गोपाळ हरी देशमुख यांची माहिती Gopal Hari Deshmukh Information In Marathi

एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रात अनेक समाजसुधारक होऊन गेले. या शतकात प्रारंभीच्या कालखंडात होऊन गेलेल्या अनेक समाजसुधारकांपैकी एक म्हणजे गोपाळ हरी देशमुख होय.

त्यांना आद्य सुधारक व आद्य प्रबोधनकारक म्हणून उल्लेखले जाते. एकोणिसाव्या शतकात वैचारिक प्रबोधनाचा पाया महाराष्ट्रात सर्वप्रथम गोपाळराव हरी देशमुख यांनी घातला.

त्यांनी प्रभाकर, या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लेखन लिहिले. त्यामुळे त्यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते.

म्हणूनच त्यांनी लिहिलेले सर्व लेख जनहितार्थ होते. त्यांच्या लेखनात समाजाचे हित पानोपानी जाणवते, म्हणून त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते.

Table of Contents

गोपाळ हरी देशमुख यांची माहिती Gopal Hari Deshmukh Information In Marathi

पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख
जन्म तारीख दि. १८ फेब्रुवारी १८२३
जन्म स्थळ पुणे
आईचे नाव काशीबाई
वडिलांचे नाव हरिपंत
पत्नीचे नाव गोपिकाबाई
ओळख लोकहितवादी
प्रसिद्ध वृतपत्रे ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश आणि लोकहितवादी
मृत्यू दिनांक ०९ ऑक्टोबर १८९२

गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म व कुटुंब प्रारंभिक जीवन

गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म दि. १८ फेब्रुवारी १८२३ मध्ये पुणे या ठिकाणी झाला. त्यांचे वडील हरिपंत हे दुसऱ्या बाजीरावांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणवीस होते. त्यांच्या आईचे नाव काशीबाई होते. गोपाळ रावांचे मूळचे आडनाव हे सिंधये होते.

Gopal Hari Deshmukh Information In Marathi

ते मूळचे कोकणातले होते. देशमुखी करून, उपजीविका करणारे गोपाळरावांचे कुटुंब त्यांचे आजोबा गोविंदराव यांच्या काळात इसवी सन १६५४ मध्ये पुणे येथे आले. गोपाळ रावांचे वडील  हरीपंत यांना तीन गावाची जहागीर होती.

 गोपाळ हरी देशमुख यांचे शिक्षण

इसवी सन १८३६ मध्ये हरिपंत मरण पावले,  गोपाळ रावांनी मराठी शिक्षण पूर्ण करून, इसवी सन १८४१ मध्ये इंग्रजी शिक्षण सुरू केले. इसवी सन १८४६ साली ते मुन्सिफची परीक्षा पास झाले.

हे सुद्धा वाचा –

गोपाळ हरी देशमुख यांचे वैयक्तिक जीवन

इसवी सन १८२९ साली गोपाळ रावांचा व्रतबंद झाला आणि इसवी सन १८३० साली त्यांचा विवाह झाला. त्यावेळी त्यांची पत्नी गोपिकाबाई चार वर्षाच्या होत्या.

Gopal Hari Deshmukh

गोपाळ हरी देशमुख यांचे करियर

  • इसवी सन १८५१ साली ते वाई येथे न्यायाधीश झाले.
  • इसवी सन १८५५ साली त्यांची नेमणूक सहाय्यक कमिशनर म्हणून झाली.
  • इसवी सन १८५६ साली ते कमिशनर झाले. पुढे गोपाळराव या पदावर होते.
  • इसवी सन १८६२ च्या दरम्याने सप्टेंबर महिन्यात ते सहाय्यक न्यायाधीश बनले.
  • इसवी सन १८६९ साली गोपाळराव याच पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यानंतर ते पुणे या ठिकाणी स्थित झाले.
  • या नंतर ते एक वर्ष रतलाम या संस्थेचे दिवाण म्हणून कार्यरत होते.

गोपाळ हरी देशमुख यांचे निधन

१८८९ नंतर त्यांची पत्नी, थोरले बंधू व जावई, तीन मुले व दोन मुली यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गोपाळराव यांचे मनोधैर्य प्रचंड खचले व गोपाळराव दिनांक ०९ ऑक्टोबर १८९२ रोजी मरण पावले.

गोपाळ हरी देशमुख

गोपाळ हरी देशमुख यांचे वृत्तपत्रातील लेखन

लोकहितवादी सुधारणा व्हावी या हेतूने अनेक वृत्तपत्रातून प्रबोधनपर लेखन गोपाळ हरी देशमुख यांनी केले. या प्रबोधनपर लेखामुळे समाज जागृती होण्यास आणि समाज सुधारण्यास मदत झाली.

विद्यावान आणि श्रेष्ठ पत्रकार व साहित्यिक दर्जाचे पत्रकार म्हणून, गोपारावांची ओळख होती. त्यांच्या लेखनाचा व्याप हा प्रचंड मोठा होता. ते लेखन कार्यात सतत मग्न असत.

भाऊ महाजन यांनी इसवी सन १८४० मध्ये प्रभाकर हे साप्ताहिक सुरू केले होते, या वृत्तपत्रातून गोपाळ रावांनी लोकहितवादी या शीर्षकाखाली वैचारिक निबंध प्रकाशित करण्यास सुरुवात केली. याशिवाय त्यांनी थिऑसफी, बुद्धी प्रकाश, ज्ञानप्रकाश, न्याय व बॉम्बे टाइम्स, इत्यादी.

लोकहितवादी

वृत्तपत्रे व मासिकातूनही विविध लेख प्रसिद्ध करून, तक्कालीन सामाजिक पद्धतीवर व रूढी परंपरांवर आघात केला.गोपाळ हरी देशमुख यांनी ऑक्टोबर १८८२ मध्ये आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि समाजात वैचारिक जागृती होण्यासाठी लोकहितवादी नावाचे मासिक सुरू केले.

गोपाळ हरी देशमुख यांची शतपत्रे

गोपाळ रावांनी ज्ञानप्रकाश, इंदुप्रकाश आणि लोकहितवादी ही वृत्तपत्रे सुरू केली. इ.स. १८४२ मध्ये त्यांनी लेखन कार्यासाठी आरंभ केला.

इसवी सन १८४८ मध्ये गोपाळ रावांनी लिहिण्यास सुरुवात केली. यानंतर इसवी सन १८५० पर्यंत त्यांनी शतपत्रे लिहिली. या शत पत्रातून त्यांनी तत्कालीन समाजाला उद्देशून, समाजातील लोक, हिंदू धर्मातील विषमता आणि अंधश्रद्धा या विषयावर टीकात्मक लेखन केले.

या सर्व वाईट कल्पना हिंदू धर्मातील लोकांनी टाकून दिल्या पाहिजेत, असे आवाहन जनतेला गोपाळरावांनी केले. त्यांनी हिंदू समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, म्हणून सामाजिक, धार्मिक, राजकीय, शैक्षणिक आणि आर्थिक सुधारणा बाबत आपली मते आपल्या लिखाणातून निर्भयपणे मांडली.

हिंदू समाजाची प्रगती व्हावी आणि त्या प्रगती मधील अडथळे दूर व्हावे हाच मुख्य उद्देश गोपाळ रावांनी सुरू केलेल्या चळवळीच्या पाठीमागे होता.

गोपाळ हरी देशमुख यांचे वाड्मयीन कार्य

गोपाळरावांनी इसवी सन १८५२ मध्ये वाड्मयीन कार्याला सुरुवात केली. वास्तविक पाहता इसवी सन १८४२ मध्ये त्यांनी लेखन कार्याला आरंभ केला.

त्याच वर्षी त्यांनी जी आर ग्लीग यांनी लिहिलेल्या हिस्टरी ऑफ अन अप्पर इंडिया या ग्रंथाच्या आधारे हिंदुस्थानचा इतिहास पूर्वार्ध लिहिला. हाच ग्रंथ इसवी सन १८६८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मराठी भाषेत ३६ ग्रंथ लिहिले.

१८५० च्या दरम्यान त्यांनी प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली. त्यांनी वेगवेगळ्या हिंदुस्थानाचा इतिहास व उदयपूरचा इतिहास व उदयपूरच्या राजपुताचा इतिहास हे त्यांचे इतिहास विषयक ग्रंथ, चांगलेच गाजलेले ग्रंथ आहेत.

गोपाळरावांच्या वांग्मय कार्यामुळे संस्कृती, राष्ट्रवादी भावना आणि देशप्रेम वाढीस लागले. गोपाळराव हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते. तरीही त्यांनी मराठी भाषेतून ग्रंथ निर्मिती केली.

हे विशेष होय. मराठी ही बहुजन समाजाची भाषा होती, या बहुजन समाजाला ज्ञानी करावयाचे असेल तर, मराठी भाषेतून ग्रंथ निर्मिती करणे गोपाळ रावांना महत्त्वाचे वाटत होते. आपल्या वाङ्मयातून गोपाळ रावांनी समाजाच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक प्रश्नांची परिमाणकारक मांडणी केली.

त्यांनी समाज आणि हिंदू धर्मातील दोषांवर प्रहार करून, ते जिव्हाळ्याच्या भावनेतून कमी करण्याचे प्रयत्न केले. लोकहितवादी, थोर विचारवंत व समाज सुधारक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांची ग्रंथसंपदा फार मोठी होती.

गोपाळराव यांनी शतकपत्रे लिहिण्यास सुरुवात केली होती. या लिखाणामुळे ते क्रांतिकारक समाज सुधारक म्हणून नावा रूपास आले.

हिंदुस्तानचा इतिहास, लक्ष्मी ज्ञान, ग्रामरचना, पानिपतची लढाई, गुजरात देशाचा इतिहास, जातीभेद, बँकेचा इतिहास,. यासारखे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिले त्यांनी लोकहितवादी नावाचे मासिक ऑक्टोबर १८८२ पासून काढण्यास सुरुवात केली.

गोपाळ हरी देशमुख यांचे ग्रंथसाहित्य

धार्मिक-नैतिक : (एकूण ७ पुस्तके)
  • गीतातत्त्व (१८७८)
  • निगमप्रकाश (मूळ गुजराती, इ.स. १८८४)
  • प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (१८८०)
  • सुभाषित अथवा सुबोध वचने (संस्कृत ग्रंथांतील सुभाषितांचे भाषांतर, १८७८)
  • खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध (१८५९)
  • आगमप्रकाश (गुजराती, १८८४).
  • आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद, १८८०)
समाजचिंतन 
  • कलियुग (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
  • जातिभेद (१८८७)
  • विद्यालहरी
  • प्राचीन आर्यविद्या व रीती (१८७७)
  • भिक्षुक (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
  • निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
इतिहास : (एकूण १० पुस्तके)
  • ऐतिहासिक गोष्टी भाग १ (१८७७)
  • ऐतिहासिक गोष्टी भाग २ (१८७८)
  • ऐतिहासिक गोष्टी भाग ३ (१८८०)
  • हिंदुस्थानचा इतिहास – पूर्वार्ध (१८७८)
  • भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास,१८५१)
  • उदेपूरचा इतिहास (कर्नल टॉडच्या ‘अ‍ॅनल्स ऑफ राजस्थान‘चे भाषांतर, १८९३)
  • गुजरात देशाचा इतिहास (१८८१)
  • सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास (गुजरातीवरून अनुवादित,१८९१)
  • पानिपतची लढाई (काशिराज पंडित यांच्या मूळ फार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावरून, १८७७.)
  • ऐतिहासिक गोष्टी भाग २ (१८७८)
  • ऐतिहासिक गोष्टी भाग ३ (१८८०)
  • लंकेचा इतिहास (१८८८)
संकीर्ण 
  • पदनामा (फार्सी पुस्तकाचा अनुवाद,१८५०)
  • होळीविषयी उपदेश (१८४७)
  • पुष्पयन(शेख सादीच्या ‘गिलिस्तों‘तील आठव्या अध्यायाचा अनुवाद, १८५१)
  • महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४८)
  • शब्दालंकार (१८५१)
  • सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण (१८५०)
  • यंत्रज्ञान “इन्ट्रॉडक्शन टु फिजिकल सायन्सेस‘ ह्या पुस्तकाचा अनुवाद, १८५०)
राज्यशास्त्र-अर्थशास्त्र 
  • स्थानिक स्वराज्य व्यवस्था (१८८३)
  • लक्ष्मीज्ञान (क्लिफ्टच्या पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे मराठी रूपांतर, १८४९)
  • स्वदेशी राज्ये व संस्थाने (१८८३)
  • हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार (दादाभाई नौरोजी यांच्या ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या निबंधाच्या आधारे, १८७६)
  • ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती (१८८३)
चरित्रे 
  • पंडित स्वामी श्रीमद्‌दयानंद सरस्वती (१८८३)
  • पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
निबंध 

लोकहितवादींची शतपत्रे

हस्तलिखित न सापडल्याने प्रसिद्ध करता न आलेली पुस्तके
  • एका दिवसात लिहिलेले पुस्तक
  • आत्मचरित्र
  • हिंदुस्थानातील बालविवाह
  • विचारलहरी
नियतकालिके
  • लोकहितवादी (ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक, एप्रिल१८८३पासून ते १८८७पर्यंत)
  • लोकहितवादी (डेमी आकारमानाचे वीस पृष्ठांचे मासिक, ऑक्टोबर १८८२पासून १८८७पर्यंत)
पुस्तके
  • विद्यालहरी
  • जातिभेद (१८८७)
  • निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
  • भिक्षुक (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
  • कलियुग (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
  • प्राचीन आर्यविद्या व रीती (१८७७)

गोपाळ हरी देशमुख यांची समाजसेवा

गोपाळ रावांनी आयुष्यभर लोकसेवा अर्थास समाजसेवा केली. त्यांनी लोक उपयोगी कार्य करण्यावर अधिक भर दिला. त्यांनी समाजा विषयी आणि समाजाचा सर्वांगीण विकास या विषयी अत्यंत तळमळ होती, म्हणूनच त्यांनी सरकारी नोकरी करत असतानाही, समाजसेवा निष्ठेने केली.

नोकरीच्या निमित्ताने गोपाळराव जेथे गेले, त्या त्या  ठिकाणी त्यांनी निरनिराळ्या संस्था स्थापन करून समाजसेवा करण्याचे कार्य केले. वाई येथे न्यायाधीश म्हणून काम करीत असताना, कृष्णा नदीला महापूर आला, तेथील पूर ग्रस्तांना त्यांनी आर्थिक मदत केली.

अहमदनगर व सुरत येथे असताना त्यांनी नवे उपक्रम सुरू करून नवीन संस्था स्थापन केली व वृत्तपत्रे सुरू करून, त्या शहराच्या सार्वजनिक जीवनात नवचैतन्य निर्माण केले.

सोसायटी व प्रार्थना समाज या संघटनेची त्यांचे जवळचे नाते होते. या दोन्ही संघटनांनी सुरू केलेल्या धर्म सुधारणाच्या कार्यास गोपाळ रावांनी मार्गदर्शन केले. ते आर्य समाजाचे काही काळ अध्यक्ष राहिले. त्यांचे कार्य सर्वव्यापी आणि बहुरंगी होते.

गोपाळ हरी देशमुख यांचे समाजकार्य

  • गरजू विद्यार्थांना आर्थिक व शैक्षणिक मदत
  • अहमदाबादेत प्रार्थना समाज व पुनर्विवाह मंडळाची स्थापना
  • गरजूंसाठी आपल्याच घरात मोफत दवाखाना
  • पंढरपूर येथील अनाथबालकाश्रम व सूतिकागृह स्थापनेत सहभाग
  • हितेच्छू ह्या गुजराती नियतकालिकाच्या स्थापनेत सहाय्य
  • गुजराती वक्तॄत्त्व मंडळाची स्थापना व त्याद्वारे व्याख्यानांचे आयोजन

गोपाळ हरी देशमुख यांची वैचारिक जागृती

महाराष्ट्रात होऊन गेलेल्या प्रारंभीच्या समाज सुधारकांपैकी गोपाळ रावांनी केलेले समाज सुधारण्याचे कार्य सर्वव्यापी होते. पाश्चात्य देशातील प्रगतीची जाणीव गोपाळरावांना होती.

पाश्चात्य समाजाच्या प्रगती प्रमाणे हिंदू समाजाची प्रगती करावयाची असेल तर, आपल्या देशात सामाजिक परिवर्तन आवश्यक ठरते, अशी त्यांची भूमिका होती.

हिंदू धर्मातील मागासलेपणा आणि समाजातील अज्ञानता नष्ट करण्यासाठी, सामाजिक परिवर्तन आवश्यक होते. नेमके हेच कार्य गोपाळरावांनी केले.

समाजामध्ये वैचारिक जागृती निर्माण होण्यासाठी, गोपारावांनी ज्ञानप्रकाश, बॉम्बे टाइम्स, इंदुप्रकाश, लोकहितवादी आणि प्रभाकर ही नियतकालिके, त्रैमासिक व वृत्तपत्रातून सातत्याने लिखाण करून सामाजिक जागृतीचे कार्य केले.

लोकहितवादी यांच्याबद्दल थोडक्यात माहिती

महाराष्ट्रातील धर्म प्रबोधनाच्या चळवळीतील अग्रणी असलेले गोपाळ हरीपंत देशमुख उर्फ लोकहितवादी हे होय. तसेच त्यांचं उपनव हे सिधेय होतं. त्यांच्या वडिलांचे नाव हरिपंत देशमुख असे होते. गोपाळ हरी देशमुख यांचे घराणे हे मूळचे कोकणातले, वतनदार होते.

गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म दि. १८ फेब्रुवारी १८२३ मध्ये पुणे या ठिकाणी झाला. इसवी सन १९ व्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाज सुधारक व इतिहास लेखक अशी गोपाळ हरी देशमुख यांची ओळख होती. गोपाळ रावांना ग्रंथ संग्रहाची व वाचनाची विलक्षण आवड होती.

इतिहास हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी इतिहास या विषयावर दहा पुस्तके लिहिली. गोपाळ रावांनी प्रभाकर या साप्ताहिका मधून, लोकहितवादी या टोपण नावाने त्यांनी समाज सुधारणा विषयक शतपत्रे लिहिली. भाऊ महाजन आणि विठ्ठल कुंटे हे या साप्ताहिकाचे संपादक होते.

गोपाळ रावांनी समाजातील दोषांवर टीका केली, समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून, सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे असे, त्यांना वाटत असे. अंधश्रद्धा, भोळ्या समजूती व संकुचित विचार यांचा त्याग करावा, असे गोपाळ हरी देशमुख सांगत असत.  

भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे, असे त्यांचे मत होते. लोकहितवादींनी बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्वाची पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केलेली आहे.

समाजाची उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांना वाटत असे. ज्या ज्या भागांमध्ये ते सरकारी अधिकारी म्हणून गेले, त्या भागांमध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली.

१८४४ मध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी सरकारी खात्यात दुभाष्याचे कार्य केले, तर १८४६ मध्ये शिरस्ते दाराचे काम केले, एकविसाव्या वर्षात न्यायालयात भाषांतरकार म्हणून गोपाळ रावांनी कार्य केले.

१८५२ पासून ते मुंबई सरकारच्या न्याय खात्यात न्यायाधीश झाले, त्या पदावर त्यांनी अहमदाबाद नाशिक आणि सातारा इथल्या कोर्टात काम केले. पण गोपाळ हरी देशमुख यांनी कुणाची मजुरी पत्करली नाही.

हिंदुस्थानात ज्ञाना बरोबरच तंत्रज्ञान व नाना प्रकारचे उद्योगधंदे वाढावेत ही, त्यांची तळमळ होती. जी.आर यांच्या हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया या पुस्तकाचे आधारे गोपाळराव देशमुख यांनी इसवी सन १८४२ मध्ये म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्तानाचा इतिहास हे पुस्तक लिहिले. परंतु या पुस्तकाचे प्रकाशन हे इसवी सन १८७८ मध्ये झाले.

इसवी सन १८४८ ते इसवी सन १८५० या काळात गोपाळ रावांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले, हेच निबंध लिखित वाड्मयाची शतपत्रे या नावाने ओळखली जातात. ब्रिटिश सरकारने गोपाळ हरी देशमुख यांना जस्टिस ऑफिस व रावबहादूर या पदव्या दिल्या आहेत.

गोपाळ रावांनी धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वांग्मय, ऐतिहासिक, सांस्कृतिक, इत्यादी विषयांवर त्यांनी लहान मोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहले आहे.

हिंदुस्थानचा इतिहास, लंका पाणीपत, गुजरात हे ऐतिहासिक, तर लक्ष्मी ज्ञान, हिंदुस्थानात दारिद्र्य येण्याची कारणे, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था, हे राजकीय व पृथ्वीराज चव्हाण, स्वामी दयानंद सरस्वती, हे चरित्रात्मक ग्रंथ त्यांनी लिहिले होते. हे त्यांच्या ३९ ग्रंथांमधील काही ग्रंथ.

गोपाळ हरी देशमुख हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते. ज्ञान ही शक्ती शहाणपणाचे अंति सर्व आहे, या शब्दात त्यांनी शिक्षण विषयक विचार मांडले होते. गोपाळ हरी देशमुख यांनी इसवी सन १८४८ साली पुण्यात एक ग्रंथालय काढले.

पुणा नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावाने स्थापन झालेले हे ग्रंथालय पुढे पुणे नगर वाचन मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.

प्रामुख्याने महाराष्ट्रात व गुजरातमध्ये त्यांनी आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला होता. १८५६ साली गोपाळराव असिस्टंट इनाम कमिशन या पदावर नेमले गेले व १८६७ साली त्यांनी अहमदाबाद येथे स्मॉल कॉच कोर्टात जज म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

गुजरात मधील प्रेमाबाई इन्स्टिट्यू तर्फे गोपाळराव दरवर्षी व्याख्यान माला करवीत आणि स्वतःही अनेक विषयावर भाषणे देत असत. तेथे त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. तसेच त्यांनी गुजराती पुनर्विवाह मंडळ सुद्धा स्थापन केले.

गोपाळ हरी देशमुख यांचे दिनांक ०९ ऑक्टोबर १८९२ मध्ये निधन झाले. अश्या ह्या महान समाज सुधारकास कोटी कोटी नमन.

गोपाळ हरी देशमुख यांच्याबद्दल १० ओळी

  • गोपाळ हरी देशमुख यांचा जन्म दि. १८ फेब्रुवारी १८२३ साली झाला.
  • हे एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाज सुधारक व इतिहास लेखक होते.
  • प्रभाकर नावाच्या साप्ताहिक आतून लोकहितवादी या टोपण नावाने यांनी समाज सुधारणा विषयक शतकपत्रे लिहिली.
  • भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुंटे हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमान काळात लिहिलेल्या एका शत पत्राचा इतिहास पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनातून स्पष्ट केला आहे.
  • संख्येने १००० असलेल्या निबंधात त्यांनी संस्कृत विद्या, पुनर्विवाह, घराधर्म करण्याची आवश्यकता, पुनर्विवाह सुधारणा आणि अधिक तीन सर्वांगीण सामाजिक सुधारणा घडवून आणण्यासाठीच आग्रह धरला होता.
  • आपल्या समाजातील रूढी परंपरावर त्यांनी टीका केली.
  • समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा दूर करून सर्वांगीण सामाजिक प्रगतीचा विचार सर्वांनी केला पाहिजे, समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन स्वतःची उन्नती साधावी, अंधश्रद्धा भोळ्या समजुती व संकुचित विचार यांचा त्याग करावा असे ते सांगत .
  • भारतीय समाजातील जातीव्यवस्था ही समाजाच्या अधोगतीला कारणीभूत झालेली आहे असे त्यांचे मत होते. म्हणून त्यांच्या जाती व्यवस्था, वर्णभेद याला विरोध होता.
  • उच्च वर्णीय यांनी आपल्या वर्ण श्रेष्ठत्वाच्या कल्पनांचा त्याग करून, देश हितासाठी नव्या आचार विचारांचा अंगीकार करावा, असे त्यांनी म्हटले होते. लोकहितवादी पद्धती, अशा अनिष्ट प्रथांवर टीका केली.
  • स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने अधिकार मिळाले पाहिजेत, त्यांना शिक्षण व विभाग याबाबत स्वातंत्र्य असावे, विधवांना पुनर्विवाह करण्याचा अधिकार असावा, असे विचार त्यांनी स्पष्टपणे मांडले होते. सुधारणा वादाचा विचार मांडणारे आणि स्वतः यांवर प्रखरपणे टीका करणारे, त्यांचे दोष त्यांच्या लक्षात आणून देणारे, तत्कालीन सुधारकांमध्ये, महत्त्वाचे सुधारक म्हणजे गोपाळ हरी देशमुख.
  • समाजाची उन्नती झाली पाहिजे आणि त्यासाठी संघटितपणे सर्वांनी प्रयत्न करावेत, असे त्यांना वाटत होते. शिक्षण हे त्यासाठी महत्त्वाचे माध्यम असले पाहिजे, सामाजिक मतभेद दूर करून, समाजामध्ये एकी निर्माण व्हावे, यासाठी प्रयत्न केले पाहिजे, आपल्या लिखाणातून त्यांनी समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला.
  • ज्या ज्या भागांमध्ये सरकारी अधिकारी म्हणून ते गेले, त्या भागामध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली. तत्कालीन सनात आणि समाजाला उदबोधन करताना, त्यांनी समाजाची गरज लक्षात आणून दिली.
  • अशा या सामाजिक सुधारण्याच्या काळामध्ये गोपाळ हरी देशमुख यांनी समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले.
  • गोपाळ हरी देशमुख यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते.
  • गोपाळराव देशमुख यांचे वडील हरिपंत देशमुख हे पुण्यात दुसऱ्या बाजीराव पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांचे फडणवीस म्हणून काम करीत होते. त्यांनी त्या विषयावर सुमारे दहा पुस्तके लिहिली.

गोपाळ हरी देशमुख यांना मिळालेले पुरस्कार

  • ब्रिटिशांनी गोपाळराव देशमुखांना ‘जस्टिस ऑफ पीस‘ या पदवीने आणि १८७७मध्ये ‘रावबहाद्दूर‘ या पदवीने सन्मानिले.
  • १८८१मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना ‘फर्स्ट क्लास सरदार‘ म्हणून मान्यता दिली.

FAQ

१. गोपाळ हरी देशमुख यांना परोपकारी का म्हणतात?

एकोणिसाव्या शतकात वैचारिक प्रबोधनाचा पाया महाराष्ट्रात सर्वप्रथम गोपाळराव हरी देशमुख यांनी घातला. त्यांनी प्रभाकर, या साप्ताहिकात लोकहितवादी या नावाने लेखन लिहिले. त्यामुळे त्यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते. म्हणूनच त्यांनी लिहिलेले सर्व लेख जनहितार्थ होते. त्यांच्या लेखनात समाजाचे हित पानोपाणी जाणवते, म्हणून त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते.

२. गोपाळ हरी देशमुख यांनी कोणते काम केले?

गोपाळ रावांनी आयुष्यभर लोकसेवा अर्थास समाजसेवा केली. त्यांनी लोक उपयोगी कार्य करण्यावर अधिक भर दिला.गोपाळरावांच्या वांग्मय कार्यामुळे संस्कृती, राष्ट्रवादी भावना आणि देशप्रेम वाढीस लागले. गोपाळराव हे इंग्रजी भाषेचे विद्वान होते. तरीही त्यांनी मराठी भाषेतून ग्रंथ निर्मिती केली. हे विशेष होय. मराठी ही बहुजन समाजाची भाषा होती, या बहुजन समाजाला ज्ञानी करावयाचे असेल तर, मराठी भाषेतून ग्रंथ निर्मिती करणे गोपाळ रावांना महत्त्वाचे वाटत होते. आपल्या वाङ्मयातून गोपाळ रावांनी समाजाच्या सामाजिक, धार्मिक, राजकीय व शैक्षणिक प्रश्नांची परिमाणकारक मांडणी केली.

३. गोपाळ हरी देशमुख यांचे आडनाव काय आहे?

गोपाळ रावांचे मूळचे आडनाव हे सिंधये होते. ते मूळचे कोकणातले होते.

४. गोपाळ हरी देशमुख यांचा मृत्यू कधी झाला ?

१८८९ नंतर त्यांची पत्नी, थोरले बंधू व जावई, तीन मुले व दोन मुली यांचा मृत्यू झाला. त्यामुळे गोपाळराव यांचे मनोधैर्य प्रचंड खचले व गोपाळराव दिनांक ०९ ऑक्टोबर १८९२ रोजी मरण पावले.

५. गोपाळ हरी देशमुख यांचे लग्न कधी झाले ?

इसवी सन १८२९ साली गोपाळ रावांचा व्रतबंद झाला आणि इसवी सन १८३० साली त्यांचा विवाह झाला. त्यावेळी त्यांची पत्नी गोपिकाबाई चार वर्षाच्या होत्या.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास गोपाळ हरी देशमुख यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment