जयंत नारळीकर माहिती मराठी Jayant Narlikar Information In Marathi

डॉक्टर जयंत नारळीकर अर्थात जयंत विष्णू नारळीकर हे प्रसिद्ध भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आहेत. ज्यांनी अमुलाग्र योगदान देऊन, हॉईल नारळीकर सिद्धांत मांडला. नारळीकर हे ब्रम्हांडाच्या स्थिर स्थितीच्या सिद्धांताचे तज्ञ व्यक्तिमत्व आहे.

विज्ञान विषय हा जन सामान्य लोकांपर्यंत लोकप्रिय करण्यासाठी, विज्ञान विषयाच्या प्रसारासाठी, त्यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी, इत्यादी. भाषेमध्ये पुस्तके लिहिली व विज्ञान विषयाचा लोकांपर्यंत प्रसार केला.

त्यांना भारत सरकार व आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण व पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे, ही माहिती व हा लेख जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

जयंत नारळीकर माहिती मराठी Jayant Narlikar Information In Marathi

नाव डॉ. जयंत नारळीकर
पूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर 
ओळखभारतीय शास्त्रज्ञ
नागरिकत्व भारतीय
जन्म तारीख दि. १९ जुलै १९३८
जन्म स्थळ कोल्हापुर, महाराष्ट्र
शिक्षण पी-एच. डी. (गणित)
शाळाबनारस हिंदू विद्यापीठ
विशेष योगदानविज्ञानाच्या प्रसारासाठी वैज्ञानिक साहित्यात अमूल्य योगदान दिले.
संबंधित लेख भारतीय अंतराळ संशोधन संस्था
पुरस्कार ‘पद्मभूषण’ (1965) आणि ‘पद्मविभूषण’ (2004)
आईंचे नाव  सुमती नारळीकर
वडिलांचे नाव विष्णू वासुदेव नारळीकर ( गणितज्ञ )
पत्नीचे नाव मंगला सदाशिव राजवाडे
अपत्य गीता, गिरिजा व लीलावती

जयंत नारळीकर जन्म व प्रारंभिक जीवन

भारताचे महान खगोलशास्त्रज्ञ, डॉक्टर नारळीकर यांचा जन्म महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात दि. १९ जुलै १९३८  रोजी झाला. त्यांचे वडील प्राध्यापक विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणित विषयाचे विभाग प्रमुख होते.

 Jayant Narlikar Information In Marathi

त्यानंतर ते राजस्थान लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष झाले. जयंत नारळीकरांचे शिक्षण वाराणसी मध्ये झाले. त्यांची आई तत्कालीन मुंबई विद्यापीठाची संस्कृतची पदवीधर होती. याशिवाय इंग्रजी साहित्याची त्यांना ओढ होती. त्या अत्यंत शालीन सुसंस्कृत व सुशिक्षित महिला होत्या.

हे सुद्धा वाचा –

नारळीकर तरुण वयातच साधारण प्रतिभाशाली होते. शाळा व महाविद्यालयाच्या परीक्षा मध्ये हि ते प्रथम येत. गणित त्यांच्या आवडीचा विषय होता. याशिवाय वाचनाचा त्यांना छंद होता. इसवी सन १९५९ साली बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांनी बीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.

त्यात ते प्रथम आले. गणित व खगोलीय पदार्थ विज्ञान हे त्यांचे विशेष विषय होते. त्यांचे वडील त्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठवू इच्छित होते, इंग्लंडला शिकून परत आलेल्या लोकांनी त्यांना आत्मसंतुष्ट राहू नका, असा सल्ला दिला.

त्या लोकांच्या मते, इंग्लंडचे जीवन खूप कठीण होतं. परंतु नारळीकर यांनी कठोर परिश्रम केले आणि ते यशस्वी झाले.त्यांचे वडील खास करून त्यांचे मामा डॉक्टर वसंतराव हुजूर बाजार यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे, त्यांचे काम सोपे झाले.

शिक्षक, सल्लागार व मित्र फ्रेंड हॉईल यांचा त्यांच्या जीवनावर खूप प्रभाव होता. याव्यतिरिक्त पदवी स्तरावर मिळवलेल्या यशामुळे त्यांना शिष्यवृत्ती मिळाली.

जयंत नारळीकर शास्त्रज्ञ

नारळीकर यांना इंग्लंडला पाठवले गेले. तेथे त्यांनी केंद्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतला व दोन वर्षात त्यांनी एम.एस.सी पदवी मिळवली. योगायोगाने खगोलीय पदार्थ विज्ञानातील जगप्रसिद्ध प्राध्यापक त्यावेळी केंद्र विद्यापीठांमध्ये होते.

त्यांचे नाव होते फेडरिक हॉईल. सहकारी त्यांना फ्रेड हॉईल म्हणत. कॉलेज केंब्रिज येथे ते प्राध्यापक होते व आकाशात वस्तूच्या स्थिती आणि गतीवर संशोधन करत होते.

नारळीकर यांनी हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली, पीएचडी करण्याचा ठरवलं, नाव नोंदवलं आणि संशोधन कार्यास आरंभ केला आहे.

त्यांनी नारळीकर यांना मनःपूर्वक स्वीकारलं होतं. १९६३ साली नारळीकर यांना केंब्रिज विद्यापीठाची पीएचडी पदवी मिळाली. १९५७ ते १९६२ पर्यंत केंब्रिज येथेच नारळीकर राहिले. डॉक्टर नारळीकरांनी आपल्या परदेशातील पंधरा वर्षाच्या वास्तव्यात अनेक महत्त्वपूर्ण संशोधन केली.

वयाच्या २२ व्या वर्षी रॉयल एस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे ते सदस्य झाले, किंग्स कॉलेज केंब्रिजचे हॅलो म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांचे वडील या संस्थेचे सदस्य होते.

हॉईल नारळीकर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत

नारळीकर यांच्या पीएचडीच्या प्रबंधात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, आकर्षक आकाशास्तव, वस्तूतील गुरुत्वाकर्षण, सृष्टीची निर्मिती व इतर संशोधन होतं.

लोकप्रिय अशा सिद्धांता संबंधित त्यांनी वेगळे विचार व दृष्टिकोन मांडले त्यांच्या सिद्धांतानुसार विश्वासाचा विस्तार होत नाही, तर ते स्थिर आहे. त्यांचे त्यांनी स्थिर स्थिती असे वर्णन केले.

या सिद्धांताने या विषयावर नवा प्रकाश टाकला. फ्रेड हॉईल यांच्याबरोबर त्यांनी गुरुत्वाकर्षण सदृश्य सिद्धांत सादर केला.

त्यांनी मांडलेला हा सिद्धांत जगात प्रसिद्ध झाला व नारळीकर व हॉईल त्यांनी विश्ववृत्त शास्त्रावर संशोधन केले जाते, त्यात स्थिर स्थिती सिद्धांत गुरुत्वाकर्षण सिद्धांत, विद्युत गतीची इत्यादीचा समावेश होता.

 Jayant Narlikar

त्या दोघांनी असे सिद्ध केले की, अंतराळात व विश्वास अस्तित्वात असलेले इतर शक्तीच्या वजनाचा पदार्थाच्या वस्तुमानावर प्रभाव पडतो. याशिवाय हे पदार्थाची आकृती व आकारमान यावरही प्रभाव टाकतात.

सर्वसाधारणतः असे मानण्यात येते की, गुरुत्वाकर्षण वस्तूच्या वस्तूमानावर अवलंबून असते, त्यांनी असे सुचवले की, आकर्षिस्त वस्तूतील गुरुत्वाकर्षण त्यांच्या घनतेवर अवलंबून असते आणि तसेच वस्तूची आंतरिक घनता ही जास्त असल्याने, त्यांचे गुरुत्वी आकर्षण जास्त असते.

त्यामुळे मोठ्या खगोलीय वस्तूंच्या वस्तू इतर खगोलीय वस्तूच्या वस्तूंना निष्क्रिय करतात. या वस्तूच्या वस्तुमानात वाढ होते, त्यामुळे त्या अधिक घन होतात. त्यांची घनता इतकि वाढते की, चिमुटभर पदार्थाचे वस्तुमान प्रत्येक जणांच्या बरोबर असते.

शेवटी त्या कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होल बनतात. अशा वस्तू त्यांच्यामधून प्रकाशही जाऊ शकत नाहीत, खगोलशास्त्री वस्तूच्या गुरुत्वाकर्षणावरील त्यांचे संशोधनी वैशिष्ट्यपूर्ण मानण्यात येतात.

जयंत नारळीकर यांचा सन्मान व त्यांचे योगदान

युरोपमध्ये डॉ. नारळीकर यांना अनेक संस्थांचे पुरस्कार व पदके मिळाली. १९५९ मध्ये केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने, डॉक्टर नारळीकर व प्राध्यापक हॉईल त्यांना भारतामध्ये भाषण देण्यासाठी, आमंत्रित केले.

१९६८ मध्ये केंब्रिज विद्यापीठाने, त्यांना अवार्ड देऊन सन्मानित केले आणि प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार यापूर्वी तीन भारतीय वैज्ञानिकांना देण्यात आला होता.

१९४४ मध्ये होमी भाभा यांना देण्यात आला होता, १९४८ मध्ये डॉक्टर चंद्रशेखर आणि १९६१ साली हुजूर बाजार त्यांना हा पुरस्कार मिळाला होता.

गणित, खगोलीय पदार्थ, विज्ञान व नैसर्गिक शास्त्र या क्षेत्रातील असाधारण संशोधनासाठी हा पुरस्कार दोन वर्षातून एकदा डॉक्टर हॉईल यांच्या स्मरणार्थ देण्यात येतो. १८६४ मध्ये त्यांनी नेपच्यून ग्रह अस्तित्वात असल्याचे भाकित केलं होतं.

जयंत नारळीकर

नारळीकर यांचा विवाह १९६६ मध्ये मंगला सदाशिव राजवाडे यांच्याबरोबर झाला. १९६९ मध्ये ते भारतात आले, तेव्हा भारत सरकारने त्यांना पद्मभूषण किताब देऊन, त्यांचा सन्मान केला होता.

मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेने खगोलशास्त्रीय विधी पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक पद स्वीकारण्यासाठी त्यांना आमंत्रित केले.

डॉक्टर नारळीकरांनी देखील देशाच्या सेवेसाठी योगदान करण्याचा निर्णय घेतला होता आणि १९७२ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये प्राध्यापक म्हणून, त्यांनी कार्यभार सांभाळला.

संशोधन आणि अध्यापन या व्यतिरिक्त डॉक्टराना, विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करीत. येथे त्यांनी त्याची अनावर संशोधन चालू ठेवले.

त्यांची संशोधने अशी आहे की जे कण प्रकाशाच्या गतीने जातात, डॉक्टर नारळीकर यांच्या मते बाहेरचा येणारा प्रकाश हे कण सामावून घेतात व अत्याधिक दाब देऊन, कृष्णविवर यांचा पृष्ठभाग अंकुचित करतात.

जयंत नारळीकर यांचे साहित्यातील योगदान

भारतात आल्यावर नारळीकर यांनी आणखी एक कार्य केले, लोकांमध्ये विज्ञान विशेषता, खगोल विज्ञान, लोकप्रिय व्हावे म्हणून, आपल्या मातृभाषेत म्हणजेच मराठीमध्ये आकाशाची जडले नाते हे पुस्तक लिहिलं.

याशिवाय त्यांनी अनेक विज्ञान कथा लिहिल्या, त्यांच्या पुस्तकाचे अनुवाद हिंदी व गुजरात मध्ये केले गेले आहेत. नारळीकर अतिशय शांत विज्ञान कथा लेखक आहेत.

सप्टेंबर १९८८ मध्ये स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी त्यांना विज्ञान व केंद्रीय पदार्थ विज्ञानानंतर विद्यापीठ केंद्र चालू करण्यासाठी प्रोत्साहन दिल.

विद्यापीठ अनुदान आयोग व केंद्र सरकार यांच्या आर्थिक मदतीतून हे केंद्र उभे राहिले आणि नारळीकर हे त्या केंद्राचे पहिले संचालक होते व त्यांनी होमी भाभाचे प्रोफेसर म्हणून काम केले.

जयंत विष्णू नारळीकर यांची पुस्तके आणि प्रकाशने

  • जयंत विष्णू नारळीकर यांना विविध पुरस्कार व सन्मान देऊन, गौरवीत केले गेले आहे. त्यांनी विज्ञानाच्या प्रचारासाठी व प्रसारासाठी विज्ञान साहित्यातही महत्त्वाची भूमिका निभावली.
  • विज्ञानाच्या प्रसाराद्वारे प्रकाशित केल्या गेलेल्या कृष्णविवर व इतर विज्ञान कथा या नुकत्याच प्रदर्शित झाल्या असून, या संग्रहामध्ये जयंत नारळीकर यांच्या १४ विज्ञान कथांचा संग्रह आपल्याला दिसून येतो. त्यामध्ये त्यांच्या नौलखा हार, धूमकेतू, कृष्णविवर या प्रसिद्ध कथांचा प्रामुख्याने समावेश आहे.
  • जयंत विष्णू नारळीकर यांनी लिहिलेल्या इतर संग्रहांमध्ये ओ लास्ट विकल्प, उजव्या सोंडेचा गणेशची, अहंकार, विषाणू, पुत्रवती भव, टाईम मशीनचा करिष्मा, तारश्म, ट्रॉयचा घोडा, स्फोटाची भेट, छुपा तारा, विज्ञान कथा इत्यादी कथांचा समावेश आहे.

डॉक्टर नारळीकर पुरस्कार

१९८८ मध्ये अमेरिकेच्या एका शहरात खगोलशास्त्रासंबंधी झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत, त्यांनी भाग घेतला दि. १० जानेवारी १९८९ रोजी राष्ट्रीय विज्ञान अकॅडमीने नारळीकर यांना १९८८ चा वेणूबापू स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित केले.

या पुरस्कारांतर्गत व पंचवीस हजार व एक पदक दिले जाते. जयंत विष्णू नारळीकर यांच्या अनमोल योगदानासाठी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केले गेले.

  • १९६२ मध्ये त्यांना स्मिथ पुरस्कार देऊन गौरविले त्यानंतर १९६७ मध्ये ॲडम्स पुरस्कार त्यांना दिला गेला.
  • १९७९ मध्ये शांतीस्वरूप पुरस्कार देऊन जयंत विष्णू नारळीकर त्यांचा सन्मान केला गेला.
  • त्यानंतर १९९० मध्ये त्यांना इंदिरा गांधी पुरस्कार दिला गेला.
  • १९९६ मध्ये जयंत विष्णू नारळीकर यांना कलिंग पुरस्कार देऊन, त्यांचा सन्मान करण्यात आला.
  • यानंतर २००१ मध्ये त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरविले.
  • जयंत विष्णू नारळीकर यांना एमपी, भटनागर पुरस्कार, असे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले गेले.
  • बिर्ला पुरस्कार व कलिंग पुरस्कार हे त्यामधील प्रमुख पुरस्कार आहे.
  • १९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण, २००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवीत केले गेले.

जयंत विष्णू नारळीकर यांच्या अंतराळाशी संबंधित कथा

  • टाइम मशीनची किमया
  • प्रेषित
  • यक्षांची देणगी
  • याला जीवन ऐसे नाव
  • अभयारण्य
  • वामन परत ना आला
  • अंतराळातील भस्मासुर
  • व्हायरस
  • चला जाऊ अवकाश सफरीला

डॉ. जयंत नारळीकर यांचे विज्ञान संबंधित पुस्तके

  • विज्ञानाची गरुडझेप
  • विश्वाची रचना
  • विज्ञानाचे रचयिते
  • कॉस्मॉलॉजी मध्ये तथ्य आणि अनुमान
  • कॉसमॉसचे सात आश्चर्य
  • विज्ञान आणि वैज्ञानिक
  • विज्ञानगंगेची अवखळ वळणे
  • चार नगरांत माझे विश्व
  • आकाशाशी जडले नाते
  • गणितातील गमतीजमती
  • युगायुगाची जुगलबंदी गणित अन्‌ विज्ञानाची
  • नभात हसरे तारे

डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या बद्दल तथ्ये

  • डॉक्टर जयंत नारळीकर हे ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले आहेत.
  • डॉक्टर नारळीकरांचे संपूर्ण नाव जयंत विष्णू नारळीकर.
  • त्यांचा जन्म दि. १९ जुलै १९३८ रोजी कोल्हापूर या ठिकाणी झाला.
  • नारळीकरांचे वडील विष्णू वासुदेव नारळीकर हे एक प्रसिद्ध गणित तज्ञ होते.
  • विष्णू वासुदेव नारळीकर वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठाच्या गणित विभागाचे प्रमुख होते.
  • डॉक्टर नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणसी येथे झाले. तेथूनच सन १९९७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली.
  • डॉक्टर नारळीकरांचे उच्च शिक्षण हे ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठामध्ये पूर्ण झाले. त्या ठिकाणी त्यांनी पदवी प्राप्त केली.
  • नाळेकर यांना रंग्लर ही पदवी, तसेच खगोलशास्त्राचे टायसन मेडल व इतर अनेक बक्षिसे प्राप्त झाली.
  • नारळीकरांनी सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ सर फ्रेड हॉईल यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली.
  • सर फ्रेड हॉईल डॉक्टर नारळीकरांच्या बुद्धिमत्तेने अतिशय प्रभावीत होते.
  • १९६६ मध्ये हॉईल यांनी केंब्री ज्या ठिकाणी इन्स्टिट्यूट ऑफ थेऑरॉटिकल इन्स्ट्रॉनॉमी नावाची स्वतःची संस्था सुरू केली, त्यामध्ये डॉक्टर नाळीकरांचाही महत्त्वाचा वाटा होता.
  • सर हॉईल आणि डॉक्टर नारळीकर यांनी खगोलशास्त्रात एकत्र संशोधन केले आहे.
  • या दोघांनी मिळून गुरुत्वाकर्षणावर संशोधन करून, सिद्धांत मांडला जो हॉईल नारळीकर सिद्धांत या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध आहे.
  • हॉईल नारळीकर सिद्धांत सांगतो की, वस्तूमधील कणांचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते.
  • १९६६ साली डॉक्टर नाळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे यांच्या सोबत झाला.
  • भारतातील खगोलशास्त्रातील संशोधनाला लोकप्रियता व गती देण्यासाठी १९७२ साली आंतरराष्ट्रीय स्तरावरून नाव प्राप्त करून डॉक्टर नारळीकर हे भारतामध्ये परतले.
  • डॉक्टर नारळीकर यांनी मुंबई येथील टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या खगोलशास्त्र विभागाचे प्रमुख पद स्वीकारले.
  • १९८८ मध्ये डॉक्टर जयंत यांची पुणे येथील आयुका संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती झाली.
  • डॉक्टर नारळीकर हे प्रसिद्ध शास्त्रज्ञ म्हणून लोकप्रिय आहेतच, त्याप्रमाणे त्यांनी मराठी साहित्यामध्ये सुद्धा त्यांचे अमुलाग्र योगदान दिले आहे.
  • सामान्य माणसांना खगोलशास्त्र समजवण्यासाठी डॉक्टर नारळीकर यांनी अनेक लेख व कथा लिहिल्या.
  • डॉक्टर नारळीकर यांच्या यक्षांची देणगी या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार प्राप्त आहे.
  • वैज्ञानिक विषयात लिखाण करून, विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी डॉक्टर नारळीकर यांनी १९९६ साली  युनेस्कोने कलिंग पारितोषिक देऊन सन्मान केला.
  • चार दशकापेक्षा जास्त कालावधीपासून डॉक्टर नारळीकर यांचे अंतरिक्ष विज्ञान क्षेत्रात संशोधन सुरू आहे.

जयंत नारळीकर यांच्या बद्दल १० ओळी

  • डॉक्टर नारळीकर हे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अतिशय व्यंजक पद्धतीने विज्ञान कथा लिहिणारे लेखक आहेत.
  • नाशिक येथे होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या, डॉक्टर जयंत नारळीकरांनी विपुल साहित्य लेखन केलेल आहे.
  • खगोलशास्त्रज्ञ आणि विज्ञान कथा लेखक डॉक्टर नारळीकर हे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, कथा लेखक आहेत.
  • डॉक्टर नारळीकरांनी विपुल संशोधन केलेले आहे. त्यांचे पहिले पुस्तक नभात हसरे तारे, हे त्यांनी त्यांच्या पत्नीस लिहिले असून, पाहिलेले देश भेटलेली माणसे, हे त्यांचे एक गाजलेले पुस्तक आहे.
  • त्यांनी अनेक नियतकालिके, दैनिके व मासिकां मधून विज्ञाना कथा व विज्ञान विषयक माहितीने भरलेले लेखन विपुल प्रमाणात केलेले आहे.
  • यांच्या कार्याची दखल अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी घेतली असून, भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.
  • डॉक्टर जयंत नारळीकर यांची निवड ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी झाल्यानंतर, त्यांच्या लेखनाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
  • अंतराळातील भस्मासुर, अंतराळातील स्फोट, अभयारण्य, चला जाऊ अवकाश सफरीला, टाईम मशीनची किमया, प्रेषित, यक्षांची देणगी, याला जीवन ऐसे नाव, वामन परत न आला, व्हायरस, इत्यादी. ह्या विज्ञान कथा विषयक पुस्तकांनी, त्यांना विज्ञान साहित्यिकाचा दर्जा मिळवून दिला आहे.
  • चार नगरातले माझे विश्व, पाहिलेले देश भेटलेली माणसे, समग्र जयंत नारळीकर ही त्यांची आत्मकथात्मक पुस्तके आहे.
  • डॉक्टर नारळीकर हे इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी आणि थर्ड वर्ड अकॅडमी ऑफ सायन्सेस चे ते  अधिकछात्र देखील आहे.

जयंत नारळीकर यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

  • डॉक्टर नारळीकर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. लहानपणापासून त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती. परिकथा, विनोदी पुस्तके, ऐतिहासिक व सामाजिक कादंबऱ्या व देशी-विदेशी साहित्य त्यांनी वाचले.
  • त्याचप्रमाणे त्यांची आई त्यांना पंचतंत्र व हितोपदेश यामधील गोष्टी देखील सांगत असे. त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी सुंदर रंगीत खडू आणले होते, त्याच्या साह्याने ते फळ्यावर छान चित्र काढत, तीस पर्यंतचे पाढे त्यांना शाळेत जाण्यापूर्वीच पाठ झाले होते. त्यांचे वडील व मामा त्यांना गणितातील कोडी तसेच कठीण प्रश्न विचारीत.
  • १९५७ साली ते बनारस विद्यापीठातून बीएससी उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाली व ते इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठात शिकण्यास गेले. तेथे त्यांनी ट्रायपास ही गणितातील महत्वाची परीक्षा पास केली व ते रंगलेर बनले. पुढे त्यांनी एमए ही पदवी मिळवली व १९९५  मध्ये त्यांनी गणित विषयातील पीएचडी प्राप्त केली.
  • केंब्रिज विद्यापीठातील इन्स्टिट्यूट ऑफ थेरॉटिकल एस्ट्रॉनॉमी मध्ये ते स्टाफ मेंबर होते. १९६४ साली विश्व रचनेबाबत त्यांनी संशोधन केले. त्यासाठी त्यांना भारत सरकारचा पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला.
  • १९७२ ला ते भारतात परत आले आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च म्हणजेच टी आय एस आर या संस्थेत खगोलशास्त्राचे प्रमुख प्राध्यापक बनले.
  • त्यांचे गुरु हॉईल व त्यांनी स्थिर विश्वाबद्दल सिद्धांत मांडला. त्यांनी भारतात विश्वरचना व खगोलशास्त्र यावर संशोधन केले. स्थिर विश्व सिद्धांतानुसार विश्व स्थिर आहे, ते आकुंचन पावत नाही. किंवा प्रसारणही पावत नाही.
  • विश्वाचा मुलाधार गुरुत्वाकर्षणचा हात आहे. आकाशातील रेडिओ ताऱ्यांविषयी, अधिक माहिती त्यांनी लोकांना दिली. लोकांमध्ये विज्ञान प्रसारण व्हावे म्हणून त्यांनी व्याख्याने दिली, लेख लिहिले, रेडिओ व दूरदर्शनवर कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला.
  • आकाशाशी जडले नाते कॉसमॉस, ब्रम्हांड, सुरभी, यांसारख्या दूरदर्शनवरील गाजलेल्या मालिकांमधून त्यांनी खगोलशास्त्र व वैज्ञानिक दृष्टिकोन यांचा प्रसार करण्यासाठी महत्त्वाचे कार्य केले.
  • विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी त्यांनी विज्ञान विषयक लेखन केले. ते खूप लोकप्रिय ठरले त्यांची अनेक भाषांमध्ये भाषांतर सुद्धा झाली आहे २०२१ साली नाशिक येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

FAQ

१. जयंत नारळीकर यांचे पूर्ण नाव काय आहे ?

जयंत नारळीकर यांचे पूर्ण नाव डॉ. जयंत विष्णू नारळीकर असे आहे.

२. नारळीकर यांचा जन्म कधी झाला ?

भारताचे महान खगोलशास्त्रज्ञ, डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर यांचा जन्म महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका सुशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात दि. १९ जुलै १९३८  रोजी झाला.

३. जयंत नारळीकर का प्रसिद्ध आहेत ?

डॉक्टर जयंत नारळीकर अर्थात जयंत विष्णू नारळीकर हे प्रसिद्ध भारतीय भौतिक शास्त्रज्ञ आहेत. ज्यांनी अमुलाग्र योगदान देऊन, हॉईल नारळीकर सिद्धांत मांडला. नारळीकर हे ब्रम्हांडाच्या स्थिर स्थितीच्या सिद्धांताचे तज्ञ व्यक्तिमत्व आहे.
विज्ञान विषय हा जन सामान्य लोकांपर्यंत लोकप्रिय करण्यासाठी, विज्ञान विषयाच्या प्रसारासाठी, त्यांनी इंग्रजी, हिंदी, मराठी, इत्यादी. भाषेमध्ये पुस्तके लिहिली व विज्ञान विषयाचा लोकांपर्यंत प्रसार केला.

४. जयंत नारळीकर यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

नारळीकरांचे वडील प्राध्यापक विष्णू वासुदेव नारळीकर हे बनारस हिंदू विद्यापीठात गणित विषयाचे विभाग प्रमुख होते. त्यानंतर ते राजस्थान लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष झाले.

५. जयंत नारळीकर यांना कोणते पुरस्कार मिळाले ?

जयंत विष्णू नारळीकर यांना एमपी, भटनागर पुरस्कार, असे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविले गेले. बिर्ला पुरस्कार व कलिंग पुरस्कार हे त्यामधील प्रमुख पुरस्कार आहे.

६. जयंत नारळीकर यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार कधी देण्यात आला ?

१९६५ मध्ये त्यांना पद्मभूषण, २००४ मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवीत केले गेले.

७. डॉ. जयंत नारळीकर यांच्या आईचे नाव काय ?

नारळीकरांच्या आईचे नाव सुमिती नारळीकर असे होते, त्या तत्कालीन मुंबई विद्यापीठाची संस्कृतची पदवीधर होत्या. याशिवाय इंग्रजी साहित्याची त्यांना ओढ होती. त्या अत्यंत शालीन सुसंस्कृत व सुशिक्षित महिला होत्या.

८. जयंत नारळीकर यांनी कोणता सिद्धांत मांडला ?

नारळीकर यांच्या पीएचडीच्या प्रबंधात गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, आकर्षक आकाशास्तव, वस्तूतील गुरुत्वाकर्षण, सृष्टीची निर्मिती व इतर संशोधन होतं. लोकप्रिय अशा सिद्धांता संबंधित त्यांनी वेगळे विचार व दृष्टिकोन मांडले त्यांच्या सिद्धांतानुसार विश्वासाचा विस्तार होत नाही, तर ते स्थिर आहे. त्यांचे त्यांनी स्थिर स्थिती असे वर्णन केले.

९. नारळीकर यांनी मांडलेल्या सिद्धांतास काय नाव पडले ?

हॉईल नारळीकर गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत असे नाव पडले.

१०. नारळीकर यांच्या पत्नीचे नाव काय आहे ?

१९६६ साली डॉक्टर नाळीकर यांचा विवाह मंगला सदाशिव राजवाडे यांच्या सोबत झाला.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस डॉ जयंत नारळीकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment