सर आयझॅक न्यूटन माहिती Sir Isaac Newton Information In Marathi

सर आयझॅक न्यूटन (१६४२ –  १७२७) आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंड मध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतींशी समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपा नामक पुस्तकांमध्ये मांडला.

त्या आधी केपलर ने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले होते, परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात ? यामागील महत्त्वाची कारणे माहीतच नव्हती. सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून, ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख व माहिती जाणून घेण्यासाठी खालील माहिती शेवटपर्यंत वाचा.

सर आयझॅक न्यूटन माहिती Sir Isaac Newton Information In Marathi

पूर्ण नाव सर आयझॅक न्यूटन
जन्म तारीख ४ जानेवारी, १६४२
जन्म स्थळ युनायटेड किंगडम
ओळख आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ
निर्मिती गतीचे नियम, गतींशी समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत
मृत्यू दि.२० मार्च १७२१ मध्ये

कोण होते सर आयझॅक न्यूटन ?

न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रांमध्येही उल्लेखनीय कार्य केले. त्यांनी गणिताच्या एका नवीन शाखेचा शोध लावला. कॅलक्यूलस या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. सर आयझॅक न्यूटन हे परावर्तक दुर्बीण तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते.

हे वाचा –

बिस्कीट मध्ये २२ होल असतात, दहा रुपयाच्या चिप्स पॅकेटमध्ये वीस मोठे, सहा छोटे आणि बाकी चा चुरा असतो, व्हाटस ॅप्प मधील कोणत्याहि स्माईलीला नाक नसते, असे बरेच शोध आपल्या सारख्या बऱ्याच जणांनी लावले असतील.

Sir Isaac Newton Information In Marathi

कोरोना सारखाच एक लॉकडाऊन १६६५ मध्ये इंग्लंडमध्ये लागू केला होता, त्यावेळी आत्ताच्या कोरोना सारखाच एक साथी प्लेग सर्वत्र पसरला होता आणि आता सारखेच तेव्हा पण रोग सर्वत्र पसरत होता.

सर्वत्र कॉरंटाईन लागू केलं होतं, याच वेळी नेहमी सारखंच पण थोडसं लेखी सफरचंद झाडावरून खाली पडलं आणि त्या खाली बसलेल्या सर आयझॅक न्यूटनने ते चुपचाप खाण्याऐवजी, हे खालीच का पडलं ? वर का नाही गेलं ? एखादी गोष्ट वर टाकली तर ती खालीच काय येते ? असे बरेच प्रश्न पडले त्याला पडले आणि त्यानंतर सुरू झाला तो म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा शोध.

न्यूटन जन्म व प्रारंभिक जीवन

इ.स १६४२ म्हणजेच ज्या वर्षी गॅलिलिओने आपले शेवटचा श्वास घेतला, त्याच वर्षी न्यूटनने आपला पहिला श्वास घेतला. सर आयझॅक न्यूटन चे बालपण तसं खूप बेकारीत गेले.

जन्मा पूर्वी वडिलांचा मृत्यू, लहानपणी अशक्तपणामुळे मरता मरता वाचणे, आईने दुसरे लग्न करून न्यूटनला आजोळी ठेवणे,, या सर्व गोष्टींचा त्याच्या बाल मनावर खूप मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे तो थोडा रागीट आणि एकलकोंडा बनला.

Sir Isaac Newton

न्यूटनच्या रागीटपणाची एखादं तर कहर झाली, जेव्हा त्यांनी आपल्या आईला आणि सावत्र वडिलांना जिवंत जाळण्याची धमकी दिली. न्यूटनच्या अशा वागण्याने त्याच्या आईने त्याला त्याच्या मामाकडे पाठवले.

पण मामाला कदाचित भाच्याबद्दल थोडी माया असावी, त्यामुळे त्यांच्या मामाने न्यूटनला केंब्रिज विद्यापीठात शिकण्यासाठी पाठवले. पण म्हणतात ना किस्मत बडी बुरी चीज है | कभी भी पलट जाती है |सर आयझॅक न्यूटनच्या बाबतीत पण अगदी असं झालं.

त्यांना केंब्रिजमध्ये ऍडमिशन तर भेटलं, पण त्यासाठी लागणारे पैसे जमवणे त्यांच्यासाठी एक मोठा टास्कच होता. कॉलेज मधल त्यांचं जीवन खूपच हलीकीच गेलं. कॉलेजमध्ये असतानाच, इंग्लंडमध्ये १६६५ ला ग्रेट प्लेगची साथ सुरू झाली. रोग जास्त पसरवू नये, म्हणून केंब्रिज विद्यापीठ बंद ठेवण्यात आलं.

सर आयझॅक न्यूटन पण आपल्या घरी आला, हे क्वारंटाईन एक वर्ष चालू राहील, याच एका वर्षामध्ये न्यूटनने गुरुत्वाकर्षणाची थेरी मांडली. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी एक सफरचंद खाली पडताना पाहिले आणि ते बघून त्यांच्या मनात गुरुत्वाकर्षणाची कल्पना आली.

सर आयझॅक न्यूटन यांच्या बद्दल मनोरंजक तथ्ये

 • सर आयझॅक न्यूटन यांना भलेही डोक्यावर सफरचंद पडल्यावर ती ग्रॅव्हिटीची आयडिया आली असेल, परंतु ग्रॅव्हिटीच्या पूर्ण सिद्धांत विकसित करण्यासाठी, त्यांना दोन दशकांचा वेळ लागला.
 • न्यूटन यांनी खूप वर्षां पर्यंत आपला रिसर्च जगापासून लपवून ठेवला. त्यांनी केलेल्या अविष्काराची लोक चेष्टा करतील अशी त्यांना भीती वाटत होती.
 • सर आयझॅक न्यूटन एवढे मोठे वैज्ञानिक असूनही, ते एक धार्मिक मनुष्य होते. त्यांनी स्वतः असे लिहिले आहे की, गुरुत्वाकर्षण आपल्याला ग्रहांच्या गती बद्दल सांगते, परंतु हे सांगू शकत नाही की, या ग्रहांना या गतीमध्ये कोणी सेट केले आहे, ते तर ईश्वरच आहे, जो या सर्व गोष्टीच कंट्रोल करतो.
 • सर आयझॅक न्यूटन यांचा बायबल वरती खूप विश्वास होता. ते बायबलला खूप खोलवर वाचत असत न्यूटन यांनी बायबल मधील गुढ अर्थ जाणून घेण्यासाठी, हिब्रू भाषा सुद्धा शिकली होती.
 • तुम्ही हे जाणून आश्चर्यचकित व्हाल की, आपण ज्या न्यूटनला एक महान वैज्ञानिक म्हणून ओळखतो त्यांनी आपल्या आयुष्यातील अर्धा वेळ हा सायन्स वरती काम करण्याऐवजी, धर्मात शिकण्यास घालवला आणि फक्त एवढेच नाही तर, न्यूटन यांनी सायन्स पेक्षा जास्त धर्म आणि इतिहासा वरती लेखन केले आहे.
 • न्यूटनच पहिले वैज्ञानिक होते, ज्यांनी सांगितले होते की, पृथ्वीही गोल नसून अंडाकृती आहे.
 • सूर्याकडे सतत पाहत राहिल्याने, सर आयझॅक न्यूटन यांना सनलाइट फोबिया झाला होता.
 • न्यूटन १६८९ पासून ते १६९० पर्यंत इंग्लंड संसदेचे सदस्य होते. असे म्हटले जाते की, संसदेमध्ये न्यूटन यांनी फक्त एकच वाक्य बोलले होते ते म्हणजे, थंडी खूप आहे, खिडकी बंद करा.
 • न्यूटन यांनी कधीही लग्न केले नाही. दि. २० मार्च १७२७ या दिवशी न्यूटन यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा, त्यांची सर्व संपत्ती त्यांच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात आली.
 • न्यूटन आपल्या वैज्ञानिक कामांमध्ये इतके गुंग झाले होते की, त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पारा आढळून आला होता. न्यूटन यांचा मृत्यू लंडनमध्ये दि.२० मार्च १७२१ मध्ये झाला होता.
 • जॉब यांच्या एप्पल कंपनीच्या आधीच्या लोगो मध्ये सर्वात आधी न्यूटन यांचा फोटो होता. या लोगो मध्ये एप्पलने न्यूटनच्या आयुष्यातील तो क्षण दाखवला होता, जेव्हा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखाली बसले होते आणि त्यांच्या डोक्यावरती सफरचंद येऊन पडले, ज्यामुळे त्यांना ग्रॅव्हिटीची आयडिया आली होती.
 • सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या मरणा आधी काही भविष्यवाणी केल्या, न्यूटन्याची पहिली भविष्यवाणी होती की येहुदी लोक पुन्हा एकदा इजराइल वरती कब्जा करतील आणि हि भविष्यवाणी खरी देखील ठरली. न्यूटन यांच्या दुसऱ्या भविष्यवाणीनुसार या जगाचा २०६० पर्यंत विनाश होणार नाही.
 • ज्या वर्षी महान वैज्ञानिक गॅलिलिओ गॅलिली यांचा मृत्यू झाला, त्याच वर्षी न्यूटन यांचा जन्म झाला होता.
 • ज्या सफरचंदाच्या झाडामुळे न्यूटन यांना ग्रॅव्हिटीची आयडिया आली, त्या झाडाचा वंशज आजही इंग्लंडमध्येच आहे. परंतु ओरिजनल झाड हे १८१५ ते १८२० या काळामध्येच नष्ट झाले होते.
 • त्या सफरचंदाच्या झाडाच्या लाकडाचा एक तुकडा सर आयझॅक न्यूटन यांच्या फोटो सोबत स्पेस मध्ये पाठवला आहे. कारण न्यूटन यांनी आपल्यासाठी आणि सायन्स साठी जे योगदान दिले आहे, त्यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले जाऊ शकतील आणि त्या झाडास शून्य ग्रॅव्हिटी चा अनुभव सुद्धा मिळू शकेल.

मित्रांनो हे होते, सर आयझॅक न्यूटन यांच्या आयुष्यातील काही रोचक तथ्ये.

आयझॅक न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षणाचा शोध

आपण लहानपणापासून म्हणजे न्यूटन नावाचा एक मुलगा सफरचंदाच्या झाडाखाली बसलेला निरीक्षण करतो, अभ्यास करतो आणि गुरुत्वाकर्षणाचा शोध लावतो. परंतु मित्रांनो या सफरचंदाच्या गोष्टी विषयी अनेक तज्ञांमध्ये महत्व मतांतरे आहेत.

Sir Isaac Newton

म्हणजेच काही जणांच्या मते, ही केवळ दंतकथा आहे तर काहीजणांच्या मते सत्यकथा. काही जणांच्या मते न्यूटन झाडाखाली बसलेला असतो तर, काही जणांच्या मते तो घराच्या खिडकीतून पडणारे सफरचंद बघतो.

मित्रांनो सर आयझॅक न्यूटन यांच्या अत्यंत जवळील व्यक्ती म्हणजे विल्यम्स स्टुपिली हे व्यक्ती प्रसिद्ध लेखक व वैज्ञानिक होते आणि यांनीच न्यूटनच्या जीवनावर सर्वात अधिक लेख लिहिले.

ते असं म्हणतात की, न्यूटनने ही गोष्ट त्यांना सांगितली होती. विल्यम्स स्टुपिली यांनी त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात त्यांचा उल्लेख केला आणि आजही हे पुस्तक रॉयल सोसायटीच्या लायब्ररीत जतन करून ठेवण्यात आलेले आहे.

या पुस्तकातील कथे नुसार न्यूटनला अभ्यासाची अत्यंत आवड होती. तो नेहमी पुस्तक घेऊन निसर्गाच्या सानिध्यात रमत असे. न्यूटन एक दिवस सफरचंदाच्या झाडाखाली बसला होता, इतक्यात अचानक जाणून एक सफरचंद खाली पडलं.

न्यूटनच्या मनात विचारांची साखळी तयार झाली. अनेक प्रश्न निर्माण झाले. हे सफरचंद थेट जमिनीवर का पडलं ? ते वर का गेलं नाही ? किंवा हवेत का तरंगला नाही ? असं त्यांचा मनात विचार येत.

मग त्याचा प्रवाह आकाशातील चंद्र उतारे यांच्यावर का पडत नाहीत, त्यांना पृथ्वी स्वतःकडे का आकर्षून घेत नाही, अशा असंख्य प्रश्नाच्या चिंतनातून व त्यावर केलेल्या सखोल अभ्यासातून, न्यूटनने १९६५ मध्ये गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जन्माला आणला.

या सिद्धांताला विरोध होऊ नये, म्हणून न्यूटनने त्याला सत्यात उतरवण्यासाठी गतीविषयक नियमांचा शोध लावला. प्रकाशाचा पांढरा रंग हा अनेक रंगांचा मिश्रण असतं, हा शोध लावला, तसेच दुर्बिणीचा शोध रिलीपर्स या शास्त्रज्ञाने लावला असला, तरीही उत्तम दर्जाचा टेलिस्कोप बनवला.

न्यूटनच्या अशा अनेक शोधांनी माणसाच्या जगण्या मरण्याला दिशा दिली. विविध शोध जन्माला आले. त्यांनी तरुण संशोधकांसाठी व्यासपीठ तयार करून दिलं. असे या महान शास्त्रज्ञाने उभा आयुष्य संशोधन कार्यासाठी वाहून घेतलं. मित्रांनो न्यूटनच्या या संशोधन कार्याला सलाम.

सर आयझॅक न्यूटन यांचे गतिविषयक ३ नियम

न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केले आहे. म्हणूनच त्याला जडत्वाचा नियम असे म्हणतात. आयझॅक न्यूटन एक महान प्रयोगशील भौतिक शास्त्रज्ञ तसेच महान गणितीज्ञ होते.

सर आयझॅक न्यूटन

न्यूटनचे गतीविषयक नियम सर्वमान्य झाले. न्यूटन यांना महान कार्यासाठी सन १७०५ मध्ये सर हा इंग्लंडचा राजकीय किताब मिळाला आणि ते सर आयझॅक न्यूटन म्हणून प्रसिद्ध झाले. सर आयझॅक न्यूटन यांनी गतीचे तीन नियम मांडले, आता आपण प्रत्येक नियम एकेक करून पाहूया.

न्यूटनच्या गतीविषयक पहिला नियम

भूपृष्ठाला समांतर असणारा टेबलावर एक गुळगुळीत कार्ड ठेवा, त्यावर जड पुस्तक ठेवा. पुस्तक उचलले न जाता कार्डबोर्ड झटक्यात खेचा, तुम्ही काय निरीक्षण केलं, पुस्तक टेबलावर पडलं, पुस्तकाचे जडत्व त्याची सुरुवातीची स्थिती बदलण्यास विरोध करतं, जी एकसमान असते.

याचा अर्थ असा की, पुस्तक कार्ड बोर्ड बरोबर हलत नाही आणि गुरुत्वाकर्षणामुळे टेबलावरच पडतं. एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल, तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहत.

यालाच न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम म्हणतात. एखाद्या वस्तूवर कोणतेही बल कार्यरत नसल्याने, ती वस्तू विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये असते, असं नव्हे. प्रत्यक्षात त्या वस्तूवर विविध बाह्य बलक कार्य करतात.

ती परस्परांना निष्पर करत असल्यामुळे, एकंदर परिणामी बल शून्य होतं. न्यूटनच्या पहिल्या नियमाने जडत्वाचे म्हणजेच वस्तूच्या गती विषयक अवस्था स्वतःहून न बदलण्याचं स्पष्टीकरण दिलं जातं.

त्याचप्रमाणे वस्तूच्या विराम अवस्थेत किंवा वस्तूच्या सरळ रेषेतील एकसमान गतीत बदल घडवून आणणाऱ्या किंवा बदलास प्रवृत्त करणाऱ्या बलाचं स्पष्टीकरण दिलं जातं. जडत्वाची सर्व उदाहरणं न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत.

न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम

तुम्ही तुमच्या मित्राला गच्चीवरून समान आकाराचे प्लास्टिक बॉल आणि रबरी बॉल खाली टाकायला सांगा, तुम्ही प्लास्टिक बॉल सहज झेलू शकता, कारण प्लास्टिकच्या बॉलचं वस्तुमान हे रबरी बॉलच्या वस्तुमानापेक्षा कमी असतं.

गतिमान वस्तू थांबवण्यासाठी लागणारे बल हे त्या वस्तूमानाच्या समानुपाती असावं, आता तुम्ही तुमच्या मित्राला एक चेंडू हळूच फेकायला सांगा आणि तुम्ही स्वतः तो झेलण्याचा प्रयत्न करा, आता तो चेंडू खूप जास्त वेगाने फेकायला सांगा आणि झेलण्याचा प्रयत्न करा.

जो चेंडू हळू फेकलेला आहे, तो झेलायला सोपा जातो. कारण त्याची गती कमी असते. फक्त वस्तुमान किंवा वेग हा बलाचा पुरेसा परिणाम घडवून, आणायला कारणीभूत नाही. पण त्यासाठी वस्तूचं वस्तुमान आणि वेग यांना एकत्र जोडणारा गुणधर्म अस्तित्वात असल्याचे दिसून येत. या गुणधर्मालाच न्यूटनने संवेग असं संबोधलं.

संवेगाने वस्तू मधील वेग मोजला जातो. वस्तूमध्ये सामावलेली एकूण गती म्हणजे संवेग. गणिताच्या दृष्टीने संवेग मोजण्यासाठी, वस्तूचे वस्तुमान आणि वेग यांचा गुणाकार केला जातो. P= m*v. संवेगाला परिमाण आणि दिशा दोन्ही असतं.

संवेगाची दिशा वेगाच्या दिशेने असते. संवेगाचे si एकक किलोग्रॅम, मीटर, प्रतिसेकंद आणि सेंटीमीटर प्रतिसेकंद जर वस्तूवर प्रयुक्त केलेलं असंतुलित बल वेगामध्ये बदल घडून आणत असेल तर, तेच बल संवेगातही बदल घडवतो.

वस्तूच्या संवेगात बदल घडून आणण्यासाठी, आवश्यक असणारे बल संवेग बदलाच्या दरावर अवलंबून असते. न्यूटनचा दुसरा नियम संवेग बदलाचे स्पष्टीकरण देतो. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी होतो.

न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम

न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या दोन नियमांमधून, बल आणि बलाचे परिणाम यांची माहिती मिळते. न्यूटनचा तिसरा नियम अन्य क्रिया करणाऱ्या दोन वस्तूंवर प्रयुक्त बलांमधील संबंधाचे वर्णन करतो.

निसर्गात बल एकांगी असूच शकत नाही, भले नेहमी जोडीनेच प्रयुक्त होत असतात, दोन वस्तूंमधील बल नेहमी समान आणि विरुद्ध असतात. ही कल्पना न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमांमध्ये मांडलेली आहे.

प्रत्येक क्रिया बलास समान परिमाणाचे एकाच वेळी घडणारे, प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. क्रिया आणि प्रतिक्रिया या बस स्पष्ट करणाऱ्या जोडीनेच प्रयुक्त होतात. ही एकाच वेळी कार्यरत असतात.

क्रिया आणि प्रतिक्रिया बले वेगवेगळ्या वस्तूंवर प्रयुक्त होतात आणि ही एकाच वस्तूवर प्रयुक्त नसतात. त्यामुळे ती मुले एकमेकांचा परिणाम नष्ट करू शकत नाहीत. न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम उदाहरणे – इथे अशी काही उदाहरणे आहेत की जी न्यूटनच्या गतीविषयक तिसऱ्या नियमावर प्रकाश टाकतात.

 • १)  जेव्हा बॅटने चेंडूला मारलं जातं, तेव्हा चेंडू सुद्धा समान प्रतिक्रिया बल विरुद्ध दिशेने प्रयुक्त करतो. चेंडूवर प्रयुक्त झालेल्या बलामुळे, त्याला जास्त वेळ प्राप्त होतो. बॅटचा पुढच्या दिशेने होणाऱ्या गतीचा वेग कमी होतो.
 • २) जेव्हा बंदुकीतून गोळी मारली जाते, तेव्हा बंदूक गोळीबार बल प्रयुक्त करते आणि त्यामुळे गोळीला अधिक वेग प्राप्त होतो. समान बल विरुद्ध दिशेने बंदुकीवर प्रयुक्त करते आणि बंदूक कमी वेगाने विरुद्ध दिशेला गतिमान होते.

संशोधनाची संपूर्ण कागद जळाल्याची घटना न्यूटनने आयुष्यभर का गुपित ठेवले होते? का न्यूटनने आयुष्यभर विवाह केला नाही ?

मित्रांनो न्यूटन हे मानशास्त्रज्ञ, गणिती व ज्योतिष तज्ञ होते. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत गती विषयक नियमांचा शोध, तसेच प्रकाशाचा पांढरा रंग हा अनेक रंगांचा मिश्रण असतं, असे अनेक शोध लावले.

या महान व्यक्तीचा जन्म १६४२ मध्ये नाताळच्या दिवशी झाला. न्यूटनचा जन्म म्हणजे परमेश्वराने जगाला दिलेली अनमोल अशी भेट. न्यूटनच्या आजारपणामुळे त्यांना जबरदस्त धक्का बसला होता, तब्येतीच्या निष्काळजीपणाने त्यांची तब्बेत बिघडली होती.

मात्र नियतीला त्याच्याकडून चमत्कार घडून आणायचा होता, म्हणून हे बाळ जगत कल्याणासाठी तब्बल ८५ वर्ष जगले. त्याच्या वडिलांच्या नावावरून त्याचं नाव ठेवण्यात आलं. त्याला आई हाच एकमेव आधार होता.

तेव्हा त्याची आई फक्त तीस वर्षाची होती, त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिचा दुसरा विवाह लावून दिला. आता न्यूटन एकाकी पडला होता, याच एकटेपणाने त्याला आकाशाकडे टक लावून पाहणे, सूर्य चंद्राची अवलोकन करणे, स्वतःच्या हाताने लहान लहान वस्तू तयार करणे, अशा गोष्टींची सवय लागली.

न्यूटन यांचे बालपणातील शोध  

 • मित्रांनो एकदा न्यूटनचे शिक्षक मुलांना पवनचक्की दाखवायला घेऊन गेले होते, ती पवनचक्की पाहून न्यूटन आश्चर्यचकित झाला. त्याने घरी येऊन उभेउभ पवन चक्कीची प्रतिकृती तयार केली. तिला फिरवण्यासाठी वाऱ्याची वाट न पाहता, त्याने एका बाजूला उंदीर ठेवला व दुसऱ्या बाजूला खाद्यपदार्थ उंदीर जेव्हा खाण्यासाठी धावायचा, तेव्हा पवनचक्की आपोआप फिरायची त्याचा हा प्रयोग पाहून, शिक्षक भारावून गेले होते.
 • याशिवाय न्यूटनने, लहान वयातच पाण्यावर चालणारी घड्याळे, यांत्रिक मोटारी, कंदीला पासून पतंग अशा अनेक वस्तू तयार केल्या होत्या. मित्रांनो न्यूटनच्या आईला त्याने शेतकरी बनावे अशी इच्छा होती, मात्र न्यूटला वेगळाच छंद होता, त्यांनी गॅलिलिओ, प्लेटो, यांचे पुस्तके वाचून काढले. मित्रांनो न्यूटन हा एक बुद्धिमान व्यक्ती होता. त्याने १६६१ मध्ये केंब्रिज विद्यापीठात प्रवेश मिळवला. विद्यापीठात शिक्षण घेत असताना, न्यूटनला पैशाची चणचण भासे, त्यासाठी तो श्रीमंत विद्यार्थ्यांची वाटेल ती कामे करे, तो गणितातील प्रमेय आपल्या पद्धतीने सोडू लागला, वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी न्यूटनने बायोलॉजी यांचा शोध लावला.

१६६४ मध्ये केंब्रिज विद्यापीठातील, प्रतिभावंत विद्यार्थी म्हणून त्याची निवड करण्यात आली. सर्वसामान्य माणसांना न पडणारे प्रश्न न्यूटनला कायम पडत असत. सूर्य, चंद्र व तारे याविषयी तो तासांचा विचार करत असे, अशा अनेक प्रश्नांच्या अभ्यासातून १६६५ मध्ये न्यूटने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत मांडला.

या सिद्धांतला तात्कालीन वैज्ञानिकांनी खूप विरोध केला होता. मात्र न्यूटनने न डगमुकता या शोधाच्या सिद्धतेसाठी सतत पाठपुरावा केला. गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांत नंतर न्यूटनने गतीचे तीन नियम शोधून काढले.

भौतिकशास्त्राच्या अभ्यासात तीनही नियमना अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. अगदी सायकल पासून ते रॉकेट पर्यंत न्यूटनच्या या नियमांचा कुठे कुठे संबंध हा येतोच.

मित्रांनो एक दिवस न्यूटन स्वतःला अंधाऱ्या खोलीत बंद केलं, खिडकीच्या दाराला एक छिद्र पाडलं, छीद्रा समोर एक प्रिझम बसवला सूर्यकिरणे प्रीझम वर पडू लागतात, भिंतीवर एक सप्तरंगी छटा ऊमटायची ती पाहून तो चकित झाला.

हा प्रयोग पुन्हा पुन्हा करून, अनुमान काढू लागला. सर्व बाबींचे विश्लेषण करून, त्यांने निष्कर्ष काढला की, पांढरा दिसणारा सूर्यप्रकाश हा अनेक रंगांचे मिश्रण आहे.

मित्रांनो न्यूटन हे अतिशय शांत वृत्तीचे होते. ते संपूर्ण जीवन अविवाहित राहिले. विवाह केल्यास आपल्या संशोधन कार्यास बाधा येईल याची त्यांना खात्री होती, म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्य वैज्ञानिक संशोधनास वाहून घेतलं.

एकदा न्यूटन चर्चमध्ये जाताना खोलीतील मेणबत्ती विजवायचे विसरले होते, त्यांचा आवडता कुत्रा डायमंड त्यांची प्रतीक्षा करत होता, तशातच अचानक उंदराला पाहून, डायमंडणे टेबलावर उडी मारली त्यामुळे जळती मेणबत्ती टेबलावर पडली आणि सर्व मौल्यवान कागद आगीत भस्मसात झाले.

न्यूटनने केलेल्या कित्येक महिन्याच्या मेहनतीचे, क्षणात राख रांगोळी झाली होती. न्यूटन चर्च मधून परतले तेव्हा ते दृश्य बघून अवाक झाले, परंतु तरीही न्यूटन शांत होते. ते आपल्या लाडक्या डायमंड जवळ गेले, त्याला प्रेमाने गोंजारलं.

आपल्या मालकाच्या प्रेमळ स्वभावाने डायमंड न्युटनचा पाय चाटू लागला. त्यांचे मित्र जॉन विकिन्स यावेळी त्यांच्यासोबत होते, त्या भयानक घटने नंतर ही न्यूटनचा शांतपणा बघून ते थक्क झाले. मात्र न्यूटनने ही घटना आयुष्यभर गोपनीय ठेवली, कारण लोक त्यांच्या संशोधनावर विश्वास ठेवणार नाहीत, याची त्यांना शंका वाटत होती.

सर आयझॅक न्यूटन यांचा मृत्यू

मित्रांनो पुन्हा यातून फिनिक्स भरारी घेत कागदांची रात्रंदिवस मेहनत करून, जोमाने कार्याला लागले. आयुष्यातील प्रत्येक घटना सकारात्मक असो की नकारात्मक, माणसाला शिकवण्यासाठी अशा घटनांना नशिबाचा भाग न समजता, आनंदाने स्वीकारायला हवे.

न्यूटन ने संपूर्ण जीवन जगत कल्याणासाठी खर्चाला  लावले, आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेने, जगाचा प्रसिद्ध गणितज्ञ, प्रसिद्ध तत्त्वेता व आधुनिक भौतिकीचे जनक सर आयझॅक न्यूटन यांनी दि. २० मार्च १७२७ रोजी जगाचा निरोप घेतला.

FAQ

१. न्यूटन का प्रसिद्ध होते ?

सर आयझॅक न्यूटन (१६४२ –  १७२७) आधुनिक काळातील अग्रगण्य शास्त्रज्ञ मानले जातात. त्यांचा जन्म इंग्लंड मध्ये झाला. त्यांनी गतीचे नियम, गतींशी समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आपल्या प्रिन्सिपा नामक पुस्तकांमध्ये मांडला. त्या आधी केपलर ने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे तीन नियम मांडले होते, परंतु ग्रह या नियमा प्रमाणे भ्रमण का करतात ? यामागील महत्त्वाची कारणे माहीतच नव्हती. न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून, ते नियम गणितीय पद्धतीने सिद्ध केले.

निष्कर्ष

मित्रहो, खालील लेखाद्वारे आम्ही आपणास न्यूटन यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment