गणेश चतुर्थी 2023 : ganesh chaturthi 2023 date time muhurt puja mantra history in marathi – भाद्रपद महिन्यात असणारा, गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील सर्वात महत्वाचा सण आहे, जो संपूर्ण भारतात आणि जगाच्या इतर भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. पौराणिक मान्यतेनुसार, भाद्रपद महिन्यात, शुक्ल पक्षातील, चतुर्थीच्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. हिंदू धर्मातील आराध्य दैवत म्हणजे सर्वांचा लाडका गणपती बाप्पा याचा हा सण सर्वत्र हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
गणेश चतुर्थी 2023 : ganesh chaturthi 2023 date time muhurt puja mantra history in marathi
या दिवशी लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणून तिची प्रतिष्ठापना करून 10 दिवस मनोभावे पूजन केले जाते.
गणेश चतुर्थी 2023 तारीख
गणेश चतुर्थी उत्सव साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येतो. हिंदू पंचांगानुसार श्री गणेश चतुर्थी हे मराठी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्ष चतुर्थीला केले जाणारे धार्मिक व्रत आहे. यावर्षी हा उत्सव 19 सप्टेंबर रोजी साजरा केला जाईल आणि हिंदू कॅलेंडरनुसार गणेश विसर्जन (अनंत चतुर्दशी) 28 सप्टेंबर रोजी आहे.
हिंदू कॅलेंडरनुसार, विनायक चतुर्दशी 2023 सोमवार, 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 वाजता सुरू होईल आणि मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी रात्री 8:43 वाजता समाप्त होईल. शिवाय, जर तुम्ही मध्य गणेश पूजा मुहूर्त पाहिला तर, तो सकाळी 11:01 वाजता सुरू होईल आणि दुपारी 01:28 पर्यंत चालेल. तो कालावधी 02 तास 27 मिनिटांसाठी असेल.
गणेश चतुर्थीच्या आधी चंद्रदर्शन टाळणे महत्वाचे आहे, त्यामुळे 18 सप्टेंबर रोजी सकाळी 09:45 ते रात्री 08:44 पर्यंत चंद्रदर्शनासाठी निषिद्ध वेळ आहे.
गणेश चतुर्थीचा इतिहास
शिव पुराणातील कथेनुसार देवी पार्वतीचा पुत्र गणेशाचा जन्म या गणेश चतुर्थीच्या दिवशी झाला होता. म्हणून भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
एके दिवशी देवी पार्वती स्नानासाठी जात असताना तिने चन्दनापासून निर्मित अश्या बालकाला द्वारपाल म्हणून नेमले. जेव्हा ती स्नान करत होती त्यावेळी श्री भगवान शंकर तिथे आले. त्यावेळी या बालकाने प्रभू शिवांना रोखले आणि दोघांमध्ये वाद झाला.
पार्वतीचा एक आज्ञाधारक मुलगा असल्याने, या बालकाने आपल्या आईच्या आज्ञेचा आदर केला आणि भगवान शिवाला सभागृहात प्रवेश दिला नाही. यामुळे भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी या बालकाचे मस्तक शरीरापासून वेगळे केले. हे पाहिल्यानंतर देवी पार्वतीने काली अवतारात धारण करून, क्रोधाने विश्वाचा नाश करण्याची धमकी दिली. त्यामुळे सर्व देवी देवता त्यांची प्रार्थना करून क्षमा मागू लागले.
नक्की वाचा 👉गणेशोत्सवात बांधली जाणारी माटोळी म्हणजे काय ? वाचा सविस्तर
त्यावेळी देवी पार्वती शांत झाल्या आणि पुत्राला पुनर्जीवित करावे, आणि त्या पुत्राला सर्वात उच्च स्थान दिले जावे अशी मागणी महादेवांकडे केली. महादेव देवी पार्वती यांच्या मागणीला होकार देऊन आपल्या गणांना आदेश दिला की, पृथ्वीतलावर जा आणि सगळ्यात आधी तुम्हाला जो प्राणी दिसून येईल त्याचे शीर कापून घेऊन या. गण पृथ्वीतलावर गेले त्यावेळी त्यांना सर्वप्रथम हत्ती हा प्राणी दिसून आला. मग त्या हत्तीचे शीर कापून घेऊन महादेवासमोर हजर झाले. तेच हत्तीचे शीर महादेव यांनी त्या पुत्राच्या धडावर लावले. आणि त्या पुत्राला पुनर्जीवित केले.
नक्की वाचा 👉कोकणातील गणेशोत्सव : एक अद्भुत आनंद सोहळा
यानंतर महादेव, पार्वती यांनी त्याचा स्वपुत्र म्हणून स्वीकार केला. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मूख या दोघांचा मिळून गजानन असा अर्थ होतो. त्याचप्रमाणे महादेवाने या पुत्राला गणांचा देव म्हणून गणेशाचे नाव प्रदान केले आहे. हे सगळे प्रकार घडले तो दिवस भाद्रपद शुक्ल चतुर्थीचा होता. म्हणून या दिवसापासून गणेश चतुर्थीला महत्त्व प्राप्त झाले असून आपण हा दिवस मोठ्याने आनंदात साजरा करतो.
गणेश चतुर्थीचे महत्त्व
गणेश चतुर्थी हा हिंदूंसाठी भगवान गणेशाचा जन्म साजरा करण्याची आणि बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्यासाठी त्यांचे आशीर्वाद मिळविण्याची वेळ आहे. हा सण कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी एकत्र येण्याचा आणि साजरा करण्याचा एक काळ आहे.
हिंदू धर्मात भगवान श्री गणेशाला प्रथम पूजेचा मान असतो. कोणत्याही कार्य असल्यावर सर्वात आधी भगवान गणेशाची पूजा केली जाते. संकटाचा नाश करणारा, अडथळे दूर करणारा आणि आनंदी वातावरण निर्माण करणारा असा हा विघ्नहर्ता, गणपती म्हणून गणेश चतुर्थी साजरी केली जाते.
गणेश चतुर्थी 2023 शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थी 2023 प्रारंभ आणि समाप्ती तारीख
गणेश चतुर्थी 2023 प्रारंभ तारीख – | मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 |
गणेश चतुर्थी 2023 शेवटची तारीख – | गुरुवार, सप्टेंबर 28, 2023 |
मध्यान्ह गणेशपूजेचा मुहूर्त – | 11:01 AM ते दुपारी 01:28 |
कालावधी – | 02 तास 27 मि |
गणेश चतुर्थी तिथी सुरू – | 18 सप्टेंबर, दुपारी 12:39 वाजता |
गणेश चतुर्थी तिथी समाप्त – | 19 सप्टेंबर, दुपारी 1:43 वाजता |
चंद्रदर्शन टाळण्यासाठी आदल्या दिवशीची वेळ – | 18 सप्टेंबर दुपारी 12:39 ते रात्री 08:10 |
कालावधी – | 07 तास 32 मि. |
चंद्रदर्शन टाळण्याची वेळ – | सकाळी 09:45 ते 08:44 PM |
कालावधी – | 10 तास 59 मि. |
गणेश विसर्जन 2023 कधी आहे? – | गुरुवार, सप्टेंबर 28, 2023 |
गणेश चतुर्थी मंत्र
|| ॐ गं गणपतये नमः ||
|| ॐ श्री गणेशाय नमः ||
हा मंत्र अडथळे दूर करण्यास आणि सौभाग्य आणण्यास मदत करणारा आहे.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
अर्थ – वक्राकार सोंड आणि विशाल शरीर आणि कोटी सूर्यासारखी महान प्रतिभा असलेले भगवान श्री. गणेश, आम्हाला आमच्या सर्व कार्य कोणत्याही अडथळा विना पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद द्या.
एकदंताय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
महाकर्णाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
गजाननाय विद्महे, वक्रतुण्डाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात्।।
ॐ श्रीम गम सौभाग्य गणपतये
वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥
अर्थ – या मंत्राचा जप केल्यामुळे आपल्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात. हा सण आर्थिक प्रगती आणि समृद्धी परिदान करणारा असा आहे. आपल्या मनातील मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपतीची साधना करावी. कोणत्याही प्रकारचे कार्य सुरू करण्यापूर्वी वरील मंत्रांनी भगवान गणेशाचे स्मरण अवश्य करावे. त्यामुळे तुमची शुभकार्य निश्चितच सिद्ध होतील.
गणेश चतुर्थी पूजन कसे करावे
गणेश चतुर्थीच्या या 10 दिवसांच्या कालावधीत 16 विधी केले जातात. त्यापैकी आम्ही त्यांना 4 प्रमुख विधी म्हणून वर्गीकृत करू शकतो
आवाहन आणि प्राणप्रतिष्ठा विधी
गणपतीच्या मूर्तीला पवित्र करण्यासाठी हा विधी केला जातो. ‘दीप-प्रज्वलन’ आणि ‘संकल्प’ केल्यानंतर, हे भक्तांचे पहिले पाऊल आहे. भगवान गणेशाला मंत्र पठणाने आदरपूर्वक आमंत्रित केले जाते आणि पंडाल, मंदिर किंवा घरात ठेवलेल्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा जाते.
- सर्वप्रथम सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावे.
- त्यानंतर पूजेची सर्व तयारी करावी.
- त्यानंतर सोवळे नेसावे.
- घरातील देवाची पूजा करावी.
- ज्या ठिकाणी गणपतीची मूर्ती स्थापन करणार त्या ठिकाणी चौरंग किंवा पाठ ठेवावा.
- त्यावर लाल रंगाचा कपडा घालावा व त्या कपड्यावर थोडेसे तांदूळ ठेवून नंतर गणपतीची मूर्ती स्थापन करून घ्यावी.
- दोन बाजूला समया लावून घ्याव्या.
- त्यानंतर दूर्वा पाण्यात बुडवून गणपतीच्या मूर्ती दर्शन करून तसेच गणपतीच्या पूजेच्या साहित्यावर शिंपडून घ्यावे.
- गणेशाचे पाय धुतल्यानंतर, मूर्तीला दूध, तूप, मध, दही, साखर (पंचामृत स्नान) त्यानंतर सुगंधी तेल आणि नंतर गंगाजलाने स्नान केले जाते.
- गणपतीच्या मूर्तीला जानवे घालावे.
- मंत्रोच्चाराने श्री गणेशाचे आवाहन आणि प्राणप्रतिष्ठा करावी.
श्री गणेश पूजन
पुढील पायरीमध्ये 16 चरण पूजेची म्हणजेच षोडशोपचार परंपरा समाविष्ट आहे ज्यात संस्कृतमध्ये ‘षोडशा’ म्हणजे 16 आणि उपचारा म्हणजे ‘श्रद्धेने देवाला अर्पण करणे.
- श्री गणेशाला फुलांची माळ घालावी.
- त्यानंतर नवीन वस्त्र/वस्त्रे अर्पण करावी. (वस्त्र, उत्तरीय समर्पण)
- नंतर गणपतीच्या मूर्तीला चंदन, हळद, कुंकू, गुलाल लावून घ्यावा.
- गणपतीच्या मूर्तीला फुले वाहावीत.
- गणपतीच्या मूर्तीला 21 पत्री वाहावीत. (जाणून घ्या 👉गणपतीच्या पूजेतील 21 पत्री )
- गौरी आणि गणपतीच्या मूर्तीला लाल वस्त्रे वाहवित.
- फुलांसह, अखंड तांदूळ (अक्षता), हार, सिंदूर आणि चंदन. मूर्तीला मोदक, सुपारीची पाने, नारळ (नैवेद्य) अगरबत्ती, दिवे, स्तोत्र, मंत्रजप देऊन धार्मिक रीतीने सजवावे.
- गणपतीच्या मूर्तीला मिठाई, मोदकांचा तसेच पंचामृताचा नैवेद्य दाखवावा.
- त्यानंतर मूर्ती समोर अगरबत्ती लावावी.
- गणपती मूर्तीच्या बाजूला गौरीची मूर्ती एका कलशामध्ये स्थापन करून घ्यावी. त्यानंतर तिला हळद-कुंकू वाहून फुले वहावित.
- त्यानंतर गौरीच्या मूर्तीला देखील निरांजन आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे. त्यानंतर गणपतीला देखील निरांजनाने आणि अगरबत्तीने ओवाळून घ्यावे.
- “ओम गं गणपतये नमः” मंत्राने पूजा सुरू करा.
- गणपतीच्या मंत्रोच्चाराने यथासांग पूजा करावी.
- गणपतीला धूप दाखवून संपूर्ण घरामध्ये धुपारती करावी.
- विनायक कथा, गणेश स्तोत्र आणि गणेश अथर्वशीर्ष चा जप करा.
- त्यानंतर गणपतीची कापूर लावून आरती करावी.
- निरंजन आरती, पुष्पांजली अर्पण, प्रदक्षिणा या चरणांचा क्रम आहे.
- पहिल्या दिवशी गणपतीच्या आवडीचे मोदक यांचा तसेच पंचपक्वानांचा नैवेद्य दाखवावा.
- हे दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानले जातात त्यामुळे ज्यांना घरी गणपती आणता येत नाही ते मंदिरात जाऊन गणपतीला लाडू आणि दुर्वा अर्पण करून प्रार्थना करू शकतात.
उत्तरपूजा विधी
ज्याप्रमाणे आपण गणेश चतुर्थी या दिवशी गणेशाची स्थापना करून पूजा करतो, त्याच पद्धतीने गणपतीची विसर्जन पूजा देखील केली जाते. शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपतीची पूजाअर्चा करून विसर्जन केल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, समाधान लाभते.
- सर्वप्रथम गणपतीला फुलांचा हार घालावा. त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्याव्यात.
- त्यानंतर लाल वस्त्र वहावीत. गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा, जास्वंदीची फुले व्हावीत.
- यानंतर अगरबत्ती लावावी. आणि घंटा वाजवून अगरबत्तीने ओवाळावे.
- त्याचप्रमाणे तुपाचे निरांजन लावून, घंटा वाजवून, तुपाचे निरांजनाने ओवाळावे. गणपतीसाठी तयार केलेला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर विडा, सुपारी सुटे, पैसे यावर पाणी वहावे.
- गणपतीची मनोभावे आरती करावी. आरती झाल्यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावे.
- मंत्रपुष्पांजली नंतर पूजेच्या अक्षता आणि फुले गणपतीला वहावीत.
- विसर्जनापर्यंतच्या पूजेमध्ये अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमा याचना करावी.
- उपस्थित असलेल्या कुटुंबातील सर्वांनी गणपतीला फुले, अक्षता वाहून नमस्कार करून घ्यावा.
- त्यानंतर गणपतीवर उत्तर पूजेच्या अक्षता वाहून गणपती जागेवरून थोडासा हलवायचा आहे.
विसर्जन
- गणपतीच्या मूर्तीच्या विसर्जनासोबत पूजा साहित्य, त्याचप्रमाणे निर्माल्य आणि इतर वस्तू विसर्जित करावे.
- गणपतीचे विसर्जन झाल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटावा.
- विसर्जन हा गणपतीच्या आशीर्वादाबद्दल आभार मानण्याचा प्रतीकात्मक मार्ग आहे.
गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित करण्याचा हा शेवटचा विधी आहे. विसर्जनाला जाताना, लोक “गणपती बाप्पा मोरया, पूर्ण वर्षा लौकर या” (गणपतीचा जयजयकार) असा जयघोष करतात. विशेष म्हणजे, हा गणपती विसर्जन कार्यक्रम संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
हिंदू कॅलेंडरनुसार गणेश विसर्जन (अनंत चतुर्दशी) 28 सप्टेंबर रोजी आहे.
गणेश चतुर्थी मध्ये काय काय करावे ?
- गणेश चतुर्थी हा हिंदूंसाठी एकत्र येण्याचा आणि भगवान गणेशाचा जन्म साजरा करण्याची आणि बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेण्याची वेळ आहे.
- घरात या दिवसांत वातावरण सात्विक आणि भक्तिमय ठेवावे.
- गणेशोत्सवाचे दिवस भजन कीर्तन यामध्ये व्यतीत करावे.
- गणपतीला प्रार्थना करण्यासाठी आणि उत्सवाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सार्वजनिक गणेशाच्या पंडालला भेट देऊ शकता.
आमचे गणपती स्पेशल लेख नक्की वाचा👇
- गणेश चतुर्थी 2023 तारीख, इतिहास, मुहूर्त, शुभ योग, मंत्र आणि पूजाविधी, विसर्जन
- हरतालिका पूजन संपूर्ण माहिती
- गणेश चतुर्थी संपूर्ण माहिती
- संकटनाशन गणेश स्तोत्र
- ऋषिपंचमी संपूर्ण माहिती
- गौरी आवाहन – पूजन संपूर्ण माहिती आणि पूजविधी
- श्री गणेश विसर्जन संपूर्ण माहिती
प्रश्नोत्तरे
2023 च्या गणपतीची तारीख काय आहे?
या वर्षी मंगळवार, १९ सप्टेंबरपासून गणेश चतुर्थीला सुरुवात होणार आहे .
गणेश विसर्जन 2023 कधी आहे?
यावर्षी गणेश विसर्जन 2023 गुरुवार, 28 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.
गणेश चतुर्थीची सुरुवात कोणी केली?
ऐतिहासिक पुरावे असे सूचित करतात की छत्रपती शिवाजी महाराजांनी संस्कृती आणि राष्ट्रवादाचा प्रचार करण्याचा एक मार्ग म्हणून उत्सव सुरू केले.
2023 मध्ये गणेश चतुर्थी पूजेची वेळ किती आहे?
मध्यान्ह गणेश पूजेचा मुहूर्त सकाळी 11:01 वाजता सुरू होईल आणि दुपारी 01:28 पर्यंत चालेल. हा कालावधी 02 तास 27 मिनिटांसाठी असेल.
गणेश चतुर्थी 10 दिवसांची की 11 दिवसांची?
10 दिवस चालणाऱ्या गणेश उत्सवाची सांगता गणेश विसर्जन म्हणून होणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार गणेश विसर्जन (अनंत चतुर्दशी) 28 सप्टेंबर रोजी आहे.
निष्कर्ष
मित्रांनो, मराठी झटका डॉट कॉम या वेब पेज द्वारे गणेश चतुर्थी या सणाबद्दल कथा, पूजाविधि, गणेश चतुर्थी का साजरी केली जाते? याबाबतची सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. आपल्याला ही माहिती वाचून कशी वाटली? कमेंट करून आम्हाला नक्की कळवा.