द्रौपदी मुर्मू माहिती मराठी Draupadi Murmu Information In Marathi

द्रौपदी मुर्मू या प्रतिभाताई पाटील यांच्यानंतर भारत देशाला लाभलेल्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत. या केवळ दुसऱ्या महिला राष्ट्रपती नसून, त्या सर्वप्रथम आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत. द्रौपदी मुर्मू या भारत देशाच्या सर्वश्रेष्ठ पदावर विराजमान असून, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी खडतर प्रयत्न केले. संघर्षाने भरलेले त्यांचे जीवन व कुटुंबांमधील आर्थिक अडचणींचा सामना करत, द्रौपदी मुर्मू यांनी या विजयाच्या शिखरावर थेट उत्तुंग भरारी घेतली.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास द्रौपदी मुर्मू यांच्या जीवनाबद्दल माहिती दिलेली आहे. हा लेख व ही माहिती जाणून घेण्यासाठी, शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

द्रौपदी मुर्मू माहिती मराठी Draupadi Murmu Information In Marathi

नाव द्रौपदी मुर्मू
जन्म तारीख २० जून १९५८
जन्म स्थळ बैदापोसी गाव, मयूरभंज, ओडिशा
ओळख राजकारणी
पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी
वडिलांचे नाव बिराची नारायण तुडूळ
पतीचे नाव कै. श्याम चरण मुर्मू
व्यवसाय शिक्षक, सामजिक राजकर्ता, राजकारणी
अपत्य
राष्ट्रीयत्व भारतीय
धर्म हिंदू

कोण आहेत द्रोपदी मुर्मू ?

द्रोपदी मुर्मू या एक आदिवासी महिला राष्ट्रपती असून, त्या एक मृदूभाषी नेत्या आहेत. जिने असंख्य संघर्षांना सामोरे जात, कठोर परिश्रमाने ओडिशाच्या राजकारणामध्ये प्रवेश केला. २०२२ मध्ये द्रोपदी मुर्मू यांनी राष्ट्रपदाची निवडणूक जिंकली. यानंतर भारताच्या सर्वोच्च व सर्वश्रेष्ठ पदावर स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी व दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या. द्रोपदी मुर्मू यांनी  सर्वोच्च घटनात्मक पदांसाठी, संयुक्त विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवली होती.

Draupadi Murmu Information In Marathi

हे वाचा –

द्रोपदी मुर्मू प्रारंभिक जीवन आणि शिक्षण

द्रोपदी मुर्मू यांचा जन्म दिनांक २० जून १९५८ मध्ये ओडिशा राज्यातील उपरबेडा गावामध्ये एका संथाली आदिवासी कुटुंबामध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांनी द्रोपदी मुर्मू यांचे सर्वप्रथम नाव पुती तुडू असे ठेवले होते. परंतु शिक्षकांनी हे नाव बदलून, द्रोपदी असे नाव ठेवले. ओडिषाच्या मयूरभंज जिल्ह्यामध्ये असलेले ऊपरबेड हे एक छोटेसे गाव आहे. भारतामधील अतिदुर्ग व अविकसित आदिवासी ठिकाणांपैकी, एक ठिकाण आहे. व संथाल हा भारतातील सर्वात मोठ्या आदिवासी समुदायांपैकी, एक समुदाय आहे.

Draupadi Murmu

द्रोपदी मुर्मू यांनी अतिशय खडतर जीवन संघर्षामध्ये, गरिबीचा अनुभव बालपणापासूनच घेतला आहे. त्यांनी त्यांचे प्राथमिक शालेय शिक्षण त्यांच्या गावांमधीलच शाळेमध्ये पूर्ण केले. यानंतर त्यांनी भुवनेश्वर मधील रमादेवी महिला महाविद्यालयामधून कला शाखेमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. आदिवासी समुदायांपैकी विद्यापीठाचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या, द्रोपदी मुर्मू या त्या गावातील पहिल्या महिला होत्या.

द्रोपदी मुर्मू वैयक्तिक जीवन

भाजप पक्षाच्या नेतृत्वाखाली भारत देशाच्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी २००९ ते २०१५ या कालावधी मध्ये त्यांचे पती, दोन मुलं, आई, भाऊ, असे सर्व जवळचे नातेसंबंधी गमावले. मुर्मू यांना दोन मुलं आणि एक मुलगी अशी अपत्य होती.

त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सार्वजनिक नाहीत. त्यांचं लग्न श्याम चरण मुर्मू यांच्याशी झालं होतं पण लहान वयातच त्यांच्या पतीचं निधन झालं. त्यांना तीन मुलं होती, पण यातल्या दोन मुलांचा अकाली मृत्यू झाला.

त्यांचा एक मुलगा लक्ष्मण मुर्मूचा ऑक्टोबर 2009 मध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला. त्यावेळी लक्ष्मणचं वय फक्त 25 वर्ष होतं. तेव्हाच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृत्यूच्या आदल्या रात्री तो त्याच्या मित्रांसोबत भुवनेश्वरमधील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला होता.

तिथून परतल्यानंतर त्याची प्रकृती खालावली. तो तेव्हा आपल्या मामाच्या घरी राहत होता. घरी परतल्यावर त्याने आपल्याला झोपेची गरज असल्याचं सांगितलं. त्यावेळी त्याला झोपू देण्यात आलं.

पण सकाळी उशिरापर्यंत त्याने खोलीचा दरवाजा उघडलाच नाही. म्हणून मग पुढे खोलीत घुसून त्याला बाहेर काढण्यात आलं आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

२००९ च्या दरम्याने मुर्मू यांच्या एका मुलाचे निधन झाले व त्यानंतर तीन वर्षांनी लगेच २०१२ साली त्यांच्या दुसऱ्या मुलाचे रस्त्याच्या अपघातात निधन झाले.

मुलांच्या निधनाअगोदर द्रोपदी मुर्मू यांचे पती श्याम चरण मुर्मू यांचे निधन झाले होते. त्यांची मुलगी इतश्री ही ओडिषा मधील एका बँकेमध्ये काम करत आहे. मुलीचा विवाह गणेश चंद्र हेमब्रम यांच्याशी झाला आहे. ते रायरंगपूरचे रहिवासी असून त्यांना आद्यश्री नावाची मुलगी आहे.

Draupadi Murmu family

द्रोपदी मुर्मू यांची अध्यापनाची कारकीर्द

द्रोपदी मुर्मू या एक राजकारणी आहेत. हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु राजकारणामध्ये प्रवेश करण्या अगोदर त्या एक शाळा शिक्षिका म्हणून काम करत होत्या. द्रोपदी मुर्मू यांनी “श्री अरबिंदू इंटिग्रल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट रायरंगपूर या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक तसेच ओडिषा सरकारच्या पाटबंधारे विभागामध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून कारकीर्द केली.

आदिवासी समाजासाठी वकिली

द्रोपदी मुर्मू या सर्वात उल्लेखनीय कामगिरीपैकी एक म्हणजे आदिवासी समाजातील हक्कांसाठी व वकिली करणे होय.

झारखंड मध्ये राज्यपाल पदी कार्यकाळामध्ये द्रोपदी आणि आदिवासी सामुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले.

Draupadi Murmu narendra modi

शाळा, रुग्णालय, आणि प्रशिक्षण केंद्रांचे बांधकाम तसेच आदिवासी तरुणांमध्ये स्वयंरोजगार आणि उद्योजकता याला चालना देण्यासाठी त्यांनी काही कार्यक्रम केले.

आदिवासी समाजातील समस्या आणि त्यांच्या आव्हानांचा प्रत्यक्ष अनुभव आहे. द्रौपदी यांनी या समस्यांचे निराकरण केले.

आदिवासी जमाती मधील लोकांसाठी आरोग्य सेवा, रोजगाराच्या संधी आणि शिक्षण मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन केले.

द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकीर्द

१९९७ मध्ये द्रोपदी मुर्मू यांनी भारतीय जनता पक्ष अर्थात भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. यानंतर त्या रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून सुद्धा निवडून आल्या. २००० च्या दरम्याने द्रोपदी मुर्मू यांनी रायरंगपूर नगर पंचायतीच्या अध्यक्षाचे स्थान भूषवले. तसेच भाजप अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा म्हणून, सुद्धा त्यांनी कार्य केले व बिजू जनता दल युती सरकारच्या काळामध्ये द्रोपदी मुर्मू यांनी खालील पदांवर कार्य केले.

पद कार्यकाळ
रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार२००४
मत्स्यव्यवसाय आणि पशु संसाधन विकास मंत्रीदि. ०६ ऑगस्ट २००२ ते १६ मे २००४ पर्यंत
ओडिशाचे माजी मंत्री२०००
वाणिज्य आणि परिवहनचा स्वतंत्र प्रभार असलेले राज्यमंत्री०६ मार्च २००० ते ६ ऑगस्ट २०००
 • राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू ह्या एक शिक्षिका म्हणून काम करीत होत्या.
 • अनेक राजकीय पदांवर म्हणजेच आमदार राज्यपाल राज्य सरकारी मंत्री नगरसेविका यासारख्या पदांवर त्यांनी काम केले आहे.
 • आपल्या राजकीय कारकिर्दीला द्रौपदी मुर्मू यांनी 1997 मध्ये सुरुवात केली.
 • द्रौपदी मुर्मू या रायरांकपुर नगर परिषदेमध्ये नगरसेविका झाल्या तसेच काही काळ नगर परिषदेचे उपाध्यक्ष हे पद देखील त्यांनी भूषवले आहे.
 • जिल्हा परिषद सदस्य म्हणून 1997 मध्ये त्या निवडून आल्या.
 • भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी काम केले आहे.
 • ओरिसा सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून द्रौपदी मुर्मू यांना परिवहन आणी वाणिज्य खाते सांभाळण्याची संधी मिळाली.
 • ओरिसा सरकारचे राज्यमंत्री म्हणून पशुसंवर्धन व मत्स्य व्यवसाय हे खाते देखील त्यांनी संभाळले आहे.
 • मयूर भाजी जिल्हा भाजपचे अध्यक्ष पदही 2002 ते 2009 या कालावधीमध्ये मिळाले आहे.
 • झारखंडचे राज्यपाल पद सन 2015 मध्ये त्यांना मिळाले त्यांनी 2021 पर्यंत ते पद सांभाळले त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून कार्यरत होत्या.
 • ओडिसा मधील पहिल्या महिला आदिवासी नेत्या म्हणून भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झाल्या होत्या.

द्रोपदी मुर्मू झारखंडच्या राज्यपाल

दि.१८ मे २०१५ मध्ये द्रोपदी मुर्म यांनी झारखंडच्या राज्यपाल म्हणून शपथविधी पूर्ण केली. यानंतर त्या झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल बनल्या. भारतीय राज्याच्या राज्यपाल पदी नियुक्त झालेल्या, ओडिषा मधील आदिवासी समाजामधील द्रोपदी मुर्मू या पहिल्या महिला नेत्या होत्या.

२०१७ च्या दरम्याने झारखंडच्या राज्यपाल म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी छोटा नागपूर भाडेकरू कायदा १९०८  तसेच  संथाल परगणा भाडेकरा कायदा १९४९  मध्ये सुधारणा करण्यासाठी झारखंड विधानसभेने मंजूर केलेल्या विधायकाला संमती देण्यास नकार दिला.

या विधेयकामध्ये आदिवासींना त्यांच्या जमिनीचा व्यावसायिक वापर करण्याचे अधिकार देण्याची मागणी द्रोपदी मुर्मू यांनी या ठरावांमध्ये केली. तसेच जमिनीच्या मालकीमध्ये बदल होणार नाही. याचीही दक्षता घेण्यात आली.

द्रोपदी मुर्मू एन.डी.ए.च्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार २०२२

जून २०२२ मध्ये द्रोपदी मुर्मू यांनी २०२२ च्या निवडणुकांसाठी भारताच्या राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार म्हणून भाजप पक्षातून निवडणूक लढवल्या. यानंतर २०२२ च्या राष्ट्रपती पदाच्या मोहिमेचा भाग म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी भारत देशांमधील भाजप खासदार व इतर विरोधी पक्षांकडून स्वतःला  उमेदवारीसाठी पाठिंबा मिळवण्यासाठी, विविध राज्यांना भेटी सुद्धा दिल्या. द्रोपदी मुर्मू यांनी पूर्वोत्तर राज्यांना भेटी दिल्या. ओडिशाचा बीजेडी, झारखंड चा जे.एम.एम पक्ष, महाराष्ट्राचा शिवसेना, उत्तर प्रदेशाचा बसपा, कर्नाटकाचा जेडीएस व इतर अनेक प्रमुख विरोधी पक्ष यांना द्रोपदी मुर्मू यांनी भेट देऊन पाठिंबा प्राप्त केला.

देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी ऐतिहासिक विजय प्राप्त केला. या निवडणुकीमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षातील उमेदवार यशवंतराव सिन्हा यांना मोठ्या फरकाने पराभव केले. या निवडणुकीमध्ये द्रोपदी मुर्मू यांना २८२४ मतदान प्राप्त झाले. याशिवाय त्यांचा प्रतिध्वंदी उमेदवार यशवंत सिन्हा यांना १८७७ मतदान प्राप्त झाले.

द्रोपदी मुर्मू यांनी भारताच्या १५ राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली

दि. २५ जुलै २०२२ मध्ये द्रोपदी मुर्मू यांनी भारत देशाच्या १५ व्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. प्रतिभाताई नंतर भारत देशाचे दुसरे महिला राष्ट्रपती स्थान भूषवणारे, द्रोपदी मुर्मू ह्या पहिले आदिवासी नेत्या बनल्या.

संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भारताचे सर न्यायाधीश एन व्ही रमण यांनी त्यांना शपथ दिली. भारताचे निवृत्त मान राष्ट्रपती रामनाथ कोविंद व द्रोपदी मुर्मू शपथविधी सुरू होण्याच्या काही वेळा अगोदर एका औपचारिक मिरवणुकीमध्ये संसदेमध्ये प्रवेश केला.

भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी आपल्या दिलेल्या कणखर भाषणामध्ये, भारताच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड केल्याबद्दल खासदार व आमदारांचे मनःपूर्वक आभार मानून, त्यांना विनम्र अभिवादन केले.

जगामधील सर्वात मोठ्या लोकशाहीचे राष्ट्रपती म्हणून आपल्या पहिल्या अभिवादनामध्ये त्या म्हणाल्या, स्वातंत्र्य भारतात जन्मलेली मी देशाची पहिली राष्ट्रपती आहे. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांकडून ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या प्रयत्नांना गती द्यावी लागेल.

राष्ट्रपती बनलेल्या द्रौपदी मुर्मू या भारत देशाच्या –

 • स्वतंत्र भारतात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती आहेत.
 • सर्वात कमी वयात राष्ट्रपती बनल्या.
 • पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत.
 • भारत देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती आहेत.
 • दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहे.
 • ओडिशा राज्यातून येणाऱ्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहे.

द्रोपदी मुर्मू यांच्या गावात उत्साह

मुर्मू यांचे मुख्य गाव हे रायरंगपूर या ठिकाणी आहे. ज्यावेळी द्रोपदी मुर्मू या राष्ट्रपदी पदाच्या निवडणुकीमध्ये जिंकल्या, त्यावेळी गावामध्ये मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा केला गेला. गावामध्ये वीस हजार लाडू बनवण्यात आले. तसेच द्रोपदी मुर्मू यांच्या अभिनंदनासाठी १०० बॅनर सुद्धा लावण्यात आले. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली होती. रायरंगपूर मधील जनतेने द्रौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपतीपदी जिंकून येण्याबद्दल, गावामध्ये पूजा सुद्धा घातली होती .

द्रोपदी मुर्मू ह्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती

द्रोपदी मुर्मू यांनी दि. २५ जुलै २०२२ मध्ये राष्ट्रपती पदाचा शपथविधी कार्यक्रम पूर्ण केला. त्यावेळी त्यांचे वय हे ६४ वर्ष ३५ दिवस इतके होते. त्यामुळे भारत देशाच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बनण्याचा बहुमान द्रोपदी मुर्मू यांना मिळाला. या अगोदर सर्वात कमी वयाचे राष्ट्रपती होण्याचा विक्रम नीलम संजीव रेड्डी यांच्या नावावर होता. ज्यावेळी त्या राष्ट्रपती झाल्या तेव्हा त्यांचे वय हे ६४ वर्ष २ महिने ६ दिवस इतके होते. त्यांचा हा विक्रम द्रौपदी मुर्मू यांनी मोडला.

द्रौपदी मुर्मू यांचे प्रेरणास्थान

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू, या तिघांचे व्यक्तिमत्व व जीवन शैली द्रोपदी मुर्मू यांना खूप प्रभावित करते. त्यामुळे द्रोपदी मुर्मू आंबेडकर, गांधी व नेहरू यांना आपले आदर्श स्थान मानतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझ्यासाठी देवासमान आहे, त्यामुळेच मी आज राष्ट्रपती बनू शकले, असे राष्ट्रपती द्रोपदी मुर्म यांनी एका भाषणाद्वारे सांगितले.

द्रौपदी मुर्मू पुरस्कार आणि सन्मान

 • २००७ मध्ये द्रोपदी मुर्मू यांना ओडिषा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदारसाठी नीलकंठ पुरस्कार देऊन गौरवित केले.

द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल मनोरंजक तथ्ये

 • झारखंड राज्याच्या राज्यपाल पदी स्वतःचे स्थान निर्माण करणाऱ्या द्रोपदी मुर्मू पहिल्या महिला आदिवासी राजकारणी आहेत.
 • कोणत्याही भारतीय राज्याच्या पूर्णवेळ राज्यपाल बनणाऱ्या द्रोपदी मुर्मू या पहिल्या आदिवासी महिला आहेत.
 • द्रौपती मुर्मूला लहानपणापासूनच राजकारणात रस होता कारण ती लहान असताना तिचे वडील आणि आजोबा गावचे प्रमुख होते.
 • द्रोपदी मुर्मू या भारताच्या पहिल्या पंधराव्या राष्ट्रपती आदिवासी महिला आहेत.
 • नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 25 जुलै 2022 रोजी देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी त्यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पदाची शपथ दिली. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आणि भारताच्या १२व्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यानंतरच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला होता.
 • 2015 मध्ये, त्या झारखंडच्या नवव्या आणि पहिल्या महिला राज्यपाल बनल्या.
 • राष्ट्रपती पदाची निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी सर्वात तरुण राष्ट्रपती होण्याचा विक्रम स्वतःच्या नावे नोंदवला आहे.
 • 2016 मध्ये, मुर्मूने रांचीच्या कश्यप मेमोरियल आय हॉस्पिटलमध्ये तिच्या मृत्यूनंतर तिचे डोळे दान करणार असल्याची घोषणा केली.

द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

 • द्रोपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ साली मयूरभंज जिल्ह्यात बडीपोसी नावाचे गाव आहे, त्याच गावातल्या एका आदिवासी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. राजकारणाचा बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले. कारण त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही त्यांच्या गावचे सरपंच होते. १९७९ साली भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून बी. ए मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. द्रोपदी मुर्मू बालपणापासून धाडसी विचारांच्या होत्या. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, त्यांची श्याम चरण मुर्मू यांच्याशी ओळख झाली.
 • पुढे १९८० साली त्यांनी आपल्या परिवाराचा विरोध पत्करून शाम चरण यांच्याशी लग्न केलं आणि त्यापुढे पहाडपूरच्या निवासी झाल्या. राजकारणात येण्यापूर्वी द्रौपदी मुर्मू आहे. द्रोपदी मुर्मू या कॉलेजवर शिक्षिका म्हणून काम करायच्या.
 • १९८४ साली एक वाईट घटना घडली. द्रोपदी मुर्मू यांच्या तीन वर्षाच्या लहान मुलीचा निधन झाले. १९९७ साली आपल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पहिल्यांदा राजकारणात पाऊल ठेवलं. त्यासाठी रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून त्या निवडून आल्या आणि पुढे जाऊन, बीजेपीच्या तिकिटावर त्या दोन हजार ते २००४ या काळात रायरंगपूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देखील झाल्या २००० ते २००४ मध्ये ओडिशा राज्यात भारतीय जनता पक्ष आणि बिजू जनता दल यांच्यात युतीचे सरकार होतं. त्यावेळी द्रौपदी मुर्मू युतीच्या सरकारमध्ये मार्च २०१७ ऑगस्ट २००२ साल पर्यंत वाणिज्य आणि वाहतूक राज्यमंत्री होत्या.
 • तर २००२ ते २००४ या काळात व्यवसाय आणि पशुसंशोधन विकास राज्यमंत्री होत्या. पुढे २००४ ते २००९ या काळात सुद्धा त्या पुन्हा भारतीय जनता पक्षाकडून रायरंग पुढच्या विधानसभेवर निवडून आल्या आणि २००७ मध्ये तर ओडिषा विधानसभेने सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून त्यांचा नीलकंठ पुरस्कारांना सन्मान केला. पण यादरम्यान म्हणजे साधारण २००९ साली आणखी एक अकस्मात घटना घडली आणि ती म्हणजे त्यांच्या थोरल्या मुलाचे निध.न त्या घटनेने द्रौपदी मुर्मू पूर्ण खचून गेल्या की, त्यांना या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी चक्क आध्यात्मिक गोष्टींची मदत घ्यावी लागली.
 • त्यावेळी त्या काही काळ ब्रह्मकुमारीला जाऊन राहिल्या होत्या. या घटनेतून त्या सावरणार तेवढ्यात आणखी एक मोठा धक्का त्यांना मिळाला. २०१३ साली त्यांचा दुसरा मुलगा जग सोडून गेला.
 • पुढं बरोबर दोन ते तीन महिन्यांचा फरकान त्यांच्या आई आणि सख्खा भाऊ देखील वारला. या साऱ्या दुःखातून त्यांना वसंत मिळेल असं वाटत असतानाच, २०१४ साली त्यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचं म्हणजे त्यांच्या पतीचे देखील निधन झालं.
 • असं असताना द्रौपदी मुर्मू परिस्थितीच्या छाताडावर पाय ठेवून, ठाम उभे राहिले. कुणासाठी जगायचं हा प्रश्न उभा असताना, त्या मात्र जनतेसाठी उभा राहिल्या. पुढे जाऊन मग द्रौपदी मुर्मू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या.
 • साधारण २०१५ ते २०२१ पर्यंत झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून त्यांनी कार्यकाळ पाहिला. त्यावेळी एखाद्या भारतीय राज्यात राज्यपाल म्हणून नियुक्त झालेल्या, त्या ओडिशातल्या पहिल्या महिला आदिवासी नेत्या होत्या. त्यांच्या त्या कार्यकाळात त्यांनी २०१७ साली झारखंड सरकारने घेतलेला छोटा नागपूर टेंसी आणि संकल्प परागनाट्यांची हे कायदे रद्द करण्यासाठी प्रयत्न केले होते. कारण त्यानुसार झारखंडच्या स्थानिक आदिवासी लोकांची जमीन त्यांच्या परवानगीशिवाय विकास कामांसाठी वापरण्याची तरतूद त्या कायद्यात केलेली होती. पण द्रौपदी मुर्मू यांनी तेव्हा तो कायदा रद्द करण्यासाठी, रघुवीर दास यांच्या भाजपच्या सरकारला देखील धारेवर धरलं होतं.
 • सध्या त्या भारताच्या राष्ट्रपतीपदावर विराजमान होणारे, आदिवासी जमातीच्या पहिल्या आणि अनुसूचित जमातीच्या तिसऱ्या व्यक्ती आहेत. या आधी अनुसूचित जातीचा विचार केला तर, दलित समाजाचे दोन राष्ट्रपती झालेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे केअर नारायण आणि दुसरे रामनाथ कोविंद आणखी सांगायचं म्हणजे द्रौपदी सध्या भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती बनलेल्या आहेत. यापूर्वी केवळ प्रतिभाताई पाटील या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती राहिल्या.

द्रौपदी मुर्मू यांच्याबद्दल १० ओळी

 • द्रोपदी मुर्मू  देशाची पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती बनली.
 • द्रोपदी मुर्मू  आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी उडीसा सरकार साठी लिपिक म्हणून, आपल्या व्यवसायिक कारकीर्दीची सुरुवात केली.
 • पुढे त्या पाटबंधारे आणि ऊर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक झाल्या. नंतरच्या काळात त्यांनी शिक्षिका म्हणूनही काम केलं.
 • द्रोपदी मुर्मू १९९७ मध्ये रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले.
 • भारतीय जनता पक्ष आणि बीजू जनता दल युती सरकारच्या काळात त्या वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्री होत्या.
 • त्यानंतर रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातील आमदारही त्या झाल्या. त्यानंतर यशाची शिखरे असंच चढत असताना, त्यांना २००७ मध्ये उडीसा विधानसभेने, सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून नीलकंठ पुरस्काराने सन्मानित केलं.
 • पुढे त्यांनी २०१५ ते २०२१ या कालावधीत झारखंडच्या नव्या राज्यपाल म्हणून काम पाहिलं.
 • त्या मूळ उडीसा राज्यातील असून, पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या झारखंडच्या त्या पहिल्या राज्यपाल आहेत.
 • भारताच्या पहिल्या आदिवासी समाजाच्या द्रोपदी मुर्मू  महिला राष्ट्रपती आहे.
 • पण द्रोपदी मुर्मू  ह्या आज भारताच्या राष्ट्रपती बनल्या असल्या तरी, त्यांचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. बऱ्याच सामाजिक आणि वैयक्तिक संकटांना तोंड देताना, राष्ट्रपती पदापर्यंत द्रोपदी मुर्मू  यांनी मजल मारली.

FAQ

१. द्रौपदी मुर्मूच्या वडिलांचे नाव काय होते?

द्रौपदी मुर्मूच्या वडिलांचे नाव बिराची नारायण तुडूळ असे होते.

२. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत?

द्रौपदी मुर्मू झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल झाल्या. ओडीसा राज्यातील द्रोपदी मुर्मू  देशाची पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती बनली.

३ .द्रौपदी मुर्मू किती शिक्षित आहे?

राजकारणाचा बाळकडू त्यांना त्यांच्या घरातूनच मिळाले. कारण त्यांचे वडील आणि आजोबा हे दोघेही त्यांच्या गावचे सरपंच होते. १९७९ साली भुवनेश्वरच्या रमादेवी महिला महाविद्यालयातून बी. ए मध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

४. भारताच्या विद्यमान राष्ट्रपतींचे नाव काय आहे?

द्रोपदी मुर्मू यांनी दि. २५ जुलै २०२२ मध्ये राष्ट्रपती पदाचा शपथविधी कार्यक्रम पूर्ण केला. त्यावेळी त्यांचे वय हे ६४ वर्ष ३५ दिवस इतके होते. त्यामुळे भारत देशाच्या सर्वात कमी वयाच्या राष्ट्रपती बनण्याचा बहुमान द्रोपदी मुर्मू यांना मिळाला.

५. द्रौपदी मुर्मू कोणत्या जातीची आहे?

द्रोपदी मुर्म यांचा जन्म दिनांक २० जून १९५८ मध्ये ओडिशा राज्यातील उपरबेडा गावामध्ये एका संथाली आदिवासी कुटुंबामध्ये झाला.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास द्रौपदी मुर्मू यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परिवारासोबत नक्की शेयर करा . धन्यवाद .

Leave a comment