हेलेन केलर माहिती मराठी Helen Keller Information In Marathi

असं म्हणतात, जगातला सगळ्यात दयनीय व्यक्ती तो असतो, ज्याच्याकडे दृष्टी असते, पण जगण्यासाठीचा लागणारा दृष्टिकोन नसतो.

हे वाक्य आहे, त्या व्यक्तीचं जिच्याकडून नियतीने सगळ्या गोष्टी हिरावून घेतल्या. ती ना काही बोलू शकत होती, ना ऐकू शकत होती, ना काही पाहू शकत होती, परंतु इतकं असतानाही एका डोळस माणसाला लाजवेल अस यश त्यांनी मिळवलं.

ते कसं? ही त्याच यशाची गोष्ट. तर त्या व्यक्ती आहेत, हेलेन केलर. हेलेन केलर हे एक फक्त नाव नाही तर, संपूर्ण जगासाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास हेलन केलर यांच्या बद्दल महिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

हेलेन केलर माहिती मराठी Helen Keller Information In Marathi

पूर्ण नाव हेलेन अॅडम्स केलर
जन्म तारीख दि. २७ जून १८८०
जन्म स्थळ तुस्कुम्बिया, अलाबामा, युनायटेड स्टेट्स
आईचे नाव केट अॅडम्स केलर
वडिलांचे नाव आर्थर हेन्ली केलर
गुरु एनी सुल्लीवन
ओळख लेखिका, अपंगत्व हक्क वकील व राजकीय क्रियाकलाप आणि व्याख्याता
शिक्षण बीए (हॉवर्ड विद्यापीठ)
प्रसिद्ध पुस्तक माझी जीवन कथा
मृत्यू दि. ०१ जून १९६८
मृत्यू ठिकाण ईस्टन (कनेक्टिकट)
मृत्यू कारण हृदयविकाराचा झटका

कोण होत्या हेलेन केलर?

हेलेन या अमेरिकन लेखक, वकील, अपंगत्व अधिकार अधिवक्ता, राजकीय कार्यकर्त्या आणि व्याख्याता म्हणून जगभर ओळखल्या जातात. महाविद्यालयातून पदवीधर होणाऱ्या त्या पहिल्या मूकबधिर व्यक्ती होत्या.

हे वाचा –

त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांपैकी, बऱ्याचशा पुस्तकांचे अधिक भाषात रूपांतर झालेले आहे. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी स्वतःची आत्मकथा, द स्टोरी ऑफ माय लाईफ लिहिली.

Helen Keller Information In Marathi

त्यांनी कर्णबधिर लोकांच्या स्थितीबद्दल प्रेरणादायी भाषणे देऊन, २५ वेगवेगळ्या देशांचा प्रवास सुद्धा केला. न्यूयॉर्कच्या अमेरिकन फाउंडेशन फॉर ब्लाइंड या संस्थेत बरेच वर्ष काम केले. अमेरिकन संघराज्य पेन्सिलवेनियामध्ये त्यांचा वाढदिवस हेलन केलर दिवस म्हणून साजरा होतो.

हेलेन केलर जन्म व बालपण

हेलेन केलर यांचा अमेरिकेतला अलाबामा ह्या ठिकाणी दि. २७ जून १८८० मध्ये जन्म झाला. हेलन केलरच्या वडिलांचे नाव आर्थर एच. केलर आणि आईचे नाव कॅथरीन अॅडम्स केलर होते आणि चार भावंड असा त्यांचा एकंदरीत परिवार होता.

हेलनचा परिवार तितकासा श्रीमंत नव्हता. हेलनचे वडील पूर्वी सैन्यात कॅप्टन होते. त्यांनी कापूस लागवडीसाठी काम केले आणि नंतर ते एका साप्ताहिक स्थानिक वृत्तपत्राचे संपादक होते.

सगळं सगळ नीट चालू होतं, पण हेलन जन्मली आणि अवघ्या १९ महिन्यांची असताना त्यांना एक आजार झाला, त्या आजाराचं योग्य निदान न झाल्याने त्यांना आपली दृष्टी आणि श्रमण क्षमता गमवावी लागली. आता त्यांना पाहता, ऐकता आणि शब्द कानावर न पडल्याने आपसूकच बोलता देखील येत नव्हतं.

त्यांनी प्रामुख्याने वयाच्या सातव्या वर्षापर्यंत स्पर्श आणि तुटके हातवारे यांच्या साह्याने कसाबसा संवाद साधला, पण अर्थात तिची ही भाषा सर्वानाच कळत होती, असे नाही. घरातल्या बऱ्याच वस्तू तिच्या नकळत असल्याने पडायच्या.

Helen Keller

ज्यात बऱ्याचदा तिला जखमा व्हायच्या, तिच्या घरातल्या सारख्या वावरामुळे कामांमध्ये अडचणी यायच्या आणि खूप काही घडायचं. त्यामुळे सहाजिकच सगळ्यांना तिचा थोडा का होईना, पण राग यायचा.

या सगळ्यामुळे लहान हेलन देखील चिडचिडया स्वभावाची झाली. पण जेव्हा ती चिडायची तेव्हा तिची आई तिच्या तोंडात केकचा तुकडा भरवायची आणि हेलन शांत व्हायच्या.

१८८० मधले ते उन्हाळ्याचे दिवस होते. अलबामा नावाच्या छोट्या शहरांमध्ये एका सुंदर मुलीचा जन्म झाला. तिचे पालक तिच्यावर प्रचंड प्रेम करत असत व त्यांनी तिचे नाव हेलन केलर असे ठेवले. परंतु एके दिवशी हेलनला प्रचंड ताप आला व ती आजारी पडली.

दिवसेंदिवस तिचा हा ताप चढतच होता, कुटुंबातील सर्वजण हेलनला पूर्वस्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करत होते, परंतु हेलन या परिस्थितीमधून सुधारत नव्हती, सगळ्यांनी हार मानली व ते म्हणाले हेलन आता जगू शकत नाही, परंतु हेलन जगली.

परंतु हेलन ही पहिल्यासारखी राहिली नाही, प्रचंड आजारामुळे हेलनने तिची ऐकण्याची व पाहण्याची क्षमता गमावली. हेलनच्या आई वडिलांना हेलनबद्दल प्रचंड दुःख वाटत असे, कारण हेलन ही पाहु शकत नव्हती व ऐकू पण शकत नव्हती.

हेलनला जरी लहानपणापासून ऐकता व पाहता येत नसलं, तरी ती अतिशय तेजस्वी व हुशार मुलगी होती. काही लोक बोलायची हेलन कधीच काही शिकू शकत नाही परंतु तिची आई या गोष्टीशी सहमत नव्हती. हेलन अतिशय हुशार मुलगी होती.

हेलेन केलर व एनी सुल्लीवन यांच्या मधील नात

१८८६ साली त्यांच्या आईच्या वाचनात एक बातमी आली, की ती मूकबधिर महिलेच्या यशस्वी शिक्षण प्रवासाबदल होती. हेलनच्या आईने हेलनच्या प्रेमापोटी वडिलांकडे आणि डॉक्टरांकडे या गोष्टीची विचारपूस केली.

डॉक्टरांनी त्यांना एका व्यक्तीचे नाव सुचवले, जी व्यक्ती हेलन सारख्या लोकांसाठी काम करत होती. त्या  इन्स्टिट्यूटची माहिती दिली.

हेलेन  केलर

शेवटी इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर यांना भेटल्यानंतर त्यांनी त्यांच्या वीस वर्षीय माजी विद्यार्थी एनी सुल्लीवन यांना हेलन यांचे मार्गदर्शक होण्यासाठी विचारण्यात येईल, ज्या स्वतः वयाच्या पाचव्या वर्षापासून अंशतः अंध होत्या. पण तरीही जिद्दीने त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी हे मार्गदर्शकाचे काम स्वीकारले.

हेलेन केलर व एनी सुल्लीवन यांच्या असामान्य प्रवासाची सुरुवात

१८८७ साली एनी सुल्लीवन हेलन यांच्या घरी आल्या आणि इथून त्यांच्या असामान्य प्रवासाची सुरुवात झाली.

जेव्हा ते हेलन यांच्या घरी राहायला आल्या, तेव्हापासूनच त्यांनी हेलनला तिच्या हातावर स्वतःच्या बोटांनी शब्दांचे स्पेलिंग करून, संवाद साधण्यास शिकवायला सुरुवात केली. त्यांनी हेलन साठी भेट म्हणून आणलेल्या बाहुलीसाठी डी. ओ. एल. एल. असा उल्लेख केला.

हेलेन सुरुवातीला निराश झाली, कारण तिला हेच समजत नव्हतं की, प्रत्येक वस्तू एका विशिष्ट शब्दांनी ओळखली जाते. एने सुल्लीवन “मग” हा शब्द शिकवण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा हेलन इतक्या चिडल्या की त्यांनी तो मगच तोडून टाकला.

जिला ऐकायला, बोलायला आणि डोळ्यांनी पाहता सुद्धा येत नव्हतं, अशा एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात शिकवण ही कल्पना करणे देखील अवघड आहे. पण एने सुल्लीवन यांनी प्रयत्न करणे कधी सोडले नाही. एकदा हेलन यांच्या पालकांनी एने सुल्लीवन यांना विचारले, तुम्ही हे कसं करणार आहात ?

तुम्ही स्वतः अंध आहात, त्यावर सुल्लीवन म्हणाल्या, ते मला माहित नाही, पण मला विश्वास आहे, की जसा नवजात पक्षी एक दिवस आकाशात उंच भरारी घेतो, तसाच एक क्षण हेलन यांच्या आयुष्यात देखील येईल, पण तो केव्हा? हे सांगणं कठीण आहे.

सततच्या प्रयत्नामुळे आणि कधीही हार न मानण्याच्या वृत्तीमुळे, हळूहळू का होईना, पण हेलन यांनी यांच्या हाताच्या हालचालींचे अनुकरण करण्यास सुरुवात केली.

हेलन यांची प्रगती हळूहळू दिसू लागली. जेव्हा हेलन यांना समजले की, तिच्या शिक्षिका तिच्या हाताच्या बोटांनी करत असलेला हालचाली म्हणजे वॉटर शब्दाचे स्पेलिंग आणि तिच्या दुसऱ्या हातावर थंड पाणी ओतत आहेत तो शब्द वॉटर.

सुल्लीवन यांच्या ओठावर हेलन यांनी हात फिरवला आणि शेवटी असंख्य अडचणींना सामोरे जाऊन, हेलन यांनी वॉटर हा पहिला शब्द उच्चारला.

त्या वेळी एने सुल्लीवन यांचे अश्रु अनावर झाले. आता हेलन दुसऱ्यांच्या ओठांना आणि गळ्याला स्पर्श करून बोलायलाही शिकल्या. त्यानंतर त्या दोघींनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. हेलन यांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुद्धा एने सुल्लीवन ह्या बराच काळ त्यांच्यासोबत राहिल्या.

१९६४ साली राष्ट्रपती लींडन बी जॉन्सन यांच्या हस्ते केलर यांना अमेरिकेतील सर्वश्रेष्ठ नागरी सन्मान असलेली प्रेसिडेन्शिअल मेडल ऑफ फ्रीडम यांनी सन्मानित करण्यात आले.

सर्वात मोठे आव्हान खूप कमी वेळात स्वीकारून ते तडीस नेऊन, हेलन यांचे आयुष्य फुलवणाऱ्या एने सुल्लीवन ज्यांनी गुरु शिष्याचा उत्तम आदर्श घालून दिला, त्या १९३६  साली हे जग सोडून गेल्या.

हेलेन केलरचा संघर्ष काळ

केलर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक संघर्ष केला आहे. हेलन केलर यांना समजले होते की, संघर्ष केला तर आपण करू शकत नाही असे कोणतेही काम नाही.

या दृष्टिकोनाच्या जोरावर हेलन केलर यांनी समाजाच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली. व लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली.

हेलन केलर यांनी देशभर फिरून स्वतःची कहाणी लोकांपर्यंत पोहोचवली, जेणेकरून त्या लोकांना सुद्धा यांच्या आयुष्यातील दुःखाशी लढण्याची प्रेरणा प्राप्त व्हावी. हेलनने महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवला.

हेलन केलर यांनी असे सिद्ध केले होते की, शारीरिक अपंगत्व माणसाला वाचणे, लिहिणे, बोलणे आणि खेळणे यामध्ये कधीच अडथळा आणू शकत नाही. माणसातील आळशीपणा व निराशेमुळेच माणूस हा या गोष्टींपासून वंचित राहतो. परंतु अतिशय कठीण परिश्रम, समर्पण व धैर्य जीवनामध्ये यशस्वी होण्यास मदत करतात.

हेलेन केलर पुरस्कार व सन्मान

  • १९६४ मध्ये हेलन केलर यांना राष्ट्रपती स्वातंत्र्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.
  • १९६५ मध्ये हेलन केलर यांची निवड हॉल ऑफ फेम साठी केली गेली.
  • हेलन केलर यांना १९३६ मध्ये विशिष्ट सेवा पदक देऊन गौरवीत करण्यात आले.
  • हेलन केलर यांना स्कॉटलंड मधील ग्लासगो विद्यापीठ आणि जर्मनीतील बर्लिन विद्यापीठ, तसेच दिल्ली विद्यापीठ व भारताकडून मानस डॉक्टर पद प्रदान करण्यात आले.

हेलेन केलर यांचा मृत्यू

१९६१ मध्ये हेलन यांनाही हृदय विकाराचा झटका आला, पण तरीही त्यांनी अंधांच्या निधीसाठी आपले काम चालू ठेवले. पण १९६८  साली झोपेतच त्यांची प्राणजित मावळली.

केलर ह्या या जगात नसल्या तरी, केलर आणि एने सुल्लीवन यांच्यातल्या गुरु शिष्या पलीकडचे नाते, त्यांचे चरित्र, समाजाप्रतीचे कार्य आपल्यातल्या प्रत्येकाला चिरंतर स्फूर्तीदायक ठरणार आहे.

हेलेन केलर यांचे प्रेरणादायी विचार

  • मी माझ्या कमतरतांबद्दल क्वचित विचार केला, म्हणून त्यांनी मला कधीही दुःखी केले नाही.
  • जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तो आहे, ज्याच्याकडे दृष्टी आहे पण ध्येय नाही.
  • जीवन एकतर धाडसी साहस आहे, किंवा काहीही नाही.
  • आपण आपल्या कामासाठी पुरेसा वेळ दिला तर, आपल्याला हवे ते करू शकतो.
  • चारित्र्य विकास सहजा सहजी करता येत नाही.
  • कधीही डोके झुकवू नका, उंच धरा. सरळ डोळ्यांनी जगाकडे पहा.
  • लोकांना विचार करायला आवडत नाही, जर त्यांनी विचार केला असता. तर त्याचे परिणाम नक्कीच मिळाले असते. परंतु परिणाम नेहमीच आनंददायी नसतात.
  • विश्वास ही अशी शक्ती आहे, ज्याद्वारे अंधारात विखुरलेल्या जगातही प्रकाश आणता येतो.
  • विज्ञान सर्व वाईटांवर उपचार करू शकते, परंतु त्यापैकी सर्वात वाईट मानवी उदासीनता यावर कोणताही इलाज नाही.
  • आनंदाचा एक दरवाजा बंद झाला की, दुसरा उघडतो. पण आपण त्या बंद दाराकडे इतका वेळ पाहतो की, आपल्यासाठी उघडलेला दुसरा दरवाजा आपल्याला दिसत नाही.
  • जर तुम्ही तुमचा चेहरा सूर्याकडे ठेवाल तर, तुम्हाला कधीही सावली दिसणार नाही.
  • मला मोठ्या आणि चांगल्या गोष्टी करायच्या आहेत, पण त्या छोट्या गोष्टीही महान आणि उदात्त असल्यासारखे करणे हे माझे सर्वोच्च कर्तव्य आहे.
  • काहीतरी चांगले साध्य करण्यासाठी, आपण केलेले कोणतेही प्रयत्न कधीही वाया जात नाही.
  • आशावाद हा विश्वास आहे, जो आपल्याला यश देतो. आशा आणि आत्मविश्वासाशिवाय काहीही करता येत नाही.
  • जर जगात फक्त आनंद असता तर आपण कधीही धैर्य वाढ आणि सहनशील व्हायला शिकलो नसतो.
  • जगातील सर्वात सुंदर वस्तू ना बघू शकतो, ना स्पर्श करू शकतो, त्यांना फक्त आपण अनुभवू शकतो.
  • जेव्हा कोणताही व्यक्ती उंच उडण्याची इच्छा व्यक्त करतो, त्यावेळी तो कधीही रेंगाळण्यासाठी सहमत होत नाही.
  • मी महान व चांगले कार्य करण्याची इच्छा व्यक्त करते, परंतु हे माझे परम कर्तव्य आहे की, मी छोट्या कामांमध्ये पण असे कार्य करावे, जे महान व साफ असेल.
  • आयुष्यामध्ये स्वातंत्र्याचा अर्थ असा असतो की, आयुष्यातील अडथळ्यांना दूर करणे.
  • जर आपण आपल्या कामामध्ये मग्न असू तर, आपल्याला जे हवे ते आपण प्राप्त करू शकतो.
  • खरं आनंद तेव्हा प्राप्त होतो, ज्यावेळी आपण दुसऱ्यांना मदत करतो.
  • आयुष्यामधील सर्वात महत्त्वपूर्ण शिक्षा म्हणजे संघर्ष करणे होय.
  • स्वतःची तुलना जास्त भाग्यशाली लोकांसोबत करण्यापेक्षा, आपल्या सारख्याच इतर व्यक्तींसोबत केलेली कधीही चांगले व त्यावेळी आपल्याला अनुभव येईल की आपण किती भाग्यवान आहोत.

हेलन केलर चित्रपट 

जिच्या आयुष्याला “ब्लॅक” या हिंदी चित्रपटाने अमर केले आहे ती हेलन केलर ही एक तेजस्वी दूरदर्शी स्त्री होती. हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीने खलनायकाची भूमिका केली होती, मेगास्टार अमिताभ बच्चन देखील यात मुख्य भूमिकेत होते.

हेलन केलर यांचा वारसा

तिच्या जीवनात अतुलनीय आव्हानांना सामोरे जावे लागल्यानंतरही, तिने कधीही तिची स्वप्ने किंवा जगात बदल घडवण्याची तिची इच्छा सोडली नाही.

हेलन केलरचा वारसा प्रेरणा आणि धैर्याचा एक आहे. जगभरातील असंख्य लोकांना प्रतिकूलतेवर मात करण्यासाठी आणि सामाजिक न्याय आणि समानतेसाठी लढण्यासाठी तिच्या कथेने प्रेरित केले आहे.

आज, हेलन केलर इंटरनॅशनल संस्था जागतिक पातळीवर लक्ष केंद्रित करून तिचे कार्य चालू ठेवते

हेलेन केलर यांच्या बद्दल थोडक्यात माहिती

हेलेन ॲडम्स केलर यांचा जन्म दि. २७  जून १८८० मध्ये अमेरिकेतील टस्कबिया अलबामा या ठिकाणी झाला. जन्माच्या वेळी हेलेन ह्या एकदम स्वस्थ व तंदुरुस्त होत्या. १९ महिन्यानंतर त्यांना आजाराने ग्रसले व त्या आजारामध्ये त्यांची ऐकण्याची क्षमता, पाहण्याची क्षमता व बोलण्याची क्षमता त्यांनी गमावली.

हेलन या प्रसिद्ध अमेरिकी लेखक, राजनैतिक कार्यकर्त्या, व्याख्याता व मूकबधिर असून सुद्धा बीएची डिग्री प्राप्त करणाऱ्या पहिल्या न पाहू शकणाऱ्या व न ऐकू शकणाऱ्या व्यक्ती होत्या.

प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्या नंतर हेलेन केअर यांच्या स्वतःला एकट समजत असत, कारण त्यांची सुद्धा इच्छा होती की, इतरांप्रमाणे त्यांनी सुद्धा पुढील शिक्षण पूर्ण करावे.

यामुळेच १९०२ मध्ये हेलेन केलर यांनी त्यांची पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी रेडक्लिफ कॉलेजमध्ये दाखला घेतला. त्या ठिकाणी केलर हे सामान्य विद्यार्थ्यांसोबत शिक्षण घेऊ लागल्या. या ठिकाणी शिक्षण पूर्ण करताना हेलेन केलर यांना लिखाणाचा छंद लागला व त्या लिखाण करू लागल्या.

त्या काळामध्ये केलर यांनी एक असे प्रसिद्ध पुस्तक लिहिले, ज्या पुस्तकांने हेलेन यांना प्रसिद्धी प्राप्त करून दिली. त्या पुस्तकाचे नाव द स्टोरी ऑफ माय लाईफ असे आहे.

आपल्या आयुष्यामधील संघर्षाच्या काळातील असे प्रसंग सहन करत, हेलेन केलर यांनी समजले होते की, जीवनामध्ये संघर्ष केला तर कोणतेही काम हे अशक्य नाही.

याच विचारसरणीच्या आधारावर हेलेन केलर यांनी समाजाप्रती समाज सेवेची भावना ठेवून पावले उचलली व त्यांनी समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला.

हेलेन यांच्या नावाच्या आधारे १९७७ मध्ये मुंबईमध्ये हेलेन केलर इन्स्टिट्यूट फॉर डेफ अँड डेफ ब्लाइंडची स्थापना करण्यात आली. डेफ अँड ब्लाइंड असून सुद्धा हेलेन यांनी जे प्राप्त केले, ते सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहे.

हेलेन केलर यांच्या बद्दल दहा ओळी

  • हेलेन यांचा जन्म दि. २७ जून १८८० मध्ये झाला.
  • हेलेन चे पूर्ण नाव हेलन अदमास केलर असे होते.
  • हेलेन ह्या पहिल्या पाहू व एकू न शकणाऱ्या व्यक्ती होत्या, ज्यांनी बॅचलर ऑफ आर्ट्स ही डिग्री संपादन केली होती.
  • हेलेन या एक अमेरिकन लेखिका, अपंगत्व हक्क वकील व राजकीय क्रियाकलाप आणि व्याख्याता होत्या.
  • हेलेन यांनी आजारपणामुळे वयाच्या एकोणिसाव्या महिन्यामध्ये, त्यांची ऐकण्याची व पाहण्याची क्षमता गमावली होती.
  • १९०९ मध्ये हेलेन यांनी अमेरिकेच्या समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला.
  • १९२० मध्ये हेलेन केलर यांनी अमेरिकन नागरी स्वातंत्र्य संघ शोधण्यास मदत केली.
  • हेलेन केलर यांनी एकूण बारा प्रकाशित पुस्तके व अनेक लेख लिहिले आहेत.
  • झोपेत असतानाच हेलेन केलर यांचा मृत्यू दिनांक ०१ जून १९६८ मध्ये झाला.
  • हेलेन केलर ह्या खरोखरच अपवादात्मक महिला होत्या.

FAQ

१. हेलन केलरच्या शिक्षिकेचे नाव काय होते?

वीस वर्षीय माजी विद्यार्थी एनी सुल्लीवन यांना हेलन यांचे मार्गदर्शक होण्यासाठी विचारण्यात येईल, ज्या स्वतः वयाच्या पाचव्या वर्षापासून अंशतः अंध होत्या. पण तरीही जिद्दीने त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यांनी हे मार्गदर्शकाचे काम स्वीकारले.

२. हेलन केलर कोणत्या आजाराने ग्रस्त होते?

हेलन जन्मली आणि अवघ्या १९  महिन्यांची असताना त्यांना एक आजार झाला, त्या आजाराचं योग्य निदान न झाल्याने त्यांना आपली दृष्टी आणि श्रमण क्षमता गमवावी लागेली. आता त्यांना पाहता, ऐकता आणि शब्द कानावर न पडल्याने आपसूकच बोलता देखील येत नव्हतं.

३. हेलनने लोकांना प्रेरणा कशी दिली?

हेलन केलर यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यामध्ये अनेक संघर्ष केला आहे. हेलन केलर यांना समजले होते की, संघर्ष केला तर आपण करू शकत नाही असे कोणतेही काम नाही. या दृष्टिकोनाच्या जोरावर हेलन केलर यांनी समाजाच्या कल्याणासाठी अनेक पावले उचलली.
व लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली.
हेलन यांनी देशभर फिरून स्वतःची कहाणी लोकांपर्यंत पोहोचवली, जेणेकरून त्या लोकांना सुद्धा यांच्या आयुष्यातील दुःखाशी लढण्याची प्रेरणा प्राप्त व्हावी. हेलनने महिलांच्या सन्मानासाठी आवाज उठवला.

४. हेलन केलर यांचा जन्म कधी झाला ?

हेलन केलर यांचा अमेरिकेतला अलाबामा ह्या ठिकाणी दि. २७ जून १८८०  मध्ये जन्म झाला.

५. हेलर केलर या कोण होत्या ?

हेलन केलर या एक अमेरिकन लेखिका, अपंगत्व हक्क वकील व राजकीय क्रियाकलाप आणि व्याख्याता होत्या.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस हेलन केलर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment