मंगेश पाडगावकर माहिती मराठी | Mangesh Padgaonkar Information In Marathi

मंगेश पाडगावकर माहिती मराठी | Mangesh Padgaonkar Information In Marathi – शब्दांचे नक्षत्र आपल्या लेखणीमधून रेखाटणारे मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म झाला १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्गच्या वेंगुर्ले तालुक्यात झाला. मंगेश केशव पाडगावकर यांनी खऱ्या अर्थानं आधुनिक नवकवितांना जन्म दिला. मंगेश पाडगावकर प्रसिद्ध कवी होते. त्यांनी मराठी साहित्यामध्ये मोलाचे काम केले.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास मंगेश केशव पाडगावकर यांच्याबद्दल माहिती दिली आहे. माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत वाचा.

Table of Contents

मंगेश पाडगावकर माहिती मराठी | Mangesh Padgaonkar Information In Marathi

पूर्ण नाव मंगेश केशव पाडगावकर
जन्म तारीख १० मार्च १९२९
जन्म स्थळ महाराष्ट्र, वेंगुर्ले (कोकण)
वडिलांचे नाव केशव पाडगावकर
मृत्यू ३० डिसेंबर २०१५
मृत्यू स्थळ मुंबई

कोण होते मंगेश केशव पाडगावकर ?

Mangesh Padgaonkar Information In Marathi

मंगेश केशव पाडगावकर हे मराठी साहित्यामधील प्रसिद्ध कवी, गीतकार व लेखक होते. मराठी साहित्यामधील सर्वात नावाजलेले कवी म्हणून मंगेश केशव पाडगावकर यांच्याकडे पाहिले जात असे. त्यांनी त्यांच्या लेखणीमधून, त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रामध्ये अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे. त्यांनी विविध बालगीते, कादंबऱ्या, कविता, ग्रंथांचे मराठी मध्ये अनुवाद इत्यादी. महत्त्वाचे योगदान देऊन मराठी साहित्य अग्रगण्य स्थान प्राप्त केले आहे.

मंगेश पाडगावकरांच्या “गुलमोहर”, “नाट्यगीते” या कवितासंग्रहाने मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवली. असंख्य वाचकांच्या मनात पाडगावकरांबद्दल आदराचे स्थान निर्माण झाले. त्यांची सर्जनशील प्रतिमा मराठी चित्रपट सृष्टीपर्यंत जाऊन पोहोचली, ज्या ठिकाणी मंगेश पाडगावकरांनी असंख्य चित्रपटांसाठी गीते लिहिली.

प्रख्यात संगीत दिग्दर्शकांच्या सहकार्याने मंगेश पाडगावकरांच्या श्लोकांचे रूपांतर महाराष्ट्रातील लोकांना अतिशय मोहून टाकणाऱ्या सुरांमध्ये निर्माण झाले. त्यामुळे पाडगावकरांची मनोहर आराधना आणि लोकप्रियता वाढत गेली.

मंगेश पाडगावकरांच्या मराठी साहित्यातील अमूल्य योगदानामुळे, त्यांना सलाम या काव्यसंग्रहासाठी १९८० मध्ये प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कारांसह विविध पुरस्कार प्राप्त झाले. मराठी कविता लोकप्रिय करण्यासाठी, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, पाडगावकरांच्या अतोनात प्रयत्नांमुळे पाडगावकरांना रसिकांच्या हृदयामध्ये आदराचे स्थान प्राप्त झाले.

मंगेश पाडगावकर यांचा जन्म व बालपण

मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ले तालुक्यामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचे नाव केशव पाडगावकर होते, केशव पाडगावकर हे संस्कृत विद्वान होते. मंगेश पाडगावकरांच्या वडिलांनी त्यांना मराठी आणि संस्कृत भाषेचे प्राथमिक ज्ञान दिले.

Mangesh Padgaonkar Information In Marathi

मंगेश पाडगावकर यांचे शिक्षण

पाडगावकरांनी आपले प्राथमिक शिक्षण वेंगुर्ला या ठिकाणी पूर्ण केले व त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते मुंबईला गेले. त्यांनी मुंबईच्या रामनारायण रुईया महाविद्यालयांमधून मराठी साहित्यामध्ये पदवी प्राप्त केली. मुंबई विद्यापीठामध्ये मंगेश पाडगावकर यांनी मराठी आणि संस्कृत मध्ये मास्टर ऑफ आर्ट्स पदवी प्राप्त केली.

त्यानंतर १९७० ते १९९० पर्यंत मुंबई मधील इन्फॉर्मेशन सर्विस मध्ये ते संपादक म्हणून कार्य पाहत होते. मुंबईमधील मातोश्री मिठीबाई महाविद्यालयामध्ये, पाडगावकरांनी अनेक वर्ष मराठी शिकवले. साधना साप्ताहिकमध्ये त्यांनी सहाय्यक संपादक म्हणून सुद्धा काम केले.

मंगेश पाडगावकर यांचे वैयक्तिक जीवन

पाडगावकर यांचे व्यक्तिमत्व विनम्र होते. त्यांनी विमल यांच्याशी लग्न केले. विमल पाडगावकर या प्रसिद्ध कवयित्री व लेखिका होत्या. मंगेश पाडगावकर यांना दोन अपत्ये झाली. मुलगा समीर पाडगावकर व मुलगी शर्मिला पाडगावकर.

मंगेश पाडगावकर माहिती मराठी

मंगेश पाडगावकर यांचे करिअर

मंगेश पाडगावकर यांनी चौदा वर्षापासून कविता लिहायला सुरुवात केली. त्यांनी त्यांच्या नावावर आजपर्यंत ४० प्रकाशन नोंदवली आहे. त्यापैकी बहुतेक प्रकाशन प्रकाशित झाली आहे. मंगेश पाडगावकर यांनी मुलांसाठी कविता, सामाजिक- राजकीय विषयांवर आधारित कविता, निबंध, संग्रह, इंग्रजी व इतर भाषांमधील ग्रंथांचे भाषांतर केले. युनायटेड स्टेट मधील “लायब्ररी ऑफ काँग्रेसने” त्यांच्या ३१ कामांचे संपादन केले आहे.

मंगेश पाडगावकर मुर्गी क्लबचे सदस्य देखील होते. युएसआयएस मध्ये काम करत असताना, पाडगावकरांनी त्यांच्या रिकाम्या वेळेत विविध ग्रंथांचे भाषांतर करण्याचे काम सुरू केले. त्याने काही अमेरिकन कादंबरींचे मराठी भाषेमध्ये अनुवादन केले.

मंगेश पाडगांवकरांचे अनुवादित साहित्यातील योगदान

 • भावगीत असो, प्रेम गीत असो, भक्ती गीत असो, किंवा बालगीत प्रत्येक गाण्यांमध्ये त्यांनी आपल्या शब्दांची जादू रसिकांच्या मनावर बिंबवली. निरनिराळ्या कवितासंग्रहांमधून रसिकांची मन जिंकणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी, सगळ्यात पहिली कविता रचली, ती अवघ्या बाराव्या वर्षी. जी कविता बाबा बोरकरांना वाचायला दिली. त्यांना मात्र या बालकाने केलेली कविता हा जणू एक चमत्कारच वाटला आणि म्हणून बोरकरांनी पाडगावकरांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले.
 • आचार्य अत्रेंच्या समीक्षा मधून पाडगावकरांच्या कविता त्याकाळी वाचायला मिळत असत. तेव्हा दहावीची परीक्षा पाडगावकर देत होते. त्यांचे शालेय शिक्षण विल्सन हायस्कूल मधून पूर्ण झालं. कॉलेज आटोपल्यानंतर त्यांनी श्रीलंकेला काही काळ राहणं पसंत केलं. तिथे राहून आपल्या आयुष्यातल्या अनुभवांना शब्द रूपात मांडून लोकांपर्यंत पोहोचवण्यात, ते यशस्वी झाले.
 • याच काळात त्यांनी अनेक कविताही लिहिल्या आणि त्यांनी त्यांचं पहिलं कवितांचं पुस्तक प्रकाशित केलं ते होतं धारानृत्य. यावेळेस पाडगावकर केवळ २१ वर्षांचे होते. २२ वर्षी त्यांना नोकरी मिळाली.
 • कवी विंदा करंदीकर आणि वसंत बापट यांच्या यादीमध्ये मंगेश पाडगावकर हे नाव सुद्धा आता सामील झालं होतं. १९५३ साली मंगेश पाडगावकर यांनी कीर्ती कॉलेज मध्ये प्रवेश घेतला आणि मराठी व संस्कृत विषयांमधून त्यांनी पदवी संपादित केली. ते वर्गातून पहिले आले.
 • याच काळात पाडगावकर माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या मुलांचे घरगुती वर्ग घेऊ लागले. या गोष्टीचा घरच्यांनाही आधार झाला. कॉलेजात शिकत असतानाच निंबोणीच्या झाडामागे, छोरी, यांसारख्या कवितासंग्रहांमधून आपल्या कविता रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या पाडगावकरांनी पुढे ऑल इंडिया रेडिओवर द स्पोकन वर्ड या कार्यक्रमाच्या सहाय्यक निर्मात्याची जबाबदारी स्वीकारली.
 • १९७० ते १९९० सालापर्यंत यु.एस इन्फॉर्मेशन सर्विस मध्ये मंगेश पाडगावकर हे संकलक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी अनेक कविता रचल्या, कौतुकास्पद असे लेखनही केलं.
 • १९८३ साली पुणे विद्यापीठासाठी एक थीम सॉंग रचनेची जबाबदारी पु ल देशपांडे यांनी पाडगावकरांवरती सोपवली. कारण त्यांना विश्वास होता की, हा कवी केवळ एका दिवसामध्ये कविता लिहून देइल आणि त्यांनी लिहिलेली कविता भास्कर चंद्रावरकरांच्या संगीतानं सजली.
 • मंगेश पाडगावकर म्हटलं की, त्यांनी लिहिलेल्या अनेक कविता रसिकांच्या ओठांवर तरळतात. “प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमच अगदी सेम असतं”. असं म्हणणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी “सांग सांग भोलानाथ” सारखं बालगीत ही लिहिलं.
 • वेगवेगळ्या कविता रचणाऱ्या शब्दांमधून व्यक्त होणाऱ्या या कवीने कविता केवळ लिहिल्याच नाही तर त्या कविता ते जगले आणि म्हणूनच आपण म्हणतो की, प्रेम करायला शिकवणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी प्रेमासोबतच जगण्यावरही प्रेम करायला शिकवले.

मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मोलाची कामगिरी

मराठी साहित्य क्षेत्रामध्ये मंगेश पाडगावकरांनी मोलाची कामगिरी केली. त्यांनी बायबल, भगवद्गीता, संत मीराबाई, कबीर, सूरदास यांच्या रचना मराठीत अनुवादित करून, ‘द टाईम टेस्ट ज्युनिअर सिजर आणि रोमियो यांसारखी शेक्सपियरची नाटकं त्यांनी मराठीत भाषांतरित केली. त्यांनी वादळ या नाटकाचे लेखनही केलं.

मंगेश पाडगावकर माहिती मराठी

विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

आपल्या कवितांच्या आठवणी आणि आपल्या अनुभवाचा शोध कवितेच्या पुस्तकातून रेखाटणाऱ्या मंगेश पाडगावकरांनी २०१० साली दुसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पदही भूषविले.

मंगेश पाडगांवकर यांच्या काही विशेष प्रसिद्ध कविता

 • असा बेभान हा वारा
 • दार उघड, दार ऊघड, चिऊताई, चिऊताई दार उघड
 • नसलेल्या आजोबांचं असलेलं गाणं
 • फूल ठेवूनि गेले
 • सांगा कसं जगायचं
 • टप टप करति अंगावरती प्राजक्ताची फुले
 • अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी
 • तिनं लाजून होय म्हटलं
 • आतां उजाडेल
 • मन कसं धुंद आहे
 • सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?
 • चांदणं
 • अफाट आकाश
 • तरीसुद्धा
 • सावर रे, सावर रे, उंच उंच झुला
 •  जगणं सुंदर आहे
 • तू प्रेम केलंस म्हणून
 • मी आनंदयात्री
 • जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा
 • मनमोकळ गाणं
 • मी बोलले न काही नुसतेच पाहिले
 • आपल्या माणसाचं गाणं
 • तु असतीस तर 
 • माणूस केलंत तुम्ही मला
 • छोरी
 • चेहरा 
 • अशी पाखरे येती
 • एकामेकांशिवाय 
 • मी फुले ही वेचताना सांज झाली
 • कुणी मज पाहिले नाही नजर चुकवून जाताना
 • भाव माझ्या अंतरीचे एकदा कळतील सारे

मंगेश पाडगावकर यांची प्रसिद्ध कविता

पाखरांशी नातं असतं त्याचं गाणं

पाखरांनो, या मातीवर
सुखाने मी रांगत असतो,
तरीसुद्धा तुमच्याशी
माझं नातं सांगत असतो !
आभाळाच्या अपारात
तुम्ही उडत असता,
निळ्या निळ्या अथांगात
तुम्ही बुडत असता,
तेव्हा मी डोळे भरून
बघत असतो,
काही क्षण माझं स्वप्न
जगत असतो !

पाखरांनो, या मातीवर
सुखाने मी रांगत असतो,
तरीसुध्दा तुमच्याशी
माझं नातं सांगत असतो !
इथलं जिणं कधीचं मी
शाप मानलं नाही,
मातीवरचं प्रेम कधीच
पाप मानलं नाही !
मातीतच परमेश्वर
हिरवागार रूजून येतो ;
मातीच्या मार्दवातच
फुलांनी सजून येतो !
मातीवरुन वहाणारा
स्वर्गातसुध्दा वारा नसतो ;
आभाळाच्या करुणेला
मातीशिवाय थारा नसतो !

पाखरांनो, या मातीवर
सुखाने मी रांगत असतो,
तरीसुध्दा तुमच्याशी
माझं नातं सांगत असतो !
तुम्हांलाही मातीवरच
यावं लागतं,
आपलं अन्न इथेच बसून
खावं लागतं ;
मातीच्याच आधाराने
जगत असता, नांदत असता,
मातीवरच्याच काड्या जमवून
आपलं घरटं बांधत असता !
तुमच्या या पंखाना
मातीचा वास असतो,
आणि तरी निळ्याभोर

आभाळाचा ध्यास असतो !
मातीचं मातीपण कळण्यासाठी
आभाळावर प्रेम हे केलंच पाहिजे,
अस्तित्वाला तुमच्यासारखे पंख फुटून
निळ्या निळ्या अपारात गेलंच पाहिजे !
पाखरांनो, या मातीवर
सुखाने मी रांगत असतो,
तरीसुध्दा तुमच्याशी
माझं नातं सांगत असतो !

माणंस अजून गाऊ शकतात

शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,
हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात !
प्रत्येक वाट
गोंगाटाच्या रानात घुसते ;
मोटारींच्या आवाजांची
खिळेठोक कानांत असते !
असं असलं तरी माणंस
गाण्याला ताल अजून देऊ शकतात !
शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,
हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात !

पुस्तकांच्या ओझ्याखाली
बाळपण सगळं चिरडून जातं ;
अक्राळविकराळ स्पर्धखाली
कोवळेपण भरडून जातं !
असं असलं तरी मुलं
फुगे घेऊन बागेत अजून धावू शकतात!
शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,
हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात !
कटुतेचा पाऊस
घरं झोडून जातो ;
विश्वासाचा कणा
पार मोडून जातो !
तरी माणंस मायेने
बाळाचा पापा घेऊ शकतात !
शीळ घालीत माणंस अजून गाऊ शकतात,
हातात हात गुंफून अजून जाऊ शकतात !

एकटं असावसं वाटतं

कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं!
अवती भवती रान सगळं
मुकं मुकं असतं,
वाट दिसू नये इतकं
धुकं धुकं असतं !
झाडाखाली डोळे मिटून बसावंसं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं!

येते येते… हूल देते :
सर येत नाही,
घेते घेते म्हणते तरी
जवळ घेत नाही !
अशा वेळी खोटं खोटं रुसावसं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं!
कुठे जाते कुणास ठाऊक
वाट उंच-सखल,
त्यात पुन्हा सगळीकडे
निसरडीचा चिखल…
पाय घसरून आदळल्यावर हसावंसं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं!

पाखरं जरी दिसली नाहीत
ऐकू येतात गाणी,
आभाळ कुठलं कळत नाही
इतकं निवळं पाणी !
आपल्या डोळयांत आपलं रूप दिसावंसं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं!
ओळीमागून गाण्याच्या
थरारत जावं,
आभाळातून रंगांच्या
भरारत जावं !
सुरांच्या रानात भुलून फसावंसंं वाटतं,
कधी कधी जवळ कुणी नसावंस वाटतं,
आपलं आपण अगदी एकटं असावसं वाटतं!

खरं गाणं

पाखरांना ठाऊक असतं :
बाजारात गळा विकून
आपलं खरं गाणं कधी गाता येत नाही;
सोन्याच्या पिंजऱ्याला
पंख विकून
आभाळाच्या जवळ कधी जाता येत नाही!

कवितेव्यतिरिक्त मंगेश पाडगावकरांचे लेखन

मंगेश पाडगावकर यांनी मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अनेक गीते लिहिली. “या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे”, “कधी तू, रिमझिम झरणारी बरसात” “असावा सुंदर चॉकलेटचा बंगला” यांसारखी प्रसिद्ध गाणी मंगेश पाडगावकर यांनी लिहिली. त्याचप्रमाणे त्यांनी लहान मुलांसाठी भातुकलीचे फेणे, नखरे वरती छोरी, धुंदी अशा अनेक पुस्तकांचे लेखन केले.

प्रकाशित साहित्य

 • धारा नृत्य – कवितासंग्रह इ.स. १९५०
 • जिप्सी – कवितासंग्रह इ.स. १९५३
 • निंबोणीच्या झाडामागे – कवितासंग्रह इ.स. १९५४
 • छोरी – कवितासंग्रह इ.स. १९५७
 • शर्मिष्ठा – कवितासंग्रह इ.स. १९६०
 • उत्सव – कवितासंग्रह इ.स. १९६२
 • वात्रटिका – कवितासंग्रह इ.स. १९६३
 • भोलानाथ – कवितासंग्रह इ.स. १९६४
 • मीरा – कवितासंग्रह इ.स. १९६५
 • विदूषक – कवितासंग्रह इ.स. १९६६
 • बबलगम – इ.स. १९६७
 • सलाम – इ.स. १९७८
 • गझल – इ.स. १९८१
 • भटके पक्षी – इ.स. १९८४
 • तुझे गीत गाण्यासाठी – इ.स. १९८९
 • बोलगाणी – इ.स. १९९०
 • चांदोमामा – इ.स. १९९२
 • सुट्टी एक्के सुट्टी – इ.स. १९९२
 • वेड कोकरू – इ.स. १९९२
 • आता खेळा नाचा – इ.स. १९९२
 • झुले बाई झुले – इ.स. १९९२
 • नवा दिवस – इ.स. १९९३
 • उदासबोध – इ.स. १९९४
 • त्रिवेणी – इ.स. १९९५
 • कबीर – इ.स. १९९७
 • मोरू – इ.स. १९९९
 • सूरदास – इ.स. १९९९
 • राधा – इ.स. २०००
 • वाढदिवसाची भेट – इ.स. २०००
 • अफाटराव – इ.स. २०००
 • फुलपाखरू नीळ नीळ – इ.स. २०००
 • वादळ – नाटक इ.स. २००१
 • ज्युलिअस सीझर – इ.स. २००२
 • आनंदऋतू – इ.स. २००४
 • सूर आनंदघन – इ.स. २००५
 • मुखवटे – इ.स. २००६
 • काव्यदर्शन – इ.स. १९६२
 • तृणपर्णे –
 • गिरकी –

मंगेश पाडगावकारांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

मंगेश पाडगावकारांसारख्या प्रतिभा संपन्न कवीला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले.

 • साहित्य अकादमी पुरस्कार (इ.स. १९८०) सलाम या कवितासंग्रहासाठी
 • महाराष्ट्र भूषण पुरस्कार (२४-११-२००८)
 • पद्मभूषण पुरस्कार
 • महाराष्ट्र साहित्य परिषद म.सा.प. मानद पुरस्कार (२०१३)
 • जीवन साधना गौरव पुरस्कार (२०१२)
 • मुंबईतील जी-दक्षिण विभागात असलेल्या जुना प्रभादेवी मार्ग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाला जोडणाऱ्या नाक्यावरील चौकास मंगेश पाडगावकर चौक असे नाव देण्यात आले आहे.
 • त्यांच्या नावाने मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार दिला जातो.
 • पाडगावकर यांना पुणे महानगरपालिकेतर्फे कला संगीत साहित्य आणि सामाजिक कार्यक्षेत्रामधील नामवंत व्यक्तींना प्रदान करण्यात येणारा, “पुणे पंडित पुरस्कार” देऊन गौरविले.
 • २००६ मध्ये मंगेश पाडगावकर यांना प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या नावावर असलेला “कुसुमाग्रज” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मंगेश पाडगावकर यांच्याविषयी महत्त्वाची माहिती

 • मंगेश पाडगावकर यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षापासून कविता लिहायला सुरुवात केली.
 • मंगेश पाडगावकर हे लोकप्रिय नावाजलेले कवी व साहित्यिक आहेत.
 • मंगेश पाडगावकर यांनी प्रेम कविता, राजकारण सामाजिक तसेच मुलांसाठी बालकविता आयुष्यावरील कविता इत्यादी. कविता लिहिल्या. तसेच त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. इंग्रजी ग्रंथांचे मराठीमध्ये भाषांतर देखील केले.
 • मंगेश पाडगावकर यांचा जन्म कोकणमधील सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ले तालुक्यामध्ये झाला.
 • शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मंगेश पाडगावकर हे काही काळ श्रीलंकेमध्ये निवास करत होते.

मंगेश पाडगावकारांचा मृत्यू

वयाच्या चौदाव्या वर्षी “तुझं पाहिले तर वाहिले नवपुष्प हे हृदयातले” ही पहिली कविता लिहिणाऱ्या मंगेश पाडगावकरांचा कवितांचा प्रवास सत्तर वर्षांपर्यंत यशस्वीरित्या चालूच राहिला. ते म्हणायचे ते ८० च्या दशकात जगत असताना, जरी त्यांचे पाय लटपटू लागले तरी, त्यांच्या कविता कधीच डगमगल्या नाही. सुरुवातीच्या काळात प्रसिद्धी मिळण्यापूर्वी मंगेश पाडगावकरांनी आपल्या कविता वाचनाचे कार्यक्रम गावोगावी शहरो शहरी केले.

३० डिसेंबर २०१५ रोजी दीर्घ आजारामुळे राहत्या घरी मंगेश पाडगांवकर यांनी शेवटचा श्वास घेतला. सौंदर्यवादी शब्दांनी निसर्गाची ओढ व्यक्त करणाऱ्या आणि कवितेमध्ये सामाजिक भान जपत प्रेम करायला शिकवणाऱ्या मंगेश पाडगावकरांवर आपणही शतदा प्रेम करावे अशा या अजरावर कवीला कोटी कोटी नमन.

FAQ

१. जिप्सी या काव्यसंग्रहाचे कवी कोण आहे?

मंगेश पाडगावकरांचे ‘धारानृत्य’, ‘जिप्सी’, ‘सलाम’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’ हे काव्यसंग्रह लोकप्रिय आहेत.

२. मंगेश पाडगावकरांचा जन्म कधी झाला ?

मंगेश केशव पाडगावकर यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ले तालुक्यामध्ये झाला.

मंगेश पाडगावकरांनी कोणता कविता संग्रह लिहिला आहे ?

रोमँटिक कवितेचा ब्रेक “सलाम” या संग्रह आहे. त्यांनी मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये “सुट्टी एके सुटी” समाविष्ट आहे आणि त्यांच्या निबंध संग्रहाचे नाव “निंबोणीच्या झाडामागे” आहे.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास मंगेश पाडगावकर यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला, हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment