अण्णा हजारे माहिती मराठी | Anna Hajare Information In Marathi – अण्णा हजारे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत असते. ते एक भारतीय समाजसेवक आहेत . ग्रामीण विकास करण्यासाठी, सरकारी कामकाज स्वच्छ बनवण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी व भ्रष्टाचारांची चौकशी करण्यासाठी, त्यांना योग्य शिक्षा करण्यासाठी प्रमुख नेते, म्हणून अण्णा हजारे यांच्याकडे पाहिले जाते.
गावागावांमध्ये जाऊन चळवळ करून, लोकांना संघटित करून व त्यांना प्रोत्साहित करून, गांधीजींच्या अहिंसक धोरणाचे पालन करून, अण्णा हजारे यांनी समाजसेवामध्ये अमुलाग्र योगदान दिले.
त्यांनी अनेक वेळा उपोषण केले. अहमदनगर जिल्ह्यामधील राळेगण सिद्धी नावाच्या गावाच्या प्रगतीसाठी व विकासासाठी अण्णा यांचे योगदान हे महत्त्वपूर्ण आहे. हे गाव इतरांसाठी आदर्श गाव म्हणून प्रस्थापित करण्याचा अण्णा हजारे यांचा मुख्य प्रयत्न होता.
अण्णा यांना केंद्र सरकारने १९९२ मध्ये भारताचा राष्ट्रीय पुरस्कार “पद्यविभूषण” देऊन गौरवित केले.
आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास अण्णा हजारे यांचे चरित्र व माहिती दिली आहे. ही माहिती व हा लेख जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की वाचा.
अण्णा हजारे माहिती मराठी | Anna Hajare Information In Marathi
पूर्ण नाव | किसन बाबूराव हजारे |
टोपणनाव नाव | अण्णा हजारे |
जन्म तारीख | १५ जून १९३७ |
जन्म स्थळ | भिंगार, महाराष्ट्र |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
व्यवसाय | भारतीय समाजसेवक |
शैक्षणिक पात्रता | ७वी पास |
वैवाहिक स्थिती | अविवाहित |
छंद | योग करणे आणि पुस्तके वाचणे |
अण्णा हजारे यांचा जन्म व वैयक्तिक जीवनाचा परिचय
- बाबुराव हजारे यांच्या घरी अण्णा हजारे यांचा जन्म दि. १५ जून १९३६ रोजी झाला. महाराष्ट्रामधील अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार हे एक छोटेसे गाव आहे, या गावांमध्ये अण्णा यांचे बालपण गेले. अण्णा यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई हजारे व त्यांना मारुती हजारे नावाचा एक भाऊ सुद्धा आहे. अण्णा यांनी लग्न केले नाही ते अविवाहित आहेत.
- राळेगणसिद्धीच्या संत यादव बाबा मंदिरातील एका छोट्या खोलीमध्ये, अण्णा व त्यांचे कुटुंब १९७५ पासून राहत होते. दि. १६ एप्रिल २०११ रोजी अण्णा हजारे यांनी प्रचंड काबाडकष्ट करून व एक उत्तम समाजसेवक होऊन, स्वतःची परिस्थिती बदलून कुटुंबाला एक चांगले आयुष्य दिले.
- अण्णा हे उत्तम समाजसेवक असून, त्यांची राळेगणसिद्धी येथील वडिलोपार्जित जमीन त्यांनी गावासाठी दोन तुकडे दान केली.
नक्की वाचा –
- गोपाळ गणेश आगरकर माहिती मराठी
- वासुदेव बळवंत फडके माहिती मराठी
- पंडिता रमाबाई माहिती मराठी
- डॉ तात्याराव लहाने यांची माहिती
अण्णा हजारे यांची कौटुंबिक माहिती
नाव | अण्णा हजारे |
आईचे नाव | लक्ष्मीबाई हजारे |
वडिलांचे नाव | बाबूराव हजारे |
भावंडे | मारूती हजारे |
अण्णा यांच्या आई वडिलांविषयी बोलायचे गेल्यास, त्यांचा जन्म हा एका शेतकरी सामान्य कुटुंबामध्ये झाला. त्यांना सहा भावंडे होते. त्यापैकी अण्णा सर्वात मोठे बंधू. अण्णांच्या वडिलांचे नाव बाबुराव हजारे. हे एक सामान्य शेतकरी तसेच आयुर्वेद आश्रमातील फार्मसी मध्ये मजूर म्हणून काम करायचे. त्यांच्या आई या गृहिणी होत्या. अण्णा यांना दोन बहिणी तसेच चार भाऊ होते.
अण्णा हजारे यांचे शिक्षण
अण्णा यांचा जन्म एका गरीब कुटुंबामध्ये झाला असून, त्यांना गरिबीमुळे शाळेमध्ये जाणे तितकेचे शक्य झाले नाही. अण्णा यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या मूळ गावी म्हणजेच, भिंगार या त्यांच्या मूळ गावी पूर्ण केले. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याकारणाने, उपजीविकेसाठी शेतजमणीवर अवलंबून राहून, शेती करूनच त्यांना उदरनिर्वाह करावा लागत असे.
अण्णा यांनी मुंबईच्या दादर रेल्वे स्थानकावर फुल विकण्याचा व्यवसाय सुरू केला व कष्ट करून अण्णांनी दादर शहरांमध्ये दोन फुलांची दुकाने सुरू करण्यात यश मिळवले. यानंतर ते एका जागरूक गटांमध्ये सामील झाले, ज्या ठिकाणी त्यांनी जमीनदारांना गरिबांना घाबरवण्यापासून व त्यांची फसवणूक करण्यापासून रोखण्याचे काम सुरू केले.
अण्णा हजारे यांची कारकीर्द
राळेगण सिद्धीच्या विकासात योगदान
- अण्णा यांनी लष्करी सेवेमधून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर, आपल्या मूळ गावी राळेगणसिद्धीला परतायचे ठरवले. जिथे त्यांनी गावाची अधोगती, गरिबी, पाणी टंचाई इत्यादीची पाहणी केली , पर्यावरणाचा ऱ्हास प्रचंड प्रमाणात झाला असून, खडकाळ मातीमुळे शेतीसाठी सुपीक जमीन नसल्याचे अण्णांना जाणवले. यामुळेच गावाची अर्थव्यवस्था ढासाळली असून, बेकायदेशीर दारू उत्पादन, तंबाकू, सिगारेट आदी, विक्री इत्यादींवर अवलंबून होती.
- शिक्षण व रोजगाराच्या संधी या गावांमध्ये उपलब्ध नव्हत्या. अण्णांनी गावाला प्रगती पथावर आणण्यासाठी सर्वांना श्रमदान करण्याचे आवाहन केले. पुढे अण्णा यांनी तरुणांना एकत्रित करून, “तरुण मंडळ” संस्था स्थापन केली व सामाजिक कार्यामध्ये ते रुजू झाले.
- गावांमधील युवकांच्या संघटनेने, गावामध्ये दारू विक्रीवर, तंबाखू विक्रीवर, सिगारेट इत्यादी. गोष्टींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला व त्यांचे तंतोतंत पालन सुद्धा गावकऱ्यांनी केले. आता राळेगण मध्ये या सर्वांची विक्री केली जात नाही, खालील गोष्टी हजारेंनी राळेगण गावामध्ये विकसित केल्या –
पाणलोट विकास कार्यक्रम
राळेगण हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले असून, पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. अण्णा यांनी गावकऱ्यांना पाण्याच्या व्यवस्थेसाठी, पाणलोट बंधारा बांधून दिला व गावकऱ्यांना समजावून सांगून, सिंचन सुधारण्याचे काम सुद्धा केले. त्यामुळे राळेगण गावातील पाण्याची समस्या दूर झाली. पाण्याच्या टंचाईमुळे उसासारख्या पिकाची शेती करणे, अण्णांनी बंद केले व ज्या पिकास पाणी कमी प्रमाणात लागते, अशा कडधान्य, तेलबिया, इत्यादी. पिकांच्या लागवडीसाठी अण्णांनी जास्त प्रोत्साहन दिले. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला व त्यांचे उत्पन्न वाढू लागले. अण्णा हजारे यांनी १९७५ मध्ये राळेगणला येऊन, केवळ ७० एकर जमिनीवर सिंचनाचे काम केले होते. मात्र आता अण्णा हजारे यांनी ७० एकर पासून २५०० एकरपर्यंत जमिनीचा विस्तार वाढवला.
धान्य बँक
अण्णा यांनी १९८० मध्ये दुष्काळ व पीक निकामी झाल्यामुळे, शेतकऱ्यांना अन्नसुरक्षा उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाच्या उद्देशाने मंदिरात धान्य बँक सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांवरील दुष्काळाच्या काळामध्ये आलेल्या अन्नाच्या संकटाचा सामना करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले.
ग्रामसभा
हजारे हे नेहमी गांधीवादी विचाराचे होते. त्यांनी अहिंसाचा मार्ग अवलंबून, अनेक चळवळी केल्या. ग्रामीण भागामध्ये ग्रामसभेत हिंसात्मक विचार न मांडता, गांधीवादी विचार मांडून, सामूहिक निर्णय घेण्याची एक महत्त्वाची लोकशाही संस्था म्हणून प्रसिद्धीस आणली. यानंतर, अण्णांनी १९९८ ते २००६ च्या दरम्याने ग्रामसभेच्या दुरुस्तीसाठी सुद्धा संपूर्ण तळागळामध्ये प्रचार केला. अण्णांनी गावाच्या विकास कामावर खर्च करण्यासाठी ग्रामसभेची मान्यता घेणे बंधनकारक केले.
अस्पृश्यता दूर करणे
हजारे यांच्या नैतिक नेतृत्वाने प्रेरित होऊन, राळेगणच्या ग्रामस्थांनी अस्पृश्यता तसेच जातीभेद दूर करण्याच्या प्रयत्नामध्ये व दलित जातीच्या घरांच्या बांधकामांमध्ये, महत्त्वपूर्ण योगदान करून, उच्च वर्णीय ग्रामस्थांचे ऋण फेडण्यास अण्णांना मदत केली.
शिक्षण
राळेगण गावामध्ये, एक प्राथमिक शाळा होती. परंतु मुलांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिरूर व पारनेर जवळच्या गावांमध्ये जावे लागत असायचे. परंतु मुलींचे शिक्षण प्राथमिक शाळेपर्यंतच मर्यादित होते. कारण मुली पुढील शिक्षणासाठी एवढा लांबचा पल्ला गाठू शकत नव्हत्या, या कारणास्तव मुलींच्या शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी अण्णांनी १९७९ मध्ये प्री स्कूल तसेच हायस्कूल राळेगण गावामध्ये सुरू केले.
लष्करी सेवा
अण्णांनी १९६० मध्ये लष्करी ट्रक ड्रायव्हर म्हणून, आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. नंतर त्यांना बढती मिळून शिपाई म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले. लष्करातील पंधरा वर्षाच्या करिअरमध्ये, अण्णा यांनी १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान, पंजाब मधील थेमकरण सेक्टरमध्ये, देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढत होते. १९७१ मध्ये नागालँड तसेच, १९७४ मध्ये मुंबई व जम्मू मध्ये, त्यांनी लष्करी सेवेत महत्त्वाचे योगदान दिले.
यानंतर भारत-पाकिस्तान युद्धा दरम्यान, गाडी चालवताना अण्णा प्रचंड अपघातातून वाचले, याचे वर्णन ते देवाकडून प्राप्त झालेला वरदान म्हणून करतात व ते म्हणतात की, जनतेची सेवा करणे म्हणजेच परमेश्वराची सेवा करणे आहे.
अण्णा हजारे यांचे इतर सामाजिक कार्य
माहिती अधिकार चळवळ
इसवी सन २००० च्या दशकामध्ये अण्णा हजारे यांनी महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचे प्रमुख नेतृत्व केले ज्या कारणामुळे महाराष्ट्र सरकारने “सुधारित माहिती अधिकार कायदा” चालू केला. २००५ च्या दरम्याने भारताच्या राष्ट्रपतीच्या मंजुरीनंतर, केंद्र सरकारने चालू केलेला हा “माहिती अधिकार कायदा” कागदपत्र म्हणून स्वीकारण्यात आला. या कायद्यामधील दुरुस्तीच्या विरोधामध्ये, अण्णा यांनी उपोषण करण्यास सुद्धा सुरुवात केली व अण्णा हजारे यांच्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या.
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराविरोधी आंदोलने
- १९९१ मध्ये अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार विरोधी, आंदोलने करण्यास सुरुवात केली. त्यावर्षी त्यांनी ४० वन अधिकारी व लाकूड व्यापारी यांच्यातील भ्रष्टाचाराच निषेध करण्यास सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की, अधिकाऱ्यांची बदली व त्यांचे निलंबन करण्यात आले.
- दि. ०४ नोवेंबर १९९७ मध्ये घोलप यांनी अण्णांवर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली, मानहानीचा खटला सुद्धा दाखल केला होता. त्यादरम्यान १९९८ एप्रिल मध्ये अण्णांना अटक करण्यात आली. अण्णांच्या बचावासाठी, पुराव्या अभावी अण्णांना मुंबईच्या महानगर न्यायालयाने तीन महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुद्धा ठोठावली. याचा परिणाम असा झाला की, अण्णांना येरवडा कारागृहामध्ये डांबून ठेवण्यात आले. यानंतर जनतेच्या विरोधामुळे सरकारला अण्णांच्या सुटकेचे आदेश जाहीर करावे लागले व यानंतर घोलप यांनी १९९९ मध्ये मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
- १९९९ च्या दरम्याने अण्णा हजारे यांनी वीज प्रकल्पाच्या खरेदीतील भ्रष्टाचार विरुद्ध आंदोलन करण्यास सुरुवात केली. २००३ मध्ये अण्णांनी काँग्रेस राष्ट्रवादी सरकारमधील, राष्ट्रवादीच्या चार मंत्रांवर आरोप केले होते. यानंतर त्या काळाचे मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी न्यायमूर्ती पीबी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली आरोपाची चौकशी करणाऱ्या उप आयोगाची स्थापना केली.
- ज्या आयोगाच्या अहवालामध्ये सुरतेदा जैन, पद्यसिंह पाटील, नवाब मलिक, इत्यादी. गुन्हेगार म्हणून आढळून आले. त्यानंतर जैन व मलिक यांनी मंत्रिमंडळामधून राजीनामा दिला. अशा प्रकारे यांना हजारे हे नेहमी भ्रष्टाचार विरुद्ध लढत राहिले व त्यांनी आंदोलने करून देशाच्या सेवेसाठी महत्त्वाचे योगदान दिले.
निवडणूक सुधारणा चळवळ
अण्णा हजारे यांनी भारतीय निवडणुकांत दरम्यान इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणांमध्ये नोटाला पर्याय देण्याची मागणी केली. ज्या पर्यायाला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त शहाबुद्धींच्या कुरेशी यांनी पाठिंबा सुद्धा दिला. अशा रीतीने अण्णा हजारे यांनी समाजातील भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी आंदोलने, उपोषणे तसेच सामाजिक चळवळी सुरू केल्या व त्यात त्यांना यश सुद्धा प्राप्त झाले.
लोकपाल विधेयक आंदोलन
- २०११ च्या दरम्यान अण्णा हजारे यांनी भारतीय संसदेत मंजूर झालेल्या भ्रष्टाचार विरुद्ध लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग दर्शवला. जनलोकपाल विधेयकाचा मसुदा सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती एन. संतोष हेगडे, तसेच कर्नाटक लोकायुक्त प्रशांत भूषण व सामाजिक कार्यकर्ते अरविंद केजरीवाल यांनी बनवला होता.
- यानंतर दिनांक. ०५ एप्रिल २०११ मध्ये अण्णा हजारे यांनी दिल्लीमधील जंतर-मंतरवर सरकारने विधेयक जाहीर करावा, या मागणीसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. परंतु त्याकाळचे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अण्णांची मागणी पूर्ण केली नाही. या आंदोलनामध्ये अरविंद केजरीवाल, मेघा पाटेकर, किरण बेदी, जयप्रकाश नारायण, कपिल देव, श्री श्री रविशंकर, स्वामी रामदेव, यांसारख्या अनेकांनी अण्णांना पाठिंबा दिला व अण्णांना मीडियाचा सुद्धा प्रचंड पाठिंबा प्राप्त झाला होता.
- अण्णांनी हे आंदोलन मुंबई, चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद, गुवाहाटी, अशा विविध शहरांमध्ये केले. याचा परिणाम असा झाला की, केंद्र सरकारने दिनांक. ०८ एप्रिल २०११ मध्ये आंदोलनाच्या मागण्या पूर्ण करण्यास मान्यता दिली. यानंतर दि. ९ एप्रिल रोजी सरकारने एक अधिसूचना जाहीर केली, ज्यामध्ये असे म्हटले गेले की. संयुक्त मसुदा समितीमध्ये भारत सरकारचे पाच नाम निर्देशित मंत्री प्रणव मुखर्जी केंद्रीय अर्थमंत्री, पी चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री, एम वीरप्पा मोइल, केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री, कपिल सिपल केंद्रीय मानव संसाधन व विकास मंत्री, तसेच सलमान कृषी केंद्रीय जलसंपदा मंत्री व अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री, हे सर्व उमेदवार व पाच नागरी समाज म्हणजेच बिगर राजकीय नावे असतील. ज्यामध्ये अण्णा हजारे, ज्येष्ठ वकील शांती भूषण, अरविंद केजरीवाल, एन संतोष हेगडे,. इत्यादी यांचा समावेश असेल.
- यानंतर दिनांक. ०९ एप्रिल रोजी अण्णा हजारे यांनी ९८ तासाचे उपोषण संपवून, केंद्र सरकार यांना विधेयक मंजूर करण्यासाठी दि. १५ ऑगस्ट २०११ पर्यंत अंतिम मुदत दिली. त्यानंतर विधेयक मंजूर न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याची मागणी करणार असल्याचे, अण्णांनी केंद्र सरकार यांना सांगितले. त्यांनी त्यांच्या आंदोलनाला स्वातंत्र्याचा दुसरा संघर्ष असे नाव दिले व हा लढा सुरू ठेवण्याविषयी अण्णा बोलले परंतु आंदोलन करण्याची धमकी, त्यांनी सरकारला देऊन सरकारकडून विधेयक मंजूर करण्यासाठी मागणी केली.
- दिनांक. २८ जुलै २०११ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने लोकपाल विधेयकाचा मसुदा मंजूर करून मागणी पूर्ण केली. ज्याने पंतप्रधान न्यायपालिका व खालच्या नोकरशाहीला लोकपालच्या कक्षेबाहेर ठेवले, याच्या निषेधार्थ अण्णांनी दिनांक. १६ ऑगस्ट २०११ मध्ये जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा, पुन्हा निर्णय घेतला. सरकारवर आमचा अजिबात विश्वास नसल्याचे, अण्णांनी सांगितले. जर सरकार भ्रष्टाचारशी लढण्यासाठी खरोखरच गंभीर आहे तर, ते पंतप्रधान सरकारी कर्मचारी व सीबीआयला लोकपालच्या कक्षेत का घेऊन जात नाहीत ?
- अण्णांना उपोषण करण्यापासून रोखण्यासाठी, दिल्ली पोलिसांनी आधीच त्यांना अटक केली होती. त्यानंतर देशभरामध्ये अण्णांच्या चाहत्यांनी निषेध केल्याच्या बातम्या संपूर्ण मीडियाद्वारे चर्चेत आल्या. त्यानंतर दिल्ली पोलिसांना अण्णा हजारे यांना सोडावे लागले.
अण्णा हजारे यांना मिळालेले पुरस्कार
- २००८ – जागतिक बँकेतर्फे जीत गिल मेमोरियल पुरस्कार
- २०१३ – ब्रिटीश कोलंबिया विद्यापीठाच्या कायद्याच्या विद्याशाखेद्वारे आंतरराष्ट्रीय अखंडता पुरस्कारासाठी अलर्ड पुरस्कार
- २००३ – आंतरराष्ट्रीय पारदर्शकता पुरस्कार
- १९९० – भारत सरकारच्या पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
- २००५ – गांधीग्राम ग्रामीण विद्यापीठातून डॉक्टरेट पदवी
- २०११ – अरविंद केजरीवाल यांच्यासह NDTV द्वारे NDTV इंडियन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित
- १९८६ – अण्णांना भारत सरकारतर्फे इंदिरा प्रियदर्शनी वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
- १९८९ – महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण पुरस्कार
- १९९९ – भारत सरकारचा सामाजिक योगदानकर्ता पुरस्कार
- १९९७ – महावीर पुरस्कार
- १९९६ – शिरोमणी पुरस्कार
- १९९८ – केअर रिलीफ एजन्सीद्वारे केअर आंतरराष्ट्रीय पुरस्कार
अण्णा हजारे यांची पुस्तके
अण्णा हजारे यांनी असं अनेक पुस्तके लिहिली, त्यापैकी काही पुस्तके खालील प्रमाणे –
- मेरा गाव – मेरा पवित्र देश
- राळेगाव सिद्धी – एक वैध परिवर्तन
- वाट ही संघर्षाची
- आदर्श गाव योजना
- लोकांच्या कार्यक्रमात सरकारची भागीदारी
- महाराष्ट्र सरकारचा आदर्श ग्राम प्रकल्प
इत्यादी प्रमुख पुस्तके अण्णा हजारे यांनी मराठी भाषेमध्ये लिहिलेली आहेत.
अण्णा हजारे यांच्यावर आधारित चित्रपट
अण्णा हजारे यांच्या जीवनशैलीवर आधारित, त्यांच्या संघर्षावर आधारित, एक चित्रपट बनवला गेला. ज्या चित्रपटाचे टायटल “मे अण्णा बनना चाहता हु” असे आहे. या चित्रपटांमध्ये अरुण नलावडे यांनी अण्णा हजारे यांची मुख्य भूमिका साकारली असून, अतिशय उत्तमरित्या या चित्रपटांमध्ये अण्णांच्या जीवन क्रमाचा परिचय दिला आहे. हा चित्रपट अण्णा हजारे यांच्या कार्यावर आधारित आहे. २०१६ मध्ये लेखक व दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी हा चित्रपट प्रदर्शित केला.
अण्णा हजारे यांचे वाद
नरेंद्र मोदी आणि नितेश कुमार यांचे विचार
२०११ एप्रिलच्या दरम्याने, एका पत्रकार परिषदेमध्ये अण्णा हजारे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे मन भरून कौतुक केले व असे म्हटले की, इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून शिकवण घेतली पाहिजे व ग्रामीण विकासाच्या प्रगतीसाठी त्यांचे अनुकरण केले पाहिजे.
परंतु मे महिन्यामध्ये गुजरात दौऱ्यावर असताना, अण्णांनी त्यांचे मत पूर्णपणे बदलून टाकले व मोदींवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्याची टीका अण्णांनी केली.
त्यांनी मोदींना लोकायुक्त नियुक्त करण्याचे आवाहन सुद्धा केले व मीडियाने व्यावसायिक गुजरातची चुकीची प्रतिमा मांडल्याचे स्पष्ट केले गेले. यानंतर अण्णांनी मोदी हे पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार नसल्याचे, सुद्धा मीडियासमोर स्पष्टपणे बोलले.
भ्रष्टाचाराचे आरोप
२००३ सप्टेंबरच्या दरम्याने न्यायमूर्ती पीबी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र सरकारने एक “चौकशी आयोग स्थापन” केला. ज्यामध्ये अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली, हिंद स्वराज्य ट्रस्ट व अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लादण्यात आले.
या चौकशी आयोगाने दि. २२ फेब्रुवारी २००५ च्या दरम्याने आपला तपास अहवाल तपशिलरित्या सरकार समोर सादर केला. ज्यामध्ये ट्रस्टवर अण्णांच्या वाढदिवसाच्या उत्सवासाठी पैसे वापरल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला.
मुस्लिम विरोधी असल्याचा आरोप
दिनांक. २२ ऑगस्ट २०११ मध्ये लेखिका व अभिनेत्री अरुंधती रॉय यांनी एका वृत्तपत्राच्या माध्यमाने, अण्णा हजारे यांच्यावर धर्मनिरपेक्षण असल्याचा आरोप केला होता. जामा मशिदीचे मुस्लिम बुखारी यांनी अण्णा हजारे यांच्यावर मुसलमानांच्या विरोधात काम केल्याचा आरोप करून त्यांना वादा अडकवले होते.
दलित विरोधी आणि लोकशाही विरोधी असल्याचा आरोप
कोलकत्ता टेलिग्राफ मध्ये रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या लेखांमध्ये असे बोलले गेले की, पर्यावरण पत्रकार मुकुल शर्मा यांनी असे सांगितले आहे की, अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धीतील दलित कुटुंबांना शाहकारी आहार घेण्यासाठी भाग पाडले. त्यामुळे अण्णा हजारे यांच्या सूचनेवरून गेल्या दोन दशकांपासून गावात पंचायतीची कोणतीही निवडणूक करण्यात आलेली नाही.
हजारे यांच्या हत्येचा कट
अण्णा हजारे यांनी राज्यातील सहकारी कारखान्यांमधील, भ्रष्टाचार उघडकीस आणून त्यातील खासदार डॉक्टर पद्यसिंह बाजीराव पाटील, यांच्यासह अनेक मोठ्या नेत्यांचाही सहभाग असल्याचे मीडियासमोर सांगितले.
यानंतर अण्णांच्या हत्येची सुपारी दिली गेली, अशी चर्चा सर्वत्र चालू झाली. परंतु नंतर गुन्हेगार पकडला गेला व त्यांनीच नेत्यांची नावे सांगितली.
यानंतर अण्णा हजारे यांनी पाटील यांच्या विरोधात, स्वतंत्र एफ आय आर सुद्धा दाखल केला होता. त्यावरचा निर्णय अद्याप कोर्टात चालू आहे. तेव्हापासून अण्णा हजारे यांना झेड प्लस सुरक्षा महाराष्ट्र सरकारने पुरवली होती.
अण्णा हजारे यांचे मौल्यवान विचार
- लोकपाल स्थापन करण्याची प्रभावी इच्छाशक्ती सरकारकडे नाही.
- स्वातंत्र्यापूर्वीची लूट, दूर व्यवस्था आणि भ्रष्टाचार आजही समाजात आहे.
- जे लोक स्वार्थापोटी फक्त स्वतःसाठी जगतात आणि फक्त स्वतःचाच विचार करतात, ते समाजासाठी मेलेले आहेत.
- सरकारी पैसा हा जनतेचा पैसा आहे. हा पैसा जनतेसाठीच वापरला गेला पाहिजे. सरकारने जनतेसाठी प्रभावी धोरणे बनवून, त्यांचा फायदा करून देण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे.
- मी माझ्या देशातील जनतेला असे आवाहन करतो की, भ्रष्टाचार विरुद्धची ही क्रांती तुम्ही नेहमीच अशी तेवत ठेवा. मी असो वा नसो, तरीही तुम्ही हा लढा सुरूच ठेवला पाहिजे आणि अन्यायाला कडाडून विरोध केला पाहिजे.
- लोकपाल विधेयकाची माझी मागणी कधीही बदलणार नाही. तुम्ही माझे मुंडके जरी कापले, तरी तुम्ही मला कोणत्याही अवस्थेमध्ये झुकायला भाग पाडू शकत नाही.
- देशाच्या स्वातंत्र्यासाठी, लाखो लोकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले पण काही लोकांनी या बलिदानाचा सन्मान केला नाही. आणि काही स्वार्थी लोकांमुळे आपल्याला खरे स्वातंत्र्य अजूनही प्राप्त झाले नाही.
अण्णा हजारे यांचा व्हिडीओ
अण्णा हजारे यांच्या बद्दल काही मनोरंजक तथ्ये
- अण्णा हजारे यांना १९९० मध्ये केंद्र सरकारने “पद्यश्री” पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- १९६२ च्या भारत पाकिस्तान युद्धानंतर अण्णा हजारे यांनी १९६३ मध्ये भारतीय सैन्यात सेवा देण्याचे कार्य सुरू केले. ज्या ठिकाणी ते एका ट्रकचे चालक म्हणून काम करत असत.
- अण्णा हजारे यांचे वडील, बाबुराव हजारे हे आयुर्वेद आश्रम फार्मसी मध्ये मजूर म्हणून काम करत असत.
- अण्णा हजारे यांनी त्यांच्या व्यवसायाची सुरुवात मुंबईमधील दादर रेल्वे स्थानकावर फुल विकून केली. यानंतर त्यांनी यशाची पातळी गाठत दादर शहरांमध्ये दोन फुलांची दुकाने उघडली.
- १९९२ मध्ये भारत सरकारने अण्णा हजारे यांना “पद्यभूषण” पुरस्कार देऊन सन्मानित केले.
- अण्णांनी १९९१ मध्ये भ्रष्टाचार विरुद्ध, आवाज उठवण्यासाठी राळेगणसिद्धी या ठिकाणी जन आंदोलन चळवळ सुरू केले.
FAQ
१. अण्णा हजारे यांचा जन्म कधी झाला ?
बाबुराव हजारे यांच्या घरी अण्णा हजारे यांचा जन्म दि. १५ जून १९३६ रोजी झाला.
२. कोण आहेत अण्णा हजारे ?
अण्णा हजारे हे नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेत आहे. ते एक भारतीय समाजसेवक आहेत. ग्रामीण विकास करण्यासाठी, सरकारी कामकाज स्वच्छ बनवण्यासाठी, जनतेची सेवा करण्यासाठी व भ्रष्टाचारांची चौकशी करण्यासाठी, त्यांना योग्य शिक्षा करण्यासाठी प्रमुख नेते, म्हणून अण्णा हजारे यांच्याकडे पाहिले जाते.
अण्णा हजारे सामाजिक चळवळीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
अण्णा हजारे यांनी 5 एप्रिल 2011 पासून भ्रष्टाचारविरोधी नवी दिल्लीतील जंतरमंतर स्मारकावर उपोषण सुरू केले तेव्हापासून या आंदोलनाला गती मिळाली. जनलोकपाल विधेयक सादर करून भारत सरकारमधील भ्रष्टाचार कमी करण्याचा या चळवळीचा उद्देश होता.
अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव काय आहे?
हजारे यांचे पूर्ण नाव किसन बाबूराव हजारे ऊर्फ अण्णा हजारे असे आहे.
निष्कर्ष
मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणस अण्णा हजारे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्रपरिवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद .