कर्मवीर भाऊराव पाटील माहिती Karmveer Bhaurao Patil Information In Marathi

छत्रपती शिवराय, शाहू महाराज, महात्मा फुले, यांच्या महाराष्ट्रात ज्यांनी गोरगरीब बहुजन अशा समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचे बीज रोवलं ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील.

स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, आणि स्वातंत्र्य हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतुसूत्री मांडणारे, कर्मवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षक, तज्ञ, तर म्हटलेच पाहिजे. त्यासोबत कमवा आणि शिका असा अतिशय सोप्या भाषेत, शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे, कर्मवीर एक श्रेष्ठ समाज सुधारक आहेत.

सांगली, कोल्हापूरचा नदीपट्टा म्हणजे जैन, मराठा आणि लिंगायत या तिन्ही जातींचे राजकारण. उगीच खोटं कशाला बोलावं, पण आम्ही जातीचे राजकारण करत नाही, असं कितीही ठणकावून म्हणालात तर, हे राजकारण इथे चालतं.

अशाच भागातून कर्मवीर हे नाव पुढे आले. काही प्रमुख अपवाद होते, ज्यांना जातीचा बिल्ला कधीच लागला नाही आणि कोणी जाणूनबुजून लावण्याचा प्रयत्न केला, तर कर्मवीर अण्णांच्या उंची पुढे तो फिका पडला.

या माणसाला गरिबी आणि शेतकरी ही एकच साथ दिसत होती आणि शिक्षण हा त्यावरचा उपाय दिसत होता. त्यातूनच कर्मवीरांनी शिक्षणाचा प्रसार सुरु केला. एक नाही, दोन नाही, तर अशा चार चार पिढ्यांना शिकवण्याचा श्रेय कर्मवीर अण्णांना जातं.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख जाणून घेण्यासाठी खालील माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

कर्मवीर भाऊराव पाटील माहिती Karmveer Bhaurao Patil Information In Marathi

पूर्ण नाव महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील
जन्म तारीख दि. २२ सप्टेंबर १८८७
जन्म स्थळ कुंभोज, कोल्हापूर
ओळख महर्षी , कर्मवीर
आईचे नाव गंगुबाई पायगोंडा पाटील
वडिलांचे नाव पायगोंडा पाटील
पत्नी लक्ष्मी बाई पाटील
अपत्य आप्पासाहेब पाटील
मृत्यू दि. ९ मे १९६९

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म व प्रारंभिक जीवन

कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी भाऊरावांचा दि. २२ सप्टेंबर १८८७ साली जन्म झाला. भाऊराव हे लहानपणापासून हट्टी स्वभावाचे, वडील सरकारी नोकरीत होते, त्यामुळे वडिलांसोबत भाऊ रावांच्या पायालाही भिंगरी लागले.

हे वाचा –

परंतु भाऊरावांचे मामा हे पैलवान,त्यांचा मित्र सत्यपाल हा शूर, साहसी आणि दयाळू गरिबांचा वाली. तो श्रीमंताकडून मिळालेले पैसे गोरगरिबात वाटून टाकत असे, त्याच्या चातुर्याच्या, हिमतीच्या, संगोपणाच्या गोष्टींचा प्रभाव भाऊरावांवर चांगलाच होता. अन्यायाविरुद्ध बंड करण्याचे बाळकडू त्यांना लहानपणी सत्यपालाकडून मिळाले होते.

भाऊराव यांचा जन्म जैन कुटुंबात झालेला, जैन धर्माचे नियम बाजूला ठेवून, भाऊराव त्याच मार्गाने चालू लागले, जातीच्या शिक्षणासाठी त्यांनी हा मार्ग निवडला होता. लहानपणापासून भाऊराव पाटील हे वेगळ्या स्वभावाचे होते, त्यांना कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन होत नव्हता. मग तो अन्याय इतरांवर का केला गेला पाहिजे ? हा प्रश्न त्यांना पडत असे.

Karmveer Bhaurao Patil Information In Marathi

भाऊरावांचे शिक्षण बेताचे वसतिगृहात शिकत असताना तेथील नियम हे व्यक्ती स्वातंत्र्याच्या विरुद्ध दिसल्याबरोबर भाऊरावांनी ते वसतिगृह सोडले आणि त्यांच्या आयुष्याला एक वेगळे वळण लागले.

कुस्ती, मल्लखांब, यासारख्या खेळात नेहमी आघाडीवर असल्यामुळे, त्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या वाड्यात आश्रय मिळाला. समाजसेवेचा वारसा त्यांनी त्यांच्याकडूनच घेतला. पुढे उद्योगाच्या निमित्ताने ते जेव्हा भारतभर फिरून आले, तेव्हा त्यांचा शिक्षणाचा पिंड काही त्यांना गप्प बसू देत नव्हता.

विचार, आचार, उच्चार, यांचे उगम स्थान म्हणजेच खरे शिक्षण. सत्य, सामाजिक समता, या सर्वांचा संगम त्यांना शिक्षणात दिसला. इतकेच नव्हे तर जनजागृती, समाज क्रांतीसाठी ही शिक्षणासारखे दुसरे माध्यम नाही, अशी त्यांची खात्री झाली.

कर्मवीर भाऊराव पाटील कसे घडले ?

कधी कधी माणसाच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात, ज्याने त्याचे आयुष्य बदलून जाते. माणसाच्या आयुष्याला कलाटणी देणारे असे प्रसंग त्याच्या जीवनात असले हि पाहिजे, नाही तर त्यांच्याविना हे आयुष्य निरस होईल. असाच एक प्रसंग कर्मवीर भाऊराव यांच्या आयुष्यात देखील घडला आणि या प्रसंगानंतर त्यांचे आयुष्य बदलून गेले.

Karmveer Bhaurao Patil

पायगोंडा पाटील हे आपल्या परिवारासह कोरेगाव या ठिकाणी राहत होते. तेव्हा एकदा त्यांच्या घरी पाहुणे आलेले होते, इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यानंतर पाहुणे जेवण्यास बसले.

जेवता जेवता पाहुण्यांनी प्रश्न केला, आपला चिरंजीव काय काम करतात ? यावर पायगोंडा पाटील उत्तरले, तो काहीही काम करत नाही. दोन वेळा पोटभर जेवणे आणि गावभर हिंडणे तेवढेच तो काम करतो.

कर्मवीर अण्णांच्या पत्नी त्यावेळेस जेवण वाढत होत्या, हे सर्व ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू दाटले आणि जेवण वाढता वाढता कर्मवीर अण्णांच्या ताटात पडले. बायको आणि पाहुण्यांसमोर झालेला हा अपमान त्यांच्या जिवारी लागला.

तेव्हा लगेच ते तडकन ताटावरून उठले आणि जेवण न करता निघून गेले. कर्मवीर अण्णांच्या डोक्यामध्ये अनेक विचार येऊ लागले, अनेक प्रश्नांनी त्यांच्या डोक्यामध्ये थैमान घातले. आपण काहीतरी केलेच पाहिजे, असा त्यांनी मनाचा निर्धार केला आणि तो निर्धार पूर्ण करण्यासाठी, त्यांनी वाटचाल सुरू केली.

अत्यंत खडतर तपश्चर्येतून, त्यांच स्वप्न पूर्ण झालं. कमवा आणि शिका या योजनेतून त्यांनी असंख्य मुलांना शिक्षण दिले. तळागाळातील मुलांना आपल्या अंगा खांद्यावरून आणून, शाळेत दाखल करून, शिक्षण दिले.

त्यांनी घरोघरी शिक्षणाची गंगा पोहोचवली. घरोघरी शिक्षणाची मुळे खोलवरती रुजवण्याचं कार्य, कर्मवीरांनी केल. आपल्या आयुष्यातील अनेक संकटांवरती मात करून, त्यांनी असंख्य मुलांना शिक्षित केले.

तळागाळातील मुलांना देखील त्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात आणले, आजही अण्णांची कमवा आणि शिका ही योजना अगणित मुलांना स्वावलंबी शिक्षण देत आहे. आणि त्यांना भारताचे एक उत्तम नागरिक बनवत आहे.

शिक्षणाचा प्रसार

महात्मा फुले यांचा पाईक म्हणून दुधगाव येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना त्यांनी केली. पुढे १९१९ मध्ये कराड तालुक्यातील काले या गावी रयत शिक्षण संस्थेची स्थापना त्यांनी केली एकूणच शिक्षणासाठी सर्व जीवन वाहून जनसामान्यांच्या मुलांसाठी, अतोनात कष्ट भाऊराव यांनी केले.

Karmveer Bhaurao Patil

या त्यांच्या शैक्षणिक कार्यांत त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचाही फार मोठा हातभार होता. मुलांना सण साजरा करता यावा, म्हणून लक्ष्मीबाईंनी स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवले होते. कमवा आणि शिका हा कर्मवीरांचा शिक्षणामागचा मूलमंत्र रयतेला पटवून देण्यासाठी स्वावलंबी शिक्षणाची कल्पना ते प्रत्यक्षात जगले.

बहुजन समाजाला ज्ञानाची संजीवनी देऊन, गरिबांच्या झोपडी पर्यंत ज्ञानगंगा पोहोचवण्याचे, व्रत त्यांनी आयुष्यभर पाळले. कर्मावर त्यांचा गाढा विश्वास होता.

कोणते काम किंवा श्रम हे हलके नसते, काम म्हणजे ईश्वर. त्या श्रमाला प्रतिष्ठान देण्याचे कार्य, पवित्र देण्याचे काम, स्वावलंबनाचा आनंद लुटू देण्याचे महान श्रेय, कर्मवीरांच्या शैक्षणिक तत्त्वज्ञानातून दिसून येते.

रयतेच्या शिक्षणाबरोबरच समाज परिवर्तन घडवून आणण्याचा वारसा कर्मवीरांनी महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगे महाराज यांच्यापासून घेतला होता.

शिक्षणाच्या गंगोत्रीतून दारिद्र्य, अंधश्रद्धा, लोक भ्रम, अज्ञान, अशा अनेक महा संकटातून सुटण्यासाठी अनेक समाज उद्योग उपक्रम त्यांनी राबवले. हे कर्तव्यनिष्ठ शिक्षक हा संपूर्ण समाज बदलू शकतो, लहान मुले हीच या देशाचे भविष्य घडवणार असतात, तेव्हा शिक्षणातून देशप्रेम, स्वावलंबन, अन्यायाची चीड, श्रमाची प्रतिष्ठा, अशा सद्गुणांचे बाळकडू सर्वाना पाजले गेले तर, निश्चितच या देशाचा विकास घडेल.

शिक्षण हेच माणसाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे मूळ आहे. हीच त्यांची पक्की विचारसरणी होती. कर्मवीरांच्या कार्याचा पडसाद, तसेच त्यांच्या कार्याची पाऊल खुणा, तसेच त्यांच्या स्मृती, आठवणी, म्हणून सांगलीतील दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ नावाची मोठी संस्था तसेच, साताऱ्यातील छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस, तर बोधचिन्ह, रूप, वट वृक्षासह आजही दिमाखात उभे आहे.

वसतीगृहातून भेदभाव नष्ट करणे, अस्पृश्यांना न्याय मिळवून देणे, सामाजिक समता प्रस्थापित करणे, सर्व जाती धर्माचे, सर्व थरातील विद्यार्थी एकत्र राहणे, त्यांचा समन्वय घडून आणणे या त्यांच्या सामान्य कार्याची सर्वांनी मुक्तकंठाने स्तुती केली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्था

सातारा जिल्ह्यातील कालिया गावी दिनांक दि. ४ ऑक्टोंबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी केवळ कमी शिक्षणाचा नव्हे, तर समता, बंधुता, समप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी, आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील

दि. २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वस्तीगृहाचे, श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नामकरण केले गेले. दि. १६ जून १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत झाली. याचसाठी साताऱ्यात भाऊरावांनी सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज सुरू केले.

देशातले कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे पहिले हायस्कूल सन १९४० साली  फ्री अंड रेसिडेन्शियल हायस्कूल, ज्याचे नंतर महाराजा सयाजीराव गायकवाड असे नामकरण झाले. इसवी सन १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेजची, तर इसवी सन १९५४ साली कराड येथे सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली.

शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणू लागली म्हणून, त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इसवी सन १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले. भारतात क्रमांक एकची बनलेली शिक्षण संस्था म्हणजेच रयत शिक्षण संस्था.

महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे समाजकार्य

महर्षी कर्मवीर यांनी फक्त शिक्षणातच नाही तर, समाजातही अनेक बदल घडवून आणले. आता आपण पाहू कर्मवीरांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे, यासाठी कमवा व शिका ही कल्पना स्वीकारून मोठे काम केले.

ते महात्मा ज्योतिबा फुले, यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.

रयत शिक्षण संस्थेची स्थापना कशी केली ?

वडिलांनी बायको समोर बेरोजगार म्हणून केलेला अपमान सहन झाला नाही म्हणून, कर्मवीरांनी रागाने आपलं राहतं घर सोडलं.

पुढ आयुष्यात काहीतरी करून दाखवीन, तेव्हाच घरी पाय ठेवीन अशी ठाम निश्चयवादी भूमिका आणि छत्रपती शाहू महाराजांकडून मिळालेलं समाजसेवेचे बाळकडू, या दोन्हच्या प्रेरणेतून त्यांनी गरिबांच्या मुलांसाठी खंडातील सर्वात मोठी शिक्षा संस्था उभी केली. संस्था गरीब जनतेच्या प्रयत्नसाठी होती म्हणून त्या संस्थेला नाव सुद्धा रयत शिक्षण संस्था असच दिल.

आजपर्यंत संस्थेत करोड मुलांनी शिक्षण घेतले आणि आजच्या घडीला करोडो मुले शिक्षण घेत आहे. यापेक्षा मोठा वर मग काय असू शकतो, हा सर्व भीम पराक्रम ज्यांनी आपल्या आयुष्यात साध्य करून दाखवला, ते शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील.

भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुंभोज गावचा. त्यांच्या वडिलांचे नाव पायगुंडा पाटील सरकारी खात्यात कारकून म्हणून काम करायचे. त्यांच्या सतत बदलही व्हायच्या, त्यामुळे भाऊरावांच प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या गावात झाल.

भाऊराव म्हणजे लहानपणापासून बंडखोर वृत्तीचा माणूस. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, हा त्यांचा स्वभाव. इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी जेव्हा त्यांनी राजाराम हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं, तेव्हा तिथे त्यांना जैन बोर्डिंग मध्ये राहावं लागल.

त्या बोर्डिंग मधील मुलांवर कर्मठ धार्मिक नियमांचे पालन करण्याची सक्ती केली जायची. पण भाऊराव यांनी ते नियम पाळण्यास नकार दिला. त्यासाठी त्यांना शिक्षाही भोगावी लागली. पण शेवटपर्यंत त्यांनी आपली भूमिका बदलली नाही.

रागाच्या भरात भाऊरावांनी बोर्डीग सोडले. म्हणजे फक्त सहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर, सत्यशोधक समाजाच्या कार्यात जास्त काळ छत्रपती शाहू महाराजांच्या सहवासात राहिल्यामुळे, त्यांचा त्या संघटनेची संबंध आला होता.

काय दिवस तिथे काम केल्यानंतर, त्यांनी वेगवेगळे व्यवसाय शोधण्याचा प्रयत्न देखील केला. त्यांच्या कंपन्यांसाठी त्यांनी गावोगावी फिरून मार्केटिंगचे काम देखील केलं. याच काळात त्यांचा लोकांच्या मूलभूत प्रश्नांशी, गरीब आणि अस्पृश्य मुलांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध आला.

त्या लोकांवर होणारे अन्याया मुळे, त्या लोकांना शिकून सोडून शहाण केलं नाही, त्यांना त्यांच्यावरच्या अन्यायाची जाणीव करून दिली नाही, तर त्यांच्या पुढच्या कित्येक पिढ्या अशाच अंधारात जगत राहतील, या विचाराने त्यांना अस्वस्थ केले. तेव्हा त्यांनी गरीब मुलांना शिक्षण देण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर उचलली आणि काम करायला सुरुवात केली.

बहुजन समाजातील मुलांना शिक्षण देणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता. त्यानुसार बहुजनांच्या मुलांसाठी त्यांनी पहिल्यांदा सांगली जिल्ह्यातल्या दुधगाव येथे दुधगाव विद्या प्रसारक मंडळ आणि दुधगाव विद्यार्थी आश्रमाची स्थापना केली.

तिथे सगळ्या जाती-धर्माची मुलं एकत्र राहून शिक्षण घ्यायची आणि काले गावात सुद्धा अशीच वस्तीगृह सुरू केली. लोकांचा चांगला प्रतिसाद त्यांना मिळू लागला. सातारा मध्ये पार पडलेल्या सत्यशोधक समाजाच्या परीक्षेत बोलण्याची संधी मिळाली, तेव्हा त्यांनी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून, एक संस्था स्थापन करण्याचा विचार मांडला.

सर्वांनी त्यांचं बोलणं उचलून धरलं. त्यानुसार लोकांच्या सहभागातून ०४ ऑक्टोबर १९१९ मध्ये कोरे येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. पुढे १९२४ मध्ये शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय सातारा येथे नेण्यात आले.

छत्रपती शाहू बोर्डी गावची सुरुवात केली. सर्व जाती-धर्मांची पोरं, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता त्या बोर्डिंग हाऊस मध्ये राहू लागली. भाऊराव यांनी खूप कष्ट घेतले, पावसापाण्याची कसलीच परवा न करता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत, त्यांनी संस्थेसाठी निधी उभा केला.

वेळप्रसंगी आपल्या बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून, वस्तीगृहातल्या मुलांच्या जेवणाची सोय केली. पण त्यांच्या शिक्षणाची कसली आभाळवून दिली नाही. विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका या योजना राबवून त्यांनी शिक्षण क्षेत्रात अभिनव प्रयोग राबवला. त्यातून प्रेरणा घेत कित्येक विद्यार्थ्यांनी स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद हे त्यांचे घोषवाक्य खरं करून दाखवल.

आज सुद्धा प्रयत्न करून बाहेर पडलेले कित्येक विद्यार्थी देशातल्या मोठमोठ्या सरकारी पदावर कारभार सांभाळत आहेत. एवढेच नाही तर, त्यापैकी बरेच जण राजकारण, उद्योग व्यवसायात, आपली छाप पडत आहेत. त्या काही प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या उभारणीनंतर, कर्मवीरांनी आपला मोर्चा बहुजन तरुणांच्या उच्च शिक्षणाकडे वळवला होता.

त्यानंतर त्यांनी गांधी, आंबेडकर, यांच्यामधील पुणेकरांच निमित्त साधून युनियन बोर्डिंग अशी स्थापना केली. महात्मा गांधी सुद्धा कर्मवीरांच्या कार्याने प्रभावित झाले होते, म्हणून तर त्यांनी त्यांच्या आश्रमांकडून वार्षिक पाचशे रुपयांची देणगी संस्थेसाठी सुरू केली होती.

पुढे साताऱ्यातच तरुणांच्या उच्च शिक्षणासाठी छत्रपती शिवाजी कॉलेजची देखील स्थापना केली. आज तर रयत संस्थेचा प्रसार खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. २०१७ च्या सर्वेक्षणानुसार रयत शिक्षण संस्था आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे.

कारण सध्या रयत शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्रात तब्बल ४३८ माध्यमिक शाळा, एक अभियांत्रिकी महाविद्यालय, एक विधी महाविद्यालय, २ कॉलेज ४२ उच्च महाविद्यालय ८ बेड कॉलेज, ८० वस्तीगृहे, ४२ प्राथमिक शाळा, ३१ पूर्व प्राथमिक शाळा, ०८ आश्रम शाळा आणि ०६ औद्योगिक प्रशिक्षण संसद आहे.

सयाजीराव महाविद्यालय, वाय सी कॉलेज, डीजी कॉलेज, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, हे सुद्धा रयत शिक्षण संस्थेचाच एक भाग आहे.

रयत शिक्षण संस्थेची उद्दिष्टे

  • शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे, तशीच ती वाढवणे.
  • मागासलेल्या वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणे.
  • दलित जाती धर्मातील विद्यार्थ्यांसाठी प्रेम भाव निर्माण करणे.
  • अयोग्य रूढीना फाटा देऊन, खऱ्या विकासाचे वळण लावणे.
  • संघशक्तीचे महत्त्व कृतीने पटवून देणे.
  • सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.
  • बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारसाठी जरूत पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू

या महापुरुषाचे महानिर्वाण दि. ०९ मे १९५९ साली झाला. परंतु मित्रहो संपूर्ण महाराष्ट्रभर अनेकानेक प्राथमिक, पूर्व प्राथमिक, माध्यमिक अध्यापन, विद्यालय, महाविद्यालय, वसतिगृह, कार्यालय आणि इतर अनेक शिक्षण संस्था आज कर्मवीरांच्या त्या विशाल वटवृक्षाखाली गुण्या गोविंदाने नांदत आहे.

कर्मवीर भाऊराव पाटील यांचा सन्मान

  • भारत सरकारने पद्मभूषण हा किताब देऊन कर्मवीर यांचा सर्वोच्च सन्मान केला.
  • कर्मवीर पाटील यांना महाराष्ट्राचा बुकर टी वॉशिंग्टन या नावाने त्यांना ओळखले जाते.
  • यशवंतराव चव्हाण भाऊराव यांच्या विषयी म्हणतात, कर्मवीर हीच एक महान संस्था, बहुजन समाजाचा ज्ञानप्रकाश, तसेच त्यांची रयत शिक्षण संस्था ही शिक्षणाची गंगोत्री आहे.
  • महाराष्ट्रातील लोकांनी त्यांना कर्मवीर या सन्मानाने सन्मानित केले.
  • भारत सरकारने त्यांना १९१९ मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले.

साहित्य

ललित

  • कुमारांचे कर्मवीर ([द.ता भोसले]. इंग्रजी अनुवाद Karmaveer Bhauraao Patil)
  • ग्रामीण महाराष्ट्राची शिक्षण परंपरा – कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणानंद बापूजी साळुंखे (रा. ना. चव्हाण)
  • थोर रयतसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (लीला शांतिकुमार शाह)
  • आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार : कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा. प्रभाकर नानकर)
  • कर्मवीर भाऊराव पाटील (बा.ग. पवार)
  • कर्मवीर भाऊराव पाटील (प्रा.डॉ. रमेश जाधव)
  • समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील (तृप्ती अंतरकर)
  • माणसातील देव, अजित पाटील
  • कर्मवीर भाऊराव पाटील (संध्या शिरवाडकर)
  • कर्मवीर भाऊराव पाटील (सौ. सुधा पेठे)
  • कर्मवीर भाऊराव पाटील : काल आणि कर्तृत्व (डॉ. रा.अ. कडियाळ)

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल दहा ओळी

  • कर्मवीर पाटील यांचा जन्म दि. २२ सप्टेंबर १८८७ मध्ये कोल्हापूर मधील कुंभोज गावामध्ये झाला.
  • ते एक महान समाज सुधारक आणि शिक्षण प्रसारक होते.
  • समाजातील सर्वात गोर गरीब मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
  • मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे, म्हणून कमवा व शिका ही अभिनव योजना सुरू करून, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी खूप मोठा आशेचा किरण निर्माण केला.
  • महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे ते एक सदस्य होते.
  • भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सुद्धा त्यांनी सक्रिय सहभाग दर्शवला.
  • रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून कर्मवीर पाटील यांनी शिक्षणाचा महाराष्ट्रभर प्रसार केला.
  • समता व बंधुता याचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा कर्मवीर भाऊराव यांनी पूर्ण प्रयत्न केला.
  • महान समाज सुधारक व थोर शिक्षण प्रसार भाऊराव पाटील यांचा मृत्यू दि. ०९ मे १९५९ मध्ये झाला.
  • भारत सरकारने कर्मवीर भाऊराव यांना १९१९ मध्ये पद्मभूषण देऊन सन्मानित केले.

FAQ

१. कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव काय होते?

कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते.कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी भाऊरावांचा दि. २२ सप्टेंबर १८८७ साली जन्म झाला.

२. रयत शिक्षण संस्थेची घटना किती साली तयार करण्यात आली?

लोकांच्या सहभागातून ०४ ऑक्टोबर १९१९ मध्ये कोरे येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. पुढे १९२४ मध्ये शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यालय सातारा येथे नेण्यात आले. छत्रपती शाहू बोर्डी गावची सुरुवात केली. सर्व जाती-धर्मांची पोरं, गरीब श्रीमंत असा भेदभाव न करता त्या बोर्डिंग हाऊस मध्ये राहू लागली. भाऊराव यांनी खूप कष्ट घेतले, पावसापाण्याची कसलीच परवा न करता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत, त्यांनी संस्थेसाठी निधी उभा केला.

३. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे नाव काय?

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे लक्ष्मीबाई पाटील असे होते.शैक्षणिक कार्यांत त्यांची पत्नी लक्ष्मीबाई यांचाही फार मोठा हातभार होता. मुलांना सण साजरा करता यावा, म्हणून लक्ष्मीबाईंनी स्वतःचे मंगळसूत्र घाण ठेवले होते. कमवा आणि शिका हा कर्मवीरांचा शिक्षणा मागचा मूलमंत्र रयतेला पटवून देण्यासाठी स्वावलंबी शिक्षणाची कल्पना ते प्रत्यक्षात जगले.

४. कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू कधी झाला ?

महान समाज सुधारक व थोर शिक्षण प्रसार कर्मवीर भाऊराव पाटील यांचा मृत्यू दि. ०९ मे १९५९ मध्ये झाला.

५. कोण होत कर्मवीर भाऊराव पाटील ?

छत्रपती शिवराय शाहू महाराज, महात्मा फुले, यांच्या महाराष्ट्रात ज्यांनी गोरगरीब बहुजन अशा समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचे बीज रोवलं ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय, आणि स्वातंत्र्य हीच खरी शैक्षणिक तत्त्वज्ञानाची चतुसूत्री मांडणारे, करवीर भाऊराव पाटील यांना थोर शिक्षक, तज्ञ, तर म्हटलेच पाहिजे. त्यासोबत कमवा आणि शिका असा अतिशय सोप्या भाषेत, शिक्षणाचे मर्म सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणारे, कर्मवीर एक श्रेष्ठ समाज सुधारक आहेत.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणस कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment