मीराबाई चानू माहिती मराठी Mirabai Chanu Information In Marathi

आज आपण अश्या स्त्री शक्ती बद्दल जाणून घेणार आहोत, जिने टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदकाची कमाई केली आणि मणिपूरची ही कन्या देशाची नायक ठरली. भारतात दाखल होताच तिचे जंगी स्वागत झालं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक राजकारणांनी, सोशल मीडियावर तिच अभिनंदन केलं. क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी तर शाही सोहळ्याचा आयोजन केलं, अशा भारताच्या शान असणाऱ्या मीराबाई चानू यांच्या कर्तुत्वाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख शेवट पर्यंत वाचा.

Table of Contents

मीराबाई चानू माहिती मराठी Mirabai Chanu Information In Marathi

पूर्ण नाव साईखोम मीराबाई चानू
जन्म तारीख दि. ०८ ऑगस्ट १९९४
जन्म स्थळ इंफाळ, मणिपूर (भारत)
आईचे नावसायखोम ओंगबी टॉम्बी लिमा
वडिलांचे नावसाईखोम कृती मीती
भावंडसाईखोम संतोंबा मीतेई (भाऊ) आणि साईखोम रंगिता शाया (एकूण ६ भावंडे)
व्यवसाय खेळाडू
खेळ वजन उचलणे
प्रशिक्षककुंजराणी देवी आणि विजय शर्मा
छंदप्रवास करणे आणी संगीत
पदकसुवर्ण (अनाहिम, गोल्ड कोस्ट) आणि रौप्य पदक (ग्लासगो)
पुरस्कार पद्मश्री आणि राजीव गांधी खेलरत्न

मिराबाई चानूचा जन्म

मीराबाई चानू हिचा जन्म मणिपूर मधल्या एका छोट्याशा खेड्यात झाला. मीराबाई चानूचा जन्म दि. ०८ ऑगस्ट १९९४ मध्ये मणिपूर मधील इंफाळ गावामध्ये झाला. मीराबाईंचे प्राथमिक शिक्षण इंफाळमध्ये झाले.

Mirabai Chanu Information In Marathi

हे वाचा –

मीराबाई चानूची कौटुंबिक माहिती

मीराबाई चानूचा जन्म दि. ०८ ऑगस्ट १९९४ मध्ये मणिपूर राजधानी इंफाळ या ठिकाणी झाला. मीराबाईचे पूर्ण नाव साईखोम मीराबाई चानू आहे.

Mirabai Chanu family

मीराचा जन्म हा अतिशय सामान्य कुटुंबामध्ये झाला असून, मीराचे वडील साईखोम कृती हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कर्मचारी आहेत तर, त्यांची आई साईखोम ओंगबी टॉम्बी लीमा एक छोटे दुकान चालवते. मीराबाई चानू यांना सहा भावंडे आहेत. यात मीराबाई चानु सर्वात लहान आहेत.

मीराबाई चानूचे प्रशिक्षक

मीराबाई चानू यांच्यावरती वेटलिफ्टर कुंजुराणी देवी यांचा प्रचंड प्रभाव होता. कुंजुराणी देवी कडून प्रशिक्षण घेऊन, मीराबाईंनी वेटलिफ्टिंग मध्ये आपले करिअर करण्याचे ठरवले.

शारीरिक ठेवण

उंची ४ फूट ११ इंच
वजन ४८ किलोग्रॅम
डोळ्यांचा रंग काळा
रंग गोरा

मीराबाई चानूच्या वेटलिफ्टिंग करीयरची सुरुवात

लाकूड हे घरातलं मुख्य इंधन. मीराबाई लाकड आणण्यासाठी आपल्या भावंडां सोबत जायची. सहा भावंडांमध्ये मीराबाई सर्वात लहान, परंतु येताना सर्वात जास्त लाकडे घेऊन येत असे. मीराने आणलेली मोळी तिच्या मोठ्या भावांना सुद्धा उचलत नसे.

Mirabai Chanu

तिची आई चाणाक्ष होती. आपल्या मुलीला वेटलिफ्टर बनवावं अशी मीराच्या आईची इच्छा होती. पण मीराला मात्र तिरंदाज व्हायचं होत. परंतु ८ वी च्या पुस्तकात मीराने कुंजराणी देवी वरचा धडा वाचला आणि तिच्या जीवनाचे ध्येय ठरल वेटलिफ्टर व्हायचे.

नंतर खडतर प्रयत्न करत राज्य पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर, मीराने उत्तम चमक दाखवली. आशियाई गेम, कॉमनवेल्थ गेम जागतिक चाम्पियानशिप अश्या अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने सुवर्ण पदके जिंकली.

पण सर्वात महत्त्वाची स्पर्धा म्हणजे ऑलिंपिक. २०१५ च्या रीओ ऑलम्पिक मध्ये मीराने तीनही प्रयत्नांमध्ये ती वजन उचलण्यात ती अपयशी ठरली. मीराच्या करियरला लागलेला खरतर हा फार मोठा डाग होता.

२०१५ नंतर तिने अनेक पदक जिंकलेली असते तरी, रिओ मधील अपयशाची भरपाई झाली नव्हती. त्यातच तिला पाठीच्या दुखण्याचा जबरदस्त त्रास होऊ लागला. दोन-तीन दिवसातून एकदा सराव करूनही अशक्य झालं.

त्यातच covid चे संकट आलं. लॉकडाऊन मुळे प्रॅक्टिस ही पूर्णपणे बंद. करिअर संपणार की काय ? अशी सर्वांना धास्ती वाटत होती. परंतु केंद्र सरकारने ७१ लाख रुपये खर्च करून मीराबाईला ट्रेनिंग साठी ऑक्टोंबर २०२० मध्ये अमेरिकेत पाठवलं.

तिथल्या प्रशिक्षणाचे सुपरिणाम लवकरच दिसू लागले. दररोज सराव करणं शक्य होऊ लागलं. मिराबाईची जिद्द, चिकाटी पाहून तेथील प्रशिक्षक खूश झाले. पुन्हा एकदा मोठ्या परीक्षेचा दिवस उजाडला तो म्हणजे टोकियो  ऑलम्पिक.

यावेळी मीराबाई पूर्ण तयारीत होत्या, यावेळी रिओची पुनरावृत्ती घडणार नव्हती. मीराबाईने ४९ किलो गटामध्ये सहभाग दर्शवून, ११५ किलो वजन उचलून, नवीन ऑलिंपिक रेकॉर्ड केलं. आणि स्वतःला सिद्ध केल.

मीराबाई चानूच्या नावावर आत्तापर्यंत जिंकलेली पदके

 • २०१४ मध्ये मीराबाई यांना ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वप्रथम आंतरराष्ट्रीय यश प्राप्त झाले. या स्पर्धेमध्ये मीराने एकूण १७० किलो वजन उचलून रौप्य पदक स्वतःच्या नावे केले होते.
 • २०१८ मध्ये मीरा चानुने गोल्डकोस्ट गेम्स मध्ये वारणा पदक जिंकले होते.
 • २०२१ मध्ये ताश्कंद या ठिकाणी झालेल्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये मीराबाईने कांस्यपदक प्राप्त केले होते.
 • २०२० च्या टोकियो ऑलम्पिक मध्ये मीराबाई चानू यांनी सर्वोत्तम कामगिरी केली, यामध्ये मीराने ४९ किलो गटामध्ये सहभाग दर्शवून भारताला रौप्य पदक प्राप्त करून दिले.
मीराबाई चानू

मीराबाई चानू पुरस्कार व सन्मान

 • मणिपूर राज्य सरकारने मीराबाईला एक कोटी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक या पदावर नियुक्त केल्याची घोषणा केली आहे.
 • २०१८ मध्ये मीराबाई चानू हिला भारत सरकारने राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराने सन्मानित केलं. २०१८ मध्ये चानूला खेळ विभागातून पद्मश्री पुरस्कार पण प्रदान करण्यात आला.

मीराबाई चानू बद्दल मनोरंजक तथ्ये

 • टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत भारतासाठी वेटलिफ्टिंग मध्ये रौप्य पदकाची कमाई केल्या बद्दल मीराबाई चानू हिच्या स्वागताला गाड्यांचा मोठ्यांचा मोठा ताफा होता, पण एवढं सगळं वैभव मिळूनही मीराबाईंचे पाय आजही जमिनीवर आहेत.
 • मीराबाई चानूचा जन्म दि. ८ ऑगस्ट १९९४ रोजी मणिपूर मधील इंफाळा इथे झाला. राजधानी इंफाळा पासून २०० किलोमीटर मीराबाई चानूच गाव. लाकूड हे घरातील मुख्य इंधन.
 • वयाच्या अकराव्या वर्षी मीराबाई चानुने स्थानिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकले. नंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय आणि आशियाई ज्युनिअर स्पर्धेत भाग घेऊन, आपल्या वेटलिफ्टिंगच्या कारकीर्दीला सुरुवात केली.
 • बऱ्याच संघर्षानंतर मीराबाई चानु यांना यश मिळालं. मणिपूरच्या मीराबाई चानुने आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चितच भारताचे नाव उज्वल केले. त्यांनी यापूर्वी अनेक वेळा आपल्या क्षमतेच्या जोरावर देशाचं नाव उंच केले.

मीराबाई चानू यांचा विश्वविक्रम

 • मीराबाई चानू यांनी आतापर्यंत देशासाठी अनेक पदक जिंकली आहेत.
 • २०१४ साली त्यांनी ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकलं.
 • २०१६ च्या ऑलिंपिक स्पर्धेच्या पात्रात सामान्यतः वेटलिफ्टर कुंजर राणीचा पराभव करून, चानुने ऑलम्पिक मध्ये आपलं स्थान निर्माण केलं, मात्र २०१६ ऑलिंपिक मध्ये तीन प्रयत्नात वजन उचलण्यासाठी त्या अपयशी ठरल्या.
 • २०१७ मध्ये मीराबाईंनी ४८ किलो गटात सहभाग घेऊन सुवर्णपदक जिंकल.
 • त्याच वेळी चानु यांनी २०१८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदकही जिंकले.
 • एप्रिल २०२१ मध्ये ताश्कंद येथे झालेल्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मीराबाई चानू यांनी महिलांच्या ४९ किलो वजनाच्या गटात तब्बल ११९ किलो वजन उचलून नवीन विश्वविक्रम केला.
 • दुसरीकडे मीराबाई चानू यांना स्नेच मधील खराब कामगिरीमुळे आशियाई सामन्यात कांस्यपदावर समाधान मानावे लागल होत, पण त्यांनी हार मानले नाही आणि आजच चित्र तर आपल्यासमोर आहेच.

वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप २०१७ मध्ये सुवर्णपदक जिंकले

२०१७ मध्ये मीराबाई चानुने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये १९४ किलो वजन उचलून सुवर्णपदक स्वतःच्या नावे करून घेतले.

त्यावेळी मीराबाई या केवळ २२ वर्षाच्या होत्या. अवघ्या बावीस वर्षांमध्ये १९४ किलो वजन उचलणाऱ्या मीराबाई पहिल्या भारतीय खेळाडू होत्या.

जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय

जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये पदक प्राप्त करणाऱ्या मीराबाई चानू या पहिल्या भारतीय वेटलिफ्टर आहेत. मीराबाईने २०१७ मध्ये ४९ किलो वजनाच्या गटात सक्रिय सहभाग दर्शवला होता.

यानंतर २०१४ मध्ये मीराबाईने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४९ किलो वजनी गटामध्ये सहभाग दर्शवून रौप्य पदक पटकावले, यानंतर मीराबाईने राष्ट्रकुल क्रीडा २०१८ मध्ये सुवर्णपदक जिंकले.

मीराबाई चानू हिची रिओ ऑलंपिकच्या अपयशानंतर टोकियो ऑलंपिक चॅम्पियन बनण्यापर्यंतचा संघर्ष

टोकियो ऑलिंपिकच्या पहिल्या दिवसाची सुरुवात वादळाने, पावसाने झाली. पण या वातावरणामध्ये सुद्धा एक चांगली बातमी भारतासाठी आली, ती म्हणजे मीराबाई चानुने पहिल्याच दिवशी भारताचे पदकांचे खाते उघडलं.

मीराने महिलांच्या ४९ किलो वजनी गटामध्ये वेटलिफ्टिंग मध्ये हे पदक मिळवल आणि वेटलिफ्टिंगच्या या प्रकारामध्ये तीन स्नॅच प्रकारामध्ये ८७ आणि क्लीन अंड जर्क प्रकारांमध्ये ११५ किलो वजन उचललं.

जेमतेम २७ वर्षांची मीराबाई चानू आहे आणि तिचा इथ पर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. मणिपूरची राजधानी इंफाळ पासून २०० किलोमीटर दूर एका गावामध्ये तिचा जन्म झाला होता.

त्याकाळी मणिपूरच्या वेटलिफ्टर कुंजुराणी देवी एकदम स्टार होत्या आणि ऑलम्पिक मध्ये त्या खेळल्या होत्या आणि त्यांचाच आदर्श मीराबाई न घेतला.

सहा भावंडांमध्ये सर्वात लहान असलेल्या मीराबाईनं मग वेटलिफ्टर होण्याचा निर्णय घेतला. मीराबाईच्या जिद्दीपुढे तिच्या आई-वडिलांना सुद्धा माघार घ्यावी लागली होती आणि तिच्याकडे खरं तर सरावासाठी आवश्यक असलेल्या लोखंडाचा बार नव्हता, तेव्हा ती बांबूच्या बारने वेटलिफ्टिंगचा सराव करायची. गावामध्ये प्रशिक्षण केंद्र सुद्धा नव्हतं आणि त्यासाठी तिला जवळपास ५० ते ६०  किलोमीटर केवळ सरावासाठी दूर जाव लागायचं.

जेवणामध्ये चिकन आणि अंडी लागायची, आणि साधारण कुटुंबात जन्मलेल्या मीराबाईला ते सुद्धा शक्य नव्हतं. पण इतके अडचणी असताना सुद्धा मीराबाई थांबली नाही. तिनं जिद्दीन आपला प्रवास सुरू ठेवला.

अवघ्या ११ व्या वर्षी मीराबाई अंडर १५ चॅम्पियन होती आणि सतराव्या वर्षी ज्युनिअर चॅम्पियन  होती, ज्या कुंजुराणी देवींना ती आदर्श मानायची, त्यांचाच बारा वर्षे जुना विक्रम मीराबाईने १९२ किलो वजन उचलून मोडीत काढला होता.

एक वेळ अशी आली होती की रिओ ऑलिम्पिकला मीराबाई पोहोचू शकेल की नाही, हे सुद्धा तिला माहिती नव्हतं. तिथपर्यंत ती अखेर पोहोचली. अनेक अडथळ्यांवरती मात करून, पण तिला तिथे यश मिळवता आलं नाही. जे रीओ मध्ये साध्य झालं नाही, ते पाच वर्षांनंतर तिने टोकियो मध्ये साधलेले आहे.

मीराबाई चानू हिने एका मुलाखती दरम्यान सांगितलं होतं की, रीओ मधल्या अपयशानंतर काही काळ तिला डिप्रेशनचा त्रास सुद्धा झाला होता आणि खेळाला रामराम करावा असं सुद्धा तिच्या मनात आलं होतं.

पण तरीही त्यातनं बाहेर पडत तिने पुन्हा खेळाच्या सरावाला सुरुवात केली. त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये गोल्ड कोस्ट मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये मीराबाई चानूने भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं आणि आता थेट मीराने ऑलिंपिकच्या पदकाला झेप घेतलेली आहे.

मीराबाई चानू इतर छंद

वेटलिफ्टिंग शिवाय मीराबाईला डान्स करायला आवडतो आणि मीराने दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, सरावानंतर कधी कधी मी खोलीचं दार बंद करून डान्स करते आणि मला सलमान खान सुद्धा फार आवडतो.

मीराबाई चानू बद्दल १० ओळी

 • मीराबाई चानू हिचा जन्म दिनांक 8 ऑगस्ट 1994 मध्ये मणिपूर मधील गावामध्ये झाला.
 • टोकियो ऑलिंपिकच्या पहिल्याच दिवशी वेटलिफ्टिंग प्रकारात मीराबाईने धडाकेबाज कामगिरी करत भारताला रौप्य पदकाची कमाई करून दिली क्लीन अंड जर्क प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत मीराबाईने ४८ किलो वजनी गटात पहिलं पदक मिळवलं. मीराबाईने या स्पर्धेत २०२ किलो वजन उचललं.
 • सिडनी ऑलिंपिक मध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात पदकाची कमाई केलेल्या कर्णम मल्लेश्वरी नंतर मीराबाईने पहिल्यांदाच भारताला ऑलम्पिक पदक मिळवून दिले.
 • ऑलम्पिक मध्ये ऐतिहासिक पदकाची कमाई केल्यानंतर, मीराबाई चानुवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव झाला,परंतु मणिपूर सारख्या ईशान्येकडील राज्यातून येऊन ऑलिंपिक पातळीवर पदाची कमाई करण्याचा मीराबाईचा हा प्रवास सोपा नव्हता.
 • लहानपणी आपल्या घरच्यांसोबत लाकडं गोळा करायला जाणारी मीराबाई बाराव्या वर्षात लाकडांची मोळी सहज उचलायची. त्यावेळी मीराबाईच्या भावाला तिच्यात असलेल्या ताकदीची जाणीव झाली.
 • यानंतर घरच्यांच्या मदतीच्या जोरावर मीराबाईने वेटलिफ्टिंग प्रकारात खेळायला सुरुवात केली. आजही मीराबाई टोकियो मध्ये पदकासाठी झुंज देत असताना, मीराबाईचा परिवार आणि तिचे शेजारी घरात बसून टीव्हीवर हा तिचा सामना पहात, तिला प्रोत्साहन देतात.
 • मीराबाई चानू ने करिअरमध्ये देखील अनेक चढ-उतार आणि अनेकदा अपयश पाहिले. पाच वर्षांपूर्वी झालेल्या रिओ ऑलम्पिक मध्ये, मीराबाईला क्लीन अँड जर्क प्रकारात तीनही अटेम्प्ट मध्ये अपयश आलं होतं. त्यावेळी तिची टूर्नामेंट मधली कामगिरी गृहीत धरण्यात आली नव्हती.
 • २०१४ साली झालेल्या कॉमनवेल्थ गेम मध्ये मीराबाईने पहिल्यांदा तिची चमक दाखवली, तेव्हा ती २० वर्षांची होती.
 • २०१८ साली मीराबाईला पाठीच्या दुखण्याचाही सामना करावा लागला होता, पण अपयश आणि दुखण्याला हरून न जाता २०१९ साली मीराबाईने वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये २०० किलो वजन उचलून जोरदार कमबॅक केलं होतं.
 • त्यानंतर २०२१ च्या एशियन वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये मीराबाईने क्लीन अँड जर्क स्पर्धेत ११९ किलो वजन उचलून, नवा रेकॉर्ड केला. याच ऑलिंपिक मध्ये मिळालेल्या पदकासाठी मीराबाईने स्वतःचाच रेकॉर्ड ब्रेक केल.

FAQ

१. मीराबाई चानूबद्दल तुम्हाला काय माहिती आहे?

अवघ्या ११ व्या वर्षी मीराबाई अंडर १५ चॅम्पियन होती आणि सतराव्या वर्षी ज्युनिअर चॅम्पियन  होती, ज्या कुंजुराणी देवींना ती आदर्श मानायची, त्यांचाच बारा वर्षे जुना विक्रम मीराबाईने १९२ किलो वजन उचलून मोडीत काढला होता. एक वेळ अशी आली होती की रिओ ऑलिम्पिकला मीराबाई पोहोचू शकेल की नाही, हे सुद्धा तिला माहिती नव्हतं. तिथपर्यंत ती अखेर पोहोचली. अनेक अडथळ्यांवरती मात करून, पण तिला तिथे यश मिळवता आलं नाही. जे रीओ मध्ये साध्य झालं नाही, ते पाच वर्षांनंतर तिने टोकियो मध्ये साधलेले आहे.

२. मीराबाई चानूने किती किलो वजन उचलले?

मीराने महिलांच्या ४९ किलो वजनी गटामध्ये वेटलिफ्टिंग मध्ये हे पदक मिळवल आणि वेटलिफ्टिंगच्या या प्रकारामध्ये तीन स्नॅच प्रकारामध्ये ८७ आणि क्लीन अंड जर्क प्रकारांमध्ये ११५ किलो वजन उचललं.

३. मीराबाई चानूला सुवर्णपदक कसे मिळाले?

मीराबाईने २०१७ मध्ये ४९ किलो वजनाच्या गटात सक्रिय सहभाग दर्शवला होता. यानंतर २०१४ मध्ये मीराबाईने ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ४९ किलो वजनी गटामध्ये सहभाग दर्शवून रौप्य पदक पटकावले, यानंतर मीराबाईने राष्ट्रकुल क्रीडा २०१८ मध्ये सुवर्णपदक जिंकले.

४. मीराबाई चानू ऑलिम्पिक कोण आहे?

२०२० च्या टोकियो ऑलम्पिक मध्ये मीराबाई चानू यांनी सर्वोत्तम कामगिरी केली, यामध्ये मीराने ४९ किलो गटामध्ये सहभाग दर्शवून भारताला रौप्य पदक प्राप्त करून दिले.

५. मीराबाई चानूचे खरे नाव काय आहे?

मीराबाई चानूचा जन्म दि. ०८ ऑगस्ट १९९४ मध्ये मणिपूर राजधानी इंफाळ या ठिकाणी झाला. मीराबाईचे पूर्ण नाव साईखोम मीराबाई चानू आहे. मीराचा जन्म हा अतिशय सामान्य कुटुंबामध्ये झाला असून, मीराचे वडील साईखोम कृती हे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कर्मचारी आहेत तर, त्यांची आई साईखोम ओंगबी टॉम्बी लीमा एक छोटे दुकान चालवते.

६. मीराबाई चानू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

२०१७ मध्ये मीराबाई चानुने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप मध्ये १९४ किलो वजन उचलून सुवर्णपदक स्वतःच्या नावे करून घेतले. त्यावेळी मीराबाई या केवळ २२ वर्षाच्या होत्या. अवघ्या बावीस वर्षांमध्ये १९४ किलो वजन उचलणाऱ्या मीराबाई पहिल्या भारतीय खेळाडू होत्या.

७. वेटलिफ्टिंग शिवाय मीराबाई चानू यांना काय आवडते ?

वेटलिफ्टिंग शिवाय मीराबाईला डान्स करायला आवडतो आणि मीराने दिलेल्या एका मुलाखतीत तिने सांगितलं होतं की, सरावानंतर कधी कधी मी खोलीचं दार बंद करून डान्स करते आणि मला सलमान खान सुद्धा फार आवडतो.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास मीराबाई चानू यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment