एकनाथ शिंदे माहिती मराठी Eknath Shinde Information In Marathi

एकनाथ शिंदे हे सध्या खूप चर्चेचा विषय आहे. एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी रात्री दिनांक, ३० जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री पदासाठी शपथ घेऊन, महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनले. २९ जून रोजी रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

त्यामुळे शिंदे यांना प्रचंड मत प्राप्त झाल्या कारणाने शिंदे यांना स्वतःचे नवे सरकार स्थापन करण्याची उत्तम संधी चालून आली. शिंदेने ३० जून रोजी रात्री महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन, स्वतःचे सरकार स्थापन केले.

एकनाथ कोण आहेत आणि त्यांचं राजकीय महत्त्व काय आहे ? हे सर्वांनाच माहिती आहे, आणि या सामान्य कार्यकर्त्याचा असमान्य नेतृत्व बनण्यापर्यंतचा प्रवास जाणून घेऊ.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या राजकीय नेत्याबद्दल माहिती दिलेली आहे ही माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.हा लेख तुम्ही शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

एकनाथ शिंदे माहिती मराठी Eknath Shinde Information In Marathi

पूर्ण नाव एकनाथ संभाजी शिंदे
जन्म तारीख ९ फेब्रुवारी १९६४
जन्म स्थळ महाबळेश्वर, सातारा .
शैक्षणिक पात्रताबॅचलर ऑफ़ आर्ट्स
शाळान्यू इंग्लिश हाई स्कूल
कॉलेजयशवंत राव मुक्त विद्यापीठ, महाराष्ट्र
धर्महिंदू
राष्ट्रीयत्व भारतीय
भाषामराठी, हिंदी, इंग्रजी
वैवाहिक स्थितीविवाहित
नेट वर्थ११.५६ करोड
व्यवसाय राजनेता (महाराष्ट्राचे मुख्यमंत्री)
राजकीय पक्षशिवसेना

एकनाथ शिंदे यांचे प्रारंभिक जीवन

एकनाथ यांचा जन्म दि. ०९ फेब्रुवारी १९६४ मध्ये महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी झाला. एकनाथ यांच्या वडिलांचे नाव संभाजी नवलु शिंदे व आईचे नाव गंगुबाई शिंदे असे होते. लहानपणी एकनाथ हे गरिबीच्या अभाबी शिक्षण घेण्यास असमर्थ राहिले.

हे वाचा –

वडिलांनी एकनाथ यांचे लग्न, लता शिंदे यांच्यासोबत करून दिले. ज्या एक व्यावसायिक महिला आहेत. लता शिंदे, व एकनाथ यांना श्रीकांत शिंदे नावाचे अपत्य आहे. श्रीकांत शिंदे हा एक एमबीबीएस डॉक्टर असून, तो खासदार सुद्धा आहे.

Eknath Shinde Information In Marathi

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्या कारणाने, लहानपणापासूनच म्हणजेच वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी शिंदे यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी, ऑटो रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.

त्यांनी बराच कालावधी ऑटो रिक्षा चालवली. यासोबतच अधिक पैसा मिळवण्याच्या उद्देशाने, दारू बनवणाऱ्या कारखान्यामध्ये सुद्धा शिंदे हे काम करत असत.

एकनाथ शिंदे कौटुंबिक माहिती

आईचे नाव गंगुबाई शिंदे
वडिलांचे नाव संभाजी शिंदे
पत्नीचे नाव लता शिंदे
अपत्य श्रीकांत  शिंदे ( डॉ. खासदार )
भावंडे प्रकाश संभाजी शिंदे
एकनाथ शिंदे फॅमिली

एकनाथ शिंदे यांचे शिक्षण

एकनाथ यांनी त्यांचे शालेय शिक्षण, ठाणे शहरांमधील न्यू इंग्लिश हायस्कूल मधून पूर्ण केले. या ठिकाणीच त्यांनी अगदी कमी वयामध्ये, शालेय शिक्षण पूर्ण करून, शाळा सोडली. यानंतर त्यांनी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी, रिक्षा चालकाचे कार्य केले.

Eknath Shinde

१९८० च्या दशकामध्ये शिंदे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन शिवसेना पक्षांमध्ये त्यांनी सामील होण्याचे ठरवले. २०१४ मध्ये भाजप व शिवसेनेमध्ये युती झाली व या युतीचे सरकार आल्यानंतर, एकनाथ यांना मंत्रीपद प्राप्त झाले.

