विशतके
कसोटी सामन्यांमध्ये एकूण अर्धशतके३३

महेंद्र सिंह धोनीची टी-20 कारकीर्द

महेंद्रसिंग धोनीने पहिला टी-20 सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला आणि या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये धोनीने अतिशय निराशाजनक सामना खेळला.

या सामन्यामध्ये धोनीने फक्त दोन चेंडूंचा सामना खेळला, आणि शून्यावर आउट झाला. परंतु टीम इंडियाने हा सामना स्वतःच्या नावे करून घेतला.

धोनीच्या T20 सामन्यांच्या कारकिर्दीबद्दल माहिती

धोनीने खेळलेले एकूण T20 सामने ८९
एकूण धावा १४४४
एकूण चौकार १०१
एकूण षटकार ४६
एकूण शतके 0
एकूण अर्धशतके

महेंद्र सिंह धोनी कर्णधार म्हणून

  • महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – महेंद्रसिंग धोनी याने कर्णधार होण्यापूर्वी भारतीय संघाची जबाबदारी राहुल द्रविडकडे सोपवली होती, व ज्यावेळी राहुल द्रविड ने स्वतःचे संघ जबाबदारीचे पद सोडले, त्यामुळे त्या जागी महेंद्रसिंग धोनीची भारताचा पुढील कर्णधार म्हणून निवड करण्यात आली.
  • महेंद्रसिंग धोनीला भारतीय संघाचे कर्णधार पद देण्याबाबत राहुल द्रविड आणि सचिनने बीसीआयशी चर्चा केल्याचे, सुद्धा सांगितले जाते व यानंतर २००७ मध्ये बीसीआयने भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून धोनीची निवड केली.
  • भारताच्या संघाचा कर्णधार झाल्यानंतर सप्टेंबर २००७ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या आयसीसी विश्व टी-20 मध्ये महेंद्रसिंग धोनीने भारतीय क्रिकेट संघाचे उत्तमरीत्या नेतृत्व करून ही स्पर्धा जिंकली.
  • टी-20 विश्वचषक सामना जिंकल्यानंतर, महेंद्रसिंग धोनीकडे एकदिवसीय आणि कसोटी सामन्याचे कर्णधार पद सुद्धा सोपवण्यात आले. धोनीने स्वतःला मिळालेली ही जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली.
  • महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००९ साली भारताला आयसीसी कसोटी क्रमांकवारीत पहिले स्थान प्राप्त करून दिले.
  • महेंद्रसिंग धोनीने भारतीय संघाचा कर्णधार असताना विविध विक्रम स्वतःच्या नावावर करून घेतले आहेत.
  • महेंद्रसिंग धोनीने दोन विश्वचषकांमध्ये भारताचे नेतृत्व केले असून, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०११ मध्ये विश्वचषक जिंकला व २०१५ च्या विश्वचषकात भारताला उपांत्य फेरीत नेण्यात सुद्धा महेंद्रसिंग धोनीला यश आले.

महेंद्र सिंह धोनीची आयपीएल कारकीर्द

  • आयपीएलच्या पहिल्या सत्रात महेंद्रसिंग धोनीला चेन्नई सुपर किंग्सने पाच दशलक्ष अमेरिकन डॉलर्स म्हणजेच भारतीय रक्कम दहा कोटी रुपये देऊन, स्वतःच्या संघासाठी विकत घेतले होते. महेंद्रसिंग धोनी याला दिलेली चेन्नई सुपर किंग्सने ही सर्वात जास्त किंमत होती.
  • महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्सने झालेल्या लीगचे दोन सत्र स्वतःच्या नावे करून घेतले. याशिवाय २०१० च्या T-20 चॅम्पियन्स लीग मध्ये ही महेंद्रसिंग धोनीने स्वतःच्या संघाला यश प्राप्त करून दिले.
  • चेन्नई सुपर किंग्स वर दोन वर्षासाठी खेळण्यास बंदी घातल्यानंतर, त्यांना दुसऱ्या आयपीएल संघ रायझिंग पुणे सुपरजायंटने १.९ दशलक्ष यूएसए डॉलर्स म्हणजे भारतीय रक्कम बारा कोटी रुपये एवढी किंमत देऊन विकत घेतल्यानंतर धोनीने या संघाच्या वतीने उत्तमरीत्या सामने खेळले.
  • २०१८ च्या दरम्याने चेन्नई सुपर किंग्स वर घातल्या गेलेल्या बंदी संपुष्टात आल्या व चेन्नई सुपर किंग्सने पुन्हा धोनीला स्वतःच्या संघामध्ये समाविष्ट करून घेतले, व सध्या आयपीएलसाठी धोनी चेन्नई सुपर किंग्स या संघाचे नेतृत्व करतो.

महेंद्र सिंह धोनीने केलेले रेकॉर्ड

कसोटी सामन्यांमध्ये महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी ने एकूण ४००० धावा करत, भारताचा पहिला भारतीय यष्टीरक्षक बनला. याआधी कोणत्याही भारतीय यष्टीरक्षकाने इतक्या धावा करून यष्टीरक्षक पद प्राप्त केले नव्हते.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने एकूण २७ कसोटी सामने हे भारतीय टीमच्या नावे करून घेतले. च्या कसोटी सामन्यामध्ये महेंद्रसिंग धोनीने सर्वात यशस्वीरित्या भारतीय कसोटी कर्णधार होण्याचा विक्रम अगदी उत्तमरीत्या चालवला.

महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधार पदाच्या काळामध्ये भारतीय क्रिकेट संघाने खालील विश्वचषक जिंकले, ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी हा सर्व प्रकारचे आयसीसी स्पर्धा चषक जिंकणारा पहिला भारतीय संघाचा कर्णधार बनला.

आयसीसी स्पर्धा कोणत्या वर्षी कप जिंकला
T – 20 विश्वचषक२००७
ओडी वर्ल्ड कप२०११
चॅम्पियन्स ट्रॉफी२०१३

महेंद्रसिंग धोनीने कर्णधार म्हणून एकूण ३३१ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले आणि सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिला भारतीय संघाचा कर्णधार आहे.

धोनीने आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २०४ षटकार मारले असून, त्यासोबत त्याने उत्तम फटकेबाजी करणाऱ्या कर्णधाराचा किताबही स्वतःच्या नावे पटकावला आहे.

सर्वाधिक षटकार कर्णधार म्हणून सर्वाधिक टी-20 सामना जिंकण्याचा विक्रम सुद्धा धोनीने स्वतःच्या नावावर केला आहे.

महेंद्र सिंह धोनीला मिळालेले पुरस्कार आणि अचिव्हमेंट

  • महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – महेंद्रसिंग धोनीला २००७ मध्ये भारत सरकारने “राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार” देऊन सन्मानित केले. हा पुरस्कार क्रीडा जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून समजला जातो.
  • महेंद्रसिंग धोनीला भारत सरकारने २००९ मध्ये पद्यश्री व २०१८ मध्ये पद्यभूषण पुरस्कार देऊन गौरवित केले आहे.
  • २०११ मध्ये महेंद्रसिंग धोनीला डिमांड फोर्ट विद्यापीठाने “मानद डॉक्टरेट” पदवी प्रदान केले होती.
  • याव्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनीने दोनदा “आयसीसी वनडे प्लेयर ऑफ द इयर”, “मॅन ऑफ द मॅच” आणि “मॅन ऑफ द सिरीज” पुरस्कारही स्वतःच्या नावे करून घेतले आहे.

महेंद्र सिंह धोनीशी संबंधित वाद

कर विवाद

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – एकदा कमी नोंदणी शुल्क देण्याच्या वादामध्ये अडकला होता व अमेरिकन कंपनीने निर्णय “हमर एच-२ एस.युव्ही” या वाहनाची नोंदणी करतेवेळी या वाहनाच्या नावाऐवजी “महिंद्रा स्कॉर्पिओ” लिहिल्याचा आरोप महेंद्रसिंग धोनी यावरती झाला होता.

त्यामुळे महेंद्रसिंग धोनीला चार लाखाच्या नोंदणी शुल्क ऐवजी केवळ ५३ हजार रुपये मोजावे लागले.

मॅच फिक्सिंगचा वाद

२०१३ मध्ये आयपीएल मॅच फिक्सिंग बाबत महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा वादामध्ये अडकला होता, व महेंद्रसिंग धोनी वर मॅच फिक्सिंगचे आरोप सुद्धा करण्यात आले होते.

मात्र त्याच्यावरील हे आरोप अजून पर्यंत सिद्ध होऊ शकले नाहीत.

पाण्याचा वाद

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – २००७ मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या कॉलनीतील लोकांनी महेंद्रसिंग धोनी विरोधात रांची प्रादेशिक विकास प्राधिकरणात तक्रार दाखल केली होती. ज्यामध्ये धोनीवर दररोज सुमारे पंधरा हजार लिटर पाणी वाया जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

त्यानंतर हे प्रकरण झारखंड उच्च न्यायालयात सुद्धा पोहोचले, पण जेव्हा या प्रकरणाची चौकशी केली, तेव्हा कळले की, कॉलनीतील लोकांनी ही तक्रार काही चुकीच्या माहितीच्या आधारे केली असल्याकारणाने, धोनी विरोधात तक्रार करणाऱ्या या लोकांनी त्याची माफी मागितली होती.

महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट ( एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी )

महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित २०१६ मध्ये एक चित्रपट बनवण्यात आला. ज्या चित्रपटाचे नाव “एमएस धोनी : अनटोल्ड स्टोरी” असे होते.

हा चित्रपट धोनीच्या आयुष्यावर चित्रण करण्यात आला असून, या चित्रपटांमध्ये महेंद्रसिंग धोनीची मुख्य भूमिका अभिनेता सुशांत सिंग राजपूत याने अगदी उत्तमरीत्या साकारली होती.

व धोनीच्या बायकोची भूमिका म्हणजेच साक्षीची भूमिका अभिनेत्री कियारा अडवानी हिने साकारली होती.

आम्रपाली कंपनीशी संबंधित वाद

  • २०१६ मध्ये “आम्रपाली कंपनी” आणि या कंपनीचा “ब्रँड अँबेसिडर महेंद्रसिंग धोनी” यांना आम्रपाली हाउसिंग प्रोजेक्ट मधील रहिवाशांनी सोशल मीडिया वरती ट्रोल केले होते. यानंतर धोनीने या फॉर्मच्या ब्रँड अँबेसिडर पदाचा राजीनामा सुद्धा दिला.
  • खरे तर – ज्या लोकांनी आम्रपाली कंपनीकडून घरे घेतली होती, मात्र या लोकांकडून पैसे घेऊनही त्यांना घरे दिली गेली नाही. यानंतर या लोकांनी धोनीला त्याच्या ट्वीटमध्ये टॅग करायला सुरुवात केली.
  • लोकांची या कंपनीसोबत असलेली नाराजी पाहून, महेंद्रसिंग धोनीने आम्रपाली कंपनीशी ब्रँड अँबेसिडर पदाचे सर्व संबंध तोडून टाकले.
  • २०१८ मध्ये महेंद्रसिंग धोनीने आम्रपाली कंपनी विरोधातही गुन्हा दाखल केला असून, धोनीने या कंपनी विरोधात १५० कोटी रुपये दिले जाणार नसल्याचे सांगितले आहे.
  • सत्य – आम्रपाली कंपनी धोनीला ब्रँड अँबेसिडर बनवण्यासाठी १५० कोटी रुपये देणार होती. मात्र या कंपनीने अद्यापही धोनीला १५० कोटी रुपयांची रक्कम दिली नाही, आणि पैसे न दिल्यामुळे धोनीला या कंपनीवर गुन्हा दाखल करावा लागला.

महेंद्र सिंह धोनीची निवृत्ती – Mahendra Singh Dhoni information in Marathi

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – भारताचा महान खेळाडू आणि सर्वोत्तम कर्णधाराने म्हणजेच महेंद्रसिंग धोनी याने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सेवानिवृत्तीची घोषणा लोकांपर्यंत पोहोचवली.

महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्यांनी यासाठी अत्यंत नाराजी व्यक्त करत, त्यांच्यासाठी अत्यंत दुःखद क्षण आहे असे सांगितले. महेंद्रसिंग धोनी हा असा खेळाडू होता की, त्याला पाहण्यासाठी जगभरातील अनेक क्रिकेट वेडे क्रिकेट पाहण्यासाठी येत असत.

महेंद्र सिंह धोनीच्या सोशल मीडियाशी संबंधित माहिती

फेसबुक

महेंद्रसिंग धोनीने २०१६ मध्ये स्वतःचे फेसबुक अकाउंट तयार केले होते. त्यावेळी तो या अकाउंट वर वेळोवेळी त्याचे विविध फोटो शेअर करत असे, या फेसबुकला अंदाजे २०, ५१७, ५२७ लोक फॉलो करतात.

ट्विटर

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – महेंद्रसिंग धोनीने २००९ मध्ये स्वतःचे ट्विटर अकाउंट तयार केले होते. सध्या महेंद्रसिंग धोनीचे ट्विटर अकाउंट सुमारे सात दशलक्ष लोक फॉलोअर आहेत.

इंस्टाग्राम

महेंद्रसिंग धोनीच्या इंस्टाग्राम वर अंदाजे ९.१ मिलियन फॉलोवर त्याला फॉलो करतात. त्याने त्याच्या अकाउंट वर विविध फोटोज व व्हिडिओ पोस्ट केले आहेत. याशिवाय तो एकूण दोन लोकांना फॉलो करतो.

महेंद्र सिंह धोनीचे नेटवर्थ

महेंद्रसिंग धोनीची एकूण संपत्ती ही ७०० कोटी रुपयापर्यंत आहे. महेंद्रसिंग धोनीने क्रिकेट, जाहिराती व इतर अनेक प्रकारच्या विविध व्यवसायातून ही सर्व संपत्ती कमावली आहे. धोनीचे वार्षिक उत्पन्न १०२ कोटी रुपयांपर्यंत आहे.

धोनीच्या नावावरील विश्वविक्रम

  • नेहमी 6 क्रमांकाच्या वर फलंदाजी करण्याचा विक्रम केला.
  • सर्वाधिक सामन्यांमध्ये कर्णधारपदाचा विक्रम
  • भारतीय यष्टीरक्षकाकडून विकेटमागे सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही धोनीच्या नावावर आहे.
  • सर्वाधिक नाबाद राहिलेले भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • एकदिवसीय क्रिकेटमध्ये 200 षटकार मारणारा महेंद्रसिंग धोनी हा पहिला भारतीय आणि जगातील पाचवा खेळाडू आहे.
  • ICC ट्रॉफीच्या तीनही फॉरमॅटमध्ये विजय मिळवणारा एकमेव भारतीय कर्णधार
  • क्रिकेटमधील सर्वाधिक यशस्वी स्टंपिंगचा विक्रम.
  • धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 199 एकदिवसीय सामन्यांपैकी 110, टी-20 पैकी 41 आणि कसोटीत 60 पैकी 27 सामने जिंकले आहेत.
  • IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधारपदाचा विक्रम
  • 300 एकदिवसीय झेल घेणारा तो पहिला भारतीय यष्टीरक्षक आणि ही कामगिरी करणारा जगातील चौथा यष्टीरक्षक आहे.
  • एक यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक धावा.

एमएस धोनी : इतर क्षेत्र

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – अभिषेक बच्चन आणि विटा दाणी यांच्यासह, एमएस धोनी चेन्नईयन एफसी (चेन्नई-आधारित फुटबॉल क्लब) चे सह-मालक आहेत. ही इंडियन सुपर लीगची फ्रँचायझी आहे.

धोनी सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशिप टीम माही रेसिंग टीम इंडियाचा अक्किनेनी नागार्जुनसह सह-मालक आहे.

एमएस धोनी सहारा इंडिया परिवारसह रांची रेज (रांची-आधारित हॉकी क्लब) चे सह-मालक आहे. रांची रेज ही हॉकी इंडिया लीगची फ्रँचायझी आहे.

प्रादेशिक सैन्य

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – एमएस धोनीला क्रिकेटमधील योगदानाबद्दल 2011 मध्ये, भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट-कर्नलची मानद रँक देण्यात आली. जम्मू आणि काश्मीर प्रदेशात लष्करासोबत ऑगस्ट 2019 मध्ये त्यांनी दोन आठवड्यांचा कार्यकाळ पूर्ण केला.

प्रोडक्शन हाऊस

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – एमएस धोनीचे ‘धोनी एंटरटेनमेंट’ नावाचे प्रोडक्शन हाऊस आहे. डॉक्युमेंटरी वेब सीरिज हा पहिला शो या बॅनरखालील होता, जो ‘द रोअर ऑफ द लायन’ या हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. या मालिकेत एमएस धोनी मुख्य भूमिकेत होता.

व्यवसाय

फेब्रुवारी 2016 मध्ये धोनीने त्याचा ब्रँड ‘सेव्हन’ लाँच केला. तो त्या ब्रँडच्या शूजचा मालक आहे आणि त्याचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे.

 

महेंद्र सिंह धोनीशी संबंधित इतर गोष्टी

  • फोर्ब्स मासिकाने धोनीचे नाव २०१२ मध्ये जागतिक सर्वाधिक कमाई करणारा खेळाडूंमध्ये समाविष्ट केले होते. या व्यतिरिक्त महेंद्रसिंग धोनी २०१२ ते २०१४ च्या काळात भारत सरकारला सर्वाधिक करणारा खेळाडू बनला होता.
  • क्रिकेटर बरोबरच महेंद्रसिंग धोनी अनेक प्रकारच्या व्यवसायाशी सुद्धा संबंधित आहे. महेंद्रसिंगने रांची मध्ये स्वतःचे हॉटेल देखील उघडले आहे ज्याचे नाव त्याने “माही निवास” असे ठेवले आहे.
  • २०१६ च्या दरम्याने महेंद्रसिंग धोनीने कपड्यांच्या व्यवसायामध्ये सुद्धा प्रवेश केला. त्याने रीती ग्रुपच्या सहकार्याने “seven” नावाचा कपड्याचा ब्रँड सुरू केला आहे.
  • महेंद्रसिंग धोनीला कार व बाईक्सची खूप आवड आहे. त्याने विविध प्रकारच्या कार व बाईक्स खरेदी केल्या असून, धोनीला प्राणीमात्रांवर सुद्धा प्रेम आहे. त्याने दोन कुत्रे पाळले आहेत.
  • महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित चित्रपट बनवण्याच्या हक्कासाठी ४० कोटी रुपये घेतले होते. आणि त्याच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटाने २१० कोटी रुपये कमावले होते, असे म्हटले जाते.
  • महेंद्रसिंग धोनीच्या लांब केसांची पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर यांनी स्तुती केली होती. आणि त्यांनी धोनीला केस न कापण्याचा सल्ला सुद्धा दिला होता.
  • महेंद्रसिंग धोनीचे जीवन आपल्या देशाच्या तरुणांसाठी खूप प्रेरणादायी आहे. आजही महेंद्रसिंग धोनीच्या चहात्यांची संख्या कमी झालेली नाही. जेव्हा महेंद्रसिंग धोनी मैदानामध्ये खेळायला येतो, त्यावेळी प्रत्येक जण केवळ महेंद्रसिंग धोनीच्या फलंदाजीची वाट पाहत असतो.
  • आयपीएल सामने असो किंवा आंतरराष्ट्रीय सामने, महेंद्रसिंग धोनी प्रत्येक सामना अतिशय शांतपणे खेळतो. आणि आपल्या संघाला सहज विजय मिळवून देतो.
  • महेंद्रसिंग धोनीने कठोर परिश्रमाच्या आधारावर जे सर्वोत्तम स्थान प्राप्त केले आहे, ते इतर कोणत्याही क्रिकेटपटूला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. कदाचितच आपल्या देशाला दुसरा धोनी कधी मिळू शकेल.

कार आणि बाइक संग्रह

कार संग्रह

जीपराकी ग्रैंडओपन महिंद्रा स्कॉर्पियोलँड रोवर फ्रीलँडरफेरारी ५९९
ऑडी क्यू७ एसयूव्हीमारुति एसएक्स४मित्सुबिशी आउट लँडरटोयोटा कोरोला
पोर्श ९११हमर एच२मित्सुबिशी पजेरो एसएफएक्सजीएमसी सिएरा

बाइक संग्रह

कोलाइज्ड टीव्हीएस डर्ट बाइककॉन्फेडरेट 1098कावासाकी
एनफील्ड माचिसोडुकाटी 1098हार्ले डेविडसन
यामाहा आरडी 1098यामाहा थंडरकैटयामाहा आरएक्सजेड
यामाहा एक्सएक्सएक्सकॉन्फेडरेट हेलकैटकावासाकी निंजा एच 2
हीरो करिज्मा जेडएमआरएक नॉर्टन विंटेजयामाहा आरडी 350
यामाहा आरएक्सएक्ससुजुकी हायाबुसाबीएसए

महेंद्र सिंह धोनी बद्दल ताज्या बातम्या

महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी – एक दिवसीय सामन्यामधून महेंद्रसिंग धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर सध्या चालू असलेल्या आयपीएल मध्ये महेंद्रसिंग धोनी दिसत आहे. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार म्हणून खेळण्यासाठी मैदानावर उतरतो.

महेंद्रसिंग धोनी याचे चहाते महेंद्रसिंग धोनीला खेळताना पाहून खूप आनंदी होतात. महेंद्रसिंग धोनीची आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग आयपीएल २०२३ फायनल मध्ये पोहोचली. जिथे तिचा सामना गुजरात टायटन्स म्हणजेच हार्दिक पांड्याच्या संघाशी झाला. हा सामना अतिशय रंजक होता.

२८ मे रोजी चेन्नई सुपर किंग्स व गुजरात टायटन्सचा आयपीएलचा सामना रंगला होता. परंतु अति मुसळधार पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. त्यामुळे आयपीएल २०२३ चेन्नई सुपर किंग्स वर्सेस गुजरात टायटनचा सामना २९ मे रोजी खेळला गेला.

हा सामना खूपच रोचक होता. दोन्ही संघाने अगदी उत्तम कामगिरी केली. पण विजय महेंद्रसिंग धोनीने म्हणजेच चेन्नई सुपर किंग संघाने जिंकला. त्यानंतर पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग संघ चॅम्पियन ठरला.

FAQ

१. महेंद्रसिंग धोनी यांचे पूर्ण नाव काय?

भारतातील झारखंड राज्यामध्ये ७ जुलै १९८१च्या दरम्यान महेंद्रसिंग धोनी याचा जन्म झाला.’माही’ व ‘एम.एस. धोनी’ या नावाने तो ओळखला जातो.

२. धोनीला किती मुले आहेत?

महेंद्रसिंग धोनी याने ०४ जुलै २०१० रोजी साक्षी सिंग रावत हिच्यासोबत लग्न केले.त्यांना जीवा नावाची मुलगी झाली जिचा जन्म ०६ फेब्रुवारी २०१५ रोजी झाला.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महेंद्र सिंह धोनी माहिती मराठी यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारंसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment