संत कबीर माहिती मराठी | Sant Kabir Information In Marathi

आपल्या भारत देशात खूप संत होऊन गेले, त्यापैकी एक महान संत कबीरदास. कबीरदास कवी होते. हे दोहे लिहायचे, दोहे म्हणजे छोटे छोटे काव्य आणि ते विणकरही होते. त्यांनी आपल्या दोह्याच्या माध्यमातून, आपल्या वागण्यातून सदाचारी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच त्यांना संत म्हटले जाऊ लागले.

कबीर हे महान कर्मयोगी होते. कर्मयोगी म्हणजे काय? तर आपलं रोजचं नित्य नियमांचे काम करायचं आणि ते करता करता, ईश्वराची भक्ती करायची. कबीरांचे विचार, वागणं हे कोणत्याही काळासाठी प्रेरणादायी असेच आहे.

आजच्या लेखा द्वारे आम्ही आपणांस कबीरदास यांच्या बद्दल माहिती दिली आहे. हि माहिती जाणून घेण्यासाठी खालील लेख सविस्तर वाचा.

Table of Contents

संत कबीर माहिती मराठी Sant Kabir Information In Marathi

नाव संत कबीर दास
जन्म तारीख १३९८ इ.स
जन्म स्थळ वाराणसी, उत्तर प्रदेश
टोपण नावकबीर, कबीर दास, कबीर परमेश्वर, कबीर साहेब
व्यवसायसंत, कवी
निर्मितीकबीर ग्रंथावली, अनुराग सागर, सखी ग्रंथ, बीजक
धर्ममुस्लीम
मृत्यू इ.स. १५१८
मृत्यू स्थळ मगहर, उत्तर प्रदेश

कोण होते संत कबीर ?

कबीर उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत. महान कबीरदास म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत व समाजसुधारक होते. त्यांनी तात्कालीन प्रचलित असणाऱ्या धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यावर दोह्याच्या माध्यमातून टीका केली. ते सत्य, विज्ञान व कर्म सिद्धांत यावर लिहायचे. त्यांच्या लिखाणामुळे कबीर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले.

हे वाचा –

संत कबीरदास यांच्या जन्म, कुटुंब व प्रारंभिक जीवन

कबीरदास हे उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून प्रसिद्ध आहेत. कबीरदास यांच्या जन्म इसवी सन १४४० साली झाला. ज्येष्ठ पौर्णिमेस काशी मधील लहरताळा नावाच्या सरोवरात, एक प्रखर तेजस्वी प्रकाश यामध्ये कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले. हा सर्व प्रसंग तेथे असलेल्या अष्टानंद ऋषींनी पाहिला होता, धर्म संयोगाने काशीमधले एक मुस्लिम जोडपे, यांचे नाव निरू व निमा होते, ते तिथून जात असताना, निमा पाणी पिण्यासाठी त्या सरोवराकडे गेली, तेव्हा तिची नजर त्या तेजस्वी बालकावर पडली आणि ते जोडपे त्या बालकाला म्हणजे कबीर यांना आपल्या सोबत घेऊन गेले.

नंतर त्या मुलाचे नाव ठेवण्यासाठी बोलवले. जेव्हा कुरान उघडून पाहिले, त्या त्यावेळेस कुरान शरीफ मध्ये सर्वत्र फक्त कबीर आणि कबीर नावाच वाचण्यास मिळाले. कबीरचा अर्थ होतो की, सर्वज्ञ म्हणजे सर्वात मोठा. पण हे नाव ठेवण्याची मुळीच इच्छा नव्हती, पण इच्छा नसतानाही त्यांचे नाव कबीर ठेवण्यात आले आणि पुढे ते बालक महान कवी संत कबीर नावाने प्रसिद्ध झाले.

कबीर जरी मुस्लिम कुटुंबात राहत होते, तरी ते रामाचे उपासक होते, संत कबीर यांनी विवाह केला नव्हता. कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची मुलगी त्यांची मानलेली मुले होती. कबीर हे काशीद विणकर म्हणून काम करत होते, ते आयुष्यभर काशीमध्येच राहिले. पण मगहर येथून ते सहशरीर हा मृत्यूलोक सोडून निर्धामाला गेले.

कबीरदास यांनी स्वामी रमानंद यांना आपले गुरु मानले होते. महान कबीरदास म्हणजे काळाच्या पुढे असलेले कवी संत समाज सुधारक होते. कबीर भारतीय भूमीमध्ये जन्म घेतलेल्या, श्रेष्ठ संत यापैकी एक गुरु होते. धार्मिक तोंडावर काळे आसूड उडणारे आणि हजारो ग्रंथाचे पांडित्यखुजे करणाऱ्या प्रेमाच्या अडीच अक्षराच्या मंत्र सांगणारे, पुरोगामी संत म्हणजे कबीर. त्यांनी तात्कालीन प्रचलित असणाऱ्या, धर्मातील अंधश्रद्धा व अनिष्ट प्रथा यांच्यावर दोह्याच्या माध्यमातून टीका केली.

त्यांच्या लिखाणामुळे तत्कालीन अनिष्ट प्रथा आणि अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू बाबा व बुवा सनातनी यांचे धाबे दणाणले होते. कबीर यांनी लिहिलेले बहुतांश दोहे यावर विज्ञानवादी, बुद्ध धम्माच्या प्रभाव दिसतो. संत कबीर हे सत्य विज्ञान व कर्म सिद्धांत यावर लिहित त्यांच्या लिखाणामुळे कबीरदास संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध झाले.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कबीर यांना गुरु मानले. एवढ्या शतकानंतरही, महान संत यांचे विचार आजही समर्पक वाटतात. त्यांचे दोहे, त्यांचे विचार आजही जगाला प्रेरणा देतात.

Sant Kabir Information In Marathi

संत कबीर यांची कौटुंबिक माहिती

आईचे नाव निमा
वडिलांचे नाव नीरु
अपत्य पुत्र – कमाल
कन्या – कमाली

संत कबीर यांची प्रेरणादायी कथा

असाच एक प्रेरणादायी विचार त्यांनी आपल्या रोजच्या व्यवहारातून मांडला, एकदा एक माणूस कबीरांकडे आला आणि म्हणाला की, आपल्याला रोज रोज प्रवचन ऐकायची काय गरज आहे, तुम्ही आम्हाला नेहमी सांगता की चांगलं काम करत जा, रोज त्याच त्याच गोष्टी केल्याने, काय फायदा होतो ? कबीरदासजींनी त्या व्यक्तीचं म्हणणं नीट ऐकलं आणि काहीही न बोलता एक हातोडा घेतला आणि जवळच असलेल्या जमिनीत रुतलेल्या एका खिळ्यावर जोरात मारला आणि परत ते कामात मग्न झाले, कबीर काही बोलत नाहीत, म्हणून तो माणूस तसाच निघून गेला.

दुसऱ्या दिवशी तो परत आला आणि त्यांनी तोच प्रश्न विचारला, कबीरदासांनी परत तीच कृती केली, तो तसाच निघून गेला. तिसऱ्या दिवशी तो परत आला, कबीरदासांनी परत तेच केलं, हातोडा घेतला आणि त्याखिल्यावरती जोरात मारला आणि तो आठवडा ठेवून दिला, आता मात्र त्या माणसाला खूप राग आला. तो म्हणाला की अहो रोज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तरच देत नाहीये, तेव्हा कबीर म्हणाले की, अरे बाबा मी रोजच तुझ्या प्रश्नाचे उत्तर देतोय, या खिळ्यावर हातोडा मारून जमिनीत याची पकड मजबूत करतोय, ते खिळ्याच्या दोरीला बांधलेले, प्राणी त्याला खेचून खेचून तो खिळा सैल करतात आणि परिणामी तो खिळा  जमिनीतून निघून जाईल आणि तो निरोपयोगी होईल.

अशाच प्रकारे, आपल्या मनातील वाईट विचार, आपल्या चुका, आपल्या आजूबाजूची परिस्थिती, आपल्याला चांगल्या मनस्थितीतून बाहेर काढत असते, सत्संग म्हणजे काय ? चांगल्या लोकांच्या संगतीत राहायचं, सत्संग हा आपल्या मनरूपी खिळ्यावर एक सारखा प्रहार करत असतो, म्हणजे आपले विचार आणि भावना या सकारात्मक राहतील. आपण वाईट कामांपासून दूर राहू, म्हणून रोज प्रवचने ऐकले पाहिजे, आपण रोज ध्यान केलं पाहिजे, म्हणजे आपली स्थिती चांगली राहील.

शिवकृपानंद स्वामी आपल्याला नेहमी सांगतात की, प्रवचनाच्या माध्यमातून जे हजारो लाखो आत्म ऊर्जाग्रहण करत असतात ना, तोच उर्जेचा प्रवाह दरवेळेस आपल्याला तेच प्रवचन परत ऐकताना होतो आणि आपल्याला ती सगळी ऊर्जा प्राप्त होते आणि प्रवचनाच्या माध्यमातून गुरुदेवांना जे संदेश साधकांपर्यंत पोहोचवायचे असतात, ते आपल्या मनावर एक सारखे बिंबवले जातात आणि याच्यातून एक चांगला संस्कार आपल्यामध्ये संक्रमित होतो. आणि हा चांगला संस्कार संक्रमित झाल्यामुळे काय होईल ? तर आपण वाईट गोष्टींपासून दूर तर आहोत, पण आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या वाईट घटना, वाईट विचार, त्याच्यावर आपला काहीच ताबा नसतो. या सगळ्यांचाही आपल्या वरती काहीही वाईट परिणाम होत नाही.

Sant Kabir

संत कबीर यांचे गुरु

कबीर हे काशीचे अति प्रसिद्ध महात्मा रामानंद यांना स्वतःचे गुरु मानत असत. कबीर म्हणत असत की, रामानंदजींनी कबीर यांना अस्पृश्य जातीचे समजून पहिले, त्यांना शिष्य बनवण्यास नकार दिला होता. परंतु एके दिवशी कबीर गंगेच्या तीरावर गेले व गंगेच्या काठी असणाऱ्या पायऱ्यांवर कबीर झोपले. रामानंद रोज पहाटे गंगा तीरावर स्नान करण्यासाठी जात असत, त्यावेळी अंधारात रामानंदजींचा पाय कबीरांना लागला व तोंडामधून राम राम हे उच्चार निघाले, तेव्हापासून कबीरांनी रामानंदजींना स्वतःचे गुरु मानून, रामाचे नाव गुरु मंत्र म्हणून स्वीकारले.

संत कबीर

संत कबीर यांचा धर्म

कबीरदास यांच्या मते खरा धर्म हा एक योग्य व चांगली जीवनपद्धती आहे. कबीरदास म्हणत असत, तुम्ही जगा व तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. तुमचे जीवन शाश्वत करण्यासाठी, अत्यंत मेहनत करा. निवृत्ती घेण्यासारख्या जीवनामधील जबाबदाऱ्यांपासून, तुम्ही कधीही लांब जाऊ नका. जबाबदाऱ्या सोडून आयुष्य जगणे हा खरा धर्म नाही, असे वेदांमध्ये सुद्धा सांगितले आहे. कबीर यांनी त्यांच्या दोह्यामधून सर्व धर्मसमभावाची शिकवण जनतेस दिली.

संत कबीर एक महान कवी

  • कबीरदास हे एक महान व प्रसिद्ध कवी सुद्धा होते. भारतामधील अग्रगण्य आध्यात्मिक कवी म्हणून कबीरदास यांचा उल्लेख केला जातो. ज्यांनी त्यांच्या विचारांनी व कविता रचनेने लोकांचे जीवन उन्नत करण्यासाठी प्रयत्न केले.
  • कबीरदास हे महान विचारवंत होते, त्यांनी त्यांच्या विचारसरणीच्या आधारावरती प्रसिद्ध व महान कवितांची रचना केली. त्यांच्या विचारांच्या आधारे, त्यांनी जनतेमध्ये व समाजातील चालत आलेल्या वाईट गोष्टींच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कडवे काव्यग्रंथ लिहिले.

संत कबीर यांचे धर्मावरील विचार

कबीरदास असे मानत की, सर्व मानव समान आहे. मग तो हिंदू असो, मुस्लिम असो किंवा इतर कोणत्याही धर्माचे असो. कारण मानवामध्ये एकाच देवाचा अंश आहे. ईश्वर प्राप्तीसाठी विविध धर्मामध्ये अवलंबलेल्या पद्धती संत कबीर यांनी नाकारल्या, संत यांचा सुफी व वैष्णव धर्मावर विश्वास होता. संत यांचा मनाच्या उपासनेवर, म्हणजेच आध्यात्मिक उपासनेवर प्रचंड विश्वास होता.

संत कबीर यांच्या रचना

  • संत यांनी समाजामधील प्रचलित चालीरीती, अस्पृश्यता, जातीभेद, धार्मिक भेदभाव, यांचा समूळ नाश करण्यासाठी अनेक गोष्टींची निर्मिती केली. त्यांच्या मुख्य कृतीच्या संग्रहाला बीजक म्हणतात. याचे तीन भागांमध्ये रूपांतर केले गेले – सखी, सबद, रमणी.
  • कबीर यांनी समाज सेवेसाठी व समाज सुधारण्यासाठी काही विशेष कार्य केले, ते कार्य त्यांचे प्रिय शिष्य धर्मदास यांनी एकत्रित करून ठेवले आहे. संत कबीर यांनी आत्मवत सर्वभूतेषु ही मूल्ये प्रस्थापित केली. आपल्या कलाकृतीमध्ये, कबीर यांनी स्पष्ट भाषेचा वापर करून अहंकार, दिखाऊपणा, जीवनातील नैतिक मूल्ये, नैतिकता, चांगली संगत, इत्यादींवर अगदी मुक्तपणे लिहिले आहे. कबीर यांनी काव्यपरंपरेत आपली छबी व लिहिलेल्या कलाकृती या हिंदी साहित्याचा अमूल्य ठेवा आहेत.

संत कबीर यांचे प्रेरणादायी विचार

  • जर आपल्यासमोर गुरु आणि ईश्वर एक साथ उभे राहिले, तर तुम्ही कोणाचे चरण स्पर्श करणार, गुरुने आपल्या ज्ञानाने ईश्वराला भेटण्याचा मार्ग आपल्याला दाखवला, त्यामुळे गुरुची महिमा ईश्वरापेक्षा वर आहे. आणि आपण गुरुचे चरण स्पर्श करायला पाहिजे, हे जे शरीर आहे ते विषाने भरलेले आहे आणि गुरु अमृताची खान आहे, जर आपले शीर देण्याच्या बदल्यात आपल्याला खरा गुरु मिळत असेल, तर हा सौदा पण खूप स्वस्त आहे.
  • जर मी संपूर्ण धरतीला कागद बनवले, जगातील सर्व झाडांची कलम बनवली आणि सात समुद्राची शाही बनवली, तरी गुरुच्या गुणांना लिहिणे संभव नाही.
  • अशी भाषा बोलायला पाहिजे, जी ऐकणाऱ्याच्या मनाला खूप चांगली वाटेल. अशी भाषा दुसऱ्या लोकांना सुख देते तसेच स्वतःलाही सुखाचा अनुभव होतो.
  • खजुराचे झाड खूप मोठे असते, उंच असते, परंतु ते कोणाला सावली देऊ शकत नाही आणि त्याचे फळ देखील खूप उंचावर असते, याप्रमाणे जर तुम्ही कोणाचे भले करू शकत नाही, तर असे मोठे होऊन काही फायदा नाही.
  • दुसऱ्यांची निंदा करणाऱ्या लोकांना, नेहमी आपल्या जवळ ठेवायला पाहिजे. कारण असे लोक तुमच्या जवळ राहतील तर, तुमच्या चुका तुम्हाला सांगत राहतील आणि तुम्ही सहजपणे तुमच्या चुका सुधारू शकाल. त्यामुळे संत कबीर म्हणतात, निंदक लोक मनुष्याचा स्वभाव शांत बनवतात.
  • मी आयुष्यभर जगात वाईट शोधत राहिलो, पण जेव्हा मी माझ्या अंतकरणात डोकावून पाहिलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की, माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही. मी सर्वात स्वार्थी आणि वाईट आहे. आपण दुसऱ्यांमधील वाईट गुण बघतो, परंतु जर आपण स्वतःच्या अंतकरणात बघितले, तर समजेल की आपल्यापेक्षा वाईट कोणी नाही.
  • दुःखात असताना प्रत्येक मनुष्य ईश्वराला स्मरण करतो, परंतु सुखात सर्वजण ईश्वराला विसरतात. जर सुखातही ईश्वराचे स्मरण केले, तर दुःख कधी येणारच नाही.
  • जेव्हा कुंभार भांडे बनवण्यासाठी मातीत उडवतो, तेव्हा माती कुंभाराला म्हणते तू मला दुरत आहेस, एक दिवस असा येईल जेव्हा मी तुला सोडून जाईल.
  • मनुष्याच्या इच्छा पाण्याच्या बुडबुड्या सारख्या आहेत, जे बनतात आणि दुसऱ्या क्षणी नष्ट होतात. ज्या दिवशी तुम्हाला खऱ्या गुरुचे दर्शन होईल, त्या दिवशीही मोहमाया आणि सर्व अहंकार लपून जाईल.
  • चालत्या चक्कीला बघून कबीरदासाचे अश्रू येतात आणि ते म्हणतात की, चक्कीच्या पाठांमध्ये काहीच साबूत राहत नाही. माळीला येताना बघून बागेतील कळ्या म्हणतात की, आज माळीने फुले तोडली आणि उद्या आपली वेळ येणार, याचा अर्थ असा, आज तुम्ही जवान आहात, तरुण आहात, उद्या तुम्ही सुद्धा वृद्ध होणार. आज कळी आहे, ती उद्या फुल बनेल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, जे काम उद्या करायचे आहे, ते आज करा आणि जे आज करायचे आहे, ते आत्ताच करा. कारण एका क्षणात प्रलय होईल, मग तुम्ही तुमचे काम केव्हा कराल ?
  • ज्याप्रमाणे तिळामध्ये तेल असते आणि अग्नीमध्ये प्रकाश असतो, त्याचप्रमाणे आपल्यातही ईश्वर असतो. शोधू शकाल तर, शोधा. जिथे दया आहे, तिथे धर्म आहे आणि जिथे लोक आहे तिथे पाप आहे. जिथे पाप आहे, तिथे सर्वांनाश आहे आणि जिथे क्षमा आहे, तिथे ईश्वर आहे.
  • कमळ पाण्यामध्ये उगवतो आणि चंद्रमा आकाशात राहतो, परंतु चंद्राचे प्रतिबिंब जेव्हा पाण्यात पडते तेव्हा चंद्र आणि कमळ यांच्यात एवढे अंतर असूनही, दोघे किती जवळ असतात. पाण्यात चंद्राची प्रतिबिंब असे वाटते, जसे चंद्र स्वतः जवळ आला आहे. त्याच प्रकारे जेव्हा मनुष्य ईश्वरावर प्रेम करतो, तेव्हा  ईश्वर स्वतः चालून मनुष्याच्या जवळ येतो.
  • साधूची जात विचारू नका, त्याचे ज्ञान विचारा. ध्यानी माणसाच्या जातीपेक्षा, त्याचे ज्ञान महत्त्वाचे आहे. तलवारीची किंमत करा, ज्ञानाची नाही .ज्ञानाला पडून राहू द्या, जर तुमचे मन शांत असेल, तर जगात कोणीही तुमचा शत्रू बनू शकत नाही.
  • आतापर्यंतची वेळ गेली आहे, ती व्यर्थ गेली आहे. ना सज्जनाची संगत केली, ना कोणते चांगले काम केले, प्रेम आणि भक्ती शिवाय, मनुष्य पशु समान आहे आणि भक्ती करणाऱ्या मनुष्याच्या हृदयात भगवंत राहतो.
  • तीर्थ केल्याने, एक पुण्य मिळते. परंतु संतांची संगत केल्याने, चार पुण्य मिळतात आणि गुरु भेटला तर, अनेक पुण्य प्राप्त होतात.
  • लोक रोज आपल्या शरीराला साफ करतात, परंतु मनाला कोणीही साफ करत नाही, जो व्यक्ती आपल्या मनालाही साफ करतो, तोच खरा मनुष्य मानायच्या लायकीचा आहे.
  • प्रेम शेतामध्ये उगवत नाही किंवा बाजारात विकत मिळत नाहीत, ज्याला प्रेम हवे असेल, त्याला स्वतःचा क्रोध, काम, इच्छा, भय, याचा त्याग करावा लागेल.
  • ज्या घरामध्ये साधू आणि सत्य यांची पूजा होत नाही, त्या घरात पाप राहते. असे घर स्मशानासमान आहे, जिथे दररोज भूत प्रेत राहतात, जसे धान्यातील खडे.
  • कचरा भरण्यासाठी सूप वापरले जाते, तसा सुपासारख्या साधू विद्वानांची गरज आहे. जे समाजातील चांगल्या गोष्टीला टिकवून ठेवतील आणि नको असलेल्या गोष्टींना उडवून लावतील.
  • वेळ निघून गेली, तुम्ही ना परोपकार केला, नाही ईश्वराचे ध्यान केले, आता पश्चाताप करून काय होणार? आता वेळ निघून गेली आहे, जेव्हा मी होतो, तेव्हा देव नव्हता. म्हणजे जेव्हा मला अहंकाराने घेरले होते, तेव्हा देव दिसला नाही, पण गुरूच्या उपदेशाने, त्याच्या मार्गदर्शनातून, मला ज्ञानाचा प्रकाश दिसला आणि माझा अज्ञानरूपी अंधकार दूर झाला.
  • तुम्ही कितीही आंघोळ करा, पण मन साफ नसेल, तर आंघोळ करून काय फायदा ? ज्याप्रकारे मासा नेहमी पाण्यात राहतो, परंतु तरीही तो साफ होत नाही, त्याच्यातून दुर्गंध येतो.
  • ज्याला ईश्वरप्रेम आणि भक्ती प्रेम मिळवायचे असेल, त्याला क्रोध, काम, इच्छा यांचा त्याग करावा लागेल. लालची मनुष्य काम, क्रोध, इच्छा यांचा त्याग करू शकत नाही, परंतु प्रेम मिळवण्याची अपेक्षा करतो. जो व्यक्ती दुसऱ्यांची पीडा आणि दुःख समजतो, तो सज्जन माणूस असतो, आणि जो दुसऱ्याची पीडा समजू शकत नाही, त्याचा मनुष्य म्हणून काय उपयोग ?
  • ते लोक अंध आहेत, जे गुरुच्या महान त्यागाला समजू शकत नाहीत. जर ईश्वर तुमच्यावर रागावला तर गुरुच आधार आहे. पण जर गुरु तुमच्यावर रुष्ट झाला, तर जगात तुम्हाला कुठेही आधार नाही.

संत कबीर यांचे महापरिनिर्वाण

एवढ्या शतकानंतरही महान संत कबीर यांनी लिहिलेले दोहे आजही समर्पक वाटतात. असे हे कबीर यांचे दोहे युगानुयुगे विज्ञानवादी शिकवण देऊन सतत जगाला प्रेरणा देत राहतील. कबीर साहेब यांनी समाजाला उत्तम मार्ग त्याच्या दोह्यांच्या माध्यमातून सांगितला. अशा ह्या महान कबीरदास यांचा मृत्यू १५१८ मध्ये झाला. भारत सरकारने १९५२ साली कबीर यांच्यावर पोस्टाचे तिकीट काढले होते.

कबीरांविषयी मराठीतील पुस्तके

  • कहै कबीर मैं पूरा पाया (ओशो)
  • माझे माझ्यापाशी काही नाही (मूळ लेखक – ओशो, मराठी अनुवाद – भारती पांडे)
  • कहत कबीर (डॉ. मोहन विष्णू खडसे)
  • संत कबीर यांची अमृतवाणी (गजानन बुक डेपो प्रकाशन)
  • आदि श्री गुरुग्रंथसाहेबातील कबीर (संजय एस. बर्वे)
  • कहै कबीर दीवाना (ओशो)
  • संत कबीर – एक दृष्टा समाजसुधारक (डाॅ. मानसी विजय लाटकर)
  • कहत कबीर (डॉ. ज्योत्स्ना खळदकर)
  • संत कबीर रामदास : एक तुलनात्मक अभ्यास (डॉ. ज्योत्स्ना खळदकर)
  • कबीरवाणी (संत कबीरांच्या ५०० दोह्यांचा अर्थ, प्रा. रतनलाल सोनग्रा)
  • भारतीय साहित्याचे निर्माते – कबीर (प्रभाकर माचवे)
  • कबीर (कबीराच्या दोह्यांचा अनुवाद, मंगेश पाडगावकर)
  • कबीरायन (कादंबरी, डॉ. भारती सुदामे)
  • भारतीय परंपरा आणि कबीर (पद्मजाराजे पटवर्धन)
  • संत कबीर (मूळ लेखक प्रेमचंद ‘महेश’, मराठी अनुवाद – विद्याधर सदावर्ते)
  • भक्तीत भिजला कबीर (मूळ लेखक – ओशो, मराठी अनुवाद – भारती पांडे)
  • म्हणे कबीर दिवाणा (मूळ लेखक – ओशो, मराठी अनुवाद – भारती पांडे)
  • कबीर उपदेश (गजानन बुक डेपो प्रकाशन)
  • कबीर ज्ञानामृत : संत कबीरांचे १००८ दोहे ( स.ह. जोशी; गजानन बुक डेपो प्रकाशन)
  • मृत्यु अमृताचे द्वार (मूळ लेखक – ओशो, मराठी अनुवाद – मीना टाकळकर)
  • कबीरवाणी (संत कबीरांच्या दोह्यांचा अर्थ, डॉ. नलिनी हर्षे)
  • भक्त कबीराच्या गोष्टी (शंकर पां. गुणाजी)

संत कबीर यांच्या कविता

तेरा मेरा मनुवां।

तेरा मेरा मनुवां कैसे एक होइ रे ।
मै कहता हौं आँखन देखी, तू कहता कागद की लेखी ।
मै कहता सुरझावन हारी, तू राख्यो अरुझाई रे ॥
मै कहता तू जागत रहियो, तू जाता है सोई रे ।
मै कहता निरमोही रहियो, तू जाता है मोहि रे ॥
जुगन-जुगन समझावत हारा, कहा न मानत कोई रे ।
तू तो रंगी फिरै बिहंगी, सब धन डारा खोई रे ॥
सतगुरू धारा निर्मल बाहै, बामे काया धोई रे ।
कहत कबीर सुनो भाई साधो, तब ही वैसा होई रे ॥

बीत गये दिन भजन बिना रे।

बीत गये दिन भजन बिना रे ।
भजन बिना रे, भजन बिना रे ॥
बाल अवस्था खेल गवांयो ।
जब यौवन तब मान घना रे ॥
लाहे कारण मूल गवाँयो ।
अजहुं न गयी मन की तृष्णा रे ॥
कहत कबीर सुनो भई साधो ।
पार उतर गये संत जना रे ॥

केहि समुझावौ सब जग अन्धा।

इक दुइ होयॅं उन्हैं समुझावौं,
सबहि भुलाने पेटके धन्धा ।
पानी घोड पवन असवरवा,
ढरकि परै जस ओसक बुन्दा ॥ १॥
गहिरी नदी अगम बहै धरवा,
खेवन- हार के पडिगा फन्दा ।
घर की वस्तु नजर नहि आवत,
दियना बारिके ढूँढत अन्धा ॥ २॥
लागी आगि सबै बन जरिगा,
बिन गुरुज्ञान भटकिगा बन्दा ।
कहै कबीर सुनो भाई साधो,
जाय लिङ्गोटी झारि के बन्दा ॥ ३॥

राम बिनु तन को ताप न जाई।

जल में अगन रही अधिकाई ॥
राम बिनु तन को ताप न जाई ॥
तुम जलनिधि मैं जलकर मीना ।
जल में रहहि जलहि बिनु जीना ॥
राम बिनु तन को ताप न जाई ॥
तुम पिंजरा मैं सुवना तोरा ।
दरसन देहु भाग बड़ मोरा ॥
राम बिनु तन को ताप न जाई ॥
तुम सद्गुरु मैं प्रीतम चेला ।
कहै कबीर राम रमूं अकेला ॥
राम बिनु तन को ताप न जाई ॥

संत कबीर यांचे प्रसिद्ध दोहे

१. यह तन विष की बेलरी, गुरु अमृत की खान ।
शीश दियो जो गुरु मिले, तो भी सस्ता जान ।

२. बड़ा भया तो क्या भया, जैसे पेड़ खजूर ।
पंथी को छाया नहीं फल लागे अति दूर ।

FAQ

१. संत कबीर यांचे गुरु कोण होते?

रामानंद रोज पहाटे गंगा तीरावर स्नान करण्यासाठी जात असत, त्यावेळी अंधारात रामानंदजींचा पाय कबीरांना लागला व तोंडामधून राम राम हे उच्चार निघाले, तेव्हापासून संत कबीरांनी रामानंदजींना स्वतःचे गुरु मानून, रामाचे नाव गुरु मंत्र म्हणून स्वीकारले.

२. संत कबीर यांचा जन्म कधी झाला ?

संत कबीर यांच्या जन्म इसवी सन १४४० साली झाला. ज्येष्ठ पौर्णिमेस काशी मधील लहरताळा नावाच्या सरोवरात, एक प्रखर तेजस्वी प्रकाशात कबीर साहेब एका कमळाच्या फुलावर प्रकट झाले असे मानले जाते.

निष्कर्ष

मित्रहो, संत कबीर माहिती मराठी या लेखाद्वारे आम्ही आपणस महान संत कबीर यांच्याबद्दल माहिती दिली आहे. हा लेख तुम्हाला कसा वाटला? हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. लेख आवडल्यास तुमच्या इतर मित्र परीवारांसोबत नक्की शेयर करा. धन्यवाद.

Leave a comment