त्यानंतर पुन्हा शिक्षण घेण्याच्या महत्त्वकांक्षेने एकनाथ यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून, परीक्षा देण्यास सुरुवात केली व त्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स या शाखेतून पदवी प्राप्त केली.

एकनाथ शिंदे यांची कारकीर्द

 • १९९७ मध्ये शिंदे हे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले. ते पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते.
 • यानंतर २००१ साली एकनाथ यांची ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेतेपदी नियुक्ती करण्यात आली.
 • २००२ च्या दशकामध्ये, एकनाथ यांनी पुन्हा एकदा ठाणे महानगरपालिकेचे अध्यक्ष पद भूषवले.
 • यानंतर महाराष्ट्र विधानसभेवर, निवडणुका लढवून २००४ मध्ये एकनाथ शिंदे विधानसभेत निवडून आले.
 • २००५ मध्ये शिवसेना पक्षाने एकनाथ यांच्या कार्याची पाहणी करता, त्यांना ठाणे जिल्हाप्रमुख पदावर नियुक्त केले.
 • पुन्हा एकदा शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेमध्ये निवडणुका लढवून २००९ च्या वेळेस ते पुन्हा विधानसभेद्वारे निवडून आले.
 • एकनाथ यांचा राजकीय प्रवास असाच हळूहळू वाढत गेला. यानंतर २०१४ च्या दरम्यान शिंदे हे महाराष्ट्र विधानसभेद्वारे, पुन्हा निवडून आले.
 • तसेच २०१४ ते २०१५ पर्यंत एकनाथ महाराष्ट्र विधानसभेतील, विरोधी पक्ष नेते म्हणून कार्यरत होते.
 • यानंतर २०१९ पर्यंत एकनाथ यांनी महाराष्ट्र सरकारचे, कॅबिनेट मंत्रीपद हाताळले. त्याबरोबरच ते ठाणे जिल्ह्याचे संवर्धन मंत्री सुद्धा होते.
 • २०१८ मध्ये शिवसेना पक्षनेतेपदी, शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री म्हणून एकनाथ यांची नियुक्ती करण्यात आली.
 • २०२० मध्ये शिंदे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. यानंतर दि. ३० जून २०२२ रोजी शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, शपथविधी कार्यक्रम पूर्ण केला व महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून स्वतःचे सरकार निर्माण केले.

एकनाथ शिंदे यांना मिळाला गुरु आनंद दिघे यांचा राजकीय वारसा

दि. २६ ऑगस्ट २००१ मध्ये राजकीय महान धर्मवीर, आनंद दिघे साहेब यांचा अपघाती मृत्यू झाला. परंतु आनंद दिघे साहेबांचा हा अपघाती मृत्यू नसून, त्यांची राजकीय वादावरून केली गेलेली हत्या आहे, असे जनतेचे म्हणणे आहे.

एकनाथ शिंदे गुरु आनंद दिघे

आनंद दिघे यांच्या अचानक निधनानंतर, ठाणे भागांमधील शिवसेनेचे, वर्चस्व कमी होऊ लागले. त्यामुळे ठाणे परिसरामध्ये, शिवसेनेचे वर्चस्व स्थिर ठेवण्यासाठी, शिवसेना पक्षाने ठाणे विभाग एकनाथ यांच्याकडे सोपवला.

अशाप्रकारे स्वतःच्या रांगड्या व कर्तुत्ववान व्यक्तिमत्वाने, एकनाथ यांनी ठाणे विभागांमध्ये शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा कायम फडकवत ठेवला.

शिवसेना पक्षासोबत धोक्याचे कारण

 • काही काळापासून, शिवसेना पक्ष हा स्वतःच्या मूळ तत्त्वांपासून लांबला जात असल्याचा, आरोप या पक्षा,वरती केला जात होता. त्यामुळे शिवसेना पक्ष हा कट्टर हिंदुत्ववादी पक्ष राहिलेला नाही, असे लोकांचे म्हणणे होते. त्यामुळे लोकांचा शिवसेना पक्षा बद्दलचा वाद हा वाढत गेला.
 • लोकांमध्ये शिवसेना पक्षांच्या आमदारांचाही, समावेश होता. गेल्या काही वर्षांपासून शिवसेना पक्षाचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकही सभा आयोजित केली नसून, कोणत्याही आमदाराला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे भेटले नसल्याचे, बोलले गेले.
 • परंतु लोकांचे असे म्हणणे होते की, उद्धव ठाकरे हे केवळ नावाचे मुख्यमंत्री असून, राष्ट्रवादीचे शरद पवार फक्त महाराष्ट्राचा सरकार चालवत आहे. अशा अवस्थेमध्ये शिंदे हे नेहमी आमदारांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्यासोबत, बैठका घेत आमदारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत होते.
 • यामुळे एकनाथ यांनी शिवसेनेच्या, आमदारांचा प्रचंड विश्वास जिंकून, योग्य वेळ साधता एकनाथ शिंदे यांनी पक्षा विरुद्ध बंडखोरी केली. या परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या बाजूला आमदारांची संख्या ही प्रचंड असल्या कारणाने बहुमताने एकनाथ हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनले.

एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी नेमणूक

महाराष्ट्राचे तिसावे मुख्यमंत्री, बनण्याचा मान एकनाथ यांनी पटकावला. एकनाथ हे कट्टर हिंदुत्ववादी व शिवसेना पक्षाचे नेते होते.

त्यांनी आनंद दिघे, साहेबांना आपले नेहमी गुरू मानले व त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन, त्यांनी नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या बहुमतामुळे शिंदे यांना महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनण्यास मदत केली.

यानंतर दिनांक ३० जून २०२२ रोजी गुरुवारी रात्री शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी कार्यक्रम पूर्ण केला.

एकनाथ शिंदे महत्वाचे विषय

 • एकनाथ साहेब यांची रिक्षा चालक ते मंत्री होण्यापर्यंतची यशोगाथा
 • धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांची भेट, यानंतर दिघे साहेबांच्या तालमीत कसे घडले ?
 • तुरुंगवास आणि शिंदे यांच्या जीवनातील वाईट काळ
 • राजकीय प्रगती, नगरसेवक, सभापती, आमदार, ते थेट मंत्री

एकनाथ शिंदे साहेब यांची रिक्षा चालक ते मंत्री होण्यापर्यंतची यशोगाथा

एकनाथ यांचा जन्म दि. ०९ फेब्रुवारी १९६३ साली सातारा जिल्ह्यातील, महाबळेश्वर येथे झाला आहे. इथेच ते राहिलेत. त्यांचे वडील मात्र कामासाठी ठाणे येथे वास्तव्यात होते. एकनाथ यांना चांगले शिक्षण मिळावे, म्हणून त्यांच्या वडिलांनी त्यांना ठाणे येथील महापालिका शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला.

पण घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे, त्यांना छोटी मोठी नोकरीही करावी लागली. लहानशा उद्योगांमध्ये त्यांनी कामेही केली तितकाच अभ्यासही केला. शिंदे नेहमी फर्स्ट क्लास मिळवत. ते दहावी उत्तीर्ण झाले.

पुढे शिकण्याची इच्छा तर होती, पण आर्थिक चणचण होती, कॉलेजची फी भरण्यासाठी कामावर जावं लागतं असे आणि कामावर गेले, तर कॉलेज चुकायच म्हणून त्यांनी शिक्षण सोडून, रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला.

धर्मवीर आनंद दिघे आणि त्यांची भेट, यानंतर दिघे साहेबांच्या तालमीत कसे घडले ?

यावेळी तेथील परिसरात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची खूपच चर्चा होती, त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची तरुणाईला भुरळ पडली होती, यात शिंदेंचा ही समावेश होता.

त्यांनी वयाच्या १८ व्या वर्षी एक कार्यकर्ता म्हणून शिवसेनेत प्रवेश केला, त्यावेळी एक काम पूर्ण करण्यासाठी, ते दिघे साहेबांची भेट घेण्यास आनंद आश्रमात गेले. आनंद आश्रमात दिघे साहेबांचा जनता दरबार भरायचा, तिथे जनतेच्या समस्या सोडवला जायच्या.

भेटी दरम्यान दिघे साहेबांची त्यांच्यावर इतकी मोहिनी पडली की, ते रोज आनंद आश्रमात जाऊ लागले. त्यांचे छोटे-मोठी कामेही करू लागले. तेथे अनेक कार्यकर्त्यांची ये जा असायची.

 तुरुंगवास आणि शिंदे यांच्या जीवनातील वाईट काळ

 • एकनाथ यांनी दिघे साहेबांना त्यांनी गुरु मानलं होतं. त्यांच्या अनेक आंदोलनांमध्ये ते सामील होते. १९८४ साली, एकनाथ बेळगाव आंदोलनात सामील झाले. त्यावेळी शिंदे यांचे वय २१ वर्षे इतकं होतं. या आंदोलनामध्ये, त्यांना तब्बल ४० दिवसांचा तुरुंगवासही झाला होता. नंतर तिथून ते पुन्हा ठाणे जिल्ह्यात आले. पुन्हा मोर्चा आणि आंदोलने सुरू केली, अनेक केस ही अंगावर घेतल्या. त्यांच्यातील चिकाटी आणि समाजकारणातील जिद्द पाहून, देखील साहेबांनी त्यांना किसन नगर येथील शिवसेना शाखेचा शाखाप्रमुख केले.
 • त्यावेळी त्यांचे वय फक्त २६ वर्ष होते, मलंगड यात्रा आणि आंदोलनांमध्ये ही त्यांनी चांगली कामगिरी बजावली. आणि ९० च्या दशकात संपूर्ण ठाणे हिंदुत्ववादी झालं होतं, ठाण्यात शिवसेना प्रचंड वेगाने वाढत होती, १९९७ साली देखील साहेबांनी शिंदे यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याचा आदेश दिला.
 • ही निवडणूक जिंकून शिंदे किसन नगर येथील नगरसेवक झाले, सर्व सुरळीत चालू असताना, त्यांच्यावर मात्र दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांचे कुटुंब सुट्टीमध्ये गावी गेले होते, तेव्हा तेथील नदीमध्ये बुडून शिंदे यांचा मुलगा आणि मुलगीचे निधन झाले. नंतर काही काळाने राज्यात गेले, आपले सर्व संपले, आता काही होऊ शकत नाही. असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले, पण या काळात दिघे साहेबांनी त्यांना चांगली साथ दिली आणि त्यांचे मनोबल वाढवले.
 • शिंदे यांना त्यांनी सभागृह नेते पदही दिले, त्यामुळे ठाण्यातील त्यांचे वर्चस्व वाढू लागले. पहिला दुःखातून ते जसे सावरले, तोवर अजून एक घटना घडली, तिथे साहेबांचे निधन झाले. संपूर्ण ठाणे जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, त्यानंतर त्यांनी कसेबसे स्वतःला सावरले.

राजकीय प्रगती, नगरसेवक, सभापती, आमदार, ते थेट मंत्री

 • दिघे यांच्या मृत्यूनंतर सर्वांना वाटलं होतं की, ठाण्यातील शिवसेना संपणार. पण अशावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्याची जबाबदारी शिंदे यांच्या हाती दिली. त्यानंतर ठाण्यात सुरु झालेलं, शिंदे नावाचा वादळ हळूहळू वाढत गेलं.
 • २००४ साली त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक लढवली, आणि ते आमदार म्हणून जिंकून आले. त्यानंतर लागोपाठ चार वेळा त्यांनी आमदार म्हणून, विजय मिळवला. संपूर्ण ठाण्यात जनसंपर्क वाढवला.
 • ठाण्यातील महानगरपालिका, विधानसभा, लोकसभा, सर्व निवडणुकांमध्ये शिंदे यांनी दिलेले उमेदवारच निवडून येऊ लागले. २०१४ च्या मोदी लाटेमध्येही ठाण्यातील त्यांचा बालेकिल्ला अबाधित राहिला. ठाण्यात नगरसेवक आमदार आणि खासदार सर्वांना विजय मिळवून दिला.
 • त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हा एम.बी.बी.एस डॉक्टर आहे आणि खासदारही आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मंत्रीपद देण्यात आले. त्यांनी वेगवेगळ्या खात्यांचे मंत्री म्हणून नेतृत्व केले. ते गृहमंत्री होते, सध्या त्यांच्याजवळ नगर विकास मंत्री हे खात आहे. आता त्यांचा प्रभाव फक्त ठाण्यातच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिंदे यांचा समर्थन करणार आहे.

एकनाथ शिंदे यांची विधिमंडळातील कामगिरी

सन २००४ ते २०१४ या दहा वर्षाच्या काळामध्ये, विधानसभेत विरोधी पक्षाचे आमदार या नात्याने एकनाथ शिंदे यांनी अनेक समस्यांवर व प्रश्नांवर नेहमी आवाज उठवला.

ठाण्यामधील महत्त्वाची क्लस्टर डेव्हलपमेंट योजना, तसेच ठाण्यासाठी मेट्रो, ठाणे आणि मुलुंडच्या दरम्याने नवे विस्तारीत ठाणे स्थानक, पाणीटंचाई या ठाण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयांसोबतच, पोलीस दलाचे आधुनिकरण, सागरी सुरक्षा, वाढती महागाई, राज्याच्या डोक्यावर वाढते कर्ज, अशा अनेक विषयांवरील त्यांची अभ्यासपूर्ण भाषणे सुद्धा गाजली.

एकनाथ यांनी विधिमंडळामध्ये अनेकदा स्वतःच्या भाषणातून टीका सुद्धा केल्यात.

एकनाथ शिंदे यांची मंत्री पदावरील कामगिरी

एमएसआरडीसीचे पुनरुज्जीवन

 • शिवसेनाचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पनेतील, मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग या प्रकल्पासाठी आणि राज्यामधील रस्ते विकासाला चालना प्रदान करण्यासाठी, एमएसआरडीसीची निर्मिती करण्यात आली. या निर्मिती द्वारे मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा देशातला पहिला एक्सप्रेस वे, मुंबईतील ५५ उड्डाणपूल आणि वांद्रे वरळी सी लिंक हे प्रकल्प साकारले जाणार आहेत.
 • विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडोर या एमएमआरडीए कडे असलेल्या प्रकल्पाची जबाबदारी आता एमएसआरडीसीकडे सोपवण्यात आली असून, ठाणे बोरिवली भुयारी मार्ग, गायमुख फाउंटन हॉटेल, घोडबंदर उन्नत मार्ग, वर्सोवा विरार सी लिंक अशा प्रकल्पाची नियोजन अंतिम टप्प्यामध्ये आहेत.

सार्वजनिक बांधकाम मंत्री

इसवी सन २०१४ च्या डिसेंबर महिन्यामध्ये, शिवसेनेने राज्यातील भाजप प्रणिती सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर, शिंदे यांच्याजवळ सार्वजनिक बांधकाम मंत्री हे पद सोपवण्यात आले. यानंतर एकनाथ यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अध्यक्ष स्थान भूषवले.

एकनाथ शिंदे यांची मालमत्ता

 • २०१९ च्या उपलब्ध अहवालानुसार, एकनाथ यांच्याकडे अंदाजे ०७ कोटी ८२ लाख रुपयांपर्यंत संपत्ती उपलब्ध आहे. त्यांच्याकडे एलआयसी व इतर पॉलिसींसह ५० लाख ०८ हजार ९३० रुपये आहेत.
 • शिंदे यांच्या जवळ मोटार व विविध दागिन्यांसह ८,०००,००० रुपयांहून जास्त किमतीची संपत्ती आहे. त्यांच्याजवळ उपलब्ध असणाऱ्या सर्व जमिनींची किंमत २८,००,००० आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे ३०,००,००० एवढी व्यावसायिक मालमत्ता उपलब्ध आहे.

एकनाथ शिंदे यांची शासन आपल्या दारी ही योजना नेमकी आहे तरी काय ?

 • छत्रपती संभाजी नगर मधील कन्नड येथे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी शासन आपल्या दारी या नवीन योजनेचा शुभारंभ केला असून, या काळात परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी होती. यावेळी एकनाथ म्हणाले की, सरकार आपल्या दारी म्हणजेच शासन आपल्या दारी ही योजना, सर्वसामान्यांना व शेतकऱ्यांना दिलासा देणारी असून, सर्वसामान्य शेतकऱ्यांचे समर्थन करणारी योजना आहे.
 • आपण पण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचू का शकत नाही ? असा विचार मी व देवेंद्र फडवणीस यांनी केला, या विचारातूनच या योजनेला खतपाणी मिळाले. व ही योजना आम्ही साकारली. असे म्हणत एकनाथ म्हणाले की, या योजनेसाठी ०१ लाख ४९ हजार ५७२ लाभार्थी आहे. तर ५५१ कोटी रुपयांचं साहित्य शेतकऱ्यांना या योजनेद्वारे वाटप केले जाणार आहे. यामध्ये सर्व योजनांचा समावेश करण्यात आलेला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले होते.

इर्शाळवाडीत, दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमधील अनाथ मुलांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार दत्तक अशी घोषणा केली गेली –

 • बुधवार दिनांक १९ जुलै २०२३ रोजी रायगड जिल्ह्यामधील, इर्शाळवाडी या गावातील भूस्थलखानामुळे २२ जणांचा मृत्यू झाला. या आपत्तीची जाणीव ठेवत, एकनाथ हे या दुर्घटनास्थळी पोहोचून त्यांनी इर्शाळवाडी गावातील लोकांचे सात्वन केले होते.
 • शनिवार दिनांक २२ जुलै २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे यांनी रायगड जिल्ह्यामधील, गावांमध्ये झालेल्या प्रचंड अपघातातील दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना मदत करतील व त्यांना दत्तक घेतील, अशी घोषणा जाहीर केली होती.
 • झालेल्या दुर्घटनेच्या आधारावर, मुख्यमंत्री शिंदे यांनी अनाथ मुलांबद्दल चिंता व्यक्त करत त्यांना दत्तक घेण्यासाठी एक मायेचे पाऊल उचलले. एकनाथ शिंदे यांनी असे सांगितले की, ०२ ते १४  वर्ष वयोगटातील या अनाथ मुलांची काळजी, श्रीकांत शिंदे फाउंडेशन तर्फे घेतली जाईल व या फाउंडेशनच्या तर्फे, या मुलांचे शालेय शिक्षण व इतर सर्व खर्च केला जाईल. तसेच प्रत्येक मुलाच्या शिक्षणासाठी या फाउंडेशन तर्फे एफडी सुद्धा केली जाईल.
 • इर्शाळवाडीतील झालेल्या भयानक अपघातामध्ये, झालेल्या प्रचंड नुकसानामुळे इर्शाळवाडी गावातील लोके ही प्रचंड हानीतून जात होती, याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना मदत करण्यास सुरुवात केली व बचाव कार्याचे मूल्यांकन सुद्धा केले होते. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी मृत व्यक्तीच्या कुटुंबांना पाच लाख रुपयांची मदत सुद्धा केली होती.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एम.एस.आर.डी.सी, एम.एम.आर.डी.ए, सिडको, आदी प्राधिकरणांच्या माध्यमातून सुरू असलेले महत्त्वपूर्ण प्रकल्प

 • वांद्रे वर्सोवा सी लिंक
 • नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग
 • मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग क्षमता विस्तार
 • ठाणे बोरिवली भुयारी मार्ग
 • ठाणे खाडी वरील वाशी येथे तिसरा पुल
 • ठाणे घोडबंदर उन्नत रस्ता
 • शिव कल्याण रुंदीकरण

एकनाथ शिंदे यांच्या मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात कमी करण्यासाठी विविध उपाय योजना

 • डेल्टा फोर्स च्या माध्यमातून गस्त वाढवली.
 • दरडी कोसळू नये, त्यासाठी संरक्षक जाळ्या रॉकबोल्टिंग आधी उपाययोजना केल्या गेल्या.
 • संपूर्ण महामार्गावर थर्मो प्लास्टिक पेंट आणि आवश्यक तिथे रंबलर केलं आहे.
 • स्पीड लिमिटचे पालन व्हावे, यासाठी सीसीटीव्ही आणि स्पीड गणनांच्या माध्यमातून उपाय योजना साकारले आहेत.
 • रस्त्याच्या कडेला आणि मध्यभागी मेटलबीम क्रॅश बॅरिअर आणि वायर रोप बॅरिअर लावले आहेत.
 • सेव्ह लाइफ फाउंडेशनच्या सहकार्याने झिरो फॅटीलिटी कॉरिडॉर योजनेची अंमलबजावणी सुरू केली गेली आहे.

FAQ

१. श्रीकांत शिंदे हा एकनाथ शिंदे यांचा मुलगा आहे का?

एकनाथ शिंदे यांना श्रीकांत शिंदे नावाचे अपत्य आहे. श्रीकांत शिंदे हा एक एमबीबीएस डॉक्टर असून, तो खासदार सुद्धा आहे.

२. एकनाथ शिंदे यांचा जन्म कधी झाला ?

एकनाथ शिंदे यांचा जन्म दि. ०९ फेब्रुवारी १९६४ मध्ये महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी झाला.

३. एकनाथ शिंदे आई वडिलांचे नाव काय ?

एकनाथ शिंदे यांच्या वडिलांचे नाव संभाजी नवलु शिंदे व आईचे नाव गंगुबाई शिंदे असे होते.

४. एकनाथ शिंदे यांनी कधी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली?

आमदारांच्या बहुमतामुळे एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री बनण्यास मदत केली. यानंतर दिनांक ३० जून २०२२ रोजी गुरुवारी रात्री एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी कार्यक्रम पूर्ण केला.

५. एकनाथ शिंदे यांनी कोणाला गुरु मानले होते ?

एकनाथ शिंदे यांनी दिघे साहेबांना त्यांनी गुरु मानलं होतं. त्यांच्या अनेक आंदोलनांमध्ये ते सामील होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment