महाराणा प्रताप माहिती मराठी | Maharana Pratap Information in marathi

इतिहासातील महान राजांपैकी एक, मेवाडचे राजे महाराणा प्रताप यांचा जन्म ०७ जून १५४० रोजी झाला होता. महाराणा प्रताप म्हणजे असे योद्धा होते, ज्यांनी कधीही मुघलांच्या समोर गुडघे टेकले नाहीत. महाराणा प्रताप हे मेवाडच्या लोकांचे रक्षक होते, त्यांनी प्रत्येक परिस्थितीत आपल्या प्रजेचे रक्षण केले.

ते एक असे राजपूत होते, ज्यांच्या शौर्याला अकबरनेही सलाम केला. हळदी घाटीचे युद्ध तर सर्वांनाच माहिती आहेच. हे इतिहासातील सर्वात मोठ्या युद्धांपैकी एक होते. ज्यामध्ये मुघल आणि राजपूत यांच्यामध्ये संघर्ष झाला होता.

महाराणा युद्ध हरले, परंतु त्यांनी शरणागती पत्करली नाही. मुघलांनी किल्ला ताब्यात घेतला, तेव्हा त्यांना महाराणा प्रताप कुठे सापडले नाही. नंतर ते बरेच दिवस जंगलात राहिले. अकबरने खूप प्रयत्न केले, पण तो महाराणा प्रतापला ताब्यात घेऊ शकला नाही.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महान योद्धा महाराणा प्रताप यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख संपूर्ण वाचा.

Table of Contents

महाराणा प्रताप माहिती मराठी | Maharana Pratap Information in marathi

पूर्ण नाव महाराणा प्रताप
जन्म तारीख ९ मे १५४० (हिंदू पंचांग नुसार – वैशाख १९ , १४६२ )
जन्म स्थळ कुंभलगढ़ किल्ला, राजस्थान
टोपणनाव किका
प्रसिद्धी / ओळख राणा प्रताप, हिंदू हृदय सम्राट
धर्म हिंदू
जात सिसोदिया, राजपूत
मृत्यू 19 जानेवारी १५९७  (हिंदू पंचांग नुसार – पौष २९, १५१८)
मृत्यू स्थान चावंड, उदयपुर जिल्हा, राजस्थान

कोण होते महाराणा प्रताप ?

  • आज आपण अशा व्यक्तिमत्त्वाबद्दल चर्चा करणार आहोत की, ज्यांच्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांना अभिमान वाटतो. हो मित्रांनो ज्यावेळी औरंगजेबाने छत्रपती महाराजांचा आग्रा भेटीदरम्यान सरदारांच्या रांगेत उभा करून, अपमान केला होता.
  • त्याचवेळी भर दरबारात महाराज औरंगजेबावरती कडाडून उठले. महाराज म्हणाले, “आग्रा मध्ये येईपर्यंत आमचे स्वागत राजेशाही थाटात करतात आणि दरबारात आल्यावर आम्हाला सरदारांच्या रांगेत उभा करून आमचा अपमान करता.
Maharana Pratap Information in marathi
  • औरंगजेब आम्ही पृथ्वीराज चव्हाण, गुरुगोविंद सिंग, आणि महाराणा यांसारख्या शूरवीरांचे वंशज आहोत. आम्ही एक वेळेस स्मरणपत करू पण अपमान सहन करणार नाही. ज्या महापुरुषाचा खुद्द महाराजांना अभिमान वाटायचा, त्याच महापुरुषाचा इतिहास आज आपण बघणार आहोत. ते म्हणजे महाराणा प्रताप.
  • ही कथा आहे भारतातल्या दोन राज्यांमधील, अत्यंत भीषण प्रतिस्पर्धीची. एक राजा लढतो आपल्या हिंदू स्वाभिमानासाठी, धर्मरक्षणासाठी आणि दुसरा लढतो भारतावर राज्य करून, भारताची संस्कृती नष्ट करण्यासाठी, आणि ही प्रतिस्पर्ध्या तब्बल वीस वर्षे चालू होती. जी होती लुद्दिन मोहम्मद अकबर आणि हिंदू कुलभूषण प्रतापसिंग यांच्यामध्ये.
  • महाराणा हे महान व कर्तबगार राजा होते. ज्यांनी नेहमी आपल्या जनतेच्या रक्षणासाठी आपले सर्व आयुष्य समर्पित केले.

महाराणा प्रताप यांचा जन्म व प्रारंभिक जीवन

  • ७ मे १५४० ला महाराणा प्रताप यांचा जन्म कुंभलगड मध्ये झाला. महाराणा उदयसिंग आणि माता जयंती बाई हे त्यांचे आई-वडील. लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये नेतृत्व करण्याची कौशल्य होते. सर्व प्रकारच्या अस्त्र शास्त्रामध्ये ते पारंगत होते. महाराणा हे सिसोदिय वंशातले होते. त्यांचे अनेक शूरवीर पूर्वज होऊन गेले. जसे की, बप्पा रावल, राणा हमीर, राणा सांगा, पण महाराणा या नावाने केवळ आणि केवळ महाराणा यांना संबोधण्यात आले.
Maharana Pratap
  • मित्रांनो अकबर हा अत्यंत धूर्त आणि कपटी राजा होता. त्याने बाकीच्या मोगल राजांप्रमाणे प्रत्येक वेळेस युद्ध करून विजय न मिळवता त्यांनी प्रत्येक वेळेस अनेक वाटाघाटी केल्या आणि बऱ्याचदा संधी साधून युद्ध टाळण्याचा प्रयत्न केला. कारण जरी प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे झाली नाही, तरी युद्ध थांबून तो त्याचं मनुष्यबळ आणि युद्धात लागणारा पैसा वाचवायचा, म्हणूनच त्यांनी युती करून अनेक हिंदू घराण्यातल्या मुलींची लग्न केली.
  • अनेक ठिकाणी व्यापाराच्या मदतीने तर काही ठिकाणी संधी करून वाटाघाटी करून, भारतात आपला अधिपथ्य स्थापित करण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा मेवाड बरोबर अकबर कोणतीही संधी करण्यास समर्थ ठरला नाही, तेव्हा अकबराने मेवाड वरती आक्रमण केले.
  • १५६८ मध्ये त्यांनी पहिले आक्रमण चित्तोड वरती केले. त्यावेळी राणा उदयसिंग हे मेवाडचा राज्यकारभार सांभाळत होते, जे प्रताप यांची वडील होते आणि या युद्धामध्ये अकबरने खूप मोठ्या प्रमाणावर नरसंगार केला.
  • चाळीस हजार पेक्षाही जास्त निरपराध हिंदु जनतेचा जीव घेतला आणि यामध्ये त्या महिलांचाही समावेश आहे. या प्रसंगाने प्रतापांच्या मनात अत्यंत क्रोध निर्माण केला. तेव्हा ते युवराज होते, हे युद्ध हरल्यामुळे राणा उदयसिंग यांनी माघार घेऊन, उदयपूर मध्ये पुन्हा आपले. राज्य स्थापित केले. जे पुढे जाऊन मेवाडची राजधानी बनली.

महाराणा प्रताप यांची कौटुंबिक माहिती

आईचे नाव महारानी जयवंता बाई
वडिलांचे नाव महाराणा उदयसिंह
भावंडे महेशदास
चंदा
सरदूल
रुद्र सिंह
भव सिंह
नेतसी सिंह
बेरिसाल
मान सिंह
साहेब खान
शक्ति सिंह
खान सिंह
विरम देव
जेत सिंह
राय सिंह
जगमल
पच्छन
नारायणदास
सगर
अगर
सिंहा
सुलतान
लूणकरण
पत्नी अजबदे पंवार
फूल बाई राठौर
अमरबाई राठौर
जसोबाई चौहान
आलमदेबाई चौहान
चंपाबाई झाटी
लखाबाई
खींचण आशा बाई कंवर
माधो कंवर राठौड़
रणकंवर राठौड़
भगवत कंवर राठौड़
सोलनखिनीपुर बाई
शाहमतीबाई हाड़ा
रत्नावतीबाई परमार
अपत्य चंदा
शेखा
पूर्णमल
हाथी
रामसिंह
जसवंतसिंह
माना
नाथा
रायभान
रखमावती
रामकंवर
कुसुमावती
दुर्गावती
सुक कंवर
अमर सिंह
भगवानदास
सहसमल
गोपाल
दुर्जनसिंह
कल्याणदास
काचरा
सांवलदास

महाराणा प्रताप यांचे कुलदैवत

प्रताप हे राजपूत वंशाचे सिसोदियाचे राजा होते. ज्यांचा कुलदैवत हा एकलिंग भगवान शिव शंकर होता. मेवाड मध्ये जेवढे राजा होऊन गेले, त्या सर्वांचा कुलदैवत हा शिवशंकर होता. राजस्थान मधील उदयपूर या ठिकाणी भगवान शंकराचे एक पुरातन मंदिर आहे, इतिहासकारकांच्या मते शंकराच्या मंदिराची स्थापना मेवाडचे संस्थापक बाप्पा रावल यांनी आठव्या शतकामध्ये केले होती.

महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक

महाराणा यांचे वडील उदयसिंह यांनी अकबराच्या भीतीने, मेवाड संस्थानाचा त्याग केला होता. कारण त्यावेळी अकबरने मेवाड राज्यावर, स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले होते. मेवाड सोडल्यानंतर, उदयसिंह व त्यांचा पूर्ण परिवार राजस्थान मधील आरवली पर्वत दऱ्याखोऱ्यांमध्ये जाऊन स्थित झाले. यानंतर उदयसिंह यांनी उदयपूरला मेवाडची राजधानी बनवली.

ज्यावेळी उदयसिंह मरणाच्या दारावरती होते, त्यावेळी त्यांनी त्यांचे छोटे पुत्र यांना राजगादीवर बसवण्याचे ठरवले. परंतु त्यांचा हा निर्णय राजघराण्याच्या नियमांच्या विरुद्ध होता. ज्यावेळी राजा उदयसिंह यांचा मृत्यू झाला, त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण राजपूत सरदारांनी मिळून असा निर्णय घेतला की, महाराणा प्रताप राजा बनण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे.

त्यानंतर १६२८ मध्ये फाल्गुन शुक्ल अर्थात ०१ मार्च १५७६ मध्ये गोगुंदा या ठिकाणी महाराणा प्रताप यांचा राज्याभिषेक करून, त्यांना मेवाडचा राजा नियुक्त केले गेले.

राजगादीसाठी भावांमध्ये द्वेष निर्माण झाला

राणा उदयसिंग यांच्या मृत्यू नंतर प्रताप यांना राजा घोषित केले. राणा उदयसिंग यांना अनेक बायका आणि त्यांचे अनेक पुत्र त्यातला सगळ्यात मोठा युवराज म्हणजे महाराणा म्हणून त्यांना राजा बनवले आणि याच गोष्टीचा त्यांच्या भावांमध्ये द्वेष निर्माण झाला आणि याचाच फायदा उचलून, अकबरने महाराणा प्रताप यांच्या सर्व भाऊबंदांना त्यांच्या विरोधात उभा केलं.

आता एकटा पडून महाराणा माझ्या शरणागती मध्ये येईल, असे अकबरला वाटू लागले. पण त्यांनी निराश न होता, भिल्लांची सेना बनवली. त्यांना शस्त्रे चालवायला शिकवले. भिल्ल हे जंगलातले आदिवासी होते. अकबर यायचा, त्यांच्यावर आक्रमण करायचा.

हे परत आपली नवीन सेना बनवायचे, अकबर मेवाड वरती आक्रमण करत होता, त्याचे एकच कारण पश्चिम मधून जर काही मदत घ्यायची असेल, तर दिल्लीपर्यंतचा रोड आंबेवाड मधून जातो आणि मेवाड मध्ये प्रताप म्हणजे अकबर साठी डोकेदुखी.

प्रताप शरीराने एवढे ताकतवर होते की, त्यांची उंची ही साडेसात फूट होती. ७० किलोचा त्यांचा कवच होतं. दहा दहा किलोचे त्यांचे बूट आणि दहा किलोच्या त्यांच्या दोन तलवारी आणि ७५ किलोचा भाला. एवढी सगळे शस्त्र घालून महाराणा प्रताप हे युद्ध करायचे.

महाराणा प्रताप व अकबर

अकबरनी कंटाळून महाराणा सोबत युती करण्याचे ठरवले, त्यांनी अनेक वेळा संधी करण्याचा प्रस्ताव पाठवला. अकबराने अनेक हिंदू राजांना प्रस्ताव घेऊन पाठवलं. जलाल खान, कोरची भगवानदास आणि बरेच जण.

तब्बल आठ वेळा राजांना प्रस्ताव घेऊन पाठवलं. शेवटी स्वतः अकबराने प्रस्ताव पाठवला की मी तुला माझ्या राज्यातला अर्धा हिस्सा देतो, म्हणजेच अर्धा भारत. तू फक्त माझ्यासाठी मेवाड सोड. पण मित्रांनो महाराणा सारखा एकनिष्ठ देशभक्त, शूरवीर राजा, जो आपल्या धर्मासाठी आणि मातृभूमीसाठी अकबरचा हा प्रस्ताव देखील धुडकावून लावतो. असे राजे या पृथ्वीतलावर खूप कमी आहेत.

महाराणा प्रताप व त्यांचा घोडा चेतक

महाराणा प्रताप व त्यांचा घोडा चेतक

महाराणा यांच्या प्रिय घोड्याचे नाव चेतक असे होते. चेतक हा महाराणा यांचा सगळ्यात आवडता घोडा होता. इतिहासकारांच्या मते, चेतक हा अतिशय स्वामिनीष्ट व समजूतदार घोडा होता. असे म्हटले जाते की, चेतक ने हळदी घाट युद्धामध्ये महाराणा प्रताप यांचा प्राण वाचवला व त्यांनी २५ फूट खोल नदी वरून उडी मारून, महाराणा प्रताप यांचा मुघलांच्या वारा पासून जीव वाचवला.

महाराणा यांचा घोडा चेतक हा इतका सुंदर, उंच व लांब होता. त्याचे पाय हत्तीच्या सोंडे इतके होते. इतिहासकारकांच्या मते, चेतक घोड्याची उंची सात फूट पेक्षा अधिक होती.

हळदी घाटच्या युद्धामध्ये, महाराणा प्रताप हे पूर्ण घायाळ झाले होते. ज्यामुळे त्यांना युद्धभूमी सोडून जावे लागले. या युद्धामध्ये त्यांचा प्रिय घोडा चेतक सुद्धा पूर्णपणे घायाळ झाला होता. अंततः चेतकचा हळदी घाटच्या युद्धाच्या दरम्याने मृत्यू झाला.

हळदी घाटीमधील युद्ध

  • आठ प्रस्तावांच्या अपयशानंतर, अकबरने ठरवले की, आता महाराणा प्रतापला मारल्याशिवाय आपण मेवाड जिंकू शकत नाही. आणि मित्रांनो याचाच परिणाम म्हणजे, हळदी घाटीमधील युद्ध जे भारतातल्या सर्वात भीषण युद्धांपैकी एक मानले जाते.
  • एका बाजूला महाराणा प्रताप आहेत तर दुसऱ्या बाजूला जलालुद्दीन अकबर. महाराणा प्रतापांच्या सैन्यात वीस हजार सैनिक होते. याउलट अकबर जवळ ८० हजार सैनिक होते. फक्त या युद्धा करिता त्याची अजून खूप मोठी सेना त्याच्या राज्यात होती.
  • महाराणा प्रतापांच्या चारपटीने मोठे सैन्य अकबरा जवळ होते. तीन पट जास्त हत्ती होते आणि भरपूर जास्त प्रमाणात घोडे देखील होते आणि एवढेच नाही तर प्रतापांचे सख्खे भाऊबंद देखील या युद्धात त्यांच्या विरोधात उभे होते.
  • अकबरला अजून एक फायदा होता ते म्हणजे जेव्हा महाराणा प्रतापांचे सैन्य धनुष्य तलवार आणि भाल्याने लढत होते, त्यावेळी मुगल सैन्य हे बंदुकीने देखील लढत होते. यावरून लक्षात येते की, महाराणा प्रताप यांना हे युद्ध जिंकणं अशक्य होतं आणि अकबरला हे युद्ध जिंकणं खूपच सोपं होतं.
  • पण सगळे या उलट झालं. हे युद्ध अकबरच्या आयुष्यातलं सगळ्यात कठीण युद्ध ठरलं आणि अकबर हे युद्ध जिंकण्यास समर्थ ठरला नाही हो मित्रांनो अकबर हरला आणि ही गोष्ट खूप मोठा प्रश्न निर्माण करते, चार पटीने मोठे सैन्य असूनही, अकबर कसं काय हरतो आणि महाराणा प्रतापांमध्ये असं काय विशेष होतं की, ते हे युद्ध जिंकतात. तेही एवढ्या बलाढ्य सैन्याविरुद्ध.
  • तर झाला असं, महाराणा प्रताप यांनी खूप लक्षपूर्वक रणनीती आखली. हळदी घाटी मध्ये युद्ध होण्यापूर्वी त्यांनी तिथली सर्व माहिती गोळा केली. कारण जसे जसे महाराणा प्रताप एकेक प्रस्ताव धुडकावून लावत होते, तसे तसे त्यांना हे समजलं होतं की, युद्ध लवकरच होणार आहे. म्हणून त्यांनी सर्व तयारी आधीपासूनच केली होती.
  • सर्वप्रथम महाराणा प्रताप यांनी अशी रणनीती आखली की जर अकबरला त्यांना मारायचा असेल, तर त्याला हळदी घाटीतूनच यावं लागणार आणि हळदी घाटी ही सामान्य गाठी नव्हती, घाटी म्हणजेच खिंड ती. हळदी घाटीच्या दोन्ही बाजूला टेकड्या आणि मधून छोटीशी वाट हे वैशिष्ट्ये होत आणि तिथून खूप कमी सैन्य पुढे जाऊ शकत असे, जर जास्त जणांनी जाण्याचा प्रयत्न केला असता, तर गर्दीमुळे सगळेजण मेले असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे, महाराणा प्रताप यांना हे समजलं होतं की, चितोडच्या युद्धामध्ये मुघलांचे जिंकण्याचा मुख्य कारण म्हणजे, तोफा. आणि हे लक्षात ठेवून, महाराणा प्रताप यांनी रणनीती आखली. म्हणून मोगल सेना या खिंडीतून आपली तोफा नेण्यात असमर्थ ठरले आणि तिसरी गोष्ट म्हणजे महाराणा प्रतापांना हे माहीत होतं की, युद्धामध्ये सर्वात मोठी मालमत्ता ही मनुष्यबळ, हत्ती, घोडे किंवा तोफा आणि बंदुका नाहीत तर, त्या रणांगणातली प्रत्येक बारीक गोष्टीचा अभ्यास करून, रणनीती आखणे ही सर्वात मोठी मालमत्ता आहे.
  • या कामासाठी त्यांनी भिल्ल जातीची मदत घेतली. कारण त्यांना त्या भागातील सर्व बारीक गोष्टींची माहिती होती आणि हीच भिल्ल जातीचे लोक धनुष्यबाणाने खिंडीच्या दोन्ही बाजूने टेकड्यांवरून मुघलांवर आक्रमण करत होते आणि प्रत्येक क्षणाची बातमी प्रताप यांच्या जवळ पोहोचवायचे आणि अशाप्रकारे मित्रांनो सकाळच्या वेळी कडाक्याच्या उन्हामध्ये दि. १८ जून १५७६ मध्ये दोन्ही सैन्य एकमेकांशी सामना केला.
  • हळदी घाटीचा रणांगणात त्याचवेळी महाराणा प्रताप मुघल सैन्याच्या सेनापतीच्या अगदी समोरासमोर आले. तो म्हणजे मानसिंग, जो आपल्या हत्ती वरती बसलेला होता. त्यावेळी महाराणा प्रतापांचा शूरवीर घोडा चेतक याने इतक्या वेगाने झेप टाकली की, तो हत्तीच्या दातांवर आपले पाय टाकून त्याला झुकवतो आणि मानसिंग खाली पडतो.
  • पण चेतक हा खूप घायाळ होतो, कारण त्याकाळी हत्तीच्या सोंडे वरती तलवार लावलेली असायची. ज्यामुळे चेतकच्या पायाला जखमा होतात आणि तो रक्तबंबाळ होतो. मुघलांसाठी ही सुवर्णसंधी होती. महाराणा प्रताप यांना मारण्याची, कारण चेतक हा घायाळ झाला होता, पण झालं याउलट, चेतक इतका रक्तबंबाळ झालेला असूनही, तो होईल तेवढ्या वेगाने पळू लागला आणि तो जवळपास पाच किलोमीटर पळाला. स्वतःच्या राजाला वाचवण्यासाठी.
  • महाराणा प्रताप यांचे स्वतःचं वजन ११० किलो एवढे होते आणि त्यांच्या शस्त्रांसोबत त्यांचं वजन जवळपास ४७० किलो एवढे होते आणि हा महान घोडा चेतक पाठीवर ७७० किलोचे वजन घेऊन, पाच किलोमीटर पळाला. नंतर चेतकने एका  नदी वरून झेप घेतली, जिची रुंदी एकवीस फूट एवढी होती. हे पाहून मोगल अचंबी झाले. कारण त्यांचे घोडे थांबले होते आणि चेतकने राजाला सुखरूप सुरक्षित अंतरावर नेऊन ठेवले. ज्याक्षणी त्यांनी झेप टाकून पलीकडे प्रतापांना सोडले, चेतकने आपले प्राण सोडले. प्रतापांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि ते आपले रडणे थांबू शकले नाही. कारण चेतक हा त्यांच्या मुलासारखा होता.
  • तसेच प्रतापांचा हत्ती, रामप्रसाद हा सुद्धा खूप ताकतवर हत्ती होता. त्यांनी हळदी घाटीच्या युद्धात अकबरचे खूप सैन्य मारले होते आणि खूप हत्ती देखील मारले होते. अकबरला प्रतापांचा हाती आवडला व त्यांनी हत्तींचा चक्रव्यू बनवून ८ हत्तींचा चक्रव्यू बनून, सैनिकांच्या मदतीने त्याला पकडून तुरुंगात टाकले व त्याचे नाव रामप्रसाद बदलून पीर ठेवण्यात आले. पण रामप्रसाद हा खूप स्वामीनिष्ठ होता. आपल्या स्वामी महाराणा प्रतापन पासून वेगळे झाल्यामुळे, त्यांनी अन्न आणि जल त्याग केला. २८ दिवस काहीच न खाता पिता अशक्तपणामुळे, त्याचा मृत्यू झाला. अकबर चकित झाला. ज्याचा हत्ती सुद्धा माझ्यापुढे झुकत नाही, त्या महाराणा प्रतापाला मी कसं झुकवणार.
  • हळूहळू मुघल सैन्याने हळदी घाटी पार केली आणि महाराणा प्रताप यांना माघार घ्यावी लागली. महाराणा प्रताप हरले नाही, अकबर कधी जिंकला नाही. याला म्हणतात रणनीती आणि प्री प्लानिंग.
  • असे म्हणतात की, त्या ठिकाणी इतके रक्त सांडले होते. की हळदी घाटीची पिवळी माती, लाल रंगात परिवर्तित झाली आणि आज सुद्धा तेथे उत्खनन केल्यावर, भाले आणि तलवारी सापडतात. त्यानंतर प्रताप यांनी जंगलात लपून पुन्हा आपले सैन्य उभे केले. त्यासाठी त्यांनी एका सरदाराकडून पैसे घेतले, ज्याचं नाव होतं भामाशाह.
  • त्यानंतर अकबराने खूप वेळा आपले सैन्य पाठवत राहिला. मेवाडच्या जंगलात त्यांना मारण्यासाठी, कित्येकदा अकबर स्वतः आला, पण गनिमी कावाची टेकनिक महाराणा प्रताप यांना चांगलीच माहीत होती, म्हणून अकबर कधीच पूर्णपणे मेवाड वरती ताबा मिळवू शकला नाही. कारण तो कधीच महाराणा प्रताप यांना मारू शकला नाही.
  • ब्रिटिश इतिहासकार कर्नल जेम्स रोड यांनी आणखीन एक भीषण युद्धाचा उल्लेख केला आहे. बॅटल ऑफ दिवेर आणि या बॅटल मध्ये अकबरने ३६००० सैन्य पाठवले होते. पण यावेळेसही महाराणा प्रताप पूर्णपणे तयार होते, प्रतापांच्या सैन्याने पद्धतशीरपणे मुघलांच्या सैन्याला पराजित करून, मेवाड वरती पुन्हा आपले अधिपथ्य स्थापित केले.
  • या युद्धात अकबरच्या सेनापतीचे महाराणा प्रताप यांनी तलवारीच्या एका फटक्यातच सेनापतीसह त्याच्या घोड्याचे दोन तुकडे केले. या विजयानंतर मेवाड पुन्हा एकदा महाराणा प्रतापांच्या देखरेख मध्ये भरभराटीला आले. पुन्हा एकदा मेवाड ताकदीने उभा राहिले आणि पुढचे वीस वर्षे महाराणा प्रताप यांनी तिथे राज्य केलं.
  • नंतर त्यांचा जंगलात शिकार करताना, अपघात होऊन मृत्यू झाला. ते स्वर्गवासी झाले. मित्रांनो हे होते महाराणा प्रताप सिंग. यांनी मरेपर्यंत अकबरला एकट्याने टक्कर दिली. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांसाठी महाराणा प्रताप हे पूजनीय होते आणि ते त्यांना आदर्श ही मानायचे.
महाराणा प्रताप

महाराणा प्रताप यांचे प्रेरणादायी विचार

  • दुःख, संकटे आणि विपरीत परिस्थिती जीवनाला खंबीर आणि अनुभवी बनवतात. त्यांना घाबरू नये तर त्यांना आनंदाने सामोरे जावे.
  • जे सुखात परम आनंदी असतात आणि संकटात भयभीत होऊन, नतमस्तक होतात. त्यांना इतिहासात कधीच स्थान मिळत नाही.
  • आपले मौल्यवान जीवन सुखाचे आणि आरामाचे बनवून नष्ट करण्यापेक्षा, आपल्या राष्ट्राची सेवा करणे चांगले आहे.
  • सत्य, परिश्रम आणि समाधान हे सुखी जीवनाचे साधन आहे. पण अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक आहे.
  • तुमच्या वाईट काळात तुमच्या कर्माने स्वतःला इतके विश्वासार्ह बनवा की, जेव्हा वाईट वेळ येईल तेव्हा ते कर्म वाईट वेळेला चांगले बनवू शकेल.
  • जो व्यक्ती स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबा व्यतिरिक्त आपल्या राष्ट्राचा विचार करतो, तोच खरा नागरिक आहे.
  • माणसाचा अभिमान आणि स्वाभिमान ही त्याची सर्वात मोठी कमाई आहे. त्यामुळे त्यांचे नेहमीच रक्षण केले पाहिजे.
  • जे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही हार मानत नाहीत, ते हरूनही जिंकतात.
  • अभिमान, सन्मान आणि स्वाभिमानापेक्षा आपले जीवन अधिक मौल्यवान समजू नये.
  • हळदी घाटीच्या लढाईने माझे सर्व काही हिरावून घेतले असले तरी, माझा अभिमान आणि गौरव वाढला आहे.
  • वेळ आपला वारसा फक्त बलवान आणि धैर्यवानांनाच देते, म्हणून आपल्या मार्गावर चिकटून राहा.
  • आपले ध्येय, परिश्रम आणि आत्मशक्ती सतत लक्षात ठेवल्यास, यशाचा मार्ग सुकर होतो.
  • मातृभूमी आणि माता यांच्यातील फरकाची तुलना करणे आणि समजून घेणे हे दुर्बल आणि मूर्खाचे काम आहे.
  • हे जग फक्त काम करणाऱ्यांचे आहे, म्हणून आपल्या कृतीच्या मार्गावर दृढ आणि स्पष्ट रहा.
  • संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी, झटणारा माणूस युगांव योगेश स्मरणात राहतो.
  • राज्यकर्त्याचे पहिले कर्तव्य, हे त्याच्या राज्याच्या स्वाभिमानाचे आणि सन्मानाचे रक्षण करणे आहे.
  • जर हेतू उदात्त आणि मजबूत असेल, तर माणूस पराभूत होत नाही. तर जिंकतो.
  • काळ इतका बलवान आहे की, राजालाही गवताची भाकरी खाऊ घालू शकतो.
  • माणूस आपल्या कष्टाने आणि कर्मानेच आपले नाव अमर करू शकतो.
  • जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही, तोपर्यंत मेहनत करत राहा आणि लढत रहा. असेच व्यक्ती लोकांच्या हृदयात सदैव जिवंत असतात.
  • वडीलधाऱ्यांकडे नतमस्तक होऊन सर्व जग नतमस्तक होऊ शकते.
  • अन्याय, अधर्म, इत्यादींचा. नाश करणे हे संपूर्ण मानव जातीचे कर्तव्य आहे.
  • तुम्हाला साप आवडत असला, तरी तो त्याच्या स्वभावानुसार चावेलच.
  • आदर नसलेला माणूस मेलेल्या माणसासारखा असतो.
  • शत्रू फक्त यशस्वी आणि शूर व्यक्तींचेच असतात.

महाराणा प्रताप यांचा मृत्यू

१९ जानेवारी १५९७ रोजी चावंड येथे त्यांचा मृत्यू झाला. अख्या हिंदुस्तानातील मोगल सैन्यास गुडघे टेकायला लावणारे कुशल राज्यकर्ते तसेच देशाचे प्रथम स्वतंत्रता सेनानी म्हणून ओळखले जाणारे हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांचा मृत्यू  19 जानेवारी 1597 मध्ये चावांड येथे शिकारी दरम्यान त्यांना अत्यंत जखमा झाल्या म्हणून झाला. असं इतिहासात सांगितलं जातं. 

महाराणा प्रताप यांच्याबद्दल काही मनोरंजक गोष्टी

  • ८० किलोचा भाला, १२ किलोचे कवच, २ तलवारी असं युद्धातल्या त्यांच्या पेहरावाचं एकूण वजन तब्बल २०८ किलो होतं. या वस्तू आजही मेवाड राजघराण्याच्या म्युझियममध्ये पाहावयास मिळतात.
  •  महाराणा प्रताप यांनी राजकीय कारणास्तव ११ स्त्रियांशी लग्न केली. त्यांना एकूण १७ मुले आणि ५ मुली होत्या.
  • चेतक आणि महाराणा प्रताप यांच्यामधलं नातं अजब होतं. चेतक हा घोडा इतका वेगात पळायचा की त्याला उडणारा घोडा म्हणून ओळखले जायचे. युद्धात मुघल सैन्य मागावर असताना जखमी प्रतापसिहांना घेऊन चेतक पळत राहिला होता.
  • त्यांनी अशी शपथ घेतली होती कि जोवर चित्तोड परत मिळवणार नाही तोवर मी जमिनीवर झोपेन आणि अत्यंत साधं अन्न खाऊन दिवस काढेन. शेवटी त्याचं हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.
  • त्यांची आठवण म्हणून आजही राजपूत जेवताना ताटाखाली झाडाचं पान ठेवतात आणि झोपताना उश्याखाली गवत ठेवून झोपतात.  त्याचबरोबर बुंदेलखंड भागात गवताचा वापर करून बनवलेली भाकरी प्रसिद्ध आहे.
  • महाराणा प्रताप हे आपल्या समवेत दोन तलवारी बाळगत. त्यांना ही कल्पना त्यांच्या मातोश्री जयवंताबाई यांनी दिली होती.
  • महाराणा प्रताप यांनी बहलोल खान याच्यावर केलेल्या वाराने त्याचे आणि त्याच्या घोड्याचे दोन तुकडे झाल्याचं इतिहासकार सांगतात.

महाराणा प्रताप यांच्या बद्दल दहा ओळी

  • महाराणा यांचा जन्म दि. ०९  मे १५४० रोजी कुंभलगड येथे झाला.
  • १९ जानेवारी १५९७ रोजी चावंड येथे त्यांचा मृत्यू झाला.
  • दि. २८ फेब्रुवारी १५७२ रोजी महाराणा सिंहासनावर आरुढ झाले.
  • महाराणा यांनी मुघलांचे अधिपथ्यत्य मान्य केले नाही आणि आयुष्यभर त्यांच्या विरुद्ध विशेषतः अकबराशी लढा दिला.
  • स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या लढा सोबतच महाराणा यांचे इतर विविध क्षेत्रातही भरीव योगदान होते.
  • युद्धात मृत्युमुखी पडलेल्या वीरांच्या वारसांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विलक्षण प्रयत्न केले.
  • राष्ट्रप्रेम सर्व धर्मसमभाव, सहिष्णुता, करुणा, स्वातंत्र्याचे युद्ध, धोरणात्मक आदर्शांचे पालन, मानवी हक्कांचे रक्षण, महिलांचा आदर, पर्यावरण आणि जलसंवर्धन सर्वसामान्यांचा आदर आणि साहित्याचा आदर हे महाराणा प्रताप यांच्या कार्याचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
  • महाराणा प्रताप यांनी सर्व धर्मांचा आदर केला. हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते.
  • हकीम खान सूरी हा त्यांचा सेनापती. महाराणा प्रताप यांनी व्यवहार, आदर्श, या दोन ग्रंथांची रचना केली.
  • राज्याची समृद्धता अबाधित राहावी, यासाठी त्यांनी धातूंच्या खाणीच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले.

FAQ

१. महाराणा प्रताप यांचा जन्म कधी झाला ?

महाराणा प्रताप यांचा जन्म दि. ०९  मे १५४० रोजी कुंभलगड येथे झाला.

२. महाराणा प्रताप यांच्या आई वडिलांचे नाव काय ?

महाराणा प्रताप यांच्या आई वडिलांचे नाव महारानी जयवंता बाई महाराणा उदयसिंग असे होते

महाराणा प्रताप किती बलवान होते?

7 फूट 5 इंच उंचीसह महाराणा प्रताप हे देशातील सर्वात बलवान योद्ध्यांपैकी एक होते. त्याने सुमारे 80 किलो वजनाचा भाला, 208 किलो वजनाच्या दोन तलवारी आणि सुमारे 72 किलो चिलखतांसह 360 किलो वजन उचलले. त्याचे स्वतःचे वजन 110 किलोपेक्षा जास्त होते

हल्दीघाटी नंतर महाराणा प्रताप यांचे काय झाले?

महाराणा प्रताप राज्याच्या पश्चिमेकडील प्रदेशातील गमावलेल्या प्रदेशातील अनेक प्रदेश परत मिळवू शकले. चित्तोड मुघलांच्या ताब्यात होता. हल्दीघाटच्या लढाईत पराभव झाल्यानंतर महाराणा प्रताप यांनी जौनपूरची राजधानी केली.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महाराणा प्रताप यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment