राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी | Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी | Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi – आरक्षणाचे जनक, सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ, समतावादी लोकराजे राजर्षी शाहू महाराज एक लोक कल्याणकारी राजा होते. बहुजनांना शिक्षण, जातीभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणि स्त्रीमुक्तीसाठी कायदा करणारे, सुधारणावादी समाज सुधारक होते.

महाराष्ट्राला तीन प्रमुख समाज सुधारकांचा वैचारिक वारसा लाभल्यामुळे या राज्याला फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात.

एक माणूस एकाच आयुष्यात काय काय करू शकतो, हे सांगण्यासाठी माणसानं शाहू महाराजांकडे बोट दाखवावं असं त्यांचा आयुष्य. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास शाहू महाराजांबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही शेवट पर्यंत वाचा.

Table of Contents

राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी | Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

पूर्ण नाव राजर्षी शाहू महाराज
जन्मतारीख २६ जून १८७४
जन्मस्थळ कागल, कोल्हापूर
आईचे नाव राधाबाई
वडिलांचे नाव जयसिंगराव घाटगे
लोकांनी दिलेली पदवी राजर्षी, छत्रपती
राज्याभिषेक २ एप्रिल १८९४
पत्नीचे नाव लक्ष्मीबाई खानविलकर
मृत्यू ६ मे १९२२

कोण होते राजर्षी शाहू महाराज ?

  • राजर्षी शाहू महाराज यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मानवतावादी कार्याचा मोठा प्रभाव होता.
  • त्यामुळे गादी हाती आल्यानंतर त्यांनी सामाजिक सुधारणांचे कार्य केले. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार करण्यावर विशेष भर दिला.
  • त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला.
  • त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून, विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली.
  • राधानगरी धरणाची उभारणी, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणे, अशा कार्यातून त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष दिले. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांचे शिक्षणासाठी तसेच मुकनायक या वृत्तपत्रासाठी ही सहकार्य केले.
  • शाहू महाराजांना राजर्षीही उपाधी कानपूर मधील क्षत्रिय समाजाने दिली.
  • समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्वांना विकासाची समान संधी, ही तत्वे शाहू महाराजांनी अमलात आणली. म्हणूनच देशभरात त्यांचा महाराजांचे महाराज असा गौरव होतो.
  • त्यांनी सक्तीचे व मोफत शिक्षण दिले. गावोगावी शाळा काढल्या, मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना एक रुपया दंड करण्याची तरतूद केली.
  • व्यवसायासाठी आर्थिक मदत व प्रोत्साहन दिले.
  • अस्पृश्यांना व्यवसाय दिला. राजवाड्यातील कामे दिली.
  • सामाजिक बंधूभाव, समता, सुरक्षांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला-क्रीडा व आरोग्य इत्यादी, महत्त्वपूर्ण क्षेत्रात त्यांनी अद्वितीय कार्य केले.
  • छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व कार्याचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली.
  • महाराजांनी सुमारे 28 वर्षे राज्यकारभार चालवला व महान कार्य केले.
 Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

शाहू महाराजांचा जन्म व बालपण

राजश्री शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी घाटगे घराण्यात झाला. कोल्हापूर संस्थांचे राजे, चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गादीला वारस नव्हता, म्हणून महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी घाटगे घराण्यातील यशवंत जयसिंग घाटगे यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले आणि नामकरण झाले शाहू महाराज.

नक्की वाचा 👉👉छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण माहिती

शाहू महाराजांचे शिक्षण

राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक इसवी सन १८९४ ला पार पडला. महाराजांचे शिक्षण राजकोट आणि धारवाड येथे पार पडले. उच्च शिक्षणासाठी राजवाड्यात व्यवस्था करण्यात आली, त्याची जबाबदारी दिली ब्रिटिश अधिकारी याच्याकडे, इंग्लिश शिक्षणाचा शाहू महाराजांच्या जीवनावर कायम प्रभाव होता. त्यामुळेच त्यांच्या कार्यात अजून एकतेचा आणि दूरदृष्टीचा प्रभाव आढळतो.

नक्की वाचा 👉👉 महात्मा ज्योतिबा फुले माहिती मराठी 

शाहू महाराजांचे वैयक्तिक जीवन

राजर्षी शाहू महाराज

राजर्षी शाहू महाराज यांचा यांचा विवाह १८९१ साली बडोद्याचे मराठा सरदार कृष्णराव खानविलकर यांची कन्या लक्ष्मीबाई यांच्याशी झाला. राजश्री शाहू महाराजांना चार अपत्य होती. ज्यामध्ये शिवाजी व राजाराम हे पुत्र व राधाबाई आणि औबाई या कन्या होत्या.

राजर्षी शाहू महाराजांचा शासनकाळ

०२ एप्रिल १८९४ मध्ये राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर बसले, कोल्हापूर प्रांत कर्मवीर भूमी समजली जाते. शाहू महाराजांनी २८ वर्षाच्या शासन काळामध्ये, अनेक सामाजिक कार्य केले. त्यांच्या कामाने राजर्षी शाहू महाराजांना लोकांमध्ये लोकप्रिय बनवले. शाहू महाराजांनी उच्च जातीच्या व कमी जातीच्या लोकांमध्ये कधीच भेदभाव केला नाही. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांनी जातीवाद आणि अस्पृश्यता संपवण्यासाठी अनेक नियम बनवले.

शैक्षणिक क्षेत्रात राजर्षी शाहू महाराजांचे कार्य

प्राथमिक शिक्षण निगडीत कायदे – बहुजन समाजासाठी शिक्षणाची मोफत व्यवस्था

राज्याभिषेकापासून चालू असलेल्या राज्यकारभारात सामाजिक कार्यात अनेक धाडसी निर्णय घेतले. आणि ते अमलात देखील आणले. छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली.

Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

त्यासाठी प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, वसतिगृह, यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना त्याकाळी शाहू महाराजांनी एक रुपया दंड लावला होता.

शाहू महाराजांनी खालील शाळा सुरू केल्या.

कला शाळासंस्कृत शाळा बालवीर शाळा
प्राथमिक शाळा सैनिक शाळा डोंबारी मुलांची शाळा
माध्यमिक शाळायुवराज/ सरदार शाळाउद्योग शाळा
पाटील शाळापुरोहित शाळासत्यशोधक शाळा

शैक्षणिक वसतिगृहे

शाहू महाराजांनी सुरू केलेली शैक्षणिक वसतिगृहे खालीलप्रमाणे आहेत.

नाभिक विद्यार्थी वसतिगृह (१९२१) ढोर चांभार बोर्डिंग (१९१९)वंजारी समाज वसतिगृह, नाशिक (१९२०)
श्री देवांग बोर्डिंग (१९२०)मिस क्लार्क होस्टेल (१९०८)वैश्य बोर्डिंग (१९१८)
श्री शाहू छत्रपती बोर्डिंग, नाशिक (१९१९)छत्रपती ताराबाई मराठा बोर्डिंग, पुणे (१९२०) चौथे शिवाजी महाराज मराठा वसतिगृह, अहमदनगर (१९२०)
पांचाळ ब्राह्मण वसतिगृह (१९१२)इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९२१) शिवाजी वैदिक विद्यालय वसतिगृह (१९२०)
इंडियन ख्रिश्चन होस्टेल (१९१५) दिगंबर जैन बोर्डिंग (१९०१)उदाजी मराठा वसतिगृह, नाशिक (१९२०)
सोमवंशीय आर्यक्षत्रिय बोर्डिंग (१९२०) श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस (१९२०)चोखामेळा वसतिगृह, नागपूर (१९२०)
मुस्लिम बोर्डिंग (१९०६)कायस्थ प्रभू विद्यार्थी वसतिगृह (१९१५)आर्यसमाज गुरुकुल (१९१८)
श्रीमती सरस्वतीबाई गौड सारस्वत ब्राह्मण विद्यार्थी वसतिगृह (१९१५)

राजर्षी शाहू महाराजांद्वारे सामाजिक सुधारणाची सूची

कुस्ती खेळाला राजाश्रय मिळवून दिला

स्वतः उत्तम कुस्तीपटू असल्यामुळे, कुस्ती या खेळाला राजाश्रय मिळवून दिला, तो शाहू महाराजानी. त्यासाठी १८९५ साली मोतीबाग तालमीची स्थापना केली. एवढेच करून शाहू महाराज थांबले नाहीत, तर खासबाग सारख्या भव्य कुस्ती मैदानाची १९१२ साली निर्मिती केली.

राधानगरी धरण बांधण्याचा संकल्प

शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतीचे सिंचन, पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था, वीज निर्मिती, यासाठी राधानगरी धरण बांधण्याचा संकल्प केला. १९०९ साली या धरणाच्या कामास सुरुवात झाली. १९१८ पर्यंत धरणाचे काम ४० फुटापर्यंत पूर्ण झाले. १९५७ ला हा प्रकल्प पूर्ण झाला अशी नोंद इतिहासामध्ये नोंदवली गेली आहे.

कोल्हापूर मध्ये रेल्वे आणली

सामाजिक बांधिलकीचे स्थान आणि कोल्हापुरात रेल्वे आणण्यास, शाहू महाराजांचा अतिशय महत्त्वाचा वाटा होता.

भटक्या जनावरांसाठी निवारा

भटक्या जनावरांसाठी पांजरपोळ, घोड्याच्या देखभालीसाठी सोनतळी येते मोठा पागा बांधला.

बाजारपेठा निर्माण केल्या

कोल्हापूर शहराचा विकास करताना कोल्हापूरमध्ये अनेक बाजारपेठा निर्माण केल्या.

जातीभेद संपवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांचा प्रयत्न

  • राजर्षी शाहू महाराजांनी समाजामधील जातिवाद संपवण्यासाठी “मराठा धनगर विवाहाची” व्यवस्था केली.
  • शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह आंतरजातीय विवाह यांचे समर्थन केले. त्यासाठी त्यांनी गरजेचे कायदे सुद्धा बनवले. १९१७ साली विधवा पुनर्विवाह कायदा केला.
  • १९१६ च्या दरम्याने राजर्षी शाहू महाराजांनी राजकीय निर्णय घेण्याची प्रक्रिया निपाणी मध्ये “डेक्कन रयत संस्था” स्थापन करून केली.
  • १९१९ मध्ये आंतरजातीय विवाह कायद्यास मंजुरी दिली. जात-पात याचा विरोध करून सर्व धर्म समभाव ही भावना कायम जनसामान्यांच्या मनात जागृत ठेवली. कानपूर मध्ये भरलेल्या तेराव्या क्षत्रिय अधिवेशनात महाराजांना राजर्षी हा बहुमान मिळाला.

राजर्षी शाहू महाराज – कलाकारांचा राजा

केशवराव भोसले रंगमंच

राजर्षी शाहू महाराजांच्या काळामध्ये थेटर कलाकारांसाठी कोणताही व्यासपीठ नव्हते. तसेच कोणतेही बॉलीवूड किंवा अन्य फिल्म उद्योगी नव्हते. शाहू महाराजांनी प्रथम उत्साही लोकांसाठी केशवराव भोसले रंगमंचाची स्थापना केली.

समाज देवल क्लब

संगीत आणि गायन यांचा फायदा घेण्यासाठी, राजर्षी शाहू महाराजांनी समाज देवल क्लब या क्लबची स्थापना करून एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनाशी संबंधित एक घटना

राजर्षी शाहू महाराजांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्वतःच्या राजवाड्यामध्ये राहण्याची व शिकण्याची परवानगी दिली. राजर्षी शाहू महाराजांचा उदार स्वभाव बघून, भाऊराव पाटील अचंबित झाले. भाऊराव पाटील यांनी ग्रामीण भागातील गरीब व कमजोर मुलांना शिक्षण देण्यासाठी रयत शिक्षण संस्था याची स्थापना केली. भाऊराव पाटील यांना कर्मवीर ही पदवी प्राप्त झाली. शाहू महाराजांनी वेळोवेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांची मदत केली.

बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी केलेली मदत

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शाहू महाराजांनी वेळोवेळी शिक्षणासाठी मदत केली. राजर्षी शाहू महाराज हे पहिले असे राजा होऊन गेले, ज्याने विविध जातीच्या मुलांसाठी वस्तीगृहांची सुरुवात केली.

सत्यशोधक समाज आणि शाहू महाराज

शाहू महाराजांनी ज्योतिराव फुले स्थापित “सत्यशोधक समाज” संस्थेचे समर्थन केले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी प्लेगसारख्या रोगराईच्या कठीण काळामध्ये, समाजामधील प्रत्येक जातीच्या व्यक्तीची मदत केली. राजर्षी शाहू महाराजांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाज संस्थेला एक नवीन प्रेरणा प्राप्त करून दिली.

शाहू महाराजांच्या शासन काळात प्लेग महामारी

शाहू महाराजांनी कोल्हापूर राज्यामध्ये १८९७ ते १८९८ च्या दरम्याने प्लेग सारख्या भयंकर रोगाचा सामना केला होता.

शाहू महाराजांचे प्रेरणादायी विचार

  • शिक्षणाशिवाय कोणत्याही देशाची उन्नती झाली नाही असे इतिहास सांगतो. म्हणूनच सक्तीच्या व मोफत शिक्षणाची हिंदुस्तानला अत्यंत आवश्यकता आहे.
  • शास्त्रकारांनी कमी जातीच्या लोकांसाठी विद्या मंदिराचे दरवाजे बंद केले, स्वराज्य ऐवजी आपण प्रथम शिक्षण घेतले पाहिजे. जोपर्यंत हिंदुस्तान जातिबंधनांनी निगडित राहील, तोपर्यंत स्वराज्य स्थापनेपासून मिळणारे संपूर्ण फायदे घेता येणार नाहीत. म्हणून समाजातील लोकांना शिक्षण देण्याची पद्धत मी काळजीने अनुसरत आहे.
  • आमच्या थोर देशाच्या नैतिक आणि सांप्रतीक प्रगतीच्या कामे व सार्वजनिक हितासाठी निर्णयाला जातींचे एकीकरण करण्याचे आपण शक्य तितके प्रयत्न करूया, अशा स्थितीत मिळणाऱ्या स्वराज्याचा अर्थ मूठभर लोकांच्या हाती सत्ता जाणे होईल.

शाहू महाराजांच्या सरकारमध्ये योग्य व्यक्तींची निवड

शाहू महाराजांनी प्रशासन चालवण्याची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी, योग्य व्यक्तींची नियुक्ती केली. त्यामध्ये भास्करराव जाधव यांना शाहू महाराजांनी सहाय्यक सुभेदार पद सोपवले, तर अण्णासाहेब लठ्ठे यांना आपले राज्य प्रमुख नियुक्त केले. भास्करराव जाधव व अण्णासाहेब लठ्ठे यांनी ब्राह्मण विरोधी आंदोलनामध्ये अस्पृश्यांसाठी शाळा चालू केल्या.

शाहू महाराजांचे प्रसिद्ध वेदोक्त प्रकरण

वेदोक्त प्रकरण हे राजर्षी शाहू महाराजांच्या संबंधित ऐतिहासिक घटना आहे. १८९९ मध्ये कोल्हापूर मध्ये घडलेले हे प्रसिद्ध वेदोक्त प्रकरण आहे. राजघराण्यामधील ब्राह्मण पुरोहितांनी वैदिक स्त्रोतानुसार ब्राह्मणेतरांचे संस्कार करण्यास नकार दिल्यामुळे, राजर्षी शाहू महाराजांनी आर्य समाज आणि सत्यशोधक समाजाला पाठिंबा देण्याबरोबरच मराठा समाजाच्या हक्कासाठी, सुद्धा सर्वत्र प्रचार केला.

त्यांनी पुजाऱ्यांना हटवून शास्त्रजगत गुरु ही पदवी देऊन, एक मराठी ब्राह्मणेतरांचे धर्मगुरू म्हणून नियुक्ती करण्याचे धाडसी पाऊल उचलले. या गोष्टीलाच वेदोक्त प्रकरण किंवा वेदोक्त वाद म्हणून संबोधले जाते.

शाहू महाराजांनी कमी जातीच्या लोकांना सरकारी नोकऱ्या दिल्या

२६ जुलै १९०२ मध्ये शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासलेल्या वर्गांसाठी ५० टक्के आरक्षण सुरू केले व शाहू महाराजांमुळे कमी जातीय वर्गीय लोकांना सरकारी नोकऱ्या प्राप्त झाल्या.

शाहू महाराजांची लंडन यात्रा

राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये लंडन दौरा केला. शाहू महाराजांनी त्यांचे शिक्षण, औद्योगिक प्रगती, आधुनिक सिंचाई प्रणाली, आधुनिक संचार उपकरणे, आदींची शिकवण लंडनमधून घेतली.

पारंपारिक रूढी परंपरावर शाहू महाराजांचे प्रतिबंध

राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील विविध पारंपारिक रूढी परंपरा यावर बंदी घातली. १९२० दरम्याने शाहू महाराजांनी देवदासी या भयानक प्रथेला बंदी घातली. त्यांनी अशी घोषणा केली की, त्यांच्या राज्यामध्ये कोणीही या प्रकारच्या प्रथांचे पालन करणार नाही. शाहू महाराजांच्या काळात समाज खऱ्या अर्थाने विविध रुढीपरंपरांपासून मुक्त झाला.

औद्योगिक क्षेत्रामध्ये शाहू महाराजांचे प्रयत्न

शाहू महाराजांनी औद्योगिक विकासासाठी मोठी बाजारपेठ निर्माण केली. त्यांनी भारतामधील प्रसिद्ध गुळ बाजारपेठ स्थापन केली. ही बाजारपेठ शाहू महाराजांनी १८९५ मध्ये कोल्हापूर मध्ये स्थापन केली.

कलाक्षेत्रामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे योगदान

राजर्षी शाहू महाराजांनी नेहमीच कलाकारांना मार्गदर्शन केले. त्यांनी अनेक कलाकारांना संरक्षण दिले. व कलाकार कोणत्याही जाती धर्माचे असले, तरीही राजश्री शाहू महाराजांनी कलावंतांसाठी उत्तम व्यासपीठाची व्यवस्था सुद्धा केली.

विद्वान कलाकार व कुस्तीप्रेमींना संरक्षण प्रदान केले

राजर्षी शाहू महाराजांनी अबलाल रहमान यांसारख्या प्रतिभाशाली कलाकाराला संरक्षण दिले. तसेच राजश्री शाहू महाराजांना कुस्ती फार आवडायची, त्यामुळे त्यांनी भारतामधील कुशल कुस्ती प्रेमींना संरक्षण व आश्रय प्रदान केले.

कशी प्राप्त झाली राजर्षी पदवी ?

२१ एप्रिल १९१९ मध्ये कानपूर मधील पूर्ण क्षत्रिय समाजाने राजश्री शाहू महाराजांना सामाजिक कार्यकर्ता म्हणून सन्मानित केले. राजर्षी शाहू महाराजांनी केलेल्या विविध सामाजिक कार्यामुळे क्षत्रिय समाजाने राजश्री शाहू महाराजांना राजर्षी ही उपाधी प्रदान केली.

महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्न

राजर्षी शाहू महाराजांनी समाजाच्या विचारांमध्ये बदल करून, महिलांना सन्मानित केले. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना पाठिंबा देत, महिलांच्या सशक्तिकरण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी पावले उचलली.

शाहू महाराजांचा राज्याभिषेक

शाहू महाराजांचा राज्याभिषेक ०२ एप्रिल १८९४ रोजी करण्यात आला. शाहू महाराजांनी संपूर्ण आयुष्य जातीभेद नष्ट करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी त्यासाठी विविध कायदे सुद्धा आखले.

शाहू महाराजांची आरक्षण प्रणाली

शाहू महाराजांनी १९०२ मध्ये लंडनचा दौरा केला. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर मधील ५० % प्रशासकीय पदे मागासवर्गीयांसाठी आरक्षित ठेवण्याचा आदेश दिला. महाराजांच्या आदेशावरून कोल्हापूरच्या ब्राह्मणांना महाराजांच्या आज्ञेचे पालन करावे लागले. १९८४ च्या दरम्यान शाहू महाराजांनी राज्याची सूत्रे हाती घेतली.

त्यावेळी कोल्हापूरच्या सामान्य प्रशासनातील एकूण ७१ पदांपैकी ६० जागांवर ब्राह्मण अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. त्याप्रमाणे ५०० कारकूनपैकी फक्त ब्राह्मणांकडे पदे होती. शाहू महाराजांनी कमी जातीच्या लोकांना संधी दिल्यामुळे, १९७२ मध्ये ब्राह्मण अधिकाऱ्यांची संख्या ३५ पर्यंत कमी झाली. शाहू महाराजांनी १९०३ मध्ये कोल्हापूर मधील शंकराचार्य मठाची मालमत्ता जप्त करण्याचा आदेश दिला.

शाहू महाराजांचा सन्मान

शाहू महाराजांनी केलेल्या असंख्य प्रयत्नांमुळे,. शाहू महाराजांना केंब्रिज विद्यापीठामधून “एल.एल.डी.” पदवी प्राप्त झाली. त्यांना क्वीन विक्टोरियाकडून “ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ इंडिया कडून “ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल विक्टोरिया ऑर्डर” व “ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर” या पदव्या सुद्धा त्यांना प्राप्त झाल्या. १९०२ मध्ये शाहू महाराजांना ‘किंग एडवर्ड कोरेनेशन मेडल” सुद्धा मिळाले.

राजर्षी शाहू महाराज जयंती

महाराष्ट्र राज्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांची जयंती २६ जूनला साजरी केली जाते.

मराठा इतिहासातील दोन लोकप्रिय शाहू महाराज

कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज

कोल्हापूरच्या शाहू महाराजांना राजर्षी शाहू महाराज व शाहूजी महाराज या नावाने संबोधले जाते. राजर्षी शाहू महाराज मराठा प्रांताचे राजा होते. त्यांना छत्रपती शाहू महाराज सुद्धा संबोधले जाते.

साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज

साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराजांना शाहू पहिला म्हणून ओळखले जाते. ते मराठा साम्राज्याचे पाचवे छत्रपती होते. छत्रपती संभाजी यांचे पुत्र, छत्रपती शिवाजी राजे यांचे नातू, म्हणून त्यांची प्रचिती आहे. शाहू प्रथम हे पहिल्या सातारा गादीचे छत्रपती होते.

राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू

राजश्री शाहू महाराजांना मधुमेह होता, त्यात त्यांची प्रकृती बिघडली व दि.०६ मे १९२२ रोजी वयाच्या अवघ्या ४८ वर्षांमध्ये, मुंबईमध्ये हृदयविकाराने राजर्षी शाहू महाराजांनी जगाचा निरोप घेतला.

राजर्षी शाहू महाराजांवरील चित्रपट व दूरचित्रवाणी मालिका

  • ‘लोकराजा राजर्षी शाहू’ – दूरचित्रवाणी मालिका
  • राजर्षी शाहू महाराज व महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर एक चित्रपट आहे. (निर्माते नितीन देसाई)

शाहूंवरील प्रकाशित साहित्य

  • बी.ए. लठ्ठे यांनी १९२६मध्ये शाहूंचे इंग्रजीतील पहिले चरित्र लिहिले. त्याचे मराठी भाषांतरही प्रकाशित करण्यात आले.
  • कोल्हापूरचे शाहू छत्रपति : चरित्र व कार्य (लेखक : एकनाथ केशव घोरपडे)
  • छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर : समग्र पत्रव्यवहार’ (संपादन : डॉ. संभाजी बिरांजे प्रकाशन; विनिमय पब्लिकेशन, विक्रोळी, प. मुंबई; ८३ पृष्ठ)
  • समाज क्रांतिकारक राजर्षी शाहू महाराज- (लेखिका – डॉ. सुवर्णा नाईक-निंबाळकर)
  • राजर्षी शाहू छत्रपती (लेखक : प्रा. डॉ. रमेश जाधव; नॅशनल बुक ट्रस्टने हे पुस्तक १८ भारतीय भाषांत प्रकाशित केले आहे.)
  • ‘प्रत्यंचा: जो लढे दीन के हेत,’ (शाहू महाराजांवरील हिंदी कादंबरी; लेखक – संजीव)
  • राजर्षी शाहू छत्रपती (खंड काव्यानुवाद, लक्ष्मीनारायण बोल्ली)
  • राजर्षी शाहू छत्रपती : अ सोशली रिव्होल्युशनरी किंग (संपादक : डॉ. जयसिंग पवार आणि डॉ. अरुण साधू)
  • छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र (तेलुगू, लेखक – लक्ष्मीनारायण बोल्ली)
  • राजर्षी शाहू छत्रपती: जीवन व शिक्षणकार्य (लेखक: प्राचार्य रा. तु. भगत)
  • शाहू (लेखक : श्रीराम ग. पचिंद्रे; ही राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनावरील पहिली आणि एकमेव कादंबरी आहे.)
  • शाहू महाराजांची चरित्रे लेखक : माधवराव बागल, पी.बी. साळुंखे, धनंजय कीर, कृ .गो. सूर्यवंशी, डॉ. अप्पासाहेब पवार, जयसिंगराव पवार (यांनी २००१ साली एकत्रितपणे लिहिलेल्या चरित्राची २०१३सालची ३री आवृत्ती ही ३ खंडी आणि १२०० पानी आहे.).
  • लोकराजा राजर्षी शाहू महाराज (लेखक: सुभाष वैरागकर)
  • राजर्षी शाहू कार्य व काळ (लेखक – रा.ना. चव्हाण)
  • राजर्षी शाहू महाराज यांची सामाजिक विचारधारा व कार्य (लेखक : रा.ना. चव्हाण)

शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार

शाहू महाराजांच्या नावाने अनेक पुरस्कार जाहीर होतात. अशा काही पुरस्कारांची नावे आणि ते मिळालेल्या व्यक्तींची नावे :-

  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार डॉ. रघुनाथ माशेलकर यांना (२६ जून २०१७)
  • कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त ६ जिल्हा परिषद सदस्य, ३ पंचायत समिती सदस्य व १५ कर्मचाऱ्यांना राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला (२६ जून २०१८)
  • राजर्षी शाहू छत्रपती मेमोरिअल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा शाहू पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक आणि सामाजिक कार्यकत्या प्रा. पुष्पा भावे यांना (२६ जून २०१८)

छत्रपती शाहू महाराज यांचा सन्मान

  • छत्रपती शाहू महाराज टर्मिनस
  • शाहू महाराजांचा २६ जून हा जन्मदिवस महाराष्ट्रात ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. त्यादिवशी सार्वजनिक कार्यक्रम होतात.
  • शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
  • कोल्हापूरच्या राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे ‘राजर्षी पुरस्कार’ रोख एक लाख रुपये आणि सन्मानचिन्ह या स्वरूपात दिला जातो.
  • शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल

FAQ

१. राजर्षी शाहू महाराजांचे मूळ नाव काय होते?

कोल्हापूर संस्थांचे राजे, चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर गादीला वारस नव्हता, म्हणून महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी घाटगे घराण्यातील “यशवंत जयसिंग घाटगे” यांना १७ मार्च १८८४ रोजी दत्तक घेतले, आणि नामकरण झाले राजर्षी शाहू महाराज.

२. छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी पदवी कधी दिली?

२१ एप्रिल १९१९ मध्ये कानपूर मधील पूर्ण क्षत्रिय समाजाने राजश्री शाहू महाराजांना सामाजिक कार्यकर्ता म्हणून सन्मानित केले. राजश्री ही उपाधी प्रदान केली.

३. कोल्हापूर संस्थानात मागास जातींना किती टक्के जागा राखीव राहतील अशी त्यांनी घोषणा केली?

२६ जुलै १९०२ मध्ये शाहू महाराजांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासलेल्या वर्गांसाठी ५० टक्के आरक्षण सुरू केले .

४. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला?

राजश्री शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल गावी घाटगे घराण्यात झाला.

५. ज्या पालकांनी मुलांना शाळेत न पाठवले त्यांच्याकडून छत्रपती शाहू महाराजांनी दरमहा किती दंड वसूल केला?

छत्रपती शाहू महाराजांनी सर्व बहुजन समाजातील मुला-मुलींच्या शिक्षणाची मोफत व्यवस्था केली. त्यासाठी प्राथमिक शाळा, हायस्कूल, कॉलेज, वसतिगृह, यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली. मुलांना शाळेत न पाठवणाऱ्या पालकांना त्याकाळी शाहू महाराजांनी एक रुपया दंड लावला होता.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास राजश्री शाहू महाराजांबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment