कपिल देव माहिती मराठी Kapil Dev Information In Marathi

कपिल देव हे क्रिकेट विश्वामधील एक नावाजलेले नाव असून, कपिल देव यांना क्रिकेटमध्ये महत्तम व सन्माननीय स्थान प्राप्त आहे. कपिल देव यांनी पहिल्यांदाच भारतामध्ये क्रिकेट विश्वचषक आणून, भारताचा गौरव करण्याचे काम केले.

हा विश्वचषक भारताला प्राप्त होईल, याची कल्पना देखील कोणी केलेली नव्हती. कपिल यांनी १९९९ ते २००० च्या दरम्याने दहा महिने भारताच्या प्रशिक्षकाची भूमिका उत्तमरीत्या बजावली.

हरियाणा तुफान या नावाने प्रसिद्ध असणारे, कपिल क्रिकेटच्या खेळपट्टीवर कधीही खेळताना धावबाद होताना, आपल्याला दिसलेला नाही. कपिल यांनी स्वतःच्या तब्येतीकडे सुद्धा नीट लक्ष दिला. त्यांच्या निरोगी आरोग्यामुळे, त्यांना कधीही कसोटी सामन्या मधून वंचित राहावे लागले नाही.

हे उजव्या हाताचे फलंदाज असण्याबरोबरच, उजव्या हाताचे वेगवान गोलंदाज सुद्धा आहे. ज्यांनी त्यांच्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये प्रचंड धावा करून रेकॉर्ड मोडला आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास या महान, सन्माननीय, क्रिकेट विश्वातील प्रसिद्ध खेळाडू, कपिल देव यांच्या बद्दल माहिती दिलेली आहे, ही माहिती व हा लेख जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

कपिल देव माहिती मराठी Kapil Dev Information In Marathi

नावकपिल देव
पूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज
टोपणनावहरियाणा तुफान , केडी
जन्मतारीख६ जानेवारी १९५९
जन्मस्थानचंदीगड, भारत
शाळाडीएव्ही वरिष्ठ माध्यमिक शाळा, सेक्टर 8-सी, चंदीगड
व्यवसायक्रिकेटर, व्यवसायी
छंदगोल्फ, टेबल टेनिस आणि स्क्वॅश खेळणे, चित्रपट पाहणे
आंतरराष्ट्रीय पदार्पणएकदिवसीय – १ ऑक्टोबर १९७८ पाकिस्तान विरुद्ध क्वेटा
कसोटी – १६ – २१ ऑक्टोबर १९७८ पाकिस्तान विरुद्ध फैसलाबाद
आंतरराष्ट्रीय निवृत्तीएकदिवसीय – १७ ऑक्टोबर १९९४ वेस्ट इंडिज विरुद्ध फरीदाबाद
कसोटी – १९ – २३ मार्च १९९४ न्यूझीलंड विरुद्ध हॅमिल्टन येथे
देशांतर्गत/राज्य संघहरियाणा
नॉर्थम्प्टनशायर
फलंदाजीची  शैली उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची  शैलीउजव्या हाताचा वेगवान मध्यम गोलंदाज
आवडता शॉटहुक आणि ड्राइव्ह
आवडता बॉलआउट-स्विंग आणि इन-स्विंग यॉर्कर्स
वैवाहिक स्थितीविवाहित
लग्नाची  तारीखवर्ष १९८०
नेट वर्थ २२० कोटी रु

कपिल देव जन्म आणि शिक्षण

कपिल यांचा जन्म पंजाब मधील प्रसिद्ध शहर चंदिगढ या ठिकाणी, दि. ०६ जानेवारी १९५९  मध्ये झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण डीएव्ही शाळेमधून पूर्ण झाले व पदवी प्राप्त करण्यासाठी कपिल यानी सेंट एडवर्ड कॉलेजमध्ये दाखला घेतला.

हे वाचा –

देव यांची लहानपणापासूनच क्रिकेट खेळातील आवड आणि प्रतिभा लक्षात घेऊन, त्यांना क्रिकेट शिकण्यासाठी देशप्रेम आझाद या प्रशिक्षकाकडे पाठवण्यात आले व बालपणापासूनच त्यांनी क्रिकेट विश्वामध्ये नाव कमावण्याच्या उद्देशाने जोरदार तयारी सुरू केली.

Kapil Dev Information In Marathi

कपिल देव कौटुंबिक माहिती

आईचे नावराज कुमारी लाजवंती
वडिलांचे  नावराम लाल निखंज
भावंडे पिंकी गिल आणि इतर ३ बहिणी , रमेश (लहान भाऊ), भूषण (मोठा भाऊ)
पत्नीचे नावरोमी भाटिया (व्यावसायिक महिला)
अपत्य अमिया देवी (मुलगी)

भारत पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर, त्यांचे कुटुंब रावळपिंड म्हणजेच सध्याच्या पाकिस्तान येथून, फाजीलका जे भारत येथे आहे, इथे आले. या ठिकाणी त्यांचे वडील राम लाल निखंज हे लाकूड व्यवसाय करत होते, तर त्यांची आई राजकुमारी जी पाकिस्तानची होती, व त्या गृहिणी होत्या.

कपिल यांना सात भावंडे होती. चार बहिणी व तीन भाऊ. काही कालावधी नंतर, कपिल यांच्या पालकांनी पंजाबच्या राजधानी मध्ये वास्तव्य करण्यास सुरुवात केले.

१९८० च्या दरम्याने देव यांचा रोमि भाटिया यांच्याशी विवाह झाला. ज्या एक व्यावसायिक महिला आहेत. सतरा वर्षानंतर त्यांना कन्या रत्न प्राप्त झाले. जिचे नाव अमिया देव असे आहे.

कपिल देव फॅमिली

कपिल देव लूक

उंची६ फूट
वजन८० किलो
केसांचा रंगगडद तपकिरी
डोळ्यांचा रंगकाळा आणी पांढरा

कपिल देव क्रिकेट कारकीर्द

कपिल यांनी क्रिकेट विश्वात १९७५ पासून सुरुवात केली. त्यावेळी ते हरियाणाकडून पंजाब विरुद्ध सामन्यांमध्ये खेळले. ज्यामध्ये कपिल यांनी हरियाणाला सहा विकेट्स घेऊन, शानदार विजय प्राप्त करून दिला व पंजाब संघाला ६३ धावांवर बाद केले.

Kapil Dev

१९७६ ते १९७७ च्या दरम्याने देव यांनी जम्मू काश्मीर विरुद्ध खेळल्या गेलेल्या, सामन्यांमध्ये एकूण आठ बळी घेतले व ३६ धावा केल्या. त्याच कालावधीत बंगाल विरुद्ध त्यांनी सात विकेट घेऊन, वीस धावा केल्या. या दोन्ही खेळांमध्ये कपिल देव यांची यशस्वी प्रतिभा सर्वांनाच आकर्षित करत होती.

देव यांनी १९७८ मध्ये कसोटी सामने खेळण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी पाकिस्तान विरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळला. ज्यामध्ये देव यांनी केवळ १३ धावा केल्या व एक विकेट घेतला.

कपिल हे उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज आहे.त उत्कृष्ट फलंदाजीच्या आधारे कपिल यांनी १९७९ ते १९८० मध्ये दिल्ली विरुद्ध १९३ धावांची नाबाद खेळी खेळून, हरियाणाला नेत्र दीपक विजय पटकावून दिला.

त्यांच्या क्रिकेट कारकीर्दी मधील हे पहिले शतक होते. त्यानंतर कपिल थांबले नाहीत, देव यांच्या फलंदाजीने नाही तर, गोलंदाजीची ही पूर्ण भारतातील जनता फॅन आहे. त्यांच्याकडे असलेल्या दोन्ही कला गुणांमुळे, देव यांना सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून संबोधले जाते.

दि. १७ ऑक्टोबर १९८० मध्ये देव यांनी वेस्ट इंडिज विरुद्ध १२४ पैकी १२६ धाव्या केल्या. ही त्यांची खेळी अस्मरणीय म्हणून संबोधले जाते.

कपिल देव यांची कामगिरी

कसोटी क्रिकेट

 • १९९४ मध्ये देव यांनी सर रिचर्ड हॅडलीचा विक्रम मोडून, जगातील सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज म्हणून नावलौकिक प्राप्त केले. त्यांचा विक्रम १९९९ मध्ये वेस्ट इंडिजच्या कोर्टनी वॉलशने मोडला होता.
 • कसोटी खेळात ९ विकेट घेणारे कपिल हे एकमेव कर्णधार होते.
 • कपिल हे ४००० कसोटी धावा व ४०० बळीची दुहेरी कामगिरी करणारे, एकमेव अष्टपैलू खेळाडू होते.
 • कसोटी सामन्या मधील कारकिर्दीमध्ये कपिल यांनी सर्वाधिक धावा रन आऊट न होता पूर्ण केल्या.
 • १००, २००, ३०० कसोटी विकेट घेणारे देव हे सर्वात तरुण क्रिकेटपटू होते.

एकदिवसीय क्रिकेट

 • सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना, सर्वोच्च एक दिवसीय धावसंख्या ज्यामध्ये झिंबाब्वे विरुद्ध १९८३ मध्ये भारताने खेळून विश्वचषक भारताच्या नावे केले.
 • १९९४ मध्ये कपिल यांनी त्यांच्या निवृत्तीपर्यंत सर्वाधिक विकेट घेणारे, गोलंदाज म्हणून प्रसिद्ध झाले.

कपिल देव यांचा कर्णधार पदाचा काळ

 • १९८२ ते १९८३  च्या दरम्याने भारत श्रीलंकेसोबत सामना खेळला गेला होता, परंतु वेस्ट इंडिज या ठिकाणी होणाऱ्या एक दिवसीय मालिकेत, कर्णधार बनण्याची संधी यांना प्राप्त झाली. त्यावेळी वेस्ट इंडिजचा संघ खूप यशस्वी व नावाजलेला संघ होता. त्यांना हरवणे हे जवळपास अशक्यच होते, परंतु सुनील गावस्करांच्या शानदार खेळीच्या जोरावर, भारताने वेस्ट इंडीजचा एका सामन्यातच पराभव केला.
 • या सामन्यामध्ये कपिल यांनी ७२ धावा करत, दोन विकेट्स घेतल्या. तर सुनील गावस्कर यांनी ९० धावा केल्या. या विजयामुळे आगामी विश्वचषकांमध्ये, वेस्ट इंडीजला पराभूत करण्याचा भारताचा आत्मविश्वास हा गगनाला भिडला. यानंतर भारताने विश्वचषक जिंकून भारताचा गौरव केला.

१९८३ विश्वचषक

 • १९८३ चा विश्वचषकाची वेळ ही जशी जवळ आली, तशी तशी प्रत्येकाच्या मनामध्ये विश्वचषक जिंकण्याची भीती निर्माण होत होती. भारतीय संघाची कामगिरी पाहिल्या नंतर, भारत विश्वचषक जिंकू शकेल की नाही याची अपेक्षा ही कोणालाच नव्हती.
 • हे मैदानावर येऊन, ज्यावेळी विश्वचषक जिंकण्यासाठी खेळत होते, तेव्हा त्यांची सरासरी २४.९४ सामान्य गोलंदाजी सारखीच होती. उपांत्य फेरी गाठण्यासाठी, भारताला झिम्बाम्बे विरुद्धचा सामना जिंकणे हे अत्यावश्यक होते. या सामन्याच्या दरम्याने, यांनी त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीने सामन्यावर प्रभुत्व प्राप्त केले, त्यावेळी भारत हा पराभवाच्या दिशेने वळत होता, त्याच सामन्यांमध्ये यांनी त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीने १७५ धावा करून झिंबाब्वेची गोलंदाजी उधळून लावली.
Kapil Dev sunil gavaskar
 • ज्यामध्ये यांनी ३८ चौकार व ०६ षटकार मारले. नवव्या विकेटसाठी १२६ धावांची सर्वात मोठी भागीदारी किरमाणी व कपिल देव यांच्यामध्ये झाली. जी भागीदारी २७ वर्ष कोणीच मोडू शकले नव्हते. एवढेच काय तर, या सामन्यात यांच्या उत्कृष्ट गोलंदाजीच्या बळावर झिंबाब्वेचे आच विकेटही घेतले गेले.
 • या उत्कृष्ट कामगिरीने यांच्यावर प्रभावित झालेली जनता व त्यांचा सन्मान म्हणून त्यांना मर्सिडीज कार भेट म्हणून दिली. ही त्यांची खेळी त्यांच्या आयुष्यामधील सर्वात अविस्मरणीय व महत्त्वाची खेळी होती. ज्यामुळे कपिल यांचा मान सर्वांच्या नजरेमध्ये वाढला व १९८३ च्या विश्वचषकात विजयाचा मार्ग या सामन्यामुळे भारताला प्राप्त झाला.
 • १९८३ च्या विश्वचषका दरम्यान बीबीसीच्या संपामुळे, हा सामना त्यावेळी प्रकाशित होऊ शकला नाही व क्रिकेट प्रेमींना या वादामुळे सामन्याचा आनंद अनुभवता आला नाही. १९८३ चा विश्वचषक जिंकण्यासाठी, भारताला अंतिम फेरीमध्ये वेस्ट इंडिजचा पराभव करणे अत्यंत महत्त्वाचे होते.
 • भारताने कपिल यांच्या मार्गदर्शनाखाली १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या या विश्वचषकात, विजय प्राप्त करून, एक आगळा वेगळा इतिहासच रचला. या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, भारत क्रिकेट जगातही एक स्टार म्हणून झळकू लागला असे म्हटले जाते.

कपिल देव यांच्या कारकर्दीचा टर्निंग पॉईंट

 • १९८४ मध्ये वेस्ट इंडीज सोबत कसोटी सामन्यांमध्ये, एक दिवसीय सामन्याची मालिका आखली गेली होती, ज्यामध्ये भारताचा पराभव झाला. कपिल यांच्या क्रिकेट कारकीर्दी मधील हा सर्वात वाईट काळ होता. त्यामुळे निवड कर्त्यांनी कपिल यांना कर्णधार पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला व सुनील गावस्कर यांना पुन्हा कर्णधार पद सोपवण्यात आले.
 • यानंतर १९८७ मध्ये परत यांच्या उत्कृष्ट कामगिरीने त्यांना कर्णधार पद सोपवण्यात आले. ज्यामध्ये भारताने उपांत्य फेरी गाठली होती. परंतु इंग्लंड करून भारताला परत पराभव प्राप्त झाला व त्यामुळे भारत विश्वचषक जिंकून, जिंकू शकला नाही. याचे प्रचंड आरोप चहात्यांनी कपिल देव यांच्यावर केले व यामुळे पुन्हा एकदा यांच्याकडून कर्णधार पद काढून घेऊन, सुनील गावस्कर यांना सोपवण्यात आले.
 • हा यांचा कर्णधार पदाचा शेवटचा प्रवास होता. यानंतर कपिल यांना पुन्हा कर्णधार पदाची संधी प्राप्त झाली नाही. १९७९ मध्ये त्यांना उप कर्णधार पद देण्यात आले.

कपिल देव यांचा प्रशिक्षक बनण्याचा प्रवास

बीसीसीआयने कपिल यांची भारताच्या प्रशिक्षक पदी नियुक्ती केली. परंतु काही वादांमुळे कपिल यांना केवळ दहा महिन्यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा लागला.

भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका २-० अशा रीतीने गमावल्यानंतर, कपिल यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप लावल्याचे बोलले जात होते. त्यामुळे हे सर्व वायफळ आरोप टाळण्यासाठी, कपिल यांनी स्वतःच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा दिला.

कपिल देव पुरस्कार आणि उपलब्धी

 • १९७९ ते १९८० च्या दरम्यान कपिल यांच्या क्रिकेट विश्वातील उत्तम कामगिरीमुळे, त्यांना भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. हा पुरस्कार कोणत्याही क्रीडा क्षेत्रामधील उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना भारत सरकार देऊन त्यांचा सन्मान करते.
 • १९८२ मध्ये कपिल यांचे प्रतिभाशाली व्यक्तिमत्व व खेळाविषयी समर्पण पाहून, भारत सरकारने कपिल यांना पद्मश्री पुरस्कार देऊन, सन्मानित केले. यानंतर एका वर्षाने म्हणजेच १९८३ मध्ये कपिल यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयरचा सन्मान देऊन, त्यांना गौरवीत करण्यात आले.
 • १९९४  मध्ये देव यांनी रिचर्ड हॅडलीचा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विश्वविक्रम मोडला व कसोटी क्रिकेटमध्ये ४०० विकेटसह ५००० धावा पूर्ण करणारे देव हे जगामधील आज पर्यंतचे सर्वोच्च खेळाडू म्हणून ओळखले जातात.
 • १९९१ मध्ये देव यांच्या अविस्मरणीय योगदान आणि समर्पणाचा सन्मान करण्यासाठी, भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. त्यानंतर २००२ मध्ये कपिल यांना विस्डेन इंडियन क्रिकेटर ऑफ द सेंचुरी हा सन्मान देऊन त्यांचा सन्मान केला.
 • २०१० मध्ये कपिल यांना आयसीसी क्रिकेट हॉल ऑफ द फेम पुरस्कार देऊन, गौरविले. यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच २०१३ मध्ये भारताला एनडीटीव्ही द्वारे २५ ग्रेटेस्ट ग्लोबल लिविंग लिजेंड्सची पदवी देण्यात आली.
 • कपिल यांनी भारतीय सैन्यामध्ये सक्रिय सहभाग दर्शवण्यासाठी, भारतीय प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नल पद स्वीकारले.

निवृत्तीनंतरचा वारसा

1994 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर, कपिल देव यांचा खेळावर प्रभाव आणि भारताचा क्रिकेट वारसा टिकून राहिला. त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल, कपिल देव यांना 2010 मध्ये ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आले.

त्यांचे नेतृत्व कौशल्य आणि अविचल भावना खेळाडूंना प्रेरणा देत राहते, तर त्यांचे मैदानावरील कारनामे जगभरातील क्रिकेट चाहत्यांच्या आठवणींमध्ये कायम आहेत. त्यान्नी प्रशिक्षक, समालोचक आणि मार्गदर्शक म्हणून विविध भूमिका पार पाडल्या आणि आपले अफाट ज्ञान आणि अनुभव भविष्यातील क्रिकेटपटूंसोबत शेअर केले.

कपिल देव वाद

मॅच फिक्सिंगचा आरोप

१९९९ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आयसी बिंद्रा यांनी यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला की, यांनी १९९४  च्या श्रीलंका दौऱ्यामध्ये कमी कामगिरी करण्यासाठी, मनोज प्रभाकरला पैसे दिले होते.

या आरोपामुळे यांना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु काही कालावधी नंतर कपिल यांच्यावर लावलेला हा आरोप फेटाळण्यात आला.

कंपनीचे शेअर्स खरेदी केल्याचा आरोप

२०१६ मध्ये यांनी मोठ्या सवलतीच्या दराने कंपनीचे शेअर्स खरेदी केल्याचा आरोप, त्यांच्यावर केला गेला. ज्यामध्ये कपिल हे आयकर तपासणीच्या मध्यात आले.

कपिल देव यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

कपिल हे क्रिकेट विश्वामधील, नावाजलेले खेळाडू असून ते एक प्रसिद्ध क्रिकेटर आहे. प्रसिद्ध भारतीय चित्रपट दिग्दर्शक कबीर खान यांनी कपिल देव, यांच्या जीवनावर आधारित बायोपिक बनवण्याचे काम सुरू केले.

यावर यांना दिग्दर्शक कबीर खान यांनी विचारले की, कपिल ही भूमिका साकारण्यासाठी कोणत्या अभिनेत्याची निवड करण्यात यावी. त्यावेळी प्रसिद्ध क्रिकेटर कपिल यांनी रणवीर सिंगचे नाव सुचवले.

प्रोडक्शन व अनुराग बासू यांच्यासोबत इतरांनी, या चित्रपटात स्वतःचे पैसे गुंतवले होते. ज्यामध्ये रणवीर सिंग यांनी कपिल यांची भूमिका साकारली. यांच्या पत्नीच्या भूमिकेत दीपिका पदुकोण, सुनील गावस्करच्या भूमिकेत ताहिर राज भसीन, मोहिंदर अमरनाथच्या भूमिकेत साकिब सलीम आणि मदन लालच्या भूमिकेत हार्डी संधू यांचा समावेश आहे.

या चित्रपटात दिलीप वेंगसरकर आणि कीर्ती आझाद यांसारखे त्या काळातील इतर प्रमुख भारतीय क्रिकेटपटू देखील आहेत. हा चित्रपट नोव्हेंबर 2021 मध्ये रिलीज झाला. चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी, दिग्दर्शन आणि कामगिरी, विशेषत: कपिल देवच्या भूमिकेत रणवीर सिंगची प्रशंसा झाली.

कपिल देव यांच्या बद्दल मनोरंजक तथ्ये

 • कपिल हे एक प्रसिद्ध क्रिकेटर असून, ते एक प्रसिद्ध व्यावसायिक सुद्धा आहे. ज्याने २००६ मध्ये कॅप्टन इलेव्हन नावाची दोन रेस्टॉरंट चंदिगढ व पटनामध्ये चालू केली आहे. ज्याचे व्यवस्थापन व नियोजन स्वतः देव करतात.
 • देव यांनी दोन पेक्षा जास्त, चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारल्या आहेत. जसे की मुझसे शादी करोगी, ये दिल लगी है, इकबाल, आदी.
 • कपिल यांना लिखाण करण्याची प्रचंड आवड आहे. कपिल देव यांनी गॉडस डिग्री, क्रिकेट माय स्टाईल, स्टेट फ्रॉम माय हार्ट, अशी तीन आत्मचरित्रे लिहिली आहेत.
 • मे २०१७ मध्ये कपिल देव यांच्या उत्कृष्ट कामगिरी स्मरणार्थ, मादाम तुसाद या संग्रहालयामध्ये कपिल देव यांचे मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले गेले आहे.
 • १९९४ मध्ये त्यांच्या क्रिकेट विश्वातील निवृत्तीनंतर, कपिल देव हे गोल्फ आणि लोरीयास फाउंडेशनचे एकमेव आशियाई संस्थापक सदस्य होते.
 • कपिल देव यांना हरियाणाचा तुफान म्हणून संबोधले जाते.

कपिल देव यांच्या बद्दल दहा ओळी

 • कपिल देव हे भारतातील सर्वश्रेष्ठ अष्टपैलू खेळाडू आहेत.
 • त्यांचा जन्म दि. ०६ जानेवारी १९५९ रोजी चंदिगढ या ठिकाणी झाला.
 • कपिल देव यांचे पूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे आहे.
 • कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ साली विश्वचषक जिंकला.
 • या विजयानंतर, भारताला क्रिकेट जगामध्ये एक वेगळीच ओळख प्राप्त झाली.
 • कपिल देव यांनी आपल्या कसोटी कारकिर्दीत, ४०० पेक्षा जास्त विकेट घेऊन, चार हजार धावा काढल्या आहेत.
 • क्रिकेट मधील अमूल्य योगदानाबद्दल कपिल देव यांना अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, आयसीसी हॉल फेम पुरस्कार, सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार, देऊन सन्मानित केले गेले आहे.
 • १९८३ विश्वचषक कामगिरीसाठी, कपिल देव यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवित केले गेले.
 • १९९९ मध्ये भारतीय क्रिकेट मंडळांनी कपिल देव यांना भारतीय क्रिकेट संघाचा कोच म्हणून मान दिला.
 • कपिल देव क्रिकेट विशेषज्ञ आणि समालोचक म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहेत.

FAQ

१. कपिल देव का प्रसिद्ध होते?

भारताने कपिल देव यांच्या मार्गदर्शनाखाली १९८३ मध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या या विश्वचषकात, विजय प्राप्त करून, एक आगळा वेगळा इतिहासच रचला. या त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे, भारत क्रिकेट जगातही एक स्टार म्हणून झळकू लागला असे म्हटले जाते.

२. कपिल देव यांना कोणते पुरस्कार मिळाले आहेत?

क्रिकेट मधील अमूल्य योगदानाबद्दल कपिल देव यांना अर्जुन पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, आयसीसी हॉल फेम पुरस्कार, सी के नायडू जीवन गौरव पुरस्कार, देऊन सन्मानित केले गेले आहे. १९८३ विश्वचषक कामगिरीसाठी, कपिल देव यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवित केले गेले.

३. 1983 मध्ये कपिल देव यांनी कोणाचा विक्रम मोडला?

कपिल देव यांनी त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीने १७५ धावा करून झिंबाब्वेची गोलंदाजी उधळून लावली. ज्यामध्ये कपिल देव यांनी ३८ चौकार व ०६ षटकार मारले. नवव्या विकेटसाठी १२६ धावांची सर्वात मोठी भागीदारी किरमाणी व कपिल देव यांच्यामध्ये झाली. जी भागीदारी २७ वर्ष कोणीच मोडू शकले नव्हते.

४. कपिल देव यांचा जन्म कधी आणि कुठे झाला?

कपिल देव यांचा जन्म पंजाब मधील प्रसिद्ध शहर चंदिगढ या ठिकाणी, दि. ०६ जानेवारी १९५९  मध्ये झाला.

५. कपिल देव कोणत्या राज्यातील आहेत?

कपिल देव यांचा जन्म चंदिगढ या राज्यात झाला.

६. कपिल देव यांच्या पत्नीचे नाव काय ?

१९८० च्या दरम्याने कपिल देव यांचा रोमि भाटिया यांच्याशी विवाह झाला. ज्या एक व्यावसायिक महिला आहेत. सतरा वर्षानंतर त्यांना कन्या रत्न प्राप्त झाले. जिचे नाव अमिया देव असे आहे.

७. कपिल देव यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर हा पुरस्कार कधी व का मिळाला ?

१९८३ विश्वचषक कामगिरीसाठी, कपिल देव यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवित केले गेले.

८. कपिल देव यांचे पूर्ण नाव काय ?

कपिल देव यांचे पूर्ण नाव कपिल देव रामलाल निखंज असे आहे.

९. कपिल देव यांना प्रशिक्षक पदाचा राजीनामा का द्यावा लागला ?

१९९९ मध्ये बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आयसी बिंद्रा यांनी कपिल देव यांच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप केला की, कपिल देव यांनी १९९४ च्या श्रीलंका दौऱ्यामध्ये कमी कामगिरी करण्यासाठी, मनोज प्रभाकरला पैसे दिले होते. या आरोपामुळे कपिल देव यांना भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदाचा राजीनामा द्यावा लागला.

१०. कपिल देव यांचा मेणाचा पुतळा कधी व कूठे बनवण्यात आला आहे ?

मे २०१७ मध्ये कपिल देव यांच्या उत्कृष्ट कामगिरी स्मरणार्थ, मादाम तुसाद या संग्रहालयामध्ये कपिल देव यांचे मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केले गेले आहे.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणास क्रिकेटर कपिल देव यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा, धन्यवाद.

Leave a comment