वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी | Vasudev Balwant Phadke Information In Marathi

वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी | Vasudev Balwant Phadke Information In Marathi – मातृभूमीकरता आपले सर्व काही त्याग करणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. इंग्रजांविरोधात भारतीयांच्या मनात जागृती करणारे, आद्य क्रांतिकारक अशी त्यांची ख्याती आहे. ते देशाचे पहिले असे क्रांतिकारी होते, ज्यांनी स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धात आलेल्या सगळ्यांमध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवली आणि ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र विद्रोह पुकारला होता.

एक सच्चा देशभक्त आणि राष्ट्रभक्त जो अखेरच्या श्वासापर्यंत देशसेवेत समर्पित राहिला आणि कधीही ब्रिटिशांस समोर झुकला नाही. अशा क्रांतिकारकाची माहिती आपल्याला असायलाच हवी.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस वासुदेव बळवंत फडके यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.

Table of Contents

वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी | Vasudev Balwant Phadke Information In Marathi

पूर्ण नाव वासुदेव बळवंत फडके
जन्म तारीख दि. ०४ नोव्हेंबर १८४५
जन्म स्थळ रायगड जिल्ह्यातील, शिरढोण गावी.
वडिलांचे नाव बळवंत फडके
आईचे नाव सरस्वतीबाई
पत्नी सईबाई, गोपिकाबाई
अपत्य मधु
धर्म हिंदू
राष्ट्रीयत्व भारतीय
मृत्यू १७ फेब्रुवारी १८८३

वासुदेव बळवंत फडके यांचे चरित्र

Vasudev Balwant Phadke Information In Marathi

अनेक वर्ष पासून मी भुकेने मरणाऱ्या लोकांना कसे वाचवू शकतो ? याचा विचार करत आहे. ज्या भूमिचा मी पुत्र आहे, तिची ही सर्व मुले आहेत. हे लोक अन्नाअभावी उपाशी मरत आहे आणि आपण कुत्र्यासारखे पोट भरत आहोत, हे मला सहन होत नव्हते. त्यामुळेच मी ब्रिटिश सरकारविरुद्ध सशस्त्र बंडाची घोषणा केली. फाशीची दोरी गळ्यामध्ये झुलताना पाहूनही सिंहगर्जनेने इंग्रज दरबाराला स्वतःच्या कणखर आवाजाने गुंजवून टाकणाऱ्या निर्भिड, आत्मविश्वासी भारतीय तरुणाचे नाव म्हणजे “वासुदेव बळवंत फडके”.

फडके यांनी लष्करी वित्त विभाग पुणे या ठिकाणी महिन्याची नोकरी सोडून, आपल्या तरुण पत्नी आणि लहान मुलीचे प्रेम विसरून, भुकेलेल्यांना अन्न व बेरोजगारांना रोजगार प्राप्त करण्यासाठी, ब्रिटिश राजवट संपवण्याचा विडा उचलून शेवटच्या श्वासापर्यंत अतोनात प्रयत्न केले.

फडके हे भारत देशामधील असे पहिले क्रांतिकारी होते, ज्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध सशस्त्र बंड पुकारले आणि सशस्त्र सेना सुद्धा निर्माण केली. गावोगावी जाऊन वासुदेव यांनी राजकीय चळवळ निर्माण केली. त्यामुळे या सर्व गोष्टीचे श्रेय फडके यांना जाते.

नक्की वाचा 👉👉अण्णाभाऊ साठे माहिती मराठी

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म व बालपण

रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावी राहणाऱ्या फडके कुटुंबात दि. ०४ नोव्हेंबर १८४५ ला वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बळवंत व आईचे नाव सरस्वतीबाई. सरस्वतीबाई या कल्याणच्या समृद्ध आणि सामाजिक स्त्री होत्या.त्यांना एक भाऊ आणि दोन बहिणी होत्या. यांचे बालपण हे कल्याण या ठिकाणीच गेले.

लहानपणात वासुदेव अतिशय सुंदर व मजबूत शरीराचे होते. गावातली मुले व गावकरी वासुदेव यांना प्रेमाने महाराजा म्हणत. वासुदेवांची बुद्धी ही कुशाग्र होती. ते दणकट व बळकट होते. सुरुवातीपासून वासुदेवांनी मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळविले. याशिवाय राष्ट्रप्रेमाची भावना त्यांच्या मनात बालपणीच रुजली होती.

अगदी लहानपणापासून शूरवीरांच्या गोष्टी वाचण्याची, त्यांना फार आवड होती. फडके यांनी एक व्यायाम शाळा बनविली. त्या ठिकाणी त्यांची भेट थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाली. याशिवाय त्या ठिकाणी त्यांना शस्त्र चालविण्याचे धडे थोर स्वातंत्र्यसैनिक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी दिले. वासुदेव बळवंत फडके हे टिळकांच्या क्रांतिकारी आणि देशभक्तीच्या विचारांनी फार प्रभावित होते.

Vasudev Balwant Phadke Information In Marathi

वासुदेव बळवंत फडके यांचे शिक्षण

यांचे बालपण कल्याणमध्ये गेले. कल्याणमध्ये सुरुवातीचे शालेय शिक्षण पूर्ण केले. नंतर ते मुंबईला निघून आले. लवकरच वासुदेव यांनी पुणे येथे इंग्लिश हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला. याच्या दोन वर्षांपूर्वीच म्हणजेच १८५७ रोजी मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली होती. १८५७ मध्ये एक यशस्वी क्रांती झाली. ज्या क्रांतीच्या बातम्या यांनी लक्षपूर्वक ऐकल्या. धोरणात्मक हालचाली व रणनीती याबद्दल बोलण्यामध्ये फडके यांची आवड वाढू लागली.

युद्धामधील विजय व पराजयामागील कारणेही फडके यांनी लक्षपूर्वक समजून घेतली. या सगळ्यामुळे भारत देशामध्ये क्रांती घडवणे व भारताला स्वतंत्र करणे, हा त्यांच्या जीवनाचा उद्देश त्यांनी बनवला. या सर्व कारणांमुळे त्यांनी प्रवेश परीक्षा देणेसुद्धा गरजेचे समजले नाही. त्या काळामध्ये वासुदेवांचे वय हे अवघे पंधरा वर्षाचे होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर वडिलांची इच्छा होती की, त्यांनी व्यवसायात उतरावे. परंतु त्यांचे न ऐकता, वासुदेव यांनी मुंबई गाठली. तेथे नोकरी करून, त्यांनी आपले पुढील शिक्षण सुरू ठेवले.

वासुदेव बळवंत फडके यांचे वैयक्तिक जीवन

वासुदेव बळवंत फडके

वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी वासुदेव यांचे लग्न सोमन कुटुंबामधील सईबाईंशी झाले. क्रांतिकारी वासुदेव फडके यांचा पहिला विवाह वयाच्या २८ व्या वर्षी झाला. परंतु पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता.

वासुदेव बळवंत फडके हे “ग्रेट इंडियन ट्रेनिंग पेनिन्सुला रेल्वेच्या” कार्यालयांमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सोबत लिपिक म्हणून काम करत होते. त्यांना महिन्याचा वीस हजार रुपये पगार होता जो त्याकाळी खूप जास्त पगार समजला जायचा. ते ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या कार्यालय विभागाचे प्रमुख होते.

वासुदेव बळवंत फडके आणि कुस्तीच्या चाली

वासुदेव फडके यांच्या काळात पुण्यामध्ये कुस्तीचे आखाडे होते. वासुदेव सकाळ संध्याकाळ कुस्तीच्या आखाड्यामध्ये कुस्तीसाठी जात असत. त्या ठिकाणी त्यांनी कुस्तीच्या युक्त्या शिकून घेतल्या. ते दररोज ३१० दंडस्नान करत असत. आखाडा कुस्तीमधील फडके यांच्या मित्रांपैकी एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. जे महाराष्ट्रामधील प्रसिद्ध समाज सुधारक व ज्यांनी सत्यशोधक समाज स्थापन केला असे प्रसिद्ध क्रांतिकारक.

वासुदेव फडके हे श्री दत्ताचे भक्त होते. दत्तांवर त्यांनी “दत्तमाहात्म्य” लिहिले. फडके यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी गावोगावी फिरून युवकांना संघटित केले त्यांनी स्वतःची व्यायाम शाळा बांधली, जी जंगलात मंदिराच्या प्रांगणामध्ये होती. त्या ठिकाणी ते शस्त्रास्त्रांचा सराव सुद्धा करत.

वासुदेव बळवंत फडके यांचे कौटुंबिक जीवन व मुले

फडके यांचा विवाह सईबाईंशी झाला. त्यांना त्यापासून एक अपत्य झाले. ते फक्त दहा दिवस जगू शकले. त्यानंतर त्यांना मधु नावाची मुलगी झाली. सईबाई यांची मुलगी चार वर्षाची असतानाच, सईबाई या निधन पावल्या. लहान मुलांची काळजी घेण्यासाठी, वासुदेव फडके यांनी गोपिकाबाई यांच्यासोबत दुसरे लग्न केले. लग्नाच्या वेळी गोपिकाबाई अवघ्या नऊ वर्षाच्या होत्या.

गोपिकाबाई पंधरा वर्षाचा झाल्या. तेव्हा तिच्या पतीने म्हणजेच वासुदेव यांनी तिला मामाकडे पाठवले, ती भेट वासुदेव बळवंत फडके व गोपिकाबाईंची शेवटची भेट होती. वासुदेव यांनी क्रांतिकारी बनण्याचा मार्ग निवडला व त्यांच्या अनेक क्रांतिकारी कारवाया वाढवल्या. त्यांना त्याबाबत ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अटक केले. ब्रिटिश सरकारने गोपिकाबाईंना त्यांच्या पतीला भेटू सुद्धा दिले नाही. गोपिकाबाई या एक आदर्श भारतीय सती स्त्री होत्या.

वासुदेव बळवंत फडके आणि महाराष्ट्रामधील भीषण दुष्काळ

१८७६ मध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्य भीषण दुष्काळाच्या वेढ्यामध्ये अडकले. सरकारने उघडलेल्या कामांमध्ये लोकांकडून प्रचंड काबाडकष्ट करून घेऊन, दीड आणा मजुरी देत होते. हे ऐकून फडके यांचे मन अतिशय दुःखी झाले. कार्यालयामधून सुट्टी घेऊन, फडके दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सज्ज झाले. उज्जैन ते विजापूरपर्यंत वासुदेव फडके यांनी दारिद्र्य आणि उपासमार प्रत्यक्ष अनुभवली. ब्रिटिश राजवट लवकरात लवकर संपवण्याचा निर्धार त्यांनी मनाशी बांधला. फडके यांना त्यांची आई आजारी असल्याची बातमी समजली. परंतु कार्यालयांमधून त्यांना सुट्टी दिली नाही.

वासुदेव बळवंत फडके यांच्या आईचे निधन

 • वासुदेव फडके ब्रिटिशांच्या सेवेत” ग्रेट इंडियन ट्रेनिंग पेनिन्सुला रेल्वे आणि मिलिटरी फायनान्स डिपार्टमेंट मध्ये नोकरीला होते. त्यावेळी त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूची वार्ता समजताच त्यांनी इंग्रज अधिकाऱ्यांकडे सुट्टीची मागणी केली, परंतु त्यांची ही मागणी इंग्रज अधिकाऱ्यांनी धुडकावून लावली. फडके विना सुट्टीचे गावी परतले. आईने आपल्या मुलाची वाट पाहत निराश होऊन, जीवनाचा त्याग केला.
 • आईला भेटू न शकल्यामुळे फडक्यांच्या मनामध्ये ब्रिटिश सरकारच्या बाबतीत तीव्र राग उत्पन्न झाला. या घटनेबाबत त्यांच्या बंडखोरीला आणखीनच खतपाणी मिळाले. या घटनेमुळे त्यांच्या हृदयात इंग्रजांविरोधात भयंकर चीड उत्पन्न झाली. त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आपल्या क्रांतिकारी कार्यामध्ये सामील होण्यासाठी कोणी आले नाही, हे पाहून फडके अतिशय निराश झाले त्यांनी गावोगावी फिरून दौरा केला.
 • फडके मूळ राजे संस्थानातील राज्यकर्त्यांना भेटले, त्यांना फक्त सहानुभूती दर्शवली गेली. परंतु त्यांना कोणत्याही प्रकारची मदत कोणी केली नाही. त्यामुळे फडक्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा मार्ग स्वीकारून आदिवासींचे सैन्य निर्माण केले. संपत्ती आणि शस्त्रे गोळा करण्यासाठी लुटीचा मार्ग त्यांनी स्वीकारला.
 • सैनिकांचे मासिक वेतन हे दहा रुपये त्या काळामध्ये त्यांनी निश्चित केले. क्रूर ब्रिटिशांच्या विरोधात उठाव करण्यासाठी फडके यांनी गल्लीत, चौकात, ढोल ताशा वाजवून आपल्या सशक्त आणि दमदार भाषणांच्या सहाय्याने आदिवासींची सेना, मोठमोठे जमीनदार, शूरवीरांना एकत्रित आणलं व महाराष्ट्रात आपल्या क्रांतिकारी विचारांच्या माध्यमातून संघटित केलं.

वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील प्रभाव

वस्ताद लहुजी साळवे

पुण्यात असताना वासुदेव फडके वेताळ पेठेतील वस्ताद लहुजी साळवे यांच्या तालमीत जात. सशस्त्र क्रांतीची प्रेरणा त्यांनी आद्यक्रांती गुरु वस्ताद लहुजी साळवेकडून घेतली.

न्यायमूर्ती रानडे

न्यायमूर्ती रानडे यांनी ब्रिटिशांच्या आर्थिक धोरणावर जी टीका केली, त्यातून फडके यांचा आर्थिक राष्ट्रवाद प्रबळ झाला.

दत्तगुरु

दत्तगुरु हे वासुदेव फडके यांचे आध्यात्मिक प्रेरणास्थान होते, त्यांनी “दत्त महात्म” नावाचा सात हजार ओव्यांचा ग्रंथ देखील लिहिला.

गोविंद रानडे

१८५७ च्या क्रांतीच्या दडपशाहीनंतर, देशामध्ये नवीन प्रबोधने होत गेली. विविध क्षेत्रांमध्ये संघटना निर्माण होऊ लागल्या. यापैकी एक महत्त्वाची संघटना म्हणजे पुण्याची सार्वजनिक सभा होती. १८७० मध्ये महादेव गोविंद रानडे यांनी या सभेच्या अधिपत्याखाली झालेल्या सभेमध्ये सर्वांसमोर उत्तम भाषण केले. या भाषणाचा प्रभाव वासुदेव फडके यांच्यावर झाला व त्यांना सुद्धा भारताला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी इंग्रजांविरुद्ध मनात आग पेटली. इंग्रज भारताला आर्थिकदृष्ट्या लुटत होते, या गोष्टीचा भयानक परिणाम फडके यांच्या मनावर झाला.

वासुदेव बळवंत फडके यांचे सशस्त्र बंड

 • ब्रिटिश सरकार विरुद्ध निर्माण झालेल्या तीव्र रागाप्रती १८७९ मध्ये फडके यांनी सशस्त्र बंडाची घोषणा केली. त्यांच्या सैन्याने प्रथम धामारी गावावर छापा टाकला. त्या ठिकाणी लूट करून त्यांनी ३००० रुपये मिळवले. दरोडयाच्या वेळी महिलांची छेडछाड करण्यास, वासुदेव बळवंत फडके यांनी फक्त मनाई केली होती. महिलांचे दागिनेही त्यांनी घेतले नाहीत. फडके म्हणाले, “मी माता भगिनींना गरीब करायला आलो नाही”.
 • होळीमध्ये गावांमधील व्यापारी आणि सावकारांच्या जवळील ग्रामस्थांच्या ऋणांच्या वह्या वासुदेव बळवंत फडके यांनी जाळून टाकल्या. आपले ऋण जळत असल्याचे पाहून, ग्रामस्थ अतिशय आनंदित झाले. परदेशी कपड्यांची होळी १९२० पूर्वी झाली नव्हती, परंतु फडक्यांनी १८७९ मध्ये प्रत्येक गावामध्ये हिशोबांच्या पुस्तकांची होळी केली.
 • धामारी गावावर छापा पडल्याने, महाराष्ट्रभर गावोगावी फडक्यांची लूट सुरू झाली. सरकारने सुरुवातीला याबाबत दुष्काळ हे कारण मानले, परंतु ही लूट राजकीय कारणांसाठी होत असल्याचे, लवकरच सरकारला समजले. या सैन्याचा एक प्रभावशाली नेता आहे, व त्याला पकडण्यासाठी आणि हे बंड दाबून टाकण्यासाठी मेजर डॅनियलची नियुक्ती करण्यात आली.
 • वासुदेव फडके यांच्या क्रांतिकारी चळवळीसमोर इंग्रज सरकार देखील थरथर कापू लागले. त्यांना अटक करण्याकरिता अनेक योजना देखील करण्यात आल्या, परंतु आपल्यातील चतुराई आणि साहसाने फडके यांनी इंग्रजांच्या सर्व योजनांवर पाणी फिरवले. तेवढेच नव्हे तर, पुढे इंग्रजांनी फडके यांना जीवन अथवा मृत पकडणाऱ्याला पन्नास हजार रुपये बक्षीस देण्याची देखील घोषणा केली.
 • प्रत्युत्तर फडके यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सत्र न्यायाधीश आणि मुंबईचे राज्यपाल यांना अटक करण्यास पाच हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. या संदर्भात माहिती व पोस्टर्स फडक्यांनी शहरांमध्ये चिकटवण्यास सुरुवात केली. ही जाहिरात वर्तमानपत्रात छापण्यासाठी सुद्धा पाठवली होती. स्वतंत्र भारताचे सेनापती वासुदेव बळवंत फडके यांच्या नावाने या गोष्टीची घोषणा देण्यात आली.
 • पोलीस व लष्कर वासुदेव बळवंत फडके यांच्या शोधामध्ये होतेच, दरम्यान पुन्हा या ठिकाणी भीषण आग लागली. शनिवारी कठडा जळून राग झाला. ज्या ठिकाणी एक सरकारी शाळा होती. ही आग थंडावली नसताना, बुधवारी शेडही जळून खाक झाली. हे वासुदेव बळवंत फडके यांच्या माणसांचे काम असल्याचे, ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कानी आले.
 • मेजर डॅनियल आणि सरदार दौलत यांच्यात एका टेकडीवर लढाई निर्माण झाली. या लढाईमध्ये सरदार मारले गेले. त्यांच्या मृत्यूमुळे आदिवासी सैनिकांना सेनापती राहिला नाही. वासुदेव बळवंत फडके तापाने त्रस्त होते आणि त्यामुळे त्यांच्यासमोर दत्त मंदिरामध्ये आश्रय घेण्याशिवाय, पर्याय उरला नाही. त्या ठिकाणी त्यांनी राहून पठाणांचे घोडदळ सैन्य संघटित करण्याची योजना आखली.
 • घोडदळ सैनिकांना २५ रुपये महिन्याचे वेतन देण्याचा वासुदेव बळवंत फडक्यांनी निर्णय घेतला. रोहिलांच्या प्रमुखाने घोडे देण्यासाठी तीन हजार रुपयांची मागणी केली. दोन हजार रुपये त्यांना पाठवण्यात आले, बाकीची व्यवस्था करण्यासाठी फडक्यांनी निजाम संस्थानांमध्ये मदत मागितली. पण पोलीस त्यांच्या मागावर होतेच, वासुदेव सलग तीन दिवस इकडे तिकडे फिरत होते. तर ते तापाने सुद्धा ग्रस्त होते. रात्री विश्रांतीसाठी ज्यावेळी ते दत्त मंदिरामध्ये आश्रयासाठी आले, त्यावेळी मेजर डॅनियलच्या सरकारने मंदिराला वेढा घातला.

वासुदेव बळवंत फडके यांची अटक आणि काळापाण्याची शिक्षा

वासुदेव बळवंत फडके असे क्रांतिकारी होते की, ज्यांना इंग्रज फार घाबरत होते. त्यांना अटक केल्यानंतर देखील ब्रिटिशांना महाराष्ट्रात विद्रोहाची परिस्थिती उद्भवण्याची भीती वाटायला लागली होती. वासुदेव बळवंत फडके यांना पकडण्यात ब्रिटिशांना यश आले होते, डॅनियलने मंदिराला वेढा घातल्यानंतर वासुदेव बळवंत फडके यांना २० जुलै १८७९ रोजी अटक करण्यात आली.

१८७९ ऑक्टोंबरच्या दरम्याने वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली ब्रिटिश सरकारने तुरुंगामध्ये टाकले व फडक्यांना जन्मठेपेची कळ्यापाण्याची शिक्षा सुनावण्यात आली. आणि अंदमानला पाठवले. त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्यंत क्रूर आणि अमानवी अत्याचार केले गेले.

वासुदेव बळवंत फडके यांचे निधन

 • जानेवारी १८८० च्या दरम्याने वासुदेव बळवंत फडके यांना एडनच्या तुरुंगामध्ये स्थलांतरित केले. एडन तुरुंगामधून वासुदेव बळवंत फडके यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. ते यशस्वी पण झाले. परंतु, त्यांना त्या ठिकाणी रस्ते ओळखीचे नसल्याने दहा तासांच्या पाठलागामुळे पुन्हा ते ब्रिटिशांच्या तावडीत सापडले. तुरुंगवासी यांनी त्यांचे स्वागत केले. महाराजा आले, सरकार आले, त्यांच्या हातात खूप जाड बेड्या लावण्यात आल्या. वासुदेव फडके यांनी आमरण उपोषण केले. त्यांची प्रकृती ही दिवसेंदिवस खालवत चालली होती. त्यामुळे त्यांच्या काळजीपोटी त्यांच्यासाठी विशेष प्रकारच्या बेड्या बनवण्यात आल्या होत्या. त्यानंतर फडके यांना क्षयरोग झाला या आजारामुळे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडनच्या ब्रिटिश तुरुंगामध्ये त्यांनी त्यांचे प्राण सोडले.
 • महाराष्ट्रमध्ये जन्माला आलेले, देशाचे प्रथम क्रांतिकारी, वासुदेव बळवंत फडके यांनी आयुष्यभर भारत देशाची सेवा केली. स्वातंत्र्याच्या या लढाई दरम्यान त्यांना अत्यंत कष्ट आणि अमानवी अत्याचारांना सामोरे जावं लागलं. १८७९ साली इंग्रज अधिकाऱ्यांनी वासुदेव बळवंत फडके यांना अटक केली. आणि आजीवन काळ्यापाण्याची शिक्षा सुनावली. कारागृहात त्यांना अनेक शारीरिक यातना देण्यात आल्या, परिणामी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 • अखेरच्या श्वासापर्यंत स्वातंत्र्याची आग वासुदेव बळवंत फडके यांनी जिवंत ठेवली आणि अतोनात कष्ट आणि यातना सहन करून, देखील हिम्मत हारली नाही. निष्ठावंत देशभक्तप्रमाणे राष्ट्र सेवेचा घेतलेला वसा अखंड जपला. वासुदेव बळवंत फडके सारखे क्रांतिकारी आपल्या देशात महाराष्ट्रात जन्माला आले, ही आपल्याकरता मोठ्या अभिमानाची बाब आहे. प्रत्येक भारतीयांनी त्यांच्या देशभक्तीतून प्रेरणा घेण्याची आज आवश्यकता आहे.
 • क्रांतिकारी म्हणून आज देखील वासुदेव बळवंत फडके यांना प्रत्येक भारतीयांच्या मनात आदराचे स्थान आहे. देशाकरता त्यांच्या या बलिदान आणि समर्पणाला कधीही विसरता येणार नाही. वासुदेव बळवंत फडके सारख्या क्रांतिकारकांमुळेच आपण सगळे आज स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेऊ शकतो.

वासुदेव बळवंत फडके यांची स्मारके

 • १९८४ साली भारतीय टपाल खात्याने फडक्यांचे चित्र असलेले ५० पैशांचे तिकीट प्रकाशित केले.
 • ब्रिटिशांपासून लपत फिरत असताना फडक्यांनी पालीजवळील थनाळे-खडसांबळे गुहांमध्ये आश्रय घेतला होता.
 • ‘क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’ नावाचा विश्राम बेडेकर दिग्दर्शित चित्रपट १९५० साली प्रकाशित झाला.
 • पुण्यात चाललेल्या खटल्यादरम्यान फडक्यांना संगमपुलाजवळ एका कोठडीत ठेवण्यात आले होते. भारत स्वतंत्र झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांच्या गुप्तचर खात्याने तेथे त्यांचे स्मारक उभारले आहे.
 • वासुदेव बळवंत फडके यांचे तैलचित्र भारताच्या संसदेमध्ये ३ डिसेंबर, २००४ रोजी लावण्यात आले. हे संसदेत लावण्यात येणारे शेवटचे व्यक्तिचित्र असेल असे ठरविण्यात आले. पी.व्ही. आपट्यांच्या प्रयत्‍नाने हे तैलचित्र लावण्याची संमती मिळाली. हे तैलचित्र सुहास बहुलकर यांनी रंगवले आहे.
 • बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी आपल्या आनंदमठ कादंबरीमध्ये ब्रिटिश सरकारविरुद्धचे फडक्यांचे अनेक कारनामे वापरले आहेत. यावर सरकारने आक्षेप घेऊन कादंबरी प्रकाशित न होऊ दिल्यामुळे चट्टोपाध्यायांनी पाचवेळा बदल केल्यावर मगच त्याचे प्रकाशन झाले.
 • मुंबईतील मेट्रो सिनेमाजवळच्या चौकाला वासुदेव बळवंत फडक्यांचे नाव दिलेले आहे.

वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल तथ्ये

 • वासुदेव बळवंत फडके यांनी पंधरा वर्षे पुण्यामध्ये लष्करी लेखा विभागामध्ये लिपिक म्हणून काम केले.
 • ब्रिटिश राजवटीमध्ये शेतकरी समाजाच्या दुरव्यवस्थेने, वासुदेव फडके अस्वस्थ झाले. स्वराज्य हाच आपल्या आजारावर इलाज आहे, व ब्रिटिश सरकारच्या ताब्यातून भारत स्वतंत्र झाला पाहिजे. असा त्यांचा विश्वास होता.
 • राजकीय प्रचार दौऱ्यामध्ये जाणारे वासुदेव बळवंत फडके हे पहिले भारतीय क्रांतिकार होते.
 • फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून सुद्धा संबोधले जाते.
 • १८७५ मध्ये इंग्रजांचा समूळ नाश करण्यासाठी, महाराष्ट्रामधील कोळी, भिल्ल, धनगर, समाजाच्या मदतीने “रामोशी” नावाचा वासुदेव बळवंत फडके यांनी क्रांतिकारी गट स्थापन केला.
 • २० फेब्रुवारी १८७९ च्या रात्री वासुदेव फडके यांनी, त्यांचे सहकारी विष्णु गद्रे, गणेश देवधर, गोपाळ हरी कर्वे, गोपाळ साठे यांच्यासोबत पुण्याच्या उत्तरेस आठ मैलावर असलेल्या लेणीच्या बाहेर आपली २०० मजबूत फौज घोषित केली.
 • वासुदेव फडके यांनी १८७९ मे मध्ये सरकारच्या शोषणात्मक आर्थिक धोरणाचा निषेध करणारे प्रसिद्ध घोषणा जाहीर करून सरकारचा विरोध दर्शवला.
 • १८६० च्या दरम्याने फडके, लक्ष्मण नरहर इंदापूरकर आणि वामन प्रभाकर भावे, तीन समाज सुधारक आणि क्रांतिकारकांनी “पुणा नेटिव्ह इन्स्टिट्यूट”ची स्थापना केली. जी आता “महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी” म्हणून ओळखली जाते.
 • वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी फडके यांचे निधन झाले.

वासुदेव बळवंत फडके यांच्याबद्दल 10 ओळी

 • रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावी राहणाऱ्या फडके कुटुंबात दि. ०४ नोव्हेंबर १८४५ ला वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नाव बळवंत व आईचे नाव सरस्वतीबाई.
 • महाराष्ट्रातील 1845 मध्ये जन्मलेले एक प्रमुख भारतीय क्रांतिकारक म्हणून वासुदेव बळवंत फडके यांना ओळखले जाते.
 • अन्याय आणि शोषणाने ग्रासलेल्या समाजात फडके यांचे संगोपन झाल्यामुळे त्यांना न्याय आणि स्वातंत्र्याची आवड निर्माण झाली.
 • वासुदेव बळवंत फडके हे टिळकांच्या क्रांतिकारी आणि देशभक्तीच्या विचारांनी फार प्रभावित होते.
 • वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी वासुदेव बळवंत फडके यांचे लग्न सोमन कुटुंबामधील सईबाईंशी झाले. क्रांतिकारी वासुदेव फडके यांचा पहिला विवाह वयाच्या २८ व्या वर्षी झाला. परंतु पत्नीच्या निधनानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता.
 • वासुदेव बळवंत फडके हे “ग्रेट इंडियन ट्रेनिंग पेनिन्सुला रेल्वेच्या” कार्यालयांमध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सोबत लिपिक म्हणून काम करत होते. त्यांना महिन्याचा वीस हजार रुपये पगार होता जो त्याकाळी खूप जास्त पगार समजला जायचा. ते ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेच्या कार्यालय विभागाचे प्रमुख होते.
 • वासुदेव फडके हे श्री दत्ताचे भक्त होते. दत्तांवर त्यांनी “दत्तमाहात्म्य” लिहिले.
 • ब्रिटिश सरकार विरुद्ध निर्माण झालेल्या तीव्र रागाप्रती १८७९ मध्ये फडके यांनी सशस्त्र बंडाची घोषणा केली.
 • फडके यांना क्षयरोग झाला या आजारामुळे १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडनच्या ब्रिटिश तुरुंगामध्ये त्यांनी त्यांचे प्राण सोडले.
 • फडके यांचे नाव पुतळे, संस्था आणि सांस्कृतिक संदर्भांद्वारे भारतभर स्मरण केले जाते.

फडके यांची चरित्रे

 • आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक – डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर)
 • आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके (लेखक – विष्णू श्रीधर जोशी)

वासुदेव बळवंत फडके यांच्यावरील चित्रपट

वासुदेव बळवंत फडके यांच्या जीवनावर आधारित एक मराठी पिक्चरसुद्धा बनवण्यात आलेला आहे. यामध्ये अजिंक्य देव यांनी प्रमुख भूमिका साकारलेली आहे.

FAQ

१. आद्य क्रांतिकारक कोण?

मातृभूमी करता आपले सर्व काही त्याग करणारे, क्रांतिकारकांमध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जात. इंग्रजांविरोधात भारतीयांच्या मनात जागृती करणारे, आद्य क्रांतिकारक अशी त्यांची ख्याती आहे.

२.वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कधी झाला ?

वासुदेव बळवंत फडके यांना क्षयरोग झाला. या आजारामुळे फडके यांनी १७ फेब्रुवारी १८८३ रोजी एडनच्या ब्रिटिश तुरुंगामध्ये त्यांनी त्यांचे प्राण सोडले.

३. वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कधी झाला ?

रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावी राहणाऱ्या फडके कुटुंबात दि. ०४ नोव्हेंबर १८४५ ला वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला.

४. फडके यांच्या आई वडिलांचे नाव काय ?

फडके यांच्या वडिलांचे नाव बळवंत व आईचे नाव सरस्वतीबाई.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment