सुखदेव माहिती मराठी Sukhdev Information In Marathi

भारताचा स्वातंत्र्यलढा म्हणजे शेकडो क्रांतिकारकांची लक्षावधी देशभक्तांची शौर्यगाथा.१८५७ ते १९४७ या ९० वर्षांच्या कालखंडाचा हा इतिहास यामध्ये स्वातंत्र्य प्रेमींचा श्वासोच्छ्वास आहे, धूमसते निखारे आहेत, अनेक क्रांतिकारकांचे बलिदान, आत्महर्पण आणि हाल अपेष्टा ज्यांना सोसावं लागलं आणि भोगाव लागल्या अशा देशभक्तांची ही जीवनगाथा.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास महान क्रांतिकारी सुखदेव यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

सुखदेव माहिती मराठी Sukhdev Information In Marathi

नावसुखदेव थापर
जन्म तारीख १५ मे १९०७
जन्म स्थळ लुधियाना पंजाब
आईचे नाव रल्ली देवी
वडिलांचे नाव श्री रामलाल
भावंडे मथुरादास 
पुतण्याचे नाव भारतभूषण
धर्म
हिंदू
राष्ट्रीयत्व भारतीय
संघटनाहिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन
क्रांतिकारी उपक्रमहिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनचे सक्रिय सदस्य होते आणि त्यांनी लाहोरमध्ये अनेक वेळा तरुणांना देशासाठी काम करण्याची प्रेरणा दिली होती.
लाहोर कट प्रकरण१८ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर षडयंत्र खटल्यातील त्यांच्या योगदानासाठीही सुखदेव यांचे स्मरण केले जाते.
राजकीय कार्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी योगदान
कैद्यांचे उपोषण१९२९ मध्ये, तुरुंगात असताना, सुखदेव यांनी ब्रिटिश सरकारच्या अमानुष वागणूक आणि तुरुंगात दिल्या जाणाऱ्या निकृष्ट अन्नाच्या निषेधार्थ उपोषणात भाग घेतला.
आदर हौतात्म्याच्या स्मरणार्थ २३ मार्च रोजी शहीद दिन साजरा केला जातो.
सॉंडर्स खूनजे.पी.सँडर्स यांच्या हत्येत सुखदेवचाही हात होता.त्यात त्याने भगतसिंग आणि राजगुरू यांना सहकार्य केले.
बलिदान २३ मार्च १९३१
मृत्यू ठिकाण लाहोर, पंजाब
मृत्यूचे कारण फाशी

कोण होते सुखदेव ?

  • हुतात्मा सुखदेव थापर पंजाब मधल्या लालपूर येथे १५ मे १९६० रोजी जन्मलेला हा क्रांतिकारक. लाहोरच्या नॅशनल कॉलेज मध्ये शिकत असताना, प्रोफेसर पंडित जयचंद विद्यालंकार यांच्या प्रोत्साहनानं ते क्रांतिकार्याकडे वळले. उपजत बुद्धी आणि संघटन कौशल्य, लाभलेल्या सुखदेवांचे अल्पावधीतच क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांच्याशी मैत्री जमली.
  • हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिक आर्मीचे ते सदस्य होते. त्यामुळे त्यांच्या मनावर चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांचा पगडा होता. लाहोरच्या नॅशनल कॉलेजमध्ये, शिकत असताना सुखदेवांनी भारताचा गौरवशाली इतिहास रशियन क्रांती आणि जागतिक क्रांती यांच्या अभ्यासासाठी एक मंडळ स्थापन केलं होतं. तसेच त्यांनी लाहोर येथे नवजवान भारतीय सभेची स्थापना ही केली होती.
Sukhdev Information In Marathi
  • युवकांना क्रांतिकार्यासाठी उद्योग तर शास्त्रीय दृष्टिकोन अस्पृश्यता निवारण ही या सभेची मूळ उद्दिष्ट होती. सायमन कमिशनच्या विरोधात, आंदोलन करत असताना आणि स्कॉटच्या लाठी हल्ल्याने लाला लजपतराय मृत्युमुखी पडले, सुखदेव यांनी या घटनेचा बदला घेण्यासाठी शपथच घेतली. मोजे हाऊस मध्ये लालाजींच्या हत्ये बद्दलच्या संदर्भाच्या बैठकीत सुखदेव हजर होते. सोंडर्सला मारल्यानंतर भगतसिंग आणि राजगुरू पकडले गेले आणि कालांतराने सुखदेव ही जेलबंद झाले.
  • लाहोरच्या कारागृहात अनेक क्रांतिकारकांवर होणाऱ्या अनन्वित शाळांमध्ये सुखदेव ही सहभागी होते. तिथे त्यांनी भूख हरताळही केली, तेव्हा तर त्यांच्यावर अनन्वित अत्याचार झाले. पण सुखदेव त्याला घाबरले नाहीत अखेरीस लाहोर कट खटल्याचा निकाल लागला आणि भगतसिंग राजगुरू यांच्यासोबत सुखदेव यांनाही फासावर चढवण्यात आले. तो दिवस होता २३ मार्च १९३१ तेव्हा सुखदेव यांच वय होतं केवळ २४ वर्ष.

हे वाचा –

सुखदेव जन्म आणि कुटुंब

सुखदेव थापर यांचा जन्म दि. १५ मे १९६० मध्ये पंजाब मधील लुधियाना या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामलाल व आईचे नाव रॅली देवी होते. त्यांना एक भाऊ सुद्धा होता, ज्याचे नाव मथुरादास थापर होते व पुतण्याचे नाव भारत भूषण थापर असे होते.

Sukhdev

सुखदेव यांची बालपणीत भगतसिंग यांच्यासोबत ओळख होऊन, दोघांमध्ये चांगली घट्ट मैत्रीण निर्माण झाली व भगतसिंग व सुखदेव त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत एकमेकांसोबत जीवाला जीव देऊन, मैत्रि निभवत राहिले.

सुखदेव यांना बालपणापासूनच ब्रिटिश सरकारच्या अत्याचारां विरुद्ध प्रचंड राग व क्रोध होता. आपल्या देशाला ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त करून, देश स्वातंत्र्य होण्याची गरज त्यांना पहिल्यापासून वाटत होती व देशाला स्वातंत्र्य करण्याच्या इच्छेसाठी सुखदेव यांनी स्वतःचे बलिदान सुद्धा दिले.

आज सुखदेव यांची ओळख संपूर्ण भारत देशात एक कर्तव्यदक्ष, महान व स्वाभिमानी क्रांतिकारक म्हणून केली जाते.

सुखदेव यांचे क्रांतिकारी जीवन

  • सुखदेव हे हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन याचे सदस्य होते. त्यांनी पंजाब व उत्तर भारतामधील तसेच आजूबाजूच्या इतर शहरांमध्ये क्रांतिकारी उपक्रम राबवले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केले होते. लाहोर या ठिकाणी नॅशनल कॉलेजमध्ये भारताचा गौरवशाली इतिहास सुखदेव यांनी मांडून, तरुण पिढ्यांमध्ये देशभक्ती निर्माण केली.
  • लाहोर मध्ये सुखदेव यांनी इतर नवजवान क्रांतिकारकांसोबत नवजवान भारत सभा स्थापन केली. ज्याचे मुख्य उद्दिष्ट हे स्वातंत्र्याचे महत्त्व समजून, देशाला त्या योग्य दिशेने कार्य करण्यास प्रेरित करणे हे होते. सुखदेव यांनी लहान वयामध्ये क्रांतिकारी कार्यांमध्ये सक्रिय सहभाग दर्शवला. यामध्येच त्यांनी १९२९ मध्ये कैद्यांचे उपोषण या क्रांतिकारी कार्यामध्ये सक्रिय सहभाग दर्शवून, ब्रिटिश सरकारचा वाईट चेहरा उघडकीस आणला.
सुखदेव
  • सुखदेव यांनी भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील विविध क्रांतिकारी उपक्रम करून, देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावा व देशाला स्वातंत्र्य मिळावे या उद्देशासाठी सुखदेव यांनी वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी बलिदान दिले. ते हुतात्मे झाले. त्यांचे हे बलिदान व्यर्थ गेले नाही, १५ ऑगस्ट १९४७ मध्ये इंग्रज राजवटी पासून आपला भारत देश हा स्वतंत्र झाला.
  • सुखदेव यांच्या बलिदानामध्ये राजगुरू व भगतसिंग यांचे नाव सुद्धा आवर्जून घेतले जाते. मृत्यूच्या वेळी सुखदेव यांच्या सोबत भगतसिंग व राजगुरू यांना सुद्धा फाशीची शिक्षा दिली गेली.

सायमन आयोगाचा निषेध

१९२७ मध्ये ब्रिटिश राजवटीने एक आयोग स्थापन केले. ज्या आयोगाचे नाव सायमन कमिशन असे होते.

परंतु या समितीमध्ये ब्रिटिश सरकारने एकही भारतीय व्यक्ती सदस्य म्हणून घेतला नाही, यामुळे सायमन कमिशनचा संपूर्ण भारतामध्ये निषेध करण्यात आला.

सायमन कमिशनच्या निषेधार्थ लाला लजपत राय यांची हत्या व सुखदेव यांच्यावर हत्येचा झालेला परिणाम

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, देशांमध्ये स्वातंत्र्य संग्रामासाठी दोन पक्ष विभागले गेले होते. ज्या पक्षांचा मध्यमवादी पक्ष व अतिरेकी पक्ष असा उल्लेख केला गेला. अतिरेकीचे नेते लाला लजपतराय सायमन कमिशनच्या विरोधामध्ये नारे लावत, सायमन गो बॅक असे म्हणत असतातना जेम्स स्कॉटने त्या रॅलीवर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली.

या लाठी चार्ज लाला लजपत राय यांना प्रचंड जखमा झाल्या. परंतु लाला लजपत राय यांनी शेवटच्या श्वासापर्यंत रॅली मधील घोषवाक्य थांबवले नाही.

माझ्यावर मारली जाणारी प्रत्येकलाठी इंग्रजांच्या शवपेटीतील प्रत्येक खेळासारखी असेल असे लाला लजपतराय यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले व या रॅलीमध्ये वंदे मातरमचा जयघोष करत रॅली सुरूच ठेवण्यात आली.

रॅलीमध्ये झालेल्या प्रचंड दुखापतीमुळे, लजपत रायांची प्रकृती बिघडली व १९२८ मध्ये लाला लजपत राय यांचा मृत्यू झाला.

या सर्व घटनेमुळे सुखदेव व त्यांचे सहकारी यांना प्रचंड राग आला व ब्रिटिश सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी एक नवीन चिंगारी यांच्या मनामध्ये पेटू लागली.

सॉंडर्स हत्या प्रकरणात सुखदेव यांचे योगदान

लाला लजपतराय यांच्या निर्दयी हत्ये प्रकरणी ब्रिटिश सरकारने स्कॉट या ब्रिटिश अधिकाऱ्यावर कारवाई करण्यास व लालाजी यांच्या मृत्यूची जबाबदारी घेण्यापासून, विरोध दर्शवला. यामुळे सुखदेव व लाला लजपतराय यांच्या पक्षातील इतर सदस्यांना प्रचंड राग आला.

म्हणून स्कॉटचा बदला घेण्यासाठी सुखदेव, भगतसिंग, राजगुरू यांनी एक योजना आखली. दि. १८ डिसेंबर १९२८ मध्ये भगतसिंग व शिवराम राजगुरू यांनी स्कॉटला गोळ्या घालून ठार मारण्याची योजना आखली होती, परंतु ही योजना ठरल्याप्रमाणे पूर्ण झाली नाही.

व गोळी स्कॉटला न लागता जेपी सॉंडर्स लागली व यातच जेपी सॉंडर्स यांचे निधन झाले., या कारणास्तव ब्रिटिश अधिकारी सुखदेव, आझाद, भगतसिंग व राजगुरू यांच्या मागावर होते.

लाहोरचा कट काय होता ?

सॉंडर्सच्या हत्याकांडानंतर लाहोर मधील पोलिसांनी हत्ये निगडीत आरोपींना शोधण्यास शोधकार्य सुरू केले अशा परिस्थितीमध्ये त्या तिन्ही क्रांतिकाऱ्यांना तिथे राहून स्वतःची ओळख लपवणे प्रचंड अवघड जात होते. अशा परिस्थितीमध्ये सुखदेव यांनी भगवती चरण यांच्याकडे मदत मागितली.

लाहोरच्या पोलिसांपासून वाचवण्यासाठी भगवती चरण यांनी त्यांच्या पत्नीचा व त्यांच्या मुलाचा जीव धोक्यात घालून, भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांची मदत केली. या संपूर्ण प्रकरणाचा परिणाम असा झाला की, सुखदेव यांना लाहोर कटात एक सह आरोपी घोषित करून, त्यांना दोषी ठरवण्यात आले.

संरक्षण भारत कायदा

क्रांतिकारकांच्या कारवायांवर नजर ठेवण्यासाठी आणि नियंत्रण ठेवण्यासाठी, ब्रिटिश सरकारने डिफेन्स इंडिया कायद्याअंतर्गत पोलिसांचे अधिकार वाढवण्याची योजना सुरू केली.

त्यामुळे भारत देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी क्रांतिकार यांचे जगणे हे थोडे कठीण झाले व हाच या कायद्याचा मुख्य उद्देश होता.

विधानसभेत बॉम्ब स्फोट

संरक्षण भारत कायद्याअंतर्गत सर्व क्रांतिकारकांच्या अडचणींमध्ये वाढ होऊ लागली. यामुळे या कायद्याला प्रत्युत्तर म्हणून, हिंदुस्तान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मध्यवर्ती विधानसभेवर बॉम्ब फेक करण्याची खडतर योजना आखली.

ऑगस्टे फ्रेंच असेंबली मध्ये बॉम्ब टाकल्याच्या बातमीने, भगतसिंग हे प्रेरित झाले होते. व त्यातूनच त्यांनाही कल्पना सुचली. या बॉम्बस्फोटचा उद्देश कोणाचेही नुकसान करणे हा नसून, या संरक्षण भारत कायद्याचा विरोध करणे, इतकाच होता.

म्हणून भगतसिंग व त्यांच्या साथीदारांनी म्हणजे सुखदेव थापर राजगुरू व चंद्रशेखर आझाद यांनी आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला.

विधानसभा बॉम्बस्फोट नियोजना सुखदेवचे योगदान

बॉम्बस्फोटानंतर, भगतसिंग यांना रशियाकडे पाठवण्याचा विचार होत असल्याचे सुखदेव थापर यांना कळल्यानंतर, त्यांनी भगतसिंग यांना दुसरी बैठक बोलवण्याचा आग्रह केला. दुसऱ्या बैठकीमध्ये बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंग विधानसभेत बॉम्ब फेकणार असे निश्चित झाले.

व दि. ०८ एप्रिल १९२९ मध्ये दुपारी साडेबारा वाजता सार्वजनिक सुरक्षा विधेयक विशेष अधिकार जाहीर करण्यासाठी, सर जॉर्जे चेस्टर नवी दिल्लीच्या विधानसभेमध्ये उभे राहून भाषण देत होते, त्याच प्रसंगी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी विधानसभेमध्ये बॉम्ब फेकले व इन्कलाब झिंदाबाद असा नारा दिला.

लाहोर कटावर सुनावणी

दि. १० जुलै १९२९ मध्ये लाहोर कारागृहात लाहोर कट प्रकरणाची सुनावणी सुरू झाली. विशेष दंडाधिकारी न्यायालयामध्ये ३२ जणांविरुद्ध कारवाई सुरू करण्यात आली.

त्यापैकी चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत ०९ जण ०७ समर्थक तसेच शिल्लक १६ जणांना गुन्हेगार ठरवून, त्यांच्यावर खटला सुरू करण्यात आला.

कैद्यांचे उपोषण

  • कैद्यांना ठेवलेल्या तुरुंगामधील निकृष्ट दर्जाचे अन्न व जेलरच्या अमानुष वागणुकीच्या निषेधार्थ, कैद्यांनी उपोषण सुरू केल्याने, लाहोर तुरुंगामधील खटला पुढे चालू शकला नाही. त्यांनी आमरण उपोषण सुरू केले आणि क्रांतिकारक त्यांना खाण्यासाठी दिलेली भांडी वाजून मेरा रंग दे बसंती चोला हे गाणं गुणगुणत. त्याचे नेतृत्व भगतसिंग करत होते. भगतसिंग यांना सुखदेव थापर, राजगुरू, जितेंद्र नाथ यांनी सुद्धा साथ दिली.
  • कैद्यांचे उपोषण १३ जुलै १९२९ मध्ये सुरू झाले व तब्बल ६३ दिवस हे उपोषण चालूच होते. ह्या उपोषणाच्या कारणाने जितेंद्र नाथ यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूमुळे लोकांमध्ये प्रचंड संताप वाढू लागला. या संपूर्ण घटनेत सुखदेव यांचा सुद्धा महत्त्वपूर्ण सहभाग होता. सुखदेव व तुरुंगामधील बाकीच्या कैद्यांना सुद्धा जबरदस्तीने निकृष्ट दर्जाचे अन्न देण्यात येत असे, त्यांचा सुद्धा अमानुषपणे छळ करण्यात आला.

लाहोर कटासाठी शिक्षा

लाहोर कट खटल्याचा निकाल दि. ०७ ऑक्टोबर १९३० मध्ये सुनावण्यात आला. ज्या निकालामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

तर शिव वर्मा, डॉक्टर गया प्रसाद, जयदेव कपूर बेजोय, कुमार सिन्हा, महावीर सिंग, कमलनाथ तिवारी, किशोरीलाई रतन, या सर्वांना जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली. चंद्रशेखर आझाद फेब्रुवारी १९३१ मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये, इंग्रजांशी लढताना शहीद झाले.

तर भगवती चरण वोहरा हे मे १९३० मध्ये बॉम्ब बनवण्याचा सराव करताना शहीद झाले. भगवती चरण यांनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना तुरुंगामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता.

सुखदेव यांनी गांधीजींना पत्र लिहिले

  • सुखदेव हे तुरुंगामध्ये कैदेत असतानाच, त्यांनी गांधीजींना पत्र लिहिले. त्या काळात महात्मा गांधी सरकारकडे हिंसाचाराचा आरोप नसलेल्या, राजकीय कैद्यांची सुटका करण्याची मागणी करत होते. गांधीजींनी क्रांतिकारकांना त्यांच्या कारवाया आणि मोहीम थांबवण्याचे आवाहन सुद्धा केले. या सर्व गोष्टीच्या आधारे सुखदेव यांनी गांधीजीना पत्र लिहिले. जे पत्र भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांच्या बलिदाना नंतर दि. २३ एप्रिल १९३१ रोजी यंग इंडिया मध्ये प्रकाशित करण्यात आले.
  • या पत्रामध्ये सुखदेव यांनी त्यांचे मत स्पष्टपणे मांडले होते व त्यांनी महात्मा गांधींना जाणीव करून दिली होती की, आपले उद्दिष्ट केवळ मोठे बोलणे नाही, तर सत्य हे आहे की, क्रांतिकारक देशाच्या हितासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात व त्यापैकीच फाशीची घटना हे एक महत्त्वाचे उदाहरण आहे. अशा परिस्थितीमध्ये गांधीजी जर तुरुंगातील कैद्यांची वकिली करू शकत नसतील तर, त्यांनी या क्रांतिकारकांविरुद्ध नकारात्मक वातावरण निर्माण करणे सुद्धा टाळले पाहिजे.

भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतीकारांना ११ तास अगोदर फाशी का देण्यात आली ?

  • २३ मार्च रात्री ब्रिटिश सरकारने भारताचे तीन सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव थापर यांना फाशी देण्याची पूर्ण तयारी केली होती. प्रत्येक रात्री प्रमाणे या रात्रीही हे तीन शूर सैनिक भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे स्वप्न पाहत होते, पण असं काही घडलं की, ब्रिटिश सरकारला नियोजित वेळेच्या अकरा तास आधी २३ मार्चला त्यांना फाशी द्यावी लागली. काय आहे याचा इतिहास ? जाणून घेऊया.
भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव
  • देशाच्या आणि जगाच्या इतिहासात २३ मार्च या तारखेला अनेक महत्त्वाच्या घटनांची नोंद झाली असली तरी, भगतसिंग आणि त्यांचे साथीदार राजगुरू आणि सुखदेव थापर यांना फाशी दिल्याची नोंद इतिहासात या दिवसाची भारतातील ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घटना आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात २३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतीकारांना फाशी देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर २३ मार्च १९५६  ला पाकिस्तान जगातला पहिला इस्लामिक प्रजासत्ताक बनलं.
  • भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव थापर हे भारताचे ते खरे सुपुत्र होते. ज्यांनी आपल्या प्राणापेक्षा देशभक्तीला जास्त महत्त्व दिल आणि मातृभूमीसाठी बलिदान दिलं. २३ मार्च म्हणजे देशासाठी लढताना हसत हसत आपल्या प्राण्यांची आहुती देणाऱ्या तीन शूर सुपुत्रांचा हुतात्मा दिवस हा दिवस देशाचा आदर आणि हिंदुस्थानी असल्याचा अभिमान तर देतोच, पण भिजलेल्या अंतकरणाने शूरपुत्रांच्या बलिदानाला आदरांजली वाहतो.
  • भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी ०८ एप्रिल १९२९ ला सेंट्रल असेंबलीच्या जागेवर बॉम्ब फेकला. भगतसिंग यांनी बॉम्ब फेकल्यानंतर असे लिहिलं होतं , यात रक्तपात होऊ नये आणि आपला आवाज इंग्रजांपर्यंत पोहोचावा अशी भगतसिंगांची इच्छा होती. यानंतर त्यांनी स्वतःला पोलिसांना स्वाधीन केलं. त्यांच्या अटके नंतर ब्रिटिश पोलीस अधिकारी जे पी सॉंडर्स हत्तेमध्ये सहभागी असल्यामुळे, त्यांच्यावर देशद्रोह आणि खुनाचा खटला चालवला गेला.
  • भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी १९२८ मध्ये लाहोर येथे ब्रिटिश कनिष्ठ पोलीस अधिकारी सॉंडर्स यांची गोळ्या घालून हत्या केली. भारताचे तत्कालीन व्हॉइस रॉयल लॉर्ड यांनी या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी एक विशेष न्यायाधिकरण स्थापन केलं, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. ही शिक्षा २४ मार्चला देण्यात येणार होती, पण तिनही वीरांच्या फाशीची शिक्षा संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर फाशी बाबत आंदोलन सुरू होतील, त्यामुळे ब्रिटिश सरकार घाबरले होते. परिणामी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना नियोजित तारखेच्या एक दिवस आधी म्हणजे ११ तासापूर्वी फाशी देण्यात आली.

सुखदेव थापर यांच्या बद्दल १० ओळी

  • सुखदेव थापर यांचा जन्म दि. १५ मे १९६० रोजी लुधियाना येथे झाला होता.
  • सुखदेव थापर यांचा मृत्यू २३ मार्च इसवी सन १९३१ मध्ये झाला.
  • सुखदेव थापर भारतीय स्वतंत्र सेनानी होते.
  • यांचा इसवी सन १९२८ मध्ये जेपी सोंडर्स या ब्रिटिश अधिकाराच्या हत्येच्या कटात सहभाग होता.
  • सुखदेव हिंदुस्तान सोशियालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मधील एक नेता म्हणून त्यांच्या चळवळीत सक्रिय सहभाग होता.
  • त्यांनी भारतीय इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी, तसेच रशियन राज्यक्रांती व जागतिक क्रांतिकारी साहित्याची छाननी करण्यासाठी, लाहोरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात प्रवेश घेतला असे म्हणतात.
  • रामचंद्र व भगवती सिंह होरा यांच्याबरोबर त्यांनी लाहोर मध्ये नवजवान भारत सभेची स्थापना केली.
  • तरुणांना स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय करणे, शास्त्रीय विचार पद्धतीचा अवलंब करणे, जाती व्यवस्थेविरुद्ध, अस्पृश्यते विरुद्ध लढा देणे, हे या संघटनेचे मुख्य उद्दिष्ट होते.
  • सुखदेव यांच्यावर पंडित रामप्रसाद बिस्मिल आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता.
  • सुखदेव ने इसवी सन १९२९ मध्ये तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमाननीय वागणुकी विरुद्ध, तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता.
  • त्यांचे फाशीपूर्वी महात्मा गांधींना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचार प्रणालीवर प्रकाश टाकते.
  • त्यांच्या कार्यामुळे पंजाब मधील लुधियाना शहरातील त्यांच्या शाळेचे नाव अमर झाले.
  • भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तिघांनाही लाहोर जेलमध्ये २३ मार्च इसवी सन १९३१ संध्याकाळी सात वाजून, तेहतीस मिनिटांनी फासावर चढवण्यात आले.
  • त्यानंतर त्यांचे मृतदेह कारागृहाच्या मागील भिंती फोडून गुप्तपणे काढले गेले व त्यांचा लाहोर पासून अंदाजे ५० मैल दूर उसेने वाला या ठिकाणी सतलज नदीकिनारी अंत्यसंस्कार करण्यात आला.
  • ब्रिटिश सरकारने मृतदेह त्वरित गाढता यावेत म्हणून, त्यांचे कापून लहान लहान तुकडे करण्यात आले.

सुखदेव थापर यांचा व्हिडिओ

FAQ

१. सुखदेव यांचे आडनाव काय होते ?

सुखदेव यांचे आडनाव थापर असे होते. यांचा जन्म दि. १५ मे १९६० मध्ये पंजाब मधील लुधियाना या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामलाल व आईचे नाव रॅली देवी होते. त्यांना एक भाऊ सुद्धा होता, ज्याचे नाव मथुरादास थापर होते व पुतण्याचे नाव भारत भूषण थापर असे होते.

२. सुखदेव का प्रसिद्ध आहेत ?

सुखदेव ने इसवी सन १९२९ मध्ये तुरुंगात कैद्यांना देण्यात येणाऱ्या अमाननीय वागणुकी विरुद्ध, तुरुंग उपोषणातही भाग घेतला होता.त्यांचे फाशीपूर्वी महात्मा गांधींना सशस्त्र क्रांतिकारी मार्गाचे समर्थन करणारे पत्र हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील दोन मुख्य विचारधारांच्या विचार प्रणालीवर प्रकाश टाकते.

३. सुखदेवला फाशी का देण्यात आली ?

भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी १९२८ मध्ये लाहोर येथे ब्रिटिश कनिष्ठ पोलीस अधिकारी सॉंडर्स यांची गोळ्या घालून हत्या केली. भारताचे तत्कालीन व्हॉइस रॉयल लॉर्ड यांनी या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी एक विशेष न्यायाधिकरण स्थापन केलं, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली.

४. सुखदेव यांचा मृत्यू कधी झाला ?

सुखदेव थापर यांचा मृत्यू २३ मार्च इसवी सन १९३१ मध्ये झाला.

५. सुखदेव थापर यांच्यावर कोणाचा परिणाम होता ?

सुखदेव यांच्यावर पंडित रामप्रसाद बिस्मिल आणि चंद्रशेखर आझाद यांचा प्रभाव होता.

६. कोण होते सुखदेव ?

सुखदेव यांना बालपणापासूनच ब्रिटिश सरकारच्या अत्याचारां विरुद्ध प्रचंड राग व क्रोध होता. आपल्या देशाला ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीतून मुक्त करून, देश स्वातंत्र्य होण्याची गरज त्यांना पहिल्यापासून वाटत होती व देशाला स्वातंत्र्य करण्याच्या इच्छे साठी सुखदेव यांनी स्वतःचे बलिदान सुद्धा दिले. आज सुखदेव यांची ओळख संपूर्ण भारत देशात एक कर्तव्यदक्ष, महान व स्वाभिमानी क्रांतिकारक म्हणून केली जाते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास क्रांतिकारी सुखदेव यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment