पंडिता रमाबाई माहिती मराठी | Pandita Ramabai Information In Marathi

पंडिता रमाबाई माहिती मराठी | Pandita Ramabai Information In Marathi – पंडिता रमाबाई ह्या एक प्रख्यात भारतीय समाज सुधारक आणि सामाजिक गोष्टींमध्ये सक्रियरित्या सहभाग दर्शवणाऱ्या कार्यकर्त्या होत्या. रमाबाई प्रसिद्ध कवियीत्री, विज्ञान आणि भारतीय महिलांच्या सबलीकरणाच्या खंबीर समर्थक होत्या.

ब्राह्मण कुटुंबातील असूनही, रमाबाई यांनी दुसऱ्या जातीतील पुरुषाची लग्न करून, जातीभेदाबद्दल आवाज उठवला. महिलांच्या सबलीकरणासाठी पंडिता यांनी संपूर्ण भारतच नव्हे तर, इंग्लंडमध्ये सुद्धा प्रवास केला. १८८१ मध्ये पंडिता यांनी “आर्य महिला सभा” स्थापन केली.

इतिहासाने नटलेल्या भारताने आपल्या सामाजिक-सांस्कृतिक जडणघडणीवर खोलवर परिणाम करणारे अनेक दिग्गज पाहिले आहेत. विशेषत: स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रात अशाच आशेचा किरण म्हणजे पंडिता रमाबाई. अनेकदा, भारतातील महिला हक्कांच्या चॅम्पियन्सची चर्चा करताना, राणी लक्ष्मीबाई किंवा सावित्रीबाई फुले यांसारखी नावे संभाषणावर वर्चस्व गाजवू शकतात.

तरीही, या महान व्यक्तींमध्ये रमाबाई यांचा समावेश आहे, ज्यांच्या ज्ञानाचा अथक प्रयत्न आणि त्यांच्या काळातील सामाजिक मर्यादांमधून स्त्रियांच्या उत्थानासाठी उत्कटतेने देशाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक इतिहासावर अमिट छाप सोडली आहे.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पंडिता रमाबाई यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्ही सविस्तर वाचावा.

Table of Contents

पंडिता रमाबाई माहिती मराठी | Pandita Ramabai Information In Marathi

पूर्ण नाव रमाबाई मेधावी
जन्म तारीख २३ एप्रिल १८९८
जन्म स्थळ मैसूर
वडिलांचे नाव अनंत शास्त्री
आईचे नाव लक्ष्मीबाई डोंगरे
पतीचे नाव विपिन बिहारी
पदवी सरस्वती , पंडिता
राष्ट्रीयता भारतीय
धर्म हिंदू
स्वीकारलेला धर्म ख्रिचन
कार्य सती प्रथेच्या व बालविवाह विरोधात , महिला सक्षमीकरण कार्य , आर्य समाज संस्थेची स्थापना
मृत्यू ०५ एप्रिल १९२२

कोण होत्या पंडिता रमाबाई ?

कोणत्याही धर्माचा प्रचार करण्यास, पुरुषांच्या जोडीला महिलांचाही मोठा वाटा आहे. त्यापैकी एक नाव म्हणजे पंडिता रमाबाई. रमाबाई या ब्राह्मण असून, रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

Pandita Ramabai Information In Marathi

रमाबाई या क्रांतिकारी महिला होत्या, ज्यांनी विविध गोष्टींमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी व बालविवाह, सती प्रथेच्या विरोधामध्ये कणखरपणे आवाज उठवण्याचे कार्य केले. त्यांचे व्यक्तिमत्व हे अतिशय लोकप्रिय तसेच पंडिता यांचे योगदान फार मोठे आहे.

नक्की वाचा 👉👉सिंधुताई सपकाळ माहिती मराठी

पंडिता रमाबाई यांचा जन्म व बालपण

पंडिता यांचा जन्म दिनांक २३ एप्रिल १८९८ रोजी मैसूर संस्थानातील (कर्नाटक राज्य) मंगलोरजवळ माळहेरंजी जवळील गंगामूळ नावाच्या डोंगरावरील वस्तीत ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला. पंडिता यांच्या वडिलांचे नाव अनंत शास्त्री डोंगरे.

ते एक प्रसिद्ध संस्कृत पंडित होते. अनंत शास्त्री यांची दुसरी पत्नी लक्ष्मीबाई डोंगरे होती. दुसऱ्या पत्नी लक्ष्मीबाई डोंगरे यांची मुलगी ही रमाबाई.

पंडिता व लक्ष्मी डोंगरे यांना अनंत शास्त्री यांनी संस्कृतचे ग्रंथ शिकवले. संस्कृत शिकणे, औपचारिक शिक्षण, त्या काळामध्ये स्त्रियांना व खालच्या जातीतील लोकांना करण्यास मुभा नव्हती. १८७७ च्या दरम्याने रमाबाई यांच्या आई वडिलांचे अकस्मित निधन झाले.

रमाबाई उत्तम प्राध्यापिका म्हणून नावाजल्या. ज्या ठिकाणी विद्वानांनी त्यांना व्याख्यान देण्यासाठी आमंत्रित केले होते, त्याठिकाणी त्यांची प्राध्यापिका म्हणून कीर्ती संपूर्ण कलकत्त्यामध्ये प्रसिद्ध झाली. १८७८ मध्ये कलकत्ता विद्यापीठाने संस्कृतच्या क्षेत्रात रमाबाईंचे ज्ञान आणि कार्य लक्षात घेऊन, त्यांना सरस्वती ही सर्वात उत्तम पदवी देऊन गौरविले.

Pandita Ramabai Information In Marathi

ऋषीमुनींच्या आदरतिथ्यामुळे रमाबाईंच्या बालपणामध्येच, त्यांचे वडील गरिबीची झुंज देऊ लागले. त्या काळात रमाबाईंची बहीण भाऊ प्रत्येक गावामध्ये जाऊन, पौराणिक कथा सांगून त्या पौराणिक कथेच्या आधारावर घरचा उदरनिर्वाह करत असत.

नक्की वाचा 👉👉मदर टेरेसा माहिती मराठी

रमाबाईंचे शिक्षण

रमाबाईंनी संस्कृतचे ज्ञान स्वतःच्या वडिलांकडून म्हणजेच अनंत शास्त्री यांच्याकडून प्राप्त केले. लहानपणापासूनच रमाबाई अत्यंत बुद्धिमान व तीक्ष्ण बुद्धीच्या होत्या. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी त्यांनी सुमारे वीस हजार संस्कृत श्लोक लक्षात ठेवले. त्यांच्या मनात देशाबद्दल अतोनात प्रेम होते. त्यांनी मराठी बरोबरच कन्नड, हिंदी, बंगाली, इत्यादी.

विविध भाषा सुद्धा शिकल्या. जेव्हा रमाबाईंचे विसाव्या वर्षात पदार्पण झाले, त्यावेळी त्यांना संस्कृतच्या ज्ञानासाठी “सरस्वती” आणि “पंडिता” या पदव्या प्राप्त झाल्या व तेव्हापासून रमाबाई यांना पंडिता रमाबाई म्हणून प्रसिद्धी मिळाली.

पंडिता रमाबाई माहिती मराठी

पंडिता रमाबाई यांच्या आई वडिलांचा मृत्यू केव्हा झाला ?

रमाबाईंचे आई वडील १८७६ ते १८७८ च्या दरम्यान दुष्काळामुळे पीडित होते. रमाबाई वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी असताना त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले.

रमाबाईंचे लग्न

पंडिता वयाच्या अवघ्या २२ वर्षी विपिन बिहारी यांच्याशी लग्न झाले. विपिन एक बंगाली वकील होते. रमाबाई यांना एक मुलगी झाली, जिचे नाव रमाबाई यांच्या पतीने मनोरमा असे ठेवले. रमाबाईंच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षांनी विपिन बिहारी यांचे निधन झाले. त्या वेळी रमाबाई यांचे वय २३ वर्ष होते.

सती प्रथेच्या व बालविवाह विरोधात रमाबाई

वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी रमाबाई यांच्या पतीचे निधन झाल्यानंतर, समाजातील सती परंपरा व बालविवाह मोडून काढण्यासाठी, रमाबाईंनी अतोनात प्रयत्न केले. ज्यावेळी रमाबाई या विरोधामध्ये लढाई लढत होत्या, त्यावेळी भारत ब्रिटिशच्या दबावाखाली होता.

महिलांना देवदासी प्रमाणे घरात ठेवणे व अगदी लहान वयामध्ये त्यांचे एखाद्या मोठ्या पुरुषासोबत लग्न लावणे व नवरा मेल्यानंतर सती जाण्याच्या विविध प्रकारच्या समस्यांनी भारतामधील महिला या त्रासल्या होत्या.

पंडिता इंग्रजांसह निस्वार्थ भावनेने सर्व समस्यांविरुद्ध लढा देण्यास सुरुवात केली. रमाबाईंच्या या कठोर मेहनतीला इंग्रजांकडून शिष्यवृत्ती प्राप्त झाली. रमाबाई इंग्लंडला जाऊन, शिष्यवृत्तीमार्फत शिक्षण घेऊ लागल्या.

त्यांनी तिथली संस्कृत भाषा जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन धर्म शिकला, समजून घेतला, इतकेच नाही तर आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी तो धर्म स्वीकारला.

ख्रिस्ती धर्माची स्वीकृती

१८८३ मध्ये रमाबाईंनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला व स्वतःचे नाव बदलून, त्यांनी मारी रमा असे ठेवले. त्यांची मुलगी मनोरमा हिने सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारला. रमाबाई यांनी मराठीमधील “द पीपल ऑफ युनायटेड स्टेट्स” या पुस्तकाचे लेखनही केले. रमाबाईंच्या मते, हिंदू धर्मामधील महिलांची स्थिती ही अत्यंत बिकट आहे.

आणि धर्मशास्त्रामध्ये महिलांना द्वितीय स्थान प्राप्त आहे. जरी महिलांची वेदिक युगामध्ये प्रशंसा केली जात असली तरी, सध्याच्या काळात स्त्रियांना समानता दिली जात नाही. पंडिता यांनी त्यांचे लोकप्रिय पुस्तक उच्च जातीतील हिंदू महिला, यामध्ये हिंदू धर्मात महिला किती पीडित अवस्थेमध्ये आहे, याचा उल्लेख केला आहे.

पंडिता रमाबाई यांचे महिला सक्षमीकरण

महिलांना उत्तम शिक्षणाची आवश्यकता आहे, व त्यांच्या इच्छेनेच विवाह करण्याचा त्यांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे, असे पंडिता रमाबाई यांनी सांगितले. रमाबाईनी महिला वादासाठी सीता-सावित्री यांच्या स्वरूपाचे समर्थन केले.

पंडिता रमाबाई यांचा राष्ट्रवादी विचार

रमाबाईंनी अमेरिका, युरोप इत्यादी देशांचा दौरा केला. भारतामध्ये सुद्धा एक राष्ट्र निर्माण व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. सर्व नागरिकांना स्वतंत्रता प्राप्त होणे, आवश्यक आहे. त्यानुसार, भारतामध्ये आधुनिक भारतीय राष्ट्र निर्माण करण्यासाठी अमेरिकेचा आधार असणे आवश्यक आहे असा राष्ट्रवादी विचार रमाबाई यांचा होता.

पंडिता रमाबाई यांचे विधवांसाठी काम

पंडिता १८८३ मध्ये ब्रिटिश सरकारकडून शिष्यवृत्ती प्राप्त करून, इंग्लंडमध्ये इंग्रजी भाषेचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी इंग्लंडला गेल्या. तेथे त्यांनी दोन वर्ष संस्कृतचे शिक्षण ग्रहण करून, संस्कृत मध्ये प्राध्यापक राहिल्या. त्यानंतर त्या अमेरिकेमध्ये जाऊन पोहोचल्या.

त्या ठिकाणी त्यांनी इंग्लंडमध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला. अमेरिकेमध्ये रमाबाईंच्या यशस्वी प्रयत्नांमुळे, रमाबाई यांनी असोसिएशनची स्थापना केली. ज्यामध्ये त्यांनी दहा वर्ष भारतातील विधवा गृह चालवण्याची जबाबदारी मोठ्या धाडसीने सांभाळली.

पंडिता रमाबाई यांची विदेशयात्रा

इंग्लंड

30 एप्रिल 1883 पंडिता त्यांची कन्या मनोरमासोबत भारतातून इंग्लंड ला जाण्यास निघाल्या. आनंदीबाई या शिक्षिका होत्या. 16 मे 1883 ला त्या इंग्लंडमधील लंडन या ठिकाणी पोहचल्या. त्यानंतर पंडिता रमाबाई यांनी 30 सप्टेंबर 1883 रोजी ख्रिश्चन धर्म स्वीकारला.

व आपले नाव बदलून मेरी रमा व मुलीचे नाव मेरी मनोरमा असे ठेवले. लंडनमध्ये असताना रमाबाई यांच्यावर सिस्टर जेराल्डिन व प्रा. बिल यांच्या शिकवणीचा प्रभाव पडला. रमाबाईनी येथेच चेल्टनहॅम मध्ये शिक्षिकेचे शिक्षण घेतले.

अमेरिका

इंग्लंडवरुन अमेरिकेस 17 फेब्रुवारी 1886 साली रमाबाई प्रवासास निघाल्या. 6 मार्च 1886 रोजी त्या फिलाडेल्फिया या ठिकाणी त्या पोहचल्या. 11 मार्च 1886 ला भारतातील प्रथम महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी त्या अमेरिकेत गेल्या. डॉ रचेल बौडले यांनी त्यांना आमंत्रित केले होते.

जपान

1888 ला सॅनफ्रान्सिस्को या ठिकाणाहून रमाबाई जपानला जाण्यासाठी निघाल्या. जपान येथील योकोहामा या ठिकाणी 19 डिसेंबर 1888 ला त्या पोहचल्या. जपान चे युवराज व युवराजज्ञी यांच्या वाड्याला त्यांनी त्यावेळी भेट दिली.

चीन

15 जानेवारी 1989 रोजी रमाबाई हाँगकाँग येथे पोहचल्या. 22 जानेवारी पर्यंत त्या चीनमध्ये होत्या. येथून निघून त्या 27 जानेवारी 1889 रोजी भारतात पोहचल्या.

रमाबाई भारतात परतल्या

इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, रमाबाई १८९३ च्या दरम्याने पुण्यामध्ये आल्या. पुण्यामध्ये येऊन रमाबाईंनी स्त्रियांसाठी “आर्य समाजाची” स्थापना केली. समाजामध्ये कमी जातीच्या समजल्या जाणाऱ्या महिलांचा या आर्य समाजामध्ये त्यांनी समावेश करून घेतला.

“समाजामधील अशिक्षित महिलांना योग्य शिक्षण देणे, त्यांचा बालविवाह आणि महिलांच्या संबंधित सर्व प्रकारच्या वाईट प्रथांपासून महिलांना मुक्त करणे” हा आर्य समाज संस्थेचा मुख्य उद्देश होता.

पंडिता रमाबाईंनी लिहिलेली पुस्तके

पंडिता रमाबाईंनी त्यांच्या जीवनशैलीमध्ये विविध पुस्तके लिहिली. त्यापैकी एक प्रसिद्ध पुस्तक “द हाय कास्ट हिंदू वुमन” हे प्रसिद्ध आहे. याशिवाय ख्रिश्चन धर्मामधील बायबलचे मराठी भाषेमध्ये पंडिता रमाबाईंनी भाषांतर केले. त्यासाठी पंडिता रमाबाई या प्रचंड प्रसिद्ध झाल्या.

पंडिता रमाबाईंचे व्यक्तिमत्व

पंडिता रमाबाई या एक उत्तम समाज सुधारक होत्या. त्यांचे व्यक्तिमत्व हे प्रखर होते. ब्रह्म पंडिता रमाबाई ब्राह्मण असून, त्यांनी ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केला व ख्रिश्चन धर्म स्वीकारून, पवित्र बायबल ग्रंथाचे मराठी भाषेमध्ये भाषांतर केले. रमाबाई उत्तम संस्कृत विषयाच्या जाणकार होत्या.

त्यांनी विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला. लोकांच्या कल्याणासाठी पंडिता रमाबाईंनी त्यांचे संपूर्ण आयुष्य लोकांना सहकार्य करण्यात व सामाजिक कार्यामध्ये योगदान करण्यात घालवले.

पंडिता रमाबाई यांच्या संस्था व सामाजिक कार्य

शारदा सदन

पंडिता रमाबाई यांनी 11 मार्च १८८९ मध्ये मुंबई या ठिकाणी “शारदा सदन” नावाची महिला निवास आणि शैक्षणिक संस्था स्थापन केली. तसेच विधवा महिलांसाठी सुरक्षित आश्रयस्थान रमाबाईनी महिलांना उपलब्ध करून दिले. शारदा सदन स्थापना समारंभाच्या अध्यक्षा काशीबाई कानिटकर होत्या. महिलांना शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षण इत्यादी, गोष्टी रमाबाईंनी पुरविल्या.

सुरूवातीला 2 विद्यार्थिनी घेऊन या संस्थेची स्थापना करण्यात आली. सदनात आलेली पहिली मुलगी शारदा गद्रे हिच्या नावावरून या सदनाचे नाव शारदा सदन असे ठेवण्यात आलेले होते. शैक्षणिक अभ्यासक्रम व व्यावसायिक अभ्यासक्रम अशा दोन स्वरुपात या संस्थेत अभ्यासक्रम उपलब्ध होता.

रमाबाईंची मुक्ती मिशन सभा

१८८९ मध्ये पंडिता रमाबाईंनी पुण्यापासून चाळीस मैल दूर असलेल्या, केडगाव मध्ये मुक्ती मिशन संस्थेची स्थापना केली. ज्याला आताच्या काळामध्ये “पंडिता रमाबाई मुक्ती मिशन” असे नाव देण्यात आले.

या मुक्ती मिशन संस्थेचा मुख्य उद्देश “लहान मुलांना शिक्षण देणे, त्यांची राहण्याची व्यवस्था करून त्यांना चांगल्या पद्धतीने पालनपोषण करून, चांगले व उत्तम व्यक्ती बनवण्यास मदत करणे, हा होता.” याशिवाय मुक्तिमिशन संस्थेचा मुख्य उद्देश, हा विधवा महिलांना प्रशिक्षण देऊन, त्यांचे जीवन हे सुखकारी करणे.

रमाबाई यांनी प्रत्येक विधवेल प्रशिक्षण देण्याची इच्छा प्रकट केली. ज्याच्याकडे कोणीही नाही, अशा महिलेला स्वतःचे उत्पन्न प्राप्त करण्यासाठी रमाबाईंनी मदत केली.

सदानंद सदन

अनाथ मुलांसाठी सदानंद सदन ची स्थापना करण्यात आली. मुक्ति मिशन मध्ये हा स्वतंत्र विभाग होता. येथे दुष्काळी भागातील देखील मुले येत असे.

कृपा सदन

कृपा सदन ची स्थापना केडगाव या ठिकाणी 1899 साली करण्यात आली. लंडनमधील सीएसएमव्ही तर्फे चालवण्यात येणार्‍या पतीतगृहावरुन याची स्थापना करण्यात आली. पतीता म्हणून समाजाने नाकारलेल्या तसेच लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या स्त्रीयांचे पुनर्वसन करण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.

आर्य महिला समाज

रमाबाईनी 30 एप्रिल 1882 साली पुण्यात आर्य महिला समाज स्थापन केले. काशीबाई कानिटकर, रखमाबाई राऊत, रमाबाई रानडे यांनी या संस्थेच्या स्थापनेत रमाबाईना मदत केली. स्त्रियांची अत्याचारापासून सुरक्षा करणे, हा या समाजाचा उद्देश होता. पंढरपूर, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, बार्शी.

रमाबाई असोसिएशन

13 डिसेंबर 1887 साली रमाबाई असोसिएशन ची स्थापना अमेरिका या ठिकाणी केली. दरवर्षी 5000 डॉलर भारतात पाठवण्यासाठी अमेरिकेत पैसे जमा करण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन केली. या असोसिएशनची सभा दरवर्षी डिसेंबरमध्ये भरत असे. याच दिवशी ही रक्कम जमा केली जायची. याच पैशातून रमाबाईंनी शारदा सदनची स्थापना केली.

बातमी सदन

मुक्ति मिशन मध्ये हा स्वतंत्र विभाग अंध मुली व स्त्रियांसाठी होता. भारतातील पहिली अंधासाठींची शाळा होती.

पंडिता रमाबाई यांचे पुरस्कार

  • १८७८ मध्ये कलकत्ता विद्यापीठाने पंडिता रमाबाईंना संस्कृतच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचे ज्ञान व कार्य लक्षात घेऊन, “सरस्वती”व “पंडिता” सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित केले.
  • १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाईंना कैसर-ए-हिंद पदक ही पदवी दिली.

पंडिता रमाबाई यांचा मृत्यू

पंडिता रमाबाई यांचे दि.०५ एप्रिल १९२२ रोजी निधन झाले. ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी बायबलचा सखोल अभ्यास केला. बायबल ग्रंथातील ज्ञान मराठी मुली, महिलांना व्हावे म्हणून त्यांनी बायबलच्या भाषांतराचे काम हाती घेतले.

हे काम १८ वर्ष चालू होते. भाषांतराचे काम ज्या दिवशी संपले त्याच रात्री त्यांचे निधन झाले. रमाबाईंनी सुरू केलेले कार्य आजही केडगावात चालू आहे.

पंडिता रमाबाईबाबत काही महत्वपूर्ण तथ्य

  • भारतीय इतिहासातील एक उल्लेखनीय व्यक्तिमत्त्व म्हणून पंडिता रमाबाई यांनी आपल्या आयुष्यात अनेक कामगिऱ्या केल्या. तिच्याबद्दल काही मनोरंजक तथ्ये खालीलप्रमाणे –
  • रमाबाईंना त्यांच्या आयुष्यात अनेक वैयक्तिक दुःखांचा सामना करावा लागला. लहान वयातच त्यांचे आई वडील, आणि पती गमावले. तिने तिची दोन मुले आजारपणात गेली. या गोष्टींचा एक समाजसुधारक म्हणून तिच्या कार्यावर खोल परिणाम झाला.
  • 1880 च्या दशकात आध्यात्मिक जागृती अनुभवल्यानंतर पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. तिने धर्मांतर करणे, हा एक विवादास्पद निर्णय होता, या निर्णयामुळे तिला तिच्या ब्राह्मण कुटुंबाशी आणि व्यापक हिंदू समाजाशी संघर्ष करावा लागला.
  • संस्कृत, मराठी, हिंदी, बंगाली, इंग्रजी, जर्मन, पर्शियन अशा अनेक भाषांमध्ये रमाबाई पारंगत होत्या. ग्रीक, लॅटिन, हिब्रू, अरबी आणि सिरीयक भाषेचेही तिला ज्ञान होते.
  • ऑक्सफर्ड विद्यापीठात प्रवेश घेणार्‍या पहिल्या भारतीय महिला रमाबाई ठरल्या. कॉलेजमध्ये तिने संस्कृत आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास केला.
  • धर्म, संस्कृती, महिलांचे हक्क आणि सामाजिक सुधारणा यासह विविध विषयांवर रमाबाईंनी अनेक पुस्तके लिहिली. “द हाय कास्ट हिंदू वुमन”, “द पीपल ऑफ इंडिया”, आणि “पंडिता रमाबाईची अमेरिकन डायरी” या तिच्या सर्वात प्रसिद्ध कामांचा समावेश आहे.
  • युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि जर्मनी सारख्या देशांनाही रमाबाईंनी भेट दिली. तसेच संपूर्ण भारतभर प्रवास केला.
  • सामाजिक समस्यांबद्दल व्यापक दृष्टीकोन तिने केलेल्या प्रवासामुळे तिला मिळाला. आणि समाजसुधारक म्हणून तिला, तिच्या कार्याला प्रेरणा मिळाली.
  • पंडिता रमाबाईंचा वारसा भारतातील आणि जगभरातील महिलांच्या पिढ्यांना प्रेरणा देत आहे.

पंडिता रमाबाई यांची थोडक्यात माहिती

१९ व्या शतकात आपल्या समाजात बालविवाह झालेल्या, आणि विधवा झालेल्या स्त्रियांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्या काळात एका पुरुषाला सुद्धा या विरुद्ध आवाज उठवणे कठीण जायचं आणि अशा परिस्थितीत एका स्त्रीने म्हणजे पंडित रमाबाई यांनी आवाज उठवला.

रमाबाई संस्कृत मध्ये पारंगत असल्याने, त्यांना सरस्वती आणि पंडिता म्हटले जाऊ लागलं. त्यांनी जातिभेदाचा विरोध करणाऱ्या ब्रह्म समाजाचे सदस्य स्वीकारले. स्त्री सशक्तीकरणावर पंडिता रमाबाई यांचा भर होता. त्यांनी कलकत्ता आणि बंगाल प्रांतात स्त्रियांच्या सशक्तीकरणावर जागृती निर्माण केली असतानाच, त्यांना लोक “शिक्षण तज्ञ” म्हणून लागले होते.

पंडिता रमाबाई यांच्या पतीचे निधन झालं. यानंतर त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली. या संस्थेमार्फत महिलांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि बालविवाह रोखण्यासाठी रमाबाई यांनी प्रयत्न सुरू केले. प्रगतशील समाजामध्ये स्त्रीने आत्मनिर्भर होणे अत्यंत महत्त्वाचा आहे, असं त्यांचं मत होतं. पुढे जाऊन त्यांचा कल ख्रिश्चन धर्माकडे वळला.

१८८२ साली ब्रिटिश सरकारने हंटर कमिशन नियुक्त केलं होतं, तेव्हा पंडितांना रमाबाई यांनी हंटर कमिशन समोर साक्षी दिली. महिलांना परिपूर्ण प्रशिक्षण आणि त्यांच्या शिक्षण क्षेत्रातल्या गोष्टींवर त्यांनी भर दिला.

याची बातमी आता इंग्लंडमध्ये असलेल्या राणी विक्टोरियापर्यंत जाऊन पोहोचली होती. याच काळात लेडीज डफळे यांनी महिला चिकित्सा आंदोलन सुरू केलं होतं.

१८८३ साली वैद्यकीय प्रशिक्षणासाठी रमाबाई इंग्लंडला गेल्या. इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. रमाबाईंच्या कार्याची चर्चा आता देश विदेशात होऊ लागली होती. रमाबाई यांनी स्थापन केलेल्या संस्थेमार्फत त्यांनी हिंदू विधवा महिलांसाठी आर्थिक मदत मिळवली.

रमाबाई यांनी त्यांच्या लिखाणातून समाजाचा खरा चेहरा दाखवला. महिलांच्या सशक्तिकरणाबद्दल “द हाय कास्ट हिंदू वुमन” या पुस्तकात सविस्तर माहिती आहे. समाजात शिक्षणाचे किती महत्त्व आहे, याबद्दल महिलांमध्ये जागृती निर्माण केली.

पंडिता रमाबाई यांच्या बद्दल दहा ओळी

  • आपल्या भारतात अनेक महापुरुष, क्रांतीकारक, विचारवंत, समाज सुधारक होऊन गेले. त्यापैकीच एक म्हणजे पंडिता रमाबाई.
  • पंडिता रमाबाई एक समाज सुधारक होत्या.
  • पंडिता रमाबाईंनी महिलांच्या शिक्षणासाठी व त्यांच्या हक्कासाठी लढा दिला.
  • पंडिता रमाबाईंना लहानपणीच शिक्षणाचे महत्त्व पटले होते. त्यांनी लहान वयामध्ये अनेक विद्या आत्मसात केल्या.
  • स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन, पंडिता रमाबाईंनी स्त्रियांच्या समस्या सोडवण्याचे कार्य हाती घेतले.
  • देशाचा विकास हा स्त्रीच्या प्रगतीवर अवलंबून असतो हे रमाबाई यांनी जाणले होते. व जगाला सुद्धा त्यांनी ते पटवून दिले.
  • त्यांनी स्त्रियांसाठी “शारदा सदन” व “मुक्ती सदन” स्थापन केले.
  • पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन संस्थेची स्थापना केली.
  • मुक्ती मिशनमध्ये शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच, रमाबाईंनी अनेक लहान मोठे उद्योग व्यवसाय सुरू केले.
  • पंडिता रमाबाईंनी प्रार्थना मंदिर बांधते वेळी, महत्त्वाचे योगदान दिले.
  • मंदिर बांधताना काटकसर म्हणून, रमाबाईंनी त्यांचा आराखडा स्वतःच बनवला आणि डोक्यावर विटांचे घमेल वाहून बांधकामाला हातभार लावण्यासाठी पंडिता रमाबाईंनी प्रयत्न केला.
  • या कृती मधून पंडिता रमीबाईंनी असे सिद्ध केले की, कुठलेही काम करण्यामध्ये कधीच कमीपणा मानला नाही पाहिजे, श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या या कृतीतून आश्रमातील मुलींना दिला.
  • पंडिता रमाबाईंचे आयुष्य संघर्षाची आणि संकटाचे दीर्घ साखळी होती. परंतु त्या खचल्या नाहीत.
  • स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकालातील एकमेव कर्मयोगी व सतशील साध्वी होत्या.
  • पंडिता रमाबाईंनी केलेले सामाजिक व शैक्षणिक कार्य अफाट आहे.
  • रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य आपल्यासाठी एक आदर्श आहे.
  • पंडिता रमाबाईंच्या महान कार्याचा गौरव म्हणून, ब्रिटिश सरकारने त्यांना १९१९ मध्ये कैसर-ए-हिंद पदक देऊन गौरवले.
  • पंडिता रमाबाईंनी आपले हे कार्य आयुष्यभर सुरू ठेवले. त्या एक महान व्यक्ती होत्या.
  • पंडिता रमाबाई यांचा समाज सुधारण्यात महत्त्वाचा वाटा आहे.

रमाबाईंची ग्रंथसंपदा

  • जून 1882 साली – स्त्री धर्मनीती
  • 1883 साली – इंग्लंड चा प्रवास – हे पुस्तक
  • 1886 साली – युनायटेड स्टेट ची लोकस्थिति – प्रवासवर्णन
  • जून 1887 साली – उच्चवर्णीय हिंदू स्त्री
  • 1905 साली – बायबलचा मराठीत अनुवाद
  • 1907 साली – माझी साक्ष – हे आत्मवृत्तपर लिखाण
  • 1907 साली – द टेस्टीमनी – हे इंग्रजी पुस्तक
  • 1912 साली – नवा करार – हे पुस्तक

FAQ

१. पंडिता रमाबाईंना इंग्रजांनी कोणता पुरस्कार दिला होता?

१९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाईंना कैसर-ए-हिंद पदक ही पदवी दिली.

२. पंडिता रमाबाईंनी कोणती संस्था स्थापन केली?

पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशन संस्थेची स्थापना केली. तसेच,त्यांनी स्त्रियांसाठी “शारदा सदन” व “मुक्ती सदन” स्थापन केले.

३. रमाबाईंचे योगदान काय होते?

पंडिता रमाबाईंनी केलेले सामाजिक व शैक्षणिक कार्य अफाट आहे.रमाबाई यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले कार्य आपल्यासाठी एक आदर्श आहे.स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्त्रकालातील एकमेव कर्मयोगी व सतशील साध्वी होत्या.

४. रमाबाईंना पंडिता ही पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली?

१८७८ मध्ये कलकत्ता विद्यापीठाने पंडिता रमाबाईंना संस्कृतच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांचे ज्ञान व कार्य लक्षात घेऊन, “सरस्वती”व “पंडिता” सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित केले.

५. आर्य महिला समाजाच्या संस्थापक कोण होत्या?

इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर, रमाबाई १८९३ च्या दरम्याने पुण्यामध्ये आल्या. पुण्यामध्ये येऊन रमाबाईंनी स्त्रियांसाठी “आर्य समाजाची” स्थापना केली. समाजामध्ये कमी जातीच्या समजल्या जाणाऱ्या महिलांचा या आर्य समाजामध्ये त्यांनी समावेश करून घेतला.

६. रमाबाईंनी कोणत्या सामाजिक विचारांचे समर्थन केले?

स्त्रियांच्या समस्या लक्षात घेऊन, पंडिता रमाबाईंनी स्त्रियांच्या समस्या सोडवण्याचे कार्य हाती घेतले.सती प्रथेच्या व बालविवाह विरोधात कार्य केले,पंडिता रमाबाई यांनी विधवांसाठी काम केले.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महान समाजसेविका पंडिता रमाबाई यांच्या बद्दल महिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा,लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment