राजगुरू यांची माहिती | Rajguru Information In Marathi

भारताचा स्वातंत्र्यलढा म्हणजे शेकडो क्रांतीकारकांच्या देशभक्तीची शौर्यगाथा. १८५७ ते १९४७ या ९० वर्षांच्या कालखंडाचा हा इतिहास.

यामध्ये धकधकते यज्ञकुंड आहेत, स्वातंत्र्य प्रेमींचा श्वासोच्छ्वास आहे, धगधगत्या ज्वाला आहेत , धूमसते निखारे आहेत, अनेक क्रांतिकारकांचे बलिदान. आत्मसमर्पण आणि हाल अपेष्टा ज्यांना सोसाव्या लागल्या आहेत आणि भोगाव्या लागल्या, अशा देशभक्तांची ही जीवनगाथा.

थोर स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्र सुपुत्र, स्वातंत्र्याच्या धगधगत्या अग्निकुंडात आपल्या प्राणाची आहुती देणारे, वयाच्या २३ व्या वर्षी भगतसिंग, सुखदेव, यांच्या समवेत मृत्यूलाही हसत हसत आलिंगन देणारे, थोर क्रांतिकारक, हुतात्मा, शिवराम हरी राजगुरू.

आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्वातंत्रसेनानी शिवराम हरी राजगुरू यांच्याबद्दल माहिती दिली आहे. ही माहिती व लेख जाणून घेण्यासाठी शेवट पर्यंत नक्की वाचा.

हे वाचा –

Table of Contents

राजगुरू यांची माहिती | Rajguru Informtion In Marathi

नाव शिवराम हरी राजगुरू
टोपणनाव एम , रघुनाथ
जन्म तारीख दि. २४ ऑगस्ट १९०८
जन्म स्थळ पुणे जिल्ह्यातील खेड
राष्ट्रीयत्व भारतीय
ओळख क्रांतिकारी
त्रिकुट राजगुरू , भगतसिंग व सुखदेव
आईचे नाव पार्वतीबाई
वडिलांचे नाव हरी नारायण
मृत्यू दि. २३ मार्च १९३१
मृत्यूचे कारण फाशी

कोण होते शिवराम हरी राजगुरू ?

जब तक मेरा देश, गुलामी से आजाद नही हो जाता, तब तक आझादी के लिये हम लढते रहेंगे | मेरी मौत से हजारो राजगुरू उठ खडे होंगे, जो ब्रिटिश सरकार को भारत से उखाड फेकेंगे |

आजच्या सामंतशाही, जात, वर्ग, पितृसत्ताक व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासाठी सुखदेव आणि राजगुरू यांनी जरी सोबत क्रांतीच स्वप्न पाहिलेलं असलं, किंवा सोबत क्रांतीची पथक आपल्या खांद्यावर घेऊन हसत हसत फासावर चढत या देशासाठी बलिदान दिले असलं, तरी भगतसिंग आणि सुखदेव यांच्या तुलनेत शिवराम हरी राजगुरू यांच्याबद्दल अत्यंत कमी लिखाण करण्यात आलेले आहे.

Rajguru Informtion In Marathi

भगतसिंग आणि सुखदेव यांचं नाव राजगुरू शिवाय अपूर्ण आहे. शहीद वीर राजगुरू हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या प्राण्यांची आहुती देणाऱ्या तरुणांसाठी, प्रेरणादायी उदाहरण आहेत. २४ ऑगस्ट ही क्रांतिकारक राजगुरू यांची जयंती साजरी केली जाते.

राजगुरू यांचा जन्म व सुरुवातीचे जीवन

राजगुरू यांचे खरं नाव शिवराम हरी राजगुरू. पुणे जिल्ह्यातील खेड येथे ब्राह्मण कुटुंबात २४ ऑगस्ट १९०८ मध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील हरि नारायण त्यांनी दोन विवाह केले होते.

हरि नारायण यांच्या पत्नीचे नाव पार्वतीबाई. पार्वतीबाई व हरि नारायण यांना पाच अपत्ये होती. राजगुरू हे त्यांचे पाचवे अपत्य. वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर मोठे बंधू आणि आईने त्यांचे संगोपन केले.

राजगुरू यांचे शिक्षण

राजगुरूंनी आपले प्रारंभिक शिक्षण गावातील एका मराठी शाळेत प्राप्त केले. राजगुरू लहानपणापासूनच देशप्रेमी होते, त्यांचे विचार क्रांतिकारक होते. लहानपणी १४ वर्षे इंग्रजी विषयातील अपयशामुळे त्यांच्या भावाने, आपल्या पत्नीसमोर त्यांना इंग्रजी धडा वाचण्याची शिक्षा केली.

हा अपमान सहन न झाल्याने, शिवराम हरी राजगुरू यांनी आपल्या अंगावरच्या कपड्यांनिशी, आईने तेल आणायला दिलेले नऊ पैसे व बहिणीने अंजीर आणण्यासाठी दिलेल्या दोन पैशासह आपले घर सोडलं.

त्या पैशाच्या आधारे राजगुरू यांनी १३० किलोमीटर पायी यात्रा करत, नाशिक शहर गाठले. काही दिवस मुक्काम करून, ते कानपूर नंतर काशीमध्ये आले.

तेथे अहिल्या घाटावर त्यांनी काही दिवस मुक्काम केला. काशी येथे त्यांनी आपले शिक्षण आणि संस्कृत विषयाचा अभ्यास केला. १५ वर्षाच्या वयापर्यंत त्यांना संस्कृत भाषेत चांगले ज्ञान प्राप्त झालं. ते एक ध्यानी व्यक्ती बनले होते.

Rajguru

राजगुरू यांचे क्रांतीकडे पाऊल

१९०८ साल होतं जेव्हा पुणे जिल्ह्यात खेड येथे शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म झाला. पुण्याच्या नूतन मराठी हायस्कूल मधून इयत्ता पाचवी पर्यंत शिक्षण झालं आणि मग ते गेले काशीला. तिथे वेदशास्त्र संपन्न होऊन, तर्क क्षेत्रात पदवी त्यांनी संपादित केली.

मराठी सोबतच इंग्रजी, कानडी, उर्दू, मल्याळम या भाषांवर त्यांनी प्रभुत्व संपादित केल. तसं पाहायला गेलं तर, त्यांचा कल होता तो आध्यात्मिक विषयाकडे, आपण पंडित व्हावं अशी त्यांची मनोमनी इच्छाही होती.

पण त्यांच्या नशिबात मात्र काही वेगळच वाढवून ठेवलं होतं, दरम्यानच्या काळात बाबाराव सावरकरांशी त्यांची ओळख झाली.

त्यांच्यामुळे राजगुरू अमरावतीच्या शारीरिक शिक्षण वर्गात गेले आणि तिथला अभ्यासक्रम पूर्ण करून ते विशारदही झाले. वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या शिवराम हरी राजगुरू यांचा सुरुवातीला ओढा जरी अध्यात्माकडे असला तरी, ते जेव्हा राजकारणात पडले तेव्हा मात्र त्या वृत्तीने त्यांना बनवलं क्रांतिकारक.

राजगुरूंना लहानपणापासून आझादी मध्ये सामील होण्याची इच्छा होते. नंतर ते क्रांतिकारकांच्या संपर्कात आले. यानंतर ते हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी मध्ये दाखल झाले.

याच काळात चंद्रशेखर आझाद यांच्या विचाराने ते अत्यंत प्रभावीत झाले. महात्मा गांधी नेहमीच अहिंसेवर विश्वास ठेवत. अहिंसा प्रमोधर्म ही त्यांची घोषणा होती. राजगुरूंना मात्र क्रांतिकारक मार्गाने मुक्ती हवी होती.

राजगुरू यांचा भगतसिंग, सुखदेव इतर क्रांतिकारकांशी संबंध  

सुखदेव आणि भगतसिंग यांच्याशिवाय पंडित चंद्रशेखर आझाद, सरदार भगतसिंग हे क्रांतिकारक त्यांचे अविभाज्य मित्र होते. आपल्या क्रांतिकारी जीवनात शिवराम हरी राजगुरू आपला प्रतिस्पर्धी म्हणून भगतसिंग यांच्याकडे पाहत होते.

ती स्पर्धा स्वार्थासाठी केलेली स्पर्धा नव्हती तर, ती क्रांतिकारक म्हणून देशासाठी सगळ्यात आधी बलिदान देण्याची होती आणि भगतसिंग हा माझ्या आधी शहीद झाला तर, याची चिंता त्यांना सारखी सतवत होती.

यामुळे संघटने कडे राजगुरू यांची मागणी असायची की, कुठल्याही कामात गोळी चालवण्याची पहिली संधी ही मलाच मिळाली पाहिजे.

सशस्त्र क्रांतिकारी संघटना का उदयास आली ?

राजगुरू हे हिंदुस्थान सोशॅलिस्ट रिपब्लिकन आर्मी मध्ये सामील झाल्यानंतर, त्यांचा संपर्क सुखदेव, भगतसिंग तसेच चंद्रशेखर आजाद यांच्याशी झाला. या संघटनेचा मुख्य हेतू देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करणे, हा होता.

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली, अहिंसेच्या मार्गातून स्वातंत्र्य मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. वेगवेगळी आंदोलने, उपोषणे व चळवळींचा तो काळ होता. या काळातच पंजाब येथे एका आंदोलनात लाला लजपतराय ब्रिटिशांच्या लाठी हल्ल्यांमध्ये मृत्यू पावले.

या प्रसंगामुळे शांततापूर्ण मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवणे शक्य नाही, असे देशवासीयांना वाटू लागले. यातून जन्म घेतला सशस्त्र क्रांतिकारी संघटनेने. या क्रांतिकारी संघटनेचे आघाडीचे कार्यकर्ते म्हणून राजगुरू यांना ओळखले जाते.

ब्रिटिश पोलीस अधिकारी सोंडर्सची हत्या

तर्क क्षेत्रात पदवी संपादन करून ते, काशी मध्ये आले, तिथे ते चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव आणि अनेक क्रांतिकारकांशी त्यांचा संबंध आला. आझाद यांनी राजगुरुना एम आणि रघुनाथ ही टोपण नावे दिली.

सुरुवातीच्या काळात हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ने लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी शांततापूर्ण आंदोलन केलं. परंतु सायमन कमिशनच्या विरोधात सुरू असलेल्या शांततापूर्ण मिरवणूक व आंदोलनावर, पोलिसांनी लाठी चार्ज केला.

लाला लजपत राय यांच्या डोक्यावर लाठी चार्ज झाला ते अत्यंत जखमी झाले व त्यातचे ते शहीद झाले. या घटनेचा जबाबदार इंग्रज पोलीस अधिकारी स्कॉट याला समजून भगतसिंग, राजगुरू, यांनी त्याला मारण्याचा निश्चय केला.

लाहोर इथल्या पंजाब बँक लुटण्याचा राजगुरूंचा प्रयत्न मात्र फसला, तेव्हा लाला लजपतरायांच्या छातीवर तडाखे मारणाऱ्या स्कॉटचा वध करून, लालाजींच्या निधनाचा बदला घेण्याची योजना राजगुरूंनी भगतसिंग समवेत आखली. योजनेनुसार स्कॉटवर गोळी झाडल्या, पण स्कॉट न मरता सोंडर्स हा ब्रिटिश अधिकारी ठार झाला.

सायमन कमिशनला विरोध करताना, मृत्युमुखी पडलेल्या लाला लजपत राय यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दि. १९ डिसेंबर १९२८ रोजी लाहोर सोंडर्स हत्याकांड प्रकरणी, सोंडर्स वर पहिली अचूक गोळी ही राजगुरू यांनी चालवली होती आणि त्यांच्या त्या एका गोळीने सोंडर्स जागेवरच ठार झाला.

इतकच नाही तर, दिल्ली असेम्ब्ली मध्ये बॉम्ब टाकण्यासाठी भगतसिंग यांच्यासोबत दत्त यांना न पाठवता, मला पाठवण्यात यावं असा राजगुरू यांचा आग्रह होता.

यासाठी त्यांनी चंद्रशेखर आझाद त्यांच्याकडे तसा प्रस्तावही दिला होता, परंतु आझाद यांनी राजगुरू यांची समजूत घातली. पण तरीदेखील राजगुरू यांचा आग्रह कायम राहिला, नवी दिल्लीच्या सेंटर असेंबलीवर हल्ला करण्यात राजगुरू यांचा मोठा हात होता.

त्यात सुखदेव आणि भगतसिंग यांचाही समावेश होता. यानंतर पोलिसांनी त्यांना पकडण्यासाठी मोहीम राबवली. नंतर आपला वेश पालटून इंग्रजांची नजर चुकवत राजगुरू यांनी लाहोर सोडलं.

राजगुरू यांना अटक

हावडा येथे पोहोचले आणि राजगुरू लखनऊ येथून बनारस येथे गेले. क्रांतिकारकांच्या वाढत्या मोहिमेमुळे, इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी पूर्ण शक्ती लावली होती. राजगुरू उत्तर प्रदेशातून, नागपूर येथे आले होते.

त्यांनी आर.एस.एस.च्या एका कार्यकर्त्याच्या घरी आश्रय घेतला. दि. ३० सप्टेंबर १९२९ ला नागपूरहून पुण्याला जात असताना, इंग्रजांनी त्यांना पकडलं. इंग्रजांनी विधानसभेत बॉम्ब फेकल्यानंतर, भगतसिंग सुखदेव आणि क्रांतिकारी दलाच्या इतर क्रांतिकारकांनी पकडलं होतं.

राजगुरू यांचा तुरुंगात छळ

त्यानंतर युरोपियन देशांमध्ये भगतसिंग सोबत राजगुरू त्यांचे नोकर बनवून, रेल्वेने कलकत्ता शहरात गेले. पुढे असेंबलीमध्ये त्यांनी बॉम्ब टाकला आणि यासाठी त्यांना अटक ही झाली.

यावेळेस अनेक क्रांतिकारक पकडले गेले, फितुरी मुळे राजगुरू यांना पुणे येथे अटक करून, त्यांच्यावर लाहोर येथे खटला चालविण्यात आला. लाहोरच्या कारागृहात त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला, तीव्र उन्हाळ्यात भट्ट्या लावून राजगुरूंना त्यामध्ये बसवण्यात आलं होतं. पण तरीही त्यांनी आपल्या सहकाऱ्यांची नावे सांगितले नाहीत.

क्रांतिकारी राजगुरू यांचे बलिदान

लाहोर मध्ये सर्व क्रांतिकारकांवर खटला घडण्यात आला. राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांच्यावर सोंडर्सच्या हत्येचा अपराध असल्याचा निकाल लावण्यात आला. त्यानंतर दि. २३ मार्च १९३१ मध्ये त्या तिघांना फाशी देण्यात आली.

इतिहासकारांच्या मते वीर आपल्या मृत्यूच्या पूर्वी आनंदाने गाणे गात होते. मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कार फिरोजपुर जिल्ह्यातील सतलज नदीच्या काठावर करण्यात आले आणि अशा पद्धतीने भारत मातेचे खरे वीर हुतात्मा झाले.

त्यावेळेस त्यांच वय होतं, केवळ २३ वर्ष. स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांना शतशः नमन.

११ तास आधी दिली भारताचे तीन सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी

२३ मार्च रात्री ब्रिटिश सरकारने भारताचे तीन सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्याची पूर्ण तयारी केली होती.

प्रत्येक रात्री प्रमाणे या रात्रीही हे तीन शूर सैनिक, भारत मातेला गुलामगिरीतून मुक्त करण्याचे स्वप्न पाहत होते, पण असं काही घडलं की, ब्रिटिश सरकारला नियोजित वेळेच्या अकरा तास आधी २३ मार्चला त्यांना फाशी द्यावी लागली. काय आहे याचा इतिहास ? जाणून घेऊया, सविस्तर.

शिवराम हरी राजगुरू

देशाच्या आणि जगाच्या इतिहासात २३ मार्च या तारखेला अनेक महत्त्वाच्या घटनांची नोंद झाली असली तरी, भगतसिंग आणि त्यांचे साथीदार राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी दिल्याची नोंद इतिहासात या दिवसाची भारतातील ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची घटना आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात दि. २३ मार्च १९३१ ला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतीकारांना फाशी देण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर दि. २३ मार्च १९५६ ला पाकिस्तान जगातला पहिला इस्लामिक प्रजासत्ताक बनलं, भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव हे भारताचे ते खरे सुपुत्र होते.

ज्यांनी आपल्या प्राणापेक्षा देशभक्तीला जास्त महत्त्व दिल आणि मातृभूमीसाठी बलिदान दिलं. २३ मार्च म्हणजे देशासाठी लढताना हसत हसत आपल्या प्राण्यांची आहुती देणाऱ्या, तीन शूर सुपुत्रांचा हुतात्मा दिवस हा दिवस देशाचा आदर आणि हिंदुस्थानी असल्याचा अभिमान तर देतोच पण भिजलेल्या अंतकरणाने शूरपुत्रांच्या बलिदानाला आदरांजली वाहतो.

भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दि. ०८ एप्रिल १९२९ ला सेंट्रल असेंबलीच्या जागेवर बॉम्ब फेकला. भगतसिंग यांनी बॉम्ब फेकल्यानंतर, फेकलेल्या पॅम्प्लेट मध्ये असं लिहिलं होतं, यात रक्तपात होऊ नये आणि आपला आवाज इंग्रजांपर्यंत पोहोचावा, अशी भगतसिंगांची इच्छा होती.

यानंतर त्यांनी स्वतःला पोलिसांना स्वाधीन केलं, त्यांच्या अटकेनंतर ब्रिटिश पोलीस अधिकारी जेपी सोंडर्सच्या हत्येमध्ये सहभागी असल्यामुळे, त्यांच्यावर देशद्रोह आणि खुनाचा खटला चालवला गेला. भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांनी १९२८ मध्ये लाहोर येथे, ब्रिटिश कनिष्ठ पोलीस अधिकारी सोंडर्स यांची गोळ्या घालून हत्या केली.

भारताचे तत्कालीन व्हॉइसरॉय लॉर्ड यांनी या प्रकरणाचा खटला चालवण्यासाठी, एक विशेष न्यायाधिकरण स्थापन केलं. ज्याने तिघांनाही फाशीची शिक्षा सुनावली.

ही शिक्षा दि. २४ मार्चला देण्यात येणार होती, पण तिन वीरांच्या फाशीची शिक्षा संपूर्ण देशात वाऱ्यासारखी पसरली, त्यानंतर फाशी बाबत ज्या प्रकारे निदर्शने आणि आंदोलने सुरू झाली, त्यामुळे ब्रिटिश सरकार घाबरलं होतं.

परिणामी भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना नियोजित तारखेच्या एक दिवस आधी, म्हणजे ११ तासापूर्वी फाशी देण्यात आली. तर दुसरीकडे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू फासावर जाताना देशभक्तीपर गीत गात होते.

राजगुरू यांना मिळालेले सन्मान

 • राजगुरूने आपल्या देशासाठी महत्त्वाचे कार्य केले, योगदान दिले, बलिदान दिले, त्यामुळे त्यांच्या समानार्थ त्यांचे जन्मलेले खेडे गाव हे आता राजगुरुनगर म्हणून ओळखले जाते.
 • १९५३ मध्ये हरियाणा राज्यातील हिसार शहरांमधील एका बाजाराला राजगुरूंच्या सन्मानाप्रत्यर्थ अजिगुरू मार्केट असे नाव देण्यात आले. सध्या हे मार्केट या शहरांमधील सर्वात प्रसिद्ध मार्केट आहे.

राजगुरू यांच्या जीवनावर आधारित चित्रपट

राजगुरू यांच्या जीवनावर आधारित दि. २२ ऑक्टोंबर २०१० रोजी क्रांतिकारक राजगुरू हा चित्रपट प्रदर्शित झाला. ज्याचे दिग्दर्शन विनोद कमले यांनी केले होते.

राजगुरू यांच्या जीवनावर आधारित पुस्तक

२००८ मध्ये राजगुरू यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. दि. २४ ऑगस्ट रोजी म्हणजेच त्यांच्या शंभराव्या वर्धापनादिना निमित्त राजगुरूंच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले गेले.

त्याचे लेखक अजय वर्मा यांनी लिखाण केलेल्या राजगुरू अजिंक्य क्रांतिकार्य पुस्तकांमध्ये राजगुरूंचे संपूर्ण जीवन व त्यांनी केलेल्या योगदानाचे महत्त्व वर्णिले आहे.

राजगुरू यांच्या बद्दल दहा ओळी

 • भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात पूर्ण इंग्रज सरकारला हादरवणारे, एक त्रिकूट होते. या त्रिकुटाचे नाव म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू.
 • शहीद राजगुरू यांचा जन्म दि. २४ ऑगस्ट १९०८ रोजी पुणे जिल्ह्यातील खेड या गावात झाला.
 • त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे होते.
 • त्यांच्या वडिलांचे नाव हरि नारायण तर, आईचे नाव पार्वतीबाई असे होते.
 • लहानपणी राजगुरू यांना रघुनाथ या नावाने ओळखले जायचे.
 • राजगुरू हे अवघ्या सहा वर्षाचे असताना, त्यांच्या वडिलांचे म्हणजे हरिनारायण यांचे निधन झाले. त्यांचे संगोपन त्यांच्या आई व त्यांच्या मोठ्या भावाने केले.
 • राजगुरूंचे प्राथमिक शालेय शिक्षण पुण्यात नूतन मराठी शाळेमध्ये पूर्ण झाले.
 • बनारस येते त्यांचा चंद्रशेखर व सचिंद्रनाथ या क्रांतिकारकांशी संबंध आला.
 • लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा सूड घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी सोंडर्स या ब्रिटिश पोलीस अधिकाऱ्यास गोळी झाडून त्याची हत्या केली.
 • अवघ्या २३ वर्षाच्या वयातच राजगुरूंनी हसत हसत भारत देशासाठी स्वतःचे बलिदान दिले.

राजगुरू विषयी काही मनोरंजक तथ्ये

 • राजगुरू यांचा जन्म पुण्यातील जिल्ह्यातील खेड या गावांमध्ये एका मध्यमवर्गी ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला.
 • बालपणापासूनच राजगुरू हे अतिशय धाडसी व क्रांतिकारी स्वभावाचे होते.
 • राजगुरू अवघ्या सहा वर्षाचे असताना, त्यांचे वडील हरि नारायण हे निधन पावले व त्यांचे पालन पोषण त्यांची आई व त्यांच्या मोठ्या भावाने केले.
 • राजगुरू हे चंद्रशेखर आझाद यांच्या विचारांनी प्रभावित झाले व त्यांच्या हिंदुस्तान सोशल रिपब्लिकन आर्मी मध्ये सामील झाले.
 • राजगुरू हे सरदार भगतसिंग व सुखदेव यांचे अगदी खास मित्र होते.
 • ब्रिटिश सरकारने अकरा तास अगोदरच भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना फासावर चढवले.
 • इन्कलाब जिंदाबाद हा राजगुरू यांचा प्रसिद्ध नारा होता.
 • दिनांक १९ डिसेंबर १९२८ मध्ये भगतसिंग व सुखदेव यांच्यासोबत राजगुरू यांनी ब्रिटिश पोलीस अधिकारी जेपी सोर्डसीची हत्या केली.
 • चंद्रशेखर आझाद यांनी राजगुरू यांना व रघुनाथ असे टोपण नाव दिले.
 • दिनांक २२ ऑक्टोंबर २०१० रोजी स्वातंत्र्य सैनिक राजगुरू यांच्या जीवनावर आधारित क्रांतिकारक राजगुरू हा चित्रपट विनोद कमले यांनी दिग्दर्शित केला व प्रदर्शित केला.

शिवराम हरी राजगुरू यांच्या बद्दल थोडक्यात सारांश  

जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. या पंक्ती आहेत, शहीद भगतसिंग शहीद सुखदेव व शहीद राजगुरू यांच्यासाठी २३ मार्च भारतीय इतिहासातील काळा दिवस.

कारण या दिवशी शहीद भगतसिंग सुखदेव व राजगुरू यांना इंग्रज सरकारने फाशी दिली. तो दिवस म्हणजे २३ मार्च आणि त्या दिवसाला आपण शहीद दिवस म्हणून ओळखतो. यांच्यापैकीच एक महाराष्ट्राच्या मातीतील शिवराम हरी राजगुरू यांच्या विषयी आपणास माहिती दिली आहे.

शहीद राजगुरू यांचा जन्म दि. २४ ऑगस्ट १९०८ साली महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे होते, लहानपणापासून क्रांतिकारी विचारांनी प्रभावीत असलेले संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले. तेथे चंद्रशेखर आजाद यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राजगुरूंवर पडला.

लाला लजपत राय यांची हत्या करणारा ब्रिटिश अधिकारी जॉन स्कॉट ची हत्या करण्याचा कट रचला गेला. या गटात राजगुरू देखील सहभागी होते. सेंट्रल असेंबली मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणला गेला, या घटनेत सुद्धा त्यांचा सहभाग होता.

सामान्य जनतेत क्रांतिकारी विचार जागृत करणे, हे या मागचे मुख्य कारण होते. स्वातंत्र्य संग्रामातील देशभक्तांना इंग्रजांनी पकडणे सुरू केले होते, एक एक करून सर्वांनाच पकडले जात होते, परंतु इंग्रज अधिकाऱ्यांना वारंवार चकवा देत राजगुरू निश्चित होते.

परंतु दुर्भाग्याने त्यांना पुण्यात असताना ते पकडले गेले व लाहोर कटा बद्दल सहभागी असल्याने, दि. २३ मार्च १९३१ रोजी राजगुरू सोबत भगतसिंग व सुखदेव या भारत मातेच्या सुपुत्रांना देखील फासावर लटकवण्यात आले.

शिवराम हरी राजगुरू यांचा व्हिडिओ

FAQ

१. राजगुरूचा जन्म कुठे झाला?

राजगुरू यांचे खरं नाव शिवराम हरी राजगुरू. पुणे जिल्ह्यातील खेड येथे ब्राह्मण कुटुंबात २४ ऑगस्ट १९०८ मध्ये त्यांचा जन्म झाला.

२. राजगुरू सुखदेव कोण होते

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात पूर्ण इंग्रज सरकारला हादरवणारे, एक त्रिकूट होते. या त्रिकुटाचे नाव म्हणजे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू.

३. राजगुरू कोणत्या राज्यातील होते?

शहीद राजगुरू यांचा जन्म दि. २४ ऑगस्ट १९०८ साली महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील खेड येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे होते, लहानपणापासून क्रांतिकारी विचारांनी प्रभावीत असलेले संस्कृत शिकण्यासाठी वाराणसी येथे गेले. तेथे चंद्रशेखर आजाद यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव राजगुरूंवर पडला.

४. राजगुरूंचा मृत्यू का झाला?

लाहोर मध्ये सर्व क्रांतिकारकांवर खटला घडण्यात आला. राजगुरू, सुखदेव आणि भगतसिंग यांच्यावर सोंडर्सच्या हप्त्याचे अपराध असल्याचा निकाल लावण्यात आला. त्यानंतर दि. २३ मार्च १९३१ मध्ये त्या तिघांना फाशी देण्यात आली.

५. राजगुरूंची जयंती कधी असते?

भगतसिंग आणि सुखदेव यांचं नाव राजगुरू शिवाय अपूर्ण आहे. शहीद वीर राजगुरू हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या प्राण्यांची आहुती देणाऱ्या तरुणांसाठी, प्रेरणादायी उदाहरण आहेत. २४ ऑगस्ट ही क्रांतिकारक राजगुरू यांची जयंती साजरी केली जाते.

६. राजगुरू कोण होते ?

थोर स्वातंत्र्य सेनानी, महाराष्ट्र सुपुत्र, स्वातंत्र्याच्या धकधकत्या अग्नि कुंडात आपल्या प्राणाची आहुती देणारे, वयाच्या २३ व्या वर्षी भगतसिंग, सुखदेव, यांच्या समवेत मृत्यूलाही हसत हसत आलिंगन देणारे, थोर क्रांतिकारक, हुतात्मा, शिवराम हरी राजगुरू.

निष्कर्ष

मित्रहो, आजच्या लेखाद्वारे आम्ही आपणास स्वातंत्र सैनिक शिवराम हरी राजगुरू यांच्या बद्दल माहिती दिली आहे.

स्वातंत्र्य प्राप्ती वगळता कोणतीही अभिलाषा मनात न धरता, केवळ आणि केवळ देशासाठी प्राणाची आहुती देणारे आणि महाराष्ट्राचे नाव क्रांतीपर्वात अढळ करणाऱ्या राजगुरू नामक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाला मानाचा मुजरा. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, धन्यवाद.

Leave a comment