संत चोखामेळा माहिती मराठी : Sant Chokhamela Information In Marathi

Sant Chokhamela Information In Marathi Language | संत चोखामेळा माहिती मराठी – संत चोखामेळा हे वारकरी संप्रदायामध्ये महान संतांपैकी एक महत्त्वाचे संत कवी होऊन गेले. त्यांचा जन्म विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामधील, मंगळवेढा या एका छोट्याशा गावी झाला. जन्मतः संत चोखामेळा अस्पृश्य समाजातील असल्याकारणाने त्या काळातील कर्मठ लोके संत चोखामेळांना खूप खरीखोटी एकवत असत.

जन्माने जरी संत चोखामेळा शूद्र असले, तरी त्यांची कर्म ही शुद्ध, विचार निर्मळ व वाणी अतिशय मधुर होती. त्यांच्यामध्ये संवेदनक्षम मन व विठ्ठलाची अतोनात भक्ती होती. त्यामुळे संत चोखामेळा हे जगप्रसिद्ध संत झाले. तेराव्या शतकामधील महाराष्ट्रामधील संत चळवळ उदयाला आली. यामधील संत चोखामेळा हे एक होते. आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत चोखामेळा यांच्या बद्दल माहिती सांगणार आहोत. हा लेख तुम्ही सविस्तर वाचा.

Table of Contents

संत चोखामेळा माहिती मराठी : Sant Chokhamela Information In Marathi Language

पूर्ण नाव संत चोखामेळा महार
जन्म नोंद नाही
गावाचे नाव विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मंगळवेढा
पत्नीचे नाव सोयराबाई
बहिणीचे नाव निर्मळा
अपत्य कर्ममेळा
मृत्यू ई.स. 1338 मंगळवेढा

संत चोखामेळा यांचा परिचय

संत चोखोबा हे महाराष्ट्रातील यादव काळातील संत नामदेवाच्या संतमेळाव्यातील वारकरी संत होते. यांचा जन्म विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यात मेहुणा गावात झाला असून ते महार जातीचे होते. संत चोखामेळा हे एक, संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते. संत नामदेव हे त्यांचे गुरू होते. ते प्रापंचिक गृहस्थ उदरनिर्वाहासाठी मोलमजुरी करत असे. सतत विठ्ठलाचे नामस्मरण घेत असे. चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावचे रहिवाशी.

Sant Chokhamela Information In Marathi Language

ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके 1200 साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यांचे लग्न सोयराबाई यांच्याशी झाले.  तत्कालीन सामाजिक विषमतेमुळे चोखोबा होरपळून निघाले. पत्नी सोयरा, बहीण निर्मळा, मेहुणा बंका व मुलगा कर्ममेळा हे सर्व प्रपंचाचे काबाडकष्ट उपसत असतानाच नित्यनेमाने व भक्तिभावाने पांडुरंगाचे नामस्मरण व कीर्तन करीत होते.

संत चोखामेळा यांचा जन्म

संत चोखामेळा यांचा जन्म कधी झाला आणि जन्माबद्दल फारशी माहिती नाही. १३३८ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. ते महाराष्ट्रातील मेहुणपुरी, तालुका देऊळगाव, जिल्हा बुलढाणा येथील होते. ते महार जातीचे होते.

संत चोखामेळा आपली त्याची पत्नी सोयराबाई आणि कर्ममेळा यांच्यासमवेत मंगळवेढ्यात राहत होते. चोखामेळा यांचे काम म्हणजे लोकांच्या घरातून आणि शेतातून मेलेले प्राणी काढून टाकणे आणि त्यांना शहराच्या हद्दीबाहेर विल्हेवाट लावणे. खालच्या जातीच्या व्यक्ती म्हणून चोखामेळा यांना अस्पृश्य समाजातील सदस्यांसाठी वेगळ्या वस्तीत शहराबाहेर राहावे लागले.

संत चोखामेळा यांचे जीवनचरित्र

चोखामेळा यांना लहानपणापासूनच देवाची आराधना करून साधूसारखे जीवन जगण्याची इच्छा होती. विठ्ठल दर्शनासाठी ते अनेकदा पंढरपूरला जात असत. त्या काळात संत नामदेवांना पंढरपुरात खूप लोक मनात असत.संत नामदेवांचे अभंग ऐकून चोखामेळा इतके प्रभावित झाले की त्यांनी संत नामदेवांना आपले गुरु मानले.

चोखामेळा संत कसे झाले

चोखामेळा आपली पत्नी सोयराबाईसमवेत पंढरपुरात पूजा आणि उत्सवात हजेरी लावण्यासाठी जात असे. परंतु खालच्या जातीमध्ये जन्मल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश करण्याची किंवा कोणत्याही उत्सवात येण्याची परवानगी नव्हती, म्हणून ते दूर उभे राहून पाहत असत. संत चोखामेळा सतत विठोबाच्या नावाचा जप करत असत आणि दररोज मंदिर परिसर स्वच्छ करीत असे. तथापि, महार जातीमध्ये जन्मल्यामुळे त्यांना मंदिरात प्रवेश करण्यास परवानगी नव्हती. अस्पृश्य असल्यामुळे त्यांना उच्चवर्णीयांनी मंदिरात प्रवेश दिला नाही.

संत चोखामेळा

म्हणून त्यांनी पंढरपूरच्या पलीकडे चंद्रभागा नदीच्या दुसर्‍या बाजूला एक झोपडी बनविली. पंढरपुरात अशाच एका वेळी चोखोबा आणि सोयराबाईंनी पांढऱ्या कपड्यात एक व्यक्ती हातात एक वीणा घेऊन आणि कीर्तन करताना पाहिले. ते दुसरे तिसरे कोणी नसून थोर संत नामदेव होते. कीर्तन संपल्यानंतर सर्व लोकांनी कृतज्ञता दर्शविण्यासाठी संत नामदेवाच्या पायाशी स्पर्श करण्यास सुरवात केली.

पण त्यांच्या खालच्या जातीमुळे संत नामदेवाच्या पायाला स्पर्श होऊ देणार नाहीत हे त्यांना ठाऊक असल्याने चोखा आणि सोयराबाई काही अंतरावरच राहिल्या. संत नामदेवांनी हे निरीक्षण करून जवळ येण्यास सांगितले. त्यांनी चोखामेळा यांना सांगितले की, देव उच्च जाती किंवा निम्न जाती, श्रीमंत किंवा गरीब, सुशिक्षित किंवा अशिक्षित असल्यामुळे आपल्या मुलांना कधीच भेद करीत नाही. हे ऐकून त्या जोडप्याला खूप आनंद झाला, त्यांनी संत नामदेवापुढे नतमस्तक झाले.

संत नामदेवांनी चोखाच्या डोक्यावर हात ठेवला आणि भगवान पांडुरंगांच्या नावाचे ३ वेळा नामस्मरण केले. त्यांनी चोखाला सांगितले की सतत भगवान पांडुरंगाच्या नावाचा जप करा. असे केल्याने तो तुम्हाला भेटायला नक्की येईल. अशा प्रकारे कवी-संत नामदेव यांनी त्यांना भक्ती पंथात प्रवेश दिला.

चोखामेळा पंढरपुरात स्थलांतरित झाले. नंतर चोखामेळा पंढरपुरात स्थायिक झाले. संत नामदेव यांच्या शिकवणुकीमुळे ते प्रभावित झाले. या कीर्तनानंतर चोखोबाचे आयुष्य पूर्णपणे बदलले होते. भगवान विठोबाची भक्ती करणे हे त्यांच्या जीवनातील ध्येय बनले. अशिक्षित असूनही त्यांनी भगवान विठोबावर आणि स्वतःच्या आयुष्यातील अनुभवांबद्दल अभंग रचणे सुरू केले.

चोखामेळाच्या शिकवणींमध्ये जात किंवा सामाजिक स्थितीची पर्वा न करता सर्व व्यक्तींच्या समानता आणि एकतेवर जोर देण्यात आला. त्यांनी अस्पृश्यतेची कल्पना नाकारली आणि समाजातील शोषित आणि उपेक्षित वर्गाच्या उन्नतीसाठी जोरदार वकिली केली. चोखामेळा यांची कविता आणि भक्तीगीते, ज्यांना अभंग म्हणून ओळखले जाते, हे त्यांचे आध्यात्मिक संदेश आणि सामाजिक भाष्य करण्यासाठी प्रभावी साधन होते.

चोखामेळा यांनी रचलेले अभंग त्यांच्यातील साधेपणा, भावनिक खोली आणि सामाजिक समीक्षेचे वैशिष्ट्य आहेत. त्यांची भक्तीगीते महाराष्ट्राची स्थानिक भाषा मराठीत रचली गेली, ज्यामुळे त्यांची शिकवण लोकांपर्यंत पोहोचली. सध्याच्या समाजव्यवस्थेला आव्हान देण्यासाठी आणि समानता, करुणा आणि न्यायावर आधारित समाजाला चालना देण्यासाठी चोखामेला यांनी संगीत आणि कविता या माध्यमांचा वापर केला.

sant chokhamela

संत चोखामेळा बद्दल मनोरंजक तथ्ये (intresting facts about sant chokhamela )

कविता आणि संगीत

चोखामेळा यांनी अभंग म्हणून ओळखल्या जाणार्‍या त्यांच्या शक्तिशाली कविता आणि भक्तिगीतांमधून त्यांचे आध्यात्मिक आणि सामाजिक संदेश व्यक्त केले. त्यांच्या रचनांमध्ये साधेपणा, भावनिक खोली आणि सामाजिक समीक्षेचे वैशिष्ट्य होते.

अस्पृश्य संत

संत चोखामेळा हे भारतीय इतिहासातील काही संतांपैकी एक होते जे अस्पृश्य महार जातीचे होते. त्यांच्या शिकवणी आणि आध्यात्मिक प्रवासाने तत्कालीन प्रचलित जाति-आधारित भेदभाव व्यवस्थेला आव्हान दिले.

भक्ती चळवळीवर प्रभाव

चोखामेळा यांनी महाराष्ट्रातील भक्ती चळवळीला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या शिकवणी आणि अभंगांनी संत तुकाराम आणि संत नामदेव यांसारख्या इतर प्रमुख संत आणि समाजसुधारकांना प्रेरणा दिली, ज्यांनी पुढे सामाजिक समता आणि आध्यात्मिक भक्तीचा संदेश दिला.

समाजसुधारक

चोखामेळा यांनी सामाजिक सुधारणेसाठी सक्रियपणे कार्य केले आणि अत्याचारी जातिव्यवस्थेविरुद्ध लढा दिला. त्यांनी सध्याच्या सामाजिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि टीका केली, सर्व व्यक्तींना त्यांची जात किंवा सामाजिक स्थिती विचारात न घेता समानता आणि न्यायाचा पुरस्कार केला.

भगवान विठ्ठलाचे भक्त

चोखामेळा हा भगवान विठ्ठलाचा कट्टर भक्त होता, महाराष्ट्रात पुजले जाणारे भगवान श्रीकृष्णाचे एक रूप होते. त्यांचे अभंग (भक्तीगीते) भगवान विठ्ठलाला समर्पित होते आणि मोठ्या भक्तिभावाने गायले गेले.

भौतिकवादाचा नकार

चोखामेळा यांनी भौतिक संपत्ती आणि सांसारिक आसक्ती यांच्या निरर्थकतेवर भर दिला. भक्ती, करुणा आणि आंतरिक अनुभूती याद्वारे खरा आनंद आणि तृप्ती मिळू शकते यावर त्यांचा विश्वास होता.

तीर्थक्षेत्रे आणि अध्यात्मिक प्रवास

चोखामेळाने आध्यात्मिक ज्ञानाच्या शोधात अनेक तीर्थयात्रा केल्या. या प्रवासांमुळे त्याला वेगवेगळ्या पार्श्वभूमीतील लोकांशी संपर्क साधता आला आणि समानता आणि एकतेचा संदेश सांगता आला.

स्मरण आणि आदर

संत चोखामेळा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पूजनीय आणि स्मरणात आहे. त्यांचे जीवन आणि शिकवणी लोकांना, विशेषत: दलित समाजातील लोकांना, सामाजिक अन्याय आणि भेदभावाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

लोकप्रिय लोककथा आणि दंतकथा

संत चोखामेळा यांच्या जीवनाभोवती असंख्य लोककथा आणि दंतकथा आहेत. या कथांमध्ये त्यांचे विलक्षण आध्यात्मिक अनुभव, इतर संतांशी संवाद आणि त्यांच्या तत्त्वांप्रती असलेले त्यांचे अतूट समर्पण यांचे चित्रण आहे.

ब्राह्मणी वर्चस्वाला आव्हान देणारे

अस्पृश्य संत म्हणून चोखामेळा यांनी ब्राह्मणी वर्चस्व आणि त्यांच्या काळातील श्रेणीबद्ध सामाजिक रचनेला थेट आव्हान दिले. अध्यात्म आणि शहाणपण हे एका विशिष्ट जाती किंवा सामाजिक समूहापुरते मर्यादित नाही या वस्तुस्थितीचा पुरावा म्हणून त्यांचे जीवन आणि शिकवण उभे राहिले.

या मनोरंजक तथ्ये संत चोखामेळा यांचे उल्लेखनीय जीवन आणि योगदान अधोरेखित करतात, एक सच्चा द्रष्टा ज्याने सामाजिक नियमांना आव्हान दिले आणि अधिक समावेशक आणि न्याय्य समाजाचा मार्ग मोकळा केला.

संत चोखामेळा – आख्यायिका

संत चोखोबा हा मंगळवेढ्याचा जातीने महार असल्याने, प्रत्येक ठिकाणी त्याचा उपास होई. पण विठ्ठलावर त्याची गाढ श्रद्धा होती. तो मनाने पवित्र आणि देहाने शुद्ध होता. त्याची बायको सोयराबाई ही विठ्ठलाची उपासना करी. अस्पृश्य समाजातील लोकांना त्या काळात पंढरपूरच्या देवळात जाऊन, विठ्ठलाचे दर्शन घेण्याची सामाजिक दृष्ट्या परवानगी नसल्याने चोखामेळा मनाने कष्टी राही. अशा भक्ताचा विठ्ठलाला कसा बरे विसर पडेल ? विठ्ठल त्याच्या पाठीशी उभा होता. मरणोत्तर चोखोबांच्या अस्थी नामदेवाने पंढरपूरला नेल्या आणि महाद्वारापाशी एक खड्डा खणून, त्या तिथे पुरल्या.

प्रत्यक्ष विठ्ठलाचे दर्शन मिळण्याची आशा नसल्याने, चोखोबा उष्ट्यावरच समाधानी राही. उष्ट्या पत्रावळीतील अन्न मिळविण्यात खालच्या जमातीत आनंद माने. भक्तांच्या तोंडातून बाहेर पडणारे विठ्ठलाचे गुणवंत शब्द ऐकावयाचे आणि या वर्णन पर शब्दांच्या उष्ट्यातून, उच्चिष्ठ शीते घ्यावयाची आणि त्यात आनंद मानावयाचा. भजन असो, नामसंकीर्तन असो, रस्त्याच्या कडेला बसून ऐकावयाचे काही सज्जन भक्त चोकोबांची चौकशी करीत, विचारपूस करीत, त्यांच्या सर्व प्रश्नांना चोखोबा विनयशील उत्तर देत.

“जोहार मायबाप जोहार तुमच्या महाराजा मी महार बहु भुकेला जाहलो, तुमच्या उष्ट्यासाठी आलो”

संत चोखामेळा कथा – विठ्ठलाने चोखामेळा यांना दिलेली अनुभूति

चोखोबा देवळाच्या महाद्वारासमोर नेहमी बसत असत, पण देवाजवळ जाऊन त्याचे दर्शन घ्यावे ही त्यांची उत्कंठा इतकी वाढली की, ते आपल्या जागेवरून उठून पुढे सरकू लागले इतक्यात एका पुजाऱ्याने चोखोबाला अडवले. कुठे चाललास ? आणि त्याच्या अंगावर धावून गेला. बिचारात चोखोबा घाबरला आणि चार पावले मागे सरकला. देवाला नैवेद्य घेऊन येणारा पुजारी ओरडला, समजत नाही का तुला ?

या नैवेद्यावर तुझी सावली पडली, तर नैवेद्य विटळणार नाही का ? विटाळलेला नैवेद्य देवाला दाखवायचा, हो बाजूला. पहिल्या पुजाऱ्याने त्याला गच्चांडी मारून दूर फेकला. गरीब चोखोबा रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. मार जोराचा आणि वर्मी लागल्याने, तेथेच निपचित पडला. विभळत होता, पण तोंडातून सतत विठ्ठल विठ्ठल अशी अस्पष्ट अक्षरी बाहेर पडत होती. हालचाल करता येत नव्हती म्हणून, रात्रीही तो तेथेच पडून राहिला.

मध्यरात्री चोखोबा उठना अशी कोणीतरी साथ घातल्याचा, त्याला भास झाला. पुन्हा एकदा अरे तुला विठ्ठलाचे दर्शन घ्यावयाचे आहे ना, चल माझ्याबरोबर मी तुला हात घेऊन जातो. दिव्य स्पर्शाने चोखोबा घाबरून गेला आणि अत्यानंदाने देवाचे स्मरण करून, देवाबरोबरच गाभाऱ्यात पोहोचला. मनोमन साक्ष पडली, देवाने त्याला आपल्याजवळ बसवले. झाली तुझी इच्छा पूर्ण. पण आपल्याला फार वेळ बसता येणार नाही. काकड आरतीच्या वेळेपूर्वी तुला बाहेर गेले पाहिजे.

चोखोबाने दोन्ही हात जोडून देवाच्या पायांवर अश्रूंचा अभिषेक केला. धन्यवाद देवा. कसा मी उतराई होउ? केवढे विशाल तुझे अंतःकरण एका महाराला दिव्य दर्शन दिले. धन्य धन्य मी. जाताना चोखोबाला देवाने आपल्या गळ्यातील रत्नहार तुळशी प्रसाद म्हणून दिला. मोठ्याने उच्चारलेले शब्द ऐकताच, बाहेर झोपलेला गुरव जागा झाला. आणि त्याने गाभाऱ्यात दृष्टिक्षेप केला. पण डोळ्यावर त्याचा विश्वासच बसेना, बाहेर बसणारा महार आणि देव जवळ ? काय आश्चर्य आहे.

देवाला तो बाटविलेस निर्लज्जा, अशी दूषणे गुरव आणि पुजारी देत राहिले. चोखोबा मात्र शांत. परत फिरताना तो एवढेच म्हणाला, कोण तो सावळा ? दोन्हीच्या आगळा विठू माझा. दुसऱ्या दिवशी देवाच्या गळ्यातील रत्नहार चोरीस गेल्याचे आढळले, अर्थात चोखोबाने तो चोरला असे जाणून, त्यांनी त्याला मारहाण केली. चोखोबा बिचारा काय करणार, त्याने देवाचा धावा सुरू केला.

“धाव घाली विठू आता, चालू नको मंद बडवे मज मारिती ऐसा काय अपराध”

पंढरपूरवरून निघून आपल्या गावी मंगळवेढा परतला. इथे त्यांना चैन पडेना. ओढ होती पंढरीची चंद्रभागेच्या तिरावर दूरच्या भागात त्याने झोपडी उभारली. आणि तेथे तो राहू लागला. आपली कर्तव्य करीत, करीत, विठोबाच्या चिंतनात, भजनात कार्यक्रमानाकडे, चोखोबाची बायको सोयरा ती ही आपल्या नवऱ्याबरोबर विठ्ठलाची भक्ती करू लागली.

मनोभावे निष्ठापूर्वक देवाचे नाव घेण्यात, नामसंकीर्तन करण्यात, ती मग्न होऊन जाई. पण तिला विठ्ठल दिसे ना. आपल्या नवऱ्याला तो दिसतो. त्याच्याशी बोलतो. तेव्हा तिच्या मनात विचार आला, आणि ती म्हणाली धनी आपल्या घरी तुमच्या पांडुरंगाला घेऊन या की. अगं हो, पण तो आल्यावर त्याला आपण काय देणार. ती उद्गारली, असं का बोलता, देवाचे प्रेम तुमच्यावर आहे. आपण वाढू ते तो आनंदाने खाईल. तिनेही देवाला बोलावण्याचा हट्ट धरला, अत्यंत तळमळीने व्याकुळतेला येऊन तिने देवाची आळवणी सुरू केली.

“येईल गरुड ध्वजा विटे सहित करीन पूजा पुढे ठेवून या ताट वाडी कुटुंबी ते अन्न तुम्हा योग्य नव्हे देवा गोड करून या जीवा”

दोघांच्या मनातील तळमळ पाहून चोखोबाला एका रात्री दर्शन देऊन, पांडुरंगाने उद्या येतो जेवायला. सोयरा अतिशय उत्साही झाली. महाराच्या घरी पांडुरंग जेवायला येणार म्हणून, तिचा आनंद गगनात मावेना. ही वार्ता लोकांचा कानी पडली. या वार्तेवर लोकांचा विश्वासच बसेना. आणि सहाजिकच गोष्ट आहे, पांडुरंग कुठला येतो ? पण काही लोकांना उत्सुक वाटत होते. एक-दोन लोक चोखोबाच्या झोपडीकडे दबक्या पावलांनी येत होती.

शेवटी त्यांनी खिडकीतून आत पाहिले, त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. चोखोबाच्या अंधाऱ्या खोपट्यात पुरेसा उजेडही नव्हता, पण चोखोबा आणि देव जवळ जवळ बसलेले त्यांनी पाहिले. सोयरा ही येथे होती. काय आणि कसे बोलावे, हेच तिला सुचेना. तिचे चित्त कावरेबावरे झाले. पण अंतःकरण भरून आले होते. आनंदाची परिस्थिती उपभोगीत होती. देव म्हणाले तुम्ही दोघेही मला प्रिय आहात, तुम्हाला भेटण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत होतो. आता इच्छा झाली ना पुरी.

“नाही उरली वासना तुम्हा पाहता नारायणा, असेच डोक्याची मारीन गावी”

सोयराने मनोभावे देवाचे पूजन केले. त्याच्या कपाळी कुंकू लावले. गळ्यात हार घातला, निरांजन ओवाळले. तेवढ्याच प्रकाशात देवाच्या तेजपुंज चेहऱ्याकडे पाहत राहीली. देवाला भूक लागली आता वाढना. सोयराची धांदल उडाली. वाढता, वाढता देवाच्या पितांबरावर ताक सांडले. जेवणे झाली. पांडुरंग समाधान पावले आणि अदृश्य झाले.

खिडकीतून बघणाऱ्या लोकांची खात्री पटली. ते प्रत्येकाला या घटनेची हकीकत सांगत सुटले, आम्ही प्रत्यक्ष पांडुरंगाला चोखोबाच्या झोपडीत पाहिले. पुजाऱ्याने देवळात जाऊन विटेवर उभा असलेला विठ्ठल पाहिला तसेच त्याच्या पितांबरावर सांडलेले ताक ही पाहिले तेव्हा सगळ्यांचीच खात्री पडली. पुजाऱ्यासह बरेच लोक चोखोबाच्या झोपडीत शिरले. आणि त्याच्यापुढे साष्टांग नमस्कार घालू लागले चोखोबा नम्रपणे म्हणाला, अहो हे काय करतात. मी तर तुमचा दास, नंतर चोखोबांची गणना संत मंडळीत होऊ लागली. विठ्ठल सदैव चोखोबांच्या पाठीशी उभा होता.

संत चोखामेळा यांचा मृत्यू

इसवी सन १३३८ मध्ये मंगळवेढ्यातील किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असताना ते बांधकाम अचानक कोसळलं. ते तिथे मजूर म्हणून काम करत होते. ती भिंत पडली. या भिंत कोसळण्याच्या दुर्घटनेत संत चोखामेळांसमवेत अनेक मजूर मृत्युमुखी पडले. या घटनेने सगळीकडे हाहाकार सुरु झाला. या प्रचंड गदारोळात चोखोबांच्या अस्थी सापडेना.

या घटनेचं अतोनात दुःख संत नामदेवांना झालं त्यावेळी त्यांनी त्या ठिकाणी येऊन त्या ढिगाऱ्याखाली अस्थी शोधणं सुरु केलं. असं सांगितलं जात की ते तिथली प्रत्येक अस्थी उचलत आणि कानाला लावत, ज्या अस्थीतून विठ्ठलाचा जयघोष ऐकू येत असे ती संत चोखामेळा यांची अस्थी होती. अशा प्रकारे सगळ्या अस्थी नामदेवांनी गोळा केल्या आणि त्याची पंढरपूरला विठोबाच्या महाद्वारात समाधी बांधली असं चरित्रकार सांगतात.

संत चोखामेळा अभंग मराठी – Sant Chokhamela Abhang In Marathi

१. जोहार मायबाप जोहार । तुमच्या महाराचा मी महार ।
बहु भुकेला झालो । तुमच्या उष्ट्यासाठी आलो ।
बहु केली आस । तुमच्या दासांचा मी दास ।
चोखा म्हणे पाटी । आणिली तुमच्या उष्ट्यासाठी ।।

२. चोखा चोखट निर्मळ । तया अंगी नाही मळ।
चोखा प्रेमाचा सागर । चोखा भक्तीचा आगर ।
चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली ।।

३. चोखा माझा जीव । चोखा माझा भाव ।
कुलधर्म देव चोखा माझा ।।
काय त्याची शक्ती ।
मोही आले व्यक्ती तयासाठी ।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान ।
तया कधी विघ्न पडो नही ।

४. ऊस डोंगा परि रस नोहे डोंगा ।
काय भुललासी वरलिया रंगा ।
चोखा डोंगा परि भाव नोहे डोंगा ।।

५. आम्हां न कळे ज्ञान, न कळे पुराण ।
वेदांचे वचन, कळे न आम्हां ।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा ।
गाईन केशवा नाव तुझे ।।

६. जन्माला विटाळ, मरता विटाळ ।
चोखा म्हणे विटाळ आदिअंती ।
आदिअंती अवघा विटाळ सायला ।
सोहळा तो झाला कोणा न कळे ।।
चोखा म्हणे मज नवल वाटते !
विटाळापरते आहे कोणा ।।

७. चंदनाच्या संगेें बोरिया बाभळी
हेकळी टाकळी चंदनाची ||१||
संतांचिया संगें अभाविक जन
तयाच्या दर्शनें तेचि होती ||२||
चोखा म्हणे ऐसा परमार्थ साधावा
नाहीं तरी भार वाहावा खरा ऐसा ||३||

संत चोखामेळा यांच्याबद्दल पुस्तके

  • चोखोबाचा विद्रोह (शंकरराव खरात)
  • वारकरी संप्रदाय (शंकर वासुदेव अभ्यंकर)
  • संत चोखामेळा (लीला पाटील)
  • श्री संत चोखामेळा चरित्र (बाळकृष्ण लळीत)
  • श्री संत चोखामेळा चरित्र आणि अभंग (सोयराबाई, कर्ममेळा, बंका व निर्मलाबाई यांच्या अभंगांसह) : शब्दालय प्रकाशन.
  • श्री संत चोखामेळा व परिवार चरित्र व समग्र अभंगगाथा (प्राचार्य डाॅ. आप्पासाहेब पुजारी)
  • संत चोखामेळा : विविध दर्शन (ॲलिनॉर झेलियट, वा.ल. मंजूळ)
  • श्री संत चोखामेळा : समग्र अभंगगाथा व चरित्र (प्राचार्य डाॅ. आप्पासाहेब पुजारी)

संत चोखामेळा यांच्या जीवनावर चित्रपट – Sant Chokhamela Movie

“जोहार मायबाप” नावाचा मराठी चित्रपट 1950 साली प्रदर्शित झाला होता. संत चोखामेळा यांच्या जीवनावरील या चित्रपटाचे दिग्दर्शन राम गबाले यांनी केले होते. संगीतकार सुधीर फडके तर कथा-पटकथा आणि संवाद ग.दि. माडगुळकर  यांचे होते.

संत चोखाबद्दल संत नामदेव, संत बका व संत तुकाराम यांची वचने

‘चोखा माझा जीव चोखा माझा भाव। कुलधर्म देव चोखा माझा।।
काय त्याची भक्ति काय त्याची शक्ति। मोही आलो व्यक्ति तयासाठी।।
माझ्या चोखियाचे करिती जे ध्यान। तया कधी विघ्न पडो नदी।।
नामदेवे अस्थि आणिल्या पारखोनी। घेत चक्रपाणी पितांबर।।
(संत नामदेव)

‘चोखा चोखट निर्मळ। तया अंगी नाही मळ।।
चोखा प्रेमाचा सागर। चोखा भक्तीचा आगर।।
चोखा प्रेमाची माउली। चोखा कृपेची साऊली।।
चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।’
(संत बंका)

‘तुका म्हणे तुम्ही विचारांचे ग्रंथ। तारिले पतित तेणे किती।।’
(संत तुकाराम)

FAQ


संत चोखामेळाची समाधी कुठे आहे?

संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूर मंदिराच्या महाद्वारापाशी स्थित आहे.


संत चोखामेळा यांचे आध्यात्मिक गुरू कोण होते?

संत चोखोबा हे महान विठ्ठल भक्त होते, संत चोखोबा संत ज्ञानेश्वरांच्या प्रभावळीतले संत होते.व संत नामदेवांना चोखोबांनी आपले आध्यामिक गुरु मानले होते.

पंढरपूर येथे संत चोखामेळा यांचे स्मारक कोणी बांधले?

संत चोखामेळाच्या मरणोत्तर त्यांच्या हाडांमधून पांडुरंगाचे नामस्मरण, नाम गजर ऐकू येत होता. संत नामदेवांनी मग ती अस्थी उचलून, पंढरपूर मंदिराच्या महाद्वारापाशी पायाखाली पुरली.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास संत चोखामेळा यांच्या बद्दल माहिती सांगितली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment