तानाजी मालुसरे यांची माहिती Tanaji Malusare Information In Marathi

तानाजी मालुसरे मराठ्यांचा इतिहासात अजरामर झालेले नरवीर. मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्यात तानाजींचा पराक्रम अतुलनीय आहे. त्यांच्या पराक्रमाचे पोवाडे गाताना, आजही शाहिरांचे डब कडाडतात आणि प्रतिभा शालेय लेखकांच्या लेखणीला बळ मिळते.

आज आपण तानाजी यांच्या वीर गाथेच्या पाऊलखुणा, ऐतिहासिक दस्तऐवजातून शोधणार आहोत. तसे तानाजी मालुसरे यांचे गाव उमरठ, पण कागदपत्रात त्यांचा उल्लेख गोडोलीचे पाटील म्हणूनही येतो.

त्या भागात एक दंतकथा प्रचलित आहे की, घरातील भाऊबंदकीमुळे आपल्या पतीच्या निधनानंतर तानाजींच्या मातोश्री गावाच्या बाहेर गुहेत येऊन राहू लागल्या, त्यांनी मोठ्या जिद्दीने आपल्या मुलांचे संगोपन केले.

अर्थात या कथेला ऐतिहासिक पुरावा मात्र मिळत नाही, स्वराज्य उभारणीच्या काळात तानाजी यांनी शिवाजी महाराजांना सुरुवातीपासून सोबत केलेली दिसून येते.

शिवरायांचे बालपणीपासूनचे एकनिष्ठ सहकारी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने, सिंहगड पावन झाला. स्वराज्याचा लढा निर्णायक टप्प्यात असताना, नरवीर मालुसरे यांनी दिलेले योगदान स्वराज्याच्या रक्षणासाठी व विस्तारासाठी निर्णायक ठरले.

नरवीर मालुसरे यांचे संपूर्ण नाव, त्यांचे जन्मस्थळ , कोंढाणा किल्लाचा पराक्रम आणि त्यांचे वंशज यांची माहिती आज तगायत पुढे आलेली नाही.

त्यांच्या मृत्यूनंतर एकुलते एक चिरंजीव रायबा मालुसरे यांचे काय झाले ? ते कोठे गेले ? त्यांचे वंशज आहेत की नाही, ही सर्व माहिती आपण आज माहीत करून घेणार आहोत.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास तानाजी मालुसरे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख व माहिती जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

Table of Contents

तानाजी मालुसरे यांची माहिती Tanaji Malusare Information In Marathi

नाव तानाजी मालुसरे
जन्म तारीख १६०० इ.स
जन्म स्थळ गोंडोली गाव, सातारा जिल्हा, महाराष्ट्र
ओळख मराठा साम्राज्याचे सुभेदार
राष्ट्रीयत्वभारतीय
छंदलष्करी प्रदर्शन
वैवाहिक स्थितीविवाहित
प्रेरणा स्त्रोतछत्रपती शिवाजी महाराज
केसांचा रंगकाळा
डोळ्यांचा रंगकाळा
मृत्यू १६७० इ.स

तानाजी मालुसरे जन्म व सुरवातीचे जीवन

नरवीर मालुसरे यांचे संपूर्ण नाव तानाजी काळूजीराव मालुसरे. त्यांच्या आईचे नाव पार्वती बाई. पसरणी घाटातील गोडवली, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा, येथे तानाजींचा इसवी सन १६०० च्या सुमारास जन्म झाला.

हे वाचा –

गोडवली येथे तपनेश्वर शंभू महादेवाचे प्राचीन मंदिर आहे, तसेच ग्रामदैवत श्री काळेश्वरी देवीचे मंदिर आहे. तपनेश्वर शंभू महादेवाच्या नावावरून काळोजीराव यांनी आपल्या थोरल्या मुलाचे नाव तानाजी आणि धाकट्या मुलाचे नाव सूर्याजी असे ठेवले.

तानाजी मालुसरे कौटुंबिक माहिती

आईचे नाव पार्वतीबाई
वडिलांचे नाव सरदार काळोजी
पत्नी सावित्री मालुसरे
अपत्य रायबा मालुसरे

छत्रपती शिवरायांनी १६७६ मध्ये पारगडावर २४ दिवस वास्तव्य केले. त्या ठिकाणी शिवरायांचे स्मारक उभारण्यात आले आहे. शिवरायांनी स्थापना केलेल्या श्री भवानी माता मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला.

Tanaji Malusare Information In Marathi

शिवरायांनी देवीला अर्पण केलेले दीडशे तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, अद्यापही जसेच्या तसे आहेत. रायबा मालुसरे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा यांनी रायबा यांची समाधी पारगडावर बांधली. ही समाधी अद्यापही सुस्थितीत आहे. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी, छत्रपती शाहू महाराज, यांना रायबा त्यांचा मुलगा मुंबई, पुढे येसाजी यांनी साथ दिली.

मालुसरे यांच्याकडे निवडक शूर मावळ्यांची १००० शिवबंदी होती. संकट समई लागणारा दारूगोळा, शस्त्रसाठा याचे मोठे भांडार गडावर होते. त्यामुळे दुर्गम पारगड जिंकणे शत्रूला कधीही शक्य झाले नाही. शत्रूशी लढताना अनेक मावळे धारातीर्थी पडले.

मात्र मालुसरे यांचे मावळे कधीही मागे हटले नाहीत, स्वराज्याच्या चढउतारात प्रतिकूल परिस्थितीत पैसा, शस्त्रसाठा वेळेवर मिळत नव्हता. तरीही मालुसरे यांच्या वंशंजानी शिवबंधिने गड सोडला नाही.

शिवरायांची  आज्ञा शेवटची मानून, अतिदुर्ग उंचावर असलेल्या दुर्गम डोंगरी प्रदेशाची सेवा, साडेतीनशे वर्ष करणारे असे किल्लेदार जगाच्या इतिहासात दुर्मिळ आहेत.

शिवरायांची आज्ञा शेवटची मानून स्वतःच्या मुलाच्या लग्नापेक्षा, सिंहगडाच्या लढाईला अग्रस्थान देणाऱ्या, तानाजी मालुसरे यांच्या वंशजानी शिवरायांच्या आज्ञेचे पालन करत, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, या तीन राज्यात पंचांग सीमेवरील घनदाट जंगलातील सह्याद्रीच्या उंच डोंगर कडे कपाडातील दुर्गम पारगडाची सेवा चूकपणे बजावली आहे.

तानाजी यांचा मुलगा रायबा यांची १६७६ मध्ये छत्रपती शिवरायांनी पार गडाची किल्लेदार म्हणून नेमणूक केली तेव्हापासून आजतागायत नरवीर तानाजी मालुसरे यांचे वंशज पारगडाची सेवा करत आहेत रायबा मालुसरे यांचे पुत्र मुंबई आणि त्यांचे वंशज येसाजी, सूर्याजी, आप्पाजी, बळवंतराव, नारायणराव व त्यांचे चिरंजीव बाळकृष्ण व तानाजी यांनी पारगडाची सेवा प्रामाणिकपणे केली.

सध्या रामचंद्र मालुसरे हे पारगडावर राहत आहे. बेळगाव येथे व्यवसायानिमित्त कैलासवासी बाळकृष्ण मालुसरे राहत होते, पारगडाच्या देखभालीसाठी ते दिवसरात्र झटले.

छत्रपती शिवरायांचा व तानाजी यांचा वारसा जतन व्हावा, भारतीयांमध्ये प्रकर राष्ट्रभक्ती शौर्य जागृत व्हावी, ऐतिहासिक पारगडाचे जतन व्हावे पर्यटन स्थळ म्हणून विकास व्हावा, यासाठी गेली सात आठ दशके वयाच्या पंधराव्या वर्षापासून, कैलासवासी बाळकृष्ण मालुसरे यांनी मोठे योगदान दिले.

आता त्यांचा मुलगा शिवराज मालुसरे हे परिश्रम घेत आहेत. शिवरायांनी दिलेली कवड्याची राजमाळ, नरवीर तानाजी मालुसरे यांनी वापरलेल्या तलवारी, शिवरायांनी दिलेले आज्ञापत्र, ताम्रपत्र, शिवकालीन नाणी, इत्यादी बहुमोल ठेवा. कैलासवासी बाळकृष्ण मालुसरे यांनी जतन केला आहे.

इंग्रज राजवटीपर्यंत पारगडाच्या देखभालीसाठी, मालुसरे कुटुंबाला मानधन मिळत होते. त्यातून गडावरील शिवबा गांधीचा खर्च भागवत होता. पुढे स्वातंत्र्यानंतर खर्च मिळणे बंद झाले, अनेक शिवबंदी परिवारासह गड सोडून गेले.

तिथूनच गडाची दुरावस्था सुरू झाली. तानाजी मालुसरे व सूर्याजी यांच्या वंशंजांची अनेक वर्षानंतर, १९८० मध्ये भेट झाली. त्यानंतर दोन्ही मालुसरे परिवार तानाजी यांच्या आजरावर शौर्याचा वारसा जतन करण्यासाठी एकरूप झाले.

Tanaji Malusare

तानाजी मालुसरे यांचा पुत्र रायबा मालुसरे यांचे स्वराज्यासाठी योगदान

इतिहासकार आणि लेखकांनी नरवीर मालुसरे यांचे पराक्रम जगासमोर आणले. परंतु मालुसरे यांच्या क्रांतिकारक वंशांची आणि त्यांच्या शौर्याची देशभक्तीची दखल त्यांनी घेतली नाही.

त्यामुळे समाजालाही त्यांचा विसर पडला. नरवीरांच्या बलिदानानंतर, त्यांचे चिरंजीव रायबा मालुसरे यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्रतिकूल परिस्थितीत मोठे शौर्य गाजवले.

दक्षिणेतील मोहिमेवर जाताना, शिवरायांनी तळकोकण, गोवा व समुद्रकिनाऱ्यावरील शत्रूंच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी, दुर्गम अभ्यद्य अशा पारगाडाचे महत्त्व ओळखून, तानाजी यांचे चिरंजीव रायबा मालुसरे यांच्यावर पारगड व सभोवतालच्या प्रदेशाची जबाबदारी सोपवली.

हा गड कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात आहे. १६७६ मध्ये शिवरायांनी रायबा मालुसरे यांना पार गडाची किल्लेदारी दिली. त्यावेळी त्यांना शिवरायांनी सनदही दिली. त्यात महाराज म्हणतात, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत तुम्ही पारगडाची सेवा करावी.

महाराजांच्या या वचनाने रायबा मालुसरे भारावून गेले. बारा मावळ खोऱ्यातील व उमरठा, पोलादपूर भागातील, शेलार, पेठे, झेंडे, शिंदे, माळवे, कुबल, आदी पाचशे मावळ्यांसह रायबा मालुसरे यांनी पार गडावर वास्तव्य सुरू केले.

गडाच्या चौफेर असलेली तटबंदी भक्कम केली. ठिकठिकाणी बुरुज बांधले, सभोवतालच्या डोंगर टेकड्यांवर पहारे उभारले, किल्ले पारगड व परिसरातील प्रदेश परिसरातील प्रदेश व समुद्र किनारपट्टीवर त्यांचा दरारा होता.

अपराजित योद्धा म्हणून रायबा मालुसरे यांचा शिवरायांनी त्यावेळी गौरवही केला होता. शिवरायांच्या मृत्यूनंतर रायबा मालुसरे हे छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी एकनिष्ठ राहिले.

तानाजी मालुसरे

स्वराज्याच्या शेवटच्या टोकाला असतानाही, रायबा मालुसरे व त्यांच्या साथीदारांनी स्वराज्यावर दाखवलेली एकनिष्ठा हा भारताच्या इतिहासात प्रकर देशभक्तीचे दर्शन घडवत आहे.

रायबा मालुसरे यांनी घोडदळ, पायदळ, सागरी, आरमार व तोफखाना या चारही युद्धनीतीत प्रावीण मिळवले होते. त्यामुळे एका बाजूच्या गोव्याची समुद्र किनारपट्टी व दुसरीकडे सह्याद्रीच्या उंच डोंगररांगा अशा प्रदेशावर त्यांची हुकूमत होती.

रायबा मालुसरे यांच्या प्रकर स्वराज्य निष्ठेमुळे हा प्रदेश कधीही शत्रूला जिंकता आला नाही. अति दुर्गम असलेला हा प्रदेश घनदाट जंगलतड्यांमुळे भेदला आहे. रायबा मालुसरे यांची स्वराज्य निष्ठा, शौर्य, पाहून छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज व महाराणी ताराराणी यांनीही त्यांचा गौरव केला.

महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्याच्या सीमेवर असलेल्या पारगडावर शूर योद्धा रायबा मालुसरे यांचे वास्तव्य तब्बल साठ वर्षे होते. हा गड कधीही शत्रूला जिंकता आला नाही. स्वराज्याच्या सीमेवर जुलमी पोर्तुगीज, इंग्रज मोघलांना रोखून धरण्यासाठी, रायबा मालुसरे यांनी जीवाची बाजी लावली.

अनेकदा त्यांनी पोर्तुगीजांना पाणी पाजले. पारगडावर रायबा मालुसरे यांची समाधी आहे. त्यांचा वाढाई आहे. तेथे त्यांचे वंशज राहत आहेत.

तानाजी मालुसरे यांचा वारसा

गोडवली ग्रामपंचायत कार्यालयासमोर, नरवीर मालुसरे यांचे जन्मस्थळ आहे. शनिवार दिनांक ०३ जुलै २०१० रोजी हे जन्मस्थळ उजेडात आले. मालुसरे यांचे परडे या नावाने हे पवित्र जन्मस्थळ गावकऱ्यांनी शेकडो वर्षापासून जतन केले आहे.

१६३० च्या सुमारास मोगलांच्या लढाईत, नरवीर मालुसरे यांचे वडील काळोजीराव आणि चुलते भवरजी मृत्युमुखी पडले. काळोजीराव व भवरजी हे बंधू शूर व पराक्रमी होते. गोडवली, राजापुरी, सिंगर, पाचगणी, पसरणी, महाबळेश्वर, आदि परिसरात त्यांचा दरारा होता.

गोडवली गावातून प्रतापगडाकडे जाणारा शिवकालीन राज्यमार्ग आहे, त्यामुळे गोडवलीला ऐतिहासिक महत्त्वही आहे. हा परिसर अतिशय दुर्गम व घनदाट जंगलाचा आहे.

तानाजी यांचे मामा शेलार मामा या नावाने परिचित आहे. त्यांचे पूर्ण नाव कोंडाजी रायाजी शेलार असे होते. त्यांचे गाव प्रतापगडाच्या जवळ आहे. काळोजीरावांच्या मृत्यूनंतर शेलार मामा यांनी लहान भावंडे तानाजी सूर्याजी व बहीण पार्वतीबाई यांना गोडवली येथून, आपल्या घरी नेले.

छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे रणसिंग फुंकले, त्यावेळी शेलार मामा, तानाजी व सूर्याजीला घेऊन शिवरायांना भेटले व त्यांनी स्वराज्याच्या महायज्ञात उडी घेतली. पोलादपूर, जिल्हा रायगड, तालुक्यातील टोक. किल्ल्याची किल्लेदारी शेलार मामा यांच्याकडे होती.

गडाच्या पायथ्याला असलेल्या उमरठे या गावी ते राहत होते. तेथेच नरवीर मालुसरे यांचे बालपण गेले. या ठिकाणी सध्या तानाजी यांच्या वाड्याचे भग्न अवशेष पडलेले आहे.

उमरठे येथे तानाजी व शेलार मामा यांची शेजारी शेजारी समाधी आहे. कोल्हापूर जवळील साखर येथे सूर्याजी मालुसरे यांची समाधी आहे.

कोंढाणा किल्ल्याची लढाई

नरवीर तानाजी हे शब्द ऐकताच प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने वृंदावते. कारण तानाजी म्हणजे फक्त तानाजी. पुरंदरच्या तहात शिवरायांनी जयसिंग यांस दिलेले २३ किल्ले अजून मुघलांकडे होते.

तानाजी मालुसरे कोंढणा सिंहगड किल्ला

त्यातीलच राजगडाच्या उत्तरेस असणारा कोंढाणा सरळ समोर शिवरायांना दिसत होता. त्यावर फडकत असणारा औरंगजेबचा झेंडा शिवाजी राजे आणि जिजाऊ साहेबांना सलत होता. त्यांना हवा होता कोंढाणा. बाकीचे सारे किल्ले घेण्याचं काम त्यांनी राजमंडळावर सोपवले होते.

फक्त कोंढाण्याचा विडा महाराजांनी आपल्या मुठीत ठेवला होता, राजगडावर शिवाजी राजे आणि जिजाऊ साहेबांचे कोंढाणा किल्ल्याविषयी मसलत चालली होती आणि इतक्यात महालाचे पडदे बाजूला सारून एक धष्ट्पुष्ट देहाचा माणूस आईसाहेब, राजे, करीतमहालात आले. ते होते तानाजी मालुसरे.

तानाजी आपल्या मुलाच्या लग्नाच्या अक्षदा घेऊन ते आले होते. तानाजी आले आणि त्यांनी आऊ साहेबांचे पाय शिवले. महाराजांना मुजरा करीत, गळाभेट घेतली. तानाजी मालुसरे राजांना म्हणाले, राजे, पोराला आणि सुनेला आशीर्वाद द्यायला यायचं बर का राजे ?

पण दरवेळी तेजपुंज दिसणाऱ्या राजांच्या चेहऱ्यावरचे तेज इतर वेळी सारखे नव्हते आणि तानाजींना ते लगेच जाणवले. जाणवणारच, बालपणापासूनचे ते दोघे मित्र. तानाजी म्हणाले राज काय झालं, बघतोय काहीतरी लपवताय तुम्ही, या तानाजीपासून.

तुम्हाला आई भवानीची शपथ काय झालंय, ते आम्हाला सांगा. त्यावर शिवाजी राजे म्हणाले, तानाजीराव आम्हाला लग्नासाठी यायला जमायचे नाही. आम्ही कोंढाणा सर करण्यासाठी जाणार आहोत. तसेच तानाजी म्हणाले, राज ते जमायचं नाही. तुम्ही कोंढाण्यावर जाणार आणि मी कुठे घरी, अजिबात नाही. मी जातो पण कोंढाणा घेऊन येतो.

तानाजींना राज म्हणाले, तानाजीराव आदी रायबाचं लगीन पार पाडा. शिवरायांचे हे शब्द ऐकताच, तानाजी म्हणाले नाही राजे, आधी लगीन कोंढाण्याचे. मग माझ्या रायबाचं. महाराज, तानाजी जिवंत असताना असल्या जीवावरच्या कामगिरीवर आपण जाणार, मग आम्ही कशाला.

राजांना आणि आऊ साहेबांना माहीत होतं, आता तानाजी आपल ऐकणार नाही. राजांनी तानाजींना मोहिमेचा विडा दिला. शिवरायांशी भांडून मोहिमेचा विडा घेऊन हा सिंह मोहिमेवर निघाला.

पाचशे मावळे सोबत घेऊन, ते दि. ०४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री राजगडावरून कोंढाण्याच्या पायथ्याला पोहोचले. मशाल पेटवणे महा धोक्याचे होते, अंधारा अंधारानेच पाऊल टाकावे लागत होते. मध्यरात्रीनंतर सारे द्रोणागिरीच्या कडे जवळ जमा झाले.

काही मावळ्यांना हा कडा त्याच्या खाचाकोचा माहीत होता, कमरेला दोर बांधून दोन मावळे हा अवघड कडा जपा जपा चढून वर गेले. त्यांनी कड्याच्या वरच्या अंगाला दोर बांधले. तसेच दोराच्या आधाराने तानाजी मालुसरे आणि सारे मावळे वर आले.

साधारणता तीनशे लोक वर पोहोचले असतील, तेवढ्यात गडावरील पारध सावध झाले. किल्लेदार उदय भानला खबर लागली की, कोणीतरी शत्रू चढून किल्ल्यावर घुसतंय, एकच आरोळी पडली आणि किल्ल्यावरील पंधराशे मोगली सैन्य जागे झाले.

जाग होत आहे, याची चाहूल लागताच मराठ्यांनी शस्त्र उपसली आणि हर हर महादेवचा जय घोष करत मोगल सैनिकांच्या वस्तीवर धावले. काही सैनिक जागे होण्याच्या अगोदरच मराठ्यांनी त्यांना कापून काढले. थोड्याच वेळात गडावर तीनशे मावळे आणि पंधराशे मुगल असा सामना जुंपला.

भयंकर विध्वंस झाला. मराठ्यांचा आदेश विलक्षण होता. मराठ्यांनी पाचशे मोगल ठार केले, ४० – ५०  मावळे ही धारतीर्थ पडले. याच वेळेस किल्लेदार उदयभान राठोड आणि सुभेदार तानाजी मालुसरे यांची गाठ पडली. दोघांमध्ये भयंकर युद्ध सुरू झाले.

दोघांनाही जखमा होत होत्या, कोणीच मागे हटत नव्हते दोघेही, प्राण पणाला लावून लढत होते. उदय भानाचा जोरात वार अडवण्यासाठी, तानाजींनी ढाल पुढे केली आणि दुर्दैवाने ढाल तुटली आता तानाजी उघडे पडले आणि उदयभान जोशात आला.

त्याही प्रसंगात तानाजींनी डोक्याचे पागोटे काढून त्याची ढाल केली. तलवारी खणखणीत होत्या, रक्त सांडत होते. तानाजी त्वेषाने वार करत, उदयभानवर तुटून पडले, तसा उदयभानचा एक वार तानाजींच्यावर बसला.

तानाजींनी तसाच पलटवार करत, उदयभनावर वार केला आणि दोघेही खाली कोसळले, तर तानाजी पडले. पण मरता मरता त्यांनी असंख्य शत्रू कापून काढला आणि आपल्या मावळ्यांसाठी पुढील वाट मोकळी करून दिली.

नरवीर तानाजी पडल्यानंतर दुसरा व शेवटचा आघात केला. उदयभान पडल्यावर झालेला हा हल्ला मुगलसरा नव्हता, कित्येक मोगल सैनिक मरून गेले, बाकीचे कड्यावरून पडून मेले, असे बाराशे मोगल सैनिक मावळ्यांनी कापून काढले.

सूर्याजींनी गवताची गंजी पेटवली व महाराजांना राजगडावर गड घेतल्याचे समजले. हेरांनी राजांना बातमी दिली की, तानाजी मालुसरे पडले. मावळ्यांनी गड फत्ते केला. असे सांगताच, महाराज बोलले की एक गड घेतला, परंतु एक गड गेला.

तानाजींच्या मृत्यूची बातमी महाराजांना एखाद्या आघातासारखी होती. शिवरायांचा बालपणापासूनचा मित्र यापुढे दिसणार नव्हता, या युद्धात लढलेल्या त्या सर्व मावळ्यांचे शिवरायांनी कौतुक केले. पुढे उमरठे गावी जाऊन, शिवरायांनी स्वतः रायबाचे लग्न लावून दिले.

आजही कोंढाणा किल्ला आणि त्याच्या आसपासचा परिसर, मालुसरे आणि त्यांच्या साथीदारांच्या शौर्याच्या कणाकणात साठवून इतिहासाची साक्ष देत, अभिमानाने उभा आहे. धन्य ते तानाजी आणि धन्य त्यांचा पराक्रम.

तानाजी मालुसरे यांचा मृत्यू

दि. ०४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणताना उदयभान सोबत लढताना तानाजी धारतीर्थ पडले, व त्यांचा मृत्यू झाला .

तानाजीची स्मारके

  • रायगड जिल्ह्यातील उमरठ ह्या गावीही त्यांचा पुतळा व स्मारक उभारण्यात आले आहे.
  • कवलापूर (ता. मिरज जि. सांगली) या गावात नरवीर तानाजी मालुसरे यांचा पूर्णाकृती पुतळा आहे.
  • पुणे शहरातील वाकडेवाडी या भागाचे नाव बदलून ते नरवीर तानाजी वाडी असे करण्यात आले.
  • तानाजी मालुसरेच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोंढाणा गडाचे नाव बदलून सिंहगड ठेवण्यात आले.
  • पुण्याजवळील सिहंगडावर नरवीर तानाजी मालुसरेचे स्मारक असून, त्याचा अर्धपुतळा त्या ठिकाणी आहे.

तानाजीच्या नावे पुरस्कार

  • तानाजीच्या नावे छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानपीठ इंटरनेशनल संस्थेचा वीर तानाजी मालुसरे राष्ट्रीय पुरस्कार दिला जातो.

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट – तानाजी – द अनसंग वॉरिअर

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तानाजी द अनसंग वॉरिअर हा चित्रपट इसवी सन २०२० मध्ये प्रकाशित करण्यात आला.

या चित्रपटांमध्ये अजय देवगन यांनी तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली होती. तर काजल देवगनने त्यांची पत्नी सावित्री मालुसरे यांची पत्नी यांची भूमिका साकारली होती.

राम गबाले यांनी दिग्दर्शित केलेला ‘नरवीर तानाजी’ हा मराठी चित्रपट यापूर्वी १९५२ साली निघाला होता. चित्रपटात दुर्गा खोटे आणि मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका होत्या.

तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित पुस्तके

  • राजाशिवछत्रपती – ब.मो. पुरंदरे, पुरंदरे प्रकाशन
  • गड आला पण सिंह गेला – ह.ना. आपटे
  • सिंहगड – प्र. के. घाणेकर
  • सिंहगड – आप्पा परब
  • दुर्ग सिंहगड – आनंद पाळंदे
  • तानाजी (अमर चित्र कथा -६८२)
  • सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे – दत्ताजी नलावडे
  • नरवीर तानाजी मालुसरे (बालसाहित्य) – पंडित कृष्णकांत नाईक
  • मराठ्यांची धारातीर्थे – प्रवीण भोसले, नरसिंह पब्लिकेशन्स
  • सिंहगड – पुरंदरे प्रकाशन

तानाजी मालुसरे यांच्या बद्दल १० ओळी

  • तानाजी मालुसरे यांचा जन्म इ.स १६०० मध्ये सातारा जिल्ह्यात झाला.
  • तानाजी शूर सैनिक व स्वराज्याविषयी एकनिष्ठ असणारे व्यक्तिमत्व होते.
  • तानाजी मालुसरे शिवरायांचे बालपणीचे सवंगडी होतेच, त्याचबरोबर ते स्वराज्याच्या सैन्यातील सुभेदार देखील होते.
  • स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडींमध्ये तानाजी मालुसरे यांचा सहभाग होता.
  • अफजल खानच्या स्वारीच्या वेळी, तानाजींनी खानावर तुटून पडत उत्तम कामगिरी बजावली होती.
  • कोंढाण्यावर उदयभान सिंग राठोड आणि तानाजी यांच्यात तुंबळ लढाई झाली, यावेळी तानाजीनि यशवंती नावाच्या घोरपडीच्या सहाय्याने गड सर केला.
  • गडावर झालेल्या लढाईत उदयभान सिंग राठोड आणि तानाजी दोघेही मारले गेले.
  • तानाजी मालुसरे यांच्या मुलाचे नाव रायबा मालुसरे असे होते.
  • तानाजींच्या निधनाची बातमी राजांना समजताच, राजांना अत्यंत दुःख झाले आणि हे दुःख व्यक्त करताना गड आला पण सिंह गेला, अशा शब्दात राजाने व्यक्त केले.
  • तानाजी मालुसरे यांचा मृत्यू ४ फेब्रुवारी १६७० मध्ये झाला.

FAQ

१. इतिहासात तानाजी कोण होता?

शिवरायांचे बालपणीपासूनचे एकनिष्ठ सहकारी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने, सिंहगड पावन झाला. स्वराज्याचा लढा निर्णायक टप्प्यात असताना, नरवीर तानाजी मालुसरे यांनी दिलेले योगदान स्वराज्याच्या रक्षणासाठी व विस्तारासाठी निर्णायक ठरले.

२. तानाजी महाराजांचा जन्म कधी झाला?

नरवीर तानाजी मालुसरे यांचे संपूर्ण नाव तानाजी काळूजीराव मालुसरे. त्यांच्या आईचे नाव पार्वती बाई. पसरणी घाटातील गोडवली, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा, येथे तानाजींचा इसवी सन १६०० च्या सुमारास जन्म झाला.

३. तानाजीचा मृत्यू कधी झाला?

दि. ०४ फेब्रुवारी १६७० च्या रात्री कोंढाणा किल्ला स्वराज्यात परत आणताना उदयभान सोबत लढताना तानाजी मालुसरे धारतीर्थ पडले, व त्यांचा मृत्यू झाला .

४. तानाजीने कोणता किल्ला जिंकला?

तानाजीने कोंढाणा किल्ला जिंकून स्वराज्यात परत आणला व आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

निष्कर्ष

मित्रहो आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास शूर वीर तानाजी मालुसरे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा . धन्यवाद .

Leave a comment