डॉ वसंत गोवारीकर यांची माहिती Dr Vasant Gowarikar Information In Marathi

महाराष्ट्राला अनेक थोर व्यक्तीमत्त्वांची परंपरा लाभली आहे. समाजाशी निगडीत, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या थोर व्यक्तींनी महाराष्ट्रात जन्म घेतला आणि त्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले.

प्रामुख्याने अवकाश संशोधन, शास्त्रज्ञ, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रातील संशोधनात्मक अभ्यास भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत रणछोड गोवारीकर यांनी केले. वसंत गोवारीकर यांना आपण संशोधक, शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास प्रसिद्ध संशोधक डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

डॉ वसंत गोवारीकर यांची माहिती Dr Vasant Gowarikar Information In Marathi

नाव डॉ. वसंत गोवारीकर
जन्म तारीख दि. २५ मार्च १९३३
जन्म स्थळ पुणे
ओळख संशोधक
पत्नीचे नाव सुधा
अपत्य अश्विनी, कल्याणी, इरावती
पुरस्कार पद्मश्री, पद्मभूषण, फाय फाऊनडेशन
मृत्यू दि. ३ जानेवारी २०१५
मृत्यू स्थळ पुणे

कोण होते डॉक्टर वसंत गोवारीकर ?

आपल्या भारतामध्ये खूप वैज्ञानिक संशोधक होऊन गेले आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये संशोधन कार्य करून देशाचे नाव जागतिक स्तरावर प्रसिद्ध केल आहे.

भारत प्राचीन काळापासूनच संशोधन क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा देश आहे. परंतु मध्यंतरी आपल्या देशामध्ये संशोधनात्मक कार्य कमी झाल होत. संशोधन क्षेत्र हे खूप महत्त्वाचं असं क्षेत्र आहे.

संशोधन केल्यामुळे नवनवीन गोष्टी जगाला पाहायला मिळतात आणि जगामध्ये ज्या समस्या चाललेल्या आहेत त्या कमी होण्यामध्ये संशोधन क्षेत्राचा खूप मोठा वाटा आहे.

हे वाचा –

त्यामुळे भारतीय सरकार संशोधनासाठी बऱ्याच गोष्टी, बरेचसे स्कॉलरशिप किंवा फंड हे देत असते. कारण संशोधन होणे म्हणजे त्या देशाचा विकास होणं असाच आहे व अमेरिका सारख्या देशांमध्ये संशोधकांना विशेष सौर व ग्रांड दिला जातो.

आजकाल भारतामध्ये संशोधनाला विशेष स्थान प्राप्त झालेल आहे. आज आपण अशाच एका संशोधकाची माहिती घेणार आहोत, ज्याने कठीण परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन इंग्लंडला जाऊन, संशोधन कार्य केले आहे.

Dr Vasant Gowarikar Information In Marathi

पाऊस केव्हा पडेल ? किती पडेल ? याची देशभर चिंता असते, ही चिंता दूर करण्यासाठी ज्या संशोधकाने मान्सूनच्या अंदाजाची नवी पद्धत शोधून काढली, त्यांचे नाव डॉक्टर वसंत गोवारीकर.

पाऊस केव्हा पडेल किती पडेल ? याची देशभर सर्वांना चिंता असते. शेतकऱ्यांपासून ते सर्वांना हे कळणे गरजेचे पण आहे. पाऊस कधी पडेल? केव्हा पडेल? याचा अंदाज घेण्याची एक पद्धत शोधून काढली गेली, त्याचं श्रेय डॉक्टर वसंत गोवारीकर यांना जात.

या मराठमोळ्या डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म दि. २५ मार्च १९३३ रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या, एकदा त्यांना वाटले, आपण मोटार बनवावी अवघे तेरा वर्षांचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेन्री फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली.

हेन्री फोर्ड ला मराठी कळणार नाही म्हणून त्यांनी मित्राची मदत घेऊन, मराठीत लिहिलेल्या पत्राचे, इंग्रजी भाषांतरकेले. हेन्री फोर्ड ने डॉक्टर गोवारीकर यांच्या पत्राची दखल घेऊन, उत्तर पाठवले, त्यासोबत काही पुस्तके ही पाठवली.

डॉक्टर गोवारीकर प्रसिद्ध लंडनच्या कॉलेज मध्ये शिकायला गेले. पुढे इंग्लंडच्या ऊर्जा संशोधन केंद्रात संशोधक म्हणून त्यांनी काम केले. कोल्हापूरला डिग्रीपर्यंत ते ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण आहे, ते तिथे केल्यानंतर हायर एज्युकेशन म्हणजे उच्च शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले.

आणि बरमिंग विद्यापीठात यूनिवर्सिटी मध्ये त्यांनी केमिकल इंजिन रासायनिक अभियांत्रिकी विषयात संशोधन कार्य केलं आणि तेथेच त्यांना त्यांच्या संशोधन केंद्रात त्यांना संशोधक म्हणून काम देखील मिळालं.

विक्रम साराभाई यांच्या आग्रहामुळे १९६७ साली ते भारताच्या अवकाश संशोधन केंद्रात घन पदार्थातील ऊर्जा या विषयाच्या संशोधनासाठी त्यांच्या पुढाकाराने नवा प्रकल्प सुरू करण्यात आला. भारताच्या विज्ञान क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी फार मोठी आहे.

अग्निबाणाच्या मुदळी करता घन इंधन बनवण्याचे तंत्र त्यांनी निर्मित केले, तर विक्रम साराभाई हे देखील खूप मोठे संशोधक आपल्या देशात होऊन गेलेले आहेत किंवा अंतराळ जे क्षेत्र आहे, त्यामध्ये त्यांचं नाव खूप मोठ आहे.

सुरुवातीच्या काळात भारतामध्ये संशोधनाविषयी जास्त सुविधा उपलब्ध नव्हत्या त्यामुळे, त्यावेळी अनेक संशोधक किंवा अनेक संशोधक मंडळी ही युरोप, अमेरिका, तिकडे जायचे. परंतु आता भारतामध्ये संशोधन क्षेत्रामध्ये सरकारच्या मदतीमुळे बरीच प्रगती झालेली आहे.

डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म व शिक्षण

Dr Vasant Gowarikar

भारतात विज्ञान व तंत्रज्ञानाचा पाया रचणाऱ्या, डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म पुण्यात १९३३ साली झाला. अवकाश, हवामान आणि लोकसंख्या या तीन क्षेत्रात महत्वपूर्ण असे संशोधन डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी केले आहे.

वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी यांत्रिक पद्धतीने चरकातील धागा आपोआप गुंडाळला जाण्याची पद्धत त्यांनी शोधली होती, त्यांच्या शोधासाठी त्या काळात त्यांचे भरभरून कौतुक हि झाले होते. त्यांचे शालेय आणि महाविद्यालय शिक्षण, कोल्हापूर मध्ये झाले.

बी.एस.सी आणि मग एम.एस.सी केल्यावर डॉक्टर गोवारीकर यांनी इंग्लंडमध्ये प्रवाही पदार्थ या विषयावर पीएचडी केली. वयाच्या २८ व्या वर्षी ऑक्सफर्ड विद्यापीठांमध्ये डॉक्टरसाठी परीक्षक म्हणू,न त्यांची नियुक्ती झाली होती.

डॉक्टर वसंत गोवारीकर अमेरिकेत रिसर्च सेंटर मध्ये क्षेपणास्त्रातील मीटरचे संशोधन करण्यासाठी गेले होते, मात्र अमेरिकेत संशोधनाच्या कार्यासाठी न थांबता गोवारीकर पुन्हा भारतात परतले.

डॉ वसंत गोवारीकर यांचे संशोधन क्षेत्रातील कारकीर्द

  • १९६५ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी उपग्रह तंत्रज्ञानावर काम करायला सुरुवात केली.
  • त्यांच्याच नेतृत्वाखाली एस.एल.व्ही तीन हा उपग्रह वाहक तयार झाला व त्यांच्या या कामासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्यांचे कौतुकी केले होते. त्यांनी केलेले संशोधन सर्वत्र गाजले.
  • डॉक्टर विक्रम साराभाई यांच्यासोबत भारतीय अवकाश तंत्रज्ञानाच्या प्रगतीतही त्यांनी महत्त्वाची भूमिका बचावली होती.
  • अंदाज घेण्यासाठी मॉडेल ही तयार केले, त्यानंतर या मॉडेलला गोवारीकर मॉडेल म्हणून नाव देण्यात आले.
  • १९७९ साली डॉक्टर वसंत गोवारीकर हे अवकाश केंद्राचे संचालक झाले. विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव त्यासोबत १९९१ ते १९९३ या कालावधीत पंतप्रधानांचे विज्ञान सल्लागार म्हणून ही त्यांनी काम केले होते.
  • पुढे विद्यापीठाचे कुलगुरू पुढे सहा वर्ष म्हणजे १९९४ ते २००० या कालावधीत ते मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम पाहिले होते.
  • लोकसंख्येवर भाष्य करणारे आयप्रेडिट हे त्यांचे पुस्तक ही प्रसिद्ध आहे. संशोधन न करता मूलभूत समस्यांची जाणीव असणारे शास्त्रज्ञ म्हणून डॉक्टर वसंत गोवारीकर यांची ख्याती होती.
डॉ वसंत गोवारीकर

डॉक्टर गोवारीकर यांच्या बद्दल उल्लेखनीय कार्य

  • १९८६ मध्ये डॉक्टर वसंत गोवारीकर भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव होते.
  • १९९२ मध्ये डॉक्टर गोवारीकर इंडियन सायन्स काँग्रेसच्या बडोदा वडोदरा अधिवेशनाचे अध्यक्ष होते.
  • दि. २८ फेब्रुवारी १९९७ मध्ये गोवारीकरांनी देशात विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून सुरू केला.
  • १९९५ ते १९९८ व्या कालावधीत गोवारीकर यांनी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू पदाचा कार्यभार सांभाळला.
  • १९८८ ला हवामान खात्यात असताना, वसंत रावांनी पाऊस किती पडेल ? याचा अंदाज वर्तवला, तेव्हा हवामानाचा अचूक अंदाज वर्तवणाऱ्या गोवारीकर मॉडेलची निर्मिती करण्यात आली.

समाजात विज्ञानाचा प्रसार

डॉक्टर वसंत गोवारीकर

विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव झाल्यानंतर, डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी अनेक कार्यक्रम सुरू केले. अनेक समित्यांची त्यांनी निर्मिती केली. टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन फॉर कास्टिंग अँड असेसमेंट कौन्सिलिंग ची स्थापना केली.

संपूर्ण भारतात विज्ञानाचा प्रसार करणाऱ्या संस्था व वैज्ञानिक दृष्टिकोन असणारी माणसे ही या गौरवापासून वंचित राहू नयेत, यासाठी केंद्र सरकारतर्फे त्यांचा सन्मान केला गेला पाहिजे, असे डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांना वाटत होते.

तेव्हा त्यांनी मुलांसाठी विज्ञान प्रसार करणारे, इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे विज्ञान प्रसार करणारे, लेखन भाषण याद्वारे विज्ञान प्रसार करणारे, संस्थेद्वारे विज्ञान प्रसार करणारे, अश्या चार वर्गाद्वारे पुरस्कार वितरित करण्यास सुरुवात केली.

१९८७ मध्ये प्रत्येकी ५० हजार रुपयांचे हे पुरस्कार देण्यास त्यांनी सुरुवात केली. २००५ पासून आणखी एका वर्गाची या पुरस्कारांमध्ये भर झाली. विज्ञान माणसात रुजू करण्यासाठी डॉक्टर वसंतराव गोवारीकर आणि इंग्रजांनी हिंदी असे एक द्वैभाषिक नियतकालीन देखील सुरू केले.

डॉक्टर वसंत गोवारीकर पुरस्कार व सन्मान

  • डॉ. वसंत गोवारीकर यांना १९८४ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेले.
  • डॉ. वसंत गोवारीकर २००८ साली, पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले गेले.
  • फाय फाउंडेशन पुरस्काराने ही गोवारीकर यांना सन्मानित करण्यात आले होते.
  • डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी संशोधन त्याचप्रमाणे विज्ञान क्षेत्रासाठी दिलेल्या योगदानासाठी, पद्मश्री, फाउंडेशन पारितोषिक, नायक सुवर्णपदक व अनेक विद्यापीठांच्या डायरेक्ट अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.

डॉ. वसंत गोवारीकर मृत्यू

दि. ०२ जानेवारी २०१५ रोजी म्हणजे वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे पुण्यात निधन झाले.

डॉ. वसंत गोवारीकर यांनी लिहिलेली पुस्तके

  • जानेवारी १९८७ साली त्यांनी लिहिलेले पॉलिमर सायन्स पुस्तक प्रसिद्ध झाले. हे पुस्तक आजही तितकेच प्रसिद्ध आहे. या पुस्तकाचे तामिळ व रशियन आवृत्ती आहे.
  • लोकसंख्येवर भाष्य करणारे, आयप्रेडिट हे पुस्तक ही प्रसिद्ध आहे.
  • तर फर्टीलायझर्स इन सायक्लोपीडिया हे पुस्तकही त्यांनी लिहिले.
  • कथा इस्त्रोची अर्थात भारतीय अंतराळ संशोधनाची, हे पुस्तक डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी लिहिले.

डॉ. वसंत गोवारीकर यांच्या बद्दल थोडक्यात सारांश

पुण्यात जन्मलेल्या डॉक्टर वसंत रणछोड गोवारीकर यांनी अकराव्या वर्षीच चरख्याचा पिळीतून धागा निघतात आपोआप गुंडाळला जाण्याची नवी पद्धत शोधली होती. महात्मा गांधीजींचे चिटणीस महादेव भाई देसाईजी यांची त्यांनी शाब्बासकी मिळवली होती.

कोल्हापूर मध्ये बीएससी पर्यंतचे शिक्षण घेतल्या नंतर, त्यांनी एमएससी पूर्ण केल. इंग्लंड येथे त्यांनी प्रा गार्नर त्यांच्या मार्गदर्शना खाली प्रवाही पद्धत आतील पीएचडी अवघ्या दोन वर्षात पूर्ण केली.

त्यावेळी अनेक पाठ्यपुस्तकात गार्नर गोवारीकर थेरी चा समावेश झाला. वयाच्या २८ व्या वर्षी केंब्रीज ऑक्सफर्ड मध्ये डॉक्टरेट साठी परीक्षक म्हणून, त्यांची नियुक्ती झाली आणि पुढे अमेरिकन समर्पिल रिसर्च सेंटर मध्ये शिक्षणासाठी मीटरचे संशोधन करण्यासाठी, त्यांना सन्मानाने बोलावून घेण्यात आले.

टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेमध्ये १९६५ पासून डॉक्टर गोवारीकर विक्रम साराभाई यांच्यासोबत उपग्रह तंत्रज्ञानावर काम करू लागले. त्रिवेदम मलम थांबा येथील अवकाश संशोधन प्रयोग शाळेत  गोवारीकर प्रमुख झाले.

या सर्व श्रमाचे सार्थक म्हणजे दि. १७ एप्रिल १९८३ रोजी त्यांचा नेतृत्वाखाली एसएलव्ही ३ उपग्रह वाहक कार्यान्वित झाला व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी त्यांची पाठ थोपाटली.

काही काळ ते विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव होते. १९९१ ते १९९३ यादरम्यान ते पंतप्रधानाचे विज्ञान सल्लागार होते. त्यांच्या नेतृत्वाखाली हवामानाचा अंदाज तंत्रज्ञानाचे उद्योजक बनवण्याचा योजना स्पर्धेत भारतीय संशोधकांना परत आणणे, सरकारची विज्ञान धोरण ठरवणे व त्यांचा प्रसार करणे, ही कामे प्रामुख्याने झाली.

पुढे काही वर्ष ते पुणे विद्यापीठाची कुलगुरू होते. तसेच खताचा विश्वकोश, प्रकल्पाची कामे, त्यांनी नुकतीच पूर्ण केली आहे. १९९४ ते २००० या दरम्यान गोवारीकरांनी मराठी विज्ञान परिषदचे अध्यक्ष स्थान भूषवले होते.

डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या बद्दल मनोरंजक तथ्ये

  • विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक म्हणून डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या कार्यकार्दीत भारताचे पहिले प्रक्षेपण वाहन, SLV3 या महत्त्वपूर्ण घटना होत्या.
  • पावसाचा योग्य व अचूक अंदाज वर्तवणारे, पहिले भारतीय हवामान अंदाज मॉडेल बनवण्याचे यश सर्वस्व डॉ. वसंत गोवारीकर यांना जाते.
  • डॉ. वसंत गोवारीकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. त्याचबरोबर जगभरातून अनेक विविध सन्मान व प्रशंसाची थाप त्यांना मिळाली.
  • ऍस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया कडून आर्यभट्ट पुरस्कार सुद्धा डॉ. वसंत गोवारीकर यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
  • डॉ. वसंत गोवारीकर व त्यांच्या इतर साथीदारांनी २००८ मध्ये फर्टीलायझर एनसायक्लोपेडिया २००८ मध्ये प्रकाशित केले. या मध्ये खतांच्या रासायनिक रचनेची माहिती देणाऱ्या साधारणतः चार हजार पाचशे नोंदी त्यामध्ये आढळून येतात.
  • एपीजे अब्दुल कलाम, चिटणीस, यु आर राव, प्रमोद काळे, यांच्या समवेत भारताचा उपग्रह संशोधन कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात मदत करणाऱ्या महत्त्वपूर्ण शास्त्रज्ञांपैकी, डॉक्टर वसंत गोवारीकर हे एक प्रमुख शास्त्रज्ञ होते.
  • डॉक्टर वसंत गोवारीकर यांचा जन्म २५ मार्च १९३३ मध्ये पुण्यात झाला व भारतामध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर इंग्लंडमधील बर्मिगहॅन्ड विद्यापीठामधून त्यांनी पदव्युत्तर व डॉक्टर पदवी ग्रहण केली.
  • प्रसिद्ध व ज्येष्ठ शास्त्रज्ञ विक्रम साराभाई व डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी भारताच्या अंतराळ तंत्रज्ञान व अवकाश कार्यक्रमासाठी पाया घातला. या अवकाश कार्यक्रमाने अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले.
  • गार्नर व गोवारीकर सिद्धांत विकसित करण्यासाठी, डॉक्टर गोवारीकर यांनी डॉक्टर यांच्यासोबत महत्त्वपूर्ण योगदान दिले. जे घन व द्रव्य यांच्यातील उष्णता व वस्तुमान हस्तांतरणाचे विश्लेषण करण्यासाठी एक अभिनव दृष्टिकोन आहे.

डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्या बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे

  • १९८६ मध्ये भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सचिव म्हणून डॉक्टर गोवारीकर यांची नियुक्ती करण्यात आली होती.
  • राष्ट्रीय विज्ञान दिन, गोवारीकर यांनी १९८७ मध्ये भारत देशात विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला.
  • गोवारीकर १९९४ ते २००० दरम्यान मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष स्थान सुद्धा भूषवत होते.
  • डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी १९८८ मध्ये हवामान खात्या मध्ये योगदान देते वेळी पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी, अचूक मॉडेलची निर्मिती केली. ज्याला गोवारीकर मॉडेल म्हणून ओळखले गेले.
  • डॉक्टर गोवारीकर यांचे १९९२ मध्ये इंडियन सायन्स काँग्रेसच्या वडोदरा अधिवेशनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
  • १९९५ ते १९९८ पर्यंत डॉक्टर वसंत गोवारीकर हे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते.

डॉक्टर वसंत गोवारीकर यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

डॉ. वसंत रणछोड गोवारीकर यांचा जन्म 25 मार्च 1933 रोजी पुण्यात झाला. भारतातील पदवीनंतर डॉ. गोवारीकर यांनी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम विद्यापीठातून रसायन अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर आणि डॉक्टरेट पदवी घेतली. 

डॉक्टरेट संशोधनादरम्यान त्यांनी डॉ. एफएच गार्नर यांच्याशी केलेल्या सहकार्याचा परिणाम गार्नर-गोवारीकर सिद्धांतामध्ये झाला, जो घन आणि द्रव यांच्यातील उष्णता आणि वस्तुमान हस्तांतरणाचे अभिनव विश्लेषण होता. 

1959 ते 1967 या काळात इंग्लंडमधील त्यांच्या वास्तव्यादरम्यान, त्यांनी प्रथम हार्वेल येथे (ब्रिटिश) अणुऊर्जा संशोधन प्रतिष्ठानमध्ये आणि नंतर समरफिल्ड या रॉकेट मोटर्सच्या उत्पादनात गुंतलेल्या संस्थेमध्ये काम केले. 

त्यांनी ऑक्सफर्ड आणि केंब्रिज परीक्षा मंडळाच्या परीक्षकांच्या बाहेरील पॅनेलचे सदस्य आणि पेर्गॅमॉनचे बाह्य संपादकीय कर्मचारी म्हणूनही काम केले, जिथे त्यांनी अनेक वैज्ञानिक पुस्तके संपादित करण्यास मदत केली. 

डॉ. विक्रम साराभाई यांच्या सांगण्यावरून डॉ. गोवारीकर 1967 मध्ये थुंबा, तिरुअनंतपुरम येथील अंतराळ केंद्रात प्रॉपेलंट अभियंता म्हणून रुजू झाले. नंतर हे केंद्र इतर अवकाश संशोधन आस्थापनांसह १९७२ मध्ये विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) च्या छत्राखाली आले;

डॉ. गोवारीकर 1973 मध्ये केमिकल्स आणि मटेरियल ग्रुपचे संचालक बनले आणि शेवटी 1979 मध्ये केंद्राचे संचालक बनले आणि 1985 पर्यंत ते त्या पदावर राहिले.

भारतातील पहिले प्रक्षेपण वाहन, SLV3, व्हीएसएससीचे संचालक म्हणून त्यांच्या कार्यकाळात विजयी यश मिळवले. 

डॉ. गोवारीकर यांनी भारतातील प्रक्षेपण वाहनांसाठी गंभीर घन इंधन तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आणि प्रगत देशांच्या तुलनेत व्यावसायिक नेतृत्व प्रदान केले. 

इस्रोचा ‘सॉलिड प्रोपेलंट स्पेस बूस्टर प्लांट’ त्यांच्या नेतृत्वाखाली 5,500 एकर जागेवर उभारण्यात आला. सर्व धोरणात्मक कच्च्या मालाचे संशोधन, विकास आणि उत्पादन त्यांच्या कारभाराखाली उभारलेल्या विविध वनस्पतींमध्ये केले जाते. 

डॉ. गोवारीकर हे 1986 ते 1991 या काळात भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे (DST) सचिव होते. त्यांनी 1991 ते 1993 या काळात पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम केले. उल्लेखनीय योगदानांपैकी एक म्हणजे प्रथम स्थानिकांचा विकास.

मान्सूनचा अचूक अंदाज घेण्यासाठी हवामान अंदाज मॉडेल. त्यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि 1994 ते 2000 दरम्यान ते मराठी विद्या परिषदेचे अध्यक्ष होते.

गोवारीकर यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह फर्टिलायझर एनसायक्लोपीडिया (2008) देखील संकलित केले ज्यामध्ये रासायनिक रचना आणि सर्व खतांची माहिती असलेल्या 4,500 नोंदी होत्या. 

राष्ट्राने त्यांना 1984 मध्ये पद्मश्री आणि 2008 मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले. ते अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडियाने आर्यभट पुरस्काराचे प्राप्तकर्ता देखील आहेत. 

गोवारीकर यांचे 2 जानेवारी 2015 रोजी वयाच्या 81 व्या वर्षी निधन झाले.

FAQ

१. डॉ वसंत गोवारीकर यांचा जन्म कधी झाला?

मराठमोळ्या डॉक्टर वसंत गोवारीकरांचा जन्म दि. २५ मार्च १९३३ रोजी पुण्यात झाला. शाळेत असताना त्यांना नवनव्या कल्पना सुचायच्या, एकदा त्यांना वाटले, आपण मोटार बनवावी अवघे तेरा वर्षांचे असताना डॉक्टर गोवारीकर यांनी थेट अमेरिकेतील हेन्री फोर्डला पत्र लिहून आपली इच्छा कळवली होती.

२. डॉ वसंत गोवारीकर कोण होते?

प्रामुख्याने अवकाश संशोधन, हवामान शास्त्र आणि लोकसंख्या या क्षेत्रातील संशोधनात्मक अभ्यास भारतातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर वसंत रणछोड गोवारीकर यांनी केल. वसंत गोवारीकर यांना आपण संशोधक, शास्त्रज्ञ म्हणून ओळखतो.

३. डॉ. वसंत गोवारीकर यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला?

डॉ. वसंत गोवारीकर यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. त्याचबरोबर जगभरातून अनेक विविध सन्मान व प्रशंसाची थाप त्यांना मिळाली.
ऍस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया कडून आर्यभट्ट पुरस्कार सुद्धा डॉ. वसंत गोवारीकर यांना देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

४. वसंत गोवारीकर यांनी काय शोध लावला?

डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांनी १९८८ मध्ये हवामान खात्या मध्ये योगदान देते वेळी पावसाचा अंदाज वर्तवण्यासाठी, अचूक मॉडेलची निर्मिती केली. ज्याला गोवारीकर मॉडेल म्हणून ओळखले गेले.

५. डॉ वसंत गोवारीकर यांचा मृत्यू कधी झाला ?

दि. ०२ जानेवारी २०१५ रोजी म्हणजे वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांचे पुण्यात निधन झाले.

६. राष्ट्रीय विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो ?

राष्ट्रीय विज्ञान दिन, गोवारीकर यांनी १९८७ मध्ये भारत देशात विज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, २८ फेब्रुवारी या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉ. वसंत गोवारीकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवानंसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment