बाजीप्रभू देशपांडे यांची माहिती Bajiprabhu Deshpande Information In Marathi

बाजीप्रभू देशपांडे हे महान व वीर योद्धा होते, स्वराज्यासाठी व रयतेच्या रक्षणासाठी श्रीमंत छत्रपती महाराजांच्या रक्षणाकरिता बाजींनी स्वतःच्या प्राणाचे बलिदान दिले. बाजींच्या रक्ताने घोडखिंड पावनखिंड म्हणून प्रसिद्ध झाली.

आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणास शूर बाजीप्रभू देशपांडे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख जाणून घेण्यासाठी खालील माहिती शेवट पर्यंत नक्की वाचा.

बाजीप्रभू देशपांडे यांची माहिती Bajiprabhu Deshpande Information In Marathi

नाव बाजीप्रभू देशपांडे
ओळख शूर बाजी प्रभू
जन्म तारीख इ. स १६१५
जन्म स्थळ भोर तालुका पुणे, मावळ प्रांत (महाराष्ट्र)
प्रसिद्ध लढाई पावनखिंड लढाई
पारंगत दाणपट्टा
वंशचंद्रसेनिया कायस्थ (प्रभू वंश)
धर्महिंदू सनातन
पदछत्रपती शिवाजी महाराज यांचे सरदार
मृत्यू १६६० इ.स.
मृत्यू स्थळ घोडखिंड, कोल्हापूर, महाराष्ट्र

कोण होते बाजीप्रभू देशपांडे ?

बाजीप्रभू देशपांडे हे एक मराठा साम्राज्याचे शूर योद्धा होते. घोडखिंडीतील लढाईत यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला व शिवाजी राजे विशाल गडापर्यंत पोहोचेपर्यंत शत्रू सैन्याला खिंडीत रोखून ठेवले.

हे वाचा –

बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढी जात देशपांडे होते. बाजीप्रभू देशपांडे हे हिरडस मावळचे वतनदार असणाऱ्या बांदलांचे दिवाण होते, परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य आणि शौर्य पाहून, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले. बाजीनी ही स्वराज्यासाठी आपली निष्ठा श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केली.

Bajiprabhu Deshpande Information In Marathi

बाजीप्रभू देशपांडे हे पराक्रमी लढवय्ये तर होतेच, तसेच ते त्यागी, स्वामीनिष्ठ, करारी, कोणत्याही आमिषाला बळी न पडणारे, असे होते. सिद्धी जोहरने पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्यातून सुटण्यासाठी, महाराजांना घेऊन बाजी विशाल गडाकडे निघाले.

बाजीप्रभू देशपांडे हे बांदल यांचे सरदार होते. राजाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि सुमारे ६०० बांदल मावळे यावेळी महाराजांच्या समावेत होते. त्यावेळी आपली फसवणूक झाली हे लक्षात येऊन, विजापुरी सैन्य त्यांचा पाठलाग करीत होते.

पुढचा धोका लक्षात घेऊनच, वडीलकिच्या अधिकाराने, बाजींनी महाराजांना विशाल गडाकडे पुढे जाण्यास सांगितले. बाजी व फुलाजी हे दोघे बंधू गजापूरच्या खिंडीत सिद्धीच्या सैन्यासाठी महाकाल म्हणून उभे राहिले.

हजारोंच्या सैन्याला तीनशे मराठी मावळे रोखले होते. सतत २१ तास चालून, शरीर थकलेल्या स्थितीत असतानाही बाजी आणि त्याच्या मावळ्यांनी मोठ्या हिमतीने सहा ते सात तास खिंड लढविली, आणि पराक्रमाची शर्थ केली.

ही खिंड कोल्हापूर जिल्ह्यात आहे. सिद्धी मसूचे सैन्य अडविताना कामी आलेले मराठी मावळे धारातीर्थी पडलेले. बंधू फुलाजी जखमी झालेले, स्वतःचे शरीर या कशाचेही भान बाजींना नव्हते. महाराज विशाल गडावर सुखरूप पोहोचले, याचा इशारा देणाऱ्या तोफेचे आवाजाकडे त्यांचे कान होते.

तोफांचा आवाज ऐके पर्यंत ते दोन्ही हातात तलवार घेऊन, प्राणाची बाजी लावून लढत होते. खिंडीमध्ये महादेवाचा महारुद्र अवतार प्रकटलेला होता. तोफांचे आवाज ऐकल्यावर, कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने त्यांनी प्राण सोडले. ही घटना दिनांक दि. १३ जुलै १६६० रोजी घडली.

मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्य निष्ठांच्या पवित्र रक्ताने, घोडखिंड पावन झाली. म्हणूनच तिचे नाव पावनखिंड झाले. बाजी, फुलाजी बंधूंवर विशाल गडावर महाराजांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

बाजीप्रभू देशपांडे व फुलाजी यांची समाधी विशाल गडावर आहे. तसेच पन्हाळगडावर बाजीप्रभूंचा पूर्ण कृती पुतळा उभारण्यात आलेला आहे. घोडखिंडीचा लढा आणि बाजीप्रभू देशपांडे यांची स्वमिनिष्ठ्तेची कथा मराठ्यांच्या जनमानसावर शेकडो वर्षे अधिराज्य गाजवत आहे.

Bajiprabhu Deshpande

बाजीप्रभूंचे बालपण, बाजींच्या वाढत्या वयाबरोबर बाजीप्रभूंचा वाढता धाक आणि दरारा

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील वांगणी या गावातील श्री मळाईदेवी ही बाजीप्रभूंच्या घराण्याची कुलस्वामिनी. भोरपासून तीन मैलावरचे हिरडस मावळातील शिंद हे छोटेसे गा.व विंध्य प्रभूंचे नातू वैद्य प्रभू मोठे कर्तबगार व्यक्तिमत्व, हिरडस मावळातल्या रोहित खोऱ्यातल्या ५३ गावचे वतन वैद्य प्रभुंना त्यांच्या कर्तबदारी पाहून, बिदरच्या मिरच्या आदिलशाने बहाल केले होते.

या ५३ गावांपैकी शिंद हे ठिकाण वैद्य प्रभूंचे वास्तव्याचे ठिकाण होते. अशा वैद्य प्रभुंना एक पुत्र होता त्यांचे नाव पिलाजी प्रभू, पिलाजी प्रभू वडिलांप्रमाणेच कर्तबगार. निजामशाहीत असताना त्यांनी निजामशाहीच्या वतीने अनेक युद्धात भाग घेतला होता. निजामशाही आणखी एका मातब्बर सरदार बिलास यांच्यावर माया करत होता, त्या वीर योद्धाचे नाव होते, शहाजीराजे भोसले.

शहाजीराजे, पिलाजी प्रभूंची, कर्तबदारी ओळखून होते, त्या दोघांचे एकमेकांशी अत्यंत जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध होते. पिलाजी प्रभुंना दोन मुले होती. एकाचे नाव बाळाजी प्रभू तर दुसऱ्याचे नाव कृष्णाजी प्रभू. हे दोघेही वडिलांप्रमाणे पराक्रमी होते. कृष्णाजी प्रभुंना पत्नी बयो बाई साहेबांपासून चार पुत्र झाली. पहिले वालोजी दुसरे अनाजी तिसरे फुलाजी आणि चौथे बाजी बाजीप्रभू देशपांडे.

आपला नातूबाजी शस्त्रविद्यात पारंगत झाला पाहिजे, असे आजोबा पिलाजी प्रभुंना नेहमी वाटेल. म्हणून त्यांनी रानोजी बांदल यांना दांडपट्ट्याचे शिक्षण बाजींना देण्यासाठी, बोलावले.

बाजीप्रभू देशपांडे

बाजीप्रभू देशपांडे हळूहळू भालाफेक, विटा चालवणे, खंजीर वरची जांभिया, अशा अनेक प्रकारची शस्त्रे चालवण्यात पारंगत झाले. दाणपट्टा चालवणे आणि विटा चालवणे याबाबतीत तर उभ्या मावळ पट्ट्यात बाजींचा हात धरणारा कोणीच नव्हता.

कुस्तीच्या पाडातही त्यांचा दरारा होता. पिलाजी अद्याप राजकारणात होते, त्यांच्या समवेत त्यांची मुले आणि नातू भक्कमपणे त्यांच्या पाठीशी होते. अद्याप रोहित खोरे हिरडस मावळ यामधील देशमुखांच्या आपापसातील झुंजी कमी झालेल्या नव्हत्या, कृष्णाजी बांदल रोहित खोऱ्यातला दांडगाही करणारा एक बलाढ्य देशमुख.

तो स्वतः रोहित खोऱ्याचा मी राजा आहे, अशा तोऱ्यात वावरायचा, त्याचे कोणाशीच पटत नव्हते, रोहित खोऱ्याला लागूनच हिरडस मावळ, त्या मावळमध्ये आणखी एक बलाढ्य देशमुख, रायरेश्वराच्या परिसरात राहत होता.

नाईकजी जेथे, कान्होजी जेधे, या बांदल आणि जेथे यांच्यात वारंवार छोटी मोठी युद्ध होत, त्यांच्या वतनाच्या सीमा एकमेकांना लागूनच होत्या, या साऱ्या घटना आणि हकीकती शिवाजी राजांच्या आणि मासाहेबांच्या कानावर जात होत्या, राजे या घटना ऐकून खिन्न होत असत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे, हे कुठेतरी बंद झालं पाहिजे, असा विचार राजांचा मनात यायचा.

कृष्णाजी बांदलांकडे दिवाण म्हणून असणारे बाजीप्रभू स्वराज्यात कसे आले ?

राजांच्या कानावर एक बातमी आली की, कृष्णाजी बांदलांनी अचानक देशपांडे यांच्या वतनातील गावातून वसुली कार्यालय सुरुवात केली. देशपांडे यांच्या काही वतनी गावातील, उत्पन्नात कृष्णाजीने वाटा मागितला, पिलाजी प्रभूंनी तो देण्याचे नाकारले, मग बांदल देशपांडे यांच्यात जोरदार युद्ध झाले.

बाजीप्रभू देशपांडे

महापराक्रमी पिलाजी प्रभू आणि रोहित खोऱ्यातला ढाण्या वाघ कृष्णाजी बांदल, एकमेकांसमोर ठाकले आणि त्यांच्यात युद्ध सुरू झाले. दोघेही महापराक्रमी, कोणी कोणाला आडवेना, पिलाजी प्रभू या युद्धात अनेक जखमा होऊन मृत्यू पावले.

एवढ्यावरच ही आपापसातील झुंज थांबली नाही, बाजीप्रभूंची एक बंधू अण्णाजी प्रभू या युद्धात कामी आले, बांदल देशपांडे यांच्या युद्धात देशपांडे यांचे दोन बलाढ्य महापुरुष या रणांगणात बळी गेले.

खुद्द बाजींच्या अंगावर तीस-पस्तीस जखमा झाल्या होत्या, या भांडणाचे पडसाद सर्वत्र उमटले. विजापूर दरबारला ही समजले, या मावळ मधील झुंजीचा फायदा शिवाजी महाराज घेतील, हे विजापूरच्या लक्षात आले.

त्यांनी या दोघांनाही बोलावून दम दिला. तुमची वतने जप्त करू, असे सांगितले आणि इथून पुढे बांदल हे रोहित खोऱ्याचे राज्यात राहतील, पण त्यांनी राज्यकारभार देशपांडे प्रभूंच्या सल्ल्याने करावा. देशपांडे बांदलांचे दिवाण म्हणून कारभारी म्हणून काम करतील, असा दोघांच्या समजवता घडवून आणला आणि रोहित खोऱ्याचे राजे बांदल यांचे बाजीप्रभू दिवाण झाले.

बाजींच्या सारखा महापराक्रमी पुरुष बांदलांचा प्रमुख बनला. त्यामुळे बांदलांचे बळ वाढले. बांदलांच्या मनात देशपांडे यांचा पराभव करायचा, हे होतेच. कृष्णाजी बांदलांनी बाजींच्या साथीने जेथे आणि बांदलांच्या मधील अखेरचे युद्ध जिंकले.

आता बांदलांचे पान बाजींच्या शिवाय हलत नव्हते, बांदलांचा बाजींवर प्रचंड विश्वास बसला. त्यांच्यात अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले, बाजी म्हणतील ती पूर्व दिशा, इतका बाजींच्यावर बांदलांचा विश्वास बसला.

कृष्णाजींचा मुलगा बाजी बांदल बाजीप्रभूंचा उजवा हात. बाजीप्रभू कृष्णाजी बांदल यांचे दिवाण झाले आणि मावळचा कारभार नीट सुरू झाला. तरीपण कृष्णाजी बांदलांचा शिरजोर्पणा काही कमी होत नव्हता.

आता कृष्णाजी बांदलांनी गुंजन मावळात दांडगाही करायला सुरुवात केली. हे वागणे शिवाजी राजांना आवडले नाही, तो शिवाजी राजांवरच गुरगुरयला लागला. पण राजे शांत आणि संयमी होते. त्यांनी कृष्णाजिला नेहमी समजावून सांगितले.

काही झाले तरी बांदल आपले आहेत, बाजीप्रभू आपले आहेत, त्यांना आपले करावे. स्वराज्याच्या कामे लावावे, अशी राजांची इच्छा होती. परंतु राजांचा विचार बांदलांच्या डोक्यात शिरेना.

तरीसुद्धा राजांनी शेवटचा प्रयत्न करून पाहायचे ठरवले, बांदल सन्मानाने आपल्याकडे यावेत, म्हणून बांदलांशी समिट करण्यासाठी पंत दादोजी कोंडदेवांना राजांनी बांदलांकडे पाठवले.

पण त्यांनी कृष्णाजीला परोपरिने समजावून सांगितले, राजांच्या वाढत्या सामर्थ्याची कृष्णाजीला कल्पना दिली. परंतु आम्ही पिढ्यान पिढ्यांचे रोहित खोऱ्यातले राजे आहोत, आमचे कोण काय करणार आहे ? अशा थाटातच बांदल वागले.

दादोजी कोंडदेव यांच्या घोड्याच्या शेपट्या कृष्णाजीने कापल्या आणि राजांचा अपमान केला. ही गोष्ट राजांच्या कानावर गेल्यावर, ते चिडले आणि त्यांनी पंतांना आज्ञा दिली की, कृष्णाजी बांदलाना बेड्या लाऊन धरून आणा. त्याला जेरबंद करा.

यावेळी राजे सिंहगडावर होते, राजांनी त्याला कोणतीही दयामाया न दाखवता, त्याचा चौरंग करण्याची सजा फरमावली.

बांदलांचे दिवाण बाजीप्रभू मात्र या प्रकाराने संतापले, शिवरायांना बाजीप्रभूंची भेट घेऊन त्यांना स्वराज्य निर्मितीचे हाती घेतलेले कार्य समजावून, त्यांना स्वराज्य कार्यात सामील करून घ्यावे, अशी इच्छा राजांना होती.

त्यानुसार राजाने आपल्या साथीदारांसोबत शिंद येथे जाऊन बाजींची भेट घेतली. बाजींना स्वराज्याचा मनसुबा सांगून, त्यांना स्वराज्यात सामील करून घेतले. बाजींना स्वराज्याच्या पायदळाचे प्रमुख धारकरी म्हणून नेमले.

बाजीप्रभू देशपांडे एकटेच स्वराज्यात न येता, बांदलांचे ही मन वळवून त्यांना स्वराज्यात आणले. बाजी बांदलांकडे असलेला रोहित किल्ला आता स्वराज्यात आला. राजांनी त्याचे नाव विचित्रगड असे ठेवले.

बाजीप्रभूंचे अमूल्य योगदान स्वराज्यासाठी कसे राहिलेले आहे ?

बाजींचा आणि राजांचा स्वराज्याचा कामी संपर्क वाढला, बाजींनी आणि बांदलांनी प्रतापगड युद्धात पराक्रम गाजवला. पन्हाळगडाला सिद्धी जोहरचा वेढा पडल्यामुळे, शिवाजीराजे पन्हाळ्यात अडकून पडले होते.

त्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी राजांनी बाजीप्रभू देशपांडे सोबत गडाबाहेर पडण्याची योजना आखली. त्यानुसार राजांना मावळ्यांनी सुरक्षित बाहेर काढले.

विशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या गजापूरच्या खिंडीत बाजींनी गाजवलेल्या पराक्रम आपणा सर्वांनाच माहित आहे. बाजींनी स्वतःच्या प्राण्यांचे बलिदान दिल्याने, राजे सुरक्षित गडावर पोहोचण्यात यशस्वी झाले.

शिवराय प्रतापगडाच्या कामगिरीमुळे कान्होजी जेथे व त्यांच्या साथीदारांवर खुश होते. तसेच पन्हाळ्याच्या कामगिरीमुळे मावळ्या वीरांवर खुश होते.

अत्यंत कठीण आणीबाणी सडे, चिकणे, विचारी, धुमाळ, माने, आणि मोठ्या संख्येने बांदलांनी बलिदान देऊन, महाराजांचे प्राण वाचवले. त्यामुळे बाजीप्रभूंनी दिलेल्या बलिदानाचे सार्थक झाले. या दोन्ही यशस्वी मोहिमा, आटपून महाराज सैन्यासह राजगडावर आले.

शिवरायांना बाजीप्रभूंचा वाटणारा आधार  

स्वराज्यासाठी शौर्य गाजवणाऱ्या मावळ्यांचे कौतुक करण्यासाठी, महाराजांनी राजगडावर सर्व सरदार, शिलेदार आणि मावळ्यांची सभा भरवली. कान्होजी जेथे यांना देऊ केलेले, दरबारातील मानाचे पहिले पान महाराजांनी बांदल यांना दिले. राजगडावरील विजयी सभा आटोपली.

स्वराज्य बळकट करण्यासाठी, प्राण्यांचे बलिदान देणाऱ्या हिरड्यास रोहित खोऱ्यातील वीर मावळ्यांच्या घरी जाऊन, शिवरायांनी त्यांच्या आई, वडील, पत्नी आणि मुलांचे सांत्वन केले. त्यांना साडीचोळी, पोशाख, बक्षीस, दिली. शिंद येथे जाऊन महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांच्या कुटुंबांचे सांत्वन केले.

बाजींच्या सर्व मुलांना स्वराज्यात सामील करून घेतले. कृष्णाजी बांदल यांच्या वीर पत्नी दीपाबाई बांदल यांचे सांत्वन करून, त्यांच्याकडे हिरडस मावळ्याच्या देशमुखीची सनद दिली.

बाजीप्रभूंच्या वैयक्तिक कुटुंबाबद्दल माहिती

बाजीप्रभूंचा वैयक्तिक संसार मोठा होता. बाजींना दोन पत्नी होत्या. पहिली सोनाई आणि दुसरी गौतमाई आहे.

पहिल्या पत्नीपासून बाजीप्रभू देशपांडेना महादजी, मोराजी आणि रामजी, तर दुसऱ्या पत्नीपासून येसाजी, भावजी, हिरोजी, विसाजी आणि मताजी असे आठ पुत्र होते.

पावनखिंड लढाई – ऐतिहासिक कथा

 • छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावर सिद्धीच्या कैदेत अडकले होते. तेथून कसं सुटावं, याचाच महाराज विचार करत होते. पौर्णिमेची रात्र होती. चंद्रप्रकाश असून सुद्धा, पावसाळी ढगामुळे फारसं काही दिसत नव्हत. प्रचंड पाऊस सुरू होता, पावसाचा फायदा घेऊन, शिवराय पन्हाळगडावरून निसटले. शिवरायांच्या जागी शिवा काशिद नावाचा एक जिगरबाज मावळा सिद्धीच्या भेटीसाठी गेला, पण सिद्धीला संशय आला. हे शिवराय नाही, त्याने शिवा काशीद यांना क्रूरपणे ठार मारले.
 • छत्रपती शिवाजी महाराज आपल्या हातातून निसटले, हे सिद्धीच्या लक्षात आल्याबरोबर, त्याने सिद्धी मसूद आणि फजर खानाला शिवरायांच्या मागावर पाठवले. पाठलाग सुरू झाला, शिवाजी राजे पालखीचा गोंडा पकडून बसले होते. बाजींचा आवाज त्यांच्या कानावर येत होता. दर दहा मिनिटांनी पालखीचे भोई बदलत होते. पावसाची तमाल न बाळगता, काटेरी रान आणि चिखल माती तुडवत ६०० वीर मावळे विजेच्या वेगाने पळत सुटले होते. उद्दिष्ट एकच होता. विशालगड.
 • हातात नंग्यात तलवारी घेऊन, बाजीप्रभू, फुलाजी, पालखीच्या बाजूने धावत होते. प्रचंड वेगाने पालखी घोडखिंडीकडे पळवली जात होती. क्षण आणि क्षण महत्वाचा होता. सिद्धी मसूदचे सैन्य घोड्यावरून राजांचा पाठलाग करत होते. त्यांनी थोडा वेगळा मार्ग निवडला अर्थात घोडखिंडीच्या अलीकडेच राजांना गाठायचे असे त्यांनी पक्के केले होते.
 • त्यांच्या थोडे मागून आदिलशहाच्या स्पीडनायकाचे पायदळी येत होते. राजांचे पहिले लक्ष होते, पांढरपाणी. एकदा तिथे पोहोचल्यावर घोडखिंड गाठणे, अवघड जाणार नव्हते. आदल्या दिवशी दहा वाजता पन्हाळगड सोडल्यापासून, तब्बल बारा तासांमध्ये कोणीही विश्रांतीसाठी थांबले नव्हते. एक ध्येय समोर ठेवून, सहाशे वीर मावळे विशाल गडाच्या दिशेने पळत सुटले होते. पन्हाळगड ते पावनखिंड एकूण अंतर आहे ६१ किलोमीटर तर पन्हाळगडापासून ५५ किलोमीटर अंतरावरती पावनखिंडीच्या सहा किलोमीटर आधी पांढरपाणी आहे.
 • महाराज पांढरपाणीला येऊन पोहोचले होते. त्यावेळी घोड्यावरून राजांचा पाठलाग करणारे, सिद्धी मसूदचे सैन्य अगदी जवळ येऊन, ठेपले होते. धोका वाढत चालला होता. कुठल्याही क्षणी त्यांची धाड पडेल, असं वातावरण झालं होतं. शत्रूला गुंतवायला राजांनी २५ मावळे पांढरपाणीला ठेवले आणि घोडखिंडीच्या दिशेने निघाले. अवघे २५  मावळे लढायला सज्ज झाले. जास्तीत जास्त वेळ शत्रूला रोखून धरायचं, हेच काम त्यांना पार पाडावे लागणार होतं. त्या बहुमूल्य वेळात राजांना घोडखिंडीकडे जायला मिळणार होत. आलेल्या घोडदळाला त्या २५ मावळ्यांनी शर्थीने रोखून धरलं. सगळेच्या सगळे मावळे मारले गेले. पण त्यांनी एकही घोडेस्वाराला पुढे सरकू दिला नाही. महाराजांनी आपल्यावर सोपवलेलं काम त्यांनी चौक पार पाडलं होतं.
 • पांढरपाणीची नदी रक्ताने लाल झाली होती. तोपर्यंत राजे घोडखिंडीत येऊन पोहोचले होते. महाराजांनी रायाची बांदलाना ३०० बांदल मावळे सोबत घेऊन खिंडीमध्ये शत्रूला रोखण्याचे काम दिले. परंतु त्याच वेळी बाजीप्रभू म्हणाले राजे हे जबाबदारी माझ्यावर सोपवा आणि तुम्ही इथून निघा.. विशालगड गाठा जोपर्यंत हा बाजी जिवंत आहे, तोपर्यंत एकाही गनिमाला पुढे सरकू देणार नाही. तुम्ही तात्काळ विशाल गड गाठा आणि विशाल गडावर सही सलामत पोहोचल्या नंतर, तोफांचे तीन बार उडवा म्हणजे आमच्या लक्षात येईल, राजे गडावर सुखरूप पोहोचले.
 • बाजीप्रभू देशपांडेची स्वामीनिष्ठ पाहून, राजांना भरून आले. आता उरलेले मावळे सोबत घेऊन, राजे विशाल गडाच्या दिशेने निघाले. बाजीनी खिंडीमध्ये योजना केली, चढणीवरच्या आणि आसपासच्या झाडीमध्ये गटागटांना मावळे तैनात केले. प्रत्येक मावळ्याकडे गोपणीतून शिलाखंड जमा केले गेले, शत्रू तैनीत येण्याची आता वाट पाहत सगळे मावळे लपवून बसले. नंतर सुद्धा मावळ्यांना विश्राम नव्हता. नी एक लढाईसाठी ते तीनशे वीर सज्ज झाले होते.
 • पूर्वेच्या दिशेने घोड्याच्या टापांचे आवाज हळूहळू ऐकू येऊ लागले. थोड्याच वेळात शत्रू नजरेत येऊ लागला. परंतु शत्रूला लपलेले मावळे मात्र दिसत नव्हते. त्या अवघड वाटेने, एक एक रांग धरून सिद्धी मसूदचे घोडेस्वार खिंड उतरू लागले. गोपनेच्या टप्प्यामध्ये शत्रू आल्याबरोबर, बाजूने एकच ललकार दिला. हर हर महादेव चा गजर झाला. अचानक शत्रूच्या अंगावर दगड बसू लागले, घोड्यांनी कच खाल्ली. काही घोडे अचानक उधळले, तर काही माघारी सरकले. एकच गोंधळ उडाला. कीतीकांची डोके फुटली, तर अनेक जण जिवाच्या मागे पळत सुटले.
 • मावळ्यांनी हर हर महादेव चा नारा दिला. पण शत्रू सैन्य इतक्यात मागे हटणार नव्हतं, घोडेस्वार कोणापुढे आले, मावळ्यांनी पुन्हा एकदा दगडांचा मारा सुरू केला. शत्रूला काही केल्या मावळे पुढे सरकू देणार नव्हते, साधारणतः चार वाजता आले होते. पाठीमागून येणाऱ्या आदिलशाही स्पीड नायकाचे पायदळ आता खिंडीच्या जवळ आले होते. ते अधिक वेगाने पुण्याच्या पलीकडे सरकू लागले होते. आता मात्र मावळ्यांनी त्यांच्या अंगावरती दगडी शिरा ढकल्या. त्यामुळे पायदळा मध्ये गोंधळ उडाला.
 • अखेर तासाभराने वर पोहोचण्यात यश आले. त्या क्षणी आजूबाजूच्या झाडा झुडपामधून बाजीप्रभू देशपांडे आणि इतर मावळे बाहेर पडले. तलवारीची लढाई सुरू झाली. आपला एक एक मावळा शंभराला भारी पडत होता. बाजीप्रभूंच्या तलवारीच्या टप्प्यात, येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा मस्तक वरचेवर उडवला जात होता.
 • छत्रपती शिवरायांना वाचवण्यासाठी स्वतःच्या देहाची तटबंदी करून, बाजीप्रभू देशपांडे शत्रूसमोर उभे होते. बाजीचे थोरले बंधू कान्होजी प्रभू सुद्धा तितक्याच वेगाने लढत होते. कान्होजी खाली कोसळले, त्यांच्या हातातून तलवार खाली पडली. त्या क्षणी बाजींनी त्यांच्याकडे नजर फिरवली, त्यांच्या हातातील तलवार उचलली आणि एका हातामध्ये ढाल आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार घेऊन, लढणारे बाजीप्रभू आता दोन्ही हातामध्ये तलवार घेऊन, शत्रूच्या समोर उभे राहिले. त्यांचा वीर अवतार पाहून शत्रूला घाम फुटत होता. बाजी प्रभू आता अधिक क्रोधात लढत होते. जोपर्यंत शिवराय विशालगडावर पोहोचत नाहीत, तोपर्यंत बाजीप्रभू समोर खंबीरपणे उभे राहिले. बाजीप्रभूंच्या सर्वांगावर तलवारीचे वार झाले होते, त्यांच्या शरीरातून रक्ताचे थेंब उगळत होते. बाजीप्रभूंच्या समोर येणाऱ्या प्रत्येक शत्रूचा मस्तक उडवला जात होता. परंतु बाजीप्रभूंच्या शरीरावर देखील असंख्य वार झाले होते.
 • त्या जखमांनी बाजीप्रभू देशपांडे लढता लढता खाली कोसळले. पण काही केल्या त्यांचे प्राण जात नव्हते. त्यांचे कान मात्र विशालगडाकडे लागले होते, जोपर्यंत तोफेचे आवाज ऐकू येत नाही, तोपर्यंत हा बाजीप्रभू स्वतःचे प्राण काही केल्यास सोडणार नाही. तिकडे विशाल गडाच्या वाटेवर, असणाऱ्या राजांच्या मनाची घालमेल सुरू होती. घोडखिंडीत काय सुरू असेल, याचा राजांना पुरेपूर अंदाज होता.
 • राजे विशाल गडाच्या जवळ आले, परंतु त्यावेळी विशाल गडाला सुर्वे आणि दळवी या आदिलशाहीच्या वतनदारांनी वेढा घातला होता. शिवरायांच्या सोबत असणाऱ्या मावळ्यांनी त्यांचं सैन्य कापून काढलं आणि विशाल गडावर प्रवेश मिळवला. विशाल गडावर पोहोचतात राजांनी तोफांचे बार उडवायला सांगितले. विशाल गडावर तोफांचा आवाज थेट घोडखिंडीत ऐकू येत होता. तो आवाज रक्ताच्या चारोळ्यात पडलेल्या बाजी प्रभूंच्या कानावर गेला आणि मगच राजे सुखरूप विशालगडावर पोहोचले, म्हणून बाजीप्रभूंनी देह ठेवला.
 • घोडखिंड बाजी प्रभूंच्या रक्तांन पावन झाली. छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाल गडावर पोहोचावे, यासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि तीनशे बांदल मावळ्यांनी घोडखिंडीत स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून, रयतेच्या छत्रपतीना वाचवले. महाराष्ट्राच्या मातीसाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणाऱ्या अशा अनेक शूरवीर मावळ्यांना आमचा मानाचा मुजरा.

FAQ

१. बाजीप्रभू देशपांडे यांचे काय झाले?

घोडखिंड बाजीप्रभूंच्या रक्तांन पावन झाली. छत्रपती शिवाजी महाराज सुखरूप विशाल गडावर पोहोचावे, यासाठी बाजीप्रभू देशपांडे आणि तीनशे बांदल मावळ्यांनी घोडखिंडीत स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून, रयतेच्या छत्रपतीना वाचवले.

२. बाजीप्रभू देशपांडे यांचे पुत्र कोण होते?

बाजीप्रभूंचा वैयक्तिक संसार मोठा होता. बाजींना दोन पत्नी होत्या. पहिली सोनाई आणि दुसरी गौतमाई आहे. पहिल्या पत्नीपासून बाजींना महादजी, मोराजी आणि रामजी, तर दुसऱ्या पत्नीपासून येसाजी, भावजी, हिरोजी, विसाजी आणि मताजी असे आठ पुत्र होते.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास पावन खिंड योद्धा बाजी प्रभू देशपांडे यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा, धन्यवाद.

Leave a comment