विठ्ठल रामजी शिंदे माहिती मराठी Vitthal Ramji Shinde Information In Marathi

यमुनाबाई आणि रामजी यांच्या मुलाचे पाळण्यातील नाव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. थोर धर्म सुधारक, समाजसुधारक, लेखक, ब्राम्हो समाजाचे धर्म प्रसारक आणि स्वातंत्र्यसैनिक. सेवाभावी वृत्ती, विद्वत्ता, शोधक आणि चिकित्सक स्वभाव, बंधुत्वाचा पुरस्कार या सर्व गोष्टींचा एकत्र मिलाफ म्हणजेच कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

विठ्ठल रामजी शिंदे माहिती मराठी Vitthal Ramji Shinde Information In Marathi

पूर्ण नाव विठ्ठल रामजी शिंदे
आदिचे नाव तुकाराम
जन्म तारीख २३ एप्रिल १८७३
जन्म स्थळ कर्नाटकातील जमखंडी संस्था
आईचे नाव यमुनाबाई
वडिलांचे नाव रामजी
सन्मान कर्मवीर, महर्षी , कर्मयोगी
भावंडे कृष्णा, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ,
पत्नी रुक्मिणी
शिक्षण बी. ए
मृत्यू दि. २ जानेवारी १९४४
मृत्यू ठिकाण पुणे

विठ्ठल रामजी शिंदे जन्म व प्रारंभिक आणि कौटुंबिक जीवन

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म दि. २३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जमखंडी संस्था येथे एका मराठा कुटुंबात झाला. यमुनाबाई आणि रामजी यांच्या मुलाचे पाळण्यातील नाव तुकाराम होते, पण रामजी शिंदे हे पंढरपूरचे वारकरी आणि विठ्ठलाचे भक्त असल्याने, त्यांनी मुलाचे नाव विठ्ठल ठेवले, आणि पुढे तेच कायम झाले.

Maharshi Vitthal Ramji Shinde Information In Marathi

त्यांच्या भावंडांची नावे ही कृष्णा, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ, अशी होती. आणि त्यांची बहीण जनाबाई शिंदे त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जमखंडी येथे झाले.

हे सुद्धा वाचा –

विठ्ठल रामजी शिंदे वैयक्तिक जीवन

वयाच्या नवव्या वर्षी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा विवाह त्यांच्या रुक्मिणी या आत्ये बहिणीशी झाला. त्यावेळी त्यांच्या पत्नीचे वय सहा सात महिन्यांचे होते.

Maharshi Vitthal Ramji Shinde

विठ्ठल रामजी शिंदे शिक्षण

१८९१ साली ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले, आणि जमखंडीच्या हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. १८९३ साली त्यांनी पुण्याच्या फर्गुसन कॉलेजला बी.ए करण्यासाठी प्रवेश घेतला. १८९८ साली त्यांनी बी.ए ची पदवी मिळवली.

फर्ग्युसन मध्ये शिकत असताना, मराठा एज्युकेशन असोसिएशनची शिष्यवृत्ती विठ्ठल रामजी शिंदे यांना मिळाली. पुढे बडोदे संस्थानात नोकरी करण्याच्या अटीवर, सयाजीराव महाराजांनी त्यांना दरमहा २५ रुपयांची शिष्यवृत्ती सुरू केली.

कर्जाऊ शिष्यवृत्ती आणि खाजगी शिकवण्याची मिळकत यावर काटकसरीने राहून, त्यांनी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कायद्याच्या शिक्षणाचे प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यावर, एल.एल.बी परीक्षेकरता ते मुंबईला रवाना झाले. पण अभ्यासात त्यांचे मन रमेनासे झाले, त्यांच्या मनात समाजसेवेची आवड निर्माण झाली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व प्रार्थना समाज

१८९५ साली पुण्यातील अमेरिकन युनिटेरियन मिशनरी रेफरंट जेटी सदरलांड यांच्या व्याख्यानामुळे त्यांची एक ईश्वरवादी मताशी ओळख झाली. यांचे ग्रंथ वाचून, त्यांची धर्म प्रेरणा प्रबळ होऊ लागली. आणि लवकरच ते ईश्वरवादी प्रार्थना समाजात सामील झाले.

येथे जीबी कोटकर, शिवराम पंत गोखले, न्यायमूर्ती रानडे सर, रामकृष्ण गोपाल भांडारकर आणि केबी मराठे, यांचा सहवास त्यांना लाभला. त्यानंतर ते प्रार्थना समाजाचे पूर्ण वेळ स्वयंसेवक बनले. पुण्यात प्रार्थना समाजाची स्थापना झाली.

आज दीडशे वर्षांनंतर ही जी वाटचाल आहे, त्याचे एका वाक्यात वर्णन करायचं म्हटलं तर, असं म्हणता येईल की, न्यायमूर्ती रानडे आणि डॉक्टर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांनी प्रार्थना समाजाला भक्कम असा सैद्धांतिक पाया दिला.

तर विठ्ठल रामजी शिंदे यांनी त्याला कर्मयोगाची जोड दिली. विठ्ठल रामजी शिंदे महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आले, त्यावेळी त्यांना न्यायमूर्ती रानडे यांच्या प्रेरणेने एडवोकेट म्हस्के यांनी स्थापन केलेल्या डेक्कन मराठा असोसिएशनची शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती.

त्यानंतर १८९८ मध्ये प्रार्थना समाजातल्या उपासनेने प्रभावित होऊन, विठ्ठल रामजींनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली. प्रार्थना समाज आणि ब्राम्हो समाजाच्या शिफारसी वरून, ब्रिटिश आणि फॉरेन असोसिएशनने १९०१ साली त्यांना मँचेस्टर कॉलेज अर्थात ऑक्सफर्ड विद्यापीठ इंग्लंड येथे धर्मशास्त्राचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी पाठवले.

पुन्हा एकदा बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी त्यांना आर्थिक मदत केली. १९०१ ते १९०३ या दोन वर्षात त्यांनी दौलनिक, धर्मशास्त्र, परिभाषा आणि बौद्ध धर्म, ख्रिस्ती धर्म संघाचा, इतिहास समाजशास्त्र या विषयांचा अभ्यास केला.

समाजाचा समाजशास्त्रासह, अस्पृश्यता आणि इतर सामाजिक समस्यांचा त्यांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केला आणि असा अभ्यास करणारे ते भारतातले पहिले, शास्त्रज्ञ अभ्यासक मानले जातात.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे

प्रार्थना समाजाचे अध्यक्ष डॉ भांडारकर यांच्या शिफारसीने, विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९०१ ते १९०३ या काळात ऑक्सफर्डला रवाना झाले.

कारण होतं जगातल्या विविध धर्मांचा तौलनिक अभ्यास करण्यासाठी, त्यानंतर परत आल्यानंतर पुण्यामध्ये प्रार्थना समाजाच्या वतीने त्यांनी उदार धर्म शिक्षणाचे वर्ग चालवण्यास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान दिले.

डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेची स्थापना

१९०५ साली अहमदनगर येथील प्रार्थना समाजाच्या कार्यक्रमा वेळी भिंगार नावाच्या खेड्यातून आलेल्या अस्पृश्यांनी त्यांना आपली कर्म कहाणी ऐकवली.

भारतातील विविध ठिकाणी केलेल्या प्रवासात त्यांनी अस्पृश्य समाजाची दुरवस्था पाहिली होती, अस्पृश्य उद्धारासाठी मिशन स्थापण्याची कल्पना त्यांना त्यामुळे सूचली.

आणि दि. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांनी डिप्रेशन क्लास मिशन या संस्थेची स्थापना केली. न्यायमूर्ती चंदावरकर या संस्थेचे पहिले अध्यक्ष होते, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे स्वतः या संस्थेचे सचिव होते.

डिप्रेस्ड क्लास मिशन संस्थेची उदिष्टे

अस्पृश्यता प्रथेचे निवारण करणे, अस्पृश्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, त्यांच्यासाठी शाळा, महाविद्यालय आणि वसतिगृहांची स्थापना करणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, प्रबोधन पर व्याख्याने कीर्तने आयोजित करणे, अस्पृश्यांचे सामाजिक प्रश्न सोडवणे, त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे, त्यांना खऱ्या धर्माची शिकवण देणे, बहिष्कृत वर्गाला प्राप्त झालेला निकृष्टपणा नाहीसा करून, त्यांना स्वाभिमानी सुशिक्षित आणि उद्योगी बनवणे, यांच्या मनातील अस्पृश्यता विषय ग्रामक समजूती नष्ट करणे, आजारी लोकांची सेवा करणे, अशा काही उद्दिष्टांना समोर घेऊन या संस्थेने कार्य सुरू केले.

मिशन तर्फे पुढील दोन वर्ष मोफत दवाखान्याचे ही काम सुरू होते, त्यांच्या जहाल राजकीय मतांमुळे लवकरच मवाळ प्रार्थना समाजासोबत मतभेद सुरू झाला आणि १९१० साली त्यांचा प्रार्थना समाजा सोबत असलेला संबंध संपुष्टात आला.

विठ्ठल रामजी शिंदे माहिती मराठी

पुणे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून, विठ्ठल रामजींच्या पुढाकारांनी १९०५ मध्ये दिवसभर मजुरी करणाऱ्या कामगारांसाठी, रात्र शाळा आणि अंत्ययांच्या मुलांसाठी शाळा या सुरू करण्यात आल्या. २०१६ साल पासून विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने पुरस्कार द्यायला सुरुवात केलेली.

हा पुरस्कार हा समाजाच्या विविध घटकांमध्ये सामंजस्य प्रस्थापित करण्यासाठी, जी व्यक्ती किंवा संस्था काम करते, त्यांना नियमाने हा दरवर्षी पुरस्कार देण्यात येईल.

संस्थेच्या परिसराला अहिल्याश्रम म्हटलं जातं. महर्षी शिंदे यांनी शाळा उभारणीसाठी वाल्हेरच्या होळकर राज्याशी संपर्क साधला. तेव्हा देणगीच्या बदल्यात त्यांचं नाव द्यायचं आहे का ? अशी महर्षीना विचारणा केली. होळकर महाराजांनी स्वतःचे नाव न देता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणाची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे या परिसराला अहिल्या श्रम नाव देण्यात आलं.

भारतातील शेतकरी वर्ग, अज्ञान अंधश्रद्धा यात गुंतलेला होता. आधीच दरिद्रता आणि त्यात सावकारी आणि सरकारी पास त्यांचा श्वास अडवत होते. इंग्रज सरकारला त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता, वाली नसलेल्या या समाजाकडे शिंदेंचे लक्ष गेल.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी, म्हणून अनेक प्रयत्न केले. त्यांना संघटित करून, त्यांच्यात जागृती निर्माण करण्याचे कार्य केलं. १९१७ साली काँग्रेस पक्षातर्फे, अस्पृश्यता, निष्क्रियता संबंधित ठराव पास करून घेण्यात त्यांना यश आलं.

१९१८ ते १९२० या काळात त्यांनी अस्पृश्यता निर्मूलन परिषदा आयोजित केल्या. यातील काही परिषदा महात्मा गांधी आणि सयाजीराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आल्या. आधुनिक महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पुननिर्मितीच्या कार्यामध्ये, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे आद्य समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्रातील आणि भारतातील अस्पृश्यता निवारणाच्या कार्याची सुरुवात इथून झाली, म्हणायला हरकत नाही. यांनी अस्पृश्यता निवारणाच्या कार्याला आपल्या आयुष्याचं ध्येय मानलं.

इंग्लंडमध्ये धर्मशिक्षण घेऊन आल्यानंतर, भारतात जेव्हा ते परत आले, त्यानंतर त्यांनी इथली अवस्था पाहिली आणि अस्पृश्य समाजाची अवस्था ही अतिशय बिकट आहे.

त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळत नाही आणि त्यामुळे त्यांना एक सामाजिक स्तरावर योग्य स्थान मिळवून देण्यासाठी, म्हणून डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना १९०६ साली त्यांनी केली.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेखन व साहित्य

या सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य केलं. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन धर्म परिषदा घेणे आणि त्याचबरोबर अस्पृश्य समाजाला आपल्यामध्ये सामावून घेण्यासाठी, तेथील लोकांमध्ये जागृती घडवण्याचं, त्यांनी कार्य केलं.

त्यांना संशोधन लेखनाची ओढ असल्यामुळे, त्यांनी आपल्या या सर्व कामाच्या धावपळीतून, वेळ काढून संशोधन पर वैचारिक आणि ललित प्रकारातील महत्त्वपूर्ण लेखन केले.

अस्पृश्यता विषयक संशोधन हा त्यांच्या आस्थेचा विषय होता. अस्पृश्य वर्गाच्या एकंदर लोकसंख्येची निश्चिती करून, त्यांच्या स्थिती संबंधी १९०५ मध्ये त्यांनी इंडियन सोशल रिफॉर्मर मध्ये इंग्रजीत लेख लिहिला.

बहिष्कृत भारत साल १९०८, गायक ब्रह्मदेशातील बहिष्कृत वर्ग साल १९२७, या सोबतच भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न साल १९३३ हा समाजशास्त्रीय प्रबंध ही त्यात अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास, बुद्ध पूर्व काळापासून, वर्तमान काळापर्यंत दिसणारी अस्पृश्यतेची विविध रूपे, त्यांचा इतिहास, धर्म, सामाजिक स्थिती, राजकारण, इत्यादी विषयांचे विवेचन केले आहे.

तसेच अस्पृश्य मानले गेलेले लोक एकेकाळचे राज्यकर्ते होते आणि धर्माने बौद्ध होते, त्यांनी जाती व्यवस्थेचा, मूर्ती पूजेचा, भेदभावाचा धिक्कार केला.

त्यांनी भक्तांच्या आणि देवाच्या मध्ये पंडितांची गरज नाही, असेही नोंदवले आहे. अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्न, त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला आहे.

ग्रंथ त्यांनी लिहिला आणि भारतामध्ये अस्पृश्य समाजाची काय अवस्था आहे, आणि तो प्रश्न कशाप्रकारे सोडवला गेला पाहिजे, याची त्यांनी मांडणी केली. त्यांचे लेखन हे अतिशय उत्कृष्ट स्वरूपाचं, ग्रंथांची भाषा ही अतिशय सोपी आणि त्याचबरोबर काव्यमय सुद्धा होती.

विशेषतः या अस्पृश्य समाजाची जी अवस्था आहे, ती सुधारण्यासाठी म्हणून जी डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटीची स्थापना केली.

यामध्ये कालांतराने त्यांना जेव्हा जाणवलं की, अस्पृश्य समाज याच्यामध्ये आता सहभागी होतोय आणि आपण त्यांनाही संस्था सोपवली पाहिजे, तेव्हा स्वतःहून त्यांनी क्लासेस मिशन सोसायटी ही त्या समाजाच्या स्वाधीन केली आणि तिथून पुढे ते समाजासाठी आणि या अस्पृश्य लोकांसाठी निवारणाच्या कार्यासाठी काम करत राहिले.

विठ्ठ्ल रामजी शिंदे यांना मराठी आणि कानडी या दोन्ही भाषा अवगत होत्या. पुढे ते संस्कृत, पाली इंग्रजी आणि इतर प्राकृत भाषा शिकले. कानडी आणि मराठी भाषेतील परस्पर संबंधांचा अभ्यास करून, कानडीचा शब्दसंग्रह आणि व्याकरण यांचा मराठी वर पडलेला प्रभाव, त्यांनी अधोरेखित केला.

भागवत धर्माचा विकास या लेखमालेमध्ये भक्ती या भावनेचा विकास प्राचीन काळापासून वर्तमान काळापर्यंत कसा होत गेला, याचे विवेचन केले आहे.

१९२८ साली शिंदे यांनी ब्राह्मो समाज शतसावत श्री सफर नावाची रोजनिशी लिहिली आहे. याशिवाय मराठ्यांची पूर्वपेटी, कोकणी व मराठी भाषा संबंधांवर ही त्यांचे लेख आहे.

त्याचबरोबर विठ्ठल रामजी शिंदे यांची वृत्तपत्रे, लेखसंग्रह, लेख, व्याख्यान, उपदेश, साल १९१२ या पुस्तकात आहेत. यात प्रामुख्याने धर्म पर लेख आहे. त्यानंतरच्या काळातील अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि संशोधन पर लेख शिंदे लेख संग्रह, १९६३ यात संग्रहित करण्यात आले आहेत.

त्यांचे धर्मविषयक तसेच प्रवास वर्णन पर व्यक्ती विषयक आणि अन्य स्फोट स्वरूपाचे लेखन, धर्म जीवन व तत्वज्ञान १९७९ या ग्रंथात एकत्रित करण्यात आले आहे.

फर्ग्युसन कॉलेज साल १८१८, इंग्लंड मध्ये १९०१ ते १९०३ आणि येरवड्याच्या तुरुंगात १९३० साली असताना लिहिलेली रोजनिशी, १९७९ मध्ये प्रकाशित झाली. माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र १९४३ आणि १९५८ मध्ये प्रकाशित झाले.

हे आत्मचरित्र तीन भागात विभागलेले असून, पहिल्या भागात त्यांनी आपला जीवन प्रवास सांगितला आहे. उर्वरित भागात ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, डिप्रेशन क्लास मिशन, या त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचा उभा पोहोच आहे.

लहानपणी त्यांच्या घरी साधू रामदासी, संन्यासी आणि सिद्ध पुरुषांचे येणे जाणे होते, त्याबद्दल आणि त्यांच्या शाळा सुट्यांसोबत केलेल्या धांगडधिंगाबद्दलचे हृदयस्पर्शी अनुभव त्यात आहेत. शेतकरी चळवळ आणि परिषदांचे वृत्तांतही आहे.

त्यांच्या लेखनातून त्यांच्या अध्यात्मिक मनाची ठेवून तरल संवेदनशीलता, सौंदर्यदृष्टी आणि प्रसन्न विनोद कृती यांची प्रचिती येते. त्यांचे व्यक्तिमत्व जितके शालीन आणि सोज्वळ होते, त्यापेक्षा जास्त त्यांच्या विचारसरणीत सडेतोडपणा असायचा. समतेचा धडा त्यांनी फक्त शिकवलाच नाही तर, गिरवला देखील.

महर्षी विठ्ठलराव शिंदे सन्मान

लेखक प्राध्यापक गोमा पवार यांनी महर्षी शिंदे यांच्या आयुष्यावर संपूर्ण संशोधन करून, त्यांचे चरित्र प्रकाशीत आणले. ग.बा सरदार यांनी त्यांचा महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी म्हणून तर भाई माधवराव बागल यांनी निष्काम कर्मयोगी म्हणून गौरव केला.

जनतेने त्यांना कर्मवीर महर्षी अशा पदव्या बहाल केल्या. विठ्ठलराव शिंदे यांना आदरांजली वाहताना अर्थमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणाले होते की, महर्षी शिंदे यांनी आपल्या हयातीत केलेली धार्मिक, सामाजिक, ऐतिहासिक, आणि राजकीय क्षेत्रातील कामगिरी आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात अद्वितीय गणली जाईल.

विठ्ठल रामजी शिंदे यांचे निधन

सगळ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अहोरात्र झिजणाऱ्या महर्षी विठ्ठलराव शिंदे यांचे त्यांच्या राहत्या घरी राम विहार, पुणे या ठिकाणी दि. २ जानेवारी १९४४ निधन झाले.

विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बद्दल १० ओळी

  • जमखंडी संस्थांमध्ये जमखंडी संस्थान हे कर्नाटक मध्ये येते. या संस्थानांमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म दि. २३ एप्रिल १८७३ या तारखेला झाला होता.
  • विठ्ठल रामजी शिंदे यांना शिक्षणासाठी म्हणून सयाजीराव गायकवाड यांनी २५ रुपयांची स्कॉलरशिप देऊ केली होती आणि यासाठी अट घालण्यात आली होती की, त्यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बडोदा संस्थांमध्ये नोकरी करावी.
  • १८९८ मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचे बी.ए चे शिक्षण पूर्ण झाले. त्यांनी प्रथम श्रेणीमध्ये ही परीक्षा पूर्ण केली किंवा पास केली. ते प्रार्थना समाजाचे सदस्य होते.
  • विठ्ठल रामजी शिंदे हे टिळकांचे तसेच गांधी यांचे पुरस्कर्ते होते.
  • विठ्ठल रामजी शिंदे यांनी १९१७ च्या काँग्रेस अधिवेशनामध्ये अस्पृश्य निवारणासाठी किंवा स्प्रेता निवारणाचा एक ठराव त्यांनी संमत करून घेतला होता.
  • ऑक्टोबर १९३० मध्ये पुण्यात झालेल्या पार्वती मंदिर सत्याग्रहांमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता.
  • १९२० मध्ये त्यांनी बहुजन पक्षाची स्थापना केली. परंतु या पक्षाला अपेक्षित असा प्रतिसाद मिळू शकला नाही.
  • थोडक्यात म्हणायचं तर या पक्षाचा प्रभाव हा समाजावर पडलाच नाही, हा पक्ष त्यांनी वर्ग श्रेणीवर आधारित असा निर्माण केला होता. त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की, ज्यांच्याकडे संपत्ती आहे असा एक वर्ग समाजामध्ये आहे. ज्यांच्याकडे द्रव्य आहे असा एक वर्ग आहे आणि ज्यांच्याकडे बौद्धिक संपदा आहे असा एक वर्ग आहे आणि या तीनही वर्गामध्ये जो बसत नाही तो म्हणजे बहुजन आणि अशा बहुजनांसाठी त्यांनी या पक्षाची स्थापना केली होती.
  • विठ्ठल रामजी शिंदे यांचा मृत्यू  दि. २ जानेवारी १९४४ मध्ये झाले.
  • महर्षी शिंदे यांनी आपल्या लेखनातून समाजसुधारणेचे विचार मांडले. त्यांनी ‘उपासना’ या मासिकातून व ‘सुबोधचंद्रिका’ या साप्ताहिकातून लेखन केले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बद्दल थोडक्यात महिती

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे समाज सुधारक होते. अस्पृश्यता संपवणे आणि दलित वर्गाचे समानीकरण हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे योगदान होते.

विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखंड येथे १८७३ रोजी झाला. त्यांचे वडील रामजी शिंदे जमखंडी संस्थानात काम करायचे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी विठ्ठल रामजींचा विवाह रुक्मिणीची म्हणजेच त्यांच्या आत्याच्या मुलीशी झाला.

सुरुवातीच्या काळात उदारमतवादी वातावरणाचा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर परिणाम झाला आणि मॅक्स म्युलर यांच्यासह असंख्य तत्त्वज्ञानाच्या लेखनाचा विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर प्रभाव पडला.

विठ्ठल रामजी शिंदे म्हणजेच महर्ष शिंदे आणि १९०३ मध्ये इंग्लंडला गेल्यानंतर, त्यांचे संपूर्ण जीवन धार्मिक व सामाजिक सुधारण्यासाठी समर्पित केले. प्रार्थना समाजासाठी मिशनरी म्हणून त्यांनी आपले कार्य व योगदान चालूच ठेवले.

भारतातील अस्पृश्यता संपवणे हा त्यांच्या प्रयत्नांचा मुख्य उद्देश होता. त्यांनी १९०५ मध्ये पुण्यात अस्पृश्य मुलांसाठी रात्रीची शाळा आणि १९०६ मध्ये मुंबईत डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली.

विठ्ठल रामजी शिंदे लिखित भारतीय सृष्टी प्रचार १९३३ मध्ये प्रकाशित झाले. त्यांनी हिंदू धर्म आणि सामाजिक संस्कृती बद्दल राजा राम मोहन रॉय आणि दयानंद सरस्वती सारखेच मते व्यक्त केले. जातीव्यवस्था, मूर्ती पूजा आणि स्त्रिया आणि खालच्या जाती बद्दलच्या भेदभावांविरुद्ध त्यांनी आपल्या लेखनातून भाष्य केले.

०२ जानेवारी १९४४ मध्ये महर्षी विठ्ठल रामजींचे निधन झाले. दलितांना शिक्षणात प्रवेश मिळावा यासाठी भारतातील दलित संघर्षाचे सुप्रसिद्ध वकील विठ्ठल रामजी शिंदे आणि डिप्रेस्ड क्लासेस मशीन ऑफ इंडियाची स्थापना केली. दि. १८ ऑक्टोबर १९०६ मध्ये त्यांनी राष्ट्रीय स्तरावर अस्पृश्यतेचा सामना करण्यासाठी डिप्रेस्ड क्लासेस मशीनची स्थापना केली.

FAQ

१. कोण होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ?

यमुनाबाई आणि रामजी यांच्या मुलाचे पाळण्यातील नाव महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. थोर धर्म सुधारक, समाजसुधारक, लेखक, ब्राम्हो समाजाचे धर्म प्रसारक आणि स्वातंत्र्यसैनिक. सेवाभावी वृत्ती, विद्वत्ता, शोधक आणि चिकित्सक स्वभाव, बंधुत्वाचा पुरस्कार या सर्व गोष्टींचा एकत्र मिलाफ म्हणजेच कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे.

२. विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कधी झाला ?

जमखंडी संस्थांमध्ये जमखंडी संस्थान हे कर्नाटक मध्ये येते या संस्थानांमध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म दि. २३ एप्रिल १८७३ या तारखेला झाला होता.

३. डिप्रेशन क्लास मिशन या संस्थेची स्थापना कधी झाली ?

दि. १८ ऑक्टोबर १९०६ रोजी त्यांनी डिप्रेशन क्लास मिशन या संस्थेची स्थापना केली.

४. विठ्ठल रामजी शिंदे यांना कोणत्या पदव्या दिल्या गेल्या ?

ग.बा सरदार यांनी त्यांचा महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी म्हणून तर भाई माधवराव बागल यांनी निष्काम कर्मयोगी म्हणून गौरव केला. जनतेने त्यांना कर्मवीर, महर्षी अशा पदव्या बहाल केल्या.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला? हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